Skip to main content

तंत्रज्ञान

मिसळपाव - फोटोंसह लेख तयार करणे

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 28/04/2026 13:28 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव - फोटोंसह लेख तयार करणे

 

आपण मागच्या भागात ["नवीन मिसळपाव फोटो अपलोड". "//misalpav.com/fineart/53624"] गूगल फोटोज appवर फोटो चढवून त्याची शेअरिंग लिंक कशी मिळवायची ते पाहिले. 

 

आता या भागात एकापेक्षा अधिक फोटो देऊन लेख कसा लिहायचा ते पाहू. आपण संपूर्ण लेख प्रथम offline तयार करणार आहोत. प्रथम तुमच्या डिवाइसमधले नोट app वापरून त्यात (ब) मधले template उतरवा. 

 

अ)-एक शेअरिंग अल्बम गूगल फोटोज् appवर बनवून त्यात हवे असलेले सर्व फोटो टाकायचे. 

ब)-Template T

 

<p>   </p> 

कृत्रिम बुद्धिमत्ता, किसान जीपीटी, प्रोजेक्ट भाषिनी, आणि बरंच काही...

लेखक श्रीगणेशा यांनी बुधवार, 12/04/2023 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
---- कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) तंत्रज्ञान चर्चेत आहे. ते वापरून काय साध्य होऊ शकते, यावर दररोज नवीन कल्पना चर्चिल्या जात आहेत, विकसित केल्या जात आहेत.

आता तरी करंट जाणार का?

लेखक निनाद यांनी बुधवार, 05/01/2022 04:22 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि मेडिकल तंत्रज्ञान साठी भारत त्याच्या जवळपास सर्व सेमीकंडक्टर गरजांसाठी १००% परदेशी उत्पादकांवर अवलंबून आहे. अशा पार्श्वभूमीवर - केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर (मराठी: अर्धसंवाहक?) आणि डिस्प्ले उत्पादन उद्योगांच्या विकासासाठी ₹७६,००० कोटींच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या मोठ्या बातमी कडे फारसे लक्ष वेधलेले दिसत नाही. यामुळे धोरणात्मक महत्त्वाच्या क्षेत्रात भारताचा पाय रोवला जाईल अशी आशा आहे. पुढील सहा वर्षांत २० हून अधिक सेमीकंडक्टर डिझाइन, घटक उत्पादन आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन (फॅब) युनिट्सची स्थापना केली जाईल.

तांत्रिक संशोधनासाठी काय लागतं?

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 06/03/2021 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/48304 तांत्रिक शोधांसाठी कुतूहल, अचूक निरीक्षण आणि वेगळ्या प्रकारे विचार करता येणे या तीन गोष्टी महत्वाच्या आहे. त्यातही वेगळया प्रकारे ,वेगळ्या दिशेने विचार करता येणे सर्वात महत्वाचं असं माझं मत बनलं आहे. आता वेगळा विचार म्हणजे काय? तर उपलब्ध स्रोतांचाच वापर करुन त्याद्वारे समस्या सोडवणे. तांत्रिक शोध लावतानाही हेच होते. काहीतरी समस्या असते आणि नेहमीच्या मार्गांनी ती सुटत नाहीसे दिसू लागल्यावर जेव्हा वेगळ्या प्रकारे,वेगळ्या दिशेने विचार सुरु होतो तेव्हाच त्या समस्येवर उपाय मिळू लागतो.

फोन हॅक करून पैसे लुबाडता येतात?

लेखक निनाद यांनी मंगळवार, 09/02/2021 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
एका ग्रुपवर, फोन हॅक करून पैसे लुबाडले जातात असा विषय चालला होता. तथापि फोन कसा हॅक केला जाऊ शकतो यावर फारसा प्रकाश पडला नाही. ब्लूटूथ वापरून ब्ल्यूस्नर्फिंग समजू शकतो. पण पुर्ण फोन दुसर्‍याच्या हातात गेला तरच हे शक्य आहे. शिवाय पेयर करायला परवानगी हा प्रश्न आहेच. जीएसएम क्लोनिंग करणे पण आपला हॅण्ड्सेट कुणाला दिलाच नाही तर शक्य नाही. आता सर्व सेल फोन डिजिटल आहेत आणि त्यांचे सिग्नल एन्कोड केलेले एन्क्रिप्टेड किंवा कूटबद्ध आहेत, ज्यामुळे सिम माहिती स्कॅन करणे जवळजवळ अशक्य झाले असावे असे वाटते. जर सिम क्लोन केले तरी कंपन्या ते पकडतात, पकडत असाव्यात अशी अपेक्षा तरी आहे.

टेस्ला वि. कार डीलर्स: एक डिस्रप्शन व त्याला होत असलेला विरोध

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 08/05/2017 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
टेस्ला च्या कार विकण्यासंबंधी एक लेख नुकताच वाचला. मी पूर्वी टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") मधे काही वर्षे काम केलेले असल्याने एकूणच ऑटो इण्डस्ट्री तील बातम्यांबद्दल अजूनही कायम कुतूहल असते. तेव्हा मी टेल्को च्या सॉफ्टवेअर डिव्हिजन मधे सप्लाय चेन एरिया मधे - वाहने बनवायला लागणारा माल सप्लायर्स कडून कंपनीत येण्याबद्दलची प्रक्रिया- काम करत होतो. पुण्यातील प्लॅण्ट्स मधे उत्पादनावर जास्त फोकस होता. त्यात त्या "सेल" शी संबंधित गोष्टी कामात थेट येत नव्ह्त्या त्यामुळे त्याबद्दल माहिती नव्हती.

इजिप्त एयरलाइन्सचे विमान

लेखक स्मिता. यांनी शुक्रवार, 20/05/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं! लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असणार. पण आज या खेळाची आठवण आली ती कालच्या दुर्दैवी घटनेमुळे. इजिप्त एयरलाइन्सचं पॅरिसहून कैरोला निघालेलं विमान भूमध्य समुद्रात अचानक गायब झालं. ग्रीस एयर ट्रॅफिक कंट्रोलचं म्हणणं आहे की ग्रीसच्या एयरस्पेस मधून केवळ १० मैल दूर गेल्यावर विमानाचा रडारसोबत संपर्क तुटला. हे विमान अदृश्य झाले नसते तर त्या वेळेनंतर अवघ्या काही मिनिटात कैरोला पोहोचणार होते. उड्डाणाच्या सुरुवातीपासून तर ग्रीक एयरस्पेस सोडेपर्यंत कोठेही काहिही संशयास्पद नव्हतं.

एअरटेल ४जी

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 14/07/2015 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत एअरटेल ४जी चे ट्रायल नेटवर्क चालू झाले आहे. सध्या मुंबईत राहणारे कोणी वापरताहेत काय ? इतर शहरात कोणी वापरत असाल तर तुमचे अनुभव कळवा. मी सध्या एअरटेलचे ३जी नेटवर्क वापरत आहे आणि ४जी अपग्रेड करायच्या विचारात आहे.