एका ग्रुपवर, फोन हॅक करून पैसे लुबाडले जातात असा विषय चालला होता.
तथापि फोन कसा हॅक केला जाऊ शकतो यावर फारसा प्रकाश पडला नाही.
ब्लूटूथ वापरून ब्ल्यूस्नर्फिंग समजू शकतो. पण पुर्ण फोन दुसर्याच्या हातात गेला तरच हे शक्य आहे. शिवाय पेयर करायला परवानगी हा प्रश्न आहेच.
जीएसएम क्लोनिंग करणे पण आपला हॅण्ड्सेट कुणाला दिलाच नाही तर शक्य नाही.
आता सर्व सेल फोन डिजिटल आहेत आणि त्यांचे सिग्नल एन्कोड केलेले एन्क्रिप्टेड किंवा कूटबद्ध आहेत, ज्यामुळे सिम माहिती स्कॅन करणे जवळजवळ अशक्य झाले असावे असे वाटते.
जर सिम क्लोन केले तरी कंपन्या ते पकडतात, पकडत असाव्यात अशी अपेक्षा तरी आहे. प्रत्येक मोबाइल फोनमध्ये त्याच्या ट्रान्समिशन सिग्नलमध्ये सिम पेक्षा वेगळा असा एक रेडिओ फिंगरप्रिंट असतो असे म्हणतात. फिंगरप्रिंट आणि ईएसएन, आयएमईआय किंवा एमआयएन दरम्यान विसंगती आढळल्यास सेल्युलर कंपन्या बर्याचदा क्लोन केलेले फोन पकडू शकतात.
सेल्युलर कंपनीमध्ये लोचा करून हॅक करणे किंवा सेल्युलर नेटवर्कवर काही झोल झाल करून करण शक्य असेल तर मग अवघड आहे. पण ते पकडले जात असावे असे वाटते.
आपला फोन क्लोन केला आहे हे सांगण्याचा काही मार्ग आहे का?
फोन क्लोन केला म्हणजे आपला फोन चालायचा बंद होतो का?
फोन क्लोन केला तर गुगल सर्च माय फोन मध्ये काय दिसते? दोन ठिकाणी तो आहे असे दिसेल का?
आता आपला फोन गेलाच तर नवीन सिम घेणे आणि नंबर बदलणे हा पर्याय आहे. पण Google पिक्सेल मॉडेल आणि iPhones सारख्या नवीन स्मार्टफोन मॉडेलमध्ये सिम कार्ड हार्डवेअर केलेले आहे. म्हणजे तो मार्ग पण शक्य नाही.
फोन क्लोनिंग करणे बेकायदेशीर आहे असावे. पन त्यावर काय कायदेशीर कारवाई करता येते याचीही कल्पना नाही.
अर्थात तुम्ही तुमचे गुगल अकाऊंट शेयर केले असेल तर तुमचा बहुतेक डेटा दुसर्याला प्राप्त होऊ शकतो.
अर्थात हे सर्व ऐकलेले ज्ञान आहे. कुणी ज्ञानी माणूस असेल तर त्याने खरेच हे फोन हॅकिन्ग कसे होते सांगावे.
वर्गीकरण
वाचने
7232
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोन क्लोन केला म्हणजे आपला
धन्यवाद
In reply to फोन क्लोन केला म्हणजे आपला by गवि
मूळ मुद्दा बँक/ कार्ड पेमेंट गेटवे ढापणे हा आहे.
चांगली आणि उपयुक्त चर्चा
उपयोगी माहिती
मोबाईल मधून फसवणूक
+ अनलिमिटेड १
In reply to मोबाईल मधून फसवणूक by तुषार काळभोर
मी चौथा मार्ग वापरतो
In reply to मोबाईल मधून फसवणूक by तुषार काळभोर
सहमत. टेक्निकल हॅकिंगपेक्षा
In reply to मोबाईल मधून फसवणूक by तुषार काळभोर
मला
मागच्या आठवड्यात कायप्पावर एक
३ वर्षांपुर्वी जॉन मॅकॅफे [
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floodsजरासे अवांतर :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floodsप्रश्न :- जर अॅमेझॉन ने
In reply to जरासे अवांतर :- by मदनबाण
मेघविदागार = मुस्कटदाबी
In reply to प्रश्न :- जर अॅमेझॉन ने by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खूप महत्वाचा विषय आहे