Skip to main content

कथा

काटेकोरांटीची फुलं - रामदास काकांचा कथासंग्रह

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 25/05/2026 10:57 या दिवशी प्रकाशित केले.

रामदासकाकांच्या कथांची ओळख ’मिसळपाव’च्या वाचकांना नव्यानं करून देण्याची काही गरज नाही!

पाभे की बात १

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

रिपुदमन कुमारध्वज

लेखक साहना यांनी बुधवार, 29/04/2026 13:21 या दिवशी प्रकाशित केले.

आर्यावर्तातील चार सम्राटांच्या युद्धाचा अंत आता जवळ आला होता. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगा नदीच्या तीरावर, इंद्रप्रस्थाचे सम्राट वज्रकेतू आणि वैशाली राज्याचे बावीस वर्षीय सेनापती कुमारध्वज यांची सैन्ये आमनेसामने उभी होती. या भीषण युद्धाने संपूर्ण आर्यावर्तात जो संहार घडवून आणला होता, तो अभूतपूर्व होता.

परिक्षा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/04/2026 16:40 या दिवशी प्रकाशित केले.

गणपत वाणी आयुष्यभर दहा बाय आठ खोपटातल्या काउंटरमागे बसून उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरत राहिला. ‘आयुष्यभर’ असे तो नुसता म्हणायचा. कारण पुर्वी याशिवाय आपले दुसरे एखादे आयुष्य होते हे त्याला दात कोरतांना एकदाही आठवले नव्हते. यापुढच्या काळात आपले दुसरे एखादे आयुष्य असेल हेदेखील त्याला दात कोरतांना पटले नसते. म्हणजेच उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरणे एवढेच त्याचे एकमेव माफक आयुष्य होते. या माफक आयुष्यात त्याला एकाच कठीण परीक्षेला सतत सामोरे जावे लागत होते. त्याची काही तक्रारदेखील नव्हती. दातात अडकून बसलेला खाद्याचा एखादा हट्टी कण उदबत्तीच्या काड्यांनी उचकटवून काढणे हीच ती परीक्षा.

आज मै ऊपर आसमा नीचे -२

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/04/2026 10:52 या दिवशी प्रकाशित केले.

डॉक्टर झाले असते तर निदान नवीन काही शिकले असते. तेवढाच फरक पडतो. आर्थीक आणि मानसीक स्थितीत. आपल्याला कितीही सिनीयर व्हा. तीच आणि तीच कामे करायची. बदल तो कसला म्हणूण नाहीच. हे हल्ली असं खूप व्हायला लागलंय ना? पण कशामुळे? हा प्रश्न आला. इतका वेळ मनात स्वतःशीच संवाद करत असलेली नर्स करुणा स्वतःशीच चमकते. का बरे असे वाटावे?जाऊ दे. नकोच हा विचार करायला. एखादी माशी हाताने हाकलून लावावी तसा तो प्रश्न करुणा उडवून लावते. पण तो प्रश्न तीचा पिच्छा सोडत नाही. (क्रमशः)
मागील दुवा:
https://www.misalpav.com/story/53579

लालपरी

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 13/04/2026 06:43 या दिवशी प्रकाशित केले.

नवटाक टाकून रावल्याचा रडंवा बाप मुडद्यागत पडायचा. कधीमधी मोकाट सुटलेल्या सांडागत माळरानी तोंड मारायचा पण तरणाबांड रावल्या मात्र तापल्या तव्यावर उताणा पाताणा..

चुलीवर आगीची आन बाजेवर शेजेची वाण होती.

तालुक्याला एष्टी सुरू झाली अन  बैलांच नशीब फळफळलं, बाजारी हेलपाटे बंद झाले.

रावल्याच घोडं कुठ पेंड खात होतं कुणास ठाऊक?

घोस्टहंटरच्या निमित्ताने!

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 22/12/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटरच्या निमित्ताने! तसं बघायला गेलं तर घोस्टहंटर ही माझी दुसरी कथा! पण खरं पहायला गेलं तर पहिलीच! (दोन वेडे ट्रायल म्हणून लिहिली,आणि फसलो!) ही कथा गेले ३ वर्ष डोक्यात घोळत होती.मात्र मिसळपावने ही कथा प्रकाशित करु दिल्याबद्दल संपादकांचे आभार. घोस्टहंटरचा आवाका अत्यंत मोठा आहे. शतकी भाग झाले तरी कथा संपणार नाही.परंतु ही कथा मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल. आता मूळ मुद्यावर येतो.ही माझी पहिलीच कथामालिका असल्याने मिपाकर मंडळींच्या मार्गदर्शनाची यापुढेही आवश्यकता आहे.

श्री. भावेश भाटिया: एक अवलिया

लेखक मी ओंकार यांनी सोमवार, 19/10/2015 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या १५ व्या वर्षी अचानक आंधळेपण आले तर तुम्ही काय कराल? आणि सोबतच आई कर्करोगाने आजारी आणि वडिलांची तुटपुंजी कमाई ही संकटे ह्याच काळात उभी ठाकली तर? एकुन कदाचीत धक्का बसेल पण ही खरी गोष्ट आहे अश्याच एक अवलियाची ज्याला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या अस्मानी संकटांचा सामना करावा लागला, आणी त्यातुन खचुन न जाता जोमाने उभा राहुन आज करोडा रुपयांचा व्यवसाय आणी सोबत शेकडो अंध लोकांना रोजगार देउन त्याने आपले जिवन सार्थकी लावले. अशा या अवलियाचे नाव आहे श्री. भावेश भाटिया. श्री. भाटिया यांचा जन्म झाला महाबळेश्वर हया थंडहवेच्या गावी.

स्चीझोफ्रेनिया.......... आजार की पेर्सेपशन!भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 13/09/2015 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ त्यादिवशी सकाळपासून विक्रम मस्त मूडमध्ये होता. तो यायच्या अगोदरच गिता आली होती आणि एका जुन्या केसचा अभ्यास करत होती. त्यामुळे तो आत आला तेव्हा स्वतःशीच हसत होता ते तिच्या लक्षात आल. तो पेपर्स लावत होता तेव्हा गिता त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हळूच विचारल;"काय विकी आज काही स्पेशल? एकदम मस्त मूडमध्ये दिसतो आहेस!" तिच्याकडे वळत तो म्हणाला;"गिता काल खूप दिवसांनी राजन भेटला. मग आम्ही प्रकाश आणि हरीला जाऊन भेटलो. मस्त गप्पा मारल्या. मी त्याना आपल्याकडे आलेली ती नवीन केस आहे ना त्याबद्धल सांगितल. ती ग... १२ वर्षांची सिमरन येते ना तिची केस. poor girl!