स्चीझोफ्रेनिया.......... आजार की पेर्सेपशन!भाग २
भाग २
त्यादिवशी सकाळपासून विक्रम मस्त मूडमध्ये होता. तो यायच्या अगोदरच गिता आली होती आणि एका जुन्या केसचा अभ्यास करत होती. त्यामुळे तो आत आला तेव्हा स्वतःशीच हसत होता ते तिच्या लक्षात आल. तो पेपर्स लावत होता तेव्हा गिता त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हळूच विचारल;"काय विकी आज काही स्पेशल? एकदम मस्त मूडमध्ये दिसतो आहेस!"
तिच्याकडे वळत तो म्हणाला;"गिता काल खूप दिवसांनी राजन भेटला. मग आम्ही प्रकाश आणि हरीला जाऊन भेटलो. मस्त गप्पा मारल्या. मी त्याना आपल्याकडे आलेली ती नवीन केस आहे ना त्याबद्धल सांगितल. ती ग... १२ वर्षांची सिमरन येते ना तिची केस. poor girl!
मिसळपाव