मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

East India Company- भाग-३

मारवा ·
या भागात आपण चायना टी ट्रेड चा भारताशी असलेला संबंध बघु व इतर काही उरलेले मुद्दे घेऊन चायना ट्रेड चा हा विषय या भागात संपवु. इंडियन प्रेसीडेन्सीज ने चायना ट्रेड साठी केलेली आर्थिम मदत तिथे एकीकडे चायना टी ट्रेड मध्ये कंपनीची सातत्याने प्रगती होत होती. वर्षा/दशकागणिक खरेदीचा आकडा वाढतच चालला होता. तेव्हा आपण पाहीले तस "सिल्व्हर" च्या उभारणीसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरु होते. अशातच इकडे भारतात कंपनीला सर्वात मोठी लॉटरी लागली.

East India Company - भाग २

मारवा ·
या भागात कंपनीचा चायना टी ट्रेड हा टॉपिक घेतोय. कारण हा कंपनीचा एक महत्वाचा मोठा ट्रेड होता. हा चालवतांना कंपनीची ट्रेड स्कील्स व इतरही अनेक बाबी प्रकर्षाने जाणवतात दुसर भारताच्या शेजारीच एका भिन्न देशात भिन्न परीस्थीतीत मुख्य म्हणजे राजकीय वर्चस्वाच्या अभावातही हीच सेम कंपनी कसे काम करत होती हे बघणे भारतीय संदर्भात भारताने कंपनीला दिलेल्या प्रतिसादाच्या तुलनेत बघणे हे तुलनेसाठी अधिक योग्य वाटते व कंपनीच्या क्षमता मर्यादांचे एकुणच कंपनीचे कदाचित अधिक अचुक आकलन होउ शकते असे वाटते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा

आकाश कंदील ·
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत, सहभाग आहे हे निर्विवाद सत्य आहे. पण आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ढोबळमानाने हेच सांगितले जात आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा सिहांचा वाटा आहे. हि गोष्ट मलाही मान्य होती आणि आहे. पण २७ जानेवारीच्या (२०१६) NDTV, International Agenda (8.30pm) च्या कार्यक्रमात अजून एक नवीन पण महत्वाची गोष्ट समजली आणि जी मला तुम्हा सर्वां बरोबर share (मराठी शब्द सापडत नाही क्षमस्व) करायला आवडेल आणि त्यावर तुम्हा सर्वांचे विचार वाचायला पण आवडेल.

बाजीराव मस्तानी: आमचेही सेन्सॉर!

चलत मुसाफिर ·
मित्रहो, 'बाजीराव मस्तानी' आम्ही आज थेटरमधे जाऊन पाहिला. काही ब्रह्मवृंद या चित्रपटावर खप्पामर्जी असल्याचे जगजाहीर झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा मुद्दाम एखाद्या स्वघोषित सेन्सॉरबोर्ड मेंबरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. सिनेमाबद्दल काही ठळक मुद्दे मनात नमूद झाले ते लिहीत आहे. मुद्द्यांचे खास काही वर्गीकरण असे केलेले नाही. 1. सिनेमात बाजीराव, मस्तानी आणि काशी या तिन्ही मुख्य पात्रांना योग्य न्याय दिलेला आहे. किंबहुना काशी जबरदस्त भाव खाऊन जाते. तसेच बाजीरावाची आई, बंधू चिमाजी, छत्रपती शाहू यांचे चरित्रचित्रणही मजबूतपणे केलेले आहे.

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन

कोकणप्रेमी ·
श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन -- ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात दिलेले व्याख्यान लिखित स्वरुपात अभ्यासकांच्या माहितीसाठी मिसळपाववर देत आहे. अवश्य वाचा...अनमोल माहिती.. मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या प्रदीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागदपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही.

शिवजयंती हायजँक ????

पगला गजोधर ·
महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

विकास ·

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

Purandare Maharashtra Bhushan आत्ताच राजभवनात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांना अधिकृतपणे "महाराष्ट्र भूषण" ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने संमानीत केले.

चक्रवर्ती अशोक सम्राट (कलर्स मालीका)

माहितगार ·
सध्या कलर्स नावाच्या दूरचित्रवाणीवर चक्रवर्ती अशोक सम्राट (टेक्स्ट अपडेट) नावाची धारावाहीक मालीका चालू आहे. (मी स्वतः दूरचित्रवाणी मालीकांचा फारसा पंखा नाही तरीही गेल्या चार एक महिन्यांपासून हि मालीका पाहतो आहे). मालीकेत कुमार वयातील अशोक एका चतुर आणि गुणी युवकाच्या रुपात उभा केला गेला आहे कुमार अशोकची आई सुद्धा जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी आदर्श माता दाखवली आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासाची माहिती हवी

माहितगार ·
नेमेची येतो पावसाळा तसे महाराष्ट्रातील शाळा कॉलेजांच्या अ‍ॅडमीशनांचा हंगाम पालकांसाठी नम्रतेने रांगेत उभे टाकून कापले जाणारे खिश्यांचा अनुभव घेत मागे पडला आहे विद्यार्थी नव्या उमेदीने वर्गात (आणि क्लासांमध्ये) हजेरी लावू लागला आहे.

भारतातील आणिबाणीचा इतिहास व भवितव्य संबंधाने प्रश्न आणि उत्तरे

माहितगार ·
२५ जून इ.स. १९७५ मध्ये आज पासून बरोबर ४० वर्षांपुर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी (Emergency) लागू केली होती जी २१ महिन्यांनी वापस घेतली गेली. इंदिराजींची हि कारवाई त्यांच्या आणि भारतीय काँग्रेसच्या एकुण राजकीय वाटचालीतील मोठ्या विवाद्य गोष्टींपैकी एक गोष्ट ठरली. नवीन पिढ्यांना हा इतिहास खूपसा ठाऊक नाही. पण गेल्या आठवड्या भरापासून इतर विवीध माध्यमातून चर्चा चालू आहे, राष्ट्रीय व्यासपीठावर अगदी अडवाणी मोदींपासून बरेच जण या चर्चेत सहभागी झालेले दिसतात. इंग्रजी आणि हिंदी भाषेत या विषयावर जेवढी सविस्तर चर्चा आणि माहिती उपलब्ध होते तेवढ मराठीत होत नाही.