भारतातील आणिबाणीचा इतिहास व भवितव्य संबंधाने प्रश्न आणि उत्तरे
In reply to फारच मोठा विषय आहे. by विशाखा पाटील
जेपींनी तर आविर्भाव असा आणला की, जणू ‘चलेजाव’ चळवळच सुरू झाली आहे. परंतु, एका मुख्य प्रश्नाचे उत्तर आजवर कुणीही दिलेले नाही. तो हा की, 1958 नंतर राजकारण संन्यास घेतलेले जयप्रकाश नारायण एकदम 1972-73 नंतर सक्रिय आणि आव्हानात्मक राजकारणात का आले? 1958 ते 1973 या काळात भ्रष्टाचारच नव्हता? मग, संपूर्ण क्रांतीची गरज एकदम 1974 सालीच का भासली? अमेरिका भारताविरुद्ध काही उघडउघड आणि काही गुप्त कारस्थाने करीत होती. तेव्हाच जेपींनी नवनिर्माण आंदोलनाला उत्तेजन कसे दिले? स्वत:ला गांधीवादी म्हणविणा:या या अहिंसावादी, सत्याग्रही लोकनायकाला गुजरातमधील हिंसाचाराच्या आगडोंबात संपूर्ण क्रांतीचे स्फुल्लिंग कसे आढळले..?थोडक्यात केतकर साहेब सरळ सरळ आरोप करतायेत की जेपी आणी त्यांचे आंदोलन अमेरिका प्रणित होते. कारण काय तर विएतनाममध्ये पराभव झाल्यानंतर, जागतिक राजकारणात महत्व टिकुन राहण्यासाठी अमेरिकेला भारत आशियात डोईजड व्हायला नको होता. ह्म्म इंटरेस्टिंग.
In reply to थोडक्यात by वॉल्टर व्हाईट
In reply to आणि by अनिरुद्ध.वैद्य
In reply to केतकर by कपिलमुनी
In reply to माहिती by कपिलमुनी
In reply to मी आणिबाणीवर एक मोठ्ठा लेख by जयंत कुलकर्णी
In reply to लेखाच्या प्रतिक्षेत ... by रुस्तम
http://indianexpress.com/ramnath-goenka/10/# : In June 1975, then Prime Minister Indira Gandhi clamped an Emergency on the country. The voice of the media was ruthlessly choked, its contents censored. Anti-government demonstrations were prohibited by law. Since the paper took a strong stand against the Mrs. Gandhi’s imposition of Emergency, The Indian Express protested her Government’s attempts to censor the press by carrying a blank editorial on the OpEd page. This blank editorial went on to become a symbol of the movement against the Emergency.
याच काळात ४२वी घटना दुरुस्ती करून न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि अधिकार देखील संकुचित करण्यात आले. आणिबाणीके तीन दलाल इंदीरा, संजय, बन्सीलाल आणि चांडाळ चौकडी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या धवन-संजय-बन्सीलाल आणि व्हि सी शुक्ला यांनी मनमानी चालू केली. सक्तीची नसबंदी ही ह्याच काळातली. (त्याचे अप्रत्यक्ष समर्थन डॉ. भा.नि. पुरंदरे यांनी त्यांच्या शल्यकौशल्य या पुस्तकात केले होते. कारण नंतरच्या काळात जनता सरकारने कुटूंब नियोजन पूर्णच बाजूला केले, म्हणून.)
इंदीरांजींनी केलेल्या लोकशाहीच्या गळचेपीचे समर्थन करणार्या तथाकथीत विद्वान (वास्तवात सुमार) पत्रकारांचे लेख वाचून कदाचीत त्यांना (इंदीराजी आणि संजय गांधी) पण वर धक्का बसत असेल. म्हणत असतील, "आपल्याला हे कळलेच नाही, की इतका उदात्त हेतू होता म्हणून!"
विनोबा भाव्यांनी देखील आणिबाणीचे समर्थन करत त्याला अनुशासन पर्व काय म्हणले, मौनव्रत चालू होते म्हणून टाळ्या काय वाजवल्या. बरीच गंमत जंमत केली. बाळ ठाकर्यांनी पण समर्थन केले. अर्थात त्यांचे हुकूमशाहीसच समर्थन असायचे म्हणून आश्चर्य नाही.
महाराष्ट्रात नंतरच्या काळात आणिबाणी विरोधात पुल आणि दुर्गाबाई भागवतांनी जाहीर आवाज उठवला होता आणि सर्वत्र सभा घेणे चालू केले होते. मला वाटते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव वैतागून पुलंना विदुषक म्हणाले होते. आम्हाला शाळेत शिस्तीवरच्या गाण्यांची आणि मला वाटते, "हम होंगे कामयाब" वगैरे म्हणण्याची सक्ती केली गेली होती. अर्थात ती सक्ती वगैरे समजण्या इतके वय नव्हते. पण प्राथमिक शाळेतल्या त्या बिचार्या शिक्षिका घाबरलेल्या/बावरलेल्या दिसल्याचे आजही आठवते.
In reply to चांगला विषय by विकास
In reply to चांगला विषय by विकास
त्यांचे लोकसभासदत्व रद्द झाल्याने पंतप्रधान म्हणून राजीनामा देणे अथवा सहा महीन्यात परत निवडून येणे असे खरे म्हणजे कायदेशीर पर्याय होते. त्या निवडून देखील येऊ शकल्या असत्या....विकासजी, ते सहा महिने नसुन सहा वर्षे आहे. विकी वरुन साभार:
The hearing of the case took more than four years. The case concluded on May 23, 1975 but the judgement was not announced immediately. It was pronounced that the judgement will be pronounced on June 12, 1975. June 12, 1975 witnessed courtroom No. 24 packed by lawyers, media and general public. Sinha read only the operative part of his judgement. The judgement in itself ran into 258 pages. Gandhi was declared guilty of corrupt practices and her election to the Lok Sabha was declared null and void. She was charged under Section 123(7) of the Representation of the People Act. She was also disqualified from contesting elections for six years.
In reply to त्यांचे लोकसभासदत्व रद्द by सव्यसाची
In reply to चांगला विषय by विकास
In reply to हम्म by सुधीर
In reply to पुलंच्या लेखाची माहिती नाही. by श्रीगुरुजी
In reply to हम्म by सुधीर
In reply to बरोबर by विकास
In reply to बरोबर by विकास
In reply to चांगला विषय by विकास
In reply to विकास, by श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद - खुलासा by विकास
In reply to >>> मी जे कायम इंडीयन by श्रीगुरुजी
In reply to दोन शक्यता असू शकतील ? by माहितगार
In reply to >>> मी जे कायम इंडीयन by श्रीगुरुजी
In reply to याच विषयावर इथेही चर्चा चालू by अनुप ढेरे
In reply to एक तांत्रिक मुद्दा by विकास
In reply to >>> त्यांनी नंतर आणिबाणि by श्रीगुरुजी
In reply to एक तांत्रिक मुद्दा by विकास
त्यांनी नंतर आणिबाणि जाहीर केली वगैरे ठीक आहे. पण त्याच वेळेस त्यांनी त्यांच्यावरील ही शिक्षा पण रदबादल केली का? नसली केल्यास त्या ७७ सालातली निवडणूक कशा लढल्या?हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींची रायबरेलीमधून लोकसभेवर झालेली निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा यांनी रद्द केली. त्याला इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. इंदिरा गांधींचे आव्हान उन्हाळी सुटीच्या काळातील न्यायाधीश व्ही.आर.कृष्ण अय्यर यांच्यापुढे आले आणि इंदिरा गांधींची बाजू न्यायालयात मांडली नानी पालखीवालांनी तर विरोधी बाजूचे वकील होते शांती भूषण (प्रशांत भूषण यांचे वडील). २४ जून १९७५ रोजी न्या.कृष्ण अय्यर यांनी दिलेला निकाल मात्र बुचकळ्यात पाडणारा होता. अय्यर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तर स्थगिती दिली पण त्याचवेळी इंदिरा गांधींवर काही बंधने टाकली. ही बंधने होती-- लोकसभेत मतदान करता येणार नाही, लोकसभेच्या सदस्यत्वासाठी मिळणारा पगार (आणि भत्ते) घेता येणार नाही, एक लोकसभा सदस्य म्हणून लोकसभेत चर्चेत भाग घेता येणार नाही.पण पंतप्रधान म्हणून पगार घेता येईल, लोकसभेत सरकारच्या वतीने निवेदनेही देता येतील आणि पंतप्रधानपदावर कायम राहता येईल. म्हणजेच अय्यर यांच्या निकालाने लोंबकळलेली परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबादल केला असता तर तो इंदिरा गांधींचा विजय ठरला असता. जर का त्यांनी तो निर्णय योग्य आहे असा निवाडा दिला असता तर तो इंदिरा गांधींचा निंसंशय पराभव ठरला असता. पण अय्यर यांनी दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केवळ हंगामी स्थगिती दिली आणि इंदिरा गांधींचे अपील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे वर्ग केले. न्या.अय्यर यांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटले---"Draconian laws do not cease to be law in courts but must alert a wakeful and quick-acting legislature." म्हणजेच न्यायाधीश न्याय देताना कायद्याला बांधिल असतात. जरी एखादा कायदा अयोग्य असला तरी जोपर्यंत तो कायदा कायदेपुस्तकात (statute) आहे तोपर्यंत न्यायाधीश त्याच कायद्याला बांधिल असतात. म्हणजेच Representatives of People Act च्या ज्या कलमांतर्गत इंदिरा गांधींची निवड (भले तांत्रिक कारणांनी) रद्दबादल झाली होती ती कलमे जोपर्यंत कायद्यात आहेत तोपर्यंत खंडपीठातील न्यायाधीश त्याच कायद्याला बांधिल राहतील असा एकाप्रकारे इशाराच न्या.अय्यर यांनी दिला. ११ ऑगस्ट १९७५ रोजी इंदिरा गांधींची याचिका मुख्य न्यायाधीश ए.एन.रे आणि न्यायाधीश हंसराज खन्ना, के.के.मॅथ्यू, यशवंतराव चंद्रचूड आणि एम.एच.बेग यांच्या खंडपीठापुढे येणार होती. इंदिरा गांधींच्या सरकारने २१ जुलै १९७५ रोजी संसदेचे अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात केवळ तातडीचे कामकाज घेतले जाईल असे जाहीर करून इतर महत्वाच्या गोष्टी (प्रश्नोत्तराचा तास, सदस्यांना लक्षवेधी सूचना आणता येणे) इत्यादी रद्द केल्या. या अधिवेशनात ३८ आणि ३९ व्या घटनादुरूस्ती विधेयकांना संसदेची मंजुरी घेण्यात आली. ३८ व्या घटनादुरूस्तीविषयी अन्य प्रतिसादात लिहितो. पण ३९ व्या घटनादुरूस्तीप्रमाणे पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या लोकसभेवर झालेल्या निवडीविषयी आव्हान याचिकांवर सुनावणी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही तर त्यांच्या निवडीला कोणी आव्हान दिल्यास त्याची सुनावणी संसदेने नेमलेल्या समितीपुढे होईल असे म्हटले. त्यासाठी राज्यघटनेत ३२९ (अ) हे नवे कलम आणण्यात आले. ही ३९ वी घटनादुरूस्ती किती विलक्षण वेगाने झाली हे बघणे रोचक ठरेल. एक तर विरोधी पक्षांचे बरेचसे सदस्य आणीबाणीमुळे तुरूंगातच होते.आणि मुळातच काँग्रेसकडे असलेल्या प्रचंड बहुमतामुळे तशीही ही घटनादुरूस्ती मंजूर झालीच असती. ७ ऑगस्टला लोकसभेने तर ८ ऑगस्टला राज्यसभेने या विधेयकाला मंजुरी दिली.या विधेयकाला अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधानसभांचीही मंजुरी गरजेची होती.त्यासाठी ९ ऑगस्टला शनीवारी राज्य विधानसभांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. जवळपास सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसच सत्तेत असल्यामुळे राज्यांकडून हे पास व्हायला काहीच प्रश्न आला नाही. रविवारी १० ऑगस्टला राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आणि घटनादुरूस्ती प्रत्यक्षात झाली. तसेच Representatives of People Act मध्येही इंदिरा गांधींना अनुकूल बदल करण्यात आले. कायद्याच्या तत्वांप्रमाणे गुन्हेगारी कायदे (क्रिमीनल लॉ) पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणता येत नाहीत.पण दिवाणी कायदे (सिव्हील लॉ) करता येतात. कुणाही लोकसभा सदस्याची लोकसभेवर झालेली निवड हा अर्थातच सिव्हील लॉचा विषय होता. त्यामुळे तो असा पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणता आला. ११ ऑगस्टला जेव्हा पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हा विषय सुनावणीसाठी आला तेव्हा त्यांच्यापुढे त्यावेळी जो कायदा होता त्याद्वारेच निर्णय देणे क्रमप्राप्त झाले. इंदिरा गांधींची ही खेळी म्हणजे खेळ सुरू झाल्यानंतर खेळाचे नियम बदलण्याप्रमाणे होती आणि अर्थातच असे करणे अयोग्य होते. पुढे ७ नोव्हेंबर १९७५ रोजी खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबादल ठरविला. अशा प्रकारे रडीचा डाव खेळून इंदिरा गांधी १९७७ च्या निवडणुकीसाठी पात्र ठरल्या.
In reply to एक तांत्रिक मुद्दा by विकास
In reply to आणीबाणीतल्या सो कॉल्ड by प्रसाद१९७१
In reply to आणीबाणीतल्या सो कॉल्ड by प्रसाद१९७१
In reply to आणीबाणीतल्या सो कॉल्ड by प्रसाद१९७१
आणीबाणीतल्या सो कॉल्ड अत्याचाराचे सुत्रधार म्हणुन ज्यांचे नाव जनसंघीय घेतात त्या संजय गांधींची बायको आणि मुलगा गेली २ दशके भाजपतर्फे निवडुन येतात आणि मनेका बाई भाजप सरकार मधे मंत्रापदी कशा असतात ?आणीबाणीचे सूत्रधार म्हणून ज्यांना दोष दिला गेला त्यापैकी अनेक नंतर काँग्रेसबरोबरच भाजपशीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संबंधित राहिले. १. बन्सीलालः हरियाणाचे मुख्यमंत्री असताना बन्सीलालनी संजय गांधींना मारूती फॅक्टरीसाठी जमीन मिळवून द्यायला मदत केली होती. नंतर ते डिसेंबर १९७५ मध्ये केंद्रात संरक्षणमंत्री झाले आणि १९८५ ते १९८७ या काळात परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री होते. पुढे तेच बन्सीलाल यांनी स्वतःचा हरियाणा विकास पक्ष स्थापन केला आणि १९९६ ते १९९९ या काळात ते भाजपच्या पाठिंब्यावर राज्याचे मुख्यमंत्री होते. २. विद्याचरण शुक्ला: इंदिरा गांधींची लोकसभेवरील निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबादल केल्यानंतर इंदिरांच्या समर्थनार्थ दिल्लीजवळच्या भागातील (उत्तर प्रदेश, हरियाणा इत्यादी) अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना संजय गांधींनी दिल्लीत आणून इंदिरांना फार मोठा पाठिंबा आहे असे दाखवायचा प्रयत्न केला.यासाठी सरकारी बसगाड्यांचाही दुरूपयोग केला गेला.तसेच या जमावाला दूरदर्शन आणि आकाशवाणीवर बातम्यांमध्ये स्थान द्यावे असे संजय गांधींनी माहिती आणि प्रसारणमंत्री इंद्रकुमार गुजराल यांना सांगितले. घटनात्मक पद भूषवत नसलेल्या संजयचा आदेश गुजराल यांनी मानला नाही.त्याबद्दल त्यांची नियोजन मंत्रालयात बदली केली गेली आणि त्यांच्या जागी "सेन्सॉरशीप" साठी जबाबदार असलेल्या विद्याचरण शुक्लांना आणले गेले. त्यांनीच २००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून छत्तिसगडमधील महासमंद लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली. काँग्रेसच्या अजित जोगींनी त्यांचा पराभव केला. ३. जगमोहनः शहरांचे सुशोभिकरण हा संजय गांधींचा आवडता कार्यक्रम होता. दिल्लीतील यमुनाकाठाहून जामा मशीद कोणत्याही अडथळ्याशिवाय दिसायला हवी म्हणून यमुनाकाठच्या आणि तुर्कमान गेटजवळच्या झोपडपट्या हलवायचा कार्यक्रम संजय गांधींनी राबविला.त्यात लोकांनी जायला नकार दिला म्हणून त्यांच्यावर गोळीबार झाला आणि काही अंदाजांप्रमाणे १५० पर्यंत लोक मारले गेले. जगमोहन हे त्यावेळी दिल्ली डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनमध्ये होते आणि तुर्कमान गेट प्रकरणी बदनाम झाले होते. पुढे त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून चांगले काम केले. ते १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपण होते. त्यांचा २००४ मध्ये अजय माकन यांनी पराभव केला.त्यानंतर वाढत्या वयामुळे ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. मागे एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे ते आजही संजय गांधींनी काही चूक केली असे मानत नाहीत. ही मंडळी काँग्रेसबरोबरच कधीना कधी भाजपशीही संलग्न होतीच. तरीही मेनका गांधींची गोष्ट थोडी वेगळी आहे असे वाटते. त्यांचा संजय गांधींशी विवाह बराच लवकर (मला वाटते १९-२० वर्षाच्या असताना) झाला. संजय गांधी गेल्यानंतर १९८१-८२ मध्ये त्यांचे इंदिरा गांधींशी मतभेद झाले आणि त्यांना इंदिरांचे घर सोडावे लागले. १९८० मध्ये संजय गांधींनी आपल्या समर्थकांना मंत्रीपदे, मुख्यमंत्रीपदे (उदा. अ.र.अंतुले) मिळवून दिली होती. पण संजय गेल्यानंतर इंदिरांनी संजय समर्थकांना बाजूला करायला सुरवात केली. त्यानंतर मेनका गांधींनी राष्ट्रीय संजय मंच हा गट स्थापन करून संजय गांधींच्या "विचारांचा" प्रसार करायचा प्रयत्न केला. त्यावेळी मेनका गांधी फार तर २५ वर्षांच्या होत्या. पुढे जनता दल आणि आता भाजप असा मेनका गांधींचा प्रवास राहिला. मी जेव्हा माझे स्वतःचे वयाच्या २५ व्या वर्षीचे विचार कसे होते हे आठवतो तेव्हा माझे विचार त्यावेळी वेगळे होते हे मला जाणवते. वयानुरूप जसे अधिक जग बघतो त्याप्रमाणे वेगळे अनुभव येतात आणि त्यातून विचार बदलू शकतात. तेव्हा वयाच्या २५ व्या वर्षी संजय गांधींच्या "विचारांचा प्रसार" केला म्हणून मेनका गांधींना आयुष्यभर सुळावर चढवायची काही गरज नाही. मेनका गांधींनी बन्सीलाल, विद्याचरण शुक्ला यांच्यासारखी स्वार्थासाठी टोपी फिरवली असे तर म्हणता येणार नाही किंवा दुसर्या शब्दात विद्याचरण शुक्ला किंवा बन्सीलाल हे जसे गणंग होते तशा मेनका नक्कीच नाहीत. तेव्हा मेनका गांधी भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत याचा अर्थ संजय गांधींना जनसंघाचा पाठिंबा होता असे म्हणणे हे सुतावरून स्वर्ग गाठणे किंवा वडाची साल पिंपळाला जोडणे वगैरे म्हणींचे उदाहरण होऊ शकेल.
In reply to आणिबाणी लागू होण्याच्या अगोदर by श्रीरंग_जोशी
व मध्यम लांबीचे शीर्षक देण्यासाठी माहितगार साहेबांचे आभार.:) स्वागत
In reply to आणिबाणी लागू होण्याच्या अगोदर by श्रीरंग_जोशी
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची ही नवी ब्लॉगपोस्ट.रोचक धन्यवाद
In reply to ४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा by श्रीगुरुजी
In reply to ४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा by श्रीगुरुजी
In reply to ४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा by श्रीगुरुजी
५) आणिबाणी विषयक कोणकोणती माहिती उपलब्ध आहे आणि कोणती माहिती उपलब्ध नाही नक्की कोणत्या सल्लागारांवर विसंबून इंदिरा गांधींनी आणिबाणी आणली, त्यांना पक्षातील नक्की कोणाची भीति वाटत होती, आणिबाणी जाहीर करणे व नंतर निवडणुका जाहीर करणे यासाठी नक्की कोणत्या ज्योतिषांनी त्यांना सल्ले दिले होते, आणिबाणीच्या कालखंडात आर के धवन, स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांची नक्की कोणती भूमिका होती इ. अनेक गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत.याच्याशी थोडासा असहमत. पूर्ण माहिती नक्कीच आता आपल्याकडे नाही. परंतु सिद्धार्थ शंकर रे यांनी एका पत्रा मधून आणीबाणी चा सल्ला दिला होता. त्याच पत्रात संविधानाच्या कक्षेत राहून पण कश्या पद्धतीने लोकशाही अधिकार काढून घेतले जाऊ शकतात याची त्यांनी माहिती दिली होती. हे पत्र आजच प्रकाशित झालेल्या कुमि कपूर यांच्या पुस्तकात आहे. त्यानुसार जानेवारी १९७५ ला हे पत्र पाठवण्यात आले होते. त्या पत्राची मागणी इंदिरा गांधी यांच्याकडून झाली कि ते पत्र सिद्धार्थ शंकर रे यांनी स्वतःच पाठवले हे पाहायला लगेल. या पत्राचा विचार इंदिरा गांधी यांनी कधी केला हे पण समजले नाही. पण जानेवारी मध्ये जर हे पत्र दिले असेल तर त्यांच्या मनात आणीबाणी फक्त १२ जून नंतर आली असे म्हणता येईल का? आणीबाणी शिवाय स्वतःला पर्याय नाही म्हणून त्यांनी आणीबाणी त्यावेळी जाहीर केली का? तसेच १९७७ मध्ये असे काय घडले कि त्यांनी निवडणुका जाहीर केल्या? आर. के. धवन यांच्याबद्दल पाहायला लागेल. सध्या तवलीन सिंग यांचे दरबार पुस्तक वाचत आहे त्यामध्ये बरेच संदर्भ आहेत. जर काही मिळाले तर जरूर शेअर करेन.
In reply to ७) आणिबाणीस आंतरराष्ट्रीय by श्रीगुरुजी
उजवे कम्युनिस्टहे कोण होते ?
यशवंतराव चव्हाणांचा आणिबाणीला मूक विरोध होता, पण जाहीररित्या पाठिंबा होता.हे यशवंतरावांचे वास्तव होते का महाराष्ट्रातील बुद्धीवादी लोकांपुढे दुहेरी भूमिका वठवणे होते ? (सहज विचारले, यशवंतरांवांच्या रोल विषयी मला काहीच माहिती नाही)
In reply to उजवे कम्युनिस्ट by माहितगार
In reply to उजवे कम्युनिस्ट म्हणजे भारतीय by श्रीगुरुजी
In reply to डावे उजवे .. by अनिरुद्ध.वैद्य
In reply to १०) आणिबाणीच्या काळातील by श्रीगुरुजी
In reply to मनातील प्रश्न विचारल्या शिवाय राहवत नाहीत by माहितगार
In reply to शाह कमिशनhttps://en.m by आदूबाळ
In reply to धन्यवाद. भारतात शाह कमिशनची by माहितगार
In reply to शाह कमिशन चा रिपोर्ट तीन by सव्यसाची
In reply to मनातील प्रश्न विचारल्या शिवाय राहवत नाहीत by माहितगार
In reply to >>> ज्यांची अटक करावयाची by श्रीगुरुजी
In reply to १०) आणिबाणीच्या काळातील by श्रीगुरुजी
In reply to अजून एक गंमत झाली होती. by श्रीगुरुजी
In reply to अजून एक गंमत झाली होती. by श्रीगुरुजी
In reply to आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत. by ऋतुराज चित्रे
In reply to आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत. by ऋतुराज चित्रे
In reply to आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत. by ऋतुराज चित्रे
In reply to काही आठवणी by हुप्प्या
In reply to काही आठवणी by हुप्प्या
In reply to ११) आणिबाणीचे कुणी कुणी by श्रीगुरुजी
विद्यमान पंतप्रधानांचा पराभव होण्याची ही आजतगायत घडलेली एकमेव निवडणुक आहे.जर २०१४ मध्ये मनमोहनसिंगांनी लोकसभा निवडणुक लढवली असती तर या यादीत मनमोहनसिंगांचेही नाव नक्कीच सामील झाले असते याची शक्यता बरीच जास्त आहे :)
In reply to १९७५ साली देशात कोणतीही अराजकाची परिस्थिती नव्हती. by ऋतुराज चित्रे
असे आपण म्हणायचे असते. जेपी व जॉर्ज फर्नांडिसांच्या प्रत्येक हालचालिंवर गुप्तचर खात्याचे लक्ष होते. गुप्तचर खात्यावर इंदिराजींचा विश्वास असल्याने त्यांच्या माहितीआधारे त्यांना हा धोका अगोदरच कळला होता.याच गुप्तचर खात्याच्या आधारावर इंदिरा गांधी यांनी १९७७ मध्ये निवडणूक घेण्याचे ठरवले. थोड्या जागांचा फटका बसेल पण निवडून आपणच येऊ असे आयबी ने सांगितल्याचे धवन म्हणतात. आजच टेलीग्राफ मध्ये इंदिरा गांधी यांचे सल्लागार एच. शारदा प्रसाद यांच्या मुलाची मुलाखत आली आहे. त्यांच्यानुसार इंदिरा गांधी यांनी शारदा प्रसाद यांना असे सांगितले कि "आयबी वर माझा विश्वास नाही कारण जे मला आवडते तेच सांगितले जाते. मला माहिती आहे कि आपण निवडणूक हरणार आहोत पण निवडणूक घेतली पाहिजे." आता यातल्या कोणत्या आयबी ने १९७५ साली रिपोर्ट दिला कि धोका आहे आणि इंदिरा गांधी यांनी त्यावर विश्वास ठेवला?
In reply to असे आपण म्हणायचे असते. जेपी व by सव्यसाची
In reply to १९७५ साली देशात कोणतीही अराजकाची परिस्थिती नव्हती. by ऋतुराज चित्रे
In reply to १९७५ साली देशात कोणतीही अराजकाची परिस्थिती नव्हती. by ऋतुराज चित्रे
In reply to मस्तच प्रतिक्रिया by बोका-ए-आझम
In reply to इंदिरा गांधींनी आणीबाणीत निवडणुका जाहीर करण्यामागील कारण ... by गामा पैलवान
The House of the People, unless sooner dissolved, shall continue for five years from the date appointed for its first meeting and no longer and the expiration of the said period of five years shall operate as a dissolution of the House: Provided that the said period may, while a Proclamation of Emergency is in operation, be extended by Parliament by law for a period not exceeding one year as a time and not extending in any case beyond a period of six months after s the Proclamation has ceased to operateइंदिरा गांधी यांनी ४२ व्या दुरुस्ती मधून ८३(२) ह्या क्लॉज मध्ये पण दुरुस्ती करून 'five years' च्या ऐवजी 'six years' असे केले होते. ते त्या वेळी चालु असलेल्या लोकसभेला पण लागू होते. त्यामुळे ती लोकसभा मार्च १९७७ पर्यंत चालली असती. १९७६ नंतर लगेचच ती बरखास्त झाली नाही याला कारण ४२ वी दुरुस्ती आहे. पुढे जनता सरकारने या 'सहा' चे 'पाच' वर्षे असे केले. १९७७ मध्ये एकतर निवडणुका घ्याव्या लागल्या असत्या किंवा अजून मुदत वाढवता आली असती. त्यांनी पहिला मार्ग निवडला. आर्मी आणीबाणी मध्ये काय करत होती याचे उत्तर खालील लेखात मिळेल . http://www.thequint.com/Politics/what-was-the-army-doing-during-the-emergency
In reply to गामा जी, by सव्यसाची
इंदिरा गांधी यांनी ४२ व्या दुरुस्ती मधून ८३(२) ह्या क्लॉज मध्ये पण दुरुस्ती करून 'five years' च्या ऐवजी 'six years' असे केले होते. ते त्या वेळी चालु असलेल्या लोकसभेला पण लागू होते. त्यामुळे ती लोकसभा मार्च १९७७ पर्यंत चालली असती. १९७६ नंतर लगेचच ती बरखास्त झाली नाही याला कारण ४२ वी दुरुस्ती आहे. पुढे जनता सरकारने या 'सहा' चे 'पाच' वर्षे असे केले.आणीबाणीत एका वेळी एक वर्षाने लोकसभेची मुदत वाढवता येते. पाचवी लोकसभा मार्च १९७१ मध्ये स्थापन झाली. म्हणजे या लोकसभेची मुदत मार्च १९७६ पर्यंत होती.तुम्ही म्हणता त्या प्रमाणे ४२ वी घटनादुरूस्ती १९७६ मध्येच झाली पण ती डिसेंबर १९७६ मध्ये झाली. त्या घटनादुरूस्तीनुसार लोकसभेची मुदत ५ वर्षांवरून ६ वर्षे केली गेली. पण मार्च १९७६ पासून आणखी एक वर्ष म्हणजे मार्च १९७७ पर्यंत ती मुदत त्यापूर्वीच वाढवली गेली होती. डिसेंबर १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरूस्ती झाली त्याच लोकसभेच्या अधिवेशनात लोकसभेची मुदत आणखी एका वर्षाने (म्हणजे मार्च १९७८ पर्यंत) वाढविण्यात आली होती. पण त्यानंतर महिन्या-दीड महिन्यात इंदिरा गांधींनी पाचवी लोकसभा बरखास्त करून घेऊन निवडणुकांचा मार्ग मोकळा केला.
In reply to लोकशाही चौकटीतली आणीबाणी ... by गामा पैलवान
या संदर्भात सोनिया गांधींची प्रतिक्रिया अभ्यासणे रोचक ठरावे.खरंच अस वाटते तुम्हाला ? ;-)
In reply to circumstances leading to declaration of Emergency by सव्यसाची
५. आयबीचा असा कोणताही रीपोर्ट नव्हता जो आणीबाणी लादण्याची गरज आहे असे सुचवत होता. ६. गृहमंत्रालयाने देशांतर्गत अशांततेबद्दल असा कोणताही रीपोर्ट पंतप्रधानांना दिला नव्हता. किबहुना, जे पत्र पंप्रनी राष्ट्रपतींना पाठवले तेही आणीबाणी संपेपर्यन्त गृहमंत्रालयाच्या फाइल मध्ये नव्हते.देशात सर्वसामान्य परिस्थिती असताना व अशांतता/अराजक/युद्ध/यादवी युद्ध/जातीय दंगली/कोलमडलेली कायदा-सुव्यवस्था/ढासळलेली आर्थिक परिस्थिती ... अशी कोणतीही परिस्थिती नसताना इंदिरा गांधींनी आणिबाणी लादली ती फक्त स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी. त्यासाठी न्यायालयाला देखील धुडकावून लावण्यात आले. अर्थात सत्तेसाठी न्यायालयाची अवहेलना करणे हे काँग्रेससाठी नेहमीच सोपी गोष्ट होती हे नंतर शाहबानो प्रकरणावरून देखील दिसून आले.
In reply to इंदिरा गांधींचा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप by गॅरी ट्रुमन
In reply to वेलकम बॅक क्लिंटन! by श्रीगुरुजी
... आणि युपीएच्या १० वर्षांच्या काळ्याकुट्ट कारकीर्दीत राष्ट्रपतीपदापासून, राज्यपाल, सेन्सॉर बोर्ड, निवडणुक आयोग, राष्ट्रीय महिला आयोग अशा सर्व संस्थांमध्ये आपले पित्ते नेऊन बसविले होते याचा यांना सोयिस्कर विसर पडतो.काँग्रेस वाईटच हो आणि म्हणून तर त्यांचा इतका विक्रमी लाजिरवाणा पराभव केलाय आपण जनतेनं. पण परत परत काळीकुट्ट कारकिर्द वगैरे (इथे संबंध नसताना) म्हणून नक्की काय ठसवायचंय ?
हेच काँग्रेसवाले आता आरडाओरडा करीत आहेत की मोदी शिक्षणसंस्थांमध्ये लुडबुड करीत आहेत. हा आरोप करताना काँग्रेसवाले इंदिरा गांधींची कृत्ये विसरतातफक्त काँग्रेसवालेच आरडा-ओरडा करतात का ? की आरडा ओरडा करणारे काँग्रेसीच असणार. (ढिस्क्लेमर: मी काँग्रेसी/भाजपी अथवा कुठलाही पक्षीय नाही पण) व्यक्तिशः मला शिक्षणसंस्थांमधल्यापेक्षा न्यायालय आणि आरबीआय सारख्या स्वायत्त संस्थांवर अप्रत्यक्ष कंट्रोल आणण्याचे सरकारचे प्रयत्न पटत नाहीत. अगदी काँग्रेसद्वेषी दृष्टीने पहायचे झाल्यास उद्या कधी काँग्रेसचे सरकार आलेच तर सगळ्यात जास्त (गैर)फायदा तेच घेतील या कायद्यांचा असं वाटतं (बघा बुवा).
In reply to इंदिरा गांधींचा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप by गॅरी ट्रुमन
In reply to इंदिरा गांधींसंदर्भात दोन प्रश्न by बोका-ए-आझम
त्यांना हुकूमशहा व्हायची इच्छा होती अशा स्वरूपाचं विधान खुद्द त्यांची आत्या विजयालक्ष्मी पंडित यांनी केलं होतं. हे खरं आहे का?इंदिरा गांधी आणि त्यांची आत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्यात दुरावा इंदिरा लहान असल्यापासूनच होता. कदाचित लहानपणी आत्याकडून काही अनुभव इंदिरांना आले असतील. नेहरू पंतप्रधान असताना विजयालक्ष्मी पंडित यांना यु.एन. जनरल असेंब्लीचे अध्यक्षपद, भारताचे लंडन आणि वॉशिंग्टनमधील राजदूत अशी पदे भूषवायला मिळाली होती.पण इंदिरा पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांना फारसे महत्व मिळत नव्हते. इंदिरा गांधी प्रसंगी प्रचंड vindictive होऊ शकत. जनता सरकारने विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी नयनतारा सहगल यांना रोममध्ये भारताचे राजदूत म्हणून पाठवले.पण १९८० मध्ये इंदिरांचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरांनी ती नियुक्ती रद्द केली. सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांमध्ये हा निर्णय होता. नयनतारांचे त्यांचे पती गौतम सहगल यांच्याशी पटत नसे.त्या काळात त्या मंगत राय या अत्यंत कार्यक्षम आणि कर्तबगार अशा आय.सी.एस ऑफिसरबरोबर राहत असत. नंतर त्यांचे मंगत रायांबरोबर लग्नही झाले. मंगत राय कॅबिनेट सेक्रेटरी होऊ शकले असते पण त्यांना इंदिरांनी डावलले आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला (१९७३ मधील तीन न्यायाधीशांप्रमाणे) असे वाचले आहे.तेव्हा सांगायचा मुद्दा हा की विजयालक्ष्मी पंडित असे काही बोलल्या असल्या तरी त्यामागे ही सगळी पार्श्वभूमी असेल तर ते पूर्णपणे निष्पक्ष मत होऊ शकणार नाही.
आणीबाणी असताना त्यांनी अध्यक्षीय पद्धत आणण्याचा घाट घातला होता पण सर्वोच्च न्यायालय आणि बार कौन्सिल आॅफ इंडिया यांच्या जागरुकतेमुळे आणि विरोधामुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही असं वि.स.वाळिंब्यांच्या ' रायबरेली आणि त्यानंतर ' या पुस्तकात म्हटलंय. हा काय प्रकार आहे?याविषयी काही कल्पना नाही.
In reply to इंदिरा गांधींसंदर्भात दोन प्रश्न by बोका-ए-आझम
In reply to वरील दोन्ही मुद्द्यांविषयी by श्रीगुरुजी
In reply to २०१४ निवडणूक by बोका-ए-आझम
In reply to इंदिरा गांधींसंदर्भात दोन प्रश्न by बोका-ए-आझम
In reply to भारतात अध्यक्षीय पध्दती असती तर by गॅरी ट्रुमन
भारतातील प्रचंड विविधता लक्षात घेता अध्यक्षीय पध्दती आणता येईल असे वाटतही नाही.थोडक्यात सांरांश.. सहमत.!!
In reply to आणीबाणीची पार्श्वभूमी-१ by गॅरी ट्रुमन
In reply to क्लिंटन हा तर by बोका-ए-आझम
(स्त्रोतः http://guruprasad.net/wp-content/uploads/2014/06/1974_gujarat_protests.jpg)
दरम्यानच्या काळात गुजरातमधील विद्यार्थी, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतील शिक्षक, वकील इत्यादींची नवनिर्माण समिती बनली. या समितीला सामान्यवर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. गुजरातमधील आंदोलनात विद्यार्थी संघटनांचा पुढाकार होता.राजकारणी मंडळी त्यात सुरवातीला नव्हती.या समितीच्या कामात नरेंद्र मोदींचाही सहभाग होता. त्यावेळी ते अभाविपमध्ये होते.
(स्त्रोतः http://guruprasad.net/wp-content/uploads/2014/06/1974_modi_activist.jpg)
या समितीने मागण्या केल्या होत्या त्यातल्या काही मागण्यांमध्ये चुकीचे असे काहीच नव्हते असे वरकरणी वाटेल.पण त्या प्रत्यक्षात कशा आणायच्या याविषयी काहीच ठोस कार्यक्रम समितीकडे नव्हता. उदाहरणार्थ भ्रष्टाचाराचे उच्चाटन करा ही मागणी करायला ठिक आहे.पण ते कसे करणार याविषयी समितीकडे काहीच कार्यक्रम नव्हता.तसेच मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी राजीनामा द्यावा ही मागणी समितीने केली.जरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तरी पुढे काय? या प्रश्नांना त्या वातावरणात स्थान नव्हते. धान्याचा काळाबाजार रोखा ही पण एक मागणी होती.ती त्या काळच्या परिस्थितीत जनसामान्यांच्या हृदयाच्या तारा छेडणारी ठरली.त्यातूनच या आंदोलनाला सामान्यांचा पाठिंबा अधिक मिळत गेला.
आंदोलनात झालेला हिंसाचार आणि हाताबाहेर जाणारी परिस्थिती लक्षात घेऊन इंदिरा गांधींना नमते घेणे भाग पडले.शेवटी ९ फेब्रुवारी १९७४ रोजी चिमणभाई पटेलांना इंदिरा गांधींनी राजीनामा द्यायला सांगितले आणि विधानसभा बरखास्त न करता निलंबित अवस्थेत ठेवली.
१९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोरारजी देसाईंच्या काँग्रेस (ओ) पक्षाचा धुव्वा उडाला होता.पक्षाला १६८ पैकी अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या तर इंदिरांच्या काँग्रेस (आर) ला १४० जागा होत्या.आंदोलनात उडी घ्यायला मोरारजींना चांगली संधी होती.त्यांच्या १५ आमदारांनी राजीनामे तर दिलेच.त्यानंतर जनसंघाच्या ३ आमदारांनी राजीनामे दिले. नवनिर्माण समितीच्या आंदोलनाच्या दडपणामुळे काही काँग्रेस आमदारांनीही राजीनामे दिले. तसेच गुजरात विधानसभा बरखास्त करा या मागणीसाठी मोरारजी देसाई १२ मार्च १९७४ पासून आमरण उपोषणाला बसले. इंदिरा गांधींना शेवटी ही पण मागणी मान्य करावी लागली आणि १६ मार्चला विधानसभा बरखास्त करण्यात आली. २० डिसेंबर १९७३ रोजी एल.डी.कॉलेजमधील आंदोलन सुरू झाल्यापासून १६ मार्चपर्यंत सुमारे १००० लोकांचा मृत्यू हिंसाचारात झाला.
इंदिरा गांधींच्या हातातून परिस्थिती जायला लागली त्यात या गुजरात आंदोलनाचा वाटा मोठा आहे. यानिमित्ताने काही गोष्टी लिहाव्याशा वाटतात.
दोन्ही बाजूंकडून ही परिस्थिती अधिक प्रगल्भतेने हाताळली जायला हवी होती. चिमणभाईंचे काँग्रेस सरकार म्हणजे भ्रष्टाचार आणि सगळ्या वाईट गोष्टींचा अर्क असे चित्र उभे राहिले होते ते काही १००% चुकीचे नक्कीच नव्हते.पंडित नेहरूंच्या काळात स्वातंत्र्यलढ्यातील मुल्यांचा परिणाम म्हणा की अन्य कोणत्याही कारणाने म्हणा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. पण इंदिरांच्या काळात परिस्थिती अगदीच खालावली. संजय गांधींच्या मारूती साठी सरकारी यंत्रणा दावणीला धरली गेली.१९६७ नंतर काँग्रेस पक्षाने अनेक राज्यांमध्ये विरोधी आमदार फोडून आपली सरकारे बनवली होती. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने पाण्यासारखा पैसा खर्च केला.त्यातूनच पक्षाची पैशाची गरज आणखी वाढली आणि सगळ्या लांड्यालबाड्यांकडे कानाडोळा झाला किंवा त्यांना राजाश्रय मिळाला. सत्ताधारी माजणे म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे १९७० च्या दशकातील इंदिरांची काँग्रेस होती. तरीही नवनिर्माण समितीने भ्रष्टाचार कमी करा अशा मागण्या कोणत्याही कार्यक्रमाशिवाय सादर करणे अयोग्य होते असे माझे मत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या ही मागणीही त्यातलीच.कितीही काहीही झाले तरी आपल्या पद्धतीत राज्य विधानसभेत बहुमत आहे तोपर्यंत मुख्यमंत्री सत्तेत राहू शकतात.अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे कितपत योग्य आहे? आणि ते ही हिंसाचार करून?
इंदिरा गांधी या इतक्या खमक्या नेत्या असूनही त्यांनी अशा मागण्यांपुढे हात टेकले याचाच अर्थ परिस्थिती तितकी हाताबाहेर गेली होती. आणि अर्थातच मुळात इंदिरांची बाजूही १००% योग्य नव्हतीच. कारण राजकारणातील मूल्यांचा र्हास करायला त्या एका अर्थी जबाबदार होत्याच.त्याचे उट्टे नियतीने वेगळ्या पध्दतीने काढले असे म्हणायला हवे.
आता यापुढील प्रतिसादात बिहारमधील परिस्थितीविषयी लिहेन. In reply to आणीबाणीची पार्श्वभूमी-२ by गॅरी ट्रुमन
असच काहितरी