मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

वामन देशमुख · · काथ्याकूट
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय! ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे. --- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्

वाचने 37614 वाचनखूण प्रतिक्रिया 341

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 21:58
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!

श्रीगुरुजी Wed, 04/02/2025 - 09:41
D कोरोना काळात रस्तेबंदी असताना मी सुद्धा स्वत: गाडी चालवित वांद्र्यातून पंढरपुरास गेलो होतो. वांद्रे-पंढरपूर हा रस्ता दुर्गम, धोक्याचा व खड्ड्यांनी भरलेला आहे. माझे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे होते. हे सर्व करण्यामागे माझी देशभक्तीच होती. जय हिंद जय महाराष्ट्र.

In reply to by श्रीगुरुजी

वामन देशमुख Wed, 04/02/2025 - 10:00
या लोकांची मज्जाये, कुणी फटफटी चालवतंय तर कुणी मोटार चालवतंय, देश-राज्य मात्र नरेंद्र-देवेंद्र चालवताहेत! --- अवांतर: व्वा! खूप दिवसांनी फटफटी हा शब्द वापरला; एकदम भारी वाटलं! माझ्या बालपणी बाबांकडे रॉयल एनफिल्ड बुलेट होती. तेंव्हा मी ती चालवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी (बुलेट, जावा, येझदी, राजदूत इ. च्या काळात) मोटारसायकलीला फटफटी म्हणायचे. बाइक हा शब्द कदाचित कुणाला माहीतही नसावा! कालांतराने मी माझी रॉली घेतली. तेंव्हा, "वामन्या, घेतलास काय तुझी तुझी फटफटी लाष्टला?" असे मित्र म्हणाले होते. आता हे सर्व आठवले. त्यानिमित्ताने रागांचे आभार मानू की उठांचे आभार मानू? - (रॉलीप्रेमी) द्येस्मुक् राव्

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे Wed, 04/02/2025 - 10:24
बरं झालं ते लखनौहुन उत्तरप्रदेशात ला गेले नाहीत किंवा बंगळुरूतून कर्नाटकला गेले नाहीत . नाही तर माझ्या सारखे त्यांना पण मुंबईतून महाराष्ट्रात जायला लागले असते

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/03/2025 - 09:54
सेन्सेक्स ३०० अंकानी खाली. US tariffs hit Indian markets as Sensex falls over 300 points, Nifty below 23,250 ट्रम्प ह्यांच्या आयात शुल्काच्या निर्णयावर जगातील सर्व देशप्रमुखांच्या प्रतिक्रिया येत आहेत. Meloni called a 20% tariff rate imposed on the European Union "wrong", while Albanese said a 10% import tax on Australia's goods was "unjustified." Ireland, Taoiseach Micheál Martin said Trump's decision was "deeply regrettable" and benefitted "no-one". Japan said its 24% levy was "extremely regrettable" and could violate World Trade Organization and US-Japan agreements, while Thailand said it would negotiate its 36% tariff. https://www.bbc.com/news/articles/cvgql020y5lo https://indianexpress.com/article/business/market/us-donald-trump-tariffs-india-stock-markets-sensex-nifty-50-9921556/ भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 11:08
भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत. कोणी दिली अशी प्रतिक्रिया?

In reply to by श्रीगुरुजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/03/2025 - 11:25
इंग्रजी वर्तमानपत्रांत उद्योजकांनी दिली आहे. काल शेयरमार्केटमधील दलालही असेच म्हणत होते. सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 12:36
कोणकोणत्या उद्योजकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे? कोणकोणते दलाल असे म्हणत होते? सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच. म्हणजे देश चालविणाऱ्या अधिकृत सरकारकडून कोणत्याही अधिकृत नेत्याने अजूनपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पण माईडी कोणतेतरी अनामिक उद्योगपती, अनामिक दलाल यांच्या निराधार प्रतिक्रिया वाचून नाचायला लगली.

In reply to by श्रीगुरुजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/03/2025 - 12:57
ट्रम्पने मोदीना बोलावुन व्हाईट हाउसमध्येच भारताचा अपमान केला. बेड्या घालुन्,साखळ्या घालुन भारतियांना परत पाठवले.. त्यावर एक अक्षर न बोलणारे आता काही बोलतील ह्याची अपेक्षाच नाही. आयात्शुल्कावर आता महत्वाचे देशप्रमुख प्रतिक्रिया नोंदवत आहेत. "वसुधैव कुटुंबकम/विश्वगुरु' करणारे मात्र गप्प आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 13:13
खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर मार्गाने घुसलेल्या पुरूषांना ट्रंपने धोतर, कोट, टोपी, उपरणे, पानसुपारी, भेटवस्तू, दक्षिणा देऊन आणि महिलांना इरकली, लुगडं, धारवाडी खण, मोगऱ्याची वेणी देऊन ओटी भरून विमानाच्या प्रथम वर्गातून पाठवणी करायला हवी होती. पाठवणी करताना निरोप द्यायला ट्रंप दांपत्य विमानतळावर यायला हवे होते आणि प्रत्येकाला "पुन्हा यायचं हं आणि आल्यासरशी चांगलं महिनाभर रहायचं हं" असं सांगून गळाभेट घ्यायला हवी होती. माईडे तू नानांची, समोरच्या दुकानातल्या मारवाड्याची, कोपऱ्यावरच्या पानवाल्याची, पोस्टमनची प्रतिक्रिया घे पाहू आणि आम्हालाही सांग.

In reply to by श्रीगुरुजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/03/2025 - 14:51
"धोतर, कोट, टोपी, उपरणे, पानसुपारी, भेटवस्तू, दक्षिणा देऊन आणि महिलांना इरकली, लुगडं, धारवाडी खण" हे नाहीतर हातापायात बेड्या.. ह्यामधे काहीच नाही का ? बायनरी थिंकिंग म्हणतात ते हे. तुम्ही आमच्याबरोबर आहात नाहीतर तुम्ही आमचे शत्रु. मुलगी हवी तर ती ऐश्वर्या रायसारखीच नाहीतर मी अविवाहितच राहणार ही मानसिकता. आयात शुल्क लावले म्हणुन ईतर देश ह्यावर कसा मार्ग शोधायचा ह्यावर विचार करत आहेत. आणि ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत. उद्या बेकायदेशीर भारतियांना ट्रम्पने गोळ्या घालुन मारले तरीही मौनी पंतप्रधान गप्प बसतील आणि त्यांचे समर्थक "तो अमेरिकेचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणुन समर्थन करतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 15:02
ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत. हो ना. आमच्याकडे सकाळी वृत्तपत्र टाकणारा, महापालिकेतील मूषकसंहार कार्यालयातील एक लिपिक, आरामखुर्चीतून झुलत झुलत वामकुक्षी करणारे एक निवृत्त पणजोबा, झालंच तर नाक्यावरचा पानवाला असे अनेक भारतीय आयातशुल्क वृद्धीसाठी ट्रंपचे कौतुक करताहेत. मौजे गुडमुडशिंगी (खुर्द) मध्ये तर कोपऱ्याकोपऱ्यावर फलक लावून त्यावर ट्रंपचे चित्र व त्याखाली वस्तादाने डाव टाकला असं लिहून फटाक्यांची आतषबाजी करताहेत.

In reply to by श्रीगुरुजी

स्वधर्म गुरुवार, 04/03/2025 - 14:56
माईंचा मूळ मुद्दा जो की इतके सर्व देश प्रतिक्रीया देत असताना आपले नेते एक अवाक्षरही प्रतिक्रीया देत नाहीत हा आहे. वी आर जष्ट टेकर्स, विदाऊट करेज टू डिसअ‍ॅग्री अशी देशाची प्रतिमा जागतीक पटलावर होत आहे. शेपूट घातले तरी त्याचे समर्थन आपण कसे करू शकता हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by स्वधर्म

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 15:13
आंतरराष्ट्रीय राजकारणात घायकुतीला येऊन काहीही करत नाहीत. प्रत्येक वेळी पूर्ण अभ्यास करून, लाभ-नुकसानीचा सखोल विचार करून त्यानुसार प्रतिक्रिया देऊन भूमिका घेतली जाते. १९९८ मधील अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध घातल्यानंतर त्या संबंधात भारत-अमेरिका चर्चा सुरू झाली व चर्चेच्या अनेक फेऱ्यांनतर जो अणुकरार झाला तो २००८ मध्ये. आताही पूर्ण अभ्यास करून योग्य तो निर्णय योग्य वेळी होईल व त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विवाह झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अपत्य जन्माला येत नाही. त्यासाठी ९ महिने लागतात. तसेच असे आंतरराष्ट्रीय विषय एका दिवसात हातावेगळे होत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

स्वधर्म गुरुवार, 04/03/2025 - 17:11
बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. आपण आत्ता विश्लेषण करत आहोत. अगदी थायलंडसारखा देशही प्रतिक्रिया देता झाला. ते घायकुतीला आलेत असे अजिबात वाटत नाही. जिथल्या तिथे पहिली प्रतिक्रिया देणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आब राखण्यासाठी आवश्यक होते. भारतीयांना परत पाठवले ते ठीक पण बेड्या घालून पाठवणे हे देशासाठी अत्यंत अपमानकारक आहे. त्यावरही चिडीचूप! तरीही तुमच्या मनातील सरकारच्या प्रतिमेल धक्का लागत नाही, हे थोडे जास्तच बाजू घेणे नाही का?

In reply to by स्वधर्म

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 17:17
तात्काळ व घाईघाईने प्रतिक्रिया द्यावी असा हा निर्णय नाही. सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेणे हीच आंतरराष्ट्रीय राजकारणात योग्य प्रक्रिया असते.

In reply to by स्वधर्म

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/03/2025 - 17:18
बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. बहुतेक त्या त्या देशात खोट्या पदवीवाले पीएम असतील त्यामुळे ते लगेच प्रतिक्रिया देत असतील, आपल्या देशात खर्या पदवीवाले पीएम असल्याने डोके चालवून विश्लेशन करुनउत्तर द्यायला थोडा वेळ लागत आसावा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/03/2025 - 17:49
"सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेणे हीच आंतरराष्ट्रीय राजकारणात योग्य प्रक्रिया असते." प्रश्नपत्रिकेत एक/दोन वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न होते. ते सोडुन "आम्ही संदर्भासहित स्पष्टीकरणच लिहिणार" म्हणून ह्यांनी उत्तर पत्रिकाच कोरी ठेवली. काय बोलणार? एखाद्या हुशार बनियाने डाळींच्या भावाचा फलक ज्या सहजतेने दुकानाबाहेर लावावा तसे ट्रम्प ह्यांनी काल आयात शुल्कांचा फलक दाखवला.ईतर देशप्रमुखांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अशा प्रतिक्रिया द्यायला प्रचंड व्यासंग्,सखोल ज्ञान वगैरेची काहीही गरज नसते/नव्हती. trump

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 18:03
आंतरराष्ट्रीय राजकारणात एका वाक्यात उत्तर द्या असे प्रश्न कधीही नसतात. काही प्रश्नांना तर उत्तर देण्यासाठी अनेक प्रबंध लिहावे लागतात. "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा, चोवीस तासात काश्मीर प्रश्न सोडवून दाखवितो" असला मूर्खपणा फक्त मुर्खांसाठी असतो. अगदी ११ सप्टेंबरनंतर सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबरला अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला नव्हता. १९९० मध्ये सद्दामने कुवेत बळकावल्यानंतरही अमेरिकेने जवळपास साडेपाच महिन्यांनंतर युद्ध सुरू केले होते. अमेरिका-युक्रेन युद्ध म्हणजे हत्ती व मुंगीचे युद्ध आहे, परंतु तीन वर्षांनंतरही रशियाला विजय मिळालेला नाही वा युद्ध थांबले नाही. कायमचूर्ण वटी झोपताना घ्या, सकाळी पोट साफ असे आंतरराष्ट्रीय राजकारण नसते. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.

In reply to by श्रीगुरुजी

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/03/2025 - 23:22
मग चीन्,जपान्,युरोपियन युनियन मधील देश ह्यांनी गेल्या काही महिन्यात अमेरिकेच्या धोरणांवर ज्या तात्काळ प्रतिक्रिया दिल्या, त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही पण भारताला मात्र आंतरराष्ट्रीय राजकारण चांगले कळते असे समजायचे?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 23:40
भारताला आंतरराष्ट्रीय राजकारण व्यवस्थित समजू लागले आहे. ते कसे ते काही काळातच समजेल. 'ह्यां'ना दोन मिनिटात साबुदाण्याची लापशी करून देण्याइतके आंतरराष्ट्रीय राजकारण सोपे नसते.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 12:37
जन्मापासून मुस्लिमधार्जिणा असलेल्या पक्षाकडून काही वेगळे अपेक्षित होते का?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० गुरुवार, 04/03/2025 - 22:16
हे माहीत असूनही तुमच्या लाडक्या पक्षाने त्यांच्यासोबत युती का केली होती? सध्या तुम्ही तुमच्या लाडक्या पक्षाच्या धोरणावर आणि पक्ष वाढीवर ( भ्रष्ट नेते आयात ) नाराज असल्याचे जाणवते. नैराश्यातून आलेला तुमचा प्रतिसाद बघता लवकरच तुम्ही संन्यास घेणार असे दिसते.

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 22:35
पूर्वी प्रचारात अमित शाहंनी एक बोधकथा सांगितली होती. ती सांगण्याचा मोह आवरत नाही. एका अरण्यात एक साधू तपश्चर्या करीत असतो. त्याच्या गुहेत एक मूषक वास्तव्यास येतो. साधू त्यालाही आपल्याबरोबर थोडे अन्न द्यायचा. एक दिवस मूषक साधुला सांगतो की मला त्या मार्जाराचे खूप भय वाटते. त्यामुळे साधू त्या मूषकाचे मार्जारात रूपांतर करतो. काही दिवसांनी तो बोका साधुला सांगतो की मला त्या श्वानाचे खूप भय वाटते. त्यामुळे साधू बोक्याचे रूपांतर श्वानात करतो. काही दिवसांनी श्वान साधुला सांगतो की मला त्या शार्दुलाचे खूप भय वाटते. त्यामुळे तो साधू श्वानाचे रूपांतर शार्दुलात करतो. काही दिवसांनी शार्दूल साधुला सांगतो की मला मूषकाचे खूप भय वाटते. तो रात्री केव्हाही अंगावर चढून आयाळ कुरतडतो. शेवटी वैतागून साधू शार्दुलाला पुन्हा एकदा मूळ मूषक स्वरूपात आणतो. भाजपने शिवसेनेला मूषक स्वरूपातून शार्दूल स्वरूपात नेले, परंतु शार्दूल होण्याची पात्रता नसल्याने पुन्हा मूळ मूषक स्वरूपात आणून बिळात नेऊन ठेवले. तात्पर्य - मूषकास मूषक स्वरूपातच ठेवावे, शार्दूल स्वरूपात नेले तरी तो मूषकच राहतो. बाकी मी संन्यास वगैरे घेत नसतो. येथील थापाड्यांच्या थापा उघडकीस आणण्याचे माझे कार्य अखंडित राहील.

In reply to by श्रीगुरुजी

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/03/2025 - 22:39
एक अजगर आपल्या मालकाच्या बाजूला झोपून रोज माप घेतो, एके दिवशी त्याची साईज मालका पेक्षा मोठी झाल्यावर मालकालाच गिळतो, असे अजगर महाराष्ट्र गोमंतक पार्टी, अकाली दल, आसाम गण परिषद नी शिवसेना ह्यांनी पाळले होते म्हणतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टीपीके Fri, 04/04/2025 - 00:28
परत एकदा निर्लज्ज खोटेपणा. गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते, तेव्हा तिकडून तुम्ही पळ काढला आणि परत तीच गरळ ओकायला निर्लज्जपणे इकडे आलात. तुम्हाला माहित आहे खोटे 2 ओळीत लिहिता येते पण ते खोडण्यासाठी खूप मेहनत घेऊन मुद्देसूद लिहावे लागते. दिवसभर गावभर हुंदडायला आणि निर्लज्जपणे फुकटचा पगार खाणाऱ्या माणसासाठी काड्या सारणे हा खेळ आहे, पण प्रत्येक वेळी तुमचे खोटे उघडे पाडायला इतरांकडे वेळ असेलच असे नाही. म्हणून उगाच स्वतःची पाठ थोपटू नका

In reply to by टीपीके

खोटा कोण आहे ते अख्खा महाराष्ट्र जाणतो, ज्यांच्या डिग्र्याच खोट्या आहेत ते नी जे बांडगुळ बनून शिवसेनेच्या जीवावर वाढले ते स्वतःला मोठे म्हणणारच! अहो कसे पाया पडायला यायचे मातोश्रीवर विसरले का? सेनेने फेकलेल्या १२७ की १२० जागा घेऊन पळत सुटायचे! १७१ की १८० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला ११७ जागा पदरात मिळालेला पक्ष वाढवतो ह्यावर एखादा मूर्खच विश्वास ठेवेल किंवा एखादा अंधभक्तच! मूर्ख अंधभक्त असेल तर तो ह्यालाही खोटेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल!

In reply to by टीपीके

श्रीगुरुजी Fri, 04/04/2025 - 08:21
गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते, युती होण्यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत शून्य जागा जिंकणाऱ्या पक्षाला भाजपने खांद्यावर घेऊन मोठे केले. पण हे इतके नालायक की आपल्या कर्तृत्वानेच आपण मोठे झालो या भ्रमात भाजपच्या कानातच . . . शेवटी भाजपने खांद्यावरून उतरवून दाणकन जमिनीवर आदळून पेकाट मोडले. १ वर्षापूर्वी देशाचा पंतप्रधान होणार अशी दर्पोक्ती करणारे आज राज्यात विरोधी पक्षनेता होण्याच्या पात्रतेचे सुद्धा राहिले नाहीत व पात्रता नसली तरी आमच्यावर दया करून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या अशी भाजपचे पाय धरून विनवणी करीत आहेत. पण मांजर जसे उंदराला खेळवते तसे भाजप खोडकरपणे यांना खेळवतोय. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदेंशी बोला असे सांगून सांगता येत नाही व सहनही होत नाही अशी भाजपने उबाठाची केविलवाणी अवस्था केलीये. शेवटी नाक मुठीत धरून एकनाथ शिंदेंंना शरण जावे लागणार आणि भाजप उपकार केल्यासारखा आपल्याला हवा तोच माणूस विरोधी पक्षनेता करणार व भास्कर जाधव, आठा वगैरे चरफडत हात चोळत बसणार.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० गुरुवार, 04/03/2025 - 23:14
मी म्हटलेच होते ,तुम्ही संन्यास घेणार. आता असंबद्ध बोधकथा सांगून लवकरच भोंदूबाबा होणार ह्याची तयारी चालू केलीसुद्धा .

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 23:28
बोधकथा प्रचंड झोंबलेली दिसते. मी तुमच्यासारख्यांच्या झोंबणाऱ्या जखमांवर नियमित तिखटमीठ टाकण्यासाठी येत राहणार.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 14:09
शेवटी उठाने द्विधा मनस्थिती व संदिग्धावस्थेतून बाहेर पडून मुस्लिम अनुययाची व हिंदू विरोधाची आपल्या पिताश्रींपासून चालत आलेली भूमिका सुस्पष्टपणे घेतली यासाठी हार्दिक अभिनंदन! वरकरणी तोंडदेखले हिंदूप्रेम, आमचं हिंदुत्व गाईचे नाही तर बाईचे अशी हास्यास्पद भूमिका, मुस्लिमप्रेम उघड उघड दाखविण्यास संकोच या मानसिक कुचंबणेतून उठा बाहेर आले. मुस्लिमप्रेम सांगता येत नाही व हिंदूउन्नती सहन होत नाही ही अवस्था शेवटी उठाने संपुष्टात आणली. उठाच्या संदिग्ध भूमिकेमुळे ओवेसी, अबू आझमी, कॉंग्रेस इ. साशंक असायचे. पण शेवटी धाडस करून उठाने अत्यंत निसंदिग्धपणे मुस्लिम अनुनयाची भूमिका घेऊन सर्व संदिग्धता, साशंकता कायमस्वरूपी संपुष्टात आणली. मुस्लिमांना आता अधिकृत एक नवीन मसीहा मिळाला. मृतावस्थेत पडून शेवटचे आचके देणाऱ्या उबाठा गटाला मुस्लिम मतांचा प्राणवायू मिळून हा गट अति दक्षता विभागातून बाहेर जनरल वॉर्ड मध्ये येण्याची शक्यता निर्माण झालीये. सर्व उबाठाप्रेमींना यासाठी दिलोजानसे बधाई.

In reply to by श्रीगुरुजी

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/03/2025 - 19:26
एखाद्याने किती खरं बोलावं? काही मर्यादा?? काढा रे इडी, सीबीआय, निवडणूक आयोग, गद्दार…..

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/03/2025 - 19:26
*''छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, त्यांनी सर्वधर्मभाव जोपासला.”* - ⁠*भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* https://saamtv.esakal.com/maharashtra/gadkari-slams-nitesh-ranes-controversial-statement-on-shivaji-maharaj-bdk97 *इतिहासाचे विद्रूपीकरण करणाऱ्या भाजपच्या उथळ नेत्यांना व भक्तांना नितीन गडकरींनी स्पष्टच शब्दात चपराक दिली आहे.*

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/03/2025 - 19:34
पांचजन्य्,ऑर्गनायझरच्या पलिकडे जाउन जे वाचन करतात त्यातल्या मोजक्या भाजपा नेत्यांत गडकरी ह्यांचा समावेश होतो. गडकरी बरोबर बोलतात पण वेळ निघुन गेल्यावर.

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 19:41
आत ३ एप्रिल आहे. साहजिकच आहे काल २ एप्रिल होती आणि उद्या ४ एप्रिल असेल, परवा ५ एप्रिल असेल आणि साहजिकच आहे मग ६ एप्रिल असणार, त्यानंतर ७ एप्रिल येणार. येणार म्हणजे काय येणारच. न येऊन चालणारच नाही. मी मानगुटीला धरून ७ एप्रिलला घेऊन येणार. नाही आला तर पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून महाराष्ट्राच्या मातीत गाडीन.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/03/2025 - 22:01
मागचा आठवडा आंद्रे वपाडाव ह्यांनी गाजवल्या नंतर हा आठवडा aagya गाजवताहेत! श्रीगुरुजी एकटेच लढताहेत, भक्तांकडून योग्य ती रसद श्रीगुरूजीना पोहोचत नाहीये. पुढचा आठवडा बहुतेक “माई दी ग्रेट” गाजवणार! त्यापुढचा बिरुटेसर! :) मस्त रे मस्त! कुणी फिरवा दंडपटा कुणी काढा तलवारी, पण सोडू नका शत्रूला मोकळे ह्या मुलुख मैदानी! :) - २० मिपाकराना प्रत्यक्ष भेटलेला अमरेंद्र बाहुबली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टीपीके गुरुवार, 04/03/2025 - 22:49
खोटाड्यांना खोटे पणाच्या फुसकुल्या सोडून वातावरण दूषित करणे फार सोपे असते. स्वतःच स्वतःचा वास घ्या आणि खुश व्हा.

In reply to by टीपीके

सुक्या Fri, 04/04/2025 - 03:59
आता अगदी वीट आलाय ह्या लोकांचा. येउन जाउन तेच गुर्‍हाळ लावत असतात. नवीन असे काहीही नसते. श्रीगुरुजींची सहनशक्ती आफाट आहे. मी तर आता ह्या लोकांचे प्रतिसाद पण वाचत नाही.

In reply to by सुक्या

श्रीगुरुजी Fri, 04/04/2025 - 08:09
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद वाचत नाही. परंतु गुणगुण करीत घोटाळणाऱ्या डासाची गुणगुण खूप वाढली की फटका मारून तो डास मारावा लागतो. तसेच मी अधूनमधून करतो.

In reply to by श्रीगुरुजी

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 10:07
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद वाचत नाही. परंतु गुणगुण करीत घोटाळणाऱ्या डासाची गुणगुण खूप वाढली की फटका मारून तो डास मारावा लागतो. तसेच मी अधूनमधून करतो.
आता अगदी वीट आलाय ह्या लोकांचा. येउन जाउन तेच गुर्‍हाळ लावत असतात. नवीन असे काहीही नसते. श्रीगुरुजींची सहनशक्ती आफाट आहे. मी तर आता ह्या लोकांचे प्रतिसाद पण वाचत नाही.
दुर्दैवाने सहमत आहे. यांच्या अश्या वागण्यामुळे अनेक जुनी जाणती मिपाखरे एकतर वाचनमात्र झालीत नाहीतर मिपा सोडून गेलीत.

श्रीगुरुजी Fri, 04/04/2025 - 09:33
मुस्लिमांना इंतजेमा का काहीतरी असतं त्यासाठी उबाठा गटाने बीकेसीतील मैदान वापरायची अनुमती दिली होती. ती जागा बुलेट ट्रेनसाठी दिल्याने new muslim icon उठाचा संताप अनावर झालाय.

In reply to by श्रीगुरुजी

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 11:01
हे फुरोगाम्यांचे आइकॉन हल्ली फुरोगामित्व सोडून सनातनी होऊ घातले आहेत का? चार-सहा महिन्यांपूर्वीही त्यांनी मोदींचे समर्थन वाटेल काहीतरी बोललेले आठवते.

वक्फ बोर्ड संशोधन कायद्याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार कारण हा कायदा घटनाबाह्य आहे असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. एक गोष्ट कळत नाही. सध्या म्हटले जात आहे की संशोधन कायद्यानंतर १९९५ ची परिस्थिती परत आली आहे म्हणजे २०१३ मध्ये युपीए सरकारने जे बदल केले आहेत ते या नव्या संशोधन कायद्याद्वारे उलटवले आहेत असे मला तरी वाटत आहे. ते बरोबर आहे का? तसे असेल तर मग तो कायदा घटनाबाह्य आहे असे म्हणायला नक्की आधार काय आहे हे समजत नाही. कारण त्याचा अर्थ असा होईल की १९९५ चा कायदा हा पण घटनाबाह्य होता- तस्मात २०१३ मधील बदलही घटनाबाह्य होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे Fri, 04/04/2025 - 19:37
हे सर्व देखावा आहे. नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या बिहार च्या निवडणुकांच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुसलमानांच्या मतपेटीवर वर डोळा ठेवून हे न्यायालयातील अर्ज दाखल केलेले आहेत हे स्पष्ट आहे. कारण जोवर राष्ट्रपती त्यावर सही करत नाहीत तोवर तो कायदा होत नाही आणि संसदेत काय मंजूर होऊ शकते यावर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण नाही तेंव्हा सध्या तरी सर्वोच्च न्यायालय काही कार्यवाही करेल हि शक्यता सुतराम नाही. राष्ट्रपतींनी त्यावर सही केली आणि ते भारत सरकार राजपत्रात त्याची नोंदणी झाली कि मगच त्याला आव्हान देता येईल. याचे गुऱ्हाळ नंतर दोन तीन वर्षे तरी चालेल आणि त्यात निष्पन्न काहीही होणार नाही कारण एखादे प्रकरण न्यायालयात नेता येणार नाही असा कायदा केला असेल तर त्याला कोणते न्यायालय संमती देईल. इतके मूलभूत विचार करण्याची अपेक्षा बहुतांशी मुसलमान मतदारांची नाहीच. आणि ओवैसी आणि तत्सम लोकांना आपली मतपेटी सुरक्षित ठेवायची आहे.

In reply to by सुबोध खरे

>>> आणि ओवैसी आणि तत्सम लोकांना आपली मतपेटी सुरक्षित ठेवायची आहे. गोबरयुगात आपली सत्ता राहिली पाहिजे म्हणून 'गाजर ए कोबी' आणि 'वक्फ' ची दाळबट्टी आणली आहे, असे नाही वाटत का ? -दिलीप बिरुटे

वक्फ संशोधन बिल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास झाल्यानंतर जनता दल (युनायटेड) च्या पाच नेत्यांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे पाच नेते आहेत- नदीम अख्तर, राजू नय्यर, तबरेझ सिद्दीकी अलीग, महंमद शाहनवाझ मलिक आणि मोहंमद कासीम अन्सारी. हे पाच जण नक्की किती वरीष्ठ पदांवर आहेत याची कल्पना नाही. निदान मी तरी या पाचांपैकी एकाचेही नाव ऐकले नव्हते. बाकी कोणी राजीनामे दिले तरी फारसा फरक पडणार नाही खासदारांनी राजीनामे दिले तरच काही फरक पडू शकेल. १९९८ मध्ये तेलुगू देसमने वाजपेयी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षाचे नेते बशीरूद्दिन बाबू खान यांनी पण असाच राजीनामा दिला होता. ते चंद्रबाबू नायडू आणि एन.टी.रामाराव यांच्या मंत्रीमंडळात मंत्री तरी होते. मात्र हे पाच जण कितपत वरीष्ठ आहेत याची कल्पना नाही. त्या बशीरूद्दिन बाबू खान यांचे १९९८ नंतर नाव एकदाच ऐकले ते त्यांचे १०-१२ वर्षांपूर्वी निधन झाले तेव्हा. त्यामुळे असे नेते बाहेर पडून कितपत नुकसान होत असावे याची कल्पना नाही.

सुबोध खरे Fri, 04/04/2025 - 19:44
नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या बिहार च्या निवडणुकांच्या मुसलमानांच्या मतपेटीवर वर डोळा ठेवून हे राजीनामे दिलेले आहेत. दुष्काळात भाकड गाय ब्राम्हणाला दान देण्याची हि वृत्ती आहे. एकतर गाय दूध देत नाही, त्यातून चाऱ्याचा खर्च वाचतो आणि गोदानाचे पुण्यही मिळते.

जो भाजप आमदार आपल्या पी ए च्या बायकोला मंगेशकर रुग्णालयात दाखल करवून घेऊ शकत नाही! तो सर्वसामान्य लोकांची कामे काय करणार? लोक देखील खोट्या हिंदुत्वाच्या नादी लागून अश्या लोकांना मत देतात, ग्राउंड लेव्हलला काम करणारे शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक अश्या वेळी बरोबर न्याय मिळवून देतात! अजूनही लोकांनी सुधारायला हवे! आपण मत त्याला द्यावे जो अश्या अडचणीच्या वेळी कामात येईल खोट्या हिंदुत्वाच्या नी हिंदूंशी काडीचे देणेघेने नसलेल्या भाजप सारख्या पक्षाना मत देणे थांबवावे!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Sat, 04/05/2025 - 12:40
भुजबळ बुवा मंगेशकर रुग्णालयातील प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे माहिती नसताना बेफाट वक्तव्ये करू नका. रुग्ण दगावला असल्याने सामान्य माणसाची सहानुभूती नेहमीच नातेवाईकांना मिळत असते. रस्त्यावर असताना चूक नेहमीच मोठ्या वाहनांची असते तसंच. एकदा माझी मोटार सायकल बंद स्थितीत रस्त्याच्या उभी असताना एक शाळेतील मुलगा धावत धावत माझ्या मोटार सायकलला धडकला आणि खाली पडला त्यावर एका म्हाताऱ्याने मला मोटार सायकल नीट चालवता येत नाही का विचारले? मी त्या म्हाताऱ्याला तुम्हाला म्हातारचळ लागलाय. माझ्या बंद मोटारसायकलला ते पोरगा धडकलं यात माझी चूक काय असे मोठ्या आवाजात विचारले त्यावर त्याचा आवाज बंद झाला तुमची स्थिती यापेक्षा वेगळी नाही

In reply to by सुबोध खरे

आलेच का लगेच रुग्णालयच्या बाजूने मैदानात उतरायला? मी रुग्णालयाला दोष कुठेही दिलेला नाही. दोष भाजप आमदार नी त्याला भाजपला मत देणाऱ्या लोकांना दिलाय!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आग्या१९९० Sat, 04/05/2025 - 13:22
आलेच का लगेच रुग्णालयच्या बाजूने मैदानात उतरायला? तुमच्याकडे बघण्यासाठी ते ' पूर्वग्रह ' चष्मा वापरतात.

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव Sun, 04/06/2025 - 10:32
बरोबर आहे ... जो पर्यंत अश्या प्रत्येक म्हाताऱ्याला ... "तुम्हाला म्हातारचळ लागलाय"... असं रोखठोक कोणी सांगुन भानावर आणत नाही ... तो पर्यंत अशे थेरडे असेच चाळे चालू ठेवणार ... "आपल्याला सगळ्यातले सगळे कळते ... इतिहास, धर्म, इकॉनॉमी, राजकारण, आंतर्राष्टीर्य संबंध, सोनोग्राफी, हिंदुत्व ... अगदी सग्गळं सग्गळं .. " या म्हातार्यांना सुद्धा कोणीतरी त्यांच्या जवळचे .. "तुम्हाला म्हातारचळ लागलाय"... असं रोखठोक सांगुन भानावर आणतील ... तो पर्यंत ... जो चल रहा है चलने दो ...

आग्या१९९० Sat, 04/05/2025 - 12:20
आपण मत त्याला द्यावे जो अश्या अडचणीच्या वेळी कामात येईल खोट्या हिंदुत्वाच्या नी हिंदूंशी काडीचे देणेघेने नसलेल्या भाजप सारख्या पक्षाना मत देणे थांबवावे! अगदी बरोबर

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Sun, 04/06/2025 - 21:16
अरे चाललंय काय? एकीकडे पवार प्रभू श्रीरामांचे कौतुक करताहेत तर दुसरीकडे मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीराम भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग कॉंग्रेसवाले सांगताहेत आणि झुंडीने श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेताहेत. मुंगीने मेरूपर्वत तर गिळला नाही ना, सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना, टिटवीने समुद्र तर पिऊन आटवला नाही ना, चिलटाने समुद्र तर पार केला नाही ना . . .! अचानक ही उपरती! मग रामायण काल्पनिक कथा व राम काल्पनिक व्यक्ती या न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे काय झालं? श्रीरामसेतू उद्ध्वस्त करण्याचे काय झाले? बाबरी मशीद त्याच जागेवर परत उभारून देणार या आश्वासनाचे काय झाले? आता कॉंग्रेस, शप गट इ. सुद्धा हिंदुत्ववादी होत असतील तर गरीब बिच्चाऱ्या मुस्लिमांना आधार उरलाय तो फक्त मुस्लिम मसीहा उठाचाच.

In reply to by श्रीगुरुजी

सोमनाथचे मंदिर काँग्रेसच्या पटेलांनी तर अक्षरधामच्या उदघाटनाला की कार्यक्रमाला स्वत मनमोहनसिंग उपस्थित होते!

श्रीगुरुजी Sun, 04/06/2025 - 19:21

अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांनी टॅरीफ लावल्यावर डापु गँगवाल्यांची पंचाईत झाली आहे. एक तर डापु गँगवाले लोक मुक्त व्यापाराच्या विरोधात असतात त्यामुळे टॅरीफ वगैरे भानगडींना त्यांचे समर्थन असायला हवे. पण झाले असे आहे की हे टॅरीफ लावले आहेत डॉनल्डतात्या ट्रम्पनी- त्यांच्या अतिशय नावडत्या व्यक्तीने. त्यामुळे त्यांना पाहिजे तसे केले तरी त्याचे समर्थन कसे करायचे ही एक अडचण. इंग्लंड-अमेरिकेतील गार्डिअन, न्यू यॉर्क टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात स्तंभ लिहिणारे बरेच लोक या डापु गँगमधील असतात. गार्डिअनमध्ये असाच एक लेख आला आहे- ‘In economic terms, Trump’s tariffs make no sense at all’ https://www.theguardian.com/business/2025/apr/04/trump-tariffs-in-economic-terms-it-makes-no-sense-at-all . हा एक प्रातिनिधीक लेख आहे. अन्यत्रही अशाप्रकारची मते व्यक्त झाली आहेत. हे लिहिणार्‍यांच्या लक्षात एक गोष्ट येत आहे का? टॅरीफ वगैरे भानगडींमुळे कसे नुकसान होते हेच तर आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब सांगत होते. मुक्त व्यापार दोन्ही बाजूंच्या हिताचा असतो- अमेरिकन ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळतात तर निर्यात करणार्‍या इतर देशांना पैसे आणि तिथल्या लोकांना काम हेच तर ते सांगायचे. ते तर असेही म्हणाले होते की रेसिप्रोकल टॅरीफ अजिबात लावू नये. समजा दुसर्‍या देशाने अमेरिकन मालावर टॅरीफ लावला तरी अमेरिकेने त्या देशातून येणार्‍या मालावर टॅरीफ लावू नये. या डापु गँगच्या लोकांच्या मते आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब पण मोठे खलनायक असतात. म्हणजे ट्रम्पतात्या या एका खलनायकाने केलेल्या कृतीचा विरोध करायचा म्हणून डापु गँगवाले लोक दुसर्‍या खलनायकाची भाषा बोलायला लागले आहेत का? अर्थात त्यात नवल काहीच नाही. त्या गँगच्या लोकांना सतत विरोध करायला एक कोणीतरी खलनायक हवा असतो. आणि तो खलनायक जाऊन शिव्या देणारा नवा बकरा मिळाला की मग पूर्वी ज्याला शिव्या देत होते तो खलनायक हा खलनायक नसून चांगला होता हा साक्षात्कार कमी अधिक प्रमाणात त्यांना होत असतो. भारतातल्या डापु गँगवाल्यांच्या दृष्टीने तर असा पूर्वी शिव्या दिलेला खलनायक कित्ती कित्ती चांगला होता असे त्यांना वाटत असते. अमेरिकेतले डापु गँगवाले भारतातल्या त्यांच्या काऊंटरपार्टप्रमाणे उघडपणे त्या जुन्या खलनायकाचे गोडवे गाताना दिसत नाहीत तरीही त्यांची शिव्या घालायची धार मात्र बोथट होते. भारतात नेहरू पंतप्रधान असताना समाजवादी आणि डावे लोक त्यांना किती शिव्या घालायचे हे त्या काळातील बातम्या बघितल्या की कळेल. नेहरू स्वतःला समाजवादी म्हणवत असले आणि आपणही त्यांना समाजवादी समजत असलो तरी त्यावेळच्या समाजवाद्यांच्या मते नेहरू पुरेसे समाजवादी नव्हते म्हणून त्यांना शिव्या घातल्या जात होत्या. नंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर, विशेषत: त्यांनी आणीबाणी लादल्यावर हेच समाजवादी लोक त्याविरोधात प्राणपणाने लढले होते आणि तेव्हा नेहरू कित्ती कित्ती चांगले होते असा साक्षात्कार त्यांना झाला होता. नंतरच्या काळात मात्र नेहरूंप्रमाणे इंदिरा गांधीही या समाजवाद्यांच्या गळ्यातील ताईत झाल्या. १९९१ मध्ये नवे आर्थिक धोरण आल्यावर मनमोहनसिंगांना आय.एम.एफ चे एजंट वगैरे बोलणारे लोकच मोदी सत्तेत आल्यावर मनमोहनसिंगांचे गोडवे गायला लागले. उद्योजकांमध्ये पूर्वी हे लोक टाटा-बिर्लांना शिव्या घालायचे आता अंबानी-अडानीला शिव्या घालतात. अमेरिकेत रॉनाल्ड रेगन सत्तेत असताना डापु गँगवाले लोक त्यांना भरपूर शिव्या घालायचे (आणि रेगन त्यांना थुकीची किंमत द्यायचे नाहीत). पुढे धाकले बुश सत्तेत आल्यावर त्यांना शिव्या घालायला नवा बकरा मिळाला. आणि आता ट्रम्पतात्या हा बकरा मिळाला आहे. एकूणच काय या डापु गँगवाल्या लोकांच्या नशीबात सतत कोणालातरी शिव्या घालणेच असते. त्यामुळे कोणत्याही काळात माझ्यासारख्या कट्टर डापु गँग विरोधी मनुष्याला त्यांची तडफड बघून असुरी का काय म्हणतात तो आनंदच होणार :) :) :)

दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका गर्भवती महिलेला उपचार करणे नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ७७४ रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. रुग्णालयाने २०१९ पासून महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. तरीही सामान्यांच्या घरासमोर बँड वाजविणाऱ्या महापालिका प्रशासनाने रुग्णालयावर कारवाई न करता डोळेझाक केल्याचे समोर आले आहे. https://www.lokmat.com/pune/pune-crime-dinanath-mangeshkar-hospital-has-an-income-tax-arrears-of-rs-27-crore-a-a1008/ हा दवाखाना संघाचे लोक चालवतात ना? देशभक्तीचा आव आणण्यात ही हेच लोक पुढे असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्या हॉस्पिटलमध्ये दोनदा जायची वेळ आली. उर्मट कर्मचारी,पेशंटला तुच्छ लेखणारे दीड शहाणे डॉक्टर्स. तेव्हापासून 'ह्या रूग्णालयात बिलकूल पाय ठेऊ नका' असाच सल्ला आम्ही देतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Mon, 04/07/2025 - 07:47
जिथे संघ असतो तिथे माणुसकी संपते!> सत्ताप्राप्तीपूर्वीचा संघ आणि सत्ताप्राप्तीनंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Sun, 04/06/2025 - 23:02
माझी मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया येथेच झाली. अत्यंत चांगली सेवा मिळाली. परिचारिका, डॉक्टर्स उत्कृष्ट होते. माफक शुल्क लावले. रूग्णालयातील मुक्काम विनाकारण वाढविला नाही. त्यानंतरही १-२ वेळा इतर नातेवाईकांसाठी जावे लागले. तेव्हाही चांगला अनुभव आला. केईएम व पूना रूग्णालयाचाही अनुभव चांगला आहे. सर्वात वाईट अनुभव आला तो सह्याद्री रूग्णालयात. तेथे अक्षरशः लुटतात.

In reply to by श्रीगुरुजी

चावटमेला Mon, 04/07/2025 - 15:27
माझ्या २ सर्जरी झाल्या दीनानाथ मध्ये, मला सुद्धा डॉक्टर्स, परिचारिका ह्यांचा चांगला अनुभव आला. केईएम चा पण चांगला होता. पूना हॉस्पिटल चा मात्र खूप भिकार अनुभव आला माझा भाऊ अ‍ॅडमिट असताना. भाऊ तिथेच गेला. तेव्हापासून पूना हॉस्पिटल च्या रस्त्याकडे सुद्धा पाहवत नाही. काही कडवट आठवणींचे घाव आयुष्यभर राहतात :(

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु Mon, 04/07/2025 - 07:32
पेशंटला तुच्छ लेखणारे दीड शहाणे डॉक्टर्स> इथे दुसरी बाजू समजाऊन घेणे आवश्यक आहे- काही व्यवसाय क्षेत्रे अशी असतात की तिथे तुच्छपणा पहिल्यापासूनच म्ह० शिक्षणापासूनच जोपासला जातो. ज्या व्यवसाय क्षेत्रात उतरंडीला (हायरार्की) विशेष महत्त्व असते तिथे सेवा घेणा-याबद्द्ल (ग्राहक्/उपभोक्त्याबद्दल) असा तुच्छपणा दिसतो. कायदा(वकीली), संरक्षण इ० उदा यासाठी देता येतील. वैद्यकीय व्यवसाय काळाच्या ओघात अतिशय अवघड बनला आहे. साधारणपणे वयाच्या ३५ पर्यंत शिक्षणच चालू राहते. त्यानंतर संसार आणि व्यवसाय दोन्ही उभे करणे जिकीरीचे असते. त्यानंतर सतत कायदा, सामाजिक आणि राजकीय दबावाखाली काम करणे हे गुंतागुत निर्माण करते. व्यवसायात टिकून राहण्यासाठी इतर व्यवसायबंधूबरोबर हितसंबंध जपणे आवश्यक बनते. मग पेशंटची दिशाभूल करणे, अनावश्यक तपासण्या किंवा चूकीचे सल्ले देणे असे पण प्रकार घडतात. मला जवळून ओळ्खणा-या ९९% डॉ०कडून सुरुवातीला मी पण तुच्छ्पणा अनुभवला आहे (मला स्वतःला कमी बोलणारे डॉ० अजिबात आवडत नाहीत), पण एखादा अपवाद वगळता बहुतेकजण पुरेशी ओळख झाल्यानंतर मला गंभीरपणे घेतात, असा अनुभव आहे. स्वगत- आता डॉ०च्या बाजूने लिहूनही खोड्साळपणा करण्याचा प्रयत्न काही महाभाग करतील पण त्यांना "फाट्यावर मारणे" आता मला चांगले जमते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Mon, 04/07/2025 - 07:55
"घैसास" आडनाव असल्याचे परिणाम. आपला माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून मनमुराद नृत्य करणाऱ्या ब्रह्मवृंदांचे डोळे अजूनही उघडणार नाहीत अशी माझी गाढ श्रद्धा आहे. गतवर्षी आगरवाल सुपुत्राने सोमरसप्राशन करून पोर्श गाडीने धडक देऊन दोघांना मारले होते. तेव्हा ससूनमधील काही डॉक्टरांनी इतर अनेकांच्या मदतीने लबाडी करून त्या सुपुत्रास वाचविण्यात अद्वितीय यश प्राप्त केले होते. त्यावेळी त्या डॉक्टरांच्या कार्यालयाची, खाजगी उपचारालयाची कोणी मोडतोड केली होती का? मला माहिती नाही. तसे झाले असल्यास संदर्भ द्यावा. तसे झाले नसेल तर कारण उघड आहे असे म्हणावे लागेल.

आंद्रे वडापाव Mon, 04/07/2025 - 08:56
President Donald Trump has given his bold response to world leaders who begged him for a trade deal over the weekend as his lofty tariffs take effect. The president, 78, told reporters onboard Air Force One that he has spoken to European and Asian leaders since his worldwide tariffs went into effect - devastating the world's stock markets. Trump boasted that the foreign powers were begging him to make a trade deal with them, but he brushed off their requests and defiantly continued on with his plans.
आता मला सांगा , "वर्ल्ड लिडर" म्हणून कोण कोण मिरवत असतं म्हणे ! तर अशे हे ५६ इंच छातीचे "वर्ल्ड लिडर", ट्रम्पला छाती दाखवने सोडाच पण , आपली ६५ इंची डांग समोर करून ... "जहाँपना तुस्सी ग्रेट हो ... तोहफा कबूल करो "... म्हणून मांडवली करायला बघत आहे .....हेच ट्रम्प खुल्लम खुलला त्याच्या लोकांना सांगत आहे ..

In reply to by आंद्रे वडापाव

खरे आहे पण आपल्या उद्योगविश्वाची काय अवस्था आहे?मोठमोठ्या गप्पा आणी परिषदा. भारत आणि चीन स्टार्ट-अप ह्यांची तुलना बघा. china-india सरकारवर कितीही टीका केली तरी आमच्या नव-उद्यमींची झेप आणि स्वप्ने यथातथाच असल्यावर मोदी काय करणार? अर्धवट अभ्यास करण्यार्या मुलाच्या पालकांना शिक्ष़क शाळेत बोलावतात तेव्हा त्यांची जी अवस्था होते तशी अवस्था झाली आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आंद्रे वडापाव Mon, 04/07/2025 - 11:29
Former Infosys CFO Mohandas Pai has strongly reacted to Piyush Goyal’s recent take on Indian startups. Speaking at Startup Mahakumbh, Goyal criticised the direction of Indian entrepreneurship, especially in the quick commerce space, asking, “Dukhandari ka hi kaam karna hai ya vishwavyapi aur international scale par Bharat ki pehchaan banani hai? [Are we just doing shopkeeper’s work, or are we aiming to build India’s identity on a global scale?]” He contrasted Indian startups with those in China, which he claimed are focused on deep tech and innovation. Many, including Mohandas Pai, have fired back at Goyal. Pai said that India does have “many deep tech startups” like China but questioned the government’s support, asking, “Where is the capital?” Mohandas Pai fired back at Piyush Goyal saying India does have “many deep tech startups” like China but doesn’t have the government’s support. “There are very many small deep tech startups in chip design, IOT, Robotics, EV charging, BMS in India, growing rapidly but where is the capital?” asked Mohandas Pai on X (formerly Twitter) as he tagged Minister of Commerce and Industry, Piyush Goyal. He went on to draw a sharp contrast in global startup funding: “Indian startups got 160b $ from 2014/24, China 845b$, US 2.3Tr$. Long term investors like endowments, insurance still do not invest despite your efforts!” urging Goyal to improve the situation. The chairman of Aarin Capital called for more proactive involvement of the government in helping startups grow. “AIF investments are facing regulatory overreach, and the flow has come down. RBI harasses overseas investors on remittances,” the Bengaluru-based Padma Shri Awardee said. India vs China startup reality check At a time when China is dominating the global landscape with advancements in electric vehicle production, semiconductor development, AI models, next-generation manufacturing, space technology, high-speed rail, and renewable energy. BharatPe founder Ashneer Grover said netas need a reality check....

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Mon, 04/07/2025 - 11:32
गोमूत्र , शेण, औरंगजेबाची कबर, प्रत्येक मशिदीखाली खोदकाम , बुलडोझर , कॉमेडीअनला पकडण्याचा प्रयत्न , ईडी यातून वेळ मिळाला नं ... मग ते इंडियन स्टार्ट अप्स कडे लक्ष देणारेत म्हणे ...

कुरुळकर असो की मंगेशकर रुग्णालय, “विशिष्ट” व्यक्ती किंवा संघटना असली की त्यांचे सगळे गुन्हे पोटात घालून त्यांची तळी उचलायला “विशिष्ट” लोक सदैव तयार असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोण Mon, 04/07/2025 - 15:13
अगोदर तर्कसन्गत प्रतिक्रिया होत्या. .....पण तुमच्या अलीकडच्या प्रतिक्रिया पाहता खुपच जातीयवादी होत आहात असे वाटते.

In reply to by कोण

माझे म्हणणे हेच आहे की काही लोक गुन्हेगार कोण? हॉस्पिटल कोणते हे पाहून त्यांची बाजू घेतात असे ते का करतात? मीपावरही हाच अनुभव आलाय! त्यावर लिहिले तर जातीवादी होतय अस कस? वाईटाला वाईट म्हणायला काही लोकाना धाड का भरते?

आग्या१९९० Mon, 04/07/2025 - 11:10
बाईकवरून ऑनलाईन डिलिव्हरी करणारे एक हातात मोबाईल घेऊन पत्ते शोधत वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी, हायवे वरून सुसाट पळत असतात, कुठल्याही गल्लीतून उलट दिशेने अचानक येऊन धोकादायक पद्धतीने आपल्यासमोरून क्रॉस करतात. आपणच सावध रहावे. त्यांना स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवाची पर्वा नसते. बेकारीची कमाल आहे ही.

युयुत्सु Mon, 04/07/2025 - 11:38
दिनानाथ समोर चाललेले आंदोलन बघता मी काही दिवसांपूर्वी मटा०मध्ये लिहीलेला लेख परत आठवला. अलिकडे घडलेली काही "अवमान" प्रकरणे आणि त्यावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया बघता समाजातला विवेक संपला आहे हे निश्चित! त्याची पुनर्स्थापना पण मला अवघड वाटते. मग एकच काळजी भेडसावते - हा देश विनाशाकडे चालला आहे का?

In reply to by युयुत्सु

त्यावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया बघता समाजातला विवेक संपला आहे हे निश्चित! गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्याने विशिष्ट वळवळी लोक मग गिळून गप्प झालीत!

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Mon, 04/07/2025 - 17:23
कुठलेही क्षेत्र घ्या, काहीतरी सकारात्मक वाचायला, पहायला मिळेल म्हणून पेपर, युट्यूब, इतर समाजमाध्यमे यावर जातो, तो अधिकच नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागतात. सध्याच्या राज्य व केंद्र सरकारकडे पाहून आशा वाटेनाशी झालीय. आरोग्य विभागाची मागणी ११ हजार कोटींची होती म्हणे, त्यांना केवळ ३ हजार कोटी दिले या अर्थसंकल्पात. शिक्षणाचे तसेच, शेतकर्‍यांना पण कर्जमाफी नाकारली आहे. क्रुषी विभागातले घोटाळे दमानिया यांनी पुढे आणले, ते विसरवण्यासाठी हलाल - झटका, कबर इ. पुढे आणली. टेरिफवर बोलती बंद, वक्फ बील आणले. काही सकारात्मक दिसण्याची केवळ आशा...

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Mon, 04/07/2025 - 13:32
त्यातल्या त्यात मेधा कुलकर्णींनीच एक भूमिका घेतली आहे. मतदारसंघाचा आमदार असूनही चंपा अज्ञातवासात आहे

In reply to by रामचंद्र

श्रीगुरुजी Mon, 04/07/2025 - 18:53
मुरलीधर मोहोळांनी किंवा पुण्यातील इतर आमदारांनी काही भूमिका घेतली आहे का याची कल्पना नाही.

दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांना उपचाराविना साडेपाच तास बसवून ठेवलं, सीसीटीव्ही आलं समोर - https://www.saamana.com/tanisha-bhise-not-treated-first-five-hour-in-deenanath-mangeshkar-hospital-cctv/

In reply to by अमरेंद्र बाहुबली

साडे पाच तास ते तरी का थांबले? दुसरीकडे प्रयत्न करायला पाहिजे होते. रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी वाटतेय.

In reply to by रात्रीचे चांदणे

रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी वाटतेय. संघाची यंत्रणा नी भाजपची सत्ता म्हणून का? म्हणजे भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना शिक्षा नाहीच!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरं तर हे मी लिहिलेय पण प्राण्यांची खाण्यासाठी होणारी कत्तल मलाच पाहवत नाही! लहानपणी एकदा बोकडाच पिलू मारताना पाहिले होते, त्यानंतर कित्येक वर्षे मी नॉनव्हेज खाल्ले नाही. नंतर कधीतरी मी भावनाशून्य झालो नी परत खा खा करू लागलो! :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रामचंद्र Tue, 04/08/2025 - 00:59
परिचयातील बहुतेक सर्वच (खासकरून ब्राह्मण) कट्टर हिंदुत्ववादी हे सात्त्विक सणासुदीलाही आवडीने मांसाहार करणारे आहेत! यानुसार तुम्हालाही कडवे हिंदुत्ववादी म्हटलं पाहिजे!

In reply to by रामचंद्र

मी हिंदुत्ववादीच आहे, पण मनुवादी नाही! काही मनुवादी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात नी पवार ठाकरे वगैरेंचा द्वेष करत सुटतात!

In reply to by रामचंद्र

आंद्रे वडापाव Tue, 04/08/2025 - 08:57
साधारण आजपासून १२००० ते १५००० वर्ष्यापुर्वी शेतीचा शोध लागला आणि नियमितपणे मग ज्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो (खरं तर आजचा अतिकार्बोदके आहार) ते सुरु झालं... खरा शाकाहारी फक्त "ऋषी मुनी"/ जैन साधू वैगरे कि जे फक्त आणि फक्त कंदमुळं फळ खाऊन जगतात ... त्याला शाकाहार (शाक + आहार ) म्हणतात ... आजकाल शाकाहाराची नाटकं करणारी लोकच जास्ती झालीत ... Rigveda (10.87.4): "Māṃsaṃ bhakṣyāma / Yajñasya devatā yajñasya vai śreṣṭhaḥ" - "We shall eat flesh, for the deity of sacrifice is the best." Rigveda (1.162.18): "Gāvo 'dhyāyāt / Gāvo 'dhyāyāt" - "The cow is to be sacrificed, the cow is to be sacrificed." तर शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानव जात निर्माण होई पर्यंत बहुतेक तो शिकार करूनच उदर निवार्ह करायचा ... मग यात आजच्या सर्वांचे पूर्वज आले ... "आज जरी ते नाक मुरडून "शुद्ध्ह शांकांहांरीं" म्हणून मिरवत असले तरीही ...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आंद्रे वडापाव Tue, 04/08/2025 - 08:56
साधारण आजपासून १२००० ते १५००० वर्ष्यापुर्वी शेतीचा शोध लागला आणि नियमितपणे मग ज्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो (खरं तर आजचा अतिकार्बोदके आहार) ते सुरु झालं... खरा शाकाहारी फक्त "ऋषी मुनी"/ जैन साधू वैगरे कि जे फक्त आणि फक्त कंदमुळं फळ खाऊन जगतात ... त्याला शाकाहार (शाक + आहार ) म्हणतात ... आजकाल शाकाहाराची नाटकं करणारी लोकच जास्ती झालीत ... Rigveda (10.87.4): "Māṃsaṃ bhakṣyāma / Yajñasya devatā yajñasya vai śreṣṭhaḥ" - "We shall eat flesh, for the deity of sacrifice is the best." Rigveda (1.162.18): "Gāvo 'dhyāyāt / Gāvo 'dhyāyāt" - "The cow is to be sacrificed, the cow is to be sacrificed."

आग्या१९९० Tue, 04/08/2025 - 00:39
शाळेत असताना मृत्युंजय वाचले होते. त्यात कवचकुंडले हिरावून घेतलेल्या कर्णाला युद्धात अर्जुन क्रूरपणे तीक्ष्ण बाण जिभाळी मारण्याचे वर्णन वाचून कसेसेच वाटले होते. मनुष्य मनुष्याला इतक्या क्रूरपणे मारत असेल तर इतर प्राणी कोणत्याही पद्धतीने मारताना बघताना मला कधीच त्रास झाला नाही, खाताना तर अजिबात होत नाही.

In reply to by आग्या१९९०

माणूस माणसाला मारतो त्यामागे कारण असते, पण प्राणी बिचारा मुका! का मारावे त्याला? असो. प्रोटीनची गरज म्हणून मी भावना बाजूला ठेऊन चिकन खातो, व्हेज मध्ये पर्याय मर्यादित नी हाटेल वगैरे उपलब्ध नसलेले, पनीर तर सर्रास डुप्लिकेट!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Wed, 04/09/2025 - 10:52
प्रोटीनची गरज म्हणून मी भावना बाजूला ठेऊन चिकन खातो भुजबळ बुवा यांच्या मूलभूत गैरसमजांपैकी हा अजून एक

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, आपण म्हणजे मिपावरील ज्ञानाचा सागर. फक्त इतके सांगा की चिकनमधे प्रोटीन असतात की नाही. चिकन आहारात असावे की नसावे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Fri, 04/11/2025 - 09:39
भावना बाजूला ठेवून चिकन अन्न म्हणून मुळीच खाऊ नये तर त्याच्या चवीसाठी आणि स्वादासाठी खावे. प्रोटीनसाठी खायचे असतील तर अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त Sat, 04/12/2025 - 11:57
पनीर तर सर्रास डुप्लिकेट!
घरी अगदी सहज आणि कमी वेळात बनते पनीर. दीड लीटर दुधाचे अंदाजे दोनशे तीस ग्राम बनते. बाजारात तयार पनीर (इथे इंदुरात) ४०० रुपये किलो मिळते, म्हणजे किंमत तीच पडत असली तरी खात्रीशीर आणि ताजे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आंद्रे वडापाव Sat, 04/12/2025 - 13:19
पनीरात भेसळ होऊ शकते ... तशी दुधात पण भेसळ होऊ शकते ... (होऊ शकते काय ? होतेच अन काय ....! घाबरतोय कि काय कोण .. ) गाय म्हशीने जास्त दूध द्यावे म्हणून सर्रास त्यांना हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने टोचतात ... तसलं दुध पिऊन , या गेल्या काही वर्ष्यातील मुली (जेन झी), लवकर वयात येतात व त्यांना मासिक पाळी खूप लवकर सुरु होते ... असे एक ओळखीतले वैद्यराज म्हणत होते ब्वा ... डाळी आपण परदेशातून आयात करतो (म्हणजे भरपूर परकीय चलन खर्च करतो )... मोदीजी म्हणत होते ... कि लोकांनी आहारातून डाळ कमी केली पाहिजे ... (म्हणजे एक प्रकारे परकीय चलन वाचवून आपण देशसेवा करू ... )

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Sat, 04/12/2025 - 13:43
हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने टोचतात ... तसलं दुध पिऊन , या गेल्या काही वर्ष्यातील मुली (जेन झी), लवकर वयात येतात व त्यांना मासिक पाळी खूप लवकर सुरु होते ... असे एक ओळखीतले वैद्यराज म्हणत होते ब्वा ...
शिवाय ते म्हणत होते... आधीच्या पिढीत मुलगी (समजा १७-१८ वर्षाची) तिचे जे फिजिकल फिचर डेव्हलपमेंट व्हायचे... तसे फिजिकल फिचर आताच्या मुलींना १२ , १३ वयातच होते....

In reply to by आंद्रे वडापाव

आग्या१९९० Sat, 04/12/2025 - 13:47
आपण तर बुवा सरकारचे डोके खातो आणि परकीय चलन वाचवतो. तरीसुद्धा भक्तांना आमचे कौतुक वाटत नाही. उलट अंगावर धावून येतात.

In reply to by आग्या१९९०

आंद्रे वडापाव Sat, 04/12/2025 - 15:41
मग काय करावं त्यांनी?? एकतर दुर्मिळ गोष्टींचे आपण भक्षण करता... चिडचिड तर होणार नं त्यांची....

कंजूस Tue, 04/08/2025 - 05:57
आमटी भाकरी खाऊन उन्हात फिरणारा गुराखी आणि व्हेज प्रोटिन खाऊन दांडगा झालेला मनुष्य यांच्यात कुस्ती झाली तर कोण भारी पडेल? मागे एकदा एका महाराजांचे चरित्र वाचले होते. लेले महाराज म्हणून त्यांना लोक पुढे ओळखू लागले. तरुण असतांना ते कुस्ती शिकवत असत. एकदा त्यांच्या आईने उसाचा रस आणून दे सांगितले तर ते उस घेऊन आले. आई म्हणाली "अरे मला आता दात आहेत का ऊस सोलून खायला?" तर हे म्हणाले तुला रस पाहिजे ना म्हणून ऊस आणलाय. मग त्यांनी हातांनीच ऊस पिळून लगेच ताजा रस काढून दिला.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Tue, 04/08/2025 - 08:51
ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे गैरशाकाहारातून ती भागवली जाते. डासाची मादी संधी मिळाल्यास रक्तातून प्रोटीनची गरज भागवते.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे Wed, 04/09/2025 - 10:43
"ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे गैरशाकाहारातून ती भागवली जाते. डासाची मादी संधी मिळाल्यास रक्तातून प्रोटीनची गरज भागवते." मूलभूत गैरसमज. चिकन मध्ये २७ ग्राम प्रथिनेअसतात आणि त्याची किंमत साधारण २०० रुपये किलो आहे. Pulses like lentils, chickpeas, black beans, and peas are excellent plant-based protein sources, typically containing 21-25% protein by dry weight, सोयाबीन मध्ये ३६% प्रथिने असतात. यांची किंमत साधारण ६० ते १०० रुपये किलो आहे. ७४ रुपये लिटर असेलल्या अमूल म्हशी च्या १ लिटर दुधात ५० ग्राम प्रथिने असतात. थोडा फार फेरफार केला तरी शाकाहारी आहारातील प्रथिने जास्त स्वस्त असतात. जगातील सर्वात बलाढ्य तीन प्राणी घेतले तर ते पूर्ण शाकाहारी आहेत. उदा हत्ती गेंडा आणि रानरेडा. मर्कट गटातील सर्वात शक्तीशाली असलेले गोरिला सुद्धा पूर्ण शाकाहारी आहेत. मांसाहार हा जास्त शक्तिदायक असतो हा गैरसमज मुघल आणि नंतर इंग्रज राज्यकर्त्यानी एतद्देशीय लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी मुद्दाम पसरवलेला आहे आणि त्यांची पिलावळ आजही हा गैरसमज पसरवताना आढळते. कोणी काय खावे हा माझ्या दृष्टीने गौण आणि वैयक्तिक मुद्द्दा आहे आणि गोमांस खाण्यावर बंदी आणावी असेही मला वाटत नाही. परंतु मांसाहार हा जास्त पौष्टिक आणि चांगला असतो हा मुद्दाम पस्रवलेला गैरसमज आहे.

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० Wed, 04/09/2025 - 11:14
ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. दुर्गम भागात महागड्या डाळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही, त्यामुळे गाई, शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन, आणि वराहपालन केले जाते. ह्यात हे पाळीव पक्षीप्राणी आजुबाजूच्या जंगलातून, परिसरातून आपले खाद्य मिळवतात. त्यामुळे रोज मिळणारे दुध आणि अंडी ह्यातून प्रोटीनची गरज भागवली जाते. डुक्कर आणि कोंबड्याच्या मांसातूनही प्रोटीन उपलब्ध होते तेही डाळींच्या तुलनेत कमी खर्चात . बाकी कुठले प्रोटीन शरीराल योग्य हे शरीरच ठरवेल.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे Wed, 04/09/2025 - 12:10
ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. शाब्दिक कोलांट्या कितीही मारा दुर्गम भागात महागड्या डाळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही. हे आपण कसं ठरवलं? आरामखुर्चीत बसून टंकलेखन केलं कि असा होतंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात लोक मोठ्या प्रमाणात शाकाहारी आहेत. आणि तेथे अत्यंत दुर्गम भागात सुद्धा भट (सोयाबीन) गेहट ( कुळीथ ) आणि अनेक तर्हेचे राजमा या डाळी मोठ्या प्रमाणात पिकवल्या आणि खाल्या जातात. ते दुसऱ्या महागड्या डाळी कशाला विकत घ्यायला जातील? तेथे ७५ % लोक मांसाहारी आहेत. परंतु रोजच्या भोजनात डाळींचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रागी किंवा नाचणी यात १३ टक्के प्रथिने असतात. ती आणि एखादे वरील कडधान्य हे रोजच्या जेवणात असतं आणि मांसाहार मधून मधून प्रसंगानुरूप केला जातो. बाकी कुठले प्रोटीन शरीराला योग्य हे शरीरच ठरवेल. शरीर कसं काय ठरवणार? प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कीटक सुद्धा खाता येतात. They’re Healthy. They’re Sustainable. So Why Don’t Humans Eat More Bugs? https://time.com/5942290/eat-insects-save-planet/ आपण खातो का? कारण आपल्याला हि कल्पनासुद्धा सहन होत नाही. थायलंड व्हिएतनाम इ आशियाई देशात भाजलेले उंदीर, टोळ नाकतोडे, बीटल्स सारखे कीटक आणि अळ्या , बेडूक सर्प सुद्धा रस्त्यावर विकायला ठेवलेले असतात. त्याच्या कडे पाहून आपल्याला किळस येते. कोण काय खातं हे ज्याच्या त्याच्या सामाजिकआणि वैचारिक स्थिती आणि समजुतीवर अवलंबून असतं.

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० Wed, 04/09/2025 - 14:06
शाब्दिक कोलांट्या कितीही मारा घाईघाईत प्रतिसाद देण्यापूर्वी समोरच्याने काय लिहिले हे नीट वाचत चला. चूक दाखवली की उसळता हे नेहमीचेच आहे. हे आपण कसं ठरवलं? मी आरामखुर्चीत बसून तुमच्यासारखे गुगल करून अर्धवट माहिती मिळवत नाही . माझा प्रत्यक्ष समाजवावराचा आवाका आणि अभ्यास तुमच्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आर्थिक घटकाचा उल्लेख केला. तुम्हाला योग्य प्रतिवाद करता आला नाही म्हणून संतापला. प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कीटक सुद्धा खाता येतात. आजही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात आठवडे बाजारात मुंग्यांच्या ( मोठ्या लाल मुंग्या ) अंड्यांचे वाटे विकायला ठेवलेले असतात. पौष्टिक असतात ही अंडी. ह्याची चटणी मी खाल्ली आहे, खुप चवदार असते. अर्थात हे तुम्हाला माहित नसणारच.