Skip to main content

काथ्याकूट; राजकारण; समाजकारण; ताज्या घडामोडी; बातम्या; चर्चा;

चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/03/2026 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌ आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.‌ हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/04/2025 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!

डॉ सौ. आणि डॉ. श्री.

लेखक dadabhau यांनी शुक्रवार, 29/03/2024 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझ्या वार्डात चौकाचौकातील फ्लेक्सवर अचानकच बऱ्याच माननीयांनी श्री. ऐवजी "डॉ . श्री ." व माननीयांच्या सौ. नी सौ. ऐवजी "डॉ. सौ," लावायला सुरुवात केलीये. यातील बरेचसे माननीय " ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट" (GoI ) वाले आहेत. रोज रोज हे फ्लेक्स बघून काही प्रश्न पडलेत , जाणकार मिपाकर मदत करतील व करियर घडायला आणि भविष्याची चिंता मिटायला मदत होईल ह्या उद्देशाने हा धागा काढलाय , कृपया ज्यांना अधिक माहिती व मदत करायची इच्छा असेल त्यांनी खालील पैकी एका वा अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत तर फार उपयोग होईल. १) नावापुढे "डॉ" लावण्यासाठी P.Hd. मिळवायला साधारणतः किती खर्च येतो ?

पुन्हा भटकी कुत्री.....

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 23/10/2023 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज हे वृत्त वाचले. https://www.livemint.com/companies/people/parag-desai-wagh-bakris-ed-pa… भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यांच्यामुळे लोकांचा जीव जातो किंवा लोक जखमी होतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पुरेशा क्षमतेने काम होत नाही. दरवेळी पेटावाले किंवा प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलत राहतात. मुक्या प्राण्यांना समजून घ्या. भटकी कुत्री का पिसाळतात , रात्रीबेरात्री का भुंकतात हे समजून घ्या वगैरे टेपा लावतात.

जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते?

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 04/10/2023 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते? आजच्या लोकसत्ता मधे आलेल्या लेखाचा दूवा वरीलप्रमाणे आहे. डॉ. डी. एन. मोरे अलीकडच्या काळात शासनाने सर्वच क्षेत्राचे कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. वीज, रेल्वे, विमान, बँका, विमा, सैन्य इत्यादीसह अनेक सरकारी आणि सहकारी संस्था खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिल्या जात आहेत.

आदीपुरुष च्या निमित्ताने

लेखक वेडा बेडूक यांनी रविवार, 18/06/2023 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
आदीपुरुष च्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी रामयणावर आधारित आदीपुरुष हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. यात हिंदू धर्माची विटंबना झालीये, संवाद खराब आहेत, रावण आणि हनुमान यांना मुसलमानांसारखं दाखवलंय, असं ऐकू येतंय. IMDB वर या चित्रपटाला 1 स्टार द्या, बहिष्कार घाला, असे मेसेज येत आहेत. युट्युब वर या चित्रपटाला शिव्या देणारे अनेक व्हिडीओ आलेत. तर या सगळ्या विषयी मिपाकरांचे काय मत? कुणी चित्रपट पाहिला आहे का? (मिपा वर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. अनेक वर्षे वाचनमात्र राहिल्यावर सदस्यत्व घेतलं आहे. सांभाळून घ्या)

उजव्यांकडून होणारा सिनेमा बहिष्कार तार्किक आहे का?

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 17/12/2022 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही काळापासून काही सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतातील उजव्या गटांकडून / हिंदुत्ववादी विचारप्रवाहाकडून होताना दिसते.‌ हिंदुत्ववादी सामान्य नागरिक, समर्थक, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री इ. अशा सिनेमांविरोधात बहिष्कारचे आवाहन करताना दिसून येतात.‌ सध्या अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या पक्षाची सरकारे आहेत.‌ असे असतानात असे केवळ बहिष्काराचे आवाहन तार्किक आहे का?