22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.
वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता.
१८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला. तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून दोन समुदायात दंगल झाली. १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली.
फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. पण बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला.
२३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. तो वाद वाढू लागला म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले. १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले.
सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला.
सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते.
१९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्या विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली. सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली.
३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली. घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले. बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली.
१ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभागाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली. वादग्रस्त जागेवर मंदिर कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला सन २००३ मध्ये उत्खनन करण्याचे आदेश दिले. बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला.
३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी स्थगिती दिली. सन २०१७ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली. ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला.
५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.
अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे.
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. "हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार दूर होवो आणि लौकरच रामराज्य येवो ही प्रार्थना!
||जय श्रीराम||
वाचने
60801
वाचनखूण
प्रतिक्रिया
199
घंटा, थाळी वाजवणे दिवे लावणे
In reply to घंटा, थाळी वाजवणे दिवे लावणे by रंगीला रतन
हिंदू घरात तसाही रोज दिवा
In reply to हिंदू घरात तसाही रोज दिवा by अमरेंद्र बाहुबली
फक्त दिवेच नाही तर प्रत्येक
In reply to फक्त दिवेच नाही तर प्रत्येक by सुजित जाधव
+०८०१२०२४
जय श्रीराम....
In reply to जय श्रीराम.... by मुक्त विहारि
छापील बातमी....
In reply to छापील बातमी.... by मुक्त विहारि
काका राजकीय कमेंट्स नको.
In reply to काका राजकीय कमेंट्स नको. by अमरेंद्र बाहुबली
ह्यात राजकीय काय आहे?
आता जानेवारीतल्या मुख्य सण
मंदिर पुर्ण व्हायला अजून दोन
In reply to मंदिर पुर्ण व्हायला अजून दोन by अमरेंद्र बाहुबली
कधी नगर ला याच
जय श्रीराम!
वेडा बेडु़क. तुमचं सदस्य नाम
राममंदिराचा आनंद आहे
..
गाभार्यात मूर्ती तरी रामाचीच असेल ना ?
In reply to गाभार्यात मूर्ती तरी रामाचीच असेल ना ? by उनाड
धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर
In reply to धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर by विवेकपटाईत
चूकलंय.
In reply to चूकलंय. by अमरेंद्र बाहुबली
कलयुगात नेहरूजी आणि वल्लभभाई
In reply to कलयुगात नेहरूजी आणि वल्लभभाई by अहिरावण
गुड जोक.भगवंताचे कार्य करणारे
In reply to गुड जोक.भगवंताचे कार्य करणारे by विवेकपटाईत
आजिबात नाही. तसा तुमचा गैरसमज
In reply to चूकलंय. by अमरेंद्र बाहुबली
यात माननिय भगवंत मान आणि
In reply to यात माननिय भगवंत मान आणि by चौथा कोनाडा
सहमत आहे.
In reply to धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर by विवेकपटाईत
चाटे!
In reply to चाटे! by कपिलमुनी
+१
मुल्ला मुलायमचे कारनामे विसरलात?
In reply to मुल्ला मुलायमचे कारनामे विसरलात? by निनाद
मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची
In reply to मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची by अमरेंद्र बाहुबली
हज सबसिडी देताना, हजारों
In reply to हज सबसिडी देताना, हजारों by विवेकपटाईत
चौसष्ट कोटींची हज सबसिडी तुमच्या डोळ्यात खुपतेय?
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी तुमच्या डोळ्यात खुपतेय? by सर टोबी
चौसष्ट कोटींची हज सबसिडी
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी by सुबोध खरे
तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात?
In reply to तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात? by सर टोबी
तुम्ही बहुसंख्य ठरवणार का?
In reply to तुम्ही बहुसंख्य ठरवणार का? by वामन देशमुख
कोणत्या धर्माची? भारत हा
कोणत्या धर्माची? भारत हा सेक्युलर देश आहे. धर्माधारित नाही.म्हणून धर्म हा आपल्या घरी ठेवावा, धर्माचा बाजार मांडू नये.In reply to तुम्ही बहुसंख्य ठरवणार का? by वामन देशमुख
प्रतिसाद देण्यासाठी
In reply to तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात? by सर टोबी
चौसष्ट कोटींची हज सबसिडी
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी by सुबोध खरे
होतं असं
In reply to होतं असं by सर टोबी
दुसऱ्यांच्या संभाषणात
In reply to दुसऱ्यांच्या संभाषणात by सुबोध खरे
लोल
In reply to मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची by अमरेंद्र बाहुबली
तुमचा सल्ला योग्य आहे
In reply to तुमचा सल्ला योग्य आहे by ज्ञानोबाचे पैजार
चमकेगीरी करनार्यांना सांगा.
In reply to चमकेगीरी करनार्यांना सांगा. by अमरेंद्र बाहुबली
अबा तुमचा प्रतिसाद हुकलायं
हरवलेल्या इतिहासाला
ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या
In reply to ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या by अमरेंद्र बाहुबली
राष्ट्रपती प्रमुख पाहुणे
In reply to राष्ट्रपती प्रमुख पाहुणे by विवेकपटाईत
राष्ट्रपती प्रमुख पाहुणे
बाकी विभिन्न पंथांचे ४००० प्रमुख साधू संत ही येणार.हिंदू धर्मात चार पिठांच्या शॅकराचार्यांना महत्व आहे. असे कितीही साधू आले तरी त्यांना तितकं महत्व नाही मग चार हजार येवोत की आठ हजार. महत्वाचे मात्र शंकराचार्य.त्यांच्या न येण्याने त्यांची प्रतिष्ठा कमी होईल.दुसरी काही नाही .धर्मपिठप्रमूख गेले नाहीत तर त्या महत्वाच्या धार्मीक कार्यकर्माला काहीही महत्व राहनार नाही. तीने कार्यक्रम आयोजक नी कार्यक्रमाची प्रतिष्टा कमी होणार आहे. धर्मपिठप्रमूख नसल्याने हिंदूंनाही हा कार्यक्रम धार्मीक वाटत नाहीये. एकंदरीत जेवढा गवगवा केला तेवढा हा कार्यक्रम ऐतिहासीक वगैरे नाहीये. तिथे ना आम्हा हिंदूंचे धर्मपिठप्रमूख येणारेत ना आमच्या भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती. एकंदरीत हा कार्यक्रम ना हिंदूंचा ना भारतीयांचा.In reply to राष्ट्रपती प्रमुख पाहुणे by अमरेंद्र बाहुबली
तुमचे जे शंकराचार्यांबद्दल नवीन प्रेम उफाळुन आले आले ते भयंकर व
In reply to तुमचे जे शंकराचार्यांबद्दल नवीन प्रेम उफाळुन आले आले ते भयंकर व by Trump
त्यांची जातीव्यवस्थेबद्दल
In reply to त्यांची जातीव्यवस्थेबद्दल by अमरेंद्र बाहुबली
नावडतीचे मीठ अळणी
In reply to नावडतीचे मीठ अळणी by सुबोध खरे
आवडतीचा शेम्बूड गोड हे
आवडतीचा शेम्बूड गोडहे आवडलं. सध्या देशात असंच वातावरण आहे. आवडतीच्या शेंबडासाठी लोक चक्क शंकराचार्यांनाही विरोध करताहेत.In reply to ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या by अमरेंद्र बाहुबली
कार्यक्रम श्रीराम मंदिर
In reply to कार्यक्रम श्रीराम मंदिर by विवेकपटाईत
तेच तर म्हणतोय. श्रीराम
अपुर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा
आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने
In reply to आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने by अमरेंद्र बाहुबली
आबा पुरावा द्या.
In reply to आबा पुरावा द्या. by कर्नलतपस्वी
https://marathi.abplive.com
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
हा पुरावा विश्वसनीय नाही.
In reply to हा पुरावा विश्वसनीय नाही. by वामन देशमुख
मराठी ...
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
अती बावचळलेले प्रोग्राम (एबीपी)
नाशिकपासून मोदींनी जोरदार
In reply to नाशिकपासून मोदींनी जोरदार by अहिरावण
सर्व लोक खुश आहेत नक्की
सर्व लोक खुश आहेतनक्की कुणावर??मंदिर मूळ बाबरीच्या जागेपासून
ब्रेकिंग न्यूज
In reply to ब्रेकिंग न्यूज by विवेकपटाईत
शंकराचार्य असुरात मोडतात का?
In reply to शंकराचार्य असुरात मोडतात का? by अमरेंद्र बाहुबली
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद
In reply to तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद by विवेकपटाईत
शंकराचार्य का थयथयाट करताहेत?
शंकराचार्य का थयथयाट करताहेत?किती खोटं लिहीनार??In reply to तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद by विवेकपटाईत
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद दिला आहे.किती खोटं लिहीनार?In reply to शंकराचार्य असुरात मोडतात का? by अमरेंद्र बाहुबली
शंकराचार्याबद्दल प्रेम आताच
In reply to शंकराचार्याबद्दल प्रेम आताच by धनावडे
तेव्हा विरोध केलाच नव्हता
In reply to तेव्हा विरोध केलाच नव्हता by अमरेंद्र बाहुबली
तुमच्यासारख्या पुरोगाम्यानी
In reply to तुमच्यासारख्या पुरोगाम्यानी by धनावडे
बाब्बो. मी हिंदूत्ववादीचा
In reply to बाब्बो. मी हिंदूत्ववादीचा by अमरेंद्र बाहुबली
जाऊ दे कुणाला सांगतोय,
In reply to जाऊ दे कुणाला सांगतोय, by धनावडे
ऊत्तर नसलं की मिपाकर असंच
In reply to ऊत्तर नसलं की मिपाकर असंच by अमरेंद्र बाहुबली
शंकराचार्याना पसंत नाही
In reply to शंकराचार्याना पसंत नाही by सुबोध खरे
आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“
In reply to आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“ by अमरेंद्र बाहुबली
कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं.
In reply to आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“ by अमरेंद्र बाहुबली
भलतेच विनोदी तुम्ही.
In reply to भलतेच विनोदी तुम्ही. by Trump
पण आता कळलंय. :)
In reply to पण आता कळलंय. :) by अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला तरी गुगल न करता चार
जे.....
https://youtu.be/UJXytBX-IDk
https://youtu.be/UJXytBX-IDk
राममंदिर/मशिद आल्याने माझ्या
In reply to राममंदिर/मशिद आल्याने माझ्या by सालदार
दिवाळी तर अजिबातच नाही.
In reply to दिवाळी तर अजिबातच नाही. by सालदार
अनेक हिंदूंचं हेच मत आहे.
In reply to अनेक हिंदूंचं हेच मत आहे. by अमरेंद्र बाहुबली
आमच्या सारख्यांच्या आर्थिक
In reply to अनेक हिंदूंचं हेच मत आहे. by अमरेंद्र बाहुबली
पण खर्च सरकार करतच नाही
In reply to पण खर्च सरकार करतच नाही by धनावडे
खुळे कि काय ?
आता
In reply to आता by तिमा
हिंदूंसाठी रामनवमी हाच राहनार
In reply to हिंदूंसाठी रामनवमी हाच राहनार by अमरेंद्र बाहुबली
रामजन्म आणि मंदिरातील
काय योगदान विचारणाऱ्या नारायण
In reply to काय योगदान विचारणाऱ्या नारायण by अमरेंद्र बाहुबली
श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भर
In reply to श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भर by Trump
श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे
श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भरुन आले.धन्यवाद. आमचं आमच्या धर्मावर नितातं प्रेम आहे. पण धर्माचा फायदा घेऊण वर धर्माचे नियम मोडून काही लोक जी चमकोगीरी करताहेत त्यावर शंकराचार्य प्रहार करताहेत ह्याला मात्र समर्थन आहे. धर्माच्या आड येनार्या नी धर्माचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा शंकराचार्य हिंदूंसाठी ऊभे राहतात हे खरंच कौतूकास्पद आहे. कितीही ताकदवान असाल तरी शंकाराचार्यांपुढे व्याख्या विख्खी वूख्खूच. :)राम मंदिर उभं राहिलं पण
मंदिर मूळ बाबरी पासून ३ किमी
In reply to मंदिर मूळ बाबरी पासून ३ किमी by अमरेंद्र बाहुबली
हिंदूंची घोर फसवणूक
In reply to हिंदूंची घोर फसवणूक by सुबोध खरे
आमच्यासाठी रामजन्मभूमी ही
In reply to हिंदूंची घोर फसवणूक by सुबोध खरे
आमच्यासाठी रामजन्मभूमी ही
In reply to आमच्यासाठी रामजन्मभूमी ही by अमरेंद्र बाहुबली
आमच्यासाठी रामजन्मभूमी ही
मूळ जागेवर
हा का ना का आम्ही तुमच्या मंदिरालाही भेट देऊ आणि भरघोस देणगी पण देऊIn reply to आमच्यासाठी रामजन्मभूमी ही by सुबोध खरे
श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर
श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर बांधत असतील तर तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवरमंदिर मोदी बांधताहेत?? माझ्या माहीतीप्रमाणे दामोदरदास मोदी काही खुप श्रीमंत नव्हते की मोदीजींकडे इतके कोटी रूपये असतील मंदिर बांधायला.In reply to श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर by अमरेंद्र बाहुबली
हायला
In reply to हायला by सुबोध खरे
चाचा नेहरुंकडे आय आय टी ,
तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवर तुम्हाला कुणी थांबवलंयजागा ताब्यात द्या हिंदूंच्या. आम्ही हिंदू समर्थ आहोत ममूळ जागेवर मंदिर बांधायला भव्य नसलं तरी छोटसं बांधू कारण आमची आस्था त्या जागेशी आहे. जिथे मस्जीद तिथेच मंदिर बांधून दाखवल्याने आम्हा हिंदूंचा अहंकार सुखावेल. पण कोणाच्या भितीने मूळ बाबरीच्या जागी मंदिर न बांधता तिसरीकडेच बांधण्यात आलंय?? आम्हा हिंदूंची एवढी मोठी फसवणूक का करण्यात आली?? मीर बांकीनेही न घाबरता मंदिर पाडून बरोबक त्या जागीच मशीद बनवली पण आज असं काय घडलं की हिंदूंची फसवणूक करून मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय??In reply to चाचा नेहरुंकडे आय आय टी , by अमरेंद्र बाहुबली
मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय
In reply to चाचा नेहरुंकडे आय आय टी , by अमरेंद्र बाहुबली
भयंकर मुर्खपणा चालु आहे.
In reply to चाचा नेहरुंकडे आय आय टी , by अमरेंद्र बाहुबली
हिंदूंची फसवणूक करून मंदिर
In reply to हिंदूंची फसवणूक करून मंदिर by सुबोध खरे
मी आधीच सांगीतलंय की संशोधन
In reply to मी आधीच सांगीतलंय की संशोधन by अमरेंद्र बाहुबली
श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर
In reply to मंदिर मूळ बाबरी पासून ३ किमी by अमरेंद्र बाहुबली
फेक न्युज आहे.
In reply to फेक न्युज आहे. by कॉमी
फेक न्युज आहे.
In reply to फेक न्युज आहे. by वामन देशमुख
?
In reply to फेक न्युज आहे. by वामन देशमुख
:)
In reply to फेक न्युज आहे. by वामन देशमुख
अमरेंद्र बाहुबली साहेब,
अर्धवट मंदिराच्या
In reply to अर्धवट मंदिराच्या by अमरेंद्र बाहुबली
दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या सुट्टी कल्पना बघुन हसु आले.
In reply to दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या सुट्टी कल्पना बघुन हसु आले. by Trump
आधीच ऊल्हास त्यात फाल्गून मास
'सकलांग देवता म्हणजे
In reply to 'सकलांग देवता म्हणजे by अमरेंद्र बाहुबली
असा प्रश्न शंकराचार्यांनी
In reply to असा प्रश्न शंकराचार्यांनी by वामन देशमुख
भाऊ तोचतोचरेकर आहेत का अजून
In reply to भाऊ तोचतोचरेकर आहेत का अजून by अमरेंद्र बाहुबली
2014नंतर प्रधानमंत्री 40जागी
In reply to 2014नंतर प्रधानमंत्री 40जागी by विवेकपटाईत
पंतप्रधानांनी विकलेल्या एका
In reply to पंतप्रधानांनी विकलेल्या एका by आग्या१९९०
तुम्हाला त्याना काय म्हणायचं
हा शंभरावा प्रतिसाद
In reply to हा शंभरावा प्रतिसाद by वामन देशमुख
जय श्रीराम! सारे वाद सोडून
In reply to जय श्रीराम! सारे वाद सोडून by अमरेंद्र बाहुबली
|| जय श्रीराम ||
In reply to || जय श्रीराम || by वामन देशमुख
जय शंबूक. जय वामनावतार.
In reply to जय श्रीराम! सारे वाद सोडून by अमरेंद्र बाहुबली
अरे रे आता काय करायचं
In reply to अरे रे आता काय करायचं by जेपी
भुजबळ बुवा
कदाचित इंडिक गटबंधन जिंकेल.
In reply to कदाचित इंडिक गटबंधन जिंकेल. by विवेकपटाईत
ते ठिकाय. पण कार्यक्रम “ऊरकला
In reply to ते ठिकाय. पण कार्यक्रम “ऊरकला by अमरेंद्र बाहुबली
कार्यक्रम फक्त हिंदूंचा नाही
राममंदिर उदघाटनामुळे गावातील
In reply to राममंदिर उदघाटनामुळे गावातील by आग्या१९९०
खिक्क.
धाग्याने शतक गाठलाय. त्यामुळे
In reply to धाग्याने शतक गाठलाय. त्यामुळे by जेपी
अक्षता केव्हा वाटतात?
In reply to अक्षता केव्हा वाटतात? by अमरेंद्र बाहुबली
अक्षता?
In reply to अक्षता? by सर टोबी
लई झ्याक ....
In reply to लई झ्याक .... by नठ्यारा
गापै, तुम्ही फर टोपी आयडीला सिरिअसली घेता काय?
In reply to धाग्याने शतक गाठलाय. त्यामुळे by जेपी
शब्द रुपी, अक्षदा मिळाल्या...
अभ्यास बुडाला तर रामलल्लाही
In reply to अभ्यास बुडाला तर रामलल्लाही by अमरेंद्र बाहुबली
अभ्यासासाठी नाही असुर प्रभाव
काल...
In reply to काल... by वेडा बेडूक
ते शेजारी मुहूर्त पाहतात की
In reply to काल... by वेडा बेडूक
लोक तर नातेवाईकांच्या लग्नात पण मानापमानावरुन खुस्पट काढतात.
In reply to काल... by वेडा बेडूक
आमच्या गावातील आराम हा राम
In reply to आमच्या गावातील आराम हा राम by आग्या१९९०
खिक्क.
राममंदिर कसे चुकीचे आहे
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
खिक
In reply to खिक by अहिरावण
वाट्सअपवर आलेली प्रत्येक
In reply to वाट्सअपवर आलेली प्रत्येक by अमरेंद्र बाहुबली
खरे तर मंदिरात बऱ्याच चुका
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
इंजिनीयरींगमधे नोबेल या