शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
वाचने
119771
प्रतिक्रिया
329
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
कॉंग्रेसविरोधी लाट असती तर
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by श्रीगुरुजी
अज्ञानमूलक प्रश्न
In reply to कॉंग्रेसविरोधी लाट असती तर by एकुलता एक डॉन
सहमत गुरुजी..
In reply to अज्ञानमूलक प्रश्न by श्रीगुरुजी
चालायचं च
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता ..
In reply to चालायचं च by IT hamal
ते च हो...मतितार्थ महत्वाचा...
In reply to स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता .. by चिनार
ते च हो...मतितार्थ महत्वाचा...
In reply to स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता .. by चिनार
+1
In reply to चालायचं च by IT hamal
अजब सल्ला
सध्याच्या शिवसेनेची हालात,
+१
In reply to सध्याच्या शिवसेनेची हालात, by प्रसाद_१९८२
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.बाळ ठाकर्यांचे ते वाक्य हे जबाबदारी स्वीकारणे नसून उलट आम्ही हे केलेले नाही असेच सांगणारे होते. जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हा तो नेता "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मला जाहीर फाशी द्या" किंवा "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मी राजकारणातून कायमचा निवृत्त होईन" असे जेव्हा सांगतो तेव्हा तो नेता केलेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी घेत नसून "मी भ्रष्टाचार केलेलाच नाही" असे ठासून सांगत असतो. बाळ ठाकर्यांचे जर-तरच्या स्वरूपातील वरील वाक्य मशीद शिवसैनिकांनी पाडली याची जबाबदारी स्वीकारणारे नसून ती जबाबदारी नाकारणारे आहे. जर बाळ ठाकरे केलेल्या कृत्याची जबाबदारी घेण्याइतके निर्भीड होते तर श्रीकृष्ण अहवालात त्यांच्यावर जोरदार ठपका ठेवल्यानंतर दंगलीची जबाबदारी न स्वीकारता त्यांनी तो अहवाल फेटाळून का लावला होता?मला ही तेच म्हणायचे होते.
In reply to बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही by श्रीगुरुजी
कारसेवक (?) कोणाच्या हाकेला
In reply to मला ही तेच म्हणायचे होते. by विजुभाऊ
सोडा गुर्जी
+१
In reply to सोडा गुर्जी by सुज्ञ
हे उघडपणे मुंबईत कोणाला
तशी गर्दी अनेकांच्या
बुर्हान वाणी
In reply to तशी गर्दी अनेकांच्या by प्रविन ९
अज्ञानमूलक उत्तर!
In reply to बुर्हान वाणी by श्रीगुरुजी
सुज्ञ यांच्या मताशी १०० %
उघडपणे विचारायचे धाडस नाही
हीच झुंडगिरी आता कळफलक
In reply to उघडपणे विचारायचे धाडस नाही by सुज्ञ
शाश्वत लोकशाहीची तुमची
In reply to हीच झुंडगिरी आता कळफलक by विशुमित
नका ताणू दादा,
In reply to शाश्वत लोकशाहीची तुमची by मोदक
शाश्वत लोकशाही ची माझी
In reply to शाश्वत लोकशाहीची तुमची by मोदक
आमचं चांगलं चालाय शाहू-फुले
In reply to हीच झुंडगिरी आता कळफलक by विशुमित
आमचं चांगलं चालाय शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा. हीच विचारधारा शाश्वत लोकशाहीला मजबूत ठेवील हा विश्वास आहे.जातीयवादी काड्या, मनसोक्त भ्रष्टाचार हीच शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा आहे का?तुम्ही शिवसैनिक आहात,
In reply to उघडपणे विचारायचे धाडस नाही by सुज्ञ
तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक डरत नाही वाघासारखा धाऊन जातो वगैरे बाष्कळ बडबड आणि डोकी भडकवणारी टाळ्याखाऊ वाक्ये पूर्वी चालायची. किंबहुना यावरच यांच्या प्रमुखांनी स्वतःची घरे पोसली पण हास्यास्पद झालंय आता सगळं . .शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे आणि त्यांचा मराठी बाणा सुद्धा एक शुद्ध फसवणूक आहे. एकीकडे मराठी, मराठी करताना दुसरीकडे यांनी प्रितिश नंदी चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, संजय निरूपम, राम जेठमलानी यांना राज्यसभेच्या खासदारकीची तिकिटे विकली. उत्तर भारतीय, बिहारींना विरोध करताना 'दोपहरका सामना' हे हिंदी वृत्तपत्र काढून संजय निरूपम या बिहारीला त्याचा संपादक केले. यांची मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकली. मुंबईत येणार्या अमराठींना शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, आधार पत्र, निवासी दाखला, रिक्षा चालक परवाना, टॅक्सी चालक परवाना इ. मिळवून देण्यात इतर पक्षांप्रमाणे यांचे नगरसेवक सुद्धा होते. मुंबई महापालिकेची बहुसंख्य कंत्राटे अमराठींना देण्यात हेच पुढे होते. वाघाचा पंजा, डरकाळी असले हास्यास्पद शब्द वापरून हे स्वतःचेच हसे करून घेतात. आता तर २० कोटींचा ६ मजली 'मातोश्री २' हा नवीन बंगला बांधत आहेत. हे शेतकर्यांच्या नावाने सारखा हंबरडा फोडत असतात. आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकर्याच्या कुटुंबाला यांनी या २० कोटीतून प्रत्येकी १ लाख रूपये दिले असते, तर २००० कुटुंबांना आधार मिळाला असता. पण स्वतः खिशातून १ रूपया सुद्धा द्यायचा नाही, लंडनमध्ये जाऊन महिनाभर मजा मारायची आणि आम्हीच शेतकर्यांना कर्जमाफी मिळवून दिली अशा गफ्फा हाणायच्या यात हे वाकगबार आहेत. बाळ ठाकरे गेल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार शिवाजी पार्क मैदानावर केले. त्यानंतर यांनी हे संपूर्ण मैदानच स्मारकासाठी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम संस्कारानंतर जवळपास महिनाभर दहनासाठी उभारलेला चौथरा तसाच ठेवून रोज त्यावर हार, फुले वाहून त्या चौथर्याचे समाधीस्थळ करण्याचा यांचा प्रयत्न होता. महापालिकेने किंवा अतिक्रमण विभागाने चौथरा काढू नये यासाठी शिवसैनिक २४ तास पहारा देत होते. शिवाजी पार्क स्मारकासाठी देऊन टाका अशाही मागण्या होत होत्या. शेवटी केतन तिरोडकर व इतर काही जण याविरूद्ध न्यायालयात गेल्यानंतर चौथरा काढून टाकून मैदान फक्त खेळासाठी वापरण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शेवटी पोलिस बंदोबस्तात तो चौथरा हटविण्यात आला. तसे झाले नसते तर ते मोठे मैदान यांनी गिळंकृत केले असते.'मातोश्री २'
In reply to तुम्ही शिवसैनिक आहात, by श्रीगुरुजी
छान
<<<या एकाच वाक्यातून भाजप
In reply to छान by सुज्ञ
लोल
In reply to <<<या एकाच वाक्यातून भाजप by विशुमित
गुंडगिरी करू शकत नाहीत कारण
<<<<आणि त्याबरोबर १०.१० मि.
In reply to गुंडगिरी करू शकत नाहीत कारण by तेजस आठवले
तुम्हाला नोटा म्हणायचे असेल
In reply to <<<<आणि त्याबरोबर १०.१० मि. by विशुमित
मात्रा चुकला वाटतं. नोटा च
In reply to तुम्हाला नोटा म्हणायचे असेल by हतोळकरांचा प्रसाद
+१
In reply to <<<<आणि त्याबरोबर १०.१० मि. by विशुमित
शिवसेने ने महाराष्ट्रातील
वैयक्तिक अजेंडा
गुगलुन पाहिल्यावर सरपोतदारानी
>>> ( अवांतरः वाजपेयी सरकार
In reply to गुगलुन पाहिल्यावर सरपोतदारानी by विजुभाऊ
मोहन रावलेच
In reply to >>> ( अवांतरः वाजपेयी सरकार by श्रीगुरुजी
बर, ते बेळगावचे काय झाले?
जे खिशात ठेवलेल्या
In reply to बर, ते बेळगावचे काय झाले? by दशानन
का बुआ शेवटचा मराठी माणूस
In reply to जे खिशात ठेवलेल्या by श्रीगुरुजी
मुख्यमंत्री कुठे
In reply to का बुआ शेवटचा मराठी माणूस by हतोळकरांचा प्रसाद
बेळगाव आता परत महाराष्ट्रात
In reply to का बुआ शेवटचा मराठी माणूस by हतोळकरांचा प्रसाद
हे माहित असताना उगाच मोठी
In reply to बेळगाव आता परत महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
कदाचित त्यांनाही वास्तविकता
In reply to हे माहित असताना उगाच मोठी by हतोळकरांचा प्रसाद
एकुणात महाराष्ट्राची हालत
In reply to बर, ते बेळगावचे काय झाले? by दशानन
शेवटचा मराठी माणूस जिवंत
हम्म ..
In reply to शेवटचा मराठी माणूस जिवंत by विजुभाऊ
प्रसाद सर
मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि
In reply to प्रसाद सर by सुज्ञ
मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि
In reply to प्रसाद सर by सुज्ञ
म्हणजे ?
In reply to मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि by हतोळकरांचा प्रसाद
विभागणे या अर्थाने, किंवा
In reply to म्हणजे ? by सुज्ञ
प्रत्येक पक्षाने त्यांच्या
In reply to मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही धोरणे आणि विषय यात
In reply to प्रत्येक पक्षाने त्यांच्या by विजुभाऊ
शिवसेना आणि भाजपा आपापसात
शिवसेना आणि भाजप ला हिंदू
In reply to शिवसेना आणि भाजपा आपापसात by रामदास२९
ओवैसी आणि अबू आझमी हे दोघेही
In reply to शिवसेना आणि भाजपा आपापसात by रामदास२९
अडवाणी आणि चेले आग लाऊन स्वतः
टोल
खुप छान धागा !
नक्की
In reply to खुप छान धागा ! by धर्मराजमुटके
आपला द्वेष बाहेर काढणे
त्यात नवल काय?
In reply to आपला द्वेष बाहेर काढणे by वरुण मोहिते
दिवे लावणे वगैरे लिहून कृपया
In reply to त्यात नवल काय? by अभ्या..