Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Tue, 07/11/2017 - 20:03
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही. पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती. सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर. बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला. सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही. लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे. शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत. हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते. या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे. मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले ( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
  • Log in or register to post comments
  • 119196 views

प्रतिक्रिया

Submitted by एकुलता एक डॉन on Tue, 07/11/2017 - 20:17

Permalink

मला एवढे पटत कि लोक मते द्याल

मला एवढे पटत कि लोक मते द्याल वेडे नाहीत बाळासाहेबांच्या निधन नंतर जी गर्दी जमली होती विसरलात ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 13:45

In reply to मला एवढे पटत कि लोक मते द्याल by एकुलता एक डॉन

Permalink

तशी गर्दी अनेकांच्या

तशी गर्दी अनेकांच्या अंत्ययात्रेला जमते. त्यात काहीही विशेष नाही. गर्दी जमली म्हणजे गर्दीतले सर्वजण मत देतात असे नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Wed, 07/12/2017 - 14:33

In reply to तशी गर्दी अनेकांच्या by श्रीगुरुजी

Permalink

कैच्या कै! म्हणजे विरोध वगैरे

कैच्या कै! म्हणजे विरोध वगैरे ठीक असतं पण कशालाही विरोध हास्यास्पद होतो असे मला आपले उगाच वाटून गेले!
  • Log in or register to post comments

Submitted by एकुलता एक डॉन on Wed, 07/12/2017 - 15:09

In reply to तशी गर्दी अनेकांच्या by श्रीगुरुजी

Permalink

मोदी लाट असून पण एवढी मते

मोदी लाट असून पण एवढी मते मिळवळीतही काय कमी आहे ? आणि एवढी गर्दी बाकी कधी बघतलीत ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 16:53

In reply to मोदी लाट असून पण एवढी मते by एकुलता एक डॉन

Permalink

अनेकवेळा अशी गर्दी दिसते.

  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 16:55

In reply to मोदी लाट असून पण एवढी मते by एकुलता एक डॉन

Permalink

अनेकवेळा अशी गर्दी दिसते.

अनेकवेळा अशी गर्दी दिसते. उदाहरणार्थ बुर्‍हान वाणीची अंत्ययात्रा. गर्दी झाली म्हणजे मते मिळतात आणि नसली तर मते मिळत नाहीत हा भाबडेपणा झाला. तसे असते तर वाजपेयींच्या काळातच भाजप/जनसंघाला बहुमत मिळाले असते किंवा अगदी अलिकडचें उदाहरण म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीच्या वेळी फडणविसांच्या न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर झालेल्या सभेला जेमतेम १०० टाळकी उपस्थित असूनसुद्धा त्या भागातील चारही प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 07/11/2017 - 20:20

Permalink

अहो शुकशुक विजुभाऊ,

अहो शुकशुक विजुभाऊ, तुमची सेनेबद्दलची मते पक्की असल्याचे ह्या लेखावरून (?) भासते, ती परिस्थितीजन्य काही बोलल्यास तुम्ही बदलणार असलात तर चारशब्द बोलण्यात पॉईंट ए, नाहीतर फुकट काथ्याकुट करत बसण्यात काय मिळणार आहे हो...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 07/11/2017 - 23:32

In reply to अहो शुकशुक विजुभाऊ, by जेम्स वांड

Permalink

नाही हो. पक्की मते वगैरे काही

नाही हो. पक्की मते वगैरे काही नाही. खरेच जाणुन घ्यायची इच्छा आहे. मी पण बाळासाहेबांच्या भाषणांचा फॅन आहे. वसंत्राव नाईकाम्च्या वेळची सेना/ सीमाप्रश्नावर भुजबळांनी गाजवलेले आम्दोलन, १९९२ ची शिवसेना, भाजप सोबत असतानाची असतानाची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना या त वेळोवेळी जाणवण्या इतका फरक झालेला आहे. सेने बद्दल एक सूप्त आकर्षण आहे. तेच मनसे बद्दल ही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 07/11/2017 - 23:33

In reply to नाही हो. पक्की मते वगैरे काही by विजुभाऊ

Permalink

आणि अशी कोणती गोष्ट होती की

आणि अशी कोणती गोष्ट होती की जी सेनादला ला जमली नाही आणि शिवसेनेला जमली
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 07/11/2017 - 20:58

Permalink

या वेळेस शिवसेने ने नक्की असे

या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल वाचा, विजुभाऊ. (तो शासनाने 'मान्य' केलेला नसल्याने कधी औपचारिकरीत्या प्रसिद्ध झाला नाही. जालावर काही विशिष्ट ठिकाणी मिळू शकेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 13:48

In reply to या वेळेस शिवसेने ने नक्की असे by आदूबाळ

Permalink

श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर

श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर 'पक्षपाती' म्हणून शिवसेनेने नाकारला होता. मग तो खरा कसा मानायचा?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 07/12/2017 - 13:55

In reply to श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर by श्रीगुरुजी

Permalink

खरा माना असं म्हणालो का? वाचा

खरा माना असं म्हणालो का? वाचा असं म्हणालो. आणि मत बनवा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 14:39

In reply to खरा माना असं म्हणालो का? वाचा by आदूबाळ

Permalink

तो अहवाल अत्यंत पक्षपाती व

तो अहवाल अत्यंत पक्षपाती व एकतर्फी आहे असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 07/11/2017 - 23:50

Permalink

त्या "आतल्या" गोष्टी आहेत.

त्या "आतल्या" गोष्टी आहेत. आणी अश्या सार्वजनिक ठिकाणी विचारून तुम्हाला वाटत असेल की माहिती होईल. तर हा तुम्हचा सर्वांत मोठा गैर समज आहे. उगाच काहीही उगाळून अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 07/11/2017 - 23:50

Permalink

त्या "आतल्या" गोष्टी आहेत.

त्या "आतल्या" गोष्टी आहेत. आणी अश्या सार्वजनिक ठिकाणी विचारून तुम्हाला वाटत असेल की माहिती होईल. तर हा तुम्हचा सर्वांत मोठा गैर समज आहे. उगाच काहीही उगाळून अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 07/12/2017 - 08:57

Permalink

माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी

माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी दले व ल्ष्करी दले हा सरकारी उपचार झाला आणि गोष्टी टोकाला गेल्यानंतरच व त्या स्थितीपर्यंत आल्यानंतरच वरील गोष्टींना पाचारण करण्यात येते. बहुदा शिवसेनेमुळे तुमच्यासाठी तुमच्याच गल्लीबोळातुन तत्कालीक मदत उपलब्ध आहे हा मुद्दा लोकांच्या लक्षात आला असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 14:27

In reply to माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी by कानडाऊ योगेशु

Permalink

१९९२-९३ ची दंगल दोन भागात

१९९२-९३ ची दंगल दोन भागात झाली. ६ डिसेंबरला श्रीराम जन्मस्थानावरील मंदीर उद्ध्वस्त करून बांधलेली मशीद पाडल्यावर मुंबईत दंगल सुरू झाली. ही दंगल ४-५ दिवसांत आटोक्यात आली त्याला कारण होते मुंबईचे तत्कालीन पोलिस महासंचालक श्रीकांत बापट. बापट यांनी अत्यंत कठोरतेने दंगल हाताळली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पोलिसांना दंगल शमविण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घातण्याचा बापट यांचा आदेश होता. दंगलीच्या या पहिल्या भागात अंदाजे २०० जणांचा मृत्यु झाला. त्यात बहुसंख्य दंगलखोर मुस्लिम होते. परंतु दंगल लगेच आटोक्यात आली होती. त्याचे श्रेय अर्थातच बापट व सुधारकराव नाईकांना दिले गेले. पोलिस गोळीबारात मरण पावलेले बहुसंख्य मुस्लीम असल्याने बापटांविरूद्ध प्रचंड आरडाओरडा सुरू झाला. त्यांनी मुस्लिमांना टिपून मारले अशी देशभर निधर्मांधांनी टीका सुरू केली. मशीद पडल्यामुळे मुस्लीम आधीच नरसिंहराव सरकारवर भयंकर संतापले होते. त्यात ही भर पडल्याने काँग्रेसची पंचाईत झाली. शेवटी दबावाखाली बापट यांची मुंबईतून बदली करण्यात आली. त्याचवेळी राजकारणाचा एक वेगळाच अंक सुरू होता. जून १९९१ मध्ये केंद्रात संरक्षणमंत्री पदावर नेमणूक झाल्यानंतर पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून आपल्याजागी सुधारकरराव नाईकांना आणले. नाईक आपल्या मुठीत राहून राज्य चालवितील असा पवारांचा विश्वास होता. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर नाईकांनी पवारांना झुगारून देऊन स्वतः स्वतंत्रपणे निर्णय घेऊन कारभार सुरू केला. नाईकांना अर्थातच नरसिंहरावांचे पाठबळ होते. नाईकांनी आपल्याच पक्षाच्या पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर, सूर्यराव (हा भिवंडीचा काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. याचे आडनाव आठवत नाही.) यांच्यावर माफिया असल्याचा आरोप करून त्यांना टाडाखाली तुरूंगात टाकले. पवारांनीच स्वतः आग्रह धरून यांना तिकिटे दिली होती असे प्रसिद्ध झाल्याने पवारांची मानहानी झाली. नंतर काही काळाने पवारांच्या आशिर्वादाने आपल्याविरूद्ध काही आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत असे सांगून त्यांनी अजित पवार, बापूसाहेब थिटे इ. १२ जणांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली. हा पवारांसाठी प्रचंड मोठा धक्का होता. त्यावेळी कॉंग्रेसचे १४१ आमदार होते. काही आमदारांनी बंड केले तर आपले सरकार पडू शकते हे ओळखून सुधाकरराव नाईकांनी गुपचूप भुजबळांशी संधान बांधून शिवसेनेत फूट पाडली. भुजबळांसह एकूण १८ आमदार शिवसेनेतून फुटुन निघून काँग्रेसमध्ये सामील झाले. एकाच दगडात नाईकांनी पवार व बाळ ठाकरे असे दोन पक्षी मारले. शिवसेनेत गुप्तपणे फूट कशी पाडली असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले होते की "मी जातिवंत शिकारी आहे. सावज नजरेच्या टप्प्यात आल्याशिवाय मी बार टाकत नाही.". एकंदरीत त्यांनी पवारांची व पवार पाठिराख्यांची पूर्ण नाकेबंदी करून आपली मांड भक्कम केली होती. त्यामुळे काहीही करून नाईकांना घालवून त्यांच्या जागी आपला माणूस आणायचा यासाठी पवारांची कारस्थाने सुरू होती. ६ जानेवारीला मुंबईत दंगलीचा दुसरा अंक सुरू झाला. मुंबईची दंगल ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. जानेवारीत दुसर्‍यांदा दंगल सुरू झाल्यानंतर ती आटोक्यात यायला अनेक दिवस लागले कारण बापटांना घालविण्यात आले होते आणि दंगलखोरांवर सबुरीने कारवाई करा असे केंद्राचे आदेश होते. त्याबरोबरीने पवार स्वतः मुंबईत येऊन पोलिसांना व सैन्याला आदेश देत होते. त्यामुळे नाईकांना दंगल आटोक्यात आणता आली नाही व पवारांनीच ती आटोक्यात आणली असे पसरविले गेले. डिसेंबरच्या दंगलीत २०० जणांचा मृत्यु झाला होता. तोच आकडा जानेवारीत ८०० वर पोहोचला. यात शिवसेनेने नक्की काय केले? दंगल आटोक्यात आणली ती सैन्याने व पोलिसांनी. नाईकांनी कठोरपणे परिस्थिती हाताळल्याने डिसेंबरमध्ये दंगल लगेच आटोक्यात आली. पण जानेवारीत जास्त दिवस दंगला का चालली असावी? त्यावेळी बाळ ठाकरे 'सामना'तून अत्यंत प्रक्षोभक अग्रलेख लिहीत होते. शिवसेनेचे शौर्य (!) 'सामना'पुरतेच मर्यादीत होते. त्यामुळे दंगल अजून भडकायला मदत झाली. महाराष्ट्रातील अंतर्गत राजकारणामुळे दंगल भडकून त्याचे खापर नाईकांवर फुटुन त्यांची गच्छंती व्हावी अशी एका गटाची इच्छा होती. त्यामुळे सुद्धा दंगल बराच काळ सुरू राहिली. शेवटी मार्चमध्ये नाईकांना हटविण्यात आले. त्यांच्याजागी आपला पित्त्या बसवावा व आपण दिल्लीत राहून दंगलीचे व बाबरी मशीद पाडण्याचे खापर नरसिंहरावांवर फोडून त्यांना हटविण्यासाठी कारस्थाने करावीत ही पवारांची इच्छा मात्र अपूर्ण राहिली. कारण नरसिंहरावांनी अत्यंत धूर्तपणे पवारांनाच महाराष्ट्रात परत पाठवून देऊन त्यांचे पंख कापले व आपला केंद्रातील एक अडथळा दूर केला आणि स्वतःचे स्थान कायम राखले.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 07/12/2017 - 14:33

In reply to १९९२-९३ ची दंगल दोन भागात by श्रीगुरुजी

Permalink

सूर्यराव (हा भिवंडीचा

सूर्यराव (हा भिवंडीचा काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. याचे आडनाव आठवत नाही.)
जयवंत सूर्यराव?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 14:52

In reply to सूर्यराव (हा भिवंडीचा by आदूबाळ

Permalink

बहुतेक हेच नाव होते.

बहुतेक हेच नाव होते.
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Wed, 07/12/2017 - 17:02

In reply to १९९२-९३ ची दंगल दोन भागात by श्रीगुरुजी

Permalink

टाईमलाईन्स

या सर्व घटनाक्रमाच्या टाईमलाईन्स थोड्या वेगळ्या आहेत. जून १९९१: पवार केंद्रात रवाना. महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री नोव्हेंबर १९९१: सुधाकरराव नाईकांनी जनता दलात फूट पाडली. जनता दलाचे २५ आमदार होते. त्यापैकी ९ आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले. बबनराव पाचपुते आणि अन्य एक मंत्रीमंडळात समाविष्ट डिसेंबर १९९१: शिवसेनेतून छगन भुजबळ आणि इतर ११ आमदार काँग्रेसमध्ये सामील. छगन भुजबळ मंत्री तर राजेंद्र गोडे राज्यमंत्री. सप्टेंबर १९९२: भिवंडीचा नगराध्यक्ष जयवंत सूर्यरावला जे.जे.हॉस्पिटल गोळीबार प्रकरणी अटक ऑक्टोबर १९९२: ठाण्यातील काँग्रेस नगरसेवक गणेश सावंत उर्फ गण्यादादा (बी.केबिनमधला) याला टाडाखाली अटक नोव्हेंबर १९९२: सुधाकरराव नाईकांनी पवार समर्थक १२ मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यात बापूसाहेब थिटे होते. पण अजित पवार नव्हते. साधारण त्याचदरम्यान पप्पू कलानीला अटक डिसेंबर १९९२: ६ डिसेंबरच्या घटनेनंतर मुंबईत दंगली. डिसेंबरच्या दंगली ३-४ दिवसात शमल्या. जानेवारी १९९३: ६ जानेवारीपासून परत दंगली सुरू झाल्या. यावेळी दंगली १०-१२ दिवस चालल्या. त्याचवेळी सुरत आणि अहमदाबादमध्येही परत दंगली झाल्या होत्या. जानेवारी १९९३ च्या दंगलींच्या वेळीही श्रीकांत बापटच मुंबईचे पोलिस आयुक्त होते. दंगलींच्या काळात शरद पवार मुंबईत हजर राहून राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत होते असा आरोप झाला. ३१ जानेवारी १९९३: श्रीकांत बापट यांची पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी. त्यांच्या जागी ठाण्याचे पोलिस आयुक्त अमरजीतसिंग सामरा यांची नियुक्ती. जानेवारीतल्या दंगलीनंतर पवार गटाने सुधाकरराव नाईकांना लक्ष्य करायला सुरवात केली. कहर झाला ६ फेब्रुवारी १९९३ रोजीच्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत. या बैठकीत सुधाकररावांना पवार गटाच्या आमदारांनी अपमानास्पद वागणुक दिली. त्यांच्याबरोबर धक्काबुक्की करायचाही प्रयत्न झाला असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर सुधाकरराव नाईकांनी अजित पवार आणि अन्य ४ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकायची शिफारस राज्यपालांकडे केली. त्याप्रमाणे या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढण्यात आले. त्यानंतर सुधाकररावांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे होऊ लागली. सुधाकररावांनी राजीनाम्यास नकार दिला. पण २३ फेब्रुवारी १९९३ रोजी दिल्लीमध्ये त्यांनी नरसिंह रावांची भेट घेतली त्यावेळी स्वतः नरसिंह रावांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितले. त्यानंतर सुधाकररावांनी दुसर्‍या दिवशी मुंबईत राज्यपालांकडे राजीनामा दिला. सुधाकररावांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या आमदारांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी हा निर्णय दिल्लीवर सोडायचे ठरविले. माझ्या आठवणीप्रमाणे ही बैठक २६ फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर ४-५ दिवस सुशीलकुमार शिंदे, पद्मसिंग पाटील अशा नावांची चर्चा होत राहिली. पण ३ की ४ मार्चला नरसिंह रावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून परत पाठवायचा निर्णय जाहिर केला. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 07/12/2017 - 17:26

In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन

Permalink

तुमच्या मेंदूची रॅम किती आहे.

तुमच्या मेंदूची रॅम किती आहे..? इतक्या पटकन इतके जुने डिटेल्स आठवून लिहिणे कसे काय जमते राव..?? __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by रश्मिन on गुरुवार, 07/13/2017 - 09:49

In reply to तुमच्या मेंदूची रॅम किती आहे. by मोदक

Permalink

शत प्रतिशत सहमत !

माहितीचा आवाका बघून अचंबित झालो आहे ! आणि केवळ माहिती च नाही तर वेळोवेळी तुमचे राजकीय विश्लेषण ही वाचनीय असते (ट्रुमन पंखा )
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 17:29

In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन

Permalink

धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे

धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे लिहिले. फेब्रुवारी १९९१ ते जानेवारी १९९३ या २ वर्षातील जवळपास १६-१७ महिने परदेशात असल्याने तिथे मिळालेल्या बातम्यांनुसार व जेव्हा जेव्हा भारतात येत असे तेव्हा तेव्हा जुनी वर्तमानपत्रे वाचून मी मागील माहिती मिळवित होतो. त्यामुळे काही घटनाक्रम चुकला असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by उपाशी बोका on Wed, 07/12/2017 - 19:21

In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by श्रीगुरुजी

Permalink

धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे

धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे लिहिले.
गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी एकच आहेत काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 07/12/2017 - 19:44

In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by उपाशी बोका

Permalink

सुपारी द्यायची आहे काय? ;)

सुपारी द्यायची आहे काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 07/18/2017 - 14:51

In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by उपाशी बोका

Permalink

गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी

गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी एकच आहेत काय? नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 20:26

In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन

Permalink

सुधाकररावांचा उत्तराधिकारी

सुधाकररावांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या आमदारांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी हा निर्णय दिल्लीवर सोडायचे ठरविले. माझ्या आठवणीप्रमाणे ही बैठक २६ फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर ४-५ दिवस सुशीलकुमार शिंदे, पद्मसिंग पाटील अशा नावांची चर्चा होत राहिली. पण ३ की ४ मार्चला नरसिंह रावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून परत पाठवायचा निर्णय जाहिर केला. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. नाईकांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसमध्ये एक पवारांचा गट होता, तर दुसरा गट पवार विरोधकांचा होता ज्यात शंकाराव चव्हाण, विलासराव देशमुख, पुण्यातील प्रकाश ढेरे, विठ्ठलराव गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे इ. चा समावेश होता. परंतु पवार समर्थकांची संख्या जास्त होती. पवार मुंबईत येऊन जातीने सूत्रे हलवित होते. त्यांना आपल्या समर्थकाला मुख्यमंत्री करायचे होते. एकंदरीत बहुसंख्य आमदार पद्मसिंह पाटलांच्या बाजूने दिसत होते. दुसरीकडे दिल्लीत नरसिंहराव दिल्लीतून अत्यंत धूर्तपणे सूत्रे हलवित होते. बाबरी मशीद प्रकरण त्यांच्या अंगावर शेकू पहात होते. त्यांना हटविण्याची कारस्थाने सुरू झाली होती. परंतु त्यांच्या विरोधात अर्जुनसिंग व पवार असे दोन तगडे नेते होते व या दोघांमध्ये काँग्रेस समर्थक विभागले गेले होते. अर्जुनसिंगांची सुरवातीपासूनच १० जनपथशी जवळीक होती. अशा वेळी दोघांपैकी निदान एक विरोधक तरी संपवावा अशा चाली नरसिंहराव रचत होते. मुंबईत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत पद्मसिंह पाटील पुढे होते तरी त्यांच्या नावावर एकमत होत नाही असे कारण दाखवून नरसिंहरावांनी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठविले. निरीक्षक मुंबई विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. "आम्ही इथे डोकी मोजायला आलेलो नाही" असे निरीक्षकांनी सांगताच पद्मसिंह पवारांचा पत्ता कट झाल्याचे व नरसिंहरावांनी नक्की केलेले नाव आमदारांना सांगण्यासाठी निरीक्षक मुंबईत आल्याचे पत्रकारांनी ओळखले. नरसिंहरावांनी धूर्तपणे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांचे नाव नक्की करून त्यांना बोलावून या निर्णयाची माहिती दिली. अपेक्षेप्रमाणे पवारांनी मुंबईत परत जाण्यास नाखुषी दर्शविली कारण त्यांना नरसिंहरावांच्या जागी बसायचे होते. नंतर नरसिंहरावांनी धूर्तपणे पवारांना सांगितले की महाराष्ट्र अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे व अशा वेळी तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. समजा तुम्हाला मुंबईत परत जायचे नसेल तर मग मी आमदारांमधून वेगळ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करीन. हे ऐकल्यावर पवारांचे धाबे दणाणले. आधीच नाईकांनी पवारांना व त्यांच्या समर्थकांना बरेच त्रस्त करून सोडून त्यांच्या साम्राज्याला हादरे दिले होते. आता नाईकांच्या जागी आपल्या विरोधातला एखादा नवीन माणूस आला तर आपला महाराष्ट्रातील उरलासुरला प्रभावही कमी होईल हे ओळखून पवारांनी अत्यंत नाईलाजाने केंद्रातील मंत्रीपद सोडून राज्यात परत जायचे कबूल केले व अशा तर्‍हेने नरसिंहरावांनी आपला एक प्रबळ प्रतिस्पर्धी विनासायास दूर केला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Wed, 07/12/2017 - 20:41

In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी

Permalink

श्रीगुरुजी,

इतकी खडांखडा राजकिय माहिती, तुम्हाला कशी काय लक्षात राहते ?
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Wed, 07/12/2017 - 21:09

In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी

Permalink

जी.के. मूपनार

मुंबईत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत पद्मसिंह पाटील पुढे होते तरी त्यांच्या नावावर एकमत होत नाही असे कारण दाखवून नरसिंहरावांनी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठविले.
हो. माझ्या आठवणीप्रमाणे हे केंद्रिय निरीक्षक जी.के.मूपनार होते .
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 07/13/2017 - 11:35

In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी

Permalink

गुरुजी छान विश्लेषण...

विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा ह्या मुद्द्याने सुद्धा पवारांना पंतप्रधान होण्यास अडथळा निर्माण झाला होता. चव्हाण, देशमुख, पाटील यांना कुणब्या पवारांच्या नेतृत्वात राहायचं नव्हतं, हे पण सत्य आहे. मला जातीय टिपणी करायची नाही पण अजून ही लोक खाजगीत असंच बोलतात... असो.. (मराठा स्ट्रॉंग मन ही कुठल्या बहाद्दराने पवारांना उपाधी दिली काय माहित?)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/13/2017 - 14:36

In reply to गुरुजी छान विश्लेषण... by विशुमित

Permalink

विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा

विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा ह्या मुद्द्याने सुद्धा पवारांना पंतप्रधान होण्यास अडथळा निर्माण झाला होता. नामांतराचा अजिबात संबंध नाही. पवारांना पंतप्रधान होण्याची एकमेव संधी १९९१ मध्ये होती. नामांतर १९९४ मध्ये झाले. पवारांनी १९७८ पासून अनेकांचा विश्वासघात केला होता. १९७८ मध्ये त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केल्यानंतर ते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना घालविण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यानच्या काळात पुण्यात नाक खुपसून कलमाडीच्या माध्यमातून विठ्ठलराव गाडगीळांना शह देण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांनीच गाडगीळांना १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पाडले. १९७८ ते १९८६ या काळात काँग्रेसबाहेर असताना ते काँग्रेसला व इंदिरा गांधींना सपाटून शिव्या घालायचे. त्यामुळे गांधी घराण्याचा त्यांच्यावर फारसा विश्वास कधीच नव्हता. एकंदरीत त्यांनी महाराष्ट्रात व काँग्रेसमध्ये अनेक शत्रू निर्माण करून ठेवले होते. त्यामुळेच १९९१ पंतप्रधान होण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातूनसुद्धा पुरेसा पाठिंबा मिळाला नव्हता. चव्हाण, देशमुख, पाटील यांना कुणब्या पवारांच्या नेतृत्वात राहायचं नव्हतं, हे पण सत्य आहे. मला जातीय टिपणी करायची नाही पण अजून ही लोक खाजगीत असंच बोलतात... असो.. कारणे वरीलप्रमाणेच. अर्थात पवार हे ९६ कुळी मराठाकिंवा श्रेष्ठ मराठा समजले जात नव्हते हे सुद्धा सत्य आहे. (मराठा स्ट्रॉंग मन ही कुठल्या बहाद्दराने पवारांना उपाधी दिली काय माहित?) इंग्लिश माध्यमांनी हा शद्ब शोधला.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 07/13/2017 - 14:09

In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी

Permalink

परंतु पवार समर्थकांची संख्या

परंतु पवार समर्थकांची संख्या जास्त होती. पवार मुंबईत येऊन जातीने सूत्रे हलवित होते. त्यांना आपल्या समर्थकाला मुख्यमंत्री करायचे होते. एकंदरीत बहुसंख्य आमदार पद्मसिंह पाटलांच्या बाजूने दिसत होते.
असं असताना नरसिम्हराव यांच्याशी बोलताना पवारांचे धाबे का दणाणले होते? स्वत: दिल्लीत बसून पवार त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री निवडून आणू शकत होते ना? आणि पद्मसिंम्ह पाटील कोणत्या गटाचे होते? माफ करा..जरा कन्फ्युजन होतंय म्हणून विचारलं..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/13/2017 - 14:43

In reply to परंतु पवार समर्थकांची संख्या by चिनार

Permalink

वर याचे स्पष्टीकरण दिले आहे.

वर याचे स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रातील आमदारात पवार समर्थक आमदार जास्त संख्येने होते. परंतु आमदारातून मतदान घेऊन निवड करणे हे काँग्रेस संस्कृतीत चालत नाही. सर्व आमदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री पद निवडीचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींकडे देण्याचा ठराव मंजूर करायचा व नंतर पक्षाध्यक्षाने आपल्या पसंतीचा उमेदवार लादायचा ही काँग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळे पवार समर्थकांनी कितीही प्रयत्न केले असते तरी शेवटी नरसिंहरावांनीच मुख्यमंत्री निवडला असता. आधीच नाईकांनी पवार समर्थकांना त्रस्त करून सोडले होते. आता त्यांच्या जागी तसाच दुसरा कोणीतरी आला तर आपला महाराष्ट्रातील पाया अजून खचेल अशी पवारांना भीति होती. दिल्लीत बसून पवारांना त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री बसविणे अशक्य होते. म्हणून ते मुंबईत येऊन जातीने प्रयत्न करीत होते. पद्मसिंह पाटील पवारांचे सख्खे मेव्हणे आहेत. कारगिल युद्धाच्या निमित्ताने जमा केलेला ५३ लाखांचा निधी लाटूनसुद्धा, अण्णा हजारेंच्या खुनाची सुपारी देऊनसुद्धा, पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालकाचा सुपारी देऊन खून करूनसुद्धा महाराष्ट्रात ते निवांत कसे हिंडतात याचे रहस्य त्यांच्या या नातेसंबधात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 07/14/2017 - 11:24

In reply to वर याचे स्पष्टीकरण दिले आहे. by श्रीगुरुजी

Permalink

<<<<पद्मसिंह पाटील पवारांचे

<<<<पद्मसिंह पाटील पवारांचे सख्खे मेव्हणे आहेत.>>> ==>> पद्मसिंह पाटील अजित पवारांचे मेव्हणे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Wed, 07/12/2017 - 09:30

Permalink

माझे मत

१९९२ (की १९९३ ?) सालच्या दंगलीच्या वेळी शिवसेनेची काय भूमिका होती किंवा शिवसेनेचा असा काय धाक होता ह्या विषयी ठामपणे सांगू शकणार नाही. मात्र १९८४ साली इंदिरा गांधी हत्येनंतर ज्या दंगली उसळल्या होत्या त्यावेळी मी मुंबईत होतो. त्यावेळी बाळासाहेबांनी मुंबईतील शीख समाजाला अभय दिले होते आणि माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीत जे शीख हत्याकांड झाले त्याची झळ मुंबईपर्यंत पोहोचू शकली नव्हती. पण १९८०च्या दशकात सेनेनी 'स्थानीय लोकाधिकार समिती'च्या द्वारे हजारों तरुण मराठी युवकांसाठी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. त्यावेळी बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, रेल्वे, राज्य आणि राष्ट्रीय कंपन्या ह्यात स्थानिक मराठी युवकांना नोकऱ्या मिळवून देण्यात 'स्थानीय लोकाधिकार समितीने' सिंहाचा वाटा उचलला होता. कित्येक मोठमोठ्या कंपन्यात स्थानिक मराठी तरुणाला डावलून इतरांना नोकऱ्या दिल्या जात होत्या त्या ठिकाणी मराठी युवकांना नोकऱ्या मिळू लागल्या, आणि त्या देखील ८०% जागांवर. शिवसेनेनी मुंबईतील मराठी माणसाला एक अभिमान मिळवून दिला होता पण कालांतराने 'हिंदुत्वाचा' झेंडा खांद्यावर घेतल्याने शिवसेनेचे स्थानिक मराठी माणसाकडे दुर्लक्ष झाले. हा हिंदुत्वाचा झेंडा देखील मराठी माणसाने अभिमानाने मिरवला पण त्यांनतर मात्र मराठी माणसाची शिवसेनेकडून अपेक्षा पूर्ती झाली नाही हे सत्य नाकारता येणार नाही. मी राजकीय अभ्यासक नाही मात्र जे काही पाहिले, अनुभवले त्याच्या आधारवर हे मत मांडत आहे. काही चूक होत असल्यास मिपावरील जाणकारांकडून चूक दुरस्त करून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 07/12/2017 - 11:09

In reply to माझे मत by सौन्दर्य

Permalink

त्यावेळी बाळासाहेबांनी

त्यावेळी बाळासाहेबांनी मुंबईतील शीख समाजाला अभय दिले होते
का?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 07/12/2017 - 13:19

In reply to त्यावेळी बाळासाहेबांनी by मराठी_माणूस

Permalink

द्यायला नको होते?

द्यायला नको होते?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 13:43

In reply to त्यावेळी बाळासाहेबांनी by मराठी_माणूस

Permalink

खंडणीच्या बदल्यात

खंडणीच्या बदल्यात
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Wed, 07/12/2017 - 15:40

In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी

Permalink

हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी,

हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी, ह्यावर अजून ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 07/13/2017 - 16:39

In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी

Permalink

बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी

बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी घेऊन मुंबईकर शिखांना अभयदान दिले होते, ह्या आरोपमागे असणारे अस्सल पुरावे द्या, ही नम्र विनंती करतो, हा आरोप फार मोठा आहे, मला वाटतं ह्याची तुमच्यासारख्या अभ्यासू अन प्रगल्भ सदस्याला कल्पना असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 07/13/2017 - 20:39

In reply to बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी by जेम्स वांड

Permalink

हा हा

वाट बघत बसा ! पुरावे दिले की आभार प्रदर्शन धागा काढा .
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 07/14/2017 - 22:15

In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी

Permalink

पुरावे

" खंडणीच्या बदल्यात अभय " विधानाचे पुरावे मागितल्यावर पळ काढलेला आहे. यानंतर या धाग्यावर बरेच प्रतिसाद दिले आहेत पण इकडे नाही कारण बोलाची कढी आणि बोलाचा भात
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश पाटील on Wed, 07/12/2017 - 10:44

Permalink

शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि

शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि २० खासदार आहेत. आणि ह्यातले ६४ आमदार हे या पक्षाने एकटे लढून आलेत. केवळ मुंबई ठाणे अणि नाशिक एवढ्याच भागातून नाही
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
पहिल्याच दोन वाक्यानंतर पुढे वाचायची इच्छा झाली नाही. जरा अभ्यास वाढवा अणि मगच बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 11:17

In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील

Permalink

शिवसेनेने मागील ५१ वर्षात

शिवसेनेने मागील ५१ वर्षात महाराष्ट्रासाठी नक्की काय व किती भरीव काम केले?
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Wed, 07/12/2017 - 14:30

In reply to शिवसेनेने मागील ५१ वर्षात by श्रीगुरुजी

Permalink

अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील

अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील वाक्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव ठेवा आणि तुम्हाला हवे ते उत्तर मिळते का बघा!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 14:38

In reply to अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

उत्तर मिळाले. धन्यवाद!

उत्तर मिळाले. धन्यवाद! शिवसेनेने ५१ वर्षात महाराष्ट्रासाठी काहीही केलेले नाही हेच माझे म्हणणे होते व त्याला आता तुमच्याकडून सुद्धा दुजोरा मिळाला.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Wed, 07/12/2017 - 14:42

In reply to उत्तर मिळाले. धन्यवाद! by श्रीगुरुजी

Permalink

चला हे एक बरे झाले! आता

चला हे एक बरे झाले! आता लगेहाथ त्याच प्रश्नात दुसऱ्या पक्षाचं नाव ठेऊन तुम्हाला काय वाटते सांगून टाका बरे! तुमचं भाजपवर विशेष प्रेम आहे असे बऱ्याचवेळेस दिसते तर भाजप चे नाव घालून बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 14:50

In reply to चला हे एक बरे झाले! आता by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

भाजपचे नाव घातले तर पुष्कळ

भाजपचे नाव घातले तर पुष्कळ गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ जलयुक्त शिवार योजना किंवा मागील वर्षी प्रखर पाणीटंचाईच्या काळात लातूरला केलेला पाणीपुरवठा किंवा भुजबळ कुटुंबीय, रमेश कदम इ. भ्रष्टाचार्‍यांविरूद्ध केलेली कारवाई.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Wed, 07/12/2017 - 15:05

In reply to भाजपचे नाव घातले तर पुष्कळ by श्रीगुरुजी

Permalink

पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो

पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो आपण! आपल्याला जलयुक्त शिवार दिसते पण शिवजलक्रांती दिसत नाही! शिवसेना भाजपचे संयुक्त सरकार म्हणून केलेली कामे भाजपला अर्पण केल्याने भाजपचा मोठेपणा सिद्ध होतो का? मग त्याच हिशेबाने सार्वजनिक बांधकाम मंत्री/परिवहन मंत्री/उद्योग मंत्री आणि इतरही काही मंत्र्यांचे गेल्या अडीच वर्षातील कांमं पाहून घेऊन ते कोणाला अर्पण करायचे तेही ठरवून घ्यावे. शिवसेनेच्या आमदारांनी त्या त्या भागात केलेली कामे कोणाला अर्पण करायची?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/12/2017 - 16:57

In reply to पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

तेच विचारतोय मी. शिवसेनेने

तेच विचारतोय मी. शिवसेनेने शिवसेनेच्या आमदारांनी नक्की कोणती भरीव कामे केलीत ते सांगता का जरा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com