मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

बार्नी · · काथ्याकूट
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत . २) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते . सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?

वाचने 51176 वाचनखूण प्रतिक्रिया 254

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Sat, 11/26/2016 - 23:39
इथे तर खुद्द मोदींना च फाट्यावर मारलं-
त्यांच्या बरळण्याला विचारतंय कोण? नेहमीपेक्षा जास्त झाली असेल म्हणून असे बरळले असणार. मागे एकदा काढलेल्या "पक्ष गेला खड्ड्यात" या उद्गारांची आठवण झाली.

In reply to by विशुमित

हो हो आहे ना यादी. १. साधी रहाणी उच्चं विचारसरणी. २. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले. ३. पाठीत खंजीर नं खुपसणारा. ४. सद्र्क्षणाय खलनिग्रहणाय वाला. ह्या सगळ्या गोष्टींशी एका विशिष्ट पक्षाचा संबंध कधीही नं आल्याने ह्या गोष्टी कदाचित नवख्या वाटणं सहाजिक आहे. समजुन घ्यायच्या असतील सोदाहरण तर बोला.

वरुण मोहिते Sun, 11/20/2016 - 16:28
काय फालतूपणा आहे . कोणीतरी ब्राम्हण आहेतच पुढे असं बोले ..लोल.. हजारो क्षेत्र आहेत हो सगळ्यांना संधी आहे . काय मिळणार असा विचार करून .

अजया Sun, 11/20/2016 - 16:55
सगळीकडेच ब्राम्हण सलतात हे बघून मौज वाटते ब्वा!जातीविषयक चष्मा घातल्याशिवाय हे जाणवणं अशक्य आहे :) जात हा नेहमीच जातीविषयक चर्चा करणाऱ्याच्या मनातला किडा असतो!तो नाही जात!! आरक्षण असलेले चित्रपट बनावेत ही शुभेच्छा आणि हाॅलिवुडवर मोर्चा नेण्यास समर्थन ;)

In reply to by बोका-ए-आझम

१००% जातीयवादी धागा सं मं ताबडतोब हा धागा उडवला पाहिजे असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?

राही Sun, 11/20/2016 - 17:52
चित्रपटात पडद्यामागचंसुद्धा एक मोठं जग असतं. कॅमेरामन, मेक अप आर्टिस्ट, साउन्ड रेकॉर्डिस्ट, एडिटर्स, असिस्टन्ट्स, प्ले बॅक सिंगर्स, संगीत दिग्दर्शक.. अनेक. यामध्ये अनेक बिगर ब्राह्मण असावेत. शिवाय बिगर ब्राह्मण अभिनेते अभिनेत्र्यासुद्धा सुरुवातीला होत्याच. शांता हुबळीकर, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर, हंसा वाडकर, रत्नमाला, बेबी शकुंतला, वी. शांताराम, मा. विनायक, दादासाहेब तोरणे, सीमा(?), लीला चिटणीस, सुलोचना, अरुण सरनाईक(?) मा. विवेक, सुमती गुप्ते, स्नेहप्रभा प्रधान, वगैरे पुष्कळ आहेत. इन फॅक्ट मराठी चित्रसृष्टीचा पाया भक्कम करण्यात ब्राह्मणेतरच आघाडीवर होते असे म्हणता येईल.

In reply to by राही

पुंबा Tue, 11/22/2016 - 12:04
सहमत आता सुद्धा अनेक आघाडीचे अभिनेते ब्राह्मण नाहीत. अभिनेत्र्यांत मात्र ब्राह्मण जास्त दिसतात पण त्याचे कारण शिक्षणाचे अधिक प्रमाण हे असावे. इतर समाजात ग्लॅमर इंडस्ट्रीबद्दल जे गैरसमज होते त्यामुळे तिथून जास्त प्रमाणात कलाकार आले नाहीत.

In reply to by संदीप डांगे

नाखु Mon, 11/21/2016 - 08:41
नाम मेरा , राजा नाम मेरा अरे जो ना भूल करे ये हाथ जहां पडे मेरा वो काम झटापट चले पतली आ जाडी फिर भि या आडी सबको सिधा करे अरे जो ना भूल करे राजा नाम मेरा

In reply to by संदीप डांगे

पाटीलभाऊ Mon, 11/21/2016 - 14:40
संदीप अण्णा, आता 'गोरे', 'काळे' वरून अजून महाभारत नको...! नाहीतर परत वर्णभेद वरून धागे येतील... :P (ना गोरा ना काळा) -पाटीलभाऊ

पिलीयन रायडर Sun, 11/20/2016 - 22:02
एकदम बरोबर आहे.. काही बघायला जावं तर गोखले, कुलकर्णी, लागु, दामले, प्रभावळकर.. काही नाही हो.. आडनाव पाहुन एकमेकांना इंडस्ट्रीत ओढुन घेतात. आणि बघणारे सुद्धा आडनाव पाहुनच बघतात. टॅलेंट बिलेंट काही नाही.. त्यांनाच वर्षानुवर्ष डोक्यावर बसवुन ठेवतात, गर्दी काय करतात त्यांच काम पहायला.. सगळा ब्राह्मणी कावा आहे. बरोबर आहे तुमच्या मित्राचं.

jp_pankaj Sun, 11/20/2016 - 22:40
ही मक्तेदारी मोडुन काढण्यासाठी मुकमोर्चाचे आयोजन चालु आहे. #काढु_मुकमोर्चा_पण_कोण_करणार_खर्चा?

मारवा Sun, 11/20/2016 - 22:45
अफ्रिकेच्या विकास धारणांना बदलण्यासाठी तरी एकवेळ निसर्गचक्रा संदर्भातली भुमिका स्पष्ट करतांनाच आर्थिक मागासलेपणा ही काय मक्तेदारी बनुन राहु नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतांना दोन वेळ च्या मॉल फिरण्याची सोय झाली म्हणजे आजपर्यंतचा विदा हा केवळ आसमंतातली चांदणी जणु !!!!!!!

फेदरवेट साहेब Mon, 11/21/2016 - 07:48
एरवी सेक्युलॅरिजम ह्या शब्दाला सर्वाधिक तोडणारे त्याची यथेच्छ टिंगल करणाऱ्या समाजाचेच लोक्स 'मराठी चंदेरी दुनियेत आमच्या समाजाची मक्तेदारी नसून ते क्षेत्र सेक्युलर असल्याचे' आरडताना पाहून मजा आली.

In reply to by फेदरवेट साहेब

बोका-ए-आझम Mon, 11/21/2016 - 18:21
सेक्युलॅरिझमचा जो सोयीस्कर अर्थ काढला जातो त्यावर टीका केली जाते.रच्याकने इथे तर सेक्युलॅरिझमचा संबंधच नाही. हा वाद जातींवरुन आहे. बघा झेपतंय का.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Mon, 11/21/2016 - 22:38
दोन गटांतर्गत समभाव ही अगदी मूलभूत संकल्पना नाही का सेक्युलॅरिजमची? त्यात समभाव हा फक्त दोन धार्मिक गटातच असायला हवा का? पाश्चात्य राज्यशास्त्र जात ह्या विषयाला अनुसरून सेक्युलॅरिजमची परिभाषा कधीच करू शकणार नाहीये म्हणून का जात्यांतर्गत समभावाला सेक्युलॅरिजम म्हणायचे नाही का? (बहुदा नाहीच झेपणार तरीही)

माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे
अॉ.... अच जाल तल!

तिमा Mon, 11/21/2016 - 10:07
ज्यांच्यात कर्तृत्व नाही तेच लोक दुसर्‍याची जात काढतात.

In reply to by तिमा

अगदी योग्य विधान.७०च्या दशकापर्यत समाजात दुसरयाचा धर्म,जात कधीही उघडपणे विचारला जात नसे व त्यावर चर्चाही होत नसे.एवढेच काय, सध्या 'भैय्या'म्हणून हिणवल्या जाणार्या उत्तर प्रदेशच्या लोकांनाही कधी 'आपण मराठी का शिकत नाही ,मराठीत का बोलत नाही?' असे बावळट प्रश्न विचारले जात नसत(जे सध्या तुमच्या त्या 'कोरा' ह्या सायटीवर विचारले जातात असे हे म्हणतात) असो. 'पिंजरा' पाहताना निळू फुलेण्ची जात कोणती हा प्रश्न मनात आला नाही.'जैत रे जैत' पाहताना स्मिता पाटील मराठा की आणी कोणी ह्याचीही चर्चा तेव्हा झाली नाही. सध्याचे वातावरण पाहता देशात सामाजिक अधोगतीच झाली आहे असे म्हणावे लागेल.

amit१२३ Mon, 11/21/2016 - 12:27
थोडंसं सहमत ..आताच 1 चित्रपट पहिला तर सगळेच्या सगळे कलाकार तेच होते ..असं का असेल बरं हा विचार केला आणि मग लक्षात आलं अरे हे तर फक्त याच क्षेत्रात होत नाहीये . खाजगी कंपन्यांमध्ये पण काही लोक असा विचार करतात आणि फक्त आडनावावरून सिलेक्शन केलं जात. ( हा मला आलेला अनुभव ) बाकी सगळीच बोटे सारखी नसतात. त्यामुळे सगळेच लोक असा विचार करत असतील हे म्हणणे पण चूक आहे. बाय द वे बऱ्यापैकी डायरेक्टर इतर समाजातील हे पाहून आनंद होतो.

In reply to by amit१२३

वेल्लाभट Mon, 11/21/2016 - 12:41
काय आहे माहिती आहे का अमितभाऊ, नेम्म्मका हाच स्वभावदोष आहे ना मराठी माणसाचा, थोडं पुढे जाऊन भारतीयांचा, त्याहून पुढे जाऊन एकंदर माणसाचा, त्याचा फायदा वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या प्रकारे घेतात. इंग्रजांनी घेतला, आता राजकारणी व इतर भाषिक जे आपल्यापेक्षा तुलनेने कमी भेदभाव करतात आपापसात, ते घेतायत. एक म्हणजे आपण आपली जात वगळता इतर कुण्या जातीचं कुणी सरस काही केलं की एक तर हेटाळणी करावी किंवा खुसपटं काढावीत, आणि उलट झालं तर मग आमचं भलं झालेलं बघवत नाही वगैरे कल्ला करावा, या दोनपैकी एक गोष्ट ९०% मराठीजन करतात. एक करतो तर मग दुसरा का नाही... या लॉजिकने कुणीच थांबत, थांबवत नाही. शिक्षणाने माणसाला बाकी काही दिलं तरी त्याचं विशेष नाही, पण किमान व्यापक विचार करायची, बाकी कुणी करत नसेल त री ही करायची व इतरांना करायला लावायची बुद्धी दिली तरी पुष्कळ आहे. कुठल्या गोष्टीत आपण अजूनही अडकू पाहतोय आणि त्याने खरंच आपली वृद्धी होणार आहे का? सारासार विचार करावा. लोणी कुणी दुसराच खाऊन जातोय इतकं तरी ओळखावं, प्रत्येकानेच. जात की बात नही; बात की जात समझो

मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 12:47
ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे असे लोक अनेक शिखरे पादाक्रांत करतात ,भारतीय लोक अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ झालेले आहेत (सत्या नाडेला, सुंदर पिचाई) ज्यांना काही जमत नाही ते समजतात की ज्यांना ते मिळालंय ते कर्तृत्वामुळे नाहीतर इतर विशिष्ट कारणाने मिळालंय. बाकी जातीमुळे, संस्काराने -वारशाने काही गोष्टी मिळू शकतात असे जरी मानले तरी प्रयत्नपूर्वक इतर लोक ते कमवू शकतात. उदा : ब्राह्मण कलाकारांना स्पष्ट शब्दोच्चार, खणखणीत आवाज यावर कदाचित कमी मेहनत करावी लागत असेल (असा माझा समज) कारण संस्कारातून आलेली स्पष्ट शब्दोच्चाराची सवय . पण म्हणजे इतरांना हे जमणारच नाही असे नाही. कदाचित थोडी जास्त मेहनत करावी लागत असेल इतकेच.

वटवट Mon, 11/21/2016 - 13:00
कलेच्या प्रांतात जात, घराणेशाही, आरक्षण नसते ओ चालत... तिथं नाणं खणखणीतच असावं लागतं. जर ते नाणं खणखणीत नसेल तर मग त्याचा "रात्रीस खेळ" होतो...

In reply to by वटवट

कला म्हणजे विज्ञान वा अभियाण्त्रिकी नव्हे हो वटवट्या.हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही असे ते लोकही म्हणणार नाहीत? जॅकी श्रॉफचा तो मुलगा,शक्ती कपूरची कन्या श्रद्धा,राकट्,दांडगट अर्जुन कपूर ही नाणी खणखणीत आहेत? ही मंडळी सामान्य मध्यम्वर्गीय असती तर ह्यांना चित्रपट मिळाले असते? श्रद्धा कपूर श्रद्धा घाटपांडे असती तर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बोका-ए-आझम Mon, 11/21/2016 - 13:59
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बापाच्या नावावर फारतर पहिला चित्रपट/नाटक/संधी मिळत असेल. नंतर तर त्या कलाकाराला स्वतःला सिद्ध करावं लागतं. अमिताभला बघायला जाणारे अभिषेकला बघायला गेले नाहीत.

In reply to by बोका-ए-आझम

त्याचा अभिनय जेम्तेमच आहे हे केव्हाच कळले होते पण तरीही जवळपास १६ वर्षे टिकून आहे ना तो? दुसरा कोणी असता तर केव्हाच 'रेफ्युजी'झाला असता रेबोक्या.अजूनही यशराज फिलम्स सारखे मोठे बॅनर्स,मणिरत्नमकडे काम करायला मिळणे..मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करायची संधी मिळणे..हे कशामुळे? वडिल अमिताभ बच्चन व पत्नी ऐश्वर्या आहे म्हणूनच ना? असो. धागा भरकटवत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वटवट Mon, 11/21/2016 - 20:47
आ. माईसाहेब, जी काही उदाहरणे आपण दिलीत... ते अभिनेते आहेत?? आयला? सिनेमे मिळणे वेगळे आणि गाजणे वेगळे ओ... त्या अर्थाने म्हणत होतो मी... रसिकाला जातीशी, घराण्याशी देणेघेणे असते ते फक्त टेस्टिंग फेज मधेच... नन्तर रसिकाला जर नाणे खणखणीत वाटले नाही तर तो ते फेकून देतो...

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाखु Mon, 11/21/2016 - 14:33
मिपावर ठरावीक (विशीष्ठ) वर्गाची मक्तेदारी आहे काय ? कौलेच कौले चोहिकडे गेली चर्चा कुणीकडे या सदाबहार संघटनेच्या "वाय्फळांचा मळा" या अनियतकालीकातून साभार.

पी. के. Mon, 11/21/2016 - 14:26
विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून मराठी सिनेमा पाहत नाही असा म्हणणारा तुमचा मित्र.. शिक्षण सौंस्थेथ विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून शिक्षण सोडून दिले का? चप्पल बनवण्याच्या धंदयांत विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून चप्पल वापरणं सोडून दिले का? केस कर्तनालया मध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून केस स्वतः कापतो का? कपडे शिवण्या मध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून कपडे वापरणे बंद केले का?

अद्द्या Mon, 11/21/2016 - 15:11
हे असले YZ धागे कायला टाकतात लोक .. सगळी कडे जात काढत बसतात साले . ज्याला काम करायला जमतं त्याला ते मिळतं .. तुम्हाला जमत नसेल तर फालतू गोष्टी बोलत बसू नये .

माहितगार Mon, 11/21/2016 - 15:32
विकिपीडियावर मराठी सिनेमात कार्यरत व्यक्तींची दखल पुर्णांशाने दखल घेतली गेली अहे का माहित नाही पण चर्चा चालू आहे तर किमानपक्षी किमान स्वरुपाचा डाटा हवा म्हणून इंग्रजी विकिपीडियावरील खालील दुवे देत आहे. * https://en.wikipedia.org/wiki/Category:Marathi_film_producers * https://en.wikipedia.org/wiki/Category:Marathi_film_directors * https://en.wikipedia.org/wiki/Category:Male_actors_in_Marathi_cinema * https://en.wikipedia.org/wiki/Category:Actresses_in_Marathi_cinema

माहितगार Mon, 11/21/2016 - 15:54
मी नेपोटीझम बद्दल चर्चा धागा काढून दोन दिवस झाले एक अपवादात्मक प्रतिसादा शिवाय कुणि फिरकले नाही, ह्या धाग्यावर जातीवार विभागणीचा प्रयत्न झाला की सगळे धावत आले. असो. क्रोनीझम (मराठीत काय म्हणावे ?) नेपोटीझम (घराणेशाही) ह्या भारतीय समाज जिवनातील गृहीत गोष्टी आहेत त्यात कुणाला फारसे वैषम्य वाटत नाही त्याच प्रमाणे जात हाही भारतातील अविभाज्य घटक आदर्श नसला हत्ती गेला (लांब) शेपुट आहे या न्यायाने शिल्लक आहे. जात धर्म क्रोनीझम घराणेशाही पलिकडच्या लोकांना संधी मिळतच नाहीत असे नसावे, शहारुख खान टिव्ही मालिकेतून पुढे आला, कलावंत एकदा जनतेनी डोक्यावर घेतला की त्याला कुणिही थांबवू शकत नाही. टिव्ही सारख्या माध्यमांनी एंटरटेनमेंट मिडीया बर्‍यापैकी समानसंधी स्वरुपाचा बनवला आहे गाणे, विनोद, आयकॉन शोध अशा अनेक विषयांवर खुल्या मंचातून नवागतांना जात-पात-धर्म न पहाता संधी मिळताना दिसतात, मला वाटते बरेच चित्रपट कलावंत अभिनय बद्दल क्लासेस वगैरे घेतात फिल्म अँड टेलव्हीजन इन्स्टीट्यूट सारख्या संस्थाही विद्यार्थ्यांना जात धर्म पाहून प्रशिक्षण देत नसाव्यात. एखाद्या विशीष्ट वर्गातून एखाद्या क्षेत्रात अधिक लोक असणे संभवीनीय असू शकते कोणत्याही क्षेत्रात प्रगती होण्यासाठी समावेश न झालेले समाजघटक सोबत आलेले केव्हाही चांगलेच आणि असे घटक सामावून घेण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलणे कदाचित उपयूक्त असू शकते का यावर विचार व्हावयास हरकत नसावी. असो

In reply to by सूड

शु: शु:!!! भावना दुखावतील असे बोलु नये हो सुड!!! नाक घासुन माफी माग बरे बार्नीसरांच्या "मित्राची". माझ्यासाठी दोन चमचे चरणतीर्थही आण हो.

In reply to by सूड

गामा पैलवान Mon, 11/21/2016 - 20:14
सूड, एकदम समर्पक प्रश्न आहे! काम काही नाही. फुकट बसून पगार घेणार. अशांना सह्याजीराव म्हणंत असंत. आ.न., -गा.पै.

In reply to by सूड

सरकारी ब्राम्हण म्हणून हिनवणारे आणि एकाच वर्गात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे का, असे म्हणनारे या सर्वांबद्दल त्यांचं सेम मत असावं असं वाटतं. -दिलीप बिरुटे

नपा Tue, 11/22/2016 - 12:30
बरं मग... काय उपाय करायचा म्हणताय? एक लै भारी काम करता येईल.....मराठी चित्रपटात काम करणाऱ्यांचे फक्त पहिले नाव (First Name ) प्रसिद्ध करायचे म्हणजे लोकांना (आड)नावावरून होणारे मानसिक क्लेश कमी होतील... बाकी जो तो ज्याच्या त्याच्या गुणवत्तेने पुढे जाताच राहील त्याला जातीचा त्रास होणार नाही...

सतिश गावडे Tue, 11/22/2016 - 23:04
हो. मनापन तसाच वाटतो. मी शालेत आसताना मनापन वाटायचा आपुनपन मराटीतला आजे द्येगाना व्हवा आनी पिरेमी आशीक आवारा आसा गाना म्हणत हिरोंडा चालवावी. पन मराटी फिलिम इंडष्ट्री मदीं एका यीशीस्ट क्याटेगरीच्या लोकांची म्हाजोरगिरी आसल्यापाय गपचिप तो यीचार मनातना काडून टाकला आणि येवस्तीत शिकून बिकून सोप्टेर इंजिनेर झालो. पन आता तुमी सरल ह्याज्यात आरकशन मांगा. तुमी पन हिरो व्हाल. तुमची पोरा पन व्हतील. तुमच्या पोरांची पोरा पन व्हतील. फुडच्या पिड्याना टेन्शनचा कामच नाय.

In reply to by सतिश गावडे

यशोधरा Wed, 11/23/2016 - 11:06
पिरेमी आशीक आवारा ह्या गाना मना समाजलां, पन ह्या रे कुटला - आजे द्येगाना व्हवा. ह्या नाय समाजलां.

किसन शिंदे Wed, 11/23/2016 - 09:49
मराठी चित्रपटसृष्टीत जातीची अशी मक्तेदारी असली काय किंवा नसली काय, काही फरक पडत नाही, कारण चित्रपटाला डोक्यावर घेणार्‍या किंवा खाली आदळणार्‍या रसिक प्रेक्षकांची कुठलीच जात नसते.

सामान्य वाचक गुरुवार, 11/24/2016 - 16:49
मी हॉलीवूड चे चित्रपट बघते ते गोऱ्यांनी काढलेले, गोऱ्यांन बद्दल आणि गोऱ्यां चेच असतात पण मला काय प्रॉब्लेम नाय कारण चित्रपट हा करमणुकीसाठी बघायचा असतो हे माझ्या खांद्यावरच्या डोक्याला माहित आहे सगळ्या गोष्टींमध्ये आपली मते नोंदवण्याची, किंवा मते form करण्याची देखील गरज नसते, हे सुद्धा माझ्या डोकयाला म्हायती हाये

jp_pankaj गुरुवार, 11/24/2016 - 18:39
200 होत आले, अजुन विशीष्ट वर्गाची मक्तेदारी नाय संपली..! कोण आहे तिकडे?? शिपॉय..!

गामा पैलवान गुरुवार, 11/24/2016 - 20:55
संदीप डांगे, मी माझी संस्कृती म्हणून वैयक्तिकरित्या जात जपत असेन तर मी जातीयवादी कसा काय ठरतो? जात जपणे आणि जातीभेद जपणे यांत फरक आहे ना? तुम्ही हा संबंध कसा जोडलात ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 21:56
'संस्कृती म्हणून वैयक्तिकरित्या जात जपत असणे' म्हणजे काय? जात जपणे आणि जातीभेद जपणे यात काय फरक आहे?

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान Fri, 11/25/2016 - 02:24
संदीप डांगे, काही गोष्टी आपल्याला कुटुंबाकडून मिळालेल्या असतात. उदा. : स्वयंपाक वा पेहराव. ती जर का जातीविहीत बदलत असेल आणि मी तसाच पोशाख करत असेन आणि माझ्या आवडीनिवडी माझ्या जातीला धरून असतील तर मी जात पाळतोय. मात्र मी माझ्या जातीला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानंत नाही. इतकंच काय मी जातीभेदही मानंत नाही. सर्व जाती सारख्या मानतो. जात आन इजातीभेद मानण्यांत हा फरक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन Sat, 11/26/2016 - 08:58
खाद्यपदार्थ, पोशाख, रीतिभाती ह्याला जात म्हटले तर संस्कृती कशाला म्हणायचे? एकाच जातीतल्या दोन व्यक्ति वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी गेल्या तर सारखाच पहिराव करतील? बहुतेकांना ज्यांना "वैयक्तिकरीत्या" जात सांभाळायची असते ते तथाकथित श्रेष्ठ जातीतले असतात असे निरीक्षण आहे. बाकी चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

राही Sat, 11/26/2016 - 10:57
आपला प्रतिसाद वाचला आणि +१ साठी लॉग-इन केले. खाद्यपदार्थ, रीतिभाती, पोशाख म्हणजे 'जात' असेल तर प्रत्येक जातीची संस्कृती वेगळीच की. मग अखिल महाराष्ट्राची, देशाची संस्कृती ठरवण्याची वेळ आली तर कोणत्या जातीचे रीतिरिवाज, खाणे, पोशाख स्टँडर्ड धरायचा?

In reply to by राही

गामा पैलवान Sat, 11/26/2016 - 14:03
राही, संस्कृती म्हणजे काय या प्रश्नाचीच वाट पहात होतो मी. कारण की संस्कृती या शब्दाचं मूळ इंग्रजीत आहे. हा अर्वाचीन शब्द असून २०० वर्षांपूर्वी हा शब्द भारतीय भाषांत सापडत नसे. महाराष्ट्रापुरतं म्हणायचं झालं तर महाराष्ट्रधर्म आहे. पण संस्कृती नामे पदार्थ पारंपारिक साहित्यात नाही. तर प्रश्न असा आहे की जातीला धर्म म्हणावं का? हिंदू ही जात आहे का? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे Sat, 11/26/2016 - 14:56
शिफ्टिंग गोलपोस्ट?????? जातीच्या वर्मावर बोट ठेवले की धर्माच्या गोष्टी? ह्या धाग्याचा विषय 'जात' हाच आहे हे तुम्हाला ठावूक आहे, आता जात म्हणजे धर्म आणि हिंदु म्हणजे जात वगैरे आणून शब्दच्छल व बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न करु नका.

लीना कनाटा Sat, 11/26/2016 - 08:51
मामोऑ अरे बार्नीच्या मित्रा, हा भारतीय समाजातला शारीरिक कष्टातून सुटलेला पहिला वर्ग. पिढ्यान पिढ्या डोकॅलिटी ची कामे केल्याने बुद्धीला धार चढलेली. त्यातच वाघिणीच्या दुधाची सगळ्यात आधी धरलेली कास त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रात गेले तेथे तेथे प्रगती केली आणि तसा सगळीकडे बोलबाला. आता साधा सरळ हिशेब मांडू हं. अगदी ८०% हुशार म्हणजे चारात तीन, उरलेल्यातील फक्त २०% हुशारआणि अनुकूल परिस्थितीची संधी असलेले म्हणजे जवळ जवळ वीस. सुरवातीला प्रगतीचा चढ तीव्र त्यामुळे प्रगतीचा वेग अधिक नंतर मात्र समतल भाग, तीन तिथं समतल पातळीत तर शिक्षणाची संधी आणि अनुकूल परिस्थितीमुळे वीस त्या तिघांना गाठण्याच्या तयारीत तीव्र चढावर. उरलेल्यांना देखील आता शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध तसेच लोकसंख्येची वाढ भौमितिक प्रमाणात त्यामुळे बार्नीच्या मित्रा काही काळाने तू बार्नीला काय सांगशील हो असा आमच्या ह्यांचा प्रश्न ? मामोऑ

In reply to by लीना कनाटा

शब्दबम्बाळ Sat, 11/26/2016 - 16:33
अहो साधा सरळ हिशेब मांडताय कि कोडे घालताय!! :D आकडेवारी काहीच झेपली नाही... "अगदी ८०% हुशार म्हणजे चारात तीन, उरलेल्यातील फक्त २०% हुशारआणि अनुकूल परिस्थितीची संधी असलेले म्हणजे जवळ जवळ वीस." आता यात, कशातून किती गेले म्हणून २० उरले? ८०% हुशार कशातले? चारात तीन म्हणजे शंभरात ७५ ना? परत, "वीस त्या तिघांना गाठण्याच्या तयारीत तीव्र चढावर." आता हे २० नक्की कुठले? कृपया जरा इस्कटून सांगाल का?? :)

In reply to by शब्दबम्बाळ

लीना कनाटा Sat, 11/26/2016 - 22:06
बम्बाळ काका, शंभरातल्या साडे तीन, चार पैकी ८०% हुशार म्हणजे तीन शंभरातल्या उरलेल्या साडे शहाण्णव पैकी फक्त २०% हुशार आणि अनुकूल परिस्थिती लाभलेले म्हणजे साधारणतः वीस तीन प्रगतीच्या उच्य टप्प्यावर पोहोचलेले, वीस त्यांना गाठू पाहणारे बदलत्या परिस्थिती मुळे आणि उपलब्ध संधीमुळे शंभरातील उरलेले पंचाहत्तर देखील प्रगती करू पाहणारे हे चित्र एकीकडे तर दुसरीकडे स्नान संध्या सोडून अभक्ष्य भक्षण, अपेय पान स्वीकारून कटिंग एज (मराठी प्रतिशब्द ?) गमावणारे दुसरीकडे त्यामुळे काही काळा नंतर काय चित्र दिसेल असा ह्यांचा प्रश्न

In reply to by लीना कनाटा

शब्दबम्बाळ Sun, 11/27/2016 - 21:31
हम्म, इंटरेस्टींग! "शंभरातल्या साडे तीन, चार पैकी ८०% हुशार म्हणजे तीन" यासाठी कोणताही दुवा देता येईल का? का त्याची गरजच नसेल ना... हुशारी हि जन्मजातच असते असे काही तुमचे मत आहे का? "शंभरातल्या उरलेल्या साडे शहाण्णव पैकी फक्त २०% हुशार आणि अनुकूल परिस्थिती लाभलेले म्हणजे साधारणतः वीस" यासाठी सुद्धा संदर्भाची गरज नसेल ना? हुशारी ची आपली व्याख्या काय आहे हे ऐकायला आवडेल. एखाद्या शेतकऱ्याने अभिनव प्रयोग करून शेतीतून फायदा कमावला तर तो आपल्या 'हुशार' च्या व्याख्येत बसतो का? कि तो उच्चशिक्षित नाही, मोठ्या कंपनी मध्ये कामाला नाही, परदेशात गेला नाही म्हणून तो हुशार नाही? बाकी तुमच्या ह्यांचे विचार बऱ्याच ऍबस्ट्रॅक्ट पद्धतीने मांडले आहेत त्यामुळे नक्की मुद्दा काय आहे ते कळेना... प्रगतीचा उच्च टप्पा वगैरे तर लोल मुद्दा आहे! कोण कोणाला गाठण्यासाठी कष्ट करत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या प्रगतीसाठी आणि राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार, आधी काही लोकांना ती संधी जाणीवपूर्वक नाकारण्यात आली होती. आता त्यांना ती उपलब्ध आहे. त्याच लोकांपैकी फक्त २०% हुशार असतील असे म्हणणे हि त्यांची क्रूर थट्टा करणे वाटते.

In reply to by शब्दबम्बाळ

लीना कनाटा Mon, 11/28/2016 - 03:32
# हुशारी हि जन्मजातच असते असे काही तुमचे मत आहे का? # अगदी, अगदी आणि अश्या दाव्यांना विदा, दुवा, संदर्भ इत्यादींची गरज नसतेच मुळी ! # त्याच लोकांपैकी फक्त २०% हुशार असतील असे म्हणणे हि त्यांची क्रूर थट्टा करणे वाटते. # ओ काका, खरे तर २०% देखील जास्तच आहेत, त्यात क्रूर थट्टा कसली? मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये. - असे प्रतिसाद काय उगाच येतात काय?

राही Sat, 11/26/2016 - 11:24
खरे तर कोणत्याही कलाप्रवाहात स्थूलमानाने नेहमीच दोन प्रवाह असतात. एक अभिजनांना आकर्षित करणारा आणि एक बहुजनांना. अर्थात ही काही न बदलणारी सीमारेषा नव्हे. हे ढोबळमान आहे. बहुजनवादी कलेचे 'मास अपील' अर्थातच जास्त असते. बहुजनवादी म्हणजे ओबडधोबड किंवा क्रॅश नव्हे. पुरते ग्रामीणही नव्हे. शहरातल्या झोपडपट्टीचे, चाळीचे. गिरणीकामगारांचे चित्रण करणारी कला ही बहुजनांचे चित्रीकरण करणारी अभिजात कलाकृती असू शकते आणि अभिजनांचे चित्रीकरण करणारी बटबटीत भडक असू शकते. तेव्हा या दोनही प्रवाहात त्या त्या थीमला साजेसे कलावंत नांदत असतात. कलात्मक दर्जाच्या दृष्टीने दोघेही सारखेच असतात. मला देऊळ चित्रपट अतिशय आवडला होता. बदलत्या खेड्यातील विरोधाभासाचे चित्रीकरण करणारा हा चित्रपट 'सुवर्णमयूर' पटकावून गेला. यात या दोन्ही प्रवाहांचा सुंदर समतोल साधला गेला आहे. (गिरीश कुलकर्णीच्या साध्यासुध्या मनातली घालमेल, संघर्ष आणि आपल्या फायद्यासाठी देवळाचे महत्त्व वाढवणार्‍यांचा क्रूर बटबटीतपणा.) अभिजातता आणि बटबटीतपणा हा जातीवर नसतो.अवांतर : मला तर आजही ब्राह्मणेतर लोकच मराठी चित्रपटसृष्टीत जास्त आढळतात. नैसर्गिकरीत्या नजिकच्या भविष्यकाळात त्यांचे प्रमाण वाढणारच आहे. सो, वाद कशाला?

In reply to by राही

शब्दबम्बाळ Sat, 11/26/2016 - 16:42
णिषेध! अशा धाग्यांवर हे असले प्रतिसाद यायला लागले कि टीआरपी वर्धक चर्चा कशा बरे होणार... लोकांना आम्ही कसे भारी, ते कसे तुच्छ हे सांगायची संधी कशी मिळणार? एकमेकांवर आंतरजालीय जातीय धागे काढून हिणवण्याची इच्छा पूर्ण कशी होणार? एकमेकांना नडणे गरजेचे असते हे तुम्हाला माहिती नाही का? अभ्यास वाढवा... :)

In reply to by राही

पुंबा Sat, 11/26/2016 - 17:31
संपूर्ण सहमत. कित्येक मुख्य अभिनेते-अभिनेत्री अब्राह्मण आहेतच पण आघाडीचे दिग्दर्शक निर्माते सुद्धा अब्राह्मणच आहेत. कलेच्या प्रांतात इतकं water tight sagregation शक्य नसतंच. माझ्या जातभाईंनाच घेणार असा विचार केला तर बोऱ्या वाजू शकतोच. ब्राह्मण लोकांचा Eary bird असण्याने मिळणारा फायदा जसजसा संपत जाईल तसतसा नवा crowd या प्रांतात येईल.

गामा पैलवान Sat, 11/26/2016 - 20:05
संदीप डांगे,
शिफ्टिंग गोलपोस्ट?????? जातीच्या वर्मावर बोट ठेवले की धर्माच्या गोष्टी?
ठीके. चर्चेतून धर्म काढून टाका. संस्कृती हा शब्द तर अर्वाचीन आहे. आणि जाती तर पूर्वापार चालंत आलेल्या आहेत. म्हणजेच मी कुठलीही परंपरा पाळली की मी आपोआप जातीयवादी ठरतो. हा तिढा कसा सोडवायचा? २.
आता जात म्हणजे धर्म आणि हिंदु म्हणजे जात वगैरे आणून शब्दच्छल व बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न करु नका.
तुमची बुद्धी इतकी तकलादू आहे की माझ्या युक्तिवादाने भ्रमित होईल? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन Sun, 11/27/2016 - 20:47
तिढा सोडवणे अगदी सोपे आहे. गेल्या दोनशे वर्षातले शब्द चालत नसतील तर गेल्या दोनशे वर्षातले राहणीमानातले सगळे बदलही झुगारुन मग मूळ स्वरुपातली जात पाळावी वैयक्तिकरीत्या. अर्वाचीन काळातले सगळे करायचे; पाहिजे तिथे इंग्रजीचा वापर करायचा आणि फक्त संस्कृती ह्या शब्दाशी वाकड्यात शिरुन जातीचे तुणतुणे वाजवायचे हा प्रकार कोणत्याही लॉजिकवर टिकणारा नाही. चिंचगुळाची आमटी खाल्ली व मुंज केली म्हणून कोणाला पूर्वी ब्राह्मण म्हणत नसत; किंवा नाचगाणे केले म्हणून कोणाला महार म्हणत नसत. जात जन्मानेच येई व इच्छा असो वा नसो ते सगळे करावेच लागे. आता जीवनपद्धतीला संस्कृती हा शब्द नव्हता पूर्वी म्हणून त्यालाच तुम्ही जात म्हणण्याचा उफराटेपणा करणार असाल तर करा. त्याच निकषाने सिनेमा हा गेल्या २०० वर्षातलाच असल्याने ह्या धाग्यावर तर सिनेमात काम करणारे ब्राह्मण हे ब्राह्मणच नाहीत असे तुमचे मत असले पाहिजे वैयक्तिकरित्या. अर्वाचीन जीवनपद्धती जगणार्‍या (म्हणजे ज्याला आपण जिन्स म्हणतो ते अमेरिकन गुराख्यांचे कपडे घालणे; गेल्या दोन-चारशे वर्षांत इकडे आलेले बटाटा, मिरची, कॉफी, पिझ्झा, पास्ता इत्यादी अर्वाचीन पदार्थ खाणे हे करणार्‍या) लोकांची जात कोणती म्हणायची? दोनशे वर्षांपुर्वीच्या कोणत्या परंपरा कोण "शुद्ध" रीतिने पाळतो हेही ऐकायला आवडेल. वैदिक काळात ब्राह्मण लोक बळी द्यायचे यज्ञात आणि मांस खायचे किंवा क्षत्रिय लोक सीमोल्लंघन करुन शत्रूप्रदेशात जाऊन यायचे. ह्या प्राचीन परंपरांचे काय? की सोयीस्कर तोच कालखंड निवडायचा परंपरांसाठी?

मदनबाण Sun, 11/27/2016 - 14:04
न म स्का र न म स्का र न म स्का र कोंबड्यांच्या झुंजीत बोकडांची टक्क्कर... बैलांच्या शर्येतीत गाढवाचा पहिला नंबर... न म स्का र न म स्का र न म स्का र मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Indian Army Amazing Talent Video... :)

गामा पैलवान Sun, 11/27/2016 - 22:38
नगरीनिरंजन,
आता जीवनपद्धतीला संस्कृती हा शब्द नव्हता पूर्वी म्हणून त्यालाच तुम्ही जात म्हणण्याचा उफराटेपणा करणार असाल तर करा.
जरूर करेन. कारण पूर्वीच्या काळी लोकं आपापल्या जीवनपद्धतीस जातिधर्म, कुळाचार, वगैरे शब्दांनी ओळखंत असंत. ते सगळे संदीप डांग्यांच्या मते जातीयवादी धरायचे का? त्यांच्या मते तर वैयक्तिकरीत्या जात पाळणारा जातीयवादी आहे. अशा माणसाने कुठलीही परंपरा पाळली तर तिची नाळ जातीशी कशीही जुळवता येईल की! अशा मनुष्यास स्वत:च्या जातील इतर जातींपेक्षा श्रेष्ठ न मानण्याची संधीदेखील द्यायला संदीप डांगे तयार नाहीत. मग दोनशे वर्षांपूर्वी आणि त्याआधी शतकानुशतके भारतातले बहुतांश लोकं जातीयवादी होते का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 23:19
याचे उत्तर मी आधीच दिले आहे, जात हे आदिम इच्छेचेच सुधारित रूप आहे.. आपण 'अमुक जातीचे' आहोत म्हणजे नक्की काय आहोत ह्याचं उत्तर ज्यानेत्याने शोधावं..कसलेही तिढे उद्भवणार नाहीत, परंपरा आणि जातीचा संबंध ननि यांनी खोडून काढला आहेच, सबब, तुम्हाला मान्य नसेल तर काही उदाहरणे द्या, बघू तरी जातीचा संबंध कसा येतो ते परंपरेशी..

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान Mon, 11/28/2016 - 01:08
संदीप डांगे, सर्वसामान्य माणूस परंपरांचा उल्लेख करतांना जातिधर्म, कुळाचार, रीतीरिवाज असाच उल्लेख करतो. बरेचसे रीतीरिवाज जातींशी संलग्न आहेत. कुळाचार तर उघड उघड जातीशी निगडीत आहेत. मग हे उल्लेख जातीयवादी धरावेत का? कुळाचार तर पाळतांना जात म्हणूनंच पाळले जाणार आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे Mon, 11/28/2016 - 01:42
कुळाचार (कौटुंबिक आचार, पूजा, कर्म) हे कुटुंब म्हणून पाळतात कि जात म्हणून? कोणत्याही एका विशिष्ट जातीचे कुलदैवत, कुळाचार, कर्मकांडे 100% तंतोतंत सारखी असतात का? कर्मकांड, कुळाचार 200 वर्षांआधी जशी होती तशीची तशी 100% तंतोतंत पाळली जातात काय? (मला वरील प्रश्नांचे उत्तर अजिबात माहित नाहीये म्हणून विचारतोय, त्यानंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन)

संदीप डांगे Mon, 11/28/2016 - 01:51
गा पै, मुंज संस्कार याबद्दल विकी वर प्रस्तुत माहिती मिळते, (याचे सत्य असणे कितपत ते माहित नाही, नसल्यास त्यात आवश्यक ते बदल करण्यास माहितगार यांना सुचवलं तर योग्य राहील,) https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C तर मुंज संस्कार व जात याचा संबंध लावलेला दिसला तसेच विधीत बरेच कालानुरूप बदल आलेले दिसलेत. मुंज संस्कार हा परंपरागत संस्कार कि जातिआधारीत परंपरा?

गामा पैलवान Mon, 11/28/2016 - 18:41
संदीप डांगे,
कुळाचार (कौटुंबिक आचार, पूजा, कर्म) हे कुटुंब म्हणून पाळतात कि जात म्हणून?
सामान्य माणूस जरी कौटुंबिक कुळाचार पाळत असला तरी बोलतांना 'आमच्या जातीत अमुक चालतं' असंच म्हणतो. प्रसाद हतोळकरांनी मूळ प्रश्न याच अर्थी विचारलेला आहे. तेव्हा जात हा अतिशय संदिग्ध शब्द आहे. याच्या आधारे केलेली जातीयवादाची व्याख्या फसवी असू शकते. आ.न., -गा.पै.