Skip to main content

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

लेखक बार्नी यांनी रविवार, 20/11/2016 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत . २) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते . सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?

वाचने 51392
प्रतिक्रिया 254

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

साहेबांचा आजपर्यंतचा विश्वासघाताचा इतिहास बघूनच त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पार्टी विद डिफरेन्स च्या देशभक्त आणि चरित्रसंपन्न आमदार पुत्राचे कारनामे...ते पण गृहमंत्राच्या घरा शेजारी... http://www.loksatta.com/nagpur-news/bjp-mla-son-bang-bang-in-nagpur-bar… तरी पण असल्या जुमला पार्टीवर लोक कसे विश्वास ठेवतात देव जाणे??

In reply to by विशुमित

उदयन भोसले (शरद आप्पा लेवे), पद्मसिंह पाटिल (पवनराजे निंबाळकर), आव्हाड (बांधकाम व्यावसायिक परमार) इ. नग ज्या पक्षात होते त्या पक्षाला सुद्धा एकेकाळी थोडीफार मते मिळत होती. मग भाजपला का नाही मिळणार?

In reply to by श्रीगुरुजी

चला बरं झालं माझा मुद्दा पटला म्हणायचा. सगळी कडे आनंदी आनंदच आहे. खाली अंधार देखील.

In reply to by विशुमित

मग भाजपला का नाही मिळणार?
हे वाक्य समजलेले दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ओह आता समजलं. म्हणजे पुढच्या टर्मला ते आमदार, पुत्र कारनाम्यामुळे पक्षातून आऊट. आऊट तर करावंच लागेल मते पाहिजेत ना..!!

In reply to by विशुमित

सातारा म्हटले की उदयनराजे आठवतात ते तर साहेबांबरोबर आख्ख्या राष्ट्रावादीला फाट्ञावर मारतात. असो. असोच :)

In reply to by मृत्युन्जय

(दिसत तसं नसतं, आणि म्हणून फसणाऱ्यांच्या प्रतिसादाला आम्ही पुन्हा एकदा वाढे फाट्यावर मारतो..असो...)

In reply to by मृत्युन्जय

इथे तर खुद्द मोदींना च फाट्यावर मारलं- http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-mah… (टीप: पंतप्रधानासाठी राजेंनी वापरलेल्या भाषेविषयी माझा आक्षेप आहे)

In reply to by विशुमित

इथे तर खुद्द मोदींना च फाट्यावर मारलं-
त्यांच्या बरळण्याला विचारतंय कोण? नेहमीपेक्षा जास्त झाली असेल म्हणून असे बरळले असणार. मागे एकदा काढलेल्या "पक्ष गेला खड्ड्यात" या उद्गारांची आठवण झाली.

In reply to by विशुमित

हो हो आहे ना यादी. १. साधी रहाणी उच्चं विचारसरणी. २. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले. ३. पाठीत खंजीर नं खुपसणारा. ४. सद्र्क्षणाय खलनिग्रहणाय वाला. ह्या सगळ्या गोष्टींशी एका विशिष्ट पक्षाचा संबंध कधीही नं आल्याने ह्या गोष्टी कदाचित नवख्या वाटणं सहाजिक आहे. समजुन घ्यायच्या असतील सोदाहरण तर बोला.

काय फालतूपणा आहे . कोणीतरी ब्राम्हण आहेतच पुढे असं बोले ..लोल.. हजारो क्षेत्र आहेत हो सगळ्यांना संधी आहे . काय मिळणार असा विचार करून .

In reply to by वरुण मोहिते

वरुणजी, प्राजु ही मिपाची जुनी सदस्या आहे व करमणूक क्षेत्रात काम करते. तिने प्रतिसाद उपरोधानं दिलाय.

In reply to by रेवती

माहित आहेत प्राजु ताई . माझा रोख दुसर्यांकडे पण होता . त्यामुळे बोलो .

सगळीकडेच ब्राम्हण सलतात हे बघून मौज वाटते ब्वा!जातीविषयक चष्मा घातल्याशिवाय हे जाणवणं अशक्य आहे :) जात हा नेहमीच जातीविषयक चर्चा करणाऱ्याच्या मनातला किडा असतो!तो नाही जात!! आरक्षण असलेले चित्रपट बनावेत ही शुभेच्छा आणि हाॅलिवुडवर मोर्चा नेण्यास समर्थन ;)

धागा अप्रकाशित करता येईल काय? डोक्यात गेलेला आहे पूर्णपणे.

In reply to by बोका-ए-आझम

१००% जातीयवादी धागा सं मं ताबडतोब हा धागा उडवला पाहिजे असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?

In reply to by बोका-ए-आझम

सहमत! लेखाला तथ्यांचा आधार नाहीयेच पण चर्चा जातीयवादाकडे जाण्याची शक्यता.

तुमचा तर्क लावला तर बाकीच्या लोकांनी मतदान नाही केल पाहिजे कारण राजकारणात एका जातीचे लोक बहुसंख्येने आहेत.

चित्रपटात पडद्यामागचंसुद्धा एक मोठं जग असतं. कॅमेरामन, मेक अप आर्टिस्ट, साउन्ड रेकॉर्डिस्ट, एडिटर्स, असिस्टन्ट्स, प्ले बॅक सिंगर्स, संगीत दिग्दर्शक.. अनेक. यामध्ये अनेक बिगर ब्राह्मण असावेत. शिवाय बिगर ब्राह्मण अभिनेते अभिनेत्र्यासुद्धा सुरुवातीला होत्याच. शांता हुबळीकर, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर, हंसा वाडकर, रत्नमाला, बेबी शकुंतला, वी. शांताराम, मा. विनायक, दादासाहेब तोरणे, सीमा(?), लीला चिटणीस, सुलोचना, अरुण सरनाईक(?) मा. विवेक, सुमती गुप्ते, स्नेहप्रभा प्रधान, वगैरे पुष्कळ आहेत. इन फॅक्ट मराठी चित्रसृष्टीचा पाया भक्कम करण्यात ब्राह्मणेतरच आघाडीवर होते असे म्हणता येईल.

In reply to by राही

सहमत आता सुद्धा अनेक आघाडीचे अभिनेते ब्राह्मण नाहीत. अभिनेत्र्यांत मात्र ब्राह्मण जास्त दिसतात पण त्याचे कारण शिक्षणाचे अधिक प्रमाण हे असावे. इतर समाजात ग्लॅमर इंडस्ट्रीबद्दल जे गैरसमज होते त्यामुळे तिथून जास्त प्रमाणात कलाकार आले नाहीत.

एक गाणं डेडिकेट करतो.. पन्नास होतील त्या निमित्त..

तैनु काला चष्मा जंचदा वे जंचदा वे गोरे मुखडे पें!


In reply to by संदीप डांगे

प्यार तुम्हें किस मोड पे ले आ.......या के दिल करे हाए हाए कोई ये बताए क्या होगा....... ग आला.

In reply to by आदूबाळ

गुमनाम है कोइ, बदनाम है कोइ किसको खबर कौन है वो अंजान है कोइ। इ इ इ इ!!!!

In reply to by आदूबाळ

गैरोंपे सितम अपनो पें करम ऐ घाण्या बैला ये जुल्म न कर ये जुल्म न कर! र आला..

In reply to by संदीप डांगे

नाम मेरा , राजा नाम मेरा अरे जो ना भूल करे ये हाथ जहां पडे मेरा वो काम झटापट चले पतली आ जाडी फिर भि या आडी सबको सिधा करे अरे जो ना भूल करे राजा नाम मेरा

In reply to by संदीप डांगे

संदीप अण्णा, आता 'गोरे', 'काळे' वरून अजून महाभारत नको...! नाहीतर परत वर्णभेद वरून धागे येतील... :P (ना गोरा ना काळा) -पाटीलभाऊ

एकदम बरोबर आहे.. काही बघायला जावं तर गोखले, कुलकर्णी, लागु, दामले, प्रभावळकर.. काही नाही हो.. आडनाव पाहुन एकमेकांना इंडस्ट्रीत ओढुन घेतात. आणि बघणारे सुद्धा आडनाव पाहुनच बघतात. टॅलेंट बिलेंट काही नाही.. त्यांनाच वर्षानुवर्ष डोक्यावर बसवुन ठेवतात, गर्दी काय करतात त्यांच काम पहायला.. सगळा ब्राह्मणी कावा आहे. बरोबर आहे तुमच्या मित्राचं.

अफ्रिकेच्या विकास धारणांना बदलण्यासाठी तरी एकवेळ निसर्गचक्रा संदर्भातली भुमिका स्पष्ट करतांनाच आर्थिक मागासलेपणा ही काय मक्तेदारी बनुन राहु नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतांना दोन वेळ च्या मॉल फिरण्याची सोय झाली म्हणजे आजपर्यंतचा विदा हा केवळ आसमंतातली चांदणी जणु !!!!!!!

एरवी सेक्युलॅरिजम ह्या शब्दाला सर्वाधिक तोडणारे त्याची यथेच्छ टिंगल करणाऱ्या समाजाचेच लोक्स 'मराठी चंदेरी दुनियेत आमच्या समाजाची मक्तेदारी नसून ते क्षेत्र सेक्युलर असल्याचे' आरडताना पाहून मजा आली.

In reply to by फेदरवेट साहेब

सेक्युलॅरिझमचा जो सोयीस्कर अर्थ काढला जातो त्यावर टीका केली जाते.रच्याकने इथे तर सेक्युलॅरिझमचा संबंधच नाही. हा वाद जातींवरुन आहे. बघा झेपतंय का.

In reply to by बोका-ए-आझम

दोन गटांतर्गत समभाव ही अगदी मूलभूत संकल्पना नाही का सेक्युलॅरिजमची? त्यात समभाव हा फक्त दोन धार्मिक गटातच असायला हवा का? पाश्चात्य राज्यशास्त्र जात ह्या विषयाला अनुसरून सेक्युलॅरिजमची परिभाषा कधीच करू शकणार नाहीये म्हणून का जात्यांतर्गत समभावाला सेक्युलॅरिजम म्हणायचे नाही का? (बहुदा नाहीच झेपणार तरीही)

In reply to by फेदरवेट साहेब

ती उपरी संकल्पना आहे म्हणूनच या देशात ती लोक स्वीकारत नाहीत. राज्यघटनेत ती नंतर घुसवण्यात आली.

माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे
अॉ.... अच जाल तल!

ज्यांच्यात कर्तृत्व नाही तेच लोक दुसर्‍याची जात काढतात.

In reply to by तिमा

अगदी योग्य विधान.७०च्या दशकापर्यत समाजात दुसरयाचा धर्म,जात कधीही उघडपणे विचारला जात नसे व त्यावर चर्चाही होत नसे.एवढेच काय, सध्या 'भैय्या'म्हणून हिणवल्या जाणार्या उत्तर प्रदेशच्या लोकांनाही कधी 'आपण मराठी का शिकत नाही ,मराठीत का बोलत नाही?' असे बावळट प्रश्न विचारले जात नसत(जे सध्या तुमच्या त्या 'कोरा' ह्या सायटीवर विचारले जातात असे हे म्हणतात) असो. 'पिंजरा' पाहताना निळू फुलेण्ची जात कोणती हा प्रश्न मनात आला नाही.'जैत रे जैत' पाहताना स्मिता पाटील मराठा की आणी कोणी ह्याचीही चर्चा तेव्हा झाली नाही. सध्याचे वातावरण पाहता देशात सामाजिक अधोगतीच झाली आहे असे म्हणावे लागेल.

थोडंसं सहमत ..आताच 1 चित्रपट पहिला तर सगळेच्या सगळे कलाकार तेच होते ..असं का असेल बरं हा विचार केला आणि मग लक्षात आलं अरे हे तर फक्त याच क्षेत्रात होत नाहीये . खाजगी कंपन्यांमध्ये पण काही लोक असा विचार करतात आणि फक्त आडनावावरून सिलेक्शन केलं जात. ( हा मला आलेला अनुभव ) बाकी सगळीच बोटे सारखी नसतात. त्यामुळे सगळेच लोक असा विचार करत असतील हे म्हणणे पण चूक आहे. बाय द वे बऱ्यापैकी डायरेक्टर इतर समाजातील हे पाहून आनंद होतो.

In reply to by amit१२३

काय आहे माहिती आहे का अमितभाऊ, नेम्म्मका हाच स्वभावदोष आहे ना मराठी माणसाचा, थोडं पुढे जाऊन भारतीयांचा, त्याहून पुढे जाऊन एकंदर माणसाचा, त्याचा फायदा वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या प्रकारे घेतात. इंग्रजांनी घेतला, आता राजकारणी व इतर भाषिक जे आपल्यापेक्षा तुलनेने कमी भेदभाव करतात आपापसात, ते घेतायत. एक म्हणजे आपण आपली जात वगळता इतर कुण्या जातीचं कुणी सरस काही केलं की एक तर हेटाळणी करावी किंवा खुसपटं काढावीत, आणि उलट झालं तर मग आमचं भलं झालेलं बघवत नाही वगैरे कल्ला करावा, या दोनपैकी एक गोष्ट ९०% मराठीजन करतात. एक करतो तर मग दुसरा का नाही... या लॉजिकने कुणीच थांबत, थांबवत नाही. शिक्षणाने माणसाला बाकी काही दिलं तरी त्याचं विशेष नाही, पण किमान व्यापक विचार करायची, बाकी कुणी करत नसेल त री ही करायची व इतरांना करायला लावायची बुद्धी दिली तरी पुष्कळ आहे. कुठल्या गोष्टीत आपण अजूनही अडकू पाहतोय आणि त्याने खरंच आपली वृद्धी होणार आहे का? सारासार विचार करावा. लोणी कुणी दुसराच खाऊन जातोय इतकं तरी ओळखावं, प्रत्येकानेच. जात की बात नही; बात की जात समझो

In reply to by amit१२३

आताच 1 चित्रपट पहिला तर सगळेच्या सगळे कलाकार तेच होते .
असं मोघम विधान नका करू, चित्रपटाचं नाव सांगा >>>

ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे असे लोक अनेक शिखरे पादाक्रांत करतात ,भारतीय लोक अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ झालेले आहेत (सत्या नाडेला, सुंदर पिचाई) ज्यांना काही जमत नाही ते समजतात की ज्यांना ते मिळालंय ते कर्तृत्वामुळे नाहीतर इतर विशिष्ट कारणाने मिळालंय. बाकी जातीमुळे, संस्काराने -वारशाने काही गोष्टी मिळू शकतात असे जरी मानले तरी प्रयत्नपूर्वक इतर लोक ते कमवू शकतात. उदा : ब्राह्मण कलाकारांना स्पष्ट शब्दोच्चार, खणखणीत आवाज यावर कदाचित कमी मेहनत करावी लागत असेल (असा माझा समज) कारण संस्कारातून आलेली स्पष्ट शब्दोच्चाराची सवय . पण म्हणजे इतरांना हे जमणारच नाही असे नाही. कदाचित थोडी जास्त मेहनत करावी लागत असेल इतकेच.

कलेच्या प्रांतात जात, घराणेशाही, आरक्षण नसते ओ चालत... तिथं नाणं खणखणीतच असावं लागतं. जर ते नाणं खणखणीत नसेल तर मग त्याचा "रात्रीस खेळ" होतो...

In reply to by वटवट

कला म्हणजे विज्ञान वा अभियाण्त्रिकी नव्हे हो वटवट्या.हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही असे ते लोकही म्हणणार नाहीत? जॅकी श्रॉफचा तो मुलगा,शक्ती कपूरची कन्या श्रद्धा,राकट्,दांडगट अर्जुन कपूर ही नाणी खणखणीत आहेत? ही मंडळी सामान्य मध्यम्वर्गीय असती तर ह्यांना चित्रपट मिळाले असते? श्रद्धा कपूर श्रद्धा घाटपांडे असती तर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बापाच्या नावावर फारतर पहिला चित्रपट/नाटक/संधी मिळत असेल. नंतर तर त्या कलाकाराला स्वतःला सिद्ध करावं लागतं. अमिताभला बघायला जाणारे अभिषेकला बघायला गेले नाहीत.

In reply to by बोका-ए-आझम

त्याचा अभिनय जेम्तेमच आहे हे केव्हाच कळले होते पण तरीही जवळपास १६ वर्षे टिकून आहे ना तो? दुसरा कोणी असता तर केव्हाच 'रेफ्युजी'झाला असता रेबोक्या.अजूनही यशराज फिलम्स सारखे मोठे बॅनर्स,मणिरत्नमकडे काम करायला मिळणे..मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करायची संधी मिळणे..हे कशामुळे? वडिल अमिताभ बच्चन व पत्नी ऐश्वर्या आहे म्हणूनच ना? असो. धागा भरकटवत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आ. माईसाहेब, जी काही उदाहरणे आपण दिलीत... ते अभिनेते आहेत?? आयला? सिनेमे मिळणे वेगळे आणि गाजणे वेगळे ओ... त्या अर्थाने म्हणत होतो मी... रसिकाला जातीशी, घराण्याशी देणेघेणे असते ते फक्त टेस्टिंग फेज मधेच... नन्तर रसिकाला जर नाणे खणखणीत वाटले नाही तर तो ते फेकून देतो...

In reply to by प्रकाश घाटपांडे

मिपावर ठरावीक (विशीष्ठ) वर्गाची मक्तेदारी आहे काय ? कौलेच कौले चोहिकडे गेली चर्चा कुणीकडे या सदाबहार संघटनेच्या "वाय्फळांचा मळा" या अनियतकालीकातून साभार.

विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून मराठी सिनेमा पाहत नाही असा म्हणणारा तुमचा मित्र.. शिक्षण सौंस्थेथ विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून शिक्षण सोडून दिले का? चप्पल बनवण्याच्या धंदयांत विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून चप्पल वापरणं सोडून दिले का? केस कर्तनालया मध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून केस स्वतः कापतो का? कपडे शिवण्या मध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून कपडे वापरणे बंद केले का?

मिपावर गटारसुद्धा असले पाहिजे याची दक्षता घेणार्यांना अधिकृत पाठिंबा असावा अशी शंका घेण्यास बराच वाव आहे

हे असले YZ धागे कायला टाकतात लोक .. सगळी कडे जात काढत बसतात साले . ज्याला काम करायला जमतं त्याला ते मिळतं .. तुम्हाला जमत नसेल तर फालतू गोष्टी बोलत बसू नये .

विकिपीडियावर मराठी सिनेमात कार्यरत व्यक्तींची दखल पुर्णांशाने दखल घेतली गेली अहे का माहित नाही पण चर्चा चालू आहे तर किमानपक्षी किमान स्वरुपाचा डाटा हवा म्हणून इंग्रजी विकिपीडियावरील खालील दुवे देत आहे. * https://en.wikipedia.org/wiki/Category:Marathi_film_producers * https://en.wikipedia.org/wiki/Category:Marathi_film_directors * https://en.wikipedia.org/wiki/Category:Male_actors_in_Marathi_cinema * https://en.wikipedia.org/wiki/Category:Actresses_in_Marathi_cinema

मी नेपोटीझम बद्दल चर्चा धागा काढून दोन दिवस झाले एक अपवादात्मक प्रतिसादा शिवाय कुणि फिरकले नाही, ह्या धाग्यावर जातीवार विभागणीचा प्रयत्न झाला की सगळे धावत आले. असो. क्रोनीझम (मराठीत काय म्हणावे ?) नेपोटीझम (घराणेशाही) ह्या भारतीय समाज जिवनातील गृहीत गोष्टी आहेत त्यात कुणाला फारसे वैषम्य वाटत नाही त्याच प्रमाणे जात हाही भारतातील अविभाज्य घटक आदर्श नसला हत्ती गेला (लांब) शेपुट आहे या न्यायाने शिल्लक आहे. जात धर्म क्रोनीझम घराणेशाही पलिकडच्या लोकांना संधी मिळतच नाहीत असे नसावे, शहारुख खान टिव्ही मालिकेतून पुढे आला, कलावंत एकदा जनतेनी डोक्यावर घेतला की त्याला कुणिही थांबवू शकत नाही. टिव्ही सारख्या माध्यमांनी एंटरटेनमेंट मिडीया बर्‍यापैकी समानसंधी स्वरुपाचा बनवला आहे गाणे, विनोद, आयकॉन शोध अशा अनेक विषयांवर खुल्या मंचातून नवागतांना जात-पात-धर्म न पहाता संधी मिळताना दिसतात, मला वाटते बरेच चित्रपट कलावंत अभिनय बद्दल क्लासेस वगैरे घेतात फिल्म अँड टेलव्हीजन इन्स्टीट्यूट सारख्या संस्थाही विद्यार्थ्यांना जात धर्म पाहून प्रशिक्षण देत नसाव्यात. एखाद्या विशीष्ट वर्गातून एखाद्या क्षेत्रात अधिक लोक असणे संभवीनीय असू शकते कोणत्याही क्षेत्रात प्रगती होण्यासाठी समावेश न झालेले समाजघटक सोबत आलेले केव्हाही चांगलेच आणि असे घटक सामावून घेण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलणे कदाचित उपयूक्त असू शकते का यावर विचार व्हावयास हरकत नसावी. असो

In reply to by सूड

शु: शु:!!! भावना दुखावतील असे बोलु नये हो सुड!!! नाक घासुन माफी माग बरे बार्नीसरांच्या "मित्राची". माझ्यासाठी दोन चमचे चरणतीर्थही आण हो.

In reply to by सूड

सूड, एकदम समर्पक प्रश्न आहे! काम काही नाही. फुकट बसून पगार घेणार. अशांना सह्याजीराव म्हणंत असंत. आ.न., -गा.पै.

In reply to by सूड

सरकारी ब्राम्हण म्हणून हिनवणारे आणि एकाच वर्गात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे का, असे म्हणनारे या सर्वांबद्दल त्यांचं सेम मत असावं असं वाटतं. -दिलीप बिरुटे

बरं मग... काय उपाय करायचा म्हणताय? एक लै भारी काम करता येईल.....मराठी चित्रपटात काम करणाऱ्यांचे फक्त पहिले नाव (First Name ) प्रसिद्ध करायचे म्हणजे लोकांना (आड)नावावरून होणारे मानसिक क्लेश कमी होतील... बाकी जो तो ज्याच्या त्याच्या गुणवत्तेने पुढे जाताच राहील त्याला जातीचा त्रास होणार नाही...