Skip to main content

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

लेखक बार्नी यांनी रविवार, 20/11/2016 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत . २) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते . सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?

वाचने 51250
प्रतिक्रिया 254

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

अवांतर: मी जरी मुक मोर्चा समर्थक असलो तरी हे समर्थन फक्त एका लोकसंख्येने मोठ्या समूहाला शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आहे.
सर्व सत्तास्थाने, सहकार क्षेत्र, पोलिस खाते, शेती इ. क्षेत्रे अनेक शतके या समूहाच्याच हातात असताना त्यांना जातीवर आधारीत राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय नाही.
हेतू थोडा स्वार्थी असला तरी इतर ज्यांना आरक्षण नाही ते यातून निभावून पुढे जातील हा विश्वास आहे. त्यामुळे सकल समाजाचे कल्याण होईल.
ते कसे निभावून जातील? त्यांचे कसे कल्याण होईल? १०० पानांच्या पंगतीतील ५२ पानांवर बसायला यांना परवानगी नाही. उरलेल्या ४८ पानांवर सर्व जातीजमातींचे लोक बसू शकतात. आता या ४८ पानातील २१ पाने काढून एका प्रस्थापित समाजासाठी राखीव ठेवल्यावर उर्वरीत २७ पानांमधून यांचे कसे कल्याण होईल?
आरक्षणातून मराठा समाजाचा किती फायदा होईल, हे अगदी नोटबंदी मुळे किती फायदा होईल या सारखे आहे, असे मला वाटते.
नोटबंदीचे फायदे व तोटे सर्वांसाठीच समान आहेत. राखीव जागातून फक्त मराठ्यांचाच फायदा होईल. इतरांचा, विशेषतः ज्यांना कोठेच राखीव जागा नाहीत, त्यांचा तोटा होणार हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

सर्व सत्तास्थाने, सहकार क्षेत्र, पोलिस खाते, शेती इ. क्षेत्रे अनेक शतके या समूहाच्याच हातात असताना त्यांना जातीवर आधारीत राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय नाही.>>>> -पोलिस खाते?? अनेक शतके??? ते कसे निभावून जातील? त्यांचे कसे कल्याण होईल? १०० पानांच्या पंगतीतील ५२ पानांवर बसायला यांना परवानगी नाही. उरलेल्या ४८ पानांवर सर्व जातीजमातींचे लोक बसू शकतात. आता या ४८ पानातील २१ पाने काढून एका प्रस्थापित समाजासाठी राखीव ठेवल्यावर उर्वरीत २७ पानांमधून यांचे कसे कल्याण होईल?>>> -- मराठ्यांना जर आरक्षण मिळालंच तर फक्त ब्राह्मण समाज आरक्षणावाचून राहील आणि हे तुमचेच विधान आहे या समाजाविषयी- http://www.misalpav.com/comment/887772#comment-887772 नोटबंदीचे फायदे व तोटे सर्वांसाठीच समान आहेत. राखीव जागातून फक्त मराठ्यांचाच फायदा होईल. इतरांचा, विशेषतः ज्यांना कोठेच राखीव जागा नाहीत, त्यांचा तोटा होणार हे नक्की. -- मी फक्त मराठा आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होईल का नाही या बद्दल बोलत होतो.

In reply to by विशुमित

-पोलिस खाते?? अनेक शतके???
ब्रिटिशांच्या आगमनापासून पोलिस खाते आहेच (किमान १५०+ वर्षे). त्यापूर्वी राजेराजवाड्यांच्या काळात तत्कालीन पोलिस म्हणजे सैन्य ज्यात मराठेच बहुसंख्येने होते.
-- मराठ्यांना जर आरक्षण मिळालंच तर फक्त ब्राह्मण समाज आरक्षणावाचून राहील आणि हे तुमचेच विधान आहे या समाजाविषयी-
बरोबर ना. त्यांना ज्या थोड्याश्या संधी उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा घाला घालण्याची तयारी सुरू आहे आणि त्यातून त्यांचे कसे कल्याण होईल हाच माझा प्रश्न आहे.
-- मी फक्त मराठा आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होईल का नाही या बद्दल बोलत होतो.
मराठ्यांना राखीव जागा दिल्यावर "सकल समाजाचे" कल्याण होईल असा तुमचा दावा होता.

In reply to by श्रीगुरुजी

ब्रिटिशांच्या आगमनापासून पोलिस खाते आहेच (किमान १५०+ वर्षे). त्यापूर्वी राजेराजवाड्यांच्या काळात तत्कालीन पोलिस म्हणजे सैन्य ज्यात मराठेच बहुसंख्येने होते.>>> -- हवेत तिर मारताय असे वाटते. विदा असेल तर द्या. बरोबर ना. त्यांना ज्या थोड्याश्या संधी उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा घाला घालण्याची तयारी सुरू आहे आणि त्यातून त्यांचे कसे कल्याण होईल हाच माझा प्रश्न आहे.>>> -- त्यातून ही ब्राह्मण समाज फिनिक्स पक्ष्या प्रमाणे झेप घेईल हा विश्वास. मराठ्यांना राखीव जागा दिल्यावर "सकल समाजाचे" कल्याण होईल असा तुमचा दावा होता.>>> --कृपया "सकल मराठा सामाज्याचे" असे वाचावे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अशा लोकांशी मुद्देसूद चर्चा होवू शकत नाही. ते पढवलेल्या विचारसरणीनुसार विचार करतात आणि आपल्या खांद्यावर डोके नावाचा अवयव देवाने दिला आहे हे नेमक्या क्षणी विसरतात. (प्रतिसादातील भावना मला हवी तशी पोहोचेल की नाही असे वाटले होते. समजुन घेतल्याबद्दल धन्यवाद.)

In reply to by मोदक

बरोबर अन काही लोक देवाने खांद्यावरच्या अवयवाला ठराविक वजन दिले आहे हे विसरून सगळा ताण त्या एका मुंडक्याला अन मगजालाच देतात नाही का मोदकभाऊ. बाकी वैयक्तिक आयुष्यात 'हातोळकर ह्म्म्म' पेक्षा 'कंबळेंच्या पोरासोबत हिंडतो का तुमचा मुलगा हंम्मममम्म' हे वडलांना ऐकवलेलेच जास्त ऐकले आहे. मुद्दा काय व्यक्ती तितक्या प्रकृती! जातीवाद वाईटच, प्रॉब्लेम हा आहे की जात सोडली तर आपले कसे होईल ह्या भीतीतून तथाकथित मुंडके वापरणारे अन तथाकथित मुंडके न वापरणारे सगळेच पिढ्यांपिढ्या तोच गु चिवडत बसतात!असो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्रॉब्लेम हा आहे की जात सोडली तर आपले कसे होईल ह्या भीतीतून मला वाटते भितीपेक्षाही "पर्याय नाही म्हणून" लोकं जातीला जास्त चिकटून बसतात. अर्थात गावांत सरंजामशाही व्यवस्था असेल तर भिती शिवाय कोणताही पर्यायच राहणार नाही पण जर जातीव्यवस्थेला सक्षम पर्याय मिळाला तर पहिल्या फटक्यात ३०% ते ४०% लोकं तो पर्याय निवडतील.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गम्मतच आहे कि राव! इथे होणारी चर्चा " कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये." या वाक्यावर झालीये! कोण कोणाला कसे बोलतंय बघा जरा! पट्टी काढलीत डोळ्यावरून तर दिसू शकेल कदाचित, यात मुद्देसूद चर्चा करण्याचा कुठला मुद्दा दिसतोय?? मोदक यांनी वरच्या प्रतिसादात जे केलं ते व्हिक्टीमयझेशन चे उत्तम उदाहरण आहे! इथे कुठेही काहीही उल्लेख नसताना स्वतःच गांधीहत्येच्या मुद्दा काढायचा, स्वतःच सहानुभूती घ्यायची वा रे वा!! आणि परत तुम्ही त्यालाच सहमती दर्शवून बोलणार कि "खरंच लॉजिक कळत नाही" या सगळ्या गोष्टीच तरी काही लॉजिक लागतंय का तुम्हाला? हीच गोष्ट एका मुस्लिम व्यक्तीने केली तर तो मात्र टीकेस पात्र होतो.. काय बोलणार...

In reply to by शब्दबम्बाळ

हतोळकरांवर आरोप करून मी सहानुभूती कशी घेतली ते सांगा जरा. त्यांना उदाहरण देताना फक्त सध्या जे काही चालले आहे त्या पद्धतीने उदाहरण दिले बस्स.

In reply to by मोदक

अहो सहानुभूती "तुम्ही" घेतली असे नाही! चर्चेत रेफरन्स नसताना स्वतःच व्हिक्टीमयझेशन करायचे आणि स्वतःच सहानुभूती 'निर्माण' करून द्यायची. असे काहीसे म्हणायचे आहे. नक्की कसे लिहू कळेना पण कदाचित आता समजले असेल तुम्हाला..

In reply to by शब्दबम्बाळ

रेफरन्स नसताना स्वतःच व्हिक्टीमयझेशन करायचे आणि स्वतःच सहानुभूती 'निर्माण' करून द्यायची असे काहीसे म्हणायचे आहे. नक्की कसे लिहू कळेना मुक मोर्चा सारखे..?

In reply to by शब्दबम्बाळ

णि परत तुम्ही त्यालाच सहमती दर्शवून बोलणार कि "खरंच लॉजिक कळत नाही" या सगळ्या गोष्टीच तरी काही लॉजिक लागतंय का तुम्हाला?
माझा वरचा प्रतिसाद वाचावा.
यात मुद्देसूद चर्चा करण्याचा कुठला मुद्दा दिसतोय??
सगळे प्रतिसाद सरमिसळ करून हा निष्कर्ष नको. मी प्रत्येकाने आपापली संस्कृती/परंपरा म्हणून जात जोपासली तर का आक्षेप असावा असा मुद्दा मांडलाय. यात काही गृहीतके स्पष्ट नाहीयेत म्हणून सांगतो - १. मी जातीयवादाच्या (ऑक्सफोर्डवरील नं. २) पूर्णपणे विरोधात आहे आणि मी स्वतःही तो भेद मानत नाही. २. मी जात हि माझ्यासारख्याच चालीरीती/प्रथा/परंपरा/संस्कृती/पद्धती लोकांचा गट एवढ्याच आणि एवढ्याचकरीता मानतो. ३. याव्यतिरिक्त मी जात हि आरक्षण/लग्न/शाळा/व्यवसाय/मदत करताना यापैकीही कुठेही वापरण्याच्या विरोधात आहे. यात गैर काय ते सांगावे!

In reply to by प्राजु

कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये.
दाताखाली काचकन खडा यावा तसं वाटलं प्राजुतैचा प्रतिसाद वाचताना.

काय रे हे बार्न्या? पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत बहुताण्शी नायक पंजाबी हिंदू वा पंजाबी मुस्लिम का असतात असा ह्यांना प्रश्न पडायचा.नायकांमध्ये एकही कर्हाडे वा देशस्थ ब्राम्हण का नाही असेही हे विचारायचे. हिंदी चित्रपटांमध्येही कथानकांत शर्मा,मल्होत्रा,भाटियाच का? वेलणकर्,पाटील्,राणे का नाही असे वाटायचे. काहीना हा पंजाबी लोकांनी केलेला कट वाटायचा तर काहींना हा मुस्लिमांनी हिंदूंविरुद्ध केलेला कट(कारण बहुसंख्य लोक लाहोर व तिकडचे) वाटायचा.

१. मराठी चित्रपट सृष्टीला ब्राह्मणांनी वेठीस धरले आहे, मक्तेदारी आहे असे म्हणणे विपर्यास व अनावश्यक भलतीकडे ताणणे आहे. २. कोणतीही इन्डस्ट्री ही तिच्या ग्राहकांवर अवलंबून असते. जैसा देस वैसा भेस... पूर्वी पासून म्हणजे नाटकं फॉर्मात असल्याच्या काळापासून प्रेक्षक कोणत्या वर्गाचे जास्त होते, गरिब असले तरी घरी पुस्तकं विकत आणून वाचणारी, अनेक गोष्टींचे व्यासंग करणारी माणसं कोणत्या वर्गाची जास्त होती हे पाहिले पाहिजे. प्रेक्षक ज्या वर्गाचे जास्त त्या वर्गाला आवडेल असेच सादरिकरण होणार. मराठी इन्डस्ट्री पैसा कमावण्यात मागे राहण्याचे कारण मर्यादित प्रेक्षक वर्ग होता. रवी जाधव यांच्या चित्रपटांपासून हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. टाइमपास, बालकपालक हे रुढार्थाने ब्राह्मण कॅरेक्टर दाखवणारे चित्रपट असले तरी त्यातल्या भावना-समस्या-प्रसंग युनिवर्सल होते, दुनियादारी सारखे चित्रपट, त्यांची हाताळणी मास ला अपील होणारी होती, सैराटने जे जग दाखवले ते पुस्तकी ग्रामीण जगापेक्षा वेगळे व सत्याचे स्पष्ट दर्शन होते, इथे हॉलिवुडी चित्रपटांच उदाहरण देतो. साधारणपणे, (सरसकट नाही) 'जगात अमेरिकनच कसे भारी, हुशार, जिनियस, मॅनकाइन्ड ला वाचवणारे' हे दाखवतात, कारण प्रेक्षक ९९ टक्के अमेरिकन आहेत. अमेरिकन लोकसंख्येत ७७% व्हाईट आहेत त्यामुळे अमेरिकन चित्रपटांमधे त्यांच्या अस्मिता अहंकार, रुतून बसलेले श्रेष्ठतेचे संस्कार कुरवाळणे जास्त होते हे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे. (12 Years a Slave ह्या चित्रपटात व्हाईट व्यक्तिरेखा मेन प्रोटगनिस्टची मदत करतांना दाखवून व्हाईट गिल्ट घालवण्याचा केलेला प्रयत्न) मग हॉलिवुड हे ऑफ द व्हाईट, बाय द व्हाईट, फॉर द व्हाईट. असेच आहे असे म्हटले जाते का? नाही. पापी पेटका सवाल है. धंद्यापुढे कुठल्याही अस्मिता, जातीपाती, धर्म, देश नसतात. धंद्याचा एकच धर्म, ग्राहक. ब्राह्मण जास्त दिसत असले तरी त्यामागे योग्य अशी नैसर्गिक, सामाजिक कारणे आहेत. कोणी हे जाणून बूजून केले असे म्हणणे व त्यावर विश्वास ठेवणे द्वेषमूलक आहे. भलते सलते गैरसमज बाळगण्यापेक्षा स्वतः हे चित्र बदलण्यास सकारात्मकतेने काय होऊ शकते हे बघावे. आजकाल पूर्वीसारखे कठीण काहीही राहिले नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल ते गाजवायला युट्यूब आहे. ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय असं वाटत असेल त्यांनी रडत राहण्यापेक्षा काम करावे. या उपरही आपल्याला घुसायलाच मिळत नाही असं वाटणार्‍यांनी रॉबर्ट रॉडरिग्ज या येडपटाबद्दल व त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल वाचून प्रेरणा घ्यावी. https://en.wikipedia.org/wiki/Robert_Rodriguez

दादा कोंडकेंनी सांगितलेला किस्सा, ते एकदा त्यांच्या गावी गेले असता चावडीवरील एका वयस्कर व्यक्तीने त्यांना विचारले, तुझे सगळे सिनेमे जोरात चालतात हे ठिक आहे , परंतू इतकी वर्ष मुंबईत जातोस अजून नोकरीपाण्याची सोय होउन स्थिरस्थावर झालास की नाही? सिनेसृष्टीकडे असा दृष्टीकोन बाळगणार्‍या वर्गाकडून काय अपेक्षा बाळगावी?

ओह असा सगळा प्रकार आहे तर. बास ठरलं. एका चित्रपटात अमुक टक्के ओपन, अमुक टक्के ओ.बी.सी. आणि अमुक टक्के एस.सी./एस.टी. भुमिका असायलाचं हव्यात असा कायदा घ्यायचा का पास करुन?

In reply to by संदीप डांगे

नको. तुमच्यासारखे अनुभवी लोकचं ठिक नेतरुत्व करायला. हम किस झाड के गिरे हुए पत्ते की देठ पे बैठी मुंगी?

In reply to by संदीप डांगे

जेंन्ना अन्यावं झाला तेन्नी मोर्चा काडावा. आपण म्हराठी पिच्चरला लैचं वर्षांसुन फाट्यावर मारल्येलं असल्याने आपल्यावर काय अन्याव झाला ते काय कळ्ळबी न्हाय बगा. बाकी आपन ३.५% चं असल्याने अन्यावं झाला तरी गपगुमा सहन क्रायचा अस्तो. नायतर ५५ कोटीचे बळी जात्यात बगा.

या क्षेत्रात काम केलेल्या सगळया लोकांची (फक्त पडद्यावरचे कलाकार नाही) आत्मचरित्र वाचले किंवा मुलाखती पाहिल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांना सुरुवातीच्या काळात करावा लागलेला संघर्ष आणि घरच्यांची भक्कम साथ. संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. मनोरंजन क्षेत्रात अजुनतरी सुदैवाने आरक्षण लागू झालेले नाही. मराठी किंवा इतर भाषिक प्रेक्षक इतक्या कोत्या मनाचा नक्कीच नाही आहे कि तो एका ठराविक जातीधर्माच्या माणसाला उचलुन धरेल. कोणीही इथे येऊन काम करू शकतो. ज्याचे पारडे जड (सर्वच बाबतीत) तोच इथे टिकतो आणि बाकीचे बाहेर फेकले जातात. जे लोक इथे टिकुन आहेत त्यांनी स्वतःला सिध्द केले आहे. या क्षेत्रात ब्राह्मण जास्त आहेत हे सत्य आहे. बाकीचे इथे टिकत नाहीत आणि त्यामुळे फक्त ब्राह्मण उरतात त्यात त्यांचा काय दोष?

१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
चुकीचे निष्कर्ष आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार (लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, भरत जाधव, महेश कोठारे, सिद्धार्थ जाधव, विजय कदम, विजय चव्हाण, संगीतकार अजय-अतुल, पद्मा चव्हाण, रंजना, उषा चव्हाण, उषा नाईक, निळू फुले, दादा कोंडके ... ही यादी फार मोठी आहे) ब्राह्मण नाहीत.
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
ब्राह्मणांना सरकारी नोकरी, पोलिस खाते, राजकारण, शैक्षणिक क्षेत्र, प्रशासन इ. क्षेत्रात राखीव जागांमुळे मर्यादीत संधी आहे. शेतीतून व खेड्यातून बरेचसे ब्राह्मण हद्दपार झाले आहेत. ज्या क्षेत्रात जातीमुळे संधीला मर्यादा नाहीत तिथे ब्राह्मण जायचा प्रयत्न करतात. त्यामुळेच खाजगी कंपन्या, दूरदर्शन मालिका, वृत्तसंस्था इ. क्षेत्रात ब्राह्मण जायचा प्रयत्न करतात. त्यामुळे या क्षेत्रात त्यांची संख्या जास्त दिसत असावी.

ब्राह्मण असतील जास्त(तसा विदा नाही) पण, ब्राह्मण आहेत म्हणून लोक पिक्चर बघायला जात नाहीत, किंवा बहुजन लोक ब्राम्हण आहेत म्हणून जात नाहीत असं आजिबात होत नाही. शिवाय बहुजन समाजातील कलाकारांना संधी नाकारली जाते असं तर खचितच होत नाही. सैराट धुमधडाक्यात चालला आणि त्या स्वप्नील जोशी नावाच्या उकडलेल्या बटाट्याला लोकांनी प्रत्येक पिक्चर पाडून स्मॅश केलंय यावरूनच बघा. भारतीय चित्रपटसृष्टी बाकी काही असो, सेक्युलर आहे. उगाच धर्म, जात बघितली जात नाही इथे.

In reply to by पुंबा

समजा जर चित्रपट क्षेत्रात एखाद्या समाजाचे जास्त लोक आहेत असे मान्य जरी केले तरी लोक ते चित्रपट स्वीकारत आहेत याचा अर्थ लोकांना काहीच प्रॉब्लेम नाहीये! मराठी चित्रपट अधिकाधिक व्यवसाय करत आहे पण त्याचा गाभा "कथानक" आहे. म्हणूनच कदाचित आपल्याकडे "सुपरस्टार" वगैरे पद्धत नाहीये. (मराठी शारुख आहे म्हणा! :P ) च्यामारी हौसेने हॉलिवूड चित्रपट पाहतील, तेव्हा त्यांची जात/धर्म काय हे बघून मग बघायला जातील काय?! आताच्या इंटरनेटच्या युगात मार्केट खुले आहे. जर इच्छा आहे आणि कला पण आहे तर हल्ली शेकड्याने माध्यम उपलब्ध आहेत ती दाखवायला! उगीच काहीतरी विचार करायचा...

In reply to by शब्दबम्बाळ

मराठी शारुख
लोल! ह्यो कोने? परवाच खफवर "मराठी बच्चन परिवार" असल्याची बहुमूल्य माहिती मिळाली. असंच काहीतरी आहे का?

In reply to by आदूबाळ

तोच कि! गरिबांचा टोनी स्टार्क, चॉकलेट हिरो, लव्हर बॉय, म्हागुरुंचा मानसपुत्र आणि नुकत्याच कळालेल्या नावानुसार उकडलेला बटाटा!! वळखा बगु!! बाकी, हे "मराठी बच्चन परिवार" काय असतंय?!!

In reply to by शब्दबम्बाळ

ओह! सोपनील होय. मराठी बच्चन परिवार = डॅमिट, डॅमिटभार्या, डॅमिटसुत* आणि डॅमिटस्नुषा. --- शब्दश्रेयः कप्तान चिमण

In reply to by आदूबाळ

अन मग म्हाग्रु कोण ? मराठीतले पृथ्वीराज कपूर! ??? कधी कधी म्हाग्रु ह्यांचा तोरा असह्य झाला की मी मनात ते तरुण असताना जबलपुरला मामाकडे जाऊन बिडीच्या फॅक्टरीत काम करायला सुरुवात करायच्या अगोदरच आतच त्यांना गब्बर अन कंपनी कसे ठार करून घोड्यावर उलटे निजवते तो सीन आठवून मनातल्या मनात आपल्या असुरी आनंदाची हौस पुरवून घेतो

In reply to by यसवायजी

अरे नशीब समाज प्रिन्स ने मारले जर त्या ठिकाणी कोणी ब्राह्मण पात्र असत तर महाराष्ट्रात दंगली सुद्धा झाल्या असत्या स्वतः काही करायचं नाही आणि येता जाता ब्राह्मणानं झोडपायच हे नित्याचा झालं आहे असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?

In reply to by माझीही शॅम्पेन

खरंय राव.. थैमान झालं असतं.. ब्लेम करायला कोणतरी हवं असतं. मग इतिहासाचा आधार घेतला जातो. असं करताना वर्तमानात पायावर धोंडा पडतोय हे कळत नाही.. :(

बार्नी, मला कलाक्षेत्र काय किंवा क्रिकेट काय दोन्हींतलं फारसं कळंत नाही. पण तुमचा लेख वाचून एक साम्य जाणवलं. क्रिकेट या खेळात दलितांवर घोर अन्याय झला आहे. क्रिकेटमध्ये कोणी हिंदू दलित दिसून येत नाही. हा ब्राह्मणांनी केलेला कट समजायचा का? भारताच्या (=बीसीसीआयच्या) संघात प्रतिनिधित्व मिळालेले मागासवर्गीय बाळू पालवणकर, विनोद कांबळी आणि दोड्डा गणेश इतुकेच आहेत. तर विजय हजारे आणि चंदू बोरडे हे ख्रिश्चन आहेत. तुमचा तर्क लावू जाता क्रिकेट जगताने मागासवर्गीयांवर (दलित + सवर्ण दोन्ही) भरमसाट अन्याय केलेला आहे. आ.न., -गा.पै. अधिक माहितीसाठी वाचा : https://acrazymindseye.wordpress.com/2011/11/23/the-ekalavya-of-indian-…

नायतर काय ! हॉलिवूडवाल्यांनी पण भारतिय लोकांना त्यांच्या जगातल्या संखेपेक्षा फार कमी पिच्चरमधे घेतलंय. आता आपला डोनाल्डदादा निवडून आलाय, त्याला घेऊन हॉलिवूडवर एक मोर्चाच काढूया, नै का ? ;) :) जात नाही ती जात असे म्हणतात ते उगीच नाही ! शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा !!

डिमांड् आणि क्वालीटी सप्लाय हे प्रत्येक क्षेत्राचे बेसिक आहे.ब्राह्मण अभिनय ,नृत्य यात निपुण आहेत हे नाकारता येणार नाही.ब्राह्मणेत्तर शुड प्रुव देअर मेटल. रिंकु राजगुरुने सैराटमध्ये स्वतःला प्रुव केले व नॅशनल ॲवॉर्ड मिळवले,सई ताम्हणकरने एका चित्रपटात किसिंग सीन ,दुसर्या चित्रपटात कपडे उतरुन बिकीनी घातलि तरीही तिला अजूनही नॅशनल ॲवॉर्ड मिळालेले नाही.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सई ताम्हणकर बद्दल सहमत. बाकी रिंकु राजगुरु आणि सैरात= ओव्हररेटेड!!

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

दुसर्या चित्रपटात कपडे उतरुन बिकीनी घातलि तरीही तिला अजूनही नॅशनल ॲवॉर्ड मिळालेले नाही. >>>>>> आत्ता गोव्यात बसलोय त्यावरून डोक्यात व्हिचार आला की बिकिनी घातली म्हणून नॅशनल अवॉर्ड द्यायाचं हा ठराव ठरत असेल तर इकडे एक 400 500 पद्मश्री , 100 200 पद्मभूषण , 13 14 पद्मविभूषण आणि 2 भारत रत्न पाठवून द्या , लागलीच डिस्ट्रिब्युट करून टाकतो , कसें :D

माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले .
हा मित्र संभाजी ब्रिगेड या सामाजिक कार्य व समाजसेवा करणार्‍या संस्थेशी निगडीत असावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.

In reply to by श्रीगुरुजी

राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.>>>>> --- जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली आहे, असे नाही वाटत का? बा द वे देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान चे निकष काय आहेत कळू शकेल का? आणि कोणत्या पक्षाचा त्यावर मालकी हक्क आहे?

In reply to by विशुमित

काही देश भक्तांची लेटेस्ट यादी मिळाली.... http://www.firstpost.com/india/demonetisation-if-this-is-a-moral-crusad… (या लेखाच्या आशयाशी मी पूर्णपणे असहमत आहे, पण या मध्ये पक्षीय गोम सोडणे हे रुचला नाही म्हणून हा प्रतिसाद. या पुढे इग्नोर मारेल पण मुद्दाम खोड काढली तर वाकडेच उत्तरे मिळतील विनाकारण दगड मारणाऱ्यांना)

In reply to by विशुमित

तो भ्रष्ट पक्ष आहे हे मत मांडायला तुमची परवानगी लागणार आहे का यापुढे? पौड, आळे, शिरवळ, शीळ वगैरे महाराष्ट्रात जेवढे फाटे आहेत त्या सगळ्या फाट्यांवर मारण्यात येत आहे. काय करायचं ते करा.
मुद्दाम खोड काढली तर वाकडेच उत्तरे मिळतील विनाकारण दगड मारणाऱ्यांना.
हहपुवा.तुम्हाला कुणी प्रश्न विचारलेलाच नाही तर उत्तर कुणाला देणार?

In reply to by विशुमित

जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली आहे, असे नाही वाटत का?
बाकी काहीही असो, पण ही भाषा लैच आवडलीय बरकां विशुमती !! आता आपल्या मिपा कारकिर्दीला नीट फॉल्लो केलं पाहिजे :)

In reply to by विशुमित

राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.>>>>> --- जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली आहे, असे नाही वाटत का?
नाही बुवा. साहेबांवर टीका केलेली तुम्हाला खपत नाही. आता साहेबांच्या पक्षाची स्तुती केलेली देखील तुम्हाला चालत नाही. साहेबांच्या पक्षाला देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान इ. गुणविशेष लावलेले चालत नसतील तर वरील वाक्य सुधारून खालील प्रमाणे लिहितो.
राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या अत्यंत माजोरड्या, जातीयवादी, ब्राह्मणद्वेषी, महाभ्रष्टाचारी, ढोंगी, गुन्हेगारी, देशद्रोही, अतिरेकी समर्थक पक्षाचा कार्यकर्ता असावा.
आता खुष?
बा द वे देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान चे निकष काय आहेत कळू शकेल का? आणि कोणत्या पक्षाचा त्यावर मालकी हक्क आहे?
चांगल्या गुणांवर कोणाचाही मालकी हक्क नसतो. परंतु वाईट गोष्टींवर तो नक्कीच असतो. देशभक्ती, चारित्र्य, स्वच्छतेचे निकष - अतिरेक्यांची पाठराखण न करणे, फक्त आपल्या जातीचा उदोउदो करून इतर जातींचा द्वेष न करणे, गुन्हेगारांना पक्षात मानाचे स्थान न देणे, जनतेच्या पैशाने स्वतःच्या तुंबड्या न भरणे, माजोरडेपणा न करणे, जातीजातीत भांडणे न लावणे, इतिहास स्वतःला हवा तसा न बदलणे, ज्या क्षेत्रात आपल्याला ओ की ठो कळ्त नाही तिथे घुसुन मुक्काम न ठोकणे इ. इ.

In reply to by श्रीगुरुजी

पवारसाहेब आणि राष्ट्रवादी वरचे विनाकारण, बिनबुडाचे, निरर्थक आणि रडके प्रतिसाद साताराच्या वाढे फाट्यावर मारण्यात येत आहे....!!

In reply to by विशुमित

पवारसाहेब आणि राष्ट्रवादी वरचे विनाकारण, बिनबुडाचे, निरर्थक आणि रडके प्रतिसाद
हे वाचल्यावर साहेब सुद्धा खो खो हसतील! बादवे, नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला काही दिवसांपूर्वी उघड पाठिंबा देणारे साहेब आता नोटा रद्द करण्याच्या विरोधात बोलताहेत. काय कारण असावे? जवळच्या सगळ्या नोटा बदलून झालेल्या दिसतात.

In reply to by विशुमित

साहेबांची लीला अगाध आहे. ते काहीही करू शकतात. ज्यांची पालखी नाचवली, तेच परदेशी असल्याचा साक्षात्कार साहेबांना होतो आणि परत त्यांच्यापुढेच पुन्हा साहेब लोटांगण घालतात.

In reply to by श्रीगुरुजी

सुभाष देशमुखावरून डायरेक्ट ९० दि मध्ये... असो वर्तमानातील उत्तर द्याच टाळायचं म्हंटलं की मागची ६० वर्ष आठवतात. असो क्लीन मास्टर ने क्लीन चिट पण देऊन टाकली..(यात पण साहेबांचा च हात असू शकतो, शंकेला वाव आहे)