मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

चिर्कुट · · काथ्याकूट
यंदा दिवाळीच्या काळात १ आठवड्याच्या सुट्टीवर घरी गेलो होतो. माझे वाढलेले आकारमान पाहुन बरेच टोमणे बसत होते, तरीही फराळ/इतर खाणं हादडणे चालूच होते. :) पण एके दिवशी अचानक लक्षात आलं की माझा मलाच मी उचलत नाहीये.. :( त्यात माझ्या घरी शुगरची हिस्ट्री आहे, त्याची भीती आहेच. मग ठरवलं की आता शेंडी तुटो वा पारंबी, वजन कमी करणारच.. मी असं बोलून दाखवायचा अवकाश की सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. 'एक वेळचं जेवण बंद कर', हे खाणं सोड, ते खाणं सोड, असा व्यायाम कर, तसा प्राणायाम कर, नुसतं हैराण करुन सोडलं होतं सगळ्यानी. शेवटी गुगलबाबाला शरण गेलो आणि माझ्या समजाप्रमाणे आणि जितकं शक्य आहे त्यानुसार खालील प्लॅन बनवला.. १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल ३. १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा ४. १२:३० वा जेवण (४ छोटे फुलके आणि भाजी) ५. ३:३० / ४:०० वा फळं (टरबूज/कलींगड/चिक्कू/पेरु/सफरचंद - मिक्स) ६. ४:३० ते ६:०० जिम (२० मि ट्रेडमिल १७५ कॅ. बर्न + २० मि. इलिप्टिकल १७५ कॅ. बर्न + सायकलिंग ५० कॅ. बर्न + १०मि. वजन/अ‍ॅब्स) ७. ७-७:३० वा स्प्राऊट्स / एखादं फळ / उकडलेली अंडी २ (मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का?) ८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) या सगळ्याबरोबर दिवसभर जवळपास ४ लिटरपेक्षाही जास्त पाणी पिणे, दिवसातून दोन -तीन वेळा ३ मजले पाय-या चढणे-उतरणे.क्वचित रात्री बॅडमिंटन खेळणे इ. चालूच आहे. आठवड्यातून ५ दिवस जिम जातोच जातो. विकांताला खेळणे/फिरणे इ. होतं. अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळे आणि माझे पाककौशल्य वादातीत असल्यामुळे 'किती खायचं' यावर असला तरी 'काय खायचं' यावर कंट्रोल थोडा कमीच आहे. :) शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद. स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही. गेल्या १२-१५ दिवसांत वजन १.५ किलो कमी झाले आहे. अजून १० किलो कमी करायचा प्लॅन आहे. घाई अजिबात नाही तरीही ६ महिन्यात गोल अचिव्ह व्हावं असं वाटतय. वरील वेळापत्रकामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? अजून काही टिप्स असतील तर प्लीज सुचवा..

वाचन 64602 प्रतिक्रिया 0