✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

च
चिर्कुट यांनी
गुरुवार, 12/13/2012 - 11:51  ·  लेख
लेख
यंदा दिवाळीच्या काळात १ आठवड्याच्या सुट्टीवर घरी गेलो होतो. माझे वाढलेले आकारमान पाहुन बरेच टोमणे बसत होते, तरीही फराळ/इतर खाणं हादडणे चालूच होते. :) पण एके दिवशी अचानक लक्षात आलं की माझा मलाच मी उचलत नाहीये.. :( त्यात माझ्या घरी शुगरची हिस्ट्री आहे, त्याची भीती आहेच. मग ठरवलं की आता शेंडी तुटो वा पारंबी, वजन कमी करणारच.. मी असं बोलून दाखवायचा अवकाश की सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. 'एक वेळचं जेवण बंद कर', हे खाणं सोड, ते खाणं सोड, असा व्यायाम कर, तसा प्राणायाम कर, नुसतं हैराण करुन सोडलं होतं सगळ्यानी. शेवटी गुगलबाबाला शरण गेलो आणि माझ्या समजाप्रमाणे आणि जितकं शक्य आहे त्यानुसार खालील प्लॅन बनवला.. १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल ३. १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा ४. १२:३० वा जेवण (४ छोटे फुलके आणि भाजी) ५. ३:३० / ४:०० वा फळं (टरबूज/कलींगड/चिक्कू/पेरु/सफरचंद - मिक्स) ६. ४:३० ते ६:०० जिम (२० मि ट्रेडमिल १७५ कॅ. बर्न + २० मि. इलिप्टिकल १७५ कॅ. बर्न + सायकलिंग ५० कॅ. बर्न + १०मि. वजन/अ‍ॅब्स) ७. ७-७:३० वा स्प्राऊट्स / एखादं फळ / उकडलेली अंडी २ (मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का?) ८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) या सगळ्याबरोबर दिवसभर जवळपास ४ लिटरपेक्षाही जास्त पाणी पिणे, दिवसातून दोन -तीन वेळा ३ मजले पाय-या चढणे-उतरणे.क्वचित रात्री बॅडमिंटन खेळणे इ. चालूच आहे. आठवड्यातून ५ दिवस जिम जातोच जातो. विकांताला खेळणे/फिरणे इ. होतं. अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळे आणि माझे पाककौशल्य वादातीत असल्यामुळे 'किती खायचं' यावर असला तरी 'काय खायचं' यावर कंट्रोल थोडा कमीच आहे. :) शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद. स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही. गेल्या १२-१५ दिवसांत वजन १.५ किलो कमी झाले आहे. अजून १० किलो कमी करायचा प्लॅन आहे. घाई अजिबात नाही तरीही ६ महिन्यात गोल अचिव्ह व्हावं असं वाटतय. वरील वेळापत्रकामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? अजून काही टिप्स असतील तर प्लीज सुचवा..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64466 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

तुम्हाला डांस करायला आवड्तो

पियुशा
गुरुवार, 12/13/2012 - 11:55 नवीन
तुम्हाला डांस करायला आवड्तो का ? उत्तर हो असेल तर तात्काळ एखादा डांस क्लास लावा भरपुर व्यायाम होतो त्याने डाएटींग्ची जरज इल्ले :)
  • Log in or register to post comments

सध्या पाण्याचा दुष्काळ

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 12/13/2012 - 11:59 नवीन
सध्या पाण्याचा दुष्काळ असल्याने कमी पाणी प्या आणी १ दिवसाआड जेवन करा १०१ % फायदा होइल व्यायामाच्या फंदात नका पडु उगीच हात पाय गळायचा
  • Log in or register to post comments

सटीप शुभेच्छा !

तर्री
गुरुवार, 12/13/2012 - 12:05 नवीन
टीपा १.येथील पा.कृ . वाचू नये. (गणपा , सानिका , अपर्णा हे प्रमुख शत्रू मानून राहावे. ह्याचे प्रतिसादही वाचू नये !) २.विषय काहीही असला तरी काही धागे चवी ने खाण्याच्या उच्च शोकाचे गुणगान करणारे असतात तेंव्हा कोणताही धागा साशंकतेने उघडावा. (नाममात्र अपवाद - अकुपेडिया ) ३.शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद. मग येथे मिपा काय कार्तुसा रे .... ४.स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही. हो का बर्र .... ५.अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळे क्र. चार आणि पाच शादी .कॉम वरून चुकून कॉपी - पेस्त झालेत का ? असो निग्रह राहु दे .म्हणजे (.....पुढच्या दिवाळी पर्यंत २ चे ४ नकोत )
  • Log in or register to post comments

तर्री साहेब,

चिर्कुट
गुरुवार, 12/13/2012 - 12:26 नवीन
>>गणपा , सानिका , अपर्णा हे प्रमुख शत्रू मानून राहावे. यांच्या तर पाकृ असतात. आपले तर नावदेखील वर्ज्य केले पाहिजे नाही का? :) कृ.ह.घ्या. आणि चवीने (अती) खाणे, मिसळीसारखे पदार्थ जीव की प्राण असणे यामुळेच ही वेळ आली आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

दलिया घ्या

अनन्न्या
गुरुवार, 12/13/2012 - 12:29 नवीन
मी माझ्यासाठी हे दलिया तयार केले होते. मला चांगला फायदा झाला. अर्थात वैद्यकिय सल्याने मी हे घेतले नाही. दलियासाठी वापरलेले साहीत्यःमूग, बाजरी, तांदुळ, गहू चारही धान्ये प्रत्येकी पाव कि. घेतली. ती वेगवेगळी थोडी भाजून रवाळ दळली. हा तयार दलिया दोन खाण्याचे चमचे पाण्यात किंवा ताकात शिजवावा. रात्रीच्या जेवणाऐवजी घ्यावा. यात मिठाबरोबर स्वादासाठी जिरेपूड आणि आवडत असल्यास लसुण घालावी. दिवाळी झाली की नोव्हेंबर ते एप्रिल सहा महीने गोड बंद आणि दलिया सुरू.. वजन आटोक्यात आणि मे महिन्यात मनसोक्त आंबे खायला मोकळीक... आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत सगळे सण व्यवस्थित भरपेट साजरे करावे. संतुलित आहार वर्षासाठी!!!!
  • Log in or register to post comments

वजन कमी करणारा आहार....

बाबा पाटील
गुरुवार, 12/13/2012 - 12:43 नवीन
१)सकाळी उठल्यावर १ ग्लास गरम पाणी १च.मध व १/४ लिंबु पिळुन घेणे त्यानंतर १ तास चालणे. २)फिरुन आल्यावर १ कप चहा/कॉफी/दुध(साय काढलेले)साखर(sugar free)कमी घालुन घेणे. ३)सकाळचा नाश्ता:९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका,१ चहाचा चमचा साजुक तुप,२ चहाचे चमचे कोणतीही चटणी. ४)दुपारचे जेवणःजेवणापुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके,१ नैवद्याची वाटी कोणतीही भाजी(बटाटा सोडुन ),१ फुलपात्र वरणाचे पाणी,डाळ अजिबात नको,काकडी ,गाजर्, कोवळा मुळा , टोमॅटो,बीट्, कांद्याची पात्,सॅलेड पान,कोबीची कोशिंबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते. ५)भात पुर्णपने बंद करावा. ६)संध्याकाळचा नाश्ता:४ वाजता १ कप चहा/कॉफी/दुध(साय काढलेले)साखर(sugar free)कमी घालुन घेणे. ७)रात्रीचे जेवण :दुपारप्रमाणेच घ्यावे. ८)जेवणात गोड पदार्थांचा समावेश करु नये.तसेच चिक्कु, केळी,द्राक्ष,आंबा ही फळ सोडुन बाकी सर्व फळ खावीत. चॉकलेट,बेकरी प्रॉडक्ट्स ,शितपेय्, फास्ट फुड , हॉटेल, मिठाई बंद करावी... ९)मांसाहार्,मत्स्याहार्, अंड पुर्णपने बंद... १०)योग्य आहाराला,योग्य व्यायामाची जोड दिल्यास दर आठवड्याला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही. ११)१ ग्रम मिठ शरिरीरात साधारणतः ६० मिली पाणी धरुन ठेवते त्यामुळे मिठ जितके कमी खाल्ले जाईल तितकी सूज व स्थूलपणा कमी होतो त्यामुळे जेवणात मिठ कमी घ्यावे. १२)महत्वाचे: वरिल माहिती सामान्य प्रकृतीच्या रुग्नांकरीता आहे,जर काही इतर शाररीक तक्रारी असतील तर जवळच्या डॉक्टरकडुन किंवा वैद्याकडुन उपचार करुन घ्यावेत....
  • Log in or register to post comments

संध्याकाळी ४:३० ला घरी परत

खबो जाप
गुरुवार, 12/13/2012 - 12:45 नवीन
संध्याकाळी ४:३० ला घरी परत येवू शकता ..... आहाहा काय ते सुख !!!! आम्ही सकाळी ९:३० ला हापिसात गेलो कि डायरेक्ट बायकोने आता घरी येतोस कि कसे म्हणे पर्यंत नो time .........
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चिर्कुट
गुरुवार, 12/13/2012 - 12:55 नवीन
पियुशा, अनन्या, बाबा धन्यवाद. शक्य तेवढे सल्ले पाळण्याचा प्रयत्न करेन. खबो (मस्त नाव आहे :) ), ४:३० ला घरी नाही हो, कचेरीमध्येच जिम आहे. ४:३० ला जातो कारण नंतर कॉल्स असतात. तसे सध्या सगळे इंग्रज ख्रिसमसच्या तयारीमध्ये गुंग असल्याने तुलनेने काम कमी आहे इतकेच. म्हणूनच तर मिपावर येऊन टंकण्याइतका वेळ मिळतोय.
  • Log in or register to post comments

हा अनुभव

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/13/2012 - 15:06 नवीन
http://www.maayboli.com/node/11192 देखील वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट

मला पण सल्ला हवाय..

ह भ प
गुरुवार, 12/13/2012 - 15:12 नवीन
नुकताच व्हायरल थ्रोट इन्फेक्शन मधून बरा झालोय. पण त्यामुळं चिक्कार वीकनेस आलाय.. काय बरं करावं तो जाण्यासाठी..??
  • Log in or register to post comments

नमस्कर. मि इथे अगदिच नवीन आहे

राधा बावरि
गुरुवार, 12/13/2012 - 16:06 नवीन
नमस्कर. मि इथे अगदिच नवीन आहे. वरील माहिती खूप उपयुक्त आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

फक्त चार गोष्टी करा

संजय क्षीरसागर
गुरुवार, 12/13/2012 - 16:21 नवीन
१. भूक लागेल तेंव्हाच खा २. अन्नपदार्थांच विश्लेषण अजिबात करू नका, जे आवडेल ते खा. ३. मजा येईल इतपत व्यायाम करा (किंवा पुरेसा व्यायाम होईल असा कोणताही खेळ शिका आणि खेळा) ४. वजन करणं किंवा सतत ते कमी करण्याचा विचार करणं सोडून द्या यथावकाश तुमचं वजन नॉर्मल होईल.
  • Log in or register to post comments

१००% टक्के सहमत. - पिंगू

पिंगू
Sat, 12/15/2012 - 12:03 नवीन
१००% टक्के सहमत. - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एक साधं गणित सांगतो. १ पौंड

हारुन शेख
Fri, 12/14/2012 - 17:31 नवीन
एक साधं गणित सांगतो. १ पौंड (जवळ जवळ १/२ किलो ) वजन कमी करण्यासाठी शरीराला ३५०० कॅलरीज जाळाव्या लागतात. आपल्या शरीराला आहे तेच वजन राखण्यासाठी वजनाच्या गुणिले १८ एवढ्या कॅलरीज लागतात. वजन पौंडात घ्या. हा थंबरूल आहे पण उत्तर अचूक येते. बॉडी मास इंडेक्स च्या गणितात नेत नाही तुम्हाला त्यापेक्षा वरचा फॉर्मूला सोपाय. उत्तर अगदी किंचित फरकाने सारखेच येते. आणि खूप आकडेमोड वाचते. समजा माझे वजन ६० किलो आहे तर मला ते तेवढेच राखण्यासाठी ६०x २.२x १८ = २३७६ कॅलरीज ची रोज आवश्यकता आहे. आठवड्याला १ पौंड कमी करायचं असेल तर मला २३७६ कॅलरीज मधून ५०० कॅलरीज वजा करायला लागतील. म्हणजे १८७० कॅलरीजच रोज घ्याव्या लागतील. किंवा ५०० कॅलरीज जळतील इतका व्यायाम करावा लागेल. आपण कमी केलेल्या ५०० कॅलरी ची उर्जा आपले शरीर साठवलेली चरबी जाळून मिळवते. याला कॅलरी डेफीसीट चा नियम म्हणतात. तुम्ही डायेट आणि व्यायाम दोन्हीही करताहात हे एकदम भारी. बाकी हे गणित लक्षात ठेवा , वजनाची नोंद ठेवा, आंतरजालावर कशामध्ये किती कॅलरीज असतात याचे तक्ते मिळतील ते वापरा, प्रगतीचा आढावा घेत राहा आणि १ ते १ १/२ पौंड आठवड्याला यापेक्षा जास्त कमी करण्याचा अट्टहास करू नका. अजून आणखीन एक कुठल्याही एरोबिक व्यायाम प्रकारात (उदा. सायकल चालवणे , पळणे , चालणे , इलिप्टिकल,पोहणे यात चरबी जळण्यास सुरवात तो व्यायाम सुरु केल्याच्या २० मिनिटांनंतर होते त्यामुळे किमान चाळीस मिनिटे तो व्यायाम करणे फायद्याचे ठरेल ) वजन हळूहळू वाढलेले असते ते एक दोन आठवड्यात जादू झाल्यासारखे कमी होईल अशी अपेक्षा शरीरावर दुष्परिणाम घडवते . Bestluck.
  • Log in or register to post comments

. वजन पौंडात घ्या. हा थंबरूल

कापूसकोन्ड्या
Sat, 12/15/2012 - 08:15 नवीन
. वजन पौंडात घ्या. हा थंबरूल आहे पण उत्तर अचूक येते. बॉडी मास इंडेक्स च्या गणितात नेत नाही तुम्हाला त्यापेक्षा वरचा फॉर्मूला सोपाय. उत्तर अगदी किंचित फरकाने सारखेच येते. आणि खूप आकडेमोड वाचते. समजा माझे वजन ६० किलो आहे तर मला ते तेवढेच राखण्यासाठी ६०x २.२x १८ = २३७६ कॅलरीज ची रोज आवश्यकता आहे. आठवड्याला १ पौंड कमी करायचं असेल तर मला २३७६ कॅलरीज मधून ५०० कॅलरीज वजा करायला लागतील. म्हणजे १८७० कॅलरीजच रोज घ्याव्या लागतील. किंवा ५०० कॅलरीज जळतील इतका व्यायाम करावा लागेल. आपण कमी केलेल्या ५०० कॅलरी ची उर्जा आपले शरीर साठवलेली चरबी जाळून मिळवते. याला कॅलरी डेफीसीट चा नियम म्हणतात.
पौन्ड आणि किलोत काय तर गफलत होतीय काय हो म्हणलो मी.६०x २.२x १८ = २३७६ च्या ऐवजी १२०x२.२१८ =४५७२ असे हवे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

मी मध्यंतरी माझ्या नवर्‍याच

स्पंदना
Fri, 12/14/2012 - 17:34 नवीन
मी मध्यंतरी माझ्या नवर्‍याच वजन घटवल होत. ( मला गरज नाही काही असल काही करण्याची, मी अजुन चवळीच्या (भरलेल्या जून ) शेंगेसारखी आहे हो!) कस ते सांगते. कुछ नही, दुपारच्या डब्यात सरळ सरळ तडका मारुन सॅलड. यात लेट्युस, कोबी, पनिर्(प्रोटीन) बारिक चिरलेल गाजर्(जरा जाड असल की तस्स परत यायच) टॉमॅटो, स्नो पिज, असा काही बाही रतिब असायचा. नुसत्या भा़ज्यांनी पोट भरायच नाही म्हणुन पनिर अ‍ॅड करायचे मी. एकुण काय तर एक वेळच्या जेवणातून कार्बो बंद. चार आठवड्यात ६ किलोज. काहीही थकवा न जाणवता. अर्थात नवरोबा पुर्वी सरळ सरळ आखाड्यात जायचे. वस्तादाच्या हाताखाली लाल मातीत व्यायाम करायचे त्यामुळे असेल पण वजन झटक्यात उतरल एव्हढ मात्र खर. संध्याकाळी नेहमीच जेवण. आठवड्यातुन एकदा नॉनव्हेज. आम्ही बाहेरच विशेष खात नाही. अगदी मला कंटाळा आला माझ्या हातच खाउन तरच आम्ही बाहेर जेवतो. मला चार लिटर पाणी जास्त वाटतय. आपली गरज दोन लिटर दिवसाला पाण्याची असते. तर सांगायचा मुद्दा एकच, भात भाकरी चपाती थोड कमी करुन भाज्या दही दुध जास्त घ्या. फार फरक जाणवेल. अन हो आठवड्याच्या शेवटी मिपावरची एक तरी डीश बन्वुन हाणाच. तब्येतीला एकदम भारी!!
  • Log in or register to post comments

मला चार लिटर पाणी जास्त वाटतय

हारुन शेख
Fri, 12/14/2012 - 18:07 नवीन
मला चार लिटर पाणी जास्त वाटतय. आपली गरज दोन लिटर दिवसाला पाण्याची असते. >>>> होय ४ लीटर जास्ती होतंय. अति सर्वत्र वर्जयेत. जास्ती पाणी मूत्रपिंडांवर ताण निर्माण करू शकते. २ १/२ लिटर योग्य आहे. शिवाय चहा , ज्यूस फळे यातून आपल्याला पाणी मिळत असतेच. शरीरातील पोषक द्रव्ये खूप जास्ती पाणी पिल्याने लवकर ड्रेन आउट होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

येस्स!

स्पंदना
Fri, 12/14/2012 - 18:25 नवीन
शरीरातील पोषक द्रव्ये खूप जास्ती पाणी पिल्याने लवकर ड्रेन आउट होतात.
त्यालाही डिहायड्रेशनच म्हणतात. पाणी धरुन ठेवायचे क्षार विरघळ्उन गेल्याने डीहायड्रेट होतो आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

आमचा उपाय

चौकटराजा
Fri, 12/14/2012 - 17:44 नवीन
आपण " एकटाजीव" असल्याने सोपा उपाय सांगत आहे. आपले वजन सर्व उपवर मुलींच्या बापावर कसे पडेल ते पहा ! दोन महिन्यात फरक जाणवेल.
  • Log in or register to post comments

त्यापेक्षा आपल्याला पसंत न

रेवती
Fri, 12/14/2012 - 19:07 नवीन
त्यापेक्षा आपल्याला पसंत न पडलेल्या मुलीच्या वडिलांना तिच्यासाठी स्थळे शोधण्यास मदत, पायपीट करणे हा एक उपाय असू शकतो. याने वजन नक्कीच कमी होईल. ;)माझ्या मित्राच्या भावाचे वजन बरेच वाढले आणि लग्नाळू झाल्यावर काही केल्या कमी होईना, म्हणून त्या भावाने त्याच्यासारख्याच मुलीशी लग्न केले. सोपा मार्ग. कोणी काही बोलायला नको. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मी बलक सुद्धा खातो. याचा

हारुन शेख
Fri, 12/14/2012 - 17:56 नवीन
मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का? >>>>>>> दुष्परिणाम नाहीत पण जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करताहात तर बलक टाळलेला बरा. कारण त्यात शुदध कर्बोदके असतात व जास्तीची कर्बोदके शरीर चरबीच्या स्वरूपात साठवते. त्याउलट अंडयाच्या पांढरया भागात प्रथिने असतात जी हळूहळू पचतात पर्यायाने शरीराला ती पचविण्यासाठी जास्त उर्जा आणि वेळ लागतो. शिवाय प्रथिनयुक्त आहार जास्त घेतल्यास पोट जास्ती वेळ भरल्यासारखे राहते आणि मेंदूकडून येणारी भूक लागण्याची सूचना लांबते. fish Oil Supplement पण चालू करा. त्यामुळे रक्तातला tryglisaride नावाचा घाणेरडा कोलेस्टेरोल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारेल.
  • Log in or register to post comments

Triglyceride

आनंदी गोपाळ
Fri, 12/14/2012 - 19:51 नवीन
Triglyceride
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

बाब्बौ! व्यायाम बराच करताय

रेवती
Fri, 12/14/2012 - 19:15 नवीन
बाब्बौ! व्यायाम बराच करताय आणि वर जास्त पाणी पिताय असं वाटतय. सध्या ऋजुता दिवेकरबाईंचा बराच बोलबाला आहे. त्यांची पुस्तके वाचून बघा. त्या बाईंचे एक पुस्तक, 'डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट' एवढ्यात वाचनात आले. त्यात त्यांनी दर दोन तासांनी थोडे खायला सांगितल्यामुळे मला पुस्तक भयंकर आवडले. ;)
  • Log in or register to post comments

थोडेसे बदल सुचवतेय

michmadhura
Fri, 12/14/2012 - 19:17 नवीन
तुमच्या डाएट मधे थोडे बदल सुचवतेय, जे तुम्हाला वजन कमी करायला उपयोगी पडतील. १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास या ऐवजी सकाळी उठल्यावर साधारण व्यायामाच्या पाउण ते १ तास आधी १ कुठलेही सिझनल फळ खा. २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल या सकाळी केलेल्या व्यायामानंतर लगेच १० ते १५ मिनिटात ब्रेकफास्ट करा जो तुम्ही १० वाजता करता.फक्त यातुन चहा वगळा. ३. १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा या वेळी तुम्ही चहा + काही हलका आहार (शेंगदाणे, पिस्ता, बदाम, खारीक, कुरमुरे इ. उत्तम) घेउ शकता. ४. १२:३० वा जेवण (४ छोटे फुलके आणि भाजी) इथे वरण भात, सॅलेड व एखादी हिरवी भाजी जेवणात घ्या. ५. ३:३० / ४:०० वा फळं (टरबूज/कलींगड/चिक्कू/पेरु/सफरचंद - मिक्स) ऑफिसात मिळणारी फ्रुट्प्लेट खात असाल तर त्याएवजी १ अख्खे फळ खा. अगदिच भुकेची जाणीव होत असल्यास हलके सॅडविच, खाकरा, मनुका इ. खा. ६. ४:३० ते ६:०० जिम (२० मि ट्रेडमिल १७५ कॅ. बर्न + २० मि. इलिप्टिकल १७५ कॅ. बर्न + सायकलिंग ५० कॅ. बर्न + १०मि. वजन/अ‍ॅब्स) सकाळी व्यायाम केला असेल तर परत ते पण दीड तास व्यायामाची गरज नाही. हा व्यायाम तुम्ही सकाळीच करुन घ्या. ७. ७-७:३० वा स्प्राऊट्स / एखादं फळ / उकडलेली अंडी २ (मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का?) या वेळी एखादे सूप किंवा ताक पण घेउ शकता. ८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) यातही हिरवी भाजी, सॅलेड, चटण्या, कोशिंबीर, बीट, दही अ‍ॅड करा. हे बदल केलेत तर वजन हळू हळूच कमी होइल, पण परत वाढणार नाही.
  • Log in or register to post comments

१० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 11:13 नवीन
१० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा या वेळी तुम्ही चहा + काही हलका आहार (शेंगदाणे, पिस्ता, बदाम, खारीक, कुरमुरे इ. उत्तम) घेउ शकता. हा सगळा आत्यंतीक गुरु आणी बृहणिय आहार आहे, याने मेद वाढतो कमी होत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

अहो हे सगळे quality eating

michmadhura
Sat, 12/15/2012 - 11:35 नवीन
अहो हे सगळे quality eating आहे, जे रोजच्या आहारात असेल तर पोषक तत्वे मिळतात. शरीरातली चरबी जाळण्यासाठी पण हा मेद आवश्यक आहे. नाहीतर कमी वयात केस गळून टक्कल पडणे, सांधेदुखी अशा तक्रारी चालू होतील. याच बरोबर रोज सकाळी चीझचा अर्धा तुकडा खावा, याने वजन वाढणार नाही, चेहेर्‍यावर तजेला येइल, सुरकुत्या येण्याची प्रक्रिया लांबेल, तसेच वजन कमी झाल्यावर जाणवणारे strech marks कमी होतील. वजन कमी करायला घेतले की सगळे जण फॅट कमी करायच्या चूकिच्या पद्धती अवलंबतात तिथेच चुकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

स्वस्थ व्यक्ती आणी स्थुल व्यक्ती यात फरक आहे...

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 11:55 नवीन
तुम्ही जो आहार सांगत आहात हा स्वस्थ व्यक्तीलाही चालणार आहे,मात्र मेदस्वी व्यक्तीच्या बाबतीत् आपन जो आहार घेतो त्यापासुन पुढे रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणी शुक्र या क्रम बिघडुन मधला जो मेद आहे तो अतिरिक्त प्रमाणात उत्पन्न होत असतो,वरिल पैकी थोडा जरी आहार त्याला गेला की परत ती प्रक्रिया सुरु होते.दुसरी गोष्ट जी केस गळणे हे पित्त प्रकृती आणी प्रकुपित पित्त या कारणांमुळे होते,तर सांधे दुखी ही वात प्रकृती व धातुक्षय्,तसेच भारवृध्दी असणार्‍या व्यक्तींना गुढगे वरती अत्याधीक भार पडणे यामुळे होते.त्यामुळे स्थुल व्यक्तीला मेद वाढवणार आहार वर्जच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

तुम्ही सांगत आहात ते ही बरोबर

michmadhura
Sat, 12/15/2012 - 12:17 नवीन
तुम्ही सांगत आहात ते ही बरोबर आहे, पण हा मेद त्यांची चरबी जाळण्यासाठी आवश्यक आहे. भज्या, वेफर्स, वडापाव, बर्गर आणि असे अरबट चरबट खाणे यातुन शरीराला नको असलेला मेद मिळतो जो नक्कीच टाळायचा आहे. एकदमच शरीरातून सगळी चरबी नाहीशी करायला गेलो तर शरीर चालणार कसे? अजुन एक म्हण्जे बटाटा तळून न खाता तो उकडून खावा. नक्की काय , कसे आणि किती खावे हे माहीत असायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

जाड्यांनी बटाटा कश्याच प्रकारे खाऊ नये,,,,

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 12:27 नवीन
जाड्यांनी बटाटा कश्याच प्रकारे खाऊ नये,,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

हे वाचा

michmadhura
Sat, 12/15/2012 - 12:44 नवीन
The potato is best known for its carbohydrate content (approximately 26 grams in a medium potato). The predominant form of this carbohydrate is starch. A small but significant portion of this starch is resistant to digestion by enzymes in the stomach and small intestine, and so reaches the large intestine essentially intact. This resistant starch is considered to have similar physiological effects and health benefits as fiber: It provides bulk, offers protection against colon cancer, improves glucose tolerance and insulin sensitivity, lowers plasma cholesterol and triglyceride concentrations, increases satiety, and possibly even reduces fat storage Due to carbohydrate content, potatoes are considered to make a person obese if used in excess म्हणूनच सांगते की काय आणि किती खावं ते माहीत असायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

पुस्तक आणी अनुभव यात फार फरक असतो....

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 12:55 नवीन
पुस्तक जे सांगतात ते सगळच खर नसत्,काही शेकड्यात बटाट्यांच्यावर उपचार केलेत म्हणुन सांगतोय बटाट्यांना बटाटा वर्ज्य.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

तुमचा अनुभव नक्कीच

michmadhura
Sat, 12/15/2012 - 13:16 नवीन
तुमचा अनुभव नक्कीच माझ्यापेक्षा जास्त असेल. शिजवण्याच्या पद्धती आणि खाण्याचे प्रमाण यात संतूलन ठेवले तर बटाटा खायला हरकत नसावी. मुळात सांगायचा मुद्दा हा, की वजन कमी करण्यासाठी करत असलेले डाएट तुम्ही किती दिवस, किती महीने पाळू शकता? ते सोडल्यावर परत वजन वाढेल की. आणि इतके दिवस डाएटवर आहे म्हणून न खाल्लेले पदार्थ खाल्लेत तर वजन दुप्पटीने वाढेल. उलट तारतम्य ठेवून सर्वसमावेशक आहार घेतला तर हळू हळू पण नक्कीच (परत न वाढणारे) वजन कमी होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

सल्ला देण डॉक्टरच काम....

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 13:32 नवीन
सल्ला देण डॉक्टरच काम....बाकी निर्णय संबधीत रुग्णाचा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

अहो माझा तुम्हाला विरोध

michmadhura
Sat, 12/15/2012 - 13:41 नवीन
अहो माझा तुम्हाला विरोध नक्कीच नाही. मी फक्त माझं मत मांडलं. प्रत्येकाचं शरीर, अनुवंशिकता, दिनचर्या, राहणीमान, झोपेचे तास, कामाचे स्वरूप, ताण हे वेगवेगळे असते.त्यावरच त्याचं वजन अवलंबून असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

अजून एक सजेशन

michmadhura
Sat, 12/15/2012 - 12:48 नवीन
८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) यातही हिरवी भाजी, सॅलेड, चटण्या, कोशिंबीर, बीट, दही अ‍ॅड करा. येथे २ छोते फुलके खाण्याएवजी भाकरी(नाचणी, ज्वारी, तांदूळ किंवा मिक्स पिठं) खा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

अजुन एक क्रॅश कोर्स

मी-सौरभ
Fri, 12/14/2012 - 19:29 नवीन
गोबीच्या वाळवंटाचा दौरा करा...
  • Log in or register to post comments

तुला सर्वात जास्त गरज आहे

कपिलमुनी
Fri, 12/14/2012 - 19:48 नवीन
:P ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हे एकदम बरोबर....

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 12:08 नवीन
गोबीच्या वाळवंटाचा दौरा करा... लय भारी उपाय्,न रहेगा बास न बजेगी बासुरी......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

संजय सर, हारुन सर, मीचमधूरा, रेवती, अपर्णा तै आणि

चिर्कुट
Fri, 12/14/2012 - 21:25 नवीन
इतर सर्वांचे आभार. >> चरबी जळण्यास सुरवात तो व्यायाम सुरु केल्याच्या २० मिनिटांनंतर होते त्यामुळे किमान चाळीस मिनिटे तो व्यायाम करणे फायद्याचे ठरेल. हे माहिती नव्हतं. मग एका वेळी ट्रेडमिल, इलिप्टिकल आणि सायकलिंग न करता यापैकी एकच ४०-४५ मि. रोज आलटून पालटून करावे का? आधी सांगितल्याप्रमाणे 'काय खायचं' याचा चॉईस थोडा कमी आहे, तरीही मीचमधुरा नी सांगितलेले बदल झेपतील असे वाटताहेत. प्रयत्न करेनच. :) इतर 'जनोबा रेगे' टाईप सल्ल्यांबद्दलही आभार. करमणूक झाली.. :) 'वजनाचा मार्ग या देखील काट्यांतून जातो' हे कळालं. - चिर्कुट
  • Log in or register to post comments

एकदम बरोबर.

हारुन शेख
Fri, 12/14/2012 - 21:51 नवीन
हे माहिती नव्हतं. मग एका वेळी ट्रेडमिल, इलिप्टिकल आणि सायकलिंग न करता यापैकी एकच ४०-४५ मि. रोज आलटून पालटून करावे का? >>>>>>>>>>>>एकदम बरोबर. तसाही व्यायाम आलटून पालटून करावाच. एकाच प्रकारचा व्यायाम खूप दिवस करत राहिल्याने हळूहळू शरीराला त्याची सवय होते आणि मग त्यातून इच्छित परिणाम उशिरा मिळतात. Crossfit हया सध्या चालती असलेल्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये असेच रोज वेगवेगळे व्यायाम करून घेतले जातात. अत्यंत सक्षम शरीर मिळते यातून. अनुभवाचे बोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट

सगळं पटलं .

जेनी...
Fri, 12/14/2012 - 21:32 नवीन
सगळं पटलं . पण १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल ह्या दोन मुद्द्यांमध्ये दोन गोष्टी प्लस त्यातनं एक मायनस केलियेत राव :( समजायला लै अवघड गेलं :(
  • Log in or register to post comments

उलटे लटका

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 12/14/2012 - 21:44 नवीन
मी जसा रात्री झाडावर उलटा लटकतो त्याप्रमाणे तुम्हीही लटका. बघा नक्की वजन कमी होईल.
  • Log in or register to post comments

वजन कमी करण्यासाठी सोप्पा उपाय पण तितकाच कठीण करायला.

निश
Fri, 12/14/2012 - 22:44 नवीन
वजन कमी करण्यासाठी सोप्पा उपाय पण तितकाच कठीण करायला ते म्हंजे ताटात जे काही जेवायला येईल ते नाक न मुरडता खावे म्हंजे मन प्रसन्न असेल तर अन्न लवकर पचत व भरपुर चालाव.
  • Log in or register to post comments

खुपच छान माहिती...नवीन

हिरवळ
Sat, 12/15/2012 - 00:55 नवीन
खुपच छान माहिती...नवीन वर्षाचा सन्कल्प सोडणेस हे फारच उपयुक्त ठरेल.
  • Log in or register to post comments

रात्रीचे जेवण.

प्रभाकर पेठकर
Sat, 12/15/2012 - 02:08 नवीन
रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट्स टाळावेत. तसेच, ते जेवण रात्री न घेता सूर्यास्तापूर्वी घ्यावे. सूर्यास्ता नंतर घेतलेल्या कुठल्याही आहारातील उष्मांक (कॅलरीज) तिन पट होतात असं आयुर्वेद मानतं.
  • Log in or register to post comments

अस कुठे आले आहे ?

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 11:07 नवीन
पेठेकर काका अस कुठल्या संहितेत आल आहे हो ? सुर्यास्तानंतर भोजन केल्यावर कफपित्तांची वृद्धी होते.अन्न अपाचित राहत्,त्याचा व तुमच्या कॅलरीजचा फारसा संबद्ध नाही.स्थूलतेच्या अनेक कारणांपैकी ते एक आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आणि सूर्यास्तानंतर तर आपला दिवस सुरू होतो!

संजय क्षीरसागर
Sat, 12/15/2012 - 11:14 नवीन
पाटील बाबा आपने बराब्बर टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आयुर्वेदाचार्य..

प्रभाकर पेठकर
Sun, 12/16/2012 - 01:06 नवीन
दूरदर्शनवरील एका आयुर्वेदाचार्याच्या मुलाखतीत वरील माहीती कळली. बाकी, माझा उपहारगृहाचा व्यवसाय मुख्यतः सूर्यास्तानंतर जोर धरतो. त्यामुळे लोकं माझा सल्ला न ऐकतील तर मला आनंदच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

मेलो!!!

सुनील
Sat, 12/15/2012 - 03:49 नवीन
सूर्यास्ता नंतर घेतलेल्या कुठल्याही आहारातील उष्मांक (कॅलरीज) तिन पट होतात असं आयुर्वेद मानतं
मेलो!!!!!!!!!!! व्हिस्कीच्या एका पेगात एरवी १४० कॅलरी असतात. सुर्यास्तानंतर ४२० होणार???????????
  • Log in or register to post comments

च्याय्ची कट्कट!

आनंदी गोपाळ
Sun, 12/16/2012 - 00:22 नवीन
२५२० क्यालरी नुस्त्या पिऊन आनंद झालेला गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा