✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

च
चिर्कुट यांनी
गुरुवार, 12/13/2012 - 11:51  ·  लेख
लेख
यंदा दिवाळीच्या काळात १ आठवड्याच्या सुट्टीवर घरी गेलो होतो. माझे वाढलेले आकारमान पाहुन बरेच टोमणे बसत होते, तरीही फराळ/इतर खाणं हादडणे चालूच होते. :) पण एके दिवशी अचानक लक्षात आलं की माझा मलाच मी उचलत नाहीये.. :( त्यात माझ्या घरी शुगरची हिस्ट्री आहे, त्याची भीती आहेच. मग ठरवलं की आता शेंडी तुटो वा पारंबी, वजन कमी करणारच.. मी असं बोलून दाखवायचा अवकाश की सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. 'एक वेळचं जेवण बंद कर', हे खाणं सोड, ते खाणं सोड, असा व्यायाम कर, तसा प्राणायाम कर, नुसतं हैराण करुन सोडलं होतं सगळ्यानी. शेवटी गुगलबाबाला शरण गेलो आणि माझ्या समजाप्रमाणे आणि जितकं शक्य आहे त्यानुसार खालील प्लॅन बनवला.. १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल ३. १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा ४. १२:३० वा जेवण (४ छोटे फुलके आणि भाजी) ५. ३:३० / ४:०० वा फळं (टरबूज/कलींगड/चिक्कू/पेरु/सफरचंद - मिक्स) ६. ४:३० ते ६:०० जिम (२० मि ट्रेडमिल १७५ कॅ. बर्न + २० मि. इलिप्टिकल १७५ कॅ. बर्न + सायकलिंग ५० कॅ. बर्न + १०मि. वजन/अ‍ॅब्स) ७. ७-७:३० वा स्प्राऊट्स / एखादं फळ / उकडलेली अंडी २ (मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का?) ८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) या सगळ्याबरोबर दिवसभर जवळपास ४ लिटरपेक्षाही जास्त पाणी पिणे, दिवसातून दोन -तीन वेळा ३ मजले पाय-या चढणे-उतरणे.क्वचित रात्री बॅडमिंटन खेळणे इ. चालूच आहे. आठवड्यातून ५ दिवस जिम जातोच जातो. विकांताला खेळणे/फिरणे इ. होतं. अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळे आणि माझे पाककौशल्य वादातीत असल्यामुळे 'किती खायचं' यावर असला तरी 'काय खायचं' यावर कंट्रोल थोडा कमीच आहे. :) शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद. स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही. गेल्या १२-१५ दिवसांत वजन १.५ किलो कमी झाले आहे. अजून १० किलो कमी करायचा प्लॅन आहे. घाई अजिबात नाही तरीही ६ महिन्यात गोल अचिव्ह व्हावं असं वाटतय. वरील वेळापत्रकामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? अजून काही टिप्स असतील तर प्लीज सुचवा..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64466 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

दारु न पिता झालेला ठन ठन

श्री गावसेना प्रमुख
Sun, 12/16/2012 - 09:03 नवीन
दारु न पिता झालेला ठन ठन गोपाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अरे वा ! वजन उतरवावंसं वाटलं

सांजसंध्या
Sat, 12/15/2012 - 07:27 नवीन
अरे वा ! वजन उतरवावंसं वाटलं आणि कार्यवाहीही सुरू केलीत याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा ! मला यातलं कळत नाही पण वजनाच्या आकड्यांचा बाऊ करू नका असं सुचवावंसं वाटतं. एकटा जीव वरून वय कमी असेल असा अंदाज आहे. दोरीवरच्या उड्यांनी वजन लवकर कमी होते. हा व्यायाम कुठेही आणि कधीही करता येण्यासारखा आहे. व्यायाम असा असावा ज्यात भापूर घाम तर यायला हवा पण गळून गेल्यासारखेही वाटणार नाही. असा अनुभव आला तर जाणकारांचा सल्ला घ्यावा.
  • Log in or register to post comments

आळस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/15/2012 - 08:06 नवीन
छान. मलाही वजन कमी करायचं आहे, पण व्यायाम म्हटलं की खूपच आळस येतो. बाहेर जाऊन फिरुन यायचा कंटाळा आल्यावर ट्रेडमिलवर चालायचं ठरवलं. नवीन नवीन उत्साहानं सहाएक महिने २० ते ४० मिनिटे चाललोही. जरा उत्साहही वाटायला लागायचा. आता पुन्हा कंटाळा. :( लेख वाचून कुछ हो सकता है असं वाटलं पुन्हा एकदा मनाशी निश्चय करुन पाहतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्राडॉ नियमित सायकलवरुन घर ते

पिंगू
Sat, 12/15/2012 - 12:10 नवीन
प्राडॉ नियमित सायकलवरुन घर ते कॉलेजला जात जा. तेवढाच व्यायाम होईल. सध्या मी तरी तोच मार्ग अवलंबला आहे. रोज २० किमीपर्यंत सायकल चालवणे मला फायदेशीर ठरत आहे. - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रोज २० किमीपर्यंत सायकल

सुहास..
Sat, 12/15/2012 - 12:56 नवीन
रोज २० किमीपर्यंत सायकल चालवणे मला फायदेशीर ठरत आहे. >>> खोटारडा !! मागल्या वेळेपेक्षा चांगला फुगला होतास तु कट्ट्याला पाहिले तेव्हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

खोट्टं काय, २० किमी म्हणजे २०

५० फक्त
Sat, 12/15/2012 - 14:53 नवीन
खोट्टं काय, २० किमी म्हणजे २० वयाची किमी असेल शेजारच्या गल्लीतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

ऑ?

गवि
Sun, 12/16/2012 - 07:05 नवीन
खोट्टं काय, २० किमी म्हणजे २० वयाची किमी असेल शेजारच्या गल्लीतली.
समजा असेल.. पण तिचा वजन कमी करायला काय उपयोग? तेव्हा वीस किलोमीटर हेच अधिक वास्तविक वाटतं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आणि...

गवि
Sun, 12/16/2012 - 07:08 नवीन
आता थोड्याच दिवसांत "२०किमी" किंवा "२०_किमी" किंवा "किमी२०" किंवा किमी_२०_फक्त, "मी_२०_कि_मी" असा काही आयडी आल्यास लक्ष ठेवणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी कमी केले नाही वजन , पण आहे

सुहास..
Sat, 12/15/2012 - 10:35 नवीन
मी कमी केले नाही वजन , पण आहे ते ठेवले आहे ! काही गोष्टी मी करतो त्या १ ) भुक लागली तरच खायचे. ते ही पोट भरेपर्यंत ( डॅड म्हणतात, जेवण्याची सर्वात उत्तम वेळ कुठली ? भुक लागली की ) २ ) पोटापुरतच खायचे, फळ-फळावळ जास्त आणि त्याचा रस ! टिट-बिट्स अजिबात नाही..मी आजवर मॅगी/बिस्किटे/वेफर्स/कुरकुरे खाल्लेली नाहीत, भाज्यांचा वापर जास्त, त्यातल्या त्यात ज्या कडवट असतात त्या. नॉनव्हेज मध्ये मोस्टली अंडेच. ३ ) ड्रिंक्स आणि स्मोकिंग ला नेहमीच लिमीट द्यायची. ( अर्थात कॉकटेल कट्ट्याला नो कंट्रोल !! ;) ) ४ ) शक्य तेव्हढा बाईक/कार/लिफ्ट चा वापर टाळणे. ५ ) वजन कमी करणे वा माझ वजन वाढलयं आणि ते कमी/जास्त करायचे आहे याचा अजिबात विचार न करणे.
  • Log in or register to post comments

५) वजन कमी करणे वा माझ वजन वाढलयं

संजय क्षीरसागर
Sat, 12/15/2012 - 11:05 नवीन
आणि ते कमी/जास्त करायचे आहे याचा अजिबात विचार न करणे. = सौ बातोंकी एक बात! वजन शरीराला आहे, आपल्याला नाही हे कळल्याक्षणी एकदम हलकं वाटायला लागतं आणि सगळं लाइनीत येतं
  • Log in or register to post comments

लई भारी वजन शरिराचं आणि आपण

५० फक्त
Sat, 12/15/2012 - 14:54 नवीन
लई भारी वजन शरिराचं आणि आपण म्हणजे आत्मा, त्याला काय वजन बिजन नसतं. बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

च्यायला, हे इतका वेळ कसं सुचलं नाही?

संजय क्षीरसागर
Sat, 12/15/2012 - 14:56 नवीन
चिर्कुट तू स्लिम मुलीशी लग्न कर! ती तुला एकदम मापात आणेल. (मग नवे प्रश्न निर्माण झाले की पुन्हा धागा काढ.)
  • Log in or register to post comments

>>चिर्कुट तू स्लिम मुलीशी लग्न कर!

चिर्कुट
Mon, 12/17/2012 - 11:11 नवीन
आधी तर चुकून मुस्लिम मुलीशी लग्न कर असं वाचलं.. :) मी लाख तयार होईन हो स्लिम मुलीशी लग्न करायला, तिने तयार व्हायला हवे ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काही नाही वो सोपा उपाय आहे

शिवप्रसाद
Sat, 12/15/2012 - 16:51 नवीन
काही नाही वो सोपा उपाय आहे फक्त दर रविवारी शेतात जाउन भरपुर काम करायचे ज्यांना शेत नसेल त्यांनी माझ्याशि संपर्क साधावा माझे शेत जवळ्च आहे
  • Log in or register to post comments

सगळ्या प्रतिसादांपैकी एक

जेनी...
Sat, 12/15/2012 - 21:29 नवीन
सगळ्या प्रतिसादांपैकी एक भन्नाट प्रतिसाद . एकदं पटलं बगा आपल्याला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवप्रसाद

खूपच मस्त उपाय.

रेवती
Sat, 12/15/2012 - 21:44 नवीन
खूपच मस्त उपाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवप्रसाद

हम्म

चिर्कुट
Mon, 12/17/2012 - 11:14 नवीन
आमचे शेत आहे गावाकडे.. दर रविवारी नसलो तरी महिन्यातून एकदा जाणे होते. २-३ वेळा मळणी, सोयाबीन, भुईमूग काढणे इ. कामांसाठी गेलो होतो.. नंतर ३-४ दिवस झोपून काढावे लागले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवप्रसाद

सगळ्यात सोप्पा उपाय....

बाबा पाटील
Sat, 12/15/2012 - 23:28 नवीन
किरकिर्‍या पोरीशी लग्न करावे व तिला पाठराखण म्हणुन सोबत तिच्या आईला पन घरी आणावे,महिन्याभरात आहे नाही ते वजन कायमचे कमी होईल.....हि हा हा हा हा.....
  • Log in or register to post comments

@अजून काही टिप्स असतील तर

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/16/2012 - 00:05 नवीन
@अजून काही टिप्स असतील तर प्लीज सुचवा..>>> हा पण उपाय Image removed. करून बघा =))
  • Log in or register to post comments

गुर्जी जास्त हालू नका, तो

सोत्रि
Sun, 12/16/2012 - 01:58 नवीन
गुर्जी जास्त हालू नका, तो पोटाचा दोर सुटून वर सरकला तर पंचाइत होऊन जाइल हो :) -(साचलेल्या चरबीची लागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

-(साचलेल्या चरबीची काळजी

सोत्रि
Sun, 12/16/2012 - 01:59 नवीन
-(साचलेल्या चरबीची काळजी लागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

हा हा..

दादा कोंडके
Sun, 12/16/2012 - 02:09 नवीन
तो पोटाचा दोर सुटून वर सरकला तर पंचाइत होऊन जाइल हो
ही अ‍ॅड आठवली. :) http://youtu.be/DlwFxYBBm0o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

@(साचलेल्या चरबीची लागलेला)

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/16/2012 - 06:23 नवीन
@(साचलेल्या चरबीची लागलेला) सोकाजी>>> =)) तुमचा अनुभव कळला,हालत समजू शकतो =)) दु:ख्खात सहभागी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आईनस्टाईनचा उपाय=

चौकटराजा
Sun, 12/16/2012 - 06:09 नवीन
आईनस्टाईन म्हणतात " या जगात सारेच काही तुलनात्मक आहे . त्यांचे रिलेटीव्हिटीचे प्रतिपादन प्रसिद्ध आहे. आपण आपल्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाला भरपूर खायला घाला. त्यांची वजने वाढतील . म्हणजेच तुमचे वजन कमी होईल. शेवटी यश आल्यानंतर अल्बर्ट आईनस्टाईन यांचा एक फोटो देवघरात ठेवा. बाबा आईन्स्टाईन महाराज की जय !
  • Log in or register to post comments

बापरे

अनिल तापकीर
Sun, 12/16/2012 - 09:13 नवीन
बापरे
  • Log in or register to post comments

३२ किलो वजन कमी करायचा माझा अनुभव

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 12/16/2012 - 10:43 नवीन
मध्यंतरी मला झालेल्या अपघातामधुन बर होण्यासाठी काही स्टेराइड्स घेत होतो. त्यामुळे माझ वजन ८० किलो वरुन थेट ११२ किलो वर गेल होत. ते मी परत ८० किलो वर आनलय़ आणि सद्ध्या ८०~८२ मधे चालू आहे. माझ डाएट आणि व्यायाम सांगतोय. पण तो सगळ्यांना सहन होईल अस नाही. मी आधी कचकून व्यायाम करायचो म्हणून शक्य झालाय. १. सकाळी ५.४५ ला जिम मधे जाऊन १० मिनिट वॉर्म अप करण. २. ट्रेड मिल वर २५ मिनिट जॉगिंग +५ मिनिट चालायच. (मी जाड झालो असताना २ मिनिटाला मला धाप लागायची. पण रोज अर्धा ते एक मिनिट जॉगिंग वाढवायच. (साधारण ३.२ किमी अंतर पळून होत + ३०० मी. ५ मिनिटात कूल डाऊन साठी) ३. नंतर २-३ मिनिट आराम करा. आणि क्रॉस-स्टेपर नावाचा प्रकार असतो तो २० मिनिट करायचा. सुरुवातीला वाट लागते पण २ आठवड्या मधे स्टॅमिना वाढायला लागतो. हा माझा कॅलोरी जलायचा मुख्य व्यायाम आहे. ४. परत २-३ मिन आराम करायचा. आणि १५~२० मिनिट ट्रेड-सायकल वर साधारण ८-१० किमी व्यायाम करावा. (अतिशय सोपा असत.) ५. प्रत्येक व्यायाम प्रकारच्या मधे ग्लुकोस पाणी प्याव. जास्त नाही. ६. आपल्या गूढग्यांवर ताण येणार नसेल तर २०० दोरीवारच्या उड्या. ७. ह्याच्यानंतर रेग्युलर वेट ट्रेनिंग करायच. ते आपल्या जिम च्या ट्रेनर कडून आपल्या प्राकृतीप्रमाणे ठरवून घ्यावे. ८. व्यायाम झाल्यावर स्टॅमिना रेकवर होण्यासाठी दीर्घ श्वास घेऊन तो जोरात सोदावा. असे साधारण २०-२० चे ३ सेट करायचे. ९. शवसन करव. मी आधीपासून व्यायाम करतोय त्यामुळे मला एवढा व्यायाम सहन होतो. सर्वांना सहन होईलच असा नाही. त्यामुळे आपली प्रकृती लक्षात घेऊन हलू हलू वाढवत न्या. ५ महिन्यामाधे मी ३२ किलो वजन कमी केलाय. ह्या सर्व व्यायाम साधारण २ तासात संपतो. आळस करू नका. सुरुवातीला कंटाळा येतो. पण नंतर हलू हलू परिणाम दिलायला लागले की स्वात्हून उत्साह येतो. ________________ माझ डाएट. १. सकाळी जिम मधून आल्यावर २ पोळ्या + दूध+ २ अंडी आठवड्यातून २ वेळा. (बिस्किट टाळा.) २. मोठा बाऊल मोड आलेली मिश्र कड-धन्य. ______ कंपनी मधे गेल्यावर साधारण दुपारी १ वाजता घरचा डबा ३ पोल्या भाजी. आणि १० मिनिटांचा पॉवर न्याप. ४ वाजता कॉफी २ कप. घरी यायची वेळ साधारण ७.३० ऑर ८.३० ची आहे. मग ९ वाजता जेवण. रात्री चाय जेवणात ३ पोल्या- भाजी, आमटी. आणि जास्तीत जास्त कोशिंबीर. भात आवडत नाही त्यामुळे अजिबात नाही. रात्री ११.३० ला झक्क पैकी झोप. _______ कुठलाही व्यसन नसल्याने मला अजुन फायदा झाला. रविवार चा उत्तम व्यायाम म्हणजे मनसोक्त झोप काढणे. खण्यापिण्याच्या वेळा फिक्स ठेवा. कोणाला अजुन माहिती हवी असेल तर मला नक्की विचारा.
  • Log in or register to post comments

तुम्ही खूपच दणकट प्रकॄतीचे

अप्पा जोगळेकर
Sun, 12/16/2012 - 12:04 नवीन
तुम्ही खूपच दणकट प्रकॄतीचे आणि निर्व्यसनी मॅचोमॅन आहात तसेच तुम्ही कंपनीमध्ये जाउन कामसुद्धा करता हे कळले. इतका व्यायाम करणारे लोक दिवसभर व्यायामाबद्दलच विचार करत बसतात तसेच अधूनमधून वॉशरुममधे जाऊन आरशात स्वतःची बॉडी न्याहाळत बसणे हा त्यांचा आवडता छंद असतो असे निरीक्षण आहे. काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीशी माझी पहिल्यांदा भेट झाली आणि मी सहजपणे ,"तुम्ही काय करता?" असा प्रश्न विचारला. त्यावर तितक्याच सहजपणे ,"मी व्यायाम करतो." असे उत्तर त्या इसमाने तितक्याच सहजपणे दिले होते. त्या प्रसंगाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 12/16/2012 - 17:02 नवीन
दिवसभर बॉडी बीडी बघायला वेळ नाही मिळत हो. फक्त व्यायाम चुकवला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते मी भोगलेले आहेत म्हणून. Compulsive Disorder म्हणलात तरी काही हरकत नाही :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

हा हा...

दादा कोंडके
Mon, 12/17/2012 - 14:20 नवीन
आमच्या ऑफीस मध्ये एक बॉडीबिल्डर होता. कॅंटीन मध्ये दिसायचा. अक्षरशः लहान भावाचा शर्ट घालून यायचा बहुतेक. दोन बटणांमधला शर्टाचा भाग ताणून मधून बनियन दिसायचं इतका तटातट बसणारा शर्ट असायचा तो. प्रत्येक मिनिटाला उजव्या हाताने डावी पुढे आलेली भरदार छाती चाचपून बघायचा. काय बघायचा काय माहीत? बहुतेक त्या मापाचं बनियन मिळत नसल्यामुळे ब्रा घालत असावा आणि तो व्यवस्थित बसलाय का ते चेक करत असावा असं माझा मित्र म्हणाला होता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

हा हा..

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/17/2012 - 21:12 नवीन
एकच बाजू पूढे आहे क त्याची? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

घाम फुटला..

अनन्न्या
Mon, 12/17/2012 - 11:27 नवीन
सर्व उपाय वाचूनच घाम फुटला आणि त्यामुळे १०० ग्रॅम वजन उतरले.
  • Log in or register to post comments

आहाराबद्दलची उत्तम माहीतीhttp

शैलेंद्रसिंह
Mon, 12/17/2012 - 11:59 नवीन
आहाराबद्दलची उत्तम माहीती http://exrx.net/Nutrition/DietaryGuidelines.html
  • Log in or register to post comments

सुखि लोक्स

स्पा
Mon, 12/17/2012 - 14:55 नवीन
:-( सुखि लोक्स
  • Log in or register to post comments

मी सुचवु का???

दिपस्तंभ
Mon, 12/17/2012 - 22:57 नवीन
सर्वात चांगला व्यायाम म्हणजे "पोहणे"..... यामुळे तुमचा चपळ्पणा आणी उत्साह दुप्पट होइल. शीवाय मुक्ख्य म्हणजे वजन ही पद्द्तशीर उतरेल......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा