यंदा दिवाळीच्या काळात १ आठवड्याच्या सुट्टीवर घरी गेलो होतो. माझे वाढलेले आकारमान पाहुन बरेच टोमणे बसत होते, तरीही फराळ/इतर खाणं हादडणे चालूच होते. :) पण एके दिवशी अचानक लक्षात आलं की माझा मलाच मी उचलत नाहीये.. :( त्यात माझ्या घरी शुगरची हिस्ट्री आहे, त्याची भीती आहेच. मग ठरवलं की आता शेंडी तुटो वा पारंबी, वजन कमी करणारच..
मी असं बोलून दाखवायचा अवकाश की सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. 'एक वेळचं जेवण बंद कर', हे खाणं सोड, ते खाणं सोड, असा व्यायाम कर, तसा प्राणायाम कर, नुसतं हैराण करुन सोडलं होतं सगळ्यानी. शेवटी गुगलबाबाला शरण गेलो आणि माझ्या समजाप्रमाणे आणि जितकं शक्य आहे त्यानुसार खालील प्लॅन बनवला..
१. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास
२. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल
३. १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा
४. १२:३० वा जेवण (४ छोटे फुलके आणि भाजी)
५. ३:३० / ४:०० वा फळं (टरबूज/कलींगड/चिक्कू/पेरु/सफरचंद - मिक्स)
६. ४:३० ते ६:०० जिम (२० मि ट्रेडमिल १७५ कॅ. बर्न + २० मि. इलिप्टिकल १७५ कॅ. बर्न + सायकलिंग ५० कॅ. बर्न + १०मि. वजन/अॅब्स)
७. ७-७:३० वा स्प्राऊट्स / एखादं फळ / उकडलेली अंडी २ (मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का?)
८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात)
या सगळ्याबरोबर दिवसभर जवळपास ४ लिटरपेक्षाही जास्त पाणी पिणे, दिवसातून दोन -तीन वेळा ३ मजले पाय-या चढणे-उतरणे.क्वचित रात्री बॅडमिंटन खेळणे इ. चालूच आहे.
आठवड्यातून ५ दिवस जिम जातोच जातो. विकांताला खेळणे/फिरणे इ. होतं.
अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळे आणि माझे पाककौशल्य वादातीत असल्यामुळे 'किती खायचं' यावर असला तरी 'काय खायचं' यावर कंट्रोल थोडा कमीच आहे. :) शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद. स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही.
गेल्या १२-१५ दिवसांत वजन १.५ किलो कमी झाले आहे. अजून १० किलो कमी करायचा प्लॅन आहे. घाई अजिबात नाही तरीही ६ महिन्यात गोल अचिव्ह व्हावं असं वाटतय. वरील वेळापत्रकामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? अजून काही टिप्स असतील तर प्लीज सुचवा..
वाचने
64636
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला डांस करायला आवड्तो
सध्या पाण्याचा दुष्काळ
सटीप शुभेच्छा !
शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद.मग येथे मिपा काय कार्तुसा रे .... ४.स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही.हो का बर्र .... ५.अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळेक्र. चार आणि पाच शादी .कॉम वरून चुकून कॉपी - पेस्त झालेत का ? असो निग्रह राहु दे .म्हणजे (.....पुढच्या दिवाळी पर्यंत २ चे ४ नकोत )तर्री साहेब,
In reply to सटीप शुभेच्छा ! by तर्री
दलिया घ्या
वजन कमी करणारा आहार....
संध्याकाळी ४:३० ला घरी परत
धन्यवाद
हा अनुभव
In reply to धन्यवाद by चिर्कुट
मला पण सल्ला हवाय..
नमस्कर. मि इथे अगदिच नवीन आहे
फक्त चार गोष्टी करा
१००% टक्के सहमत. - पिंगू
In reply to फक्त चार गोष्टी करा by संजय क्षीरसागर
एक साधं गणित सांगतो. १ पौंड
. वजन पौंडात घ्या. हा थंबरूल
In reply to एक साधं गणित सांगतो. १ पौंड by हारुन शेख
मी मध्यंतरी माझ्या नवर्याच
मला चार लिटर पाणी जास्त वाटतय
In reply to मी मध्यंतरी माझ्या नवर्याच by स्पंदना
येस्स!
In reply to मला चार लिटर पाणी जास्त वाटतय by हारुन शेख
आमचा उपाय
त्यापेक्षा आपल्याला पसंत न
In reply to आमचा उपाय by चौकटराजा
मी बलक सुद्धा खातो. याचा
Triglyceride
In reply to मी बलक सुद्धा खातो. याचा by हारुन शेख
बाब्बौ! व्यायाम बराच करताय
थोडेसे बदल सुचवतेय
१० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा
In reply to थोडेसे बदल सुचवतेय by michmadhura
अहो हे सगळे quality eating
In reply to १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा by बाबा पाटील
स्वस्थ व्यक्ती आणी स्थुल व्यक्ती यात फरक आहे...
In reply to अहो हे सगळे quality eating by michmadhura
तुम्ही सांगत आहात ते ही बरोबर
In reply to स्वस्थ व्यक्ती आणी स्थुल व्यक्ती यात फरक आहे... by बाबा पाटील
जाड्यांनी बटाटा कश्याच प्रकारे खाऊ नये,,,,
In reply to तुम्ही सांगत आहात ते ही बरोबर by michmadhura
हे वाचा
In reply to जाड्यांनी बटाटा कश्याच प्रकारे खाऊ नये,,,, by बाबा पाटील
पुस्तक आणी अनुभव यात फार फरक असतो....
In reply to हे वाचा by michmadhura
तुमचा अनुभव नक्कीच
In reply to पुस्तक आणी अनुभव यात फार फरक असतो.... by बाबा पाटील
सल्ला देण डॉक्टरच काम....
In reply to तुमचा अनुभव नक्कीच by michmadhura
अहो माझा तुम्हाला विरोध
In reply to सल्ला देण डॉक्टरच काम.... by बाबा पाटील
अजून एक सजेशन
In reply to थोडेसे बदल सुचवतेय by michmadhura
अजुन एक क्रॅश कोर्स
तुला सर्वात जास्त गरज आहे
In reply to अजुन एक क्रॅश कोर्स by मी-सौरभ
हे एकदम बरोबर....
In reply to अजुन एक क्रॅश कोर्स by मी-सौरभ
संजय सर, हारुन सर, मीचमधूरा, रेवती, अपर्णा तै आणि
एकदम बरोबर.
In reply to संजय सर, हारुन सर, मीचमधूरा, रेवती, अपर्णा तै आणि by चिर्कुट
सगळं पटलं .
उलटे लटका
वजन कमी करण्यासाठी सोप्पा उपाय पण तितकाच कठीण करायला.
खुपच छान माहिती...नवीन
रात्रीचे जेवण.
अस कुठे आले आहे ?
In reply to रात्रीचे जेवण. by प्रभाकर पेठकर
आणि सूर्यास्तानंतर तर आपला दिवस सुरू होतो!
In reply to अस कुठे आले आहे ? by बाबा पाटील
आयुर्वेदाचार्य..
In reply to अस कुठे आले आहे ? by बाबा पाटील
मेलो!!!
च्याय्ची कट्कट!
In reply to मेलो!!! by सुनील
दारु न पिता झालेला ठन ठन
In reply to मेलो!!! by सुनील
अरे वा ! वजन उतरवावंसं वाटलं
आळस
प्राडॉ नियमित सायकलवरुन घर ते
In reply to आळस by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रोज २० किमीपर्यंत सायकल
In reply to प्राडॉ नियमित सायकलवरुन घर ते by पिंगू
खोट्टं काय, २० किमी म्हणजे २०
In reply to रोज २० किमीपर्यंत सायकल by सुहास..
ऑ?
In reply to खोट्टं काय, २० किमी म्हणजे २० by ५० फक्त
आणि...
In reply to ऑ? by गवि
मी कमी केले नाही वजन , पण आहे
५) वजन कमी करणे वा माझ वजन वाढलयं
लई भारी वजन शरिराचं आणि आपण
In reply to ५) वजन कमी करणे वा माझ वजन वाढलयं by संजय क्षीरसागर
च्यायला, हे इतका वेळ कसं सुचलं नाही?
>>चिर्कुट तू स्लिम मुलीशी लग्न कर!
In reply to च्यायला, हे इतका वेळ कसं सुचलं नाही? by संजय क्षीरसागर
काही नाही वो सोपा उपाय आहे
सगळ्या प्रतिसादांपैकी एक
In reply to काही नाही वो सोपा उपाय आहे by शिवप्रसाद
खूपच मस्त उपाय.
In reply to काही नाही वो सोपा उपाय आहे by शिवप्रसाद
हम्म
In reply to काही नाही वो सोपा उपाय आहे by शिवप्रसाद
सगळ्यात सोप्पा उपाय....
@अजून काही टिप्स असतील तर
गुर्जी जास्त हालू नका, तो
In reply to @अजून काही टिप्स असतील तर by अत्रुप्त आत्मा