Skip to main content

मिसळपाव - नवी रचना

लेखक सरपंच यांनी बुधवार, 19/09/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील. राहीलेली कामे. - १ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही. - नीलकांत

वाचने 48704
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

बदल, नविन रुपडे आवडले आहे. जिथे तिथे दिसणारे इंग्रजी शब्द बदलून मराठी करता आले तर उत्तम. धन्यवाद आणि अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

असेच म्हणतो. ['हिरवा माज' मात्र अंमळ जास्त वाटला हो ;)]

In reply to by नंदन

सहमत आहे.

In reply to by नंदन

>>>'हिरवा माज' मात्र अंमळ जास्त वाटला हो ;) हा हा! कदाचीत सरपंचांनी ग्रीन साईट तयार करायचे धोरण आखले असावे! असो नवीन रूप आवडले. तॄटी अनेकांनी सांगितल्याच आहेत. त्यावर काम चालू असूनही (मिपाचा) रस्ता बंद न ठेवल्याबद्दल आभार! :-)

In reply to by विकास

मला या लेखावरती विकास यांचा वरील प्रतिसाद दिसतो. त्यावरचे कुठचेच प्रतिसाद दिसत नाहीत. खालच्यांतही काही मोजकेच दिसतात. व्यनिदेखील असेच रिकामे झालेले आहेत. काही काही भाग दिसतात, पण बहुतांश म्याटर गायब झालेलं आहे. इतरांनाही असाच अनुभव आहे का? हे तात्पुरतं आहे अशी आशा करतो.

In reply to by राजेश घासकडवी

माझ्या खात्यात व्य नि रँडमली रिकामे झाले आहेत,आ॑णि स्वतःला पाठवलेले सगळे व्य नि रिकामे झाले आहेत

In reply to by राजेश घासकडवी

प्रतिसादाचं आणि लेखनाचं मात्र तात्पुरतं आहे. व्य.नि.मात्र जशाच तसे आहेत, तरीही चौकशी करुन माहिती लिहितो. -दिलीप बिरुटे

In reply to by राजेश घासकडवी

बरेच प्रतिसाद दिसत नाहीत. बरेच व्यनि दिसत नाहीत... काही जुने लेखही दिसत नाहीत. कारण एकच असावं. ते सारं सुरक्षीत आहे. पण त्याचाही मार्ग नीट आखून देण्यात काही अडथळे आले असावेत. माझेही व्यनि उडाले आहेत. त्यातले काही तर 'पुरावे' होते हो...

In reply to by श्रावण मोडक

"शोध" मधून जुना धागा काढल्यावर धाग्यातील मजकूर दिसत नाही. फक्त प्रतिक्रीया दिसत आहेत.

In reply to by श्रावण मोडक

"शोध" मधून जुना धागा काढल्यावर धाग्यातील मजकूर दिसत नाही. फक्त प्रतिक्रीया दिसत आहेत. उदा. बाजुच्या मिसळपाव २ वर क्लिक करून बघा.

In reply to by चिंतामणी

मिसळपावच्या बांधणीत टेक्स्ट फॉर्मेट फूल एचटीएमएल, प्लेन टेक्स्ट, फिल्टर्ड एचटीएमल, यापैकी फूल एचटीएमल सलेक्ट करायचे असते, मिपाची बांधणी करतांना ते डिफॉल्ट करायचे राहून गेले. मिपाची बांधणी करणारे काही तातडीचे कामामुळे मिपापासून कमीत कमी आठेक दिवस दुर असणार आहेत, ते आले की सर्व लेखन-प्रतिसाद आणि व्य.नि. पूर्ववत दिसायला लागतील. काळजीचं कारण नाही. :) >>> उदा. बाजुच्या मिसळपाव २ वर क्लिक करून बघा. आता बघा बरं दिसतंय का नाही ! :) [संपादकांनी असे लेख किंवा प्रतिसाद फूल एचटीएमल मोडमधे नेले की सर्व लेखन पूर्ववत दिसायला लागतात. आता एकेक लेख आणि एकेक प्रतिसादांना त्या मोडमधे नेण्याचे कंटाळवाणे काम आहे ] :) -दिलीप बिरुटे

In reply to by राजेश घासकडवी

माझं जुनं लेखन शाबूत आहे का हे पहाण्यासाठी माझ्या लेखनावर मी गेलो. http://www.misalpav.com/user/8578/authored मात्र त्यातल्या "जनातलं, मनातलं प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय 35 Tue, 24/04/2012 - 04:03" यावर क्लिक करायला गेलो की आख्खी लिस्ट वरखाली होत रहाते... हा माझ्याच स्क्रीनचा दोष आहे की इतरांनाही असा अनुभव येतो हे तपासून बघायचं आहे. याआधी मात्र असं कधी झालेलं नव्हतं.

अभिनंदन आणि धन्यवाद. कोणत्याही धाग्यावर 'नविन प्रतिसाद' बघायला गेलं तर नविन प्रतिसादाच्या इथे पेज कंट्रोल जातोय ( बहुतेक ) , पण प्रतिसादाजवळ 'नविन' दिसत नाहीये.

In reply to by पुष्करिणी

धाग्यावर 'नविन प्रतिसाद' बघायला गेल्यास, पेज कंट्रोल नविन प्रतिसाद दाखवतोय पण प्रतिसादा नजिक 'नविन' असं दिसत नाहीये.

अजुन काही ठिकाणी काम चालु असावे असे जाणवत आहे. सुचनेसाठीच्या येथे नोंद करावी ही लिंक वल्लीच्या धाग्यावर घेवुन जात आहे.

मिपा नव्या स्वरुपात पाहतांना आनंद होत आहे, मिपाच्या वाटचालीस शुभेच्छा. १)लेख कोणी लिहिला आहे, लेखात लेखकाचे नाव नाही. २)नवीन रचनेत काही अडचणी असल्यास येथे नोंद करता येईल. इथे चा दुवा गंडला आहे. ३) मिपा इडिटर्स (बटनं ) दिसत नाही. ४) मराठीकरण बाकी. ५)अक्षरांचा आकार थोडा मोठा करावा. ६)प्रतिसादाचा बॉक्स मॅन्युली मोठा करावा लागतोय. ७)पूर्वीची रंगसंगती आणता आली तर आणावी. ;) तूर्तास इतकेच अजून बरीच कामे राहीलेली दिसत आहेत. नवीन मिपावर जरासं बावरल्यासारखं होतंय पण नव्याचीही सवय होईल. आणि अजूनही बरेच बदल बाकी दिसत आहेत, अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा. :)

संपादक महोदय्,अतिशय स्वागतार्ह आणी छान बदल्,विशेषतः रंगसंगती डोळ्यांना सुखावणारी आहे.

नवं रुप आवडलं. मिपाचा लोगो भन्नाट आहे. मिपाटिमचे अभिनंदन आणि धन्यवाद. काही अडचणी. (येता जाता अपडेटवत राहुच) १) नवी खरड वा संदेश आल्यावर खवत/इन बॉक्समध्ये गेल्याशिवाय कळत नाही. २) नवीन आलेल्या प्रतिसादांचा 'नवीन' हे लाल वा ठळक करावे. ३) प्रतिसाद देतानाचा टुल बॉक्स गायब आहे.

एकदमच बदलले की मिपा! सवय व्हायला थोडा वेळ लागेल. लवकरात लवकर काम आटोपून मिपा पुन्हा एकदा आमच्यासाठी खुले केल्याबद्दल धन्यवाद आणि राहिलेल्या कामासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी शुभेच्छा. फाँट थोडा मोठा ठेवता येईल का?

In reply to by यकु

"मिळमिळित" हा शब्द वापरायचाय का तुला? माझं म्हणणं :- फुक्टात मिळतय त्यात नशीब माना. फुकट ते पौष्टिक. ह्याला खराब म्हणायला आपण काही दमड्या मोजलेल्या नाहित.

In reply to by मन१

हो.. मिळमिळीत.. >>>>ह्याला खराब म्हणायला आपण काही दमड्या मोजलेल्या नाहित. दमड्या मोजलेल्या असो की नसो - खराब असेल त्याला खराबच म्हणणार... आणि पूर्वीच्या तुलनेत म्हणतोय ते लक्षात घे.

मिपाची खास ओळख असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि लाडक्या तुकाराम महाराजांचा फोटो येऊ द्या. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि लाडक्या तुकाराम महाराजांचा फोटो येऊ द्या" ते आणि कशाला आता? :)

मस्त रुप आहे....आवडले.फारच डिसेंट ! नवीन लेखनाखाली लेखाचे नाव बरोबर दिसत आहे पण लेख उघडल्यावर मात्र अक्षरे गंडलेली दिसतात....

एडीटर मध्ये फॉर्मॅटींग चा पर्याय उपलब्ध नाही. ( बोल्ड, इटॅलीक, रंग, चित्र चढवण्याचा पर्याय वगैरे... )

बर्‍याच ठिकाणी "वाचणे" झालं आहे. ते "वाचने" करता येईल का?

.. दचकलोच! मिपावर आता शासकीय मराठी येणार का काय? ! नवा फॉर्म्याट छान आहे. जरा रूळायला वेळ लागेल. या उर्ध्वश्रेणीकरणावर काम करणार्‍या मंडळीना या 'लष्करच्या भाकर्‍या भाजल्याबद्दल' धन्यवाद.

नविन रचना वेगळी वाटली,हिरव्याच्या जागी आधीचा रंग जास्त आकर्षक वाटत होता... असो सवय होईल हळुहळु. फोटो टाकण्याची सुविधा कुठेही दिसत नाहीये ! खरवडवहीत देखील फोटो /व्हिडीयो लावता येत नाही.

बदल स्वागतर्ह!! फक्त स्वगृहा वरिल फोटो उजवीकडिल फ्रेम झाकतोय कीन्वा त्या़खाली झाकला जातोय.

मि. पा. वर आल्यासारख वाटलच नाही आम्हाला तर बुवा पुर्वीच मि . पा. जास्ती भारी वाटत :) तर्रिवाल्या ,लालेलाल,रसरशीत मिसळीच्या फोटोची प्रकर्षाने आठ्वण झाली असो .....

बदल आणि इन्कमटॅक्स या दोन गोष्टी कधीच टाळता येत नाहीत, तस्मात बदलाचे स्वागत. सवय व्हायला वेळ लागेल. बाकी स्वगृहावर एकच धागा दिसतोय आणि पुर्वी ज्या क्याट्यागिरी दिसायच्या त्या दिसत नाहीत. बाकी या मागं कष्ट घेणा-या सर्वाची नावं कळाली तर फार बरं होईल मालक, तेवढं कराच. एवढं चांगलं करुन उगाच प्रसिद्धी परांमुख नका राहु. आणि हो अजुन क्रोम आणि गमभनचं तात्विक भांडण मिटलेलं दिसत नाही. त्या गुगलला खेचावं का कोर्टात ?

In reply to by ५० फक्त

>>>>बाकी या मागं कष्ट घेणा-या सर्वाची नावं कळाली तर फार बरं होईल मालक, तेवढं कराच. एवढं चांगलं करुन उगाच प्रसिद्धी परांमुख नका राहु. नीलकांत आणि प्रशांत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा अपडेट करण्यासाठी ज्या मिपासदस्यांनी त्यांच्याबाबतीत नीलकांत लवकरच लिहणार... ...आणि इतरहि बरच काहि :)

खुप मेहनत घेतलेली दिसत आहे नव्या रुपावर !! नव्या स्वरूपात मिपा सादर केल्याद्बद्दल धन्यु.. फक्त हॉटेलात आणि इतर इंग्रजी शब्द ' अ‍ॅव्हॉईड' करता आले तर बरे होइल :)

झकपक झाली की ओ साईट तुमची ! हाच प्रतिसाद देण्यासाठी आधी आलो होतो पण 'पूर्वपरिक्षण' करतानाच साईट गंडली.. म्हटलं 'वाखाणला गुरव...' असो, साईट छान दिसतेय. नविन प्रतिसाद जर ठळकपणे ओळखता आले तर बघा. मिपा लोगो पण मस्त आहे.

नविन नविन मि.पा.... छान/छान मि.पा... गंपा म्हणतो तसं टूलबॉक्स हवी(च)... नायतर आम्ही सहजपणे स्मायल्या कश्या टाकणार... ;) ...नै...टाकता येतील,पण दुसरीकडून, मंजे शंकराचं फुल काढून गणपतिवर वहायचं,,,तससं नक्को.. :(

नविन मिपा छान. १. माझे किंवा इतरांचे लेखन बघायचे असल्यास कसे बघता येईल? आधी सदस्य क्र. देऊन authored लिंक वर जाऊन बघता येत होते. पण आता काहींचे नंबर दिसत आहेत तर काहींची नावे. २. नविन प्रतिसाद ठळक 'लाल' रंगात हवा. ३. सदस्यांबरोबरच किती पाहुणे आलेले आहेत ते दिसत नाही. बाकी मिपामधला 'शोधा' खूपच पॉवरफुल झालाय असे निरिक्षण नोंदवतो.

आपल्याला हे नवे रुपडे अज्जीबात आवडलेले नाही. अतिशय भयावह रुपडे आणि भयानक फाँटस आहेत. नीलकांत आणि प्रशांत सारख्या निष्णात तज्ञांनी ही रचना केली आहे ? विश्वासच बसत नाही !

In reply to by परिकथेतील राजकुमार

आपल्याला हे नवे रुपडे अज्जीबात आवडलेले नाही. अतिशय भयावह रुपडे आणि भयानक फाँटस आहेत. अगदी असेच म्हणावेसे वाटते. पूर्वीचेच मिपा चांगले होते. ते परत आणा ही विनंती.

च्यायला हे रुप म्हणजे दही साबुदाणा पोहे आणि पांचट तर्रि ( तर्री म्हणतात म्हणून) पण तिखट पणा नाही. आधीच प्रतिसाद पुर्वीसारखे खणखणीत झणझणीत नव्हते आता रुप पण मिळमिळीत झाले आहे. असो. आम्ही काही दमड्या मोजत नाही तुम्ही द्याल ते घेउ. विचारले म्हणून जे वाटले ते सांगितले. राग आल्यास माफ करा.

माझ्यामते एवढ्या टोकाच्या कमेंट्स देताना विचार करावा.. आजचं हे रूप काही फायनल नाही.. हि default थीम आहे .. लाल रंग येईलच.. फक्त सभासदांची गैरसोय होऊ नये म्हणून मिपा आज उघडले असावे.. येत्या १० १५ दिवसात योग्य ते बदल होतीलच.. वाट पाहूया कि.. लगेच बकवास म्हणून मोकळे :)

१.'शोध' (सर्च इंजिन) पूर्वी काम करत नव्हतं. आता मस्त चालतंय. एक तृटी आहे अजुनही - अगदी पहिल्यांदा 'शोध' मध्ये जाउन 'साहित्य' किंवा 'युजर्स' टॅब्ज् मध्ये गेल्यास तिथल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये 'गारबेज व्हॅल्यू' असते. २. प्रतिक्रियेचे पूर्वपरीक्षण केल्यानंतर 'प्रकशित करा' एवजी 'साठवा' बटन येतयं.

पुर्वीचे रुपडे अंमळ झानटामाटिक होते! पण बदल इज मंत्रा ऑफ जीवन! त्यामुळे नवीन बदल स्वागतार्ह आहेतच! :) नीलकांत आणि प्रशांतचे विशेष अभिनंदन! - टिंग्या

मिपा लोगो भन्नाट अभिनंदन नवीन मिपाच्या रुपड्यात पूर्वीपेक्षा वेगळे म्हणजे कोणत्या सुविधा आहेत. कोणती गोष्ट जी पूर्वी होती व आता सध्यातरी नवीन मिपावर दिसत नाही आहे. ह्याचा अंदाज प्रतिसादावरून येत आहे. मात्र एका विस्तृत प्रतिसादात कोणीतरी जुन्या व नव्या मिपातील बदल सांगितले तर काय बहार येईल. म्हणजे प्रत्येक मिपाकराला जे सुचत आहे व जे बदल दिसत आहेत ते येथे ते टंकित आहेत पण त्यांचे एकत्रीकरण असलेला प्रतिसाद वाचायला आवडेल. मी मिपाच्या बाह्य अंगापेक्षा अंत रंगावर प्रेम करतो. उत्कृष्ट लेखक , चोखंदळ वाचक व त्यांचे प्रतिसाद ., आणि निरपेक्ष संपादक आणि मालक हे मिपा ची खरी शान आहे. बाह्य रूप हे खर्या आयुष्यात सुद्धा नेहमीच बदलत असते त्याला इलाज नाही.

सर्वप्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद काहि अडचणी सोडवण्यात आल्यात व इतर लवकरच अडचणी सोडवण्यात येतील. आणि हो हि फायनल थीम नाहिच लवकरच योग्य तो बदल करण्यात येईल धन्यवाद..!

हिरवा रंग पांढर्‍या पार्शवभूमीवर नीट वाटत नाही.अर्थात प्रशांत यानी म्हटल्याप्रमाणे हे अंतिम रूप नव्हे. पण ५ वर्षे हा व्याप सांभाळल्याबद्द्ल नीलकांत ,प्रशांत व बाकी अनामिक यांच्या बद्द्ल ऋण .

व्यनि लिहिताना मराठीत टाईप न होता इंग्रजीतच टंकला जातोय. तसेच संदेश पूर्वदृष्य न दिसता फक्त send message इतकेच दिसते आहे.

१)फोटो कसे अपलोड करावे? लेखन करा का उडवले? त्या ऐवजी ईंग्रजी प्रतिशब्द का? फोनेटिक टायपिंग केल्यानंतर g mail वर देवनागरीमधिल ४-५ पर्याय लेफ्ट क्लिक केल्यावर येत असतात तशी सोय येथे केली नाही. जिमेल वर मराठी टाइप करणे फारच सुलभ आहे. अगदी शिफ्ट न दाबताही ह्रस्व दिर्घ चुका होत नाहीत.अगदि मनासारखे व व्याकरणशुद्ध टंकन होत असते. ती सोय येथे हवी होती.

नवं (बदलतं!) रूपडं आवडलं. फक्त या आधीच्या रुपात 'स्वगृहा'वर गेल्यावर जसे सर्व प्रमुख विभाग (जनातलं-मनातलं, जे न देखे रवि, काथ्याकुट, भटकंती, पाककृती आणि कलादालन) एका दृष्टीक्षेपात त्यांच्या त्यांच्या latest ८-१० धाग्यांसह दिसायचे, तसे आता दिसत नाहीत, त्यामुळे प्रत्येक विभागात काय आहे हे ते त्या त्या दुव्यावर टिचकी मारून पहावं लागतं, म्हणजे ६ विभागांसाठी ६ टिचक्या; यामुळे थोडा वेळ आधिक लागतो. तेवढं जर पहिल्यासारखं मुखपृष्ठावर आणता आलं तर आवडेल. बाकी रंगसंगती नेत्रसुखद आहे ('हिरवा माज' म्हणण्यापेक्षा 'हिरवा साज' म्हणायला हरकत नाही :-))

In reply to by बहुगुणी

ते 'पेज अप' चं बाणाचं चिन्ह होतं तेही परत आलेलं आवडेल, प्रतिक्रिया वाचत खूप खाली गेलं की परत वर सुरूवातीला जाण्यासाठी बरंच स्क्रोल करायला लागतं. http://www.scrolltotop.com/ या ठिकाणी काही वेगवेगळ्या चिन्हांचे कोड्स आहेत.

In reply to by बहुगुणी

सर्व प्रमुख विभाग एका पानावर आणता आलं तर मलाही आवडेल.... रंगसगंती, मिपालोगो अन इतर बदल झक्कास झालेत....