✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपाव - नवी रचना

स
सरपंच यांनी
Wed, 09/19/2012 - 14:41  ·  लेख
लेख
नमस्कार, आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील. राहीलेली कामे. - १ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही. - नीलकांत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48092 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

नविन मिपा छान.

प्रचेतस
Wed, 09/19/2012 - 18:38 नवीन
नविन मिपा छान. १. माझे किंवा इतरांचे लेखन बघायचे असल्यास कसे बघता येईल? आधी सदस्य क्र. देऊन authored लिंक वर जाऊन बघता येत होते. पण आता काहींचे नंबर दिसत आहेत तर काहींची नावे. २. नविन प्रतिसाद ठळक 'लाल' रंगात हवा. ३. सदस्यांबरोबरच किती पाहुणे आलेले आहेत ते दिसत नाही. बाकी मिपामधला 'शोधा' खूपच पॉवरफुल झालाय असे निरिक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments

स्वारी !

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/19/2012 - 18:41 नवीन
आपल्याला हे नवे रुपडे अज्जीबात आवडलेले नाही. अतिशय भयावह रुपडे आणि भयानक फाँटस आहेत. नीलकांत आणि प्रशांत सारख्या निष्णात तज्ञांनी ही रचना केली आहे ? विश्वासच बसत नाही !
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 09/29/2012 - 16:38 नवीन
आपल्याला हे नवे रुपडे अज्जीबात आवडलेले नाही. अतिशय भयावह रुपडे आणि भयानक फाँटस आहेत. अगदी असेच म्हणावेसे वाटते. पूर्वीचेच मिपा चांगले होते. ते परत आणा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

माफी असावी

नाना चेंगट
Wed, 09/19/2012 - 18:43 नवीन
च्यायला हे रुप म्हणजे दही साबुदाणा पोहे आणि पांचट तर्रि ( तर्री म्हणतात म्हणून) पण तिखट पणा नाही. आधीच प्रतिसाद पुर्वीसारखे खणखणीत झणझणीत नव्हते आता रुप पण मिळमिळीत झाले आहे. असो. आम्ही काही दमड्या मोजत नाही तुम्ही द्याल ते घेउ. विचारले म्हणून जे वाटले ते सांगितले. राग आल्यास माफ करा.
  • Log in or register to post comments

निषेध.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/19/2012 - 20:10 नवीन
उल्लेखाचा '(सौम्य) निषेध'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

श्रद्धा सबुरी

स्पा
Wed, 09/19/2012 - 19:55 नवीन
माझ्यामते एवढ्या टोकाच्या कमेंट्स देताना विचार करावा.. आजचं हे रूप काही फायनल नाही.. हि default थीम आहे .. लाल रंग येईलच.. फक्त सभासदांची गैरसोय होऊ नये म्हणून मिपा आज उघडले असावे.. येत्या १० १५ दिवसात योग्य ते बदल होतीलच.. वाट पाहूया कि.. लगेच बकवास म्हणून मोकळे :)
  • Log in or register to post comments

+१११ टू स्पांडू :)

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/19/2012 - 23:43 नवीन
+१११ टू स्पांडू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

'शोध'

खडीसाखर
Wed, 09/19/2012 - 19:55 नवीन
१.'शोध' (सर्च इंजिन) पूर्वी काम करत नव्हतं. आता मस्त चालतंय. एक तृटी आहे अजुनही - अगदी पहिल्यांदा 'शोध' मध्ये जाउन 'साहित्य' किंवा 'युजर्स' टॅब्ज् मध्ये गेल्यास तिथल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये 'गारबेज व्हॅल्यू' असते. २. प्रतिक्रियेचे पूर्वपरीक्षण केल्यानंतर 'प्रकशित करा' एवजी 'साठवा' बटन येतयं.
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 09/19/2012 - 20:00 नवीन
पुर्वीचे रुपडे अंमळ झानटामाटिक होते! पण बदल इज मंत्रा ऑफ जीवन! त्यामुळे नवीन बदल स्वागतार्ह आहेतच! :) नीलकांत आणि प्रशांतचे विशेष अभिनंदन! - टिंग्या
  • Log in or register to post comments

मिपा लोगो भन्नाट

निनाद मुक्काम …
Wed, 09/19/2012 - 20:07 नवीन
मिपा लोगो भन्नाट अभिनंदन नवीन मिपाच्या रुपड्यात पूर्वीपेक्षा वेगळे म्हणजे कोणत्या सुविधा आहेत. कोणती गोष्ट जी पूर्वी होती व आता सध्यातरी नवीन मिपावर दिसत नाही आहे. ह्याचा अंदाज प्रतिसादावरून येत आहे. मात्र एका विस्तृत प्रतिसादात कोणीतरी जुन्या व नव्या मिपातील बदल सांगितले तर काय बहार येईल. म्हणजे प्रत्येक मिपाकराला जे सुचत आहे व जे बदल दिसत आहेत ते येथे ते टंकित आहेत पण त्यांचे एकत्रीकरण असलेला प्रतिसाद वाचायला आवडेल. मी मिपाच्या बाह्य अंगापेक्षा अंत रंगावर प्रेम करतो. उत्कृष्ट लेखक , चोखंदळ वाचक व त्यांचे प्रतिसाद ., आणि निरपेक्ष संपादक आणि मालक हे मिपा ची खरी शान आहे. बाह्य रूप हे खर्या आयुष्यात सुद्धा नेहमीच बदलत असते त्याला इलाज नाही.
  • Log in or register to post comments

उर्ध्वश्रेणीकरण

प्रशांत
Wed, 09/19/2012 - 20:14 नवीन
सर्वप्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद काहि अडचणी सोडवण्यात आल्यात व इतर लवकरच अडचणी सोडवण्यात येतील. आणि हो हि फायनल थीम नाहिच लवकरच योग्य तो बदल करण्यात येईल धन्यवाद..!
  • Log in or register to post comments

फोटो जुन्या पद्धतीने टाकता

रेवती
Wed, 09/19/2012 - 20:14 नवीन
फोटो जुन्या पद्धतीने टाकता येणार नाहीत का? नवी पद्धत कुठे दिलीये?
  • Log in or register to post comments

आवडेश .कुणाकुणाचा हातभार आहे

जेनी...
Wed, 09/19/2012 - 21:22 नवीन
आवडेश .कुणाकुणाचा हातभार आहे ह्या नव्या रुपाला तेहि आम्हाला कळु द्या . धन्यवाद .
  • Log in or register to post comments

यापेक्षा चांगले करता येईल

चौकटराजा
Wed, 09/19/2012 - 21:50 नवीन
हिरवा रंग पांढर्‍या पार्शवभूमीवर नीट वाटत नाही.अर्थात प्रशांत यानी म्हटल्याप्रमाणे हे अंतिम रूप नव्हे. पण ५ वर्षे हा व्याप सांभाळल्याबद्द्ल नीलकांत ,प्रशांत व बाकी अनामिक यांच्या बद्द्ल ऋण .
  • Log in or register to post comments

मिपा लोगो सुंदर आहे!

नावातकायआहे
Wed, 09/19/2012 - 21:50 नवीन
मिपा लोगो सुंदर आहे! वाचणखुणा का वाचनखुणा?
  • Log in or register to post comments

व्यनि लिहिताना मराठीत टाईप न

प्रचेतस
Wed, 09/19/2012 - 21:53 नवीन
व्यनि लिहिताना मराठीत टाईप न होता इंग्रजीतच टंकला जातोय. तसेच संदेश पूर्वदृष्य न दिसता फक्त send message इतकेच दिसते आहे.
  • Log in or register to post comments

काही शंका

बापू मामा
Wed, 09/19/2012 - 22:07 नवीन
१)फोटो कसे अपलोड करावे? लेखन करा का उडवले? त्या ऐवजी ईंग्रजी प्रतिशब्द का? फोनेटिक टायपिंग केल्यानंतर g mail वर देवनागरीमधिल ४-५ पर्याय लेफ्ट क्लिक केल्यावर येत असतात तशी सोय येथे केली नाही. जिमेल वर मराठी टाइप करणे फारच सुलभ आहे. अगदी शिफ्ट न दाबताही ह्रस्व दिर्घ चुका होत नाहीत.अगदि मनासारखे व व्याकरणशुद्ध टंकन होत असते. ती सोय येथे हवी होती.
  • Log in or register to post comments

भरपूर कष्ट घेतलेले आहेत ते जाणवतं..

बहुगुणी
Wed, 09/19/2012 - 22:28 नवीन
नवं (बदलतं!) रूपडं आवडलं. फक्त या आधीच्या रुपात 'स्वगृहा'वर गेल्यावर जसे सर्व प्रमुख विभाग (जनातलं-मनातलं, जे न देखे रवि, काथ्याकुट, भटकंती, पाककृती आणि कलादालन) एका दृष्टीक्षेपात त्यांच्या त्यांच्या latest ८-१० धाग्यांसह दिसायचे, तसे आता दिसत नाहीत, त्यामुळे प्रत्येक विभागात काय आहे हे ते त्या त्या दुव्यावर टिचकी मारून पहावं लागतं, म्हणजे ६ विभागांसाठी ६ टिचक्या; यामुळे थोडा वेळ आधिक लागतो. तेवढं जर पहिल्यासारखं मुखपृष्ठावर आणता आलं तर आवडेल. बाकी रंगसंगती नेत्रसुखद आहे ('हिरवा माज' म्हणण्यापेक्षा 'हिरवा साज' म्हणायला हरकत नाही :-))
  • Log in or register to post comments

आणि हो, एक राहिलं...

बहुगुणी
Wed, 09/19/2012 - 22:59 नवीन
ते 'पेज अप' चं बाणाचं चिन्ह होतं तेही परत आलेलं आवडेल, प्रतिक्रिया वाचत खूप खाली गेलं की परत वर सुरूवातीला जाण्यासाठी बरंच स्क्रोल करायला लागतं. http://www.scrolltotop.com/ या ठिकाणी काही वेगवेगळ्या चिन्हांचे कोड्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

+१

ऐक शुन्य शुन्य
Wed, 09/19/2012 - 23:40 नवीन
सर्व प्रमुख विभाग एका पानावर आणता आलं तर मलाही आवडेल.... रंगसगंती, मिपालोगो अन इतर बदल झक्कास झालेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

छान

निशदे
Wed, 09/19/2012 - 22:58 नवीन
नवीन रूप आवडले. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मिपा पेज फास्ट लोड होत आहे. बाकी वरच्या मा. मिपाकरांच्या सूचना आहेतच.
  • Log in or register to post comments

इथे विरुद्ध अनुभव

पुष्कर जोशी
गुरुवार, 09/20/2012 - 20:46 नवीन
इथे विरुद्ध अनुभव मी Opera 12.02 वापरत आहे .. दुप्पट वेळ लागतोय ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे

छोटीशी सूचना

एस
Wed, 09/19/2012 - 23:15 नवीन
'प्रकशित करा' च्या ऐवजी 'प्रकाशित करा' असे हवे...
  • Log in or register to post comments

आधीचे रंग छान होते. हे अतिच

शिल्पा ब
Wed, 09/19/2012 - 23:26 नवीन
आधीचे रंग छान होते. हे अतिच हिरवट झालंय. नविन प्रतिसादावर लाल रंगात "नविन" असं हवं. विचारलं म्हणुन सांगितलं इतकंच.
  • Log in or register to post comments

आधीचे रंग छान होते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/19/2012 - 23:45 नवीन
अहो, हे फक्त काही दिवसांसाठी आहे. सर्व सुरळीत पूर्वीसारखं होईल. कालजीचा कारण नाय. आता सध्या आपण काम करण्यार्‍यांचा उत्साह वाढवू या. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बदल

नीलकांत
गुरुवार, 09/20/2012 - 00:06 नवीन
नमस्कार, सिस्टीमच्या दृष्टीने महत्वाचे असे बदल झालेत. आता युझर इन्टरफेसवर काम सुरू करतोय. त्यामुळे येत्या काळात वर दिलेल्या जवळपास तक्रारी निकालात निघतील अशी आशा आहे. अर्थात मिसळपावची आधीची थिम परत येणार नाहीच. रंगाचा विचार होऊ शकतो. याशिवाय आणि काही अडचणी असतील तर त्या जरूर येथे मांडा म्हणजे किडे वेचताना (डिबगींग ) कामात येतील. बाकी सर्वांच्या कौतुकाबद्दल धन्यवाद. - नीलकांत
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन

किसन शिंदे
गुरुवार, 09/20/2012 - 05:28 नवीन
नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन!! मिपा चालू झालंय हेच खूप महत्वाचं आहे, बदल काय हळूहळू होतच राहतील. Font formating बटन्स अजूनही दिसत नाहियेत.
  • Log in or register to post comments

Marathi madhil best site

kulpras
गुरुवार, 09/20/2012 - 09:03 नवीन
Best luck for MIPA May I know MIPA members from Nashik ?
  • Log in or register to post comments

नवीन आधुनिक रूप आवडलं. फ्रेश

सांजसंध्या
गुरुवार, 09/20/2012 - 09:31 नवीन
नवीन आधुनिक रूप आवडलं. फ्रेश लुक आहे. महापुरुष, साहित्यिकांची चित्र आवश्यकच असतील तर ठीक आहे. नव्या मिपाला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

दिपक
गुरुवार, 09/20/2012 - 09:33 नवीन
धन्यवाद निलकांत... मिसळीचा फोटु कुठाय.? लावा बघु पहिला. हेडर'ला काही तरी बॅकग्राऊंड इमेज द्यावी.
  • Log in or register to post comments

आणखी काही सूचना

चौकटराजा
गुरुवार, 09/20/2012 - 09:58 नवीन
लेआउटमधे संकीर्ण रंग, काळा व पांढरा यांचा समतोल असला पाहिजे. यासाठी काळा रंग लेखनासाठी पांढरा रंग कागदासाठी व लाल रंग हा लक्षवेधासाठी अगदी सक्तीचेच असतात. मिपाचा नवा लोगो ठीक आहे. खूप खास आहे असे नाही. दुसरे म्हणजे मिसळपाव या शब्दातून वैविध्य शब्दाचा अर्थ अपेक्षेत आहे त्या अर्थाने लोगोमधे काहीतरी हवे होते. स्वगृह यात मिसळपाववर स्वागत आहे हे " मिसळपाव" वर स्वागत आहे असे असावे. सध्यातरी सभासदाचे चिन्ह येत नाही असे दिसतेय !
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन

टिवटिव
गुरुवार, 09/20/2012 - 10:00 नवीन
नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन!! मिपा चालू झालंय हेच खूप महत्वाचं आहे, बदल काय हळूहळू होतच राहतील.>>अनुमोदन.. बाकि या नव्या रंगसंगतिमुळे हापिसात लो़कांना संशय येणार नाहि...नाहि तर मिपाचा लोगो बद्नाम झाला होता:):):)
  • Log in or register to post comments

बदलाचे स्वागत.

चिंतामणी
गुरुवार, 09/20/2012 - 10:25 नवीन
त्रुटींबद्दल वरती बरेच काही लिहीले गेले आहे. त्या लौकरच दूर केल्या जातील अशी आशा आहे. मला अजून एक दोन त्रुटी दिसल्या आहेत.अ व्यक्तीगत संदेशमधे मराठीत टाइप होत नाही. डिलीट करण्यासाठी एखादी ओळ हायलाईट करून डिलीट म्हणल्यास डिलीशन होत नाही. बॅक अ‍ॅरो अथवा डिलीट कीने एक एक अक्षर डिलीट करायला लागत आहे. टूलबारची आवश्यक्ता भासता आहे. कोणत्याही धाग्यावर 'नविन प्रतिसाद' बघायला गेलो , पण प्रतिसादाजवळ 'नविन' दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

दोन मुद्दे राहून गेले.

चिंतामणी
गुरुवार, 09/20/2012 - 10:43 नवीन
"संपादन" करू शकत नाही. "हजर सभासद" वर क्लिक केल्यावर दिसत नाहीत. (यादी दिसत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अभिनंदन

मोहन
गुरुवार, 09/20/2012 - 11:01 नवीन
सुंदर लोगो आणि सुखावह थिम. निलकांत व त्याच्या टीमचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

एक सूचना

बाळ सप्रे
गुरुवार, 09/20/2012 - 11:46 नवीन
एक सूचना एवढे बदल करताय त्यात आणखी एक.. प्रतिसादांना जेव्हा प्रतिसाद येतात तेव्हा मूळ लेखाचे प्रतिसाद आणि प्रतिसादाचे प्रतिसाद केवळ indentation नेच वेगळे ओळखता येतात. पण बर्‍याच वेळा उपप्रतिसाद खूप जास्त होतात तेव्हा खूप प्रतिसादाची level (साहित्यिक नव्हे :-)) ओळखणं कठिण जात .. यासाठी उपप्रतिसादांसाठी expand/collapse करता आलं तर navigation सोप होइल.
  • Log in or register to post comments

आपल्याला हा लूक अज्जीबात

प्रीत-मोहर
गुरुवार, 09/20/2012 - 12:07 नवीन
आपल्याला हा लूक अज्जीबात आवडलेला नाहीये. होईल सवय हळुहळु
  • Log in or register to post comments

technically बघता website

सौरभ उप्स
गुरुवार, 09/20/2012 - 12:40 नवीन
technically बघता website devolopment हे खूप किचकट आणि थोडेसे कठीण असे काम असते, त्यामुळे नवीन theme सर्वांसमोर finally यायला तेवढा वेळ लागेल, त्यामुळे जरा वाट बघावी लागेल सगळ्यांनाच.... पूर्वीच्या सगळ्या सोयी तर पूर्ववत होतीलच.... माझ्यामते सांगतोय ते दुरुस्त होईलच लवकरच, तरी चुकून लक्ष नसेल गेल तर एक सुचवू इच्छितो कि अगदी वर लिहिलेला मिसळपाव चा font . मध्यभागी असलेल्या फोटोवर येणाऱ्या गणेशोत्सव लिहिलंय त्याच्या वर लिहिलेल्या मिसळपाव च्या font ला match होत नाहीये, दोन्हीकडे एकाच font ठेवता आला तर तेवढ जरा बघा दुरुस्ती करताना..
  • Log in or register to post comments

नाय राव

नि३सोलपुरकर
गुरुवार, 09/20/2012 - 14:03 नवीन
नाय राव, हे बात कुछ ह्ज़म नही हुई. कुछ जम्या नही.
  • Log in or register to post comments

असूदे अन्न खाऊ नये.. वडिलांचेही |

विटेकर
गुरुवार, 09/20/2012 - 14:21 नवीन
नवे रुप आवडले ( जुने जाऊ द्या मरणालागुनी ) ..जरा फोंट मात्र मोठा करायला हवा .. ( की मला चष्मा लागलाय ?) बाकीच्या अडचणी हळू हळू दूर होतीलच. या निमित्ताने संपादक मंडळाचे हार्दिक आभार ! आपण सारे हा उद्योग खिषाला चाट देऊन करताहात. हे खरेच ( तुमच्यासाठी ) कौतुकास्पद आहे आणि (आमच्यासाठी) लाजिरवाणे आहे ! समर्थानी म्हटले आहे .. असूदे अन्न खाऊ नये.. वडिलांचेही | तेव्हा, असा उच्च प्रतिचा आनंद फुकट घेताना प्रशस्त वाटत नाही. अगदी थाळी फिरवण्याची आवश्यकता नाही .. एच्छिक असू द्यावे, अर्थिक बाबतीत आपण सारे नक्कीच सक्षम आहात , तो प्रश्न नाहीच ! पण मग आम्ही फुकटेपणा का करायचा ?
  • Log in or register to post comments

सगळ फायनल झाल की सांगा !!

सुहास..
गुरुवार, 09/20/2012 - 14:44 नवीन
मग करू कमेंट ! ( या निमीत्ताने टिंग्या परत आला म्हणून पेशव्याचे अभिनंदन ;) )
  • Log in or register to post comments

मिपाचा लोगो नादचखुळा झालाय !

मालोजीराव
गुरुवार, 09/20/2012 - 18:45 नवीन
मिपाचा लोगो नादचखुळा झालाय ! काम चालू असूनही मिपा उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे, बदल चांगला आहे,रंगसंगतीचं काही करता आलं तर पहा.आणि मिपा ला ५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! - मालोजीराव
  • Log in or register to post comments

संदेशा मध्ये मराठीत शब्द उमटत

गणेशा
गुरुवार, 09/20/2012 - 21:00 नवीन
संदेशा मध्ये मराठीत शब्द उमटत नाहियेत. इंग्रजीच तायपले जात आहे.. बदलाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

अजून एक

प्रचेतस
गुरुवार, 09/20/2012 - 21:41 नवीन
'नवे लेखन' पाहिले असता धागालेखकाचे/लेखिकेचे नाव दिसते पण धागा उघडून पाहिल्यास ते दिसत नाही.
  • Log in or register to post comments

हेच म्हणायचे आहे. म्हणजे

सस्नेह
गुरुवार, 09/20/2012 - 22:01 नवीन
हेच म्हणायचे आहे. म्हणजे संपादकांनासुद्धा दिसत नाहि वाटतं नाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माझ्याही दोन सुचना.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 09/20/2012 - 23:08 नवीन
१. फॉण्ट साईझ मोठी करावी. २. स्वाक्षरीच्या वर एक डिफॉल्ट लाईन टाकता आली,(सध्या प्रेषक च्या खाली दिसतेय तशी) किंवा स्वाक्षरीचा फाँट लहान्/वेगळ्या रंगात केला तर बरे होईल. भल्या मोठ्या स्वाक्षर्‍या पण बॅन करून १ ओळी मॅक्स द्यायची व्यवस्था करता आली तर बरे होईल. ३. मूळ लेखाचा रंग (बॅकग्राऊंड कलर / फॉर्म्याटिंग इ.) प्रतिसदांपेक्षा वेगळे दिसले तर बरे. ४. कॉमेंटवरील फॉर्मॅटिंग ऑप्शन्स कुठे गेले? धन्यवाद!
  • Log in or register to post comments

पुरवणी

आनंदी गोपाळ
गुरुवार, 09/20/2012 - 23:18 नवीन
१. स्वत:चा प्रतिसाद संपादित करण़्याची सोय दिसत नाहीये. २. पांढर्‍या शाईतील अक्षर वाचण्यासाठी 'सिलेक्ट' केले असता सिलेक्टेड टेक्स्ट बोल्ड का होते आहे? ता.क. मी फक्त अडच्णीच दाखवतो आहे. नवे रुपडे सुंदर आहे हे सांगायचे राहून गेलेय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पुरवणी :२

आनंदी गोपाळ
गुरुवार, 09/20/2012 - 23:26 नवीन
Image removed. चित्र अन मागचा सेल यांच्या आकाराचा ताळमेळ घालता येईल का? Image removed. हे असं काहीतरि?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

फायरफॉक्स वापरताय का?

गणपा
गुरुवार, 09/20/2012 - 23:50 नवीन
फायरफॉक्स वापरताय का? एक काम करा ctrl + (माउस स्र्कोल डाउन) करुन पहा. आपोआप सेट होईल चित्रं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

नीलकांत आणि टिमच अभिनंदन

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 09/20/2012 - 23:16 नवीन
नीलकांत आणि टिमच अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा