Skip to main content

मिसळपाव - नवी रचना

लेखक सरपंच यांनी बुधवार, 19/09/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील. राहीलेली कामे. - १ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही. - नीलकांत

वाचने 48704
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

नवीन रूप आवडले. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मिपा पेज फास्ट लोड होत आहे. बाकी वरच्या मा. मिपाकरांच्या सूचना आहेतच.

आधीचे रंग छान होते. हे अतिच हिरवट झालंय. नविन प्रतिसादावर लाल रंगात "नविन" असं हवं. विचारलं म्हणुन सांगितलं इतकंच.

In reply to by शिल्पा ब

अहो, हे फक्त काही दिवसांसाठी आहे. सर्व सुरळीत पूर्वीसारखं होईल. कालजीचा कारण नाय. आता सध्या आपण काम करण्यार्‍यांचा उत्साह वाढवू या. :) -दिलीप बिरुटे

नमस्कार, सिस्टीमच्या दृष्टीने महत्वाचे असे बदल झालेत. आता युझर इन्टरफेसवर काम सुरू करतोय. त्यामुळे येत्या काळात वर दिलेल्या जवळपास तक्रारी निकालात निघतील अशी आशा आहे. अर्थात मिसळपावची आधीची थिम परत येणार नाहीच. रंगाचा विचार होऊ शकतो. याशिवाय आणि काही अडचणी असतील तर त्या जरूर येथे मांडा म्हणजे किडे वेचताना (डिबगींग ) कामात येतील. बाकी सर्वांच्या कौतुकाबद्दल धन्यवाद. - नीलकांत

नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन!! मिपा चालू झालंय हेच खूप महत्वाचं आहे, बदल काय हळूहळू होतच राहतील. Font formating बटन्स अजूनही दिसत नाहियेत.

नवीन आधुनिक रूप आवडलं. फ्रेश लुक आहे. महापुरुष, साहित्यिकांची चित्र आवश्यकच असतील तर ठीक आहे. नव्या मिपाला शुभेच्छा !

धन्यवाद निलकांत... मिसळीचा फोटु कुठाय.? लावा बघु पहिला. हेडर'ला काही तरी बॅकग्राऊंड इमेज द्यावी.

लेआउटमधे संकीर्ण रंग, काळा व पांढरा यांचा समतोल असला पाहिजे. यासाठी काळा रंग लेखनासाठी पांढरा रंग कागदासाठी व लाल रंग हा लक्षवेधासाठी अगदी सक्तीचेच असतात. मिपाचा नवा लोगो ठीक आहे. खूप खास आहे असे नाही. दुसरे म्हणजे मिसळपाव या शब्दातून वैविध्य शब्दाचा अर्थ अपेक्षेत आहे त्या अर्थाने लोगोमधे काहीतरी हवे होते. स्वगृह यात मिसळपाववर स्वागत आहे हे " मिसळपाव" वर स्वागत आहे असे असावे. सध्यातरी सभासदाचे चिन्ह येत नाही असे दिसतेय !

नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन!! मिपा चालू झालंय हेच खूप महत्वाचं आहे, बदल काय हळूहळू होतच राहतील.>>अनुमोदन.. बाकि या नव्या रंगसंगतिमुळे हापिसात लो़कांना संशय येणार नाहि...नाहि तर मिपाचा लोगो बद्नाम झाला होता:):):)

त्रुटींबद्दल वरती बरेच काही लिहीले गेले आहे. त्या लौकरच दूर केल्या जातील अशी आशा आहे. मला अजून एक दोन त्रुटी दिसल्या आहेत.अ व्यक्तीगत संदेशमधे मराठीत टाइप होत नाही. डिलीट करण्यासाठी एखादी ओळ हायलाईट करून डिलीट म्हणल्यास डिलीशन होत नाही. बॅक अ‍ॅरो अथवा डिलीट कीने एक एक अक्षर डिलीट करायला लागत आहे. टूलबारची आवश्यक्ता भासता आहे. कोणत्याही धाग्यावर 'नविन प्रतिसाद' बघायला गेलो , पण प्रतिसादाजवळ 'नविन' दिसत नाहीये.

सुंदर लोगो आणि सुखावह थिम. निलकांत व त्याच्या टीमचे अभिनंदन.

एक सूचना एवढे बदल करताय त्यात आणखी एक.. प्रतिसादांना जेव्हा प्रतिसाद येतात तेव्हा मूळ लेखाचे प्रतिसाद आणि प्रतिसादाचे प्रतिसाद केवळ indentation नेच वेगळे ओळखता येतात. पण बर्‍याच वेळा उपप्रतिसाद खूप जास्त होतात तेव्हा खूप प्रतिसादाची level (साहित्यिक नव्हे :-)) ओळखणं कठिण जात .. यासाठी उपप्रतिसादांसाठी expand/collapse करता आलं तर navigation सोप होइल.

technically बघता website devolopment हे खूप किचकट आणि थोडेसे कठीण असे काम असते, त्यामुळे नवीन theme सर्वांसमोर finally यायला तेवढा वेळ लागेल, त्यामुळे जरा वाट बघावी लागेल सगळ्यांनाच.... पूर्वीच्या सगळ्या सोयी तर पूर्ववत होतीलच.... माझ्यामते सांगतोय ते दुरुस्त होईलच लवकरच, तरी चुकून लक्ष नसेल गेल तर एक सुचवू इच्छितो कि अगदी वर लिहिलेला मिसळपाव चा font . मध्यभागी असलेल्या फोटोवर येणाऱ्या गणेशोत्सव लिहिलंय त्याच्या वर लिहिलेल्या मिसळपाव च्या font ला match होत नाहीये, दोन्हीकडे एकाच font ठेवता आला तर तेवढ जरा बघा दुरुस्ती करताना..

नाय राव, हे बात कुछ ह्ज़म नही हुई. कुछ जम्या नही.

नवे रुप आवडले ( जुने जाऊ द्या मरणालागुनी ) ..जरा फोंट मात्र मोठा करायला हवा .. ( की मला चष्मा लागलाय ?) बाकीच्या अडचणी हळू हळू दूर होतीलच. या निमित्ताने संपादक मंडळाचे हार्दिक आभार ! आपण सारे हा उद्योग खिषाला चाट देऊन करताहात. हे खरेच ( तुमच्यासाठी ) कौतुकास्पद आहे आणि (आमच्यासाठी) लाजिरवाणे आहे ! समर्थानी म्हटले आहे .. असूदे अन्न खाऊ नये.. वडिलांचेही | तेव्हा, असा उच्च प्रतिचा आनंद फुकट घेताना प्रशस्त वाटत नाही. अगदी थाळी फिरवण्याची आवश्यकता नाही .. एच्छिक असू द्यावे, अर्थिक बाबतीत आपण सारे नक्कीच सक्षम आहात , तो प्रश्न नाहीच ! पण मग आम्ही फुकटेपणा का करायचा ?

मिपाचा लोगो नादचखुळा झालाय ! काम चालू असूनही मिपा उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे, बदल चांगला आहे,रंगसंगतीचं काही करता आलं तर पहा.आणि मिपा ला ५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! - मालोजीराव

'नवे लेखन' पाहिले असता धागालेखकाचे/लेखिकेचे नाव दिसते पण धागा उघडून पाहिल्यास ते दिसत नाही.

१. फॉण्ट साईझ मोठी करावी. २. स्वाक्षरीच्या वर एक डिफॉल्ट लाईन टाकता आली,(सध्या प्रेषक च्या खाली दिसतेय तशी) किंवा स्वाक्षरीचा फाँट लहान्/वेगळ्या रंगात केला तर बरे होईल. भल्या मोठ्या स्वाक्षर्‍या पण बॅन करून १ ओळी मॅक्स द्यायची व्यवस्था करता आली तर बरे होईल. ३. मूळ लेखाचा रंग (बॅकग्राऊंड कलर / फॉर्म्याटिंग इ.) प्रतिसदांपेक्षा वेगळे दिसले तर बरे. ४. कॉमेंटवरील फॉर्मॅटिंग ऑप्शन्स कुठे गेले? धन्यवाद!

In reply to by आनंदी गोपाळ

१. स्वत:चा प्रतिसाद संपादित करण़्याची सोय दिसत नाहीये. २. पांढर्‍या शाईतील अक्षर वाचण्यासाठी 'सिलेक्ट' केले असता सिलेक्टेड टेक्स्ट बोल्ड का होते आहे? ता.क. मी फक्त अडच्णीच दाखवतो आहे. नवे रुपडे सुंदर आहे हे सांगायचे राहून गेलेय ;)

In reply to by आनंदी गोपाळ

Image and video hosting by TinyPic चित्र अन मागचा सेल यांच्या आकाराचा ताळमेळ घालता येईल का? Image and video hosting by TinyPic हे असं काहीतरि?

स्वतःलाच खरड लिहिण्याची नवी सिस्टिम सुरू झालेली दिसते. ;)

एकदम पांचट... :( मिपा ला खरंच "वाढदिवसाच्या शुभेच्छा"

सर्वप्रथम नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन .... जुनी थीम खूप चांगली होती.... असो सवय होईल हळूहळू :) :)

त्या हिरवा रगा आवेजि केसारी रग वापरलात तर उत्तम होयिल राव.... तुमचा नविन सभासद रोहित

नवा रंग छान आहे डोळ्यांना सुखावणारा एक सुचना "हॉटेलात आलेली माणसं" हे रुचले नाही एक वेळ कट्टा वगैरे चालले असते किमान 'उपहारगॄह' तरी?

ते वर जायचं बटण परत आणलं तर बरं होईल......... दर वेळेस स्क्रॉल करावं लागतं.........

नविन रुपापेक्षा जुनेच user friendly होते. इतके कि माझ्यासारखा नवखा माणुसही लेखमाला लिहू शकला. टुल बार आवश्यक. तसेच सर्वात वर राम राम पाहून आपण लॉग ईन झालो याची खात्री पटे. आता ते नाही. तरी ती सोय करण्यास हरकत नसावी.

"पूर्वीची रंगसंगती आणता आली तर आणावी" या वाक्याशी सहमत! मिसळचं गायब झाली. :( मिसळीतले ते शेव-कांदा बघून धाग्यांची भूक लागायची. पूर्वीचं मुखपृष्ठ सुद्धा खूप आवडायचं कारण एकाच फटक्यात सगळेच नवीन धागे दिसायचे. असो. नवीन रुपासाठी राबणार्‍या हातांना धन्यवाद!

वाचनखूण साठवण्याचा पर्याय या धाग्यावर येतो आहे, पण सगळ्या धाग्यांवर येत नाही. उदा: 'चाचणीचा निकाल आणि चाचणीचा निष्कर्ष' इथे फक्त 'प्रतिसाद द्या' आणि 'मुद्रणसुलभ आवृत्ती' एवढेच पर्याय दिसताहेत.

लेखनविषय आणि लेखनप्रकार यांबरोबर निदान लेखकाचे सदस्य नाव असावे असे वाटते. जमल्यास पूर्वीप्रमाणे "लेखाची हेडींग", "लेखकाचे सदस्य नाव" व "लेखकाचे इतर लेख" यांचीही लिंक असावी. उ.दा. मिसळपाव - नवी रचना. --प्रेषक: निलकांत. त्यामुळे एखादा चांगला धागा चोपस्ते (copy paste) करून विपत्रातून धाडताना मूळ स्रोत आणि लेखकाची माहिती आपोआप उपलब्ध होईल. धन्यवाद!

उत्तम काम केले आहे ,थोडक्या वेळात काम संपवल्या बद्दल आभार , पेज लवकर लोड होतायत आणि आधीच्या मी.पा. वर images दर वेळी रीलोड होऊन युसेज खायच्या आणि वेळ पण घ्यायच्या त्या बाबतीत जी रचना केली ती बेष्ट !!!! फोन्ट थोडा मोठा करावा आणि android app वर झूम होत नाहीये त्याचे काय आहे ते बघावे ...

वाचनखुणा कशा साठवायच्या? गविंच्या नव्या नितांतसुंदर लेखासाठी वाचनखूण उपलब्ध नाही.

सफारी वापरून लिहिता वाचता येतंय हा मला मोठ्ठाच फायदा झालाय. पेज पूर्वीपेक्षा लवकर लोड होतंय. (इतर संस्थळांपेक्षा वेळ जास्त लागतोय पण!)

१) मी खरडवही नियमितपणे स्वच्छ करत असतो. नव्या रचनेत खवमध्ये फक्त आलेल्या खरडींना उत्तरे द्यायची किंवा नव्या खरडी लिहायची सोय आहे. साचलेल्या खरडी उडवण्याची सोय लवकरात लवकर हवी आहे. २) व्यक्तिगत संदेश लिहिताना टेक्स्ट बाय डिफॉल्ट इंग्रजी राहात आहे. विषय मात्र मराठीत टायपता येतोय.

किडे शोधणे आणि रन्गसंगतीचे बघालच. शक्य झालेच तर पानाचे स्क्रोलिंग फक्त लेखापुरते मर्यादित राहू शकते का?

In reply to by sagarpdy

वाचनखुणा, व्यक्तिगत संदेश, खरडायचा फळा ई. "NAVIGATION" मधील पानावर वरती दिसणारा पत्ता चुकल्यासारखा वाटतो. उदा. "स्वगृह >> खरडायचा फळा" ऐवजी फक्त "स्वगृह" दिसत आहे.

In reply to by sagarpdy

प्रत्येक लेखाच्या तळाशी "वाचनखुणा" म्हणून दुवा आहे. मला वाटले कि तो " वाचनखूण साठवा" असावा. या दुव्यावर टीचकी मारल्यावर आंग्लभाषेत "Unbookmark this" असे येते (ज्यातील this नवीन ओळीवर जात आहे). ते " वाचनखूण मिटवा" असावे.

In reply to by sagarpdy

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक) [http://www.misalpav.com/node/315] "MORE LIKE THIS" मध्ये त्याच कथेची लिंक २ दा येत आहे. ईतर धाग्यात पण असेच होत असू शकेल.

In reply to by sagarpdy

http://www.misalpav.com/node/22822 : बऱ्याच चित्रांची रुंदी लेखाच्या रुंदीच्या बाहेर जाते (लेखकाने फक्त लांबी रुंदी नीटपणे न निवडल्यास). बाय डिफोल्ट फोटोची रुंदी लेखाच्या रुंदीपेक्षा जास्त होऊ नये म्हणून काही करता येईल काय ?

स्वग्रुहावर लेखन कुणी केले आहे त्या व्यक्तीचे नाव दिसत नाहिये. शिवाय दुव्यावर टिचकी मारुन आत गेल्यावर देखील नाही दिसत नाव!!! :|

सुन्दर आहे नवे रुपडे. माझ्यासारख्या श्रीगणेशायनमः,गमभन शिकणार्‍या नव कॉम्प्युटर साक्षरान्साठी मराठीचा वापर जास्त असावा ही विनन्ती.

खरडवहीत मराठी टाईप होत नाही. उजवीकडच्या चौकोनात टिक केले तरच टाईप होते. हे सगळीकडे लागू नाही. इथे डायरेक्ट टाइप होत आहे.

१. मला 'संदेश' पाठवताना मराठीत लिहिता येत नाही. रोमन स्क्रिप्टच उमटते आहे. २. मला नवी पोस्ट टाकणे शक्य होत नाही कारण 'Subject Field Required' पाशी गाडी अडते आहे. विषय निवडलेला असला तरी हाच संदेश येत राहतो. विषय निवडण्याची यादी (List Box) असावी असे वाटते, पण एकावर एक अशी List Box वर Drop-down लिस्ट दिसते आहे. (इथे इमेज चढवता येत नसल्याने नेमके दाखवता येत नाही) त्यातले विषय निवडले तरी वरचाच मेसेज मिळत राहतो मी विन्डोज ७ आणि फाफॉ १३ वापरतो आहे. आई आणि क्रोमवरही हीच समस्या आहे. सरपंच आयडीला संदेश पाठवला आहे.

"माझे खाते" हा पॉईन्ट कुठे बघायला मिळेल?.. मला त्यात काही अपडेट्स द्यायचे असतील.. तर कुठे देऊ?

गंमतीशीर समस्या. इतर कोणाच्या लक्षात आली नाही याचे आश्चर्य वाटते (की माझी पाहण्यात चूक होते आहे कुणास ठाऊक). धाग्यावर धागालेखकाचे नावच नाही. त्यामुळे एकदा धागा उघडल्यावर कोणाचे लेखन वाचतोय हे समजत नाही. ही समस्या तेव्हा त्रासदायक ठरते जेव्हा अन्यत्र कुणी मिपाचा दुवा दिला नि तिथे क्लिक करून इकडे आलो तर लेखक कोण ते समजत नाही. ताज्या धाग्यांबाबत निदान मुख्य पानावर जाऊन पाहता येईल, एखाद्या जुन्या धाग्याचे काय. त्याच्या लेखकाबाबत 'पैचान कौन?' असा प्रश्न पडेल. (ह. घ्या) याशिवाय धाग्याखाली 'या लेखकाचे इतर लेखन' हा पर्याय होता तो ही गायब झालेला दिसतो. प्रतिसादाच्या एडिट बॉक्सला वरचे टूलबार दिसत नाहीत. (बोल्ड, इटॅलिक्स, अक्षररंग, पार्श्वरंग, लिंक वगैरे)