✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

श
शुचि यांनी
गुरुवार, 06/21/2012 - 07:37  ·  लेख
लेख
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत. मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;) माझ्यापासून सुरवात करते - (१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते. (२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला. (३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
196639 वाचन

💬 प्रतिसाद (347)

प्रतिक्रिया

कै च्या कै धागा आणि कै च्या

खटासि खट
Sat, 06/23/2012 - 21:31 नवीन
कै च्या कै धागा आणि कै च्या कै चर्चा..
  • Log in or register to post comments

येत चला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/23/2012 - 23:18 नवीन
>>> कै च्या कै धागा आणि कै च्या कै चर्चा.. >>> पोष्टण्याआधी थांबा. का बरं ? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा म्हणाल्या होत्या की, सेक्सी शब्दाचा अर्थ सुंदर, आकर्षक असा होतो. आता हे आकर्षक दिसण्याच्या काही सार्वत्रिक अशा कल्पना असतील आणि त्याबद्दल चर्चा होत असेल तर संयत अशी चर्चा करायला हरकत नसते, असं माझं तरी मत आहे. आदिवासी स्त्रिया, शहरी स्त्रिया, विविध जाती-जमातीमधल्या स्त्रीया, देश-विदेशातल्या स्त्रिया आकर्षक दिसाव्या म्हणुन प्रयत्न करत असतात. आकर्षक दिसण्यासाठी स्त्रिया अलंकाराचाही वापरत करतात त्यावरही उत्तम चर्चा झाली असतो. जसे, आपल्या कडे अलंकारामागे काही परंपरा असतीलही परंतु काही अलंकारांनी आकर्षक दिसलं पाहिजे हा भाग आहेच. स्त्रियांच्या गळ्यातील विविध अलंकार, नाक, कान, मनगटे, हातापायातील बोटांमधील अलंकार, शरीरावर गोंदुन घेणे, तरुण-तरुणींमधे असलेलं टॅटूचं वेड. तसंच, बारीक भुवया, उंच कपाळ, सिंहाप्रमाणे बारीक कंबर, वगैरे. असो. आपण जे कोणी असाल ते असाल, पण येत चला....सालं आमच्या मिपाला कशा-कशाचं वावडं नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

सालं आमच्या मिपाला कशा-कशाचं

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 06/24/2012 - 01:08 नवीन
सालं आमच्या मिपाला कशा-कशाचं वावडं नाही.
नक्की का ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुंतल...नेत्र

अविनाशकुलकर्णी
Sun, 06/24/2012 - 12:42 नवीन
कुंतल...नेत्र ..नासिका..अधर..स्तन .नाभी प्रदेश ..+२ [ते समजून घ्या ] हि प्रेम व काम वासना जागृत करणारी अष्टांगे आहेत . व हि अंगे जागच्या जागी व प्रमाण बद्ध असणा~या अश्या सुंदरीस अष्टांग सुंदरी म्हणतात असे एका मित्राने खूप वर्षा पूर्वी सांगितल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

अन्याय...

प्रभाकर पेठकर
Sun, 06/24/2012 - 15:13 नवीन
श्री. अविनाशकुलकर्णी साहेब, तुमच्या प्रतिसादात रंग, गंध, स्पर्श, आवाज, अदाकारी, उंची (शारीरिक आणि बौद्धीक) वगैरे महत्त्वाच्या 'अंगांना' तुम्ही 'स्पर्श' न केल्याने आमच्या सेक्स 'विषय'क भावना दुखावल्या आहेत. संपादक मंडळाने कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

अश्या अष्टांग-सुंदरींचे फोटो वा चित्रेही येऊ द्यात काही.

चित्रगुप्त
Sun, 06/24/2012 - 13:01 नवीन
अशा अष्टांग-सुंदरींचे फोटो वा चित्रेही येऊ द्यात काही. (आमची मदत हवी असल्यास सांगा)
  • Log in or register to post comments

मदत हवी आहे...

अर्धवटराव
Mon, 06/25/2012 - 22:26 नवीन
अहो फक्ट चित्रच का... सुंदरींनाच घेऊन याना... टेम्पो पाठवतो.. नव्हे मी स्वतः टेम्पो चालवत येतो ( आजकालच्या टेम्पो चालकांना मालकाच्या "गुड्स" ची काळजीच नसते म्हणुन.. बाके काहि नाहि) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

टर्न ऑफ्स...

श्रीरंग_जोशी
Sun, 06/24/2012 - 22:13 नवीन
नको तिथे नको तसे वागणे. बऱ्याच मा. त. कंपन्यांमध्ये दर शुक्रवारी परिधानाच्या बाबतीतल्या अटींमध्ये शौथिल्य असते. बरेच पुरुष कर्मचारी गबाळे पोशाख करून येतात. अन काही तरुणी असतात ज्या कंपनीने दाखविलेल्या औदर्याचा पुरेपूर गैर फायदा घेतात. पुरूष सहकाऱ्यांचे चित्त विचलित होईल व नियमात बसणारे कपडे घालून येणाऱ्या स्त्री सहकाऱ्यांना अवघडल्यासारखे वाटेल असा पोशाख त्या करतात. मुद्दामच त्या पोशाखांबाबत कुठलेही विशेषण वापरत नाहीये कारण पोशाखाबाबतच्या व्याख्या ह्या व्यक्तीगणिक बदलतात. अर्थातच कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाला या गोष्टींची दखल घ्यावी लागते. अधून मधून त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांना इशारावजा विपत्र येत असते. त्यात वर उल्लेखलेल्या दोन्ही मुद्द्यांचा अंतर्भाव असतो. अन असेही लिहिले असते की बऱ्याच लोकांना वैयक्तिक सूचना देऊन काहीही उपयोग होत नाहीये. याच कारणांमुळे माझ्या कंपनीत तर २००७ साली शुक्रवारचे अटींमधील शौथिल्य काढून टाकण्यात आले होते. तर मुद्दा असा आहे की काही लोक नको त्या तिथे नको तश्या कपड्यांचा वापर का करतात, याखेरीज त्यांच्या देहबोलीतून जाणवणारी सूचकताही आजूबाजूच्यांना अवघडल्यासारखे वाटवणारी असते (पुन्हा ह्याची व्याख्यादेखील व्यक्तिसापेक्ष आहे). अर्थात काही आंबटशौकीन या गोष्टींचाही लाभ उठवतातच. जेव्हा मनुष्यबळ विकास विभागाला अशा लोकांना इशारे देण्याची वेळ येते म्हणजे सामाजिकदृष्ट्याही हे स्वीकारार्ह नसावे. याउलट माझा अमेरिकेतला अनुभव आहे, इथेही काही लोक या प्रकारची वस्त्रे परिधान करतात व इथेही अश्या लोकांना इशारे दिले जातात. पण ज्या प्रकारची अस्वीकारार्ह देहबोली मला भारतात आढळली त्या प्रकारचे उदाहरण येथे विरळाच. मला तर त्या म. वि. विभागातील कर्मचाऱ्यांची दया येते जे अश्या व्यक्तिंशी प्रत्यक्ष बोलून त्यांना इशारा देतात. त्या वेळी त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल कारण नियम तोडणारी व्यक्ती उलट उत्तर देणारीही असू शकते. ती जर म्हणाली की बघणाऱ्यांच्या नजरेतच दोष आहे तर अश्या वेळी हे लोक प्रसंग कसा हाताळतात? असे ऐकले आहे की, मॅनेजर लोकांनाही असे इशारा देण्याचे काम करावे लागते. ही परिस्थिती तर त्याहून अवघड, रोज ज्या व्यक्तीकडून काम करवून घ्यायचे असते तीला असे काही समजावून सांगणे म्हणजे. माझ्यावर भविष्यातही असे कुणाला बोलायची वेळ न येवो म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments

आजचा सेक्सी सवाल... नेट वरील

अविनाशकुलकर्णी
Sun, 06/24/2012 - 23:21 नवीन
आजचा सेक्सी सवाल... नेट वरील चित्रे पाहून व मजकूर/चर्चा वाचून बुद्धीजीवी समाजाचे मन व नजर मेली आहे .. प्ले बॉय ने भारतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्या साठी भारतात बस्तान बसवण्या साठी हि योग्य वेळ आहे असे वाटते का?
  • Log in or register to post comments

भारतीय आवृत्ती...

चित्रगुप्त
Mon, 06/25/2012 - 00:06 नवीन
प्लेबॉय ची भारतीय आवृती म्हणजे भारतीय मॉडेल्स ची अनावृत्त छायाचित्रे असलेली, की फोटो तिकडल्यांचेच, मजकूर फक्त हिंदी, मराठी वगैरे भाषांमधे असलेली? ... यावर सदर मासिकाचे व्यावसायिक यश अवलंबून राहील, असे वाटते. अर्थात नेटवर सर्व फुकट उपलब्ध असता महागडे मासिक कितपत खपेल, हाही प्रश्न. भारतात योग्य वेळ नेहमीच होती आणि राहील, हे खजुराहो वगैरे किंवा ताडपत्रीवरील वरकरणी धार्मिक (उदा. दशावतार) चित्रे, पण घडी उघडल्यावर आत रतिचित्रे असे अनेक प्रकार बघता वाटते. ....उदाहरणार्थ या धाग्याला मिळत असलेला प्रतिसाद.... वगैरे.
  • Log in or register to post comments

डबल

तिमा
Mon, 06/25/2012 - 10:26 नवीन
डब्बल सेंचुरीला हातभार!
  • Log in or register to post comments

डॉ दिलीप बरुटेजी माझा उद्देश

खटासि खट
Mon, 06/25/2012 - 15:46 नवीन
डॉ दिलीप बरुटेजी माझा उद्देश ताशेरे ओढण्याचा नाही. हा विषय खूपच खाजगी आहे. कदाचित इथे महिला, मुली देखील असू शकतात. त्यांना वघडल्यासारखे वाटू शकते. या विषयावर आणखी संयत चर्चा होऊ शकते असं माझं मत आहे. विषय अशा पद्धतीने समोर ठेवल्यानंतर पुढे त्याचं काय होणार म्हणा.. गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments

हा विषय खाजगी आहे आणि त्याची

बॅटमॅन
Mon, 06/25/2012 - 16:08 नवीन
हा विषय खाजगी आहे आणि त्याची चर्चा करू नये वैगे वैग्रे वरकरणी संस्कृतिसंरक्षक पण व्हिक्टोरियन इंग्लंडाकडून उचललेल्या उपर्‍या जाणिवांची मुक्ताफळे उधळण्याआधी हे बघा: १. हा धागा एका महिलेने काढला आहे. २. चर्चा संयत झाली आहे. पुरुषांचे प्रतिसाद जास्त आहेत(असणारच), पण स्त्रियांचे देखील प्रतिसाद आहेत बर्‍यापैकी. ३. सेक्सीपणा म्हणजे काय हा विषय परिपक्वपणे चर्चिताना मुलींना अवघड का वाटावे? आजकालच्या सगळ्या मुली काय सानेगुरुजीछाप संस्कारवाल्याच असतात का? मुळात या मान्यतेमागे "सेक्स ही टॅबू प्रकारची गोष्ट आहे", अशी तद्दन भंपक धारणा आहे. शिवाय इथे काही स्त्रियांनी त्यांच्या मते सेक्सीपणा कशात असतो यावर आपापली मते मांडली आहेत. त्यांवरती प्रतिक्रिया देखील पुरेशा सभ्यच आहेत. ४. असभ्यपणा आणि सेक्सबद्दलची परिपक्व चर्चा यात बराच फरक आहे. संयत चर्चा म्हणजे अजून काय अपेक्षित आहे? सेक्स हा विषयच मुळात भौतिक जगाच्या केंद्रस्थानाशी असणारा आहे, त्याची "परिपक्व चर्चा" काय अ‍ॅब्स्ट्रॅक्टपणे रॉबर्ट किन्से वैग्रेंचे दाखले देऊन रु करणार आहात का? तसे तुम्हाला वाटत असेल तर धाग्याचे शीर्षक बघा, "तुम्हाला काय/कोण सेक्सी वाटते". इथे प्रामुख्याने वैयक्तिक मते मांडणे अपेक्षित आहे. तेव्हा हा दांभिकपणा टंकण्याआधी थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

.........हा दांभिकपणा

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/25/2012 - 22:28 नवीन
.........हा दांभिकपणा टंकण्याआधी थांबा. >>> सहमती +११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

१९९

आबा
Mon, 06/25/2012 - 16:22 नवीन
१९९
  • Log in or register to post comments

२००

नाना चेंगट
Mon, 06/25/2012 - 18:13 नवीन
२००
  • Log in or register to post comments

२०१

मोहनराव
Mon, 06/25/2012 - 18:47 नवीन
हे घ्या!!
  • Log in or register to post comments

२०२ हा क्रमांक लै लै सेक्सी

जेनी...
Mon, 06/25/2012 - 22:29 नवीन
२०२ हा क्रमांक लै लै सेक्सी वाटतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

आता आवरा!!

मोहनराव
Mon, 06/25/2012 - 22:55 नवीन
आता आवरा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नाहि 69 वाटतो

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 06/28/2012 - 07:18 नवीन
नाहि 69 वाटतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

बॅटमॅन>> सानेगुरुजीछाप

आशु जोग
Mon, 06/25/2012 - 23:15 नवीन
बॅटमॅन >> सानेगुरुजीछाप संस्कारवाल्याच असतात का? म्हणजे काय नक्की...
  • Log in or register to post comments

म्हंजे अगदी निष्पाप, कोणीही

बॅटमॅन
Mon, 06/25/2012 - 23:27 नवीन
म्हंजे अगदी निष्पाप, कोणीही अरे बापरे ऐवजी चायला म्हटले तरी ऐय्या, औव्वा करणार्‍या वैग्रे वैग्रे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 01:22 नवीन
>> तरी ऐय्या, औव्वा करणार्‍या वैग्रे वैग्रे.... जुन्या काळी मराठी चित्रपटात आवर्जून असणारा 'इश्श' हा शब्द ही हद्दपार झालाय हो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कोण म्हणालं ' इश्श्श्य '

जेनी...
Tue, 06/26/2012 - 09:38 नवीन
कोण म्हणालं ' इश्श्श्य ' हद्दपार झालाय? \( /( मी तर म्हणते बॉ .....छान वाटतं ' इश्श्श्य ' म्हणायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जॉन इब्राहीम प्रचंड आवडतो

वीणा३
Tue, 06/26/2012 - 07:33 नवीन
जॉन इब्राहीम प्रचंड आवडतो (दोस्ताना बघितल्यावर वैतागलेच होते, तरीपण.) केबीसी पासून अमिताभ बच्चन खूप आवडतो (फ्रेंच बेयार्ड मुळे). टकलू आणि फ्रेंच बेयार्ड हे कॉम्बिनेशोन पण खूप सेक्सी वाटतं
  • Log in or register to post comments

ध चा मा...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 09:57 नवीन
अब्राहम चा इब्राहीम कधी झाला जॉनचा, वीणातै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

:)

वीणा३
Tue, 06/26/2012 - 10:34 नवीन
sorry typo mistake :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अब्राहम आणि इब्राहिम हे एकच.

चित्रगुप्त
Tue, 06/26/2012 - 11:45 नवीन
अब्राहम आणि इब्राहिम हे एकच: http://en.wikipedia.org/wiki/Islamic_views_on_Abraham दोघेही 'अब्राम्हण' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

बर्‍याचदा स्त्री , पूरुषाकडे

जेनी...
Tue, 06/26/2012 - 09:04 नवीन
बर्‍याचदा स्त्री , पूरुषाकडे पापण्या झुकवुन ,चोरट्या नजरेने पहाते ...खरं आहे हे ,त्या नजरेत तिला फक्त त्याचं पूरुषत्व न्याहाळायचं असतं .जसं पूरुष स्त्रीचं सौंदर्य न्याहाळतो ..तसच स्त्रीलाहि पूरुषातल्या मर्दाणगीचं आकर्षण असतं. अतिशय नैसर्गिक आहे हे . जीवनचक्र ह्यावरच तर चालु आहे ..त्यामुळे आकर्षणाबद्दल बोलताना ते सहजसुंदर आहे ह्या भावनेतुन बोललं गेलं तर बरेच राज\ गुपित उलगडु शकतिल ... ' आवडणार्‍या ' पूरुषाबद्दल स्त्रीला काय वाटु शकतं हे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतेय ... माझ्याच काही ओळी .....कधीतरी लिहिलेल्या ..... पूरुष ..... पुरुष इतका सुंदर असू शकतो ?म्हणजे एखाद्या स्त्रीच्या स्त्रीत्वालाही आव्हान देईल असा? इतकं अस भरदार त्याच्याकडे असत तरी काय ....कि एखाद्या नाजूक मनाची ...कोमल शरीराची पावलं आपोआप त्याच्याकडे वळली जावित ? त्याच्यात स्त्रीपेक्षा जास्त काही असेल किवा असू शकतं ..ह्यावर तुला पाहण्या आधी विश्वास बसायचा नाही ... ' ' पुरुष ' ह्या शब्दाचीच जाणीव होण खूप महत्वाच असतं ..त्यात बरीच रुपं लपलेली असतात .. प्रत्येकवेळी स्त्री त्याच्याबाबतीत एकच विचार नाही करू शकत ..त्या पुरुषात तिला तिचे वडील ..भाऊ ..मुलगा ..नात्यातले पुरुष आणि महत्वाचा नवरा ..हि सगळी नाती मिळतात ... ज्या मायेने तिचा हात तिच्या मुलावर फिरतो ..त्याच मायेची अपेक्षा ती तिच्या वडिलांकडून करते अन ती माया ..ती काळजी .....ते प्रेम ....तो भावूक स्पर्श सर्व काही तिला तिच्या नवर्‍याकडून हवं असतं ..तिच्या नवर्‍यात पहायचं असतं ..जिथे तिच्या ह्या अपेक्षा पूर्ण होतात ..तिथे ती तिच्या आणि तिच्या नवर्‍याच्या मानसिक आणि शारीरिक ..दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरते ...... शरीराचं आकर्षण प्रत्येकाला असतं ...पण त्याहूनही महत्वाचं आकर्षण हे मनाचं असतं ....तुझं माझं जवळ येन म्हणजे मानसिकतेतून घडणार मिलन ..असे प्रकार खूप कमी पहायला मिळतील ...पण जिथे हे मिलन होतं ..ते दोन जीव जगाच्या पाठीवर कुठेही असोत एकमेकांच्या आठवणीत जगतात ....निदान माझ्यासाठी तरी तू माझ्या खूप जवळ येवून गेलायस ..इतका जवळ ..कि भास होता ..कि स्वप्न होतं ..कि खरच न घडलेलं एक सत्य होतं ...ह्या प्रश्नानाही आता जागा नाहीय ...... जगातली अप्रतिम निर्मिती म्हणजे पूरुष ..स्त्री ही अनेक नात्याची रुपं घेऊन पूरुषाशी जोडलेली असते .. मुलगी ही नेहेमीच वडीलांच्या अतुट मायेचा एक अविष्कार असते ,तर आईचं तिच्या मुलाभोवती असणारं ममतेच आवरण. स्त्री अनेक नात्यातला जीव्हाळा एकाच पूरुषात जास्त पहाण्याचा, त्याला मिळवण्याचा प्रयत्न करते तो म्हणजे तिचा प्रियकर ,तीचा पती .. हे नातं तर निसर्गालाही हेवा वाटावा इतकं सुंदर असतं .... त्यांच्यात असणार्‍या मानसिक आणि शारिरिक आकर्षणामुळे ते कायम एकमेकांचा आधार ,एकमेकाना पूरक बनुन राहातात. मी एवढच म्हणेन , स्त्री ही जेवढी पूरुषाला आकर्षक वाटते ...तेवढच स्त्रीच मनहि पूरुषाकडे आकर्षित होतं आणि त्यात गैर काहिच नाहि .
  • Log in or register to post comments

सामर्थ्य....

प्रभाकर पेठकर
Tue, 06/26/2012 - 09:53 नवीन
'सौंदर्य' हे स्त्रीचे 'सामर्थ्य' आहे तर, 'सामर्थ्य' हे पुरुषाचे 'सौंदर्य' आहे. असे कोणीतरी म्हणून ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अत्रे !

सुधीर मुतालीक
Wed, 06/27/2012 - 16:55 नवीन
पेठकर साहेब, असे आचर्य अत्रे म्हणाले होते. नक्की कोण्त्या लेखात आठवत नाहीय अत्ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

भारावून टाकणारे लेखन...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 09:55 नवीन
पूजातै - अप्रतिम शब्दरचना वापरली आहे, अरे जरा काही स्फुटलेखन वगैरे करा, दिवाळी अंकांच्या प्रकाशकांमध्ये चढाओढ होईल तुमचे लेखन छापण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

..

गवि
Wed, 06/27/2012 - 10:36 नवीन
पण दिवाळी अंकांच्या कव्हरवर मात्र बाईचाच फोटो असेल हं.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वाह!

अन्नू
Tue, 06/26/2012 - 10:37 नवीन
ज्जे बात है! Image removed. आता आमच्या पुढच्या कथेच्या नायिका पुजा पवारच. ;)
बर्‍याचदा स्त्री , पूरुषाकडे पापण्या झुकवुन ,चोरट्या नजरेने पहाते ...खरं आहे हे ,त्या नजरेत तिला फक्त त्याचं पूरुषत्व न्याहाळायचं असतं .जसं पूरुष स्त्रीचं सौंदर्य न्याहाळतो ..तसच स्त्रीलाहि पूरुषातल्या मर्दाणगीचं आकर्षण असतं. अतिशय नैसर्गिक आहे हे .
खल्लास!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मी एवढच म्हणेन , स्त्री ही

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/26/2012 - 12:47 नवीन
मी एवढच म्हणेन , स्त्री ही जेवढी पूरुषाला आकर्षक वाटते ...तेवढच स्त्रीच मनहि पूरुषाकडे आकर्षित होतं आणि त्यात गैर काहिच नाहि . >>> ग्रेट...२०० मार्कं... मी परत एकदा म्हणतो,बालिके-तू महान आहेस. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पू ssssssssssssssssssssssssss

मृगनयनी
Tue, 06/26/2012 - 12:52 नवीन
पू ssssssssssssssssssssssssss जा ssssssssssssssssssssssss ....... _______________________/\__________________________ ग्रेट्ट्ट्ट्ट्ट !!!!/////\\\\\!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

रोचक चर्चा.

नगरीनिरंजन
Tue, 06/26/2012 - 09:44 नवीन
वाचून ड्वाळे पाणावले. सेक्सी या शब्दात 'भोग्य' असा एक अर्थ अध्यारुत आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्या अर्थाने सुगंधी वाफाळत्या पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटापासून ते लसलसत्या लाल रंगाची वाईन भरलेल्या स्तनाकार गोल गरगरीत ग्लासापर्यंत, लाल-पिवळ्या आंब्यांनी भरलेल्या करंडी पासून ते निळ्या डोळ्यांना लालचुटूक ओठांशी जोडणार्‍या सरळ पातळ नाकापर्यंत, समुद्र किनार्‍यावर केशरी रंगाच्या बिकिनीतल्या बिनधास्त रुपगर्वितेपासून नऊवारीतल्या चोळी न घातलेल्या सावळ्या वडारणीपर्यंत काहीही सेक्सी वाटू शकते. तशी भूक फक्त पाहिजे. सेक्सीपणाच्या कल्पना फिक्स्ड असलेले लोक मलातरी अजिबात सेक्सी वाटत नाहीत. ;-)
  • Log in or register to post comments

वाह ननि छान प्रतिसाद! फक्त ते

एमी
Wed, 06/27/2012 - 06:38 नवीन
वाह ननि छान प्रतिसाद! फक्त ते ड्वाळे का पाणावले काय कळालं नाय : - )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वूऊऊऊऊऊ. ... असले प्रतिसाद ही

जेनी...
Wed, 06/27/2012 - 06:42 नवीन
वूऊऊऊऊऊ. ... असले प्रतिसाद ही अतिशय सेक्सी वाटायला लागलेत आता :) मस्त....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

तशी भूक फक्त पाहिजे..... केमिकल लोचा...

चित्रगुप्त
Tue, 06/26/2012 - 11:21 नवीन
कोणतीही गोष्ट सेक्सी म्हणा, आकर्षक म्हणा, वा आणखी काही म्हणा, तशी वाटण्यासाठी काही एक मनो-शारीरिक-रासायनिक स्थिति असणे आवश्यक असते, असा अनुभव येतो. शरिरात काही 'केमिकल लोचा' झालेला असता काहीच आकर्षक वाटेनासे होते, वा विशिष्ट वयात काही केमिकल लोचा झाल्याने गोष्टी सेक्सी वाटू लागतात (हार्मोन्स वगैरे ?). यावर कुणी प्रकाश टाकेल का ? पाश्चात्य विज्ञान, आयुर्वेद वा अन्य शास्त्रे याबद्दल काय म्हणतात? कृत्रिम उपायाने असे बदल घडवून आणण्याबद्दल काय प्रयोग केले गेले आहेत?
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया वाचून स्वतःबद्दल एक गोष्ट लक्षात आली.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/26/2012 - 22:32 नवीन
दोन-चार लोकांची मतं वाचून समस्त स्त्री (किंवा पुरूष, किंवा मराठी माध्यमात शिकलेले किंवा बंगाली भाषा बोलणारे किंवा ठराविक जातीचे किंवा उंच किंवा वर्णाने काळे किंवा ....) जातीबद्दल किंवा एकूणच सरसकट मतं बनवणार्‍या व्यक्ती मला बोअर (=अन-सेक्सी) वाटतात. मग सेक्सी कोण वाटतं? हुशार व्यक्ती, ज्यांना स्वतःबद्दल गंड नाही आणि समोरच्या माणसाबद्दल भीती नाही, ज्यांच्याशी वाट्टेल त्या विषयावर बोलता येतं; ज्या व्यक्तिंना विचारपूर्वक स्वतःची मतं असतात आणि मतं स्वच्छ शब्दांत/कृतीत मांडता येतात. अशा व्यक्ती दिसायला बुद्रुक नसल्या तर उत्तम! माझ्या ओळखीत तीन अपवाद वगळता एकही व्यक्ती दिसायला बुद्रुक नाही. (हे लोकं मला तसेही बोअरच वाटतात.) पण सेक्सी व्यक्तीं*ची संख्याही या आकड्याहून फार अधिक नाही. शरीराची व्यवस्थित काळजी घेणारी लोकं हेल्दी आणि म्हणून मला सुंदर दिसतात. कपडे कसे घातले आहेत, चेहेर्‍यावरून किती आधी रेझर किंवा ब्रश फिरवला आहे, उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी केस किती उरले आहेत वगैरे गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटत नाहीत. किंबहुना बाह्यरूपावर फार वेळ घालवणार्‍या व्यक्ती काही काळानंतर मला बोअर वाटतात. अन्यथा अद्ययावत तंत्रज्ञान असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, वारूणी, चीज, महाप्रचंड आकारांच्या दुर्बिणी, पवनचक्क्यांची ग्रिड इत्यादी गोष्टी सुद्धा सेक्सी वाटतात. *यात स्त्रिया आणि पुरूष दोन्हींचा समावेश आहे. मला n एवढ्या व्यक्ती उपभोग्य वाटल्या तरीही त्या प्रत्येकाचा उपभोग घेणे अत्यावश्यक वाटत नाही.
  • Log in or register to post comments

पूजा पवार यांचे लिखाण वाचून

आशु जोग
Wed, 06/27/2012 - 00:01 नवीन
पूजा पवार यांचे लिखाण वाचून अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळते आहे असे दिसते. म्हणूनच >> 'सौंदर्य' हे स्त्रीचे 'सामर्थ्य' आहे तर, 'सामर्थ्य' हे पुरुषाचे 'सौंदर्य' आहे. असे कोणीतरी म्हणून ठेवले आहे.<< ही अशी वाक्ये वाचायला मिळतात. हे वाक्य 'समिधा' च्या प्रस्तावनेत राम शेवाळकर यांनी लिहीले आहे
  • Log in or register to post comments

२५०!!!!

बॅटमॅन
Wed, 06/27/2012 - 00:07 नवीन
२५०!!!!
  • Log in or register to post comments

शुभंकरोती म्हणा मुलांनो..

योगप्रभू
Wed, 06/27/2012 - 00:57 नवीन
संध्याकाळी दिवा लाऊन शुभंकरोती/परवचा म्हणा म्हटलं तर या पोरांना नकोय.. आणि सेक्सी शब्द काय सापडला तर अगदी चवीचवीने चर्चा करत बसलेत. मुलांपेक्षा मुलीच जास्त चहाटळपणाने एकमेकींना टाळ्या देत रंगून बोलताहेत अरे! हाच दिवस बघायचा होता तर कशाला देश स्वतंत्र करण्यासाठी आम्ही लढलो? हरी हरी..
  • Log in or register to post comments

ओ काका थांबा हो....कधी नव्हे

बॅटमॅन
Wed, 06/27/2012 - 01:00 नवीन
ओ काका थांबा हो....कधी नव्हे ते मुली मुलांपेक्षा जास्त बोलताहेत या विषयावर..जरा स्वातंत्र्याचे वारे घेऊद्यात की त्यांना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

वेळेचा परिणाम का..?

मोदक
Wed, 06/27/2012 - 01:02 नवीन
>>>तर कशाला देश स्वतंत्र करण्यासाठी आम्ही लढलो? हा वेळेचा परिणाम का..? की झोपेत टाईप करायला शिकला आहात..? ;-) (ह घ्या हो..!!!!! :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

काय काका ... देश स्वतंत्र

जेनी...
Wed, 06/27/2012 - 01:15 नवीन
काय काका ... देश स्वतंत्र केलाय म्हणताय आणि स्वतंत्रपणे स्वतंत्र विचार मांडतोय तर तेही नकोय .. हे असं असतं पूरुषांचं काहिच बोलायला नसलं की असलं बोलुन नारीजातीवर शाब्दिक अत्याचार करतात .../( \( हे प्रभु ..... योगा करा काका तुमी रोज ... त्यात शिर्शासन रोजरोज करा :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

रात्रीचे दोन वाजलेत..या माहौलमधे ही एक कविता

संजय क्षीरसागर
Wed, 06/27/2012 - 02:06 नवीन
हे अस्तित्वाचे देणे मी देऊ लागलो आता मालवून क्षण तो पुढला शतरंगी सजणे येना ...१ हा विदेह बघ मी झालो निर्बंध-मुक्त तू होना ही शांत समाधी माझी, लय-पूर्ण त्यात तू होना ...२ आरपार सखये होऊ किती आत्मिक ही तन्मयता शून्यात तुझ्या मी पूर्ण उमलतो, नृत्य निरंतर होता.... ३ हि कविता माझी नाही हे अस्तित्वाचे देणे कुणी न उरले कुणा मध्ये ग, हे असे निरंजन जगणे... ४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

संजय जी तुमची रात्री २

जेनी...
Wed, 06/27/2012 - 09:55 नवीन
संजय जी तुमची रात्री २ वाजताची होती , माझी ही पहाटे सहा वाजताची होती .... " मिठीत रे सख्या...! " मिठित रे सख्या तुझ्या अशी रात्र जाई.....!! भिजलेल्या ओठांवर माझ्या चांदणी खुलुन येई.... उतरल्या पापण्या ,लाजली नजर माझी धडधडतं काळीज बघ अशी नको करु घाई... रात्र सरे बघ ही सरसर ,उठे मदनाचा शहारा स्पंदनातुन माझ्या सख्या तुझे नाव ऐकु येई... उरला फक्त चंद्र , गेल्या तारका निजुन रात्रही सख्या गगनाला पापणीत मिटुन घेई... शहारला श्वास माझा,थरथरे तुझाही श्वास स्पर्श भावनांचा मुग्ध क्षण विरघळुन जाई.... तनु विहारली मिठित, मिठी मंत्रमुग्ध झाली लाजुन पाकळी ओठांची मुख ओठात लपवुन घेई.... मिठीत रे सख्या तुझ्या अशी रात्र संपून जाई दरवळ भावनांचा कुशीत पहाटेच्या फुलुन येई .... मिठित रे सख्या तुझ्या अशी रात्र जाई भिजलेल्या ओठांवर माझ्या चांदणी खुलुन येई.....!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ठीक आहे...

योगप्रभू
Wed, 06/27/2012 - 02:08 नवीन
हे प्रभु ..... <<योगा करा काका तुमी रोज ... त्यात शिर्शासन रोजरोज करा.>> ...मुली! तुझा सल्ला चांगला आहे, पण आताशा वयोमानामुळे भीती वाटते. योगा करायला जायचो आणि मणका सरकला तर कर्माचा भोगा नशिबी यायचा. पूर्वी मी डोक्यावर पडलो असल्याने शिर्शासन जमणार नाही, पण शवासन खूप आवडते. ते करीन. <<हे असं असतं पूरुषांचं काहिच बोलायला नसलं की असलं बोलुन नारीजातीवर शाब्दिक अत्याचार करतात >> ...इश्श्श... (चालेल ना हा शब्द मी वापरला तर? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा