Skip to main content

तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

लेखक शुचि यांनी गुरुवार, 21/06/2012 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत. मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;) माझ्यापासून सुरवात करते - (१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते. (२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला. (३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.

वाचने 197516
प्रतिक्रिया 347

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

बोटं घुसवणार्‍यांना बाहेर काढण्याची घाई नसते. ;) आणि मला तर अजिबातच नाही. "हे शिर दिले तुझ्या हाती..." :)

In reply to by एक

>>>> " हे शिर दिले तुझ्या हाती " अगदी पापण्या झुकवुन , लाजुन , ओठावर हलकसं स्मित आनुन मान तिरपी करुन , थोडं पाठमोरं वळून , वितभर अंतरावरुन'च' ऐकु जाईल असं " इश्श्श्य ...!! " :P

In reply to by एमी

आधार घेतलेला नसून- स्त्रियांबद्दल काय सेक्सी वाटतं उदा. बांधा, रंग, केस, उन्नत अंगे इ. हेही सांगायचं आहे आणि त्याचं वर्णन करताना वापरलेली भाषाही कशी सेक्सी आहे हे सांगायचं आहे म्हणून काही श्लोक उद्धृत केलेत इतकंच. आणि त्याला बोअर म्हणत असाल तर काय बोलणार आम्ही? कामसूत्र आणि खजुराहो मधे अडकलोय कारण ते आहेच तसं भुरळ घालणारं. निसर्गानं स्त्रियांना याबाबतीत जास्त इंटरेस्ट दिला नसेल तर तो पुरुषांचा दोष कसा?

In reply to by चैतन्य दीक्षित

Nothing personal : - ) माझा आणि संस्कृत चा बालपणापासून ३६ चा आकडा आहे म्हणून मला तसं वाटलं असेल... पण खरच दुसर्याच्या बोजड भाषेत लिहण्यापेक्षा स्वतःच्या ओबडधोबड भाषेत लिहलेलं कधीही चांगलं...आणि max मुलं तिच ती सेक्सी अंग सांगतायत...त्यात वेगळं काय...अगदी पूजा ने वर लिहलय तसं एकदम सेक्सी आणि विशेषणं वापरा नाय म्हणत पण जरा समजेल अशा भाषेत आणि वेगळं काही तरी लिहा एवढच सांगतेय...

In reply to by एमी

>> आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्याच द्रुष्टीने सेक्सी नाहीय हे लक्षात आल्याने शांत बसलेत... दया दया...

२ दिवस विचार करतेय, करतेय,.... पण मला न आवडणार्‍या गोष्टीच जास्त आहेत. डोक्यात जाणारी माणसे देखिल खूप आहेत. सेलेब्रिटी म्हणवणार्‍यांमध्ये शून्य इंट्रेस्ट आहे. स्मार्ट लोक मला आगाउ वाटतात, गोड माणसे मंद वाटतात. चित्रे निर्जीव वाटतात. गाणे ऐकले की मी झोपून जाते. फक्त धो धो पाउस आवडतो. पण तेंव्हा असे सेक्सी वगरे काही वाटत नाही. वास्तविक नक्की काय वाटते ते सांगता येणार नाही. गारगार वाटते फक्त. बाकी काहीच होत नाही. मी आजारी तर नाही ना?

In reply to by कवितानागेश

>स्मार्ट लोक मला आगाउ वाटतात, गोड माणसे मंद वाटतात. यावरून नीतिशतकातला एक श्लोक आठवला. नोकराच्या बाबतीत- जर तो शांत असेल तर त्याला भित्रा म्हणतात, बोलत असेल तर फार तोंडाळ आहे म्हणतात समोर उभा राहात असेल (मान वर करून) तर 'मॅनरलेस' म्हणतात लांब लांब राहात असेल तर त्याच्यात प्रगल्भता नाही असे म्हणतात.. थोडक्यात- सेवाधर्म (एखाद्याची त्याच्या मनाप्रमाणे चाकरी करणं) हे योग्यालाही कठीण असं काम आहे.

In reply to by दादा कोंडके

एक से काम चलता है, पर दो की जरूरत है. हे म्हणजे जरा 'भारी'च आहे.

In reply to by नाना चेंगट

आधी स्वतःची तर जाणुन घे. (त्यासाठी आधी लग्न कर मेल्या.. चालला गगेच दुसर्‍यांच्या ताटात डोकावायला.) ;)

In reply to by नाना चेंगट

लोकाच्या पुस्तकाने आणि नोटसने अभ्यास उलट अधिक चांगला होतो हा अनुभव आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ते "मंदाकिनी" वरुन कळलच होतं... बाय द वे, मंदाकिनीचं पुढे काय झालं ? अर्धवटराव

बाकी या निमित्ताने "कर्मसूत्रां" चे विवेचन कसे काय बाहेर नै आले काय माहिती ;) (बुचकळ्यात पडलेला) बॅटमॅन.

In reply to by कवितानागेश

असेच म्हणतो. नपेक्षा गेलाबाजार सचित्र नाही पण चित्रविचित्र वर्णने वाचायला तरी मिळाली असती ;)

In reply to by कवितानागेश

एकदा खजुराहोला भेट दिली की सगळं काही कळेल ;) इतकी प्रमाणबद्ध शिल्पं कोरणार्‍या कारागिरांचा शरीरशास्त्राचा आणि कामशास्त्राचाही गाढा अभ्यास असणार हे पटतेच ती शिल्पे पाहिल्यावर. तिथे एक शिल्प आहे, स्त्री स्वतःची वस्त्रं उतरवीत आहे आणि तिच्या मांडीवर एक विंचू आहे (विंचू म्हणे तिच्या 'कामोत्तेजनेचं प्रतीक' आहे). ते शिल्प आणि इतरही अनेक (इथे अवर्णनीय) अशी शिल्पे जाम सेक्सी आहेत.

In reply to by वपाडाव

त्यांचा 'वृश्चिक दंश' जहरी असावा. जो 'इश्काची इंगळी डसली ग बाई मला....' असे बोंबलायला स्त्री जातीला भाग पाडत असावा.

एवढ्या दीडशेच्या वर प्रतिसादात आपला साधा उल्लेखही नाही, हे बघून त्या वयोवृद्ध, ह.भ.प. महर्षींच्या आणि त्यांच्या आश्रमातील त्या आश्रम-हरिणींच्या मनाला किती वेदना होतील, या विचाराने आमचे डोळे पाणावले आहेत.

In reply to by खटासि खट

>>> कै च्या कै धागा आणि कै च्या कै चर्चा.. >>> पोष्टण्याआधी थांबा. का बरं ? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा म्हणाल्या होत्या की, सेक्सी शब्दाचा अर्थ सुंदर, आकर्षक असा होतो. आता हे आकर्षक दिसण्याच्या काही सार्वत्रिक अशा कल्पना असतील आणि त्याबद्दल चर्चा होत असेल तर संयत अशी चर्चा करायला हरकत नसते, असं माझं तरी मत आहे. आदिवासी स्त्रिया, शहरी स्त्रिया, विविध जाती-जमातीमधल्या स्त्रीया, देश-विदेशातल्या स्त्रिया आकर्षक दिसाव्या म्हणुन प्रयत्न करत असतात. आकर्षक दिसण्यासाठी स्त्रिया अलंकाराचाही वापरत करतात त्यावरही उत्तम चर्चा झाली असतो. जसे, आपल्या कडे अलंकारामागे काही परंपरा असतीलही परंतु काही अलंकारांनी आकर्षक दिसलं पाहिजे हा भाग आहेच. स्त्रियांच्या गळ्यातील विविध अलंकार, नाक, कान, मनगटे, हातापायातील बोटांमधील अलंकार, शरीरावर गोंदुन घेणे, तरुण-तरुणींमधे असलेलं टॅटूचं वेड. तसंच, बारीक भुवया, उंच कपाळ, सिंहाप्रमाणे बारीक कंबर, वगैरे. असो. आपण जे कोणी असाल ते असाल, पण येत चला....सालं आमच्या मिपाला कशा-कशाचं वावडं नाही. :) -दिलीप बिरुटे

कुंतल...नेत्र ..नासिका..अधर..स्तन .नाभी प्रदेश ..+२ [ते समजून घ्या ] हि प्रेम व काम वासना जागृत करणारी अष्टांगे आहेत . व हि अंगे जागच्या जागी व प्रमाण बद्ध असणा~या अश्या सुंदरीस अष्टांग सुंदरी म्हणतात असे एका मित्राने खूप वर्षा पूर्वी सांगितल्याचे स्मरते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

श्री. अविनाशकुलकर्णी साहेब, तुमच्या प्रतिसादात रंग, गंध, स्पर्श, आवाज, अदाकारी, उंची (शारीरिक आणि बौद्धीक) वगैरे महत्त्वाच्या 'अंगांना' तुम्ही 'स्पर्श' न केल्याने आमच्या सेक्स 'विषय'क भावना दुखावल्या आहेत. संपादक मंडळाने कृपया नोंद घ्यावी.

In reply to by चित्रगुप्त

अहो फक्ट चित्रच का... सुंदरींनाच घेऊन याना... टेम्पो पाठवतो.. नव्हे मी स्वतः टेम्पो चालवत येतो ( आजकालच्या टेम्पो चालकांना मालकाच्या "गुड्स" ची काळजीच नसते म्हणुन.. बाके काहि नाहि) अर्धवटराव

नको तिथे नको तसे वागणे. बऱ्याच मा. त. कंपन्यांमध्ये दर शुक्रवारी परिधानाच्या बाबतीतल्या अटींमध्ये शौथिल्य असते. बरेच पुरुष कर्मचारी गबाळे पोशाख करून येतात. अन काही तरुणी असतात ज्या कंपनीने दाखविलेल्या औदर्याचा पुरेपूर गैर फायदा घेतात. पुरूष सहकाऱ्यांचे चित्त विचलित होईल व नियमात बसणारे कपडे घालून येणाऱ्या स्त्री सहकाऱ्यांना अवघडल्यासारखे वाटेल असा पोशाख त्या करतात. मुद्दामच त्या पोशाखांबाबत कुठलेही विशेषण वापरत नाहीये कारण पोशाखाबाबतच्या व्याख्या ह्या व्यक्तीगणिक बदलतात. अर्थातच कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाला या गोष्टींची दखल घ्यावी लागते. अधून मधून त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांना इशारावजा विपत्र येत असते. त्यात वर उल्लेखलेल्या दोन्ही मुद्द्यांचा अंतर्भाव असतो. अन असेही लिहिले असते की बऱ्याच लोकांना वैयक्तिक सूचना देऊन काहीही उपयोग होत नाहीये. याच कारणांमुळे माझ्या कंपनीत तर २००७ साली शुक्रवारचे अटींमधील शौथिल्य काढून टाकण्यात आले होते. तर मुद्दा असा आहे की काही लोक नको त्या तिथे नको तश्या कपड्यांचा वापर का करतात, याखेरीज त्यांच्या देहबोलीतून जाणवणारी सूचकताही आजूबाजूच्यांना अवघडल्यासारखे वाटवणारी असते (पुन्हा ह्याची व्याख्यादेखील व्यक्तिसापेक्ष आहे). अर्थात काही आंबटशौकीन या गोष्टींचाही लाभ उठवतातच. जेव्हा मनुष्यबळ विकास विभागाला अशा लोकांना इशारे देण्याची वेळ येते म्हणजे सामाजिकदृष्ट्याही हे स्वीकारार्ह नसावे. याउलट माझा अमेरिकेतला अनुभव आहे, इथेही काही लोक या प्रकारची वस्त्रे परिधान करतात व इथेही अश्या लोकांना इशारे दिले जातात. पण ज्या प्रकारची अस्वीकारार्ह देहबोली मला भारतात आढळली त्या प्रकारचे उदाहरण येथे विरळाच. मला तर त्या म. वि. विभागातील कर्मचाऱ्यांची दया येते जे अश्या व्यक्तिंशी प्रत्यक्ष बोलून त्यांना इशारा देतात. त्या वेळी त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल कारण नियम तोडणारी व्यक्ती उलट उत्तर देणारीही असू शकते. ती जर म्हणाली की बघणाऱ्यांच्या नजरेतच दोष आहे तर अश्या वेळी हे लोक प्रसंग कसा हाताळतात? असे ऐकले आहे की, मॅनेजर लोकांनाही असे इशारा देण्याचे काम करावे लागते. ही परिस्थिती तर त्याहून अवघड, रोज ज्या व्यक्तीकडून काम करवून घ्यायचे असते तीला असे काही समजावून सांगणे म्हणजे. माझ्यावर भविष्यातही असे कुणाला बोलायची वेळ न येवो म्हणजे मिळवली.

आजचा सेक्सी सवाल... नेट वरील चित्रे पाहून व मजकूर/चर्चा वाचून बुद्धीजीवी समाजाचे मन व नजर मेली आहे .. प्ले बॉय ने भारतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्या साठी भारतात बस्तान बसवण्या साठी हि योग्य वेळ आहे असे वाटते का?

प्लेबॉय ची भारतीय आवृती म्हणजे भारतीय मॉडेल्स ची अनावृत्त छायाचित्रे असलेली, की फोटो तिकडल्यांचेच, मजकूर फक्त हिंदी, मराठी वगैरे भाषांमधे असलेली? ... यावर सदर मासिकाचे व्यावसायिक यश अवलंबून राहील, असे वाटते. अर्थात नेटवर सर्व फुकट उपलब्ध असता महागडे मासिक कितपत खपेल, हाही प्रश्न. भारतात योग्य वेळ नेहमीच होती आणि राहील, हे खजुराहो वगैरे किंवा ताडपत्रीवरील वरकरणी धार्मिक (उदा. दशावतार) चित्रे, पण घडी उघडल्यावर आत रतिचित्रे असे अनेक प्रकार बघता वाटते. ....उदाहरणार्थ या धाग्याला मिळत असलेला प्रतिसाद.... वगैरे.

डब्बल सेंचुरीला हातभार!

डॉ दिलीप बरुटेजी माझा उद्देश ताशेरे ओढण्याचा नाही. हा विषय खूपच खाजगी आहे. कदाचित इथे महिला, मुली देखील असू शकतात. त्यांना वघडल्यासारखे वाटू शकते. या विषयावर आणखी संयत चर्चा होऊ शकते असं माझं मत आहे. विषय अशा पद्धतीने समोर ठेवल्यानंतर पुढे त्याचं काय होणार म्हणा.. गैरसमज नसावा.

In reply to by खटासि खट

हा विषय खाजगी आहे आणि त्याची चर्चा करू नये वैगे वैग्रे वरकरणी संस्कृतिसंरक्षक पण व्हिक्टोरियन इंग्लंडाकडून उचललेल्या उपर्‍या जाणिवांची मुक्ताफळे उधळण्याआधी हे बघा: १. हा धागा एका महिलेने काढला आहे. २. चर्चा संयत झाली आहे. पुरुषांचे प्रतिसाद जास्त आहेत(असणारच), पण स्त्रियांचे देखील प्रतिसाद आहेत बर्‍यापैकी. ३. सेक्सीपणा म्हणजे काय हा विषय परिपक्वपणे चर्चिताना मुलींना अवघड का वाटावे? आजकालच्या सगळ्या मुली काय सानेगुरुजीछाप संस्कारवाल्याच असतात का? मुळात या मान्यतेमागे "सेक्स ही टॅबू प्रकारची गोष्ट आहे", अशी तद्दन भंपक धारणा आहे. शिवाय इथे काही स्त्रियांनी त्यांच्या मते सेक्सीपणा कशात असतो यावर आपापली मते मांडली आहेत. त्यांवरती प्रतिक्रिया देखील पुरेशा सभ्यच आहेत. ४. असभ्यपणा आणि सेक्सबद्दलची परिपक्व चर्चा यात बराच फरक आहे. संयत चर्चा म्हणजे अजून काय अपेक्षित आहे? सेक्स हा विषयच मुळात भौतिक जगाच्या केंद्रस्थानाशी असणारा आहे, त्याची "परिपक्व चर्चा" काय अ‍ॅब्स्ट्रॅक्टपणे रॉबर्ट किन्से वैग्रेंचे दाखले देऊन रु करणार आहात का? तसे तुम्हाला वाटत असेल तर धाग्याचे शीर्षक बघा, "तुम्हाला काय/कोण सेक्सी वाटते". इथे प्रामुख्याने वैयक्तिक मते मांडणे अपेक्षित आहे. तेव्हा हा दांभिकपणा टंकण्याआधी थांबा.

२००

हे घ्या!!

In reply to by आशु जोग

म्हंजे अगदी निष्पाप, कोणीही अरे बापरे ऐवजी चायला म्हटले तरी ऐय्या, औव्वा करणार्‍या वैग्रे वैग्रे....

In reply to by बॅटमॅन

>> तरी ऐय्या, औव्वा करणार्‍या वैग्रे वैग्रे.... जुन्या काळी मराठी चित्रपटात आवर्जून असणारा 'इश्श' हा शब्द ही हद्दपार झालाय हो....

In reply to by श्रीरंग_जोशी

कोण म्हणालं ' इश्श्श्य ' हद्दपार झालाय? \( /( मी तर म्हणते बॉ .....छान वाटतं ' इश्श्श्य ' म्हणायला :)

जॉन इब्राहीम प्रचंड आवडतो (दोस्ताना बघितल्यावर वैतागलेच होते, तरीपण.) केबीसी पासून अमिताभ बच्चन खूप आवडतो (फ्रेंच बेयार्ड मुळे). टकलू आणि फ्रेंच बेयार्ड हे कॉम्बिनेशोन पण खूप सेक्सी वाटतं

In reply to by श्रीरंग_जोशी

sorry typo mistake :).

बर्‍याचदा स्त्री , पूरुषाकडे पापण्या झुकवुन ,चोरट्या नजरेने पहाते ...खरं आहे हे ,त्या नजरेत तिला फक्त त्याचं पूरुषत्व न्याहाळायचं असतं .जसं पूरुष स्त्रीचं सौंदर्य न्याहाळतो ..तसच स्त्रीलाहि पूरुषातल्या मर्दाणगीचं आकर्षण असतं. अतिशय नैसर्गिक आहे हे . जीवनचक्र ह्यावरच तर चालु आहे ..त्यामुळे आकर्षणाबद्दल बोलताना ते सहजसुंदर आहे ह्या भावनेतुन बोललं गेलं तर बरेच राज\ गुपित उलगडु शकतिल ... ' आवडणार्‍या ' पूरुषाबद्दल स्त्रीला काय वाटु शकतं हे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतेय ... माझ्याच काही ओळी .....कधीतरी लिहिलेल्या ..... पूरुष ..... पुरुष इतका सुंदर असू शकतो ?म्हणजे एखाद्या स्त्रीच्या स्त्रीत्वालाही आव्हान देईल असा? इतकं अस भरदार त्याच्याकडे असत तरी काय ....कि एखाद्या नाजूक मनाची ...कोमल शरीराची पावलं आपोआप त्याच्याकडे वळली जावित ? त्याच्यात स्त्रीपेक्षा जास्त काही असेल किवा असू शकतं ..ह्यावर तुला पाहण्या आधी विश्वास बसायचा नाही ... ' ' पुरुष ' ह्या शब्दाचीच जाणीव होण खूप महत्वाच असतं ..त्यात बरीच रुपं लपलेली असतात .. प्रत्येकवेळी स्त्री त्याच्याबाबतीत एकच विचार नाही करू शकत ..त्या पुरुषात तिला तिचे वडील ..भाऊ ..मुलगा ..नात्यातले पुरुष आणि महत्वाचा नवरा ..हि सगळी नाती मिळतात ... ज्या मायेने तिचा हात तिच्या मुलावर फिरतो ..त्याच मायेची अपेक्षा ती तिच्या वडिलांकडून करते अन ती माया ..ती काळजी .....ते प्रेम ....तो भावूक स्पर्श सर्व काही तिला तिच्या नवर्‍याकडून हवं असतं ..तिच्या नवर्‍यात पहायचं असतं ..जिथे तिच्या ह्या अपेक्षा पूर्ण होतात ..तिथे ती तिच्या आणि तिच्या नवर्‍याच्या मानसिक आणि शारीरिक ..दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरते ...... शरीराचं आकर्षण प्रत्येकाला असतं ...पण त्याहूनही महत्वाचं आकर्षण हे मनाचं असतं ....तुझं माझं जवळ येन म्हणजे मानसिकतेतून घडणार मिलन ..असे प्रकार खूप कमी पहायला मिळतील ...पण जिथे हे मिलन होतं ..ते दोन जीव जगाच्या पाठीवर कुठेही असोत एकमेकांच्या आठवणीत जगतात ....निदान माझ्यासाठी तरी तू माझ्या खूप जवळ येवून गेलायस ..इतका जवळ ..कि भास होता ..कि स्वप्न होतं ..कि खरच न घडलेलं एक सत्य होतं ...ह्या प्रश्नानाही आता जागा नाहीय ...... जगातली अप्रतिम निर्मिती म्हणजे पूरुष ..स्त्री ही अनेक नात्याची रुपं घेऊन पूरुषाशी जोडलेली असते .. मुलगी ही नेहेमीच वडीलांच्या अतुट मायेचा एक अविष्कार असते ,तर आईचं तिच्या मुलाभोवती असणारं ममतेच आवरण. स्त्री अनेक नात्यातला जीव्हाळा एकाच पूरुषात जास्त पहाण्याचा, त्याला मिळवण्याचा प्रयत्न करते तो म्हणजे तिचा प्रियकर ,तीचा पती .. हे नातं तर निसर्गालाही हेवा वाटावा इतकं सुंदर असतं .... त्यांच्यात असणार्‍या मानसिक आणि शारिरिक आकर्षणामुळे ते कायम एकमेकांचा आधार ,एकमेकाना पूरक बनुन राहातात. मी एवढच म्हणेन , स्त्री ही जेवढी पूरुषाला आकर्षक वाटते ...तेवढच स्त्रीच मनहि पूरुषाकडे आकर्षित होतं आणि त्यात गैर काहिच नाहि .

In reply to by जेनी...

'सौंदर्य' हे स्त्रीचे 'सामर्थ्य' आहे तर, 'सामर्थ्य' हे पुरुषाचे 'सौंदर्य' आहे. असे कोणीतरी म्हणून ठेवले आहे.