शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्या-कोतार्यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू. प्रभाकर जोशी, बाळासाहेब कुरतडकर, यशवंत देव, पाडगावकर, अभिषेकी बुवा, श्रीनिवास खळे ही सारी रत्नं तिथे वावरायची.
दर शनिवारी सकाळी साडेसात वाजले की रसिक ५४५ अंश पाच या मिडीयम वेव्ह वरच्या आकड्यावर डायल फिरवायचा.
"भा व स र ग म " मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करीत आहोत. " असे गोड आवाजात निवेदन. मग काव्य वाचन व नंतर प्रत्यक्ष गीत असा क्रम असायचा.अन काय सांगावं मंडळी...... मग परिकथेतील राजकुमारा,,,,,ही वाट दूर जाते... हात तुझा हातात... पहिलीच भेट् झाली.... येथून ते दिवस तुझे फुलायचे येथेपर्यंत ही मैफल कित्येक वर्षे चालू राहिली.
रेकॉर्ड कंपनीने गायक, कवि, संगीतकार गाठायचे व गीते ध्वनिमुद्रित करून तबकड्या विकायच्या असा शिरस्ता त्या पूर्वी होता.पण एखाद्या कार्यक्रमाने इतकी एका सरस भावगीते रसिकाना द्यावीत हे अद्वितीय उदाहरण म्हणावे लागेल. ( पुणे आकाशवाणी तर्फे सादर झालेले गीतरामायण हा सन्मान्य अपवाद ) .
मला वाटते शुक्रतारा हा भावसंगीतात एक मैलाचा दगड ठरावा.कारण त्यापूर्वी चे भावगीतातील ऑर्केस्ट्रेशन हे फार साधे ,मूळ चालच वाद्यावर वाजवायची असे असे. काही प्रमाणात वसंत प्रभू यानी. खळ्यानी, इंटरलूडची प्रथा समर्थपणे चालू केली होती. पण वाद्यवृंद या स्वरूपात सुरूवात ही शुक्रतारा पासून झाली असे म्हणावे लागेल. दुसरे असे की भावसंगीतात
युगलगीत असे नसे. भक्तीगीते, एकल भावगीते असत.नाट्य गीतातही " तुझे नि माझे जमेना ( ज्योत्स्ना भोळे व मा. अविनाश )असे अपवाद होते. पण मुख्यतः युगलगीते ही सिनेमातच असत.
मला नेहमी असे वाटते की मुख्य एखाद्या रागावर आधारित चाल करण्याच्या राजमार्ग पत्करल्यानंतर त्यात इतर स्वरांची
अजोड मिसळ करण्याची दैवजात देणगी मराठीत खळे आण्णांना तर हिंदीत नय्यर साहेबाना मिळालेली होती. खळयांनी तर आपल्या कारकीर्दीत हा खासपणा विशेष जपलेला दिसतो. निरनिराळ्या अंतर्याना बदलून चाल द्यायची तरीही तो पॅच वाटता कामा नये हे ही या दोन संगीतकारात असलेले साम्य. शुक्रताराचे दुसरे कडवे काय किंवा पहिलीच भेट झाली मधे "डोळे मिटून घेता" हे कडवे काय ही याची उदाहरणे आहेत.
अरूण दाते यानी जगभरात आपल्या भावगीतांचे कार्यक्रम करून दिगंत कीर्ति मिळविली. एखाद्या कलावंताची कारकीर्दे तीन तासांचा कार्यक्रम करण्याइतपत यशस्वी व मोठी असावी हे रसिकांचे भाग्य. जवळ जवळ १०० चे वर " सुधा मल्होत्रा" या कार्यक्रमाच्या निमिताने दात्यांबरोबर गायल्या. अमेरिकेत तर तेथील स्थित महिलाच गायिका म्हणून पुढे येत यात खळे काकांची सोपी चाल व गीताची कोण्याही व्यक्तिच्या काळजाला भिडण्याची ताकद याचा सुरेख संगम दिसून येतो.
आणखी ५० वर्षानंतर ही हे गीत असेच ताजे राहील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लेख... आणी अरुण दाते
वाह ! वा !
अजून एक
बादवे हे अरुण हे नामकरण यशवंत
यशवंत देवानी सांगितलेले
आयला खळ्यांची सोपी चाल?
ऊगाच वपु आठवले...
आयला खळ्यांची सोपी चाल? खळेकाकांच्या चाली ऐकायला सोप्या पण समजायला आणि गायला भयानक अवघड आहेत असे वाटते.याच अर्थाचे वाक्य आहे... बहुतेक "सखी" नक्की आठवत नाही...बरोबर
मस्त माहिती
लेख
आभार !
एक गाणं फार आवडतं होतं पण
ट्राय करतो
धन्यवाद .. पण हे नाही ... हे
या दोन ओळी वेगवेगळ्या कडव्यां
https://www.midomi.com
गाणं समजलं ... ☺️ या उदास
या उदास कवितेवरती बघ श्वास
सुरेख आठवणी