आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले.
रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ?
वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत. माझे ज्ञान अतिशय तोकडे आहे, काहि चुकले असल्यास मोठ्या मनानी क्षमा करावी आणी कान पकडुन चुक दाखवावी.
बाण लागुन वाली खाली कोसळताच राम त्याच्या दिशेने धावला, थोडेसे भानावर आल्यावर संतापलेल्या वालीने रामास खालील प्रश्न विचारले वा असे म्हणु की आपले मनोगत ऐकवले :-
१) हे उमद्या राजकुमारा मी दुसर्या कोणाशी लढत असताना तु मला बाण का मारलास ?
२) लोक म्हणतात की राम हा सत्यवचनी, तत्वनिष्ठ आणी सदा धर्माचे आचरण करणारा आहे. तुझ्या सारख्या क्षत्रियाने ज्याने वेदांचा अभ्यास केला आहे, काय योग्य काय अयोग्य ज्याला पुर्ण कळते अशा तुझ्या सारख्या व्यक्तीने असे अधर्माने वागणे योग्य आहे का ?
३) तुझ्या सारखा धर्माचरणी माणुस स्वत:च्या पवित्र आत्म्याला मारुन माझ्या सारख्याशी असे क्रुर वर्तन करेल अशी अपेक्षाच मी कधि केली न्हवती.
४) मी तुझ्या राज्यात किंवा तुझ्या विरुद्ध काहिही अपराध केलेला नसताना ती कोणती गोष्ट होती जिनी तुल मला असे अधर्मानी मारण्यास प्रवृत्त केले ? ते ही मी दुसर्या कोणाशी लढत असताना ?
५) तुझा जन्म रघुकुलातला आहे, तुमचे घराणे हे सदवर्तन आणी धर्मरक्षणासाठी फार पुर्वीपासुन प्रसिद्ध आहे. अशा कुलात जन्म घेउन सुद्धा तु हे असे पाप कसे केलेस ?
६) आम्ही वनवासी आहोत आणी तु एक नागरीक. असे असताना सुद्धा असे प्रतिष्ठा घालवणारे हिन कृत्य तु कसे करु शकतोस ?
७) लोक सोने, चांदी, सत्ता, जमीन मिळवण्यासाठी दुष्कृत्य करतात, मला मारुन तु काय मिळवलेस ?
८) पाच प्रकारची जनावरे हि ब्राम्हण व क्षत्रियांस खाण्यास योग्य असतात. मी त्यातील एकाहि प्रकारात मोडत नाही. माझी हाडे, त्वचा माझे केस हे कुठल्याच प्रकारे मनुष्यास उपयोगी पडु शकत नाहित, असे असताना सुद्धा तु माझी हत्या का केलीस ??
९) मी राम नावाच्या अशा हत्तीकडुन मारलो गेलोय ज्यानी धर्म,नितीमत्ता ह्यांची बंधने तोडुन टाकली आहेत आणी जो उन्मत्त झाला आहे.
१०) जर तु समोरा समोर मला आव्हान दिले असतेस तर आतापर्यंत तु नक्कीच मृत्युच्या कुशीत असतास.
११) जर सीतेला शोधण्यासाठी सुग्रीवाचे मदत मिळावी म्हणुन तु हे केले असशील तर ती फार मोठी चुका आहे. मला सांगितले असतेस तर मी कधिच रावणाला हात बांधुन तुझ्या समोर आणुन आदळले असते.
ह्यावर रामानी दिलेली उत्तरे अशा प्रकारे :-
१) ह्या असल्या निष्फळ आणी पुराव्याशिवाय बडबडीने तु माझ्यावर आरोप करु पाहत आहेस, किती निर्बुद्ध असशील तु.
२) कोणताही योग्य निर्णय घेताना धर्म, अर्थ, काम, समय, लोक ह्या सगळ्यांची आवश्यकता असते. तुला वरिल पैकी एकाहि गोष्टिचे ज्ञान नसताना तु ह्या गोष्टिंच्या आडुन माझ्यावर कसे आरोप करु शकतोस ?
३) तु जन्मानी एक वानर आहेस, आपल्या आजुबाजुला तु तुझ्या सारखीच इतर वानरे गोळाकरुन बसला आहेस आणी त्यांच्या संगतीत तु जे काय करशील ते सगळे धर्माप्रमाणे आहे असे तु कसे समजु शकतोस ? धर्म म्हणजे काय हे माहित नसेल तर थोर लोकांकडे जाउन अभ्यास कर, वेद, धार्मीक ग्रंथ वाच म्हणजे धर्म म्हणजे काय हे तुला निट आकलन होईल.
४) पृथ्वी वरील सर्व नद्या, डोंगर, जंगले ही रघुकुलाच्या अधिपत्याखाली येतात. रघुकुलात जन्म घेतल्याने ह्या सर्व ठिकाणी धर्माचे पालन कसे होईल ह्याकडे लक्ष देणे हे माझे कर्तव्य आहे. इथे अधर्मानी वागणार्यांना आम्ही दंडीत करणारच.
५) लहान भाउ, विद्यार्थी आणी मुलगा ह्यांना एकाच न्यायाने वागवावे.
६) मी तुझा वध करण्याचे मुळ कारण म्हणजे स्वत:च्या लहान भावाच्या बायकोशी तु केलेले दुर्वर्तन. त्या वर्तनानी तु धर्म आणी नितीमत्ता ह्यांच्याशी कायमची फारकत घेतली आहेस.
७) कन्या, भगीनी वा लहान भावाच्या बायकोशी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या दुष्कृत्यासाठी 'मृत्युदंड' हि एकच शिक्षा प्रत्येक धर्मग्रंथानी सांगितलेली आहे.
८) सुग्रीवाशी माझे जुळलेले संबध हे माझे लक्ष्मणाशी असलेल्या संबंधा येव्हडेच पवित्र आहेत. जर मी तुझ्याशी संबंध जोडले असते, तर सुग्रीवाच्या पत्नीला कोणी बरे मुक्त केले असते?
९) राजाच्या हातुन दंडास पात्र झालेला पापी स्वर्गप्राप्ती करतो, त्याची सर्व पापे नाहिशी होतात. पण ह्या उलट जर राजानी अशा पापी लोकांकडे दुर्लक्ष केले तर ह्या पापी लोकांना मिळणार्या सार्या शिक्षा ह्या राजाला नरकात भोगाव्या लागतात. माझे पुर्वज मंधता ह्यांनी सुद्धा ह्या आधी ह्याच प्रकारे पाप्यांना दंडीत केलेले आहे.
१०) तु जन्माने वानर आहेस. अनादी कालापासुन मनुष्य सापळे लावुन प्राण्यांची शिकार करत आला आहे. तुझ्या सारख्या स्वत:च्या सुरक्षीत वस्तीस्थानापासुन बाहेर आलेल्या प्राण्याची हत्या करण्यात गैर काहिच नाही. आणी मुख्य म्हणजे शिकार ही समोरा समोरच खेळली गेली पाहिजे असा कोणताही धर्म वा नियम नाही.
११) तुझी हत्या ही मी माझ्या कुलाचे नाव राखण्यासाठी, उज्वल करण्यासाठी आणी धर्माच्या रक्षणासाठीच केलेली आहे.
ह्या उत्तरांनंतर स्वत: वालीनेही रामानी काहिही पाप केले नसल्याचे मान्य केले होते.
वाचने
3459
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा 'बिनतोड'
?
मागच्या
In reply to ? by अवलिया
हरकत नाही
In reply to मागच्या by परिकथेतील राजकुमार
:-)
म्हणजे कोणीतरी डांबीस असणं हे फार पूर्वीपासूनचं आहे तर!
In reply to :-) by प्रियाली
खुद के साथ
In reply to म्हणजे कोणीतरी डांबीस असणं हे फार पूर्वीपासूनचं आहे तर! by चतुरंग
तात्या
In reply to :-) by प्रियाली
साधे उत्तर
वाली