✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राम आणी वाली

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 03/09/2009 - 18:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3431 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

हा 'बिनतोड'

मेघना भुस्कुटे
Mon, 03/09/2009 - 22:02 नवीन
हा 'बिनतोड' युक्तिवाद वाचून माझंही मनोरंजन झालं आहे. रामायण हे तत्कालीन समाजसंकेतांना धरून चालणारं एक काव्य आहे हे गृहित धरून आणि तितपतच महत्त्व त्याला देऊन त्याकडे पाहायचं हे ठाऊक आहे. पण आजच्या बदललेल्या नीतीमूल्यांमध्येही त्या वागण्याचं कुणी हिरिरीनं समर्थन करत असेल, तर त्याबद्दल दुमत नोंदवण्याचा हक्क बजावला पाहिजे, कारण रामायणाचे दाखले आजही दिले जातात. म्हणून लिहिते आहे. रामाचा - आणि त्याच्या कुलाचा - आजूबाजूच्या परिसरावरचा हक्क हा स्वघोषित होता. तत्कालीन साम्राज्यविस्ताराच्या तंत्राचा तो एक भाग होता. वाली वानर असला, तरी तो त्याच्या प्रदेशाचा शासक होता. तो प्राणी असल्यामुळे त्याला मारण्याचा हक्क रामाला मिळत नाही. हा हिसकावलेला हक्क आहे. होता. वाली, शंबुक, सीता अशा अनेक बाबतींत रामाची भूमिका वादग्रस्त ठरत आली आहे. आजच्या बदलत्या मूल्यांच्या संदर्भात तसं कुणी रोखठोकपणे म्हणत असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? कुठलंही महाकाव्य हे काळाच्या कसोटीवर अशा प्रकारे घासून घेतलं जात असतंच.
  • Log in or register to post comments

?

अवलिया
Mon, 03/09/2009 - 23:17 नवीन
हा तथाकथित संवाद आपणास कुठुन प्राप्त झाला हे कळाले तर बरे होईल. बाकी, आपले रामायणाविषयीचे ज्ञान किती आहे हे आपण सांगितले असल्याने त्यावर काहीही बोलत नाही. राम आदर्श मानला जातो आहे हजारो पिढ्यांपासुन.. काहीतरी असेलच ना त्यात.. का आजची पिढी फार हुशार आणि मागील आपले सर्व पुर्वज केवळ गतानुगतिक. नाही, काहीतरी आपलेच चुकते आहे, आपल्या पहाण्यात दोष आहे. असो. रामायण हे ना कल्पनाविलास ना काव्य ! रामायण ही कहाणी आहे अयोध्येच्या राजपुत्राची!! एका हाडामासांच्या मानवाची!!!! जो तुमच्या आमच्या सारखाच होता, फक्त फरक असेल तर येवढाच की संकटे आल्यावर तो गांगरुन जात नसे... तोंड देत असे.. विजय प्राप्त करत असे...बास ..हाच तो मुलभुत फरक!!! इंग्रजांनी फोडा झोडा केले असे म्हटले जाते... रामाने दहाहजार वर्षापुर्वी केले... सुग्रीव, बिभीषण!! अमेरिका दुस-या देशाच्या धनसहाय्याने तिस-या जगावर हल्ला करते असे म्हटले जाते... रामाने दहाहजार वर्षापुर्वी केले.. सु्ग्रीवाच्या सहाय्याने लंकेवर हल्ला !! बाकी, चमत्कार, जमिनीतील पेटी, अहिल्येची मुक्ती वगैरे वगैरे माणसाचा देव होतांना जो शेंदुर अपरिहार्यपणे चढतो त्याची पुटे. असल्याने फरक पडत नाही, नसल्याने माहात्म्य कमी होत नाही. ज्याला रामाला मानायचे त्याने मानावे, कुणी नसेल मानत त्यामुळे मला तरी फरक पडत नाही. बोला सियावर रामचंद्र की जय !!! श्रीराम जय राम जय जय राम !!! -- अवलिया
  • Log in or register to post comments

मागच्या

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/10/2009 - 12:22 नवीन
मागच्या वर्षी ह्याच मुद्यांवर झालेल्या वादात काहि लोकांकडुन मला हा संवाद प्राप्त झाला होता, त्यावेळी तरी त्यांनी तो हा संवाद वाल्मिकींनी रामायणात लिहिला आहे असा दावा केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी मी ह्या संवादाचे दाखले दिलेले बघत होतो. मी राम हा देव असल्याचा कुठल्याही प्रकारे दावा करत नाहि अथवा त्यानी केलेल्या कृत्याचे समर्थन अथवा विरोधही करत नाहि. जे मला प्राप्त झाले ते मी फक्त आपणासमोर आणले. ह्याच्या सह्हायानी मला कुठलाही दावा करायचा नाही. वाली वध आणी अधर्मचरणाचे आरोप जेव्हड्या मनोरंजकपणे मी वाचतो तेव्हड्याच मनोरंजकतेने मी हा संवाद सुद्धा वाचतो. चार ज्ञानी लोकांकडुन सांगोपांग चर्चा होउन ह्याविषयीच्या ज्ञानात अजुन भर पडावी म्हणुन हा संवाद इथे मांडला आहे. हि मांडणी करण्यात काहि चुक झाली असल्यास अथवा एखाद्या चुकिच्या गोष्टिचे समर्थन केले आहे असे वाटत असल्यास क्षमा असावी. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हरकत नाही

अवलिया
Tue, 03/10/2009 - 12:26 नवीन
हम्म. ठिक आहे. चालु द्या मग.... -- अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

:-)

प्रियाली
Mon, 03/09/2009 - 23:48 नवीन
>>आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. :)
१) हे उमद्या राजकुमारा मी दुसर्‍या कोणाशी लढत असताना तु मला बाण का मारलास ? ह्या असल्या निष्फळ आणी पुराव्याशिवाय बडबडीने तु माझ्यावर आरोप करु पाहत आहेस, किती निर्बुद्ध असशील तु.
तात्या म्हणायचे तो व्यास महाडांबीस. इथे तर मला वाल्मिकीही डांबीस असल्याचे कळले. ;)
  • Log in or register to post comments

म्हणजे कोणीतरी डांबीस असणं हे फार पूर्वीपासूनचं आहे तर!

चतुरंग
Tue, 03/10/2009 - 00:14 नवीन
(खुद के साथ बातां : मला वाटलं की येल्लॉनॉटी हेच त्या पंथातले पहिले की काय? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

खुद के साथ

पिवळा डांबिस
Tue, 03/10/2009 - 03:30 नवीन
खुद के साथ बातां : मला वाटलं की येल्लॉनॉटी हेच त्या पंथातले पहिले की काय? नाय हो!!! "महाजनो येन गता, सः पंथः" :) सध्याचा डांबिस यल्लोनॉटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

तात्या

विसोबा खेचर
Fri, 03/13/2009 - 10:20 नवीन
तात्या म्हणायचे तो व्यास महाडांबीस. इथे तर मला वाल्मिकीही डांबीस असल्याचे कळले. तात्या म्हणायचे?? अगं प्रियाली तू माझ्या जिवावर का उठली आहेस? तात्या आहेत अजून! :) बाकी वाल्मिकींना तंबाखूचे बेसुमार व्यसन असल्यामुळे त्यांना भ्रम झाला होता असे ऐकून आहे! :) आपला, (द्वाड प्रियालीचा मित्र) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

साधे उत्तर

विकास
Tue, 03/10/2009 - 00:04 नवीन
>>>हे उमद्या राजकुमारा मी दुसर्‍या कोणाशी लढत असताना तु मला बाण का मारलास ?... ह्या आणि ह्याला जोडून पुढचे सर्व प्रश्न रामाने शांतपणे ऐकले आणि एका वाक्यात रामबाणासारखे उत्तर दिले: "मी तुला का मारले म्हणून विचारतोयस? उत्तर शिंपल आहे, मी खराखुरा राजकुमार आहे, परीकथेतील नाही..." :-)
  • Log in or register to post comments

वाली

विकास
Tue, 03/10/2009 - 00:09 नवीन
(खालील काही "शोध" प.वि. वर्तकांचे - पण मला ते बर्‍यापैकी लॉजिकल वाटले काही बाबतीत अर्थातच सोडून देयचे...) वाली हा महान राज्यकर्ता होता. त्याची मदत घेतली असती तर तो भूराजकीय राजकारणात रामाला म्हणजे अयोध्येच्या (त्यावेळेस भावी) राजाला डोईजड झाला असता.ह्याचा विचार करून रामाने वालीपेक्षा कमी श्रेष्ठ पण तरीदेखील मदत होऊ शकेल अशा सुग्रीवाची मदत घेतली. अर्थात त्या आधी सीतेला शोधण्याचे वचन त्याने सुग्रीवाकडून मिळवले होते आणि हनुमानाने दोघांना आधीच मैत्रीत आणि रामाला शब्दात बांधले होते हे आहेच. वाली हा त्याच्या प्रजाजनांमधे एक कुशल राजा म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळेच त्याला मारल्यावरून, "कोणी वाली उरला नाही" अशी म्हण तयार झाली. (यातील मला त्यांचे लॉजिक आवडले पण मग मराठी किती जुनी होईल वगैरे विचार मनात येतात ;) )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा