संघ भाजपाने याचा विस्तार करावा
कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते - कारण सरसंघचालकांची किती इच्छा असेल त्यांचा कार्यसर्त्यांनी ते मनोमन स्विकारण्याचे आव्हान अगदीच लहान नाही. आता उत्तरप्रदेशात दलितांसोबत राजकीय पुढार्यांची समरसता भोजनांची रेलचेल चालु दिसते. राजकीय पुढार्यांचे वागणे हवेत विरु शकते , पण कथित संत मंडळींचा या कार्यक्रमात समावेश करुन घेण्याचा प्रयत्नाची सकारात्मक दखल घेण्यास हरकत नसावी . केवळ एवढेच की या परिघाचा संघाने आग्रहाने ह्याचा विस्तार समस्त भारत भरातील पुरोहीत वर्ग ते शंकराचार्य आणि इतर धर्माचार्यांपर्यंत केला पाहीजे. प्रसिद्ध मंदिरातील नैवेद्याचे आचारी वाढपी ते शंकराचार्य पदा पर्यंत दलित आणि स्त्रीयांना समान संधी हिंदू धर्म देतो आहे हे पाहिले पाहीजे . तसेच जन्माधारीत विषमता वगळलेल्या धार्मिक साहित्याची निर्मिती केली पाहिजे.
ते राजकीय दबावामुळे करत आहेत या तक्रारीत खूप अर्थ नाही . महात्मा गांधी आणि इतर अनेकांनी राजकीय उपरती झाल्यावरच दलित प्रश्नांकडे लक्ष दिले. संघाच्या या प्रयत्नांचा पुर्ण विस्तार होऊन समाजातील दरी संपत नाही तो पर्यंत विरोधकांनी त्रुटी काढण्यातही काही गैर आहे असे वाटत नाही. पण भाजपा अथवा संघाला असे प्रयत्नच करु देणार नाही असा अॅटीट्यूड मात्र बाजूस ठेवला पाहीजे . उदारमतवाद्यां नी किती उदारता दाखवली तरी ते उदार होते तेवढ्यावर सामाजिक उत्क्रांती होत नाही. कर्मठ लोक कर्मठता बाजूला ठेवतात तेव्हा समाज बदलतोय असे खर्या अर्थाने म्हणता येत असावे. अर्थात हे सर्व तात्कालिक अथवा दिखाऊ राहू नये हे तेवढेच खरे.
संदर्भ
*** या विषयावरील माझे धागा लेख ***
* रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?
* संघ भाजपाने याचा विस्तार करावा
* दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
खरे आहे. भाजपा सत्तेत
मोहन भागवतजीं मधला समाज सुधारक
अरे दुवा राहीलाच की
जात
अरे वा, परफेकट व्हाटसप पोस्ट.
निसटत्या बाजूतली गंमत १
आमचे, आपले , तुम्ही , तुमचे
निसटत्या बाजूतीला गंमत २
निसटत्या बाजूतीला गंमत ३
हा हा , माहीतगार , आयेम अ
शुभेच्छा ;)
तुम्हालाही शुभेच्छा !
अनेक आभार
केरळातील पौरोहीत्य