✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हो मी अर्जुन आहे..

न — निओ, Tue, 04/24/2018 - 14:27
हो मी अर्जुन आहे.. तोच तो अचूक लक्ष्यवेध करणारा गुणवत्तेने भरलेला नव्या चक्रव्यूहात अडकलेला न लढताच पराभूत झालेला हो मी अर्जुन आहे.. या महाभारतात कृष्ण शोधतो आहे जगण्याचे सर्व संदर्भ बदललेल्या या महाभारतात कृष्ण कोठे शोधायचा जरी सापडला तरी माझ्या वाटणीला किती यायचा ईथे अवती भवती सारेच अर्जुन दिशा हरवलेले... तो कृष्ण.. सखा गुरू ज्ञाता परिस्थितीची जाणीव करून देणारा ध्येयाची जाणीव करून देणारा मला कृष्ण हवाय मार्ग दाखवणारा माझ्या रथाचं सारथ्य करणारा माझं मनोधैर्य ऊंचावणारा नारायणा.... माझे दु:ख तुझ्या शिवाय कुणालाच न सांगण्यासारखे तुझ्या शिवाय कुणालाच न समजण्यासारखे कृष्णा धाव रे तुझ्या शिवाय न कोण वाली रे युगंधरा, त्रिविक्रमा... माझी लढाई मीच लढेन तू फक्त पाठीशी रहा तुझा आशिर्वाद हवा

प्रतिक्रिया द्या
1761 वाचन

💬 प्रतिसाद (3)

मुक्तक आवडले.

पद्मावति
Wed, 04/25/2018 - 13:31 नवीन
मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

निओ
गुरुवार, 04/26/2018 - 03:24 नवीन
धन्यवाद पद्मावति.
  • Log in or register to post comments

भिऊ नकोस

चित्रगुप्त
गुरुवार, 04/26/2018 - 04:47 नवीन
माझी लढाई मीच लढेन तू फक्त पाठीशी रहा Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा