Skip to main content

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

लेखक पुंबा यांनी बुधवार, 11/04/2018 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्‍याचदा अ‍ॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते. बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे: १. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. २. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते. ३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते. ४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे. ५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये. तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः १. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्‍याच केसेसमध्ये तसेच असते. २. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्‍यापैकी गाजले आहे. संदर्भ ३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये. ४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच. ५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये. आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्‍या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का? या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच. १. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे २. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/ ३. क्वोरावर या विषयावर ढिगार्‍याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथेइथे ४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे

वाचने 78093
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

कायदेशीर केले तर ते सज्ञान लोकांसाठीच करणार सरकार, त्यामुळे ज्याला जसे मरायचे आहे (गांजा पिऊन, चरस अफू ओढून ) त्याचे ते त्याने स्वतः ठरवावे बरंका डॉक्टर साहेब. नशा करायचं स्वातंत्र्य तितकं द्यावं, किंबहुना इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा आणल्यास नशेडी मंडळींस कडक शासनही करावं, एरवी तुम्ही लीगल करा की करू नका गांजा विक्री होणारच आहे, लीगल करून रेग्युलेट केल्याने झाला तर फायदाच होईल असे वाटते, पण म्हणून सरकारने त्यातून होणाऱ्या इफेक्ट वर काही करू नये, नशा करा त्याचं स्वातंत्र्य आहे, परिणाम भोगा स्वतः त्यात सरकारने काही करावे ही अपेक्षा करू नये. बाकी आत्मस्तुतीवर (माझेच खरे) साहेब बोलणे म्हणजे उत्तम विनोदबुद्धी असल्याचं निदर्शक आहे!, लगे रहो.

In reply to by जेम्स वांड

नशा करा त्याचं स्वातंत्र्य आहे, परिणाम भोगा स्वतः त्यात सरकारने काही करावे ही अपेक्षा करू नये. नशेमुळे, विषारी दारूमुळे माणसं मरतात त्यांच्या निष्पाप बायका मुलांना सरकारने काही मदत करावी का वाऱ्यावर सोडून द्यावे? कां विषारी दारू स्वस्त मिळते म्हणून लोक पितात त्यात सरकारची चूक काहीच नाही. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे अवर्षण अवकाळी पाऊस सुद्धा काय सरकारने आणलेला नसतो. (कृपया पक्षीय राजकारण बाजूला ठेवा केवळ मानवतावादी विचार करा)

In reply to by सुबोध खरे

शेतकाऱ्यांवरची मते इथे मांडली तर लैच धुरळा उठेल, ते नंतर कधीतरी प्रसंगोत्पात मांडतो. वरती तुमचा एक प्रतिसाद म्हणतोय त्या प्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य स्वैराचारकडे झुकते त्यामुळे थोडीफार बंधने हवीतच. मी नेमकं तेच म्हणतोय, स्वैरपणे गांजाचा व्यापारउदीम सुरुये त्याला कडक सरकारी बंधने घाला, मिळणे दुरापास्त करा, त्यातूनही ज्याला खाज आहे तो घेऊन ओढो अन आपली कर्मफळ भोगो.

In reply to by जेम्स वांड

आज गांजाची दुकाने उघड नसतात, ते बेकायदा आहे म्हणून बरीच सरळ मार्गी मुले त्याच्या वाटेला न जाणारी असतात. बंधने घालून कायद्यात आणले तर पिअर प्रेशर म्हणा, इतर काही कारणाने त्याचे सेवन करण्याचे प्रमाण निश्चित वाढेल. पैशासाठी लहान मुलांनाही गांजा विकायला लोक कमी करणार नाहीत. विकत घेणाऱ्या पोराचे आधार कार्ड थोडेच कोणी तपासेल?

In reply to by पैसा

कायदेशीर असतात भर बाजारात गावाच्या मधोमध सुद्धा सापडतात, किती पियर प्रेशर वाढलेलं आढळून आलंय पोरांवर (सरळमार्गी पोरांवर) किंवा किती वाढलं आहे प्रमाण दारुबाजी करायचं? वाढलंही असेल तर त्याला फक्त गावात असलेलं दुकान किती टक्के जबाबदार आहे अन फिल्मी प्रभाव, नक्की पियर प्रेशर कश्याने वाढते, हे तुम्ही आकड्यात सांगू शकाल?

In reply to by जेम्स वांड

पण अन्य एका प्रतिसादात डॉ खरे म्हणतात की गुटख्यावर बंदी घातल्यानंतर त्याचे सेवन ५३% कमी झाले. तेच इथेही लागू असायला हरकत नाही. कायदेशीर रित्या उपलब्धता हा जर परिणाम करणारा घटक असेल तर गांजा सेवन त्यामुळे ५ ते १०% वाढणार असेल तरी भयावह आहे. चरस कोकेन सगळी गांजाची पिलावळ असेल तर नक्की काय कायदेशीर करणार? अनेक सरकारी योजना कागदोपत्री उत्तम असतात, अंमल बजावणी करताना त्यांचे भरीत होते. आपण खूप अपरिपक्व लोक आहोत. परिणामांची जबाबदारी लोकांवर टाकणं आपल्याकडे अजिबात शक्य नाही. त्यामुळे आहेत ते निर्बंध उठवण्यापेक्षा तंबाखू सुद्धा सहज मिळणे दुरापास्त व्हावे अशी मागणी का करू नये? गांजा सेवन regulate म्हणजे काय करणार? पैसे सरकारला मिळणार नाहीत. नुसता डाटा कसाही मिळतो.

In reply to by जेम्स वांड

वांड साहेब सहज उपलब्धता आणि व्यसने यांचा अतिशय जवळचा संबंध आहे हे असंख्य संशोधनांती सिद्ध झालेले आहे. मुळात ते सहज उपलब्ध आहे आणि कायदेशीर याचा अर्थच त्यात काही वाईट नाही असा संदेश तरुणांना मिळतो. यामुळेच वैद्यकीय शास्त्रज्ञ केवळ चरस गांजाच नव्हे तर तंबाखूच्या सर्व उत्पादनावर बंदी आणा असेच जगभर सांगत आहेत. गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत. पण तंबाखू जितक्याजास्त प्रमाणात आणि जितक्या जास्त संख्येने सेवन केला जातो त्या परिमाणामुळे त्याची व्यापकता/ भयानकता वाढली आहे. त्याचे उत्पादन नियंत्रित करणे जास्त सोपे आहे.म्हणून सरकार त्याच्यावर नियंत्रण आणू शकते. दुर्दैवाने तंबाखूची स्थिती वेगळी आहे. सरकार लोकानुनय करणारे अनेक निर्णय घेत असते जे अंतिमतः समाजाच्या हिताचे नसतात. यात विडीवरील कर न वाढवणे आहे. तंबाखूच्या उत्पादन विक्री आणि विपणना( जाहिराती)तून सरकारला भरपूर उत्पन्न मिळते. त्यातून तंबाखूची लॉबी हि फार सशक्त आहे आणि त्यांचे सरकारातील लागेबांधे फार खोल, दूरवर आणि उन्मूलन न करता येण्यासारखे आहेत. शिवाय तंबाखूच्या उत्पादनात वितरणात शेतकरी, शेतमजूर, विडीकामगार, पानवाले इ बरयाच लोकांना रोजगार मिळतो त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. कोणतेही सरकार इतका दूरगामी विचार करून काम करीत नाही. प्रत्येक पक्ष आपल्याला ५ वर्षे काम करायचे आहे आणि परत पुढची निवडणूक लढवायची आहे एवढाच विचार करते. (असे दूरगामी काम केले असते तर आपली लोकसंख्या १० कोटीच्या वर गेली नसती) असो तात्पर्य -- सहज उपलब्धता हे एक व्यसनाधीनतेचे फार महत्त्वाचे कारण आहे. आपल्याला रस असेल तर खालील दोन दुवे वाचून पहा. In unadjusted city-stratified Cox proportional hazard models, perceived accessibility increased the risk for smoking initiation among nonsmokers and regular smoking among all participants in a dose-response fashion. Perceived accessibility also increased the risk for smoking progression among initiators in a dose-response fashion. The associations between perceived accessibility and smoking were robust to adjustment for peer and parental smoking. Youths with both perceived accessibility and peer-smokers had a higher risk of regular smoking and progression after initiation than either factor alone. These associations were stable to adjustment for potential confounders other than peer smoking. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2478499/ https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/i-was-the-terror…

In reply to by सुबोध खरे

आपली ह्या विषयावर आधीही चर्चा झाली तस्मात जास्त काही न बोलता केवळ खालील एक प्रश्न विचारत आहे > गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत. ह्या विधानाला काहीतरी सबळ आणि विश्वासार्ह सांख्यिकिय आधार द्यावा . सांख्यिकिय आधार नसल्यास " हे केवळ वैयक्तिक मत आहे" इतके तरी मान्य करावे . कारण तुर्तास आम्हाला उपलब्ध असलेल्या माहीती नुसार गांजा हा नक्कीच अल्कोहोल आणि तंबाखुच्या तुलनेत अत्यल्प हानिकारक आहे, शिवाय गांच्या अतिसेवनामुळे मृतु झाल्याचे एकही उदाहरण ( किमान अमेरिकेत तरी) नाही ! विकिपेडीया संदर्भासह खालील चार्ट देतो : a संदर्भ : Nutt, D; King, LA; Saulsbury, W; Blakemore, C (24 March 2007). "Development of a rational scale to assess the harm of drugs of potential misuse". Lancet. 369 (9566): 1047–53. doi:10.1016/s0140-6736(07)60464-4. PMID 17382831. अवांतर : हा काही आस्तिकनास्तिक धागा नाही आणि आम्ही चणेवालेही नाही तस्मात आपण सबळ पुरावा दिल्यास आम्हाला आमची मते बदलण्यात कमीपणा वाटणार नाही असे विनम्रतेने नमुद करत आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत. यात कोकेन अफू हेरॉईन हे तर तंबाखू पेक्षा जास्त घातक आहेतच. गांजा /चरस/ हे एकाच झाडाचे असल्याने दोघांचा परिणाम एकच आहे. एकटे पाहिले (STANDALONE ) तर गांजा चरस याच्यावर तंबाखू पेक्षा कमी अवलंबित्व (DEPENDANCE OR ADDICTION POTENTIAL) आहे म्हणजे सोडल्यावर होणार त्रास किंवा सोडण्यात येणारे अडथळे नक्कीच कमी आहेत किंवा प्रत्यक्ष तंबाखू पेक्षा चरस/ गांजाने शारीरिक इजा( PHYSICAL DAMAGE/HARM) सुद्धा नक्कीच कमी होते यात अजिबात शंका नाही. परंतु खाली मीच दिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जसा जसा काळ जातो तशी चरसमुळे येणारी नशा कमी होत जाते. त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण वाढवावे लागते ज्या ऐवजी बहुसंख्य लोक दुसऱ्या मोठ्या व्यसनाच्या आहारी जातात.
आज कुछ तुफानी करते है
करायला जातात आणि कायमचे व्यसनाच्या विळख्यात अडकतात. दुर्दैवाने अशी द्रव्ये सेवन करणारे किंवा अशी द्रव्ये विकणारे दलाल पण तेच किंवा त्यांच्याच संपर्कात असल्याने या पायऱ्या चढणे फारच सोपे असते. आणि मग हे लोक कोकेन हेरॉईन सारख्या जास्त किक देणाऱ्या आणि मग तीच किक पार्श्वभागावर मारणाऱ्या व्यसनात जातात जेथून कायमचे परत येणारे फार म्हणजे फारच कमी असतात( फार तर १ %) केवळ गांजा किंवा चरस हा तंबाखू इतका अपायकारक नसेल परंतु तंबाखूमुळे तुमचे "व्यक्तिमत्व"(personality) आणि तुमची "कामगिरी"(performance) बदलत नाही. तंबाखू मुले माणूस "ट्रान्स" मध्ये जात नाही. (माझी न मी राहिले अशी स्थिती होत नाही) अगदी चेन स्मोकर असेल तरीही यंत्र गाडी चालवणे किंवा धोकादायक ठिकाणी (उदा. ट्रेकला) गेल्यावर स्वतःला आणि दुसऱ्याला इजा करण्याची शक्यता हि कोणतेच व्यसन नसणाऱ्या माणसाइतकीच असते. ( पॅसिव्ह स्मोकिंगचा दुसऱ्याला धोका सोडला तर) अशी स्थिती चरस किंवा गांजा ची ( दारूची सुद्धा नाही). बँक किंवा कार्यालयातील रखवालदारापासून पोलीस किंवा सैनिक याना चरस किंवा गांजा पिऊन बंदूक सांभाळणे अशक्य आहे. हि स्थिती तंबाखूची नाही. एखादा सैनिक गांजेकस असेल तर त्याला व्यसनातून सोडवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तर लष्करातून अशा माणसाला सक्तीने निवृत्त केले जाते.(हीच स्थिती दारूचीसुद्धा आहे). पण हि स्थिती तंबाखूची नाही. केवळ लॅन्सेटच्या अभ्यास कागदातून येणारा निष्कर्ष घेऊन आपल्याला चरस किंवा गांजा सारख्या अमली पदार्थावरील बंदी उठवणे हा आत्मघात ठरेल. सहा इंचाचे फुरसे "एवढेसे गोंडस तर आहे" म्हणून त्यावर विश्वास ठेवून ते घरात पाळणे जितके धोकादायक आहे. मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या

In reply to by सुबोध खरे

सहा इंचाचे फुरसे "एवढेसे गोंडस तर आहे" म्हणून त्यावर विश्वास ठेवून ते घरात पाळणे जितके धोकादायक आहे. परफेक्ट. साप म्हणू नये धाकला आणि गांजा म्हणू नये आपला.

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण वाढवावे लागते ज्या ऐवजी बहुसंख्य लोक दुसऱ्या मोठ्या व्यसनाच्या आहारी जातात.
ह्या विधानालाही काहीही सांख्यिकिय आधार उपलब्ध्द नाहीये ! मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या येस सर ! आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे आणि त्या मताला तुर्तास तरी कोणताही वैज्ञानिक आधार , सबळ पुरावा नाही , जोवर दुष्परिणाम पुराव्याने शाबित होत नाही तोवर गांजा हे एक निरुपद्रवी पासटाईम आहे आणि तंबाखु आणि अल्कोहोल्च्या तुलनेत तर नक्कीच कमि हानिकारक आहे ! आणि म्हणुनच ते डिक्रिमिनलाईझ करावे असे माझे मत आहे ! आणि त्याच्यावर आधिकाधिक प्रयोग आणि संशोधन व्हावे ! प्रयोग करुन टी.एच.सी आणि सी.बी.डी. चे ऑप्टिमल प्रमाण शोधुन काढावे . रच्याकने ____/\____

जर गांजा विक्रि अधिकृत केली तर, त्या वर जिएसटी किती टक्के असावा? टक्क्याचा विचार करतांना गांजा हा अत्यंत गरीब व्यक्तीही घेतो हे ध्यानात ठेवावे yes

In reply to by दीपक११७७

शुन्य टक्के ! कमर्शियल लेव्हल ला उत्पादन आणि विक्री करु देवु नये , विक्री करताना कोणी सापडला तर त्याचे प्रॉडक्ट सरकार ने जप्त करावे आणि सरकार मान्य दुकानातुन विकावे ! पण उगाच जी.एस.टी सारख्या नसत्या उठाठेवी नसाव्यात कारण शेवटी हे शेतीतील उत्पन्न आहे ! ज्याला हौस आहे त्याला वैयक्तिक जास्तीतजास्त १ झाड लावायची परवानगी असावी. तुळशी वृंदावन असते तसे एक गांजा वृंदावन असावे . आणि रोज आपले एखाद दुसरे पान "खावे" ज्याने त्याने ! बदल हवा असेल म्हणाजे सटाईव्हा च्या ऐवजी इन्डिका किंव्वा हायब्रिड स्ट्रेन्स वगैरे तर स्मॉल स्केलवर कम्युनिटी करुन छोटेसे गार्डन मेंटेन करावे ( अर्थात प्रत्येकी एक झाड हा नियम न मोडता ) :) दररोज मोजुन एकच पान खाणार्‍याला काही मेजर दुष्परिणाम होतील असे वाटत नाही . ( कारण मुळातच दुष्परिणाम होतात ह्याला कोणाताच सबळ पुरावा नाहीये !) कन्ट्रोल्ड कंझम्शमन इज की टू ह्यॅप्पीनेस !

मला गांजाचा अनुभव नाही पण कुतुहल आहे. जसे दारु बद्दल म्हणता येईल की - साधारण ६० च्या एका पेग नंतर (व्हिस्की) डोक जरा हलकं वाटत.. छान /प्रसन्न वाटतं.. दोन तीन पेग झाले की की पावले , जीभ अडखळू लागतात.. पण जसं जसं अन्न पोटात जाईल तसतसं पुन्हा जीभेवर , अडखळणार्‍या पावलांवर नियंत्रण येतं.. रात्री घेतल्यावर कधी दुसरे दिवशी डोके दुखणे, मळमळ्णे ई हँग ओव्हर होतं. अशा नशेत गाडी चालवणे वा दुसरी महत्वाची कामे करणे धोक्याचे असते. तर सिगरेटमुळे असे काही परिणाम होत नाही..जसे अडखळणे वगैरे .. त्यामुळे सिगरेट ओढून वाहन चालवण्यात काही धोका नसतो. तसं गांजाबद्दल काय सांगता येईल ? वर कुणी स्लो मोशन वगैरे म्हंटल आहे त्यावरुन मेंदूवर परिणाम होवून वाहन चालवणं धोक्याचं असेल असं वाटतं पण तरी अधिक विस्ताराने कुणी सांगू शकेल काय ?

In reply to by मराठी कथालेखक

वर कुणी स्लो मोशन वगैरे म्हंटल आहे त्यावरुन मेंदूवर परिणाम होवून वाहन चालवणं धोक्याचं असेल असं वाटतं गाडीच्या आरशावर सुरक्षा सूचना असते "Obects in mirror are closer than they appear" सवयीने अंदाज येऊ लागतो तसंच काहीतरी असेल.

भांगेचा अनुभव आम्ही कॉलेजला असताना ,, आमच्या ग्रुपमध्ये मोनीश अमृते नावाचा मुलगा होता .. हिंदू कॉलनीत राहायचा .. बाबा नव्हते त्याला ... आमचे त्याच्या घरी येईन जाणे असायचे .. त्याची आईही फार प्रेमळ होती ... कधी घरी आम्ही गेलो तर मस्त खाण्यापिण्याची रेलचेल असायची ... मोनीश मस्तीमध्ये /अभ्यासातही खूप हुशार असल्याने जवळजवळ ताईत होता सर्व ग्रुपचा .. एकदा रंगपंचमीला आम्ही कॉलेजमध्येच जमायचे ठरवले होते ... तिथून कुणीतरी खुळचट कल्पना काढली कि आपण भंगपण प्यायचे ... थोडा अनुभव घ्यायला काय हरकत आहे ... झालं .. सर्व तयारी झाली .. यथेच्छ रंगपंचमीचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही जमलो ... तिथेच रस्त्यावर भंगप्रश्न सुरु झाले .. मी आणि इतर काही मित्रांनी जरा बेतानेच दबकत दबकत स्वाद घेतला ... आमची गाडी रुळावर होती ... दोन एक ग्लास रिचवल्यावर आम्ही नाद सोडून दिला .. पण आमचे मोनीश भाऊ काही ऐकायलाच तयार नव्हते .. चालू होती सुस्साट गाडी ... आणि अचानक त्याला किक बसली ... तो बसल्या जागीच वेड्यासारखा बडबडायला लागला .. रास्ता वाकडा होतोय ... पकड .. पकड मला .. आम्हाला सुरुवातीला वाटलं कि हा साला टाईमपास करतोय .. च्यामारी पंधरावीस मिनिट होऊन गेली तरी याची गाडी काही रुळावर येईना ... कितीही झालं तरी आम्ही त्यावेळी जुनिअर कॉलेजातले .. बाजूलाच सिनिअर लोकांचा प्लॅन चालला होता .. त्यात आम्ही जरा अननुभवी .. म्हंटल त्यांची मदत घ्यावी ..म्हणून मदत घ्यायला गेलो ... ते लोकही धावून आले .. पण हे भाऊ काय ऐकायलाच तयार नाहीत .. रस्ता वाकडा होतोय .. धाव धाव .. इकडे तिकडे नुसती पळापळ चाललीय .. काय करायचे तेच कोणालाच काहीच सुचत नव्हते .. सरळ आम्ही त्याला उचलला आणि थेट घरी घेऊन गेलो .. पायऱ्या चढताना पण तेच चाललेलं साहेबांचं ... मला चांगलं आठवतंय त्याच्या घरच्यांसमोर आमचा पुरा पंचनामा झाला होता .. त्याची आई काही सोडायला तयार नव्हती आम्हाला .. दोष आम्हालाच देत होती ... मी तर त्या प्रकरणाचा एव्हढा धसका घेतला कि काही विचारू नका .... हे साहेब नंतर चार दिवसांनी कॉलेजात उगवले .. तेव्हा खूप दिवस चर्चेचा विषय होते .. सर्व पोरी एकदम वाघ मारल्यावानी त्याला बघायच्या नि हसायच्या .... गांजा प्रकरण हे सर्व धंदे कॉलेजात केलेले बरं का ...आता नाही ... कॉलेजात आम्ही एकदा गांजाचा अनुभव घ्यायचा ठरवलं .. उदानी नावाच्या मित्राने सर्व तरतूद फ्रीमध्ये केलेली होती ... चिलीम आणि इतर ... कुठेतरी एक फक्त पडीक जागा बघायची आणि ठोकायची .. सर्व बालगोपाल उत्सुक होते .. तशी सिगारेट जवळचीच होती त्यामुळे हे प्रकरण काही अवघड जाणार नाही याची खात्री होती ... तर आम्ही सारे जमलो ... तो सुट्टा ठोकण्यासाठी ... कधी एकदा ठोकतोय असं झालं होत ... चला सुरुवात झाली उदानीपासून .. तो आधीच सारीत होता .. चिलीम सुलगावली आणि थेट आत .. डोळे गच्चं मिटून एखाद्या ध्यानस्थ संन्याश्यावानी त्याचा थाटमाट होता .. एकेक करत फिरत माझ्यापाशी आली .. मी कसे प्यायचे ते त्यालाच विचारले ... तो फक्त एव्हढेच बोलला कि "" बम भोले बोल और सीन फैलाके जोरदार खिच "" .. झालं .. अशी ओढली कि काही इचारू नका ... बस्स .. तेव्हढाच पुरेसा होत नंतरच्यांसाठी .. मला काहीच बोलता येत नव्हतं .. नाकातोंडातून धूर आणि धूर ... आत छातीत काहीतरी ढवळून ढवळून बाहेर येतंय असं वाटत होत ... जवळजवळ दोनएक मिनिट तरी धूर बाहेर येण्याचा कार्यक्रम चालला होता.. मग मात्र बाकीचे धास्तावले ... उदानी असं काही हसत होता कि काय इचारू नका ... नंतर मात्र एक विचित्र ग्लानी येत होतीआणि ती जवळजवळ प्रॅक्टिकल संपेपर्यंत येताच होती ... प्रॅक्टिकल झाल्यानंतरही तिचा प्रभाव कायम होता .. एक विचित्र कंटाळा .. कशातच काडीचाही रस नव्हता .. सर्व साले उगाच धावपळ करतायत असं वाटत होत ... एकेकाच्या पेकाटात लाथ मारून त्यांना थोडं गप्प बसवावंसं वाटत होत .. पण लाथ मारणार कोण ? पाय उचलायचाही त्राण नव्हतं .. साल पाय उचलून लाथ मारायला कोणातरी भाड्याने विकत घ्यावंसं वाटत होत .. कि बाबा ये .. हा माझा पाय उचल आणि घाल एकेकाच्या पेकाटतात ... हाण त्याच्या मायला एकेकाला .. असा काहीसा प्रकार होता .. गांजानंतर ... एकंदरीत सर्वात घाणेरडा प्रकार गांजाचा तो म्हणजे त्याचा गलिच्छ वास .. सालं कोलगेट पाण्यात मिसळून सरबत करून जरी गुळण्या केल्या तरी त्याचा वास काही तासांपर्यंत दरवळत राहतो ... तर असं हे प्रकरण आहे एकंदरीत .. याला कायदेशीर मान्यता दिली तर दुसरं काही होनार नाही पण एक मात्र नक्की होईल ...कि जे गांजा ओढणारे आहेत त्यांचा कामाचा ताण कमी होईल आणि घरच्यांचा वाढेल ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

तुमचा अनुभव विस्तृतपणे लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी तंबाखू एकदाच चाखली होती. ऑफिसमधल्या एका मित्राने तंबाखू चुन्यासोबत मळून दिली.. जीभेवर थोडावेळ तंबाखू ठेवून तिचा रस पोटात गेल्याव्र फार विचित्र वाटलं. शरीरात उष्णता वाढली , डोकं दुखायला लागलं. पण तेच सिगारेटनी इतकं काही होत नाही... (काही वर्षांपुर्वी मी नियमितपणे दिवसाला पाच-सहा तरी सिगारेट्स ओढायचो)... म्हणजे सिगरेट ही तंबाखूची सौम्य आवृत्ती आहे असं म्हणता येईल. पण सिगरेटचा मेंदूवर फारसा परिणाम होत नाही वा नशा आणि त्याआधारे तणावाचे तात्पुरते विस्मरण असे होत नाही. थोडक्यात सिगरेट्ने माणूस वेगळ्या जगात जात नाही. दारुने तसा माणूस वेगळ्या जगात जातो आणी तणाव विसरतो. पण दारु चढायला अणि उतरायलाही बराच वेळ लागतो. आणि दारु पुर्ण चढलेली असताना साधे सरळ चालणेही कठीण होवून जाते .. वाहन चालवणे वगैरे तर अशक्यच गांजा किंवा तत्सम पदार्थ वापरुन असे काही नशेचे साधन बनवता येईल का की ज्याने मेंदूवर त्वरीत पण अगदी सौम्य परिणाम होईल.. चिंता/तणाव तात्पुरत्या विसरता येतील पण त्याचवेळी अगदी तोल सांभाळणेही कठीण झाले असे मात्र होणार नाही.

In reply to by मराठी कथालेखक

म.क., कमी दारू प्यायली की सौम्य परिणाम होतो. पण त्याने किक बसंत नाही. सांगायचा मुद्दा काये की मात्रा उत्तरोत्तर वाढवंत न्यायची अनिवार इच्छा होते. आ.न., -गा.पै.

एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते.>> ==>> लखनौच्या आसपास अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारी कर्मचारी काय फरफट करतात याची द्रावक हकीकत ऐकली होती. लोकांच्या संसाराची राख रांगोळी करून गब्बरच करायचंय ना मग गांज्याची शेती करण्यापेक्षा सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला दारू दुकानाचे लायसेन्स मोफत काढून द्या. कधीच आत्महत्या करायची वेळ येणार नाही. (उपरोधिक प्रतिक्रिया आहे)

एक सुरस वैज्ञानिक सत्य चरस किंवा गांजाच्या जुन्या व्यसनामुळे amotivation syndrome नावाचा आजार होतो. याचे मूळ असे आहे. आपल्या मेंदूत चरसमधील द्रव्यांशी साधर्म्य असणारे संवेदक (endocannabinoid receptors) असतात. आपल्याला आनंद उल्हास आल्हाद वाटतो त्यावेळेस मेंदूत 2-Arachidonoylglycerol (2-AG) आणि anandamide हि द्रव्ये तयार होतात आणि हि द्रव्ये वरील संवेदकाना उद्दीपित करतात आणि आपल्याला वरील "सुंदर भावनांचा" अनुभव येतो. गंमत म्हणजे आपण जेंव्हा मलईयुक्त चरबीयुक्त पदार्थ खातो तेंव्हा पण मेंदूत याच द्रव्यांचा स्त्राव वाढतो यामुळे असे पदार्थ खाल्ले कि आपल्याला एक सुखद अशी गुंगी येते. म्हणून आपल्याला मलई, रबडी, बासुंदी, लोणी, तूप, चिकन तंदुरी, मटण, मिसळीवरील तर्री सारखे पदार्थ सारखे खावेसे वाटतात. याच संवेदकात अडथळा आणणारे एक द्रव्य रिमोनाबंट ( अकॉम्पलिया या नावाने) युरोपात लठ्ठपणावर औषध म्हणून बाजारात आले होते. यामुळे असे चरबीयुक्त पदार्थ पाहावेसे/खावेसे वाटणार नाहीत आणि त्याबद्दल नॉशिया येईल. दुर्दैवाने या औषधाचा दुष्परिणाम म्हणजे नैराश्य आणि आत्महत्येचे विचार असे असल्याने हे औषध बाजारातून परत काढून घेतले गेले. पण या अनुभवातून वैद्यकीय शास्त्रज्ञ एक महत्त्वाचा धडा शिकले ते म्हणजे आपले दैनंदिन जीवन सुख समाधानाने व्यतीत करण्यासाठी या संवेदकांचे काम व्यवस्थित चालू असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि जेंव्हा हे संवेदक नीट काम करीत नाहीत तेंव्हा माणूस नैराश्य आत्महत्येचे विचार अशा आजारांची शिकार होतो. गांजेकस/ चरस पिणारे लोक असतात त्यांना सुरुवातीला चरस मधील THC या द्रव्याने असाच उच्च आणि उत्तुंग अनुभव येतो म्हणून ते परत परत चरस पीत राहतात. परंतु जसा काळ जातो तसा या संवेदकांची संवेदना बोथट होत जाते आणि त्या माणसाला असा परिणाम होण्यासाठी/उच्च आणि उत्तुंग अनुभव येण्यासाठी जास्तीत जास्त चरस/ गांजा प्यावा लागतो. आणि या संवेदकांची संवेदना बोथट झाल्यामुळेहे गांजेकस निरुत्साही औदासिन्य नैराश्यवादी आत्महत्येचे विचार या विकारांना बळी पडतात. या गांजेकसांचे आयुष्य म्हणजे केवळ गांजा पिऊन पडून राहणे एवढेच होऊन राहते. अर्थात अशी स्थिती बरेच दिवस गांजा पिणाऱ्यांची होते. सठी सहामासी पिणाऱ्यांच्यात अशी स्थिती होत नाही पण केवळ थ्रिल साठी परत परत चरस पिणाऱ्यांपैकी १५-१७ % टक्के लोक अंती अशा आजाराचे शिकार होतात. लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो. सिगरेटच्या माचो जाहिरातींचा पडतो तसाच.

In reply to by सुबोध खरे

लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो.>>> ==>> करोडो की बात ...!!

In reply to by सुबोध खरे

लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो. सिगरेटच्या माचो जाहिरातींचा पडतो तसाच.
बेलाशक सहमत..

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरांनी माहितीपूर्ण प्रतिसाद दिला आहे . धन्यवाद डॉक्टर !! कोणत्याही अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे.

ज्या पदार्थाच्या सेवनाने मानसिक अवस्थेत इतका जबरदस्त बदल होतो तो पदार्थ अपायकारक किंवा किमान मानसिकदृष्टया एडिक्टिव नसेल यावर विश्वास बसत नाही. डॉ. खरे यांच्या प्रतिसादांना सुप्परलाईक..

नक्की .. काळजी घेईन पुढे ... धन्यवाद सिद्धेश्वर विलास पाटणकर

निदान वाईट गोष्टी असतील तर नाव टाळेन म्हणतोय .. बाकी काही मजेशीर आणि चांगले अनुभव नावासहित शेयर करेन सिद्धेश्वर विलास पाटणकर

खालील तक्ता हा नारकोटिक कंट्रोल ब्युरो उर्फ एनसीबीच्या २०१५ वार्षिक रिपोर्ट मधून घेतलेला आहे, नारकोटिक उर्फ भांग (फक्त भांग बरंका) लीगल असलेल्या मध्यप्रदेशचे आकडे बघा एकदा, ह्याचं कारण आहे लीगलायझेशन . तरी ह्यात भांग हे एकच नारकोटिक कव्हर केलं आहे, गांजा, अफू, इत्यादी नाहीये! तेही अफूची रिकव्हरी आहे! म्हणजे एक सबस्तान्स लीगल करता दुसऱ्याच्या मागणी, पुरवठा, इत्यादींवर दिसण्यालायक असर पडू शकतो, असा निष्कर्ष काढायला वाव आहे पुरेपूर.

In reply to by सुबोध खरे

एक सबस्तान्स लीगल करता दुसऱ्याच्या मागणी, पुरवठा, इत्यादींवर दिसण्यालायक असर पडू शकतो, असा निष्कर्ष काढायला वाव आहे पुरेपूर.

In reply to by जेम्स वांड

पंजाब आणि राजस्थान ही सीमावर्ती राज्ये आहेत. तिथे पाकिस्तानच्या वरद हस्तामुळे अमली पदार्थ सेवनाची समस्या जास्त उग्र बनली आहे असे वाचलेले आठवते.

In reply to by पैसा

होय कारण पाकिस्तानचे लष्कर या अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहे. पण ते सर्व बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानातून तस्करी केलेल्या अफू बद्दल आहे. त्याचा गांजाशी संबंध नाही. http://thebalochistanpost.com/2017/08/pakistan-army-becomes-largest-ben… https://groups.google.com/forum/#!topic/soc.culture.pakistan/Yihv9mBSyp0

मजा आली .. वादविवाद बघून ... अजून एक व्यसन किशोरवयीन मुलांमध्ये चालू आहे ते म्हणजे " आयोडेक्स पाव " ... अगदी सर्रास चालू असते .. दे मार ... त्याआधी काय तर ... कफ सिरप पूर्ण बाटली रीती करायचे... त्यावर बंदी आणली आता तर हे " आयोडेक्स पाव " जोरदार चालले आहे ... एकूण काय तर " आजच्या तरुण पिढीला यातून बाहेर काढायचे असेल तर स्पर्धात्मक वाटचालीवर वादविवाद व्हावेत .. व्यसनांवर नव्हे .. हे माझे वैयक्तिक मत आहे ... आज जो काही शिक्षणाचा बाजार झाला आहे त्याला आपण पालकमंडळीच काही अंशी जबाबदार आहोत .. व्यवस्थित मुलाची व्यवस्था केली आणि त्याला आपण दिलेल्या सुविधांची जाणीव करून दिली कि एक अनामिक दडपण त्या बालमनावर वाढत जाते ... आणि अंशतः तेच या व्यसनप्रकियेत महत्वाचा भाग बनते .... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

ते मुक्तहस्ते पूर्णविरामाची पखरण करण्याचे व्यसन ही फार त्रास करते हो वाचकांच्या डोळ्यांना. जरा तेवढे ............

किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा किसीके दिल पे मोहब्बत की रवानी का नशा किसीको देखे साँसों से उभरता है नशा बिना पिये भी कहीं हद से गुज़रता है नशा नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा किसे है होश मेरे सामने तो लाओ ज़रा नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा खिली खिली हुई सुबह पे है शबनम का नशा हवा पे खुशबू का बादल पे है रिमझिम का नशा कहीं सुरूर है खुशियों का कहीं ग़म का नशा नशा शराब मैं होता तो नाचती बोतल मैकदे झूमते पैमानों मैं होती हलचल नशा शराब मैं होता तो नाचती बोतल नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा

किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा किसीके दिल पे मोहब्बत की रवानी का नशा किसीको देखे साँसों से उभरता है नशा बिना पिये भी कहीं हद से गुज़रता है नशा नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा किसे है होश मेरे सामने तो लाओ ज़रा नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा खिली खिली हुई सुबह पे है शबनम का नशा हवा पे खुशबू का बादल पे है रिमझिम का नशा कहीं सुरूर है खुशियों का कहीं ग़म का नशा नशा शराब मैं होता तो नाचती बोतल मैकदे झूमते पैमानों मैं होती हलचल नशा शराब मैं होता तो नाचती बोतल नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा

अभ्या .. मित्रा तू पण ना एकदम भारी हायेस . चाल आजपासून एक टिम्बच टाकत जाईन . मला वाटत धन्यवाद . सिद्धेश्वर विलास पाटणकर

अभ्या .. मित्रा तू पण ना एकदम भारी हायेस . चाल आजपासून एक टिम्बच टाकत जाईन . मला वाटत कि मी जेव्हा टंकत असतो तेव्हाच अनावधानाने हि उधळण होत असावी . धन्यवाद . सिद्धेश्वर विलास पाटणकर

अभ्या .. मित्रा या तुझ्या अभिप्रायावर एक स्माईली ची उधळण होऊन जाऊ देत . सिद्धेश्वर विलास पाटणकर

ज्यांना हवंय त्यांना ते असंही मिळतंच आहे. व्यसनी मंडळी समजा ह्या सहज उपलब्ध व्यसनाने मेली तर असा काय फरक पडणारे.? देअर चोईस. मी तर मस्त पार्लर टाकीन त्यांच्यासाठी. केवढी मोठी बिझिनेसची संधी आहे ही.

वरील चर्चाप्रस्ताव गांजाचे समर्थन करण्याकरीता लिहिला नव्हता. गांजाला कायदेशीररीत्या मान्यता मिळावी असेही माझे म्हणणे नाही. गांजा खरोखरच जितका समजला जातो तेवढा हानीकारक आहे का? गांजाला कायदेशीर रूप दिले तर गांजा सेवन करणार्‍यांचे प्रमाण वाढेल का? व्यवस्थित क्वालिटी कंट्रोल, रेग्युलेशन करणे शक्य असेल तर आतापेक्षा ते चांगलेच नाही का? गांजाचे उदात्तीकरण समाजात देव- सदगुरू म्हणून मान्यता पावलेल्या लोकांकडून होते असे नाही का? गांजाचे स्मगलिंग करणार्‍या टोळ्या, या व्यवसायांतून मिळणारा पैसा समाजविरोधी तत्वांच्या हाती जाणे या प्रश्नांची चर्चा करणे हा उद्देश होता. गांजा कायदेशीर केल्यामुळे अमेरिकेत कोणते असे तोटे दिसून आले जे भारतात यायची आपणास भिती वाटते हा देखिल प्रश्न विचारावासा वाटतो. माझ्या मते, बंदी हा उपाय कधीच उपयोगाचा नसतो. आपल्यासारख्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यव्स्थेत बंदीमुळे आयतेच कुरण उपलब्ध होते. आज, गुटख्याचेच पहा, बंदी आहे, कुठे कुठे गुटख्याच्या गाड्या पकडल्याचेदेखिल बातम्यात येते मात्र गुटखा खाणार्‍यांना गुटखा मिळणे थांबले का याचे उत्तर नकारार्थी येते. बंदीपेक्षा व्यवस्थित रेग्युलेशन, दुष्परिणामांबद्दल जागृती व एकूणच सेफ पर्याय उपलब्ध करण्यासाठी संशोधन हा योग्य पर्याय वाटतो. निकोटिनमुळे होणारे मृत्यू गांजाआमुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा हजारोंच्या पटीने जास्त असताना सिगारेटवर बंदी नाही व गांजावर आहे हे विचित्र खरेच वाटत नाही का?

In reply to by पुंबा

पुम्बा साहेब सगळेच सरकारी निर्णय चूक असतात असे नाही. गुटखा बंदी नंतर गुटखा खाणाऱ्यांची संख्येत ५३% कमी झाली हि उपलब्धी मोठी नाही काय? https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/ban-on-gutka-made-53-u… केवळ सहज उपलब्ध आहे म्हणून सेवन जास्त होते हि वस्तुस्थिती आहे. गोव्यातील स्थानिक लोकांच्या दारूसेवनाचा/ व्यसनाचा प्रश्न किती गंभीर आहे याच्या कडे पहा. कारण सहजा सहजी दारू उपलब्ध आहे. महसूल मिळतो आणि पर्यटनास उत्तेजन म्हणून दारूची दुकाने बंद करता येत नाहीत पण संसाराची धूळधाण होते त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. दुवा http://goastreets.com/goa-and-the-pain-of-alcoholism/

व्यसन एखाद्याने करावे की नाही हा समजा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न मानला तरीही त्या व्यसनाने त्याच्या घराची जी धूळधाण उडते तिचे काय हा मुख्य मुद्दा आहे. सभोवताली अनेक अशी उदाहरणे आणि फरफट पहिली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला , त्याच्या उदात्तीकरणाला आणि त्याच्या कायदेशीर बनवण्याला माझा व्यक्तिशः विरोध आहे. इत्यलम!

In reply to by एस

त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला , त्याच्या उदात्तीकरणाला आणि त्याच्या कायदेशीर बनवण्याला माझा व्यक्तिशः विरोध आहे.
ही भुमिका ठीकच आहे. परंतू, उदात्तीकरण म्हणजे काय? अमुक महाराजांची मुर्ती चिलिमिशिवाय कधीही नसते, तमुक महाराजांना चिलीम अर्पण केली तर ते नवसाला पावतात ह्या गोष्टी उदात्तीकरणात येतात का?

कधी संधी मिळाल्यास कश मारुन पहायची इच्च्छा आहे. मेंदुत आधीच इतका केमिकल लोच्या आहे, त्यात वेगळा प्रयोग... अजुन काय ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing

अ‍ॅमस्टरडॅममध्ये गांजा कायदेशिररित्या विकला जातो....तिथे किती लोक त्याच्या आहारी जाउन फालतूगीरी करायला लागले याचा विदा कोणी देउ शकेल का? रच्याकने मिपावर काही विशिष्ठ धाग्यांवर लोक इतकी कि घाण करतात....ते गांजा मारुन कि गांजा न ओढता हे कसे समजेल?

आतापर्यंत आपल्या नात्यातील, मित्रपरिवारातील किंवा परिचयातील एखाद्याचे जीवन, कुटुंब कुठल्याना कुठल्या व्यसनाच्या आहारी गेल्याने उद्ध्वस्त झालेले माहीत नसलेली व्यक्ती सापडणे अशक्य आहे. तरुणपणी एक थ्रील म्हणा,मित्रांचे अनुकरण करण्याची कृती म्हणा किंवा मित्रांचा दबाव म्हणा एका सिगारेटच्या झुरक्यावर किंवा दारूच्या एका पेगवर थांबत नाही. कुठलेही सेलिब्रिशन दारू व सिगारेट शिवाय होऊच शकत नाही अशी भंपक मानसिकता होऊन जाते. मित्रांच्या लग्नात ग्रुप करता 'खास' व्यवस्था केली जाते. ह्या कंपुमधून बाहेर पडायचे म्हटलं तरी अशक्य होऊन जातं. शंकरा पासून ते टिळकांपर्यंतचे आदर्श फेकले जातात. पुरुषार्थ डीवचन्याचे प्रकार होतात. बरेच जण इच्छा असूनही बाहेर पडू शकत नाही.एखाद्या मित्राचे पालक आपल्याला विनंती करतात, बाबारे आम्ही खूप समजावून सांगितले मुलाला पण तो आमचं ऐकतंच नाही, तुम्ही सांगून बघा , ऐकेल तुमचं. आता ह्यांना काय सांगणार ?आमच्यामुळेच तो घोड्यावर बसला, घोड्याचा लगाम आता त्याच्या हातात आहे. हो म्हणायचं फक्त. हा घोडेस्वार कधीच हाती लागत नाही. कधीतरी दमून स्वार खाली पडतं, तो पर्यंत त्याचं कुटुंब उध्वस्त झालेलं असतं. असं अनेक अभिमन्यू रोज आजूबाजूला घडत असतात. आजचे सौम्य व्यसन उद्या उग्र रूप धारण करू शकते. एकदा का कायदेशीरपणे गांजा सहज उपलब्ध होऊ लागला की पुढच्या व्यसनांच्या पायऱ्याही सहज चढल्या जातील.

In reply to by मार्मिक गोडसे

एकदा का कायदेशीरपणे गांजा सहज उपलब्ध होऊ लागला की पुढच्या व्यसनांच्या पायऱ्याही सहज चढल्या जातील. परफ़ेक्ट. गांजा मुळे येणारी नशा नंतर नंतर येईनाशी होते आणि मग या पुढच्या पायऱ्या फार पटकन चढल्या जातात ज्या अटळ विनाशाकडे घेऊन जातात. हाताशी आलेला तरुण मुलगा असा विनाशाच्या गर्तेत जात असलेला पाहणे हि पालकांसाठी अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे आणि देशासाठी अतिशय घातक गोष्ट आहे.

गोडसेजी पुढच्या व्यसनांच्या. . . . एकदम रियालिस्टीक. - गांजा डेंजरज नुसत्या धाग्यात पण एवढी मारामारी ः) बाकी जसे जगात सगळे पांढरे आणि काळे असे काही काही नाही तसे ग्रे एरिया/व्यसने असणारचं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर अवैध गांजा विकणाऱ्या मधे बायकापण आहेत, पिढ्यानपिढ्या विकणारी कुटुंबे आहेत मग अधूनमधून आत जाउन येणं आलंच. जास्त पैशाच्या अमिशानं अल्पवयीन पण असतात आणि त्यांना वापरणारे आधि त्यांना गांजाची सवय लावतात. एकदम तरूण पोरं जेलमधे गेल्यावर त्यांच पुढं सेक्शुअल एक्सप्लाँयटेशन वगैरे आलंच.

माझ्या दोन परिचितांचे दारूच्या व्यसनामुळे यकृत खराब होउन वयाच्या ५० च्या आसपास निधन झाले आहे. मुलांचे अर्धवट वय (१५ ते २० वयातील मुले), दारूपायी भरपूर पैसे उधळलेले, रूग्णालयात अनेक दिवस उपचारांमुळे भरपूर खर्च झालेला . . . अशामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची अगदी वाईट परिस्थिती आहे.

मला वाटते, भारतात एकाद्या वस्तूवर बंदी घालण्याचे प्रमुख कारण म्हणजे पोलीस, सरकारी अधिकारी व इतर लोक यांच्या पोटा-पाण्याची कायमची सोय व्हावी म्हणून. या बंदीच्या निमित्ताने ह्या सर्वांना तेवढीच चिरिमीरी खायला मिळते.

या धाग्याच्या धुळवडीत उतरण्याची इच्छा नव्हती, पण मुक्तांगण विषयी काही वैयक्तिक अनुभव आहेत म्हणून राहवलं नाही. नशेचे समर्थन करणार्यांनी फक्त काही पाने वाचून पहा. http://tusharnatu2013.blogspot.com/

In reply to by मनो

सदर व्यक्तीला कोणते व्यसन होते काहीतरी स्पष्ट करा , त्यांची फिजिकल डिपेन्डॅबिलिटी आणि फिजिकल हार्म ह्यांची गांजा सोबत तुलना करा , मग बोलु. उगाचच गोष्ठींना " नशा" असे सरसकटीकरण करणार असाल तर जगातले अर्धे अधिक लोक दारु पितात किंव्वा तंबाखु खातात त्यांना मुक्तांगणला पाठवावे लागेल आधी !

In reply to by प्रसाद गोडबोले

तुषार नातू यांना गांजाच काय इतरही जी शक्य असतील ती व्यसने होती. तुमचा फिजिकल फंडा माझ्या डोक्यावरून गेला त्यामुळे त्याबद्दल काय बोलणार. आणि हो, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, जगातले अर्धे लोक जर दारू - सिगारेटच्या व्यसनाधीन असतील तर नक्कीच मुक्तांगणला पाठवायला हवेत. बंदी घालून प्रश्न सुटत नाहीत, आणि कायदा , पोलीस या भीतीने व्यसनं थांबतही नाहीत. त्यासाठी व्यसन मुक्तीचेच प्रयत्न करावे लागतात.

CONCLUSIONS: The results of the present study suggest that increasing cannabis use in late adolescence and early adulthood is associated with a range of adverse outcomes in later life. High levels of cannabis use are related to poorer educational outcomes, lower income, greater welfare dependence and unemployment and lower relationship and life satisfaction. The findings add to a growing body of knowledge regarding the adverse consequences of heavy cannabis use. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/18482420 हे हि वाचून पहा https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3711606/ https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/19937639