गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्याचदा अॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते.
बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे:
१. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल.
२. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते.
३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्यांना वंचित ठेवले जाते.
४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे.
५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये.
तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः
१. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्याच केसेसमध्ये तसेच असते.
२. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्यापैकी गाजले आहे. संदर्भ
३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये.
४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच.
५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये.
आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का?
या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच.
१. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे
२. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/
३. क्वोरावर या विषयावर ढिगार्याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथे व इथे
४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे
वर्गीकरण
वाचने
78093
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजिबात फुकट इलाज करू नये
In reply to व्यसन कुठलंही वाईटच by सुबोध खरे
नशा करा त्याचं स्वातंत्र्य
In reply to अजिबात फुकट इलाज करू नये by जेम्स वांड
सर
In reply to नशा करा त्याचं स्वातंत्र्य by सुबोध खरे
असं बघा
In reply to सर by जेम्स वांड
दारूचे गुत्ते
In reply to असं बघा by पैसा
एक्झॅक्ट आकडे मिळणे कठीण
In reply to दारूचे गुत्ते by जेम्स वांड
वांड साहेब
In reply to दारूचे गुत्ते by जेम्स वांड
हा दुसरा दुवा सर्वानी जरूर
In reply to वांड साहेब by सुबोध खरे
आपली ह्या विषयावर आधीही चर्चा
In reply to वांड साहेब by सुबोध खरे
गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत.ह्या विधानाला काहीतरी सबळ आणि विश्वासार्ह सांख्यिकिय आधार द्यावा . सांख्यिकिय आधार नसल्यास " हे केवळ वैयक्तिक मत आहे" इतके तरी मान्य करावे . कारण तुर्तास आम्हाला उपलब्ध असलेल्या माहीती नुसार गांजा हा नक्कीच अल्कोहोल आणि तंबाखुच्या तुलनेत अत्यल्प हानिकारक आहे, शिवाय गांच्या अतिसेवनामुळे मृतु झाल्याचे एकही उदाहरण ( किमान अमेरिकेत तरी) नाही ! विकिपेडीया संदर्भासह खालील चार्ट देतो :गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ
In reply to आपली ह्या विषयावर आधीही चर्चा by प्रसाद गोडबोले
सहा इंचाचे फुरसे "एवढेसे
In reply to गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ by सुबोध खरे
त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण
In reply to गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ by सुबोध खरे
मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्यायेस सर ! आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे आणि त्या मताला तुर्तास तरी कोणताही वैज्ञानिक आधार , सबळ पुरावा नाही , जोवर दुष्परिणाम पुराव्याने शाबित होत नाही तोवर गांजा हे एक निरुपद्रवी पासटाईम आहे आणि तंबाखु आणि अल्कोहोल्च्या तुलनेत तर नक्कीच कमि हानिकारक आहे ! आणि म्हणुनच ते डिक्रिमिनलाईझ करावे असे माझे मत आहे ! आणि त्याच्यावर आधिकाधिक प्रयोग आणि संशोधन व्हावे ! प्रयोग करुन टी.एच.सी आणि सी.बी.डी. चे ऑप्टिमल प्रमाण शोधुन काढावे . रच्याकने ____/\____छ
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
माझा प्रश्न
शुन्य टक्के !
In reply to माझा प्रश्न by दीपक११७७
गांजाच्या नशेबद्दल कुणी अधिक विस्ताराने सांगेल का ?
वर कुणी स्लो मोशन वगैरे
In reply to गांजाच्या नशेबद्दल कुणी अधिक विस्ताराने सांगेल का ? by मराठी कथालेखक
भांगेचा अनुभव
धन्यवाद
In reply to भांगेचा अनुभव by खिलजि
सौम्य परिणाम?
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
मित्राचे नाव खरे असल्यास तसे
In reply to भांगेचा अनुभव by खिलजि
"बंटा"ची गोळी काय असते?
बंटा म्हणजे
In reply to "बंटा"ची गोळी काय असते? by श्रीगुरुजी
<<<एक नगदी पिक जे शेतकर्
एक सुरस वैज्ञानिक सत्य
<<<लोकांना नम्र विनंती आहे कि
In reply to एक सुरस वैज्ञानिक सत्य by सुबोध खरे
लोकांना नम्र विनंती आहे कि
In reply to एक सुरस वैज्ञानिक सत्य by सुबोध खरे
छान प्रतिसाद
In reply to एक सुरस वैज्ञानिक सत्य by सुबोध खरे
आणि
In reply to छान प्रतिसाद by कपिलमुनी
ज्या पदार्थाच्या सेवनाने
@ मराठी_माणूस
@ मराठी_माणूस
@पैसा ताई
पण हा तक्ता तर पकडलेल्या
In reply to @पैसा ताई by जेम्स वांड
मला असे वाटते
In reply to पण हा तक्ता तर पकडलेल्या by सुबोध खरे
माहीत नाही.
In reply to @पैसा ताई by जेम्स वांड
होय
In reply to माहीत नाही. by पैसा
अरे वा .. अजूनही गांजापंचमी चालू आहे ...
ते मुक्तहस्ते पूर्णविरामाची
In reply to अरे वा .. अजूनही गांजापंचमी चालू आहे ... by खिलजि
..
In reply to ते मुक्तहस्ते पूर्णविरामाची by अभ्या..
मुनिवर, यु टू ?! =)) =)) =))
In reply to .. by कपिलमुनी
नशा कशाला लागते ?
_/\_
In reply to नशा कशाला लागते ? by manguu@mail.com
नशा कशाला लागते ?
अभ्या .. मित्रा
अभ्या .. मित्रा तू पण ना एकदम
:D:D:D:D
अगदी...
वरील चर्चाप्रस्ताव गांजाचे
पुम्बा साहेब
In reply to वरील चर्चाप्रस्ताव गांजाचे by पुंबा
व्यसन एखाद्याने करावे की नाही
त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या
In reply to व्यसन एखाद्याने करावे की नाही by एस
होय.
In reply to त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या by पुंबा
कधी संधी मिळाल्यास कश मारुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firingअॅमस्टरडॅममध्ये गांजा
परफेक्ट
In reply to अॅमस्टरडॅममध्ये गांजा by टवाळ कार्टा
https://news.vice.com/article
इत वस सर्चस्म ;)
In reply to https://news.vice.com/article by सुबोध खरे
आतापर्यंत आपल्या नात्यातील,
एकदा का कायदेशीरपणे गांजा सहज
In reply to आतापर्यंत आपल्या नात्यातील, by मार्मिक गोडसे
+111111
माझ्या दोन परिचितांचे
मग सरकारने दारूवर बंदी घालावी...
In reply to माझ्या दोन परिचितांचे by श्रीगुरुजी
चिरिमीरी चे राजकारण.
या धाग्याच्या धुळवडीत
सदर व्यक्तीला कोणते व्यसन
In reply to या धाग्याच्या धुळवडीत by मनो
तुषार नातू यांना गांजाच काय
In reply to सदर व्यक्तीला कोणते व्यसन by प्रसाद गोडबोले
जगातले अर्धे अधिक लोक दारू व
In reply to तुषार नातू यांना गांजाच काय by मनो
CONCLUSIONS:The results of
निदान भारतात व्यसनाच्या आहारी