गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?
गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्याचदा अॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते.
बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे:
१. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल.
२. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते.
३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्यांना वंचित ठेवले जाते.
४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे.
५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये.
तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः
१. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्याच केसेसमध्ये तसेच असते.
२. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्यापैकी गाजले आहे. संदर्भ
३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये.
४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच.
५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये.
आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का?
या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच.
१. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे
२. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/
३. क्वोरावर या विषयावर ढिगार्याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथे व इथे
४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे
वर्गीकरण
वाचने
78049
वाचनखूण
प्रतिक्रिया
158
गांजाबरोबर,
साक्षात प्रलयपिता शिवाचा प्रसाद
In reply to साक्षात प्रलयपिता शिवाचा प्रसाद by जेम्स वांड
गांजा अन शंकर!!
In reply to गांजा अन शंकर!! by अनिरुद्ध.वैद्य
गांजा शिवाचा प्रसाद आहे
In reply to गांजा शिवाचा प्रसाद आहे by जेम्स वांड
ओक्के!!
थोडी माहिती
In reply to थोडी माहिती by गामा पैलवान
हे भलतेच रोचक आहे..
माझ्या मते
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
अहाहा
मलाना क्रीम सारखी अस्सल वाक्यं!
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
शेमत!
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
गांजाचे सेवनच केवळ वैध करावे
तेच तर म्हणतोय.
In reply to तेच तर म्हणतोय. by विजुभाऊ
वा!
मी एकदा वडला होता गांजा, सगळ
In reply to मी एकदा वडला होता गांजा, सगळ by सतिश पाटील
पाटलाव ब्रूबर बोललात!
नक्किच
भारीय!
In reply to भारीय! by पैसा
वयाचे बंधन असेलच ना
In reply to भारीय! by पैसा
लगीच लगीच लागलीच
In reply to लगीच लगीच लागलीच by जेम्स वांड
हेहे!
In reply to हेहे! by पैसा
पैसा ताई
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
अगदी अगदी!
In reply to अगदी अगदी! by पैसा
अरे रे
In reply to अरे रे by जेम्स वांड
झकास!
In reply to झकास! by पैसा
नाय सहज वाटलं म्हणून माफी मागून टाकली
In reply to नाय सहज वाटलं म्हणून माफी मागून टाकली by जेम्स वांड
विनोद आहेच्च
In reply to विनोद आहेच्च by पैसा
माझ्या अटी नीट वाचल्यात का?
In reply to माझ्या अटी नीट वाचल्यात का? by जेम्स वांड
अवघड आहे
In reply to नाय सहज वाटलं म्हणून माफी मागून टाकली by जेम्स वांड
विनोद आहेच्च
In reply to अरे रे by जेम्स वांड
लई भारी जेम्स भाऊ
In reply to अरे रे by जेम्स वांड
वांड साहेब
In reply to अगदी अगदी! by पैसा
विशेष प्रतिसाद
In reply to विशेष प्रतिसाद by जेम्स वांड
एवढेच कारण असेल तर
In reply to एवढेच कारण असेल तर by पैसा
भले
In reply to भले by जेम्स वांड
+१
In reply to +१ by अनुप ढेरे
बरोबर!
In reply to बरोबर! by जेम्स वांड
कसे चालेल?
In reply to कसे चालेल? by पैसा
आता बघा ताई
In reply to कसे चालेल? by पैसा
बिट्कॉइन बेकायदेशीर करायचं
In reply to +१ by अनुप ढेरे
अनुपराव, सगळे दुराचार लिगल
In reply to अनुपराव, सगळे दुराचार लिगल by arunjoshi123
दोन सज्ञान व्यक्तींमधला
In reply to दोन सज्ञान व्यक्तींमधला by अनुप ढेरे
बंदुकीचा व्यापार पण कायदेशीर
In reply to बंदुकीचा व्यापार पण कायदेशीर by सुबोध खरे
अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत.
In reply to अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत. by अनुप ढेरे
मला वैयक्तिकरित्या उदाहरणे
In reply to मला वैयक्तिकरित्या उदाहरणे by बिटाकाका
मी आत्ता चिलम पेटवली आहे.
In reply to मी आत्ता चिलम पेटवली आहे. by अनुप ढेरे
असलं बेसलेस उत्तर तुमच्याकडून
In reply to अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत. by अनुप ढेरे
ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट
In reply to ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट by सुबोध खरे
गर्द, हेरॉईन, कोकेनसुद्धा
In reply to विशेष प्रतिसाद by जेम्स वांड
चिल माडी
In reply to चिल माडी by पैसा
असंय व्हय!
In reply to भारीय! by पैसा
एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले
एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले ते म्हणजे गांजाचे समर्थन करणार्या मंडळीला त्यांची यत्ता ५ व्वीत शिकणारी मुलगी, किंवा इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा, किंवा आयटीत लेट आवर्स शिफ्ट करणारी बहीण, शिक्षिका असलेली बायको यापैकी कोणी, किवा इव्हन घरातले नको तर मुलांचे शिक्षक गांजाच्या तारेत दिवसाचा बराच काळ असतात असे कळले तर त्यांचे हेच मत कायम असेल का ये रे डिअर, दोघेही बसू म्हणून गळ्यात गळे घालून जोडीने कारेक्रम होईल. जस्ट कुतुहल बरं का!एका धाग्यावर न्यूड मॉडेलिंगचे तावातावाने समर्थन करणा-यांना मी विचारले होते की तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का? यावर एकाही समर्थकाने स्पष्ट भूमिका न घेता हिंदुत्ववादी, कर्मठ, टिपिकल पुरूषी मानसिकता अशा शब्दात माझी संभावना केली होती.In reply to एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले by श्रीगुरुजी
कठीण आहे!
In reply to कठीण आहे! by जेम्स वांड
असा प्रतिसाद येणार हे वाटलंच
In reply to असा प्रतिसाद येणार हे वाटलंच by श्रीगुरुजी
प्रतिसादाची वाट पहातोय
In reply to प्रतिसादाची वाट पहातोय by श्रीगुरुजी
नाही बुआ
In reply to असा प्रतिसाद येणार हे वाटलंच by श्रीगुरुजी
चला, मी उत्तरे देतो.
In reply to एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले by श्रीगुरुजी
मिपा च्या बाहेर...
छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
वरील प्रतिसादात असहमत
In reply to वरील प्रतिसादात असहमत by पुंबा
गांजाचे व्यसन लागत नाही असे
In reply to वरील प्रतिसादात असहमत by पुंबा
शिवाय, गांजाचे व्यसन लागत
In reply to वरील प्रतिसादात असहमत by पुंबा
पुम्बा साहेबगांजाचे व्यसन
In reply to पुम्बा साहेबगांजाचे व्यसन by सुबोध खरे
हो तुमचे बरोबर आहे.
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
+१००
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
+११११
In reply to +११११ by arunjoshi123
अहो शुक शुक अजो
In reply to अहो शुक शुक अजो by जेम्स वांड
त्यापेक्षा लीगल असलेलं बरं,
In reply to त्यापेक्षा लीगल असलेलं बरं, by सुबोध खरे
लैच भारी
In reply to लैच भारी by जेम्स वांड
व्यसन कुठलंही वाईटच
In reply to व्यसन कुठलंही वाईटच by सुबोध खरे
अजिबात फुकट इलाज करू नये
In reply to अजिबात फुकट इलाज करू नये by जेम्स वांड
नशा करा त्याचं स्वातंत्र्य
In reply to नशा करा त्याचं स्वातंत्र्य by सुबोध खरे
सर
In reply to सर by जेम्स वांड
असं बघा
In reply to असं बघा by पैसा
दारूचे गुत्ते
In reply to दारूचे गुत्ते by जेम्स वांड
एक्झॅक्ट आकडे मिळणे कठीण
In reply to दारूचे गुत्ते by जेम्स वांड
वांड साहेब
In reply to वांड साहेब by सुबोध खरे
हा दुसरा दुवा सर्वानी जरूर
In reply to वांड साहेब by सुबोध खरे
आपली ह्या विषयावर आधीही चर्चा
गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत.ह्या विधानाला काहीतरी सबळ आणि विश्वासार्ह सांख्यिकिय आधार द्यावा . सांख्यिकिय आधार नसल्यास " हे केवळ वैयक्तिक मत आहे" इतके तरी मान्य करावे . कारण तुर्तास आम्हाला उपलब्ध असलेल्या माहीती नुसार गांजा हा नक्कीच अल्कोहोल आणि तंबाखुच्या तुलनेत अत्यल्प हानिकारक आहे, शिवाय गांच्या अतिसेवनामुळे मृतु झाल्याचे एकही उदाहरण ( किमान अमेरिकेत तरी) नाही ! विकिपेडीया संदर्भासह खालील चार्ट देतो :In reply to आपली ह्या विषयावर आधीही चर्चा by प्रसाद गोडबोले
गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ
In reply to गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ by सुबोध खरे
सहा इंचाचे फुरसे "एवढेसे
In reply to गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ by सुबोध खरे
त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण
मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्यायेस सर ! आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे आणि त्या मताला तुर्तास तरी कोणताही वैज्ञानिक आधार , सबळ पुरावा नाही , जोवर दुष्परिणाम पुराव्याने शाबित होत नाही तोवर गांजा हे एक निरुपद्रवी पासटाईम आहे आणि तंबाखु आणि अल्कोहोल्च्या तुलनेत तर नक्कीच कमि हानिकारक आहे ! आणि म्हणुनच ते डिक्रिमिनलाईझ करावे असे माझे मत आहे ! आणि त्याच्यावर आधिकाधिक प्रयोग आणि संशोधन व्हावे ! प्रयोग करुन टी.एच.सी आणि सी.बी.डी. चे ऑप्टिमल प्रमाण शोधुन काढावे . रच्याकने ____/\____In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
छ
माझा प्रश्न
In reply to माझा प्रश्न by दीपक११७७
शुन्य टक्के !
गांजाच्या नशेबद्दल कुणी अधिक विस्ताराने सांगेल का ?
In reply to गांजाच्या नशेबद्दल कुणी अधिक विस्ताराने सांगेल का ? by मराठी कथालेखक
वर कुणी स्लो मोशन वगैरे
भांगेचा अनुभव
In reply to भांगेचा अनुभव by खिलजि
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
सौम्य परिणाम?
In reply to भांगेचा अनुभव by खिलजि
मित्राचे नाव खरे असल्यास तसे
"बंटा"ची गोळी काय असते?
In reply to "बंटा"ची गोळी काय असते? by श्रीगुरुजी
बंटा म्हणजे
<<<एक नगदी पिक जे शेतकर्
एक सुरस वैज्ञानिक सत्य
In reply to एक सुरस वैज्ञानिक सत्य by सुबोध खरे
<<<लोकांना नम्र विनंती आहे कि
In reply to एक सुरस वैज्ञानिक सत्य by सुबोध खरे
लोकांना नम्र विनंती आहे कि
In reply to एक सुरस वैज्ञानिक सत्य by सुबोध खरे
छान प्रतिसाद
In reply to छान प्रतिसाद by कपिलमुनी
आणि
ज्या पदार्थाच्या सेवनाने
@ मराठी_माणूस
@ मराठी_माणूस
@पैसा ताई
In reply to @पैसा ताई by जेम्स वांड
पण हा तक्ता तर पकडलेल्या
In reply to पण हा तक्ता तर पकडलेल्या by सुबोध खरे
मला असे वाटते
In reply to @पैसा ताई by जेम्स वांड
माहीत नाही.
In reply to माहीत नाही. by पैसा
होय
अरे वा .. अजूनही गांजापंचमी चालू आहे ...
In reply to अरे वा .. अजूनही गांजापंचमी चालू आहे ... by खिलजि
ते मुक्तहस्ते पूर्णविरामाची
In reply to ते मुक्तहस्ते पूर्णविरामाची by अभ्या..
..
In reply to .. by कपिलमुनी
मुनिवर, यु टू ?! =)) =)) =))
नशा कशाला लागते ?
In reply to नशा कशाला लागते ? by manguu@mail.com
_/\_
नशा कशाला लागते ?
अभ्या .. मित्रा
अभ्या .. मित्रा तू पण ना एकदम
:D:D:D:D
अगदी...
वरील चर्चाप्रस्ताव गांजाचे
In reply to वरील चर्चाप्रस्ताव गांजाचे by पुंबा
पुम्बा साहेब
व्यसन एखाद्याने करावे की नाही
In reply to व्यसन एखाद्याने करावे की नाही by एस
त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या
In reply to त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या by पुंबा
होय.
कधी संधी मिळाल्यास कश मारुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firingअॅमस्टरडॅममध्ये गांजा
In reply to अॅमस्टरडॅममध्ये गांजा by टवाळ कार्टा
परफेक्ट
https://news.vice.com/article
In reply to https://news.vice.com/article by सुबोध खरे
इत वस सर्चस्म ;)
आतापर्यंत आपल्या नात्यातील,
In reply to आतापर्यंत आपल्या नात्यातील, by मार्मिक गोडसे
एकदा का कायदेशीरपणे गांजा सहज
+111111
माझ्या दोन परिचितांचे
In reply to माझ्या दोन परिचितांचे by श्रीगुरुजी
मग सरकारने दारूवर बंदी घालावी...
चिरिमीरी चे राजकारण.
या धाग्याच्या धुळवडीत
In reply to या धाग्याच्या धुळवडीत by मनो
सदर व्यक्तीला कोणते व्यसन
In reply to सदर व्यक्तीला कोणते व्यसन by प्रसाद गोडबोले
तुषार नातू यांना गांजाच काय
In reply to तुषार नातू यांना गांजाच काय by मनो
जगातले अर्धे अधिक लोक दारू व
CONCLUSIONS:The results of
निदान भारतात व्यसनाच्या आहारी
Cannabis is the most common
Gone to Pot - A Review of the
Cannabis use: a perspective
When cannabis and alcohol are
जाऊ द्या हो गोडसे साहेबगांजा
ह्यावर तज्ञ लोकांची मते वाचायला आवडतील
In reply to ह्यावर तज्ञ लोकांची मते वाचायला आवडतील by जेम्स वांड
चेक करा
In reply to चेक करा by manguu@mail.com
आयला!
खरंतर काल रात्रीच प्रतिसाद टंकायला घेतला होता, पण धाग्यावारचे
In reply to खरंतर काल रात्रीच प्रतिसाद टंकायला घेतला होता, पण धाग्यावारचे by टर्मीनेटर
उत्कृष्ट प्रतिसाद.