गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्याचदा अॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते.
बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे:
१. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल.
२. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते.
३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्यांना वंचित ठेवले जाते.
४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे.
५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये.
तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः
१. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्याच केसेसमध्ये तसेच असते.
२. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्यापैकी गाजले आहे. संदर्भ
३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये.
४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच.
५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये.
आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का?
या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच.
१. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे
२. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/
३. क्वोरावर या विषयावर ढिगार्याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथे व इथे
४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे
वर्गीकरण
वाचने
78093
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
गांजाबरोबर,
साक्षात प्रलयपिता शिवाचा प्रसाद
गांजा अन शंकर!!
In reply to साक्षात प्रलयपिता शिवाचा प्रसाद by जेम्स वांड
गांजा शिवाचा प्रसाद आहे
In reply to गांजा अन शंकर!! by अनिरुद्ध.वैद्य
ओक्के!!
In reply to गांजा शिवाचा प्रसाद आहे by जेम्स वांड
थोडी माहिती
हे भलतेच रोचक आहे..
In reply to थोडी माहिती by गामा पैलवान
माझ्या मते
अहाहा
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
मलाना क्रीम सारखी अस्सल वाक्यं!
शेमत!
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
गांजाचे सेवनच केवळ वैध करावे
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
तेच तर म्हणतोय.
वा!
In reply to तेच तर म्हणतोय. by विजुभाऊ
मी एकदा वडला होता गांजा, सगळ
पाटलाव ब्रूबर बोललात!
In reply to मी एकदा वडला होता गांजा, सगळ by सतिश पाटील
नक्किच
भारीय!
वयाचे बंधन असेलच ना
In reply to भारीय! by पैसा
लगीच लगीच लागलीच
In reply to भारीय! by पैसा
हेहे!
In reply to लगीच लगीच लागलीच by जेम्स वांड
पैसा ताई
In reply to हेहे! by पैसा
अगदी अगदी!
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
अरे रे
In reply to अगदी अगदी! by पैसा
झकास!
In reply to अरे रे by जेम्स वांड
नाय सहज वाटलं म्हणून माफी मागून टाकली
In reply to झकास! by पैसा
विनोद आहेच्च
In reply to नाय सहज वाटलं म्हणून माफी मागून टाकली by जेम्स वांड
माझ्या अटी नीट वाचल्यात का?
In reply to विनोद आहेच्च by पैसा
अवघड आहे
In reply to माझ्या अटी नीट वाचल्यात का? by जेम्स वांड
विनोद आहेच्च
In reply to नाय सहज वाटलं म्हणून माफी मागून टाकली by जेम्स वांड
लई भारी जेम्स भाऊ
In reply to अरे रे by जेम्स वांड
वांड साहेब
In reply to अरे रे by जेम्स वांड
विशेष प्रतिसाद
In reply to अगदी अगदी! by पैसा
एवढेच कारण असेल तर
In reply to विशेष प्रतिसाद by जेम्स वांड
भले
In reply to एवढेच कारण असेल तर by पैसा
+१
In reply to भले by जेम्स वांड
बरोबर!
In reply to +१ by अनुप ढेरे
कसे चालेल?
In reply to बरोबर! by जेम्स वांड
आता बघा ताई
In reply to कसे चालेल? by पैसा
बिट्कॉइन बेकायदेशीर करायचं
In reply to कसे चालेल? by पैसा
अनुपराव, सगळे दुराचार लिगल
In reply to +१ by अनुप ढेरे
दोन सज्ञान व्यक्तींमधला
In reply to अनुपराव, सगळे दुराचार लिगल by arunjoshi123
बंदुकीचा व्यापार पण कायदेशीर
In reply to दोन सज्ञान व्यक्तींमधला by अनुप ढेरे
अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत.
In reply to बंदुकीचा व्यापार पण कायदेशीर by सुबोध खरे
मला वैयक्तिकरित्या उदाहरणे
In reply to अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत. by अनुप ढेरे
मी आत्ता चिलम पेटवली आहे.
In reply to मला वैयक्तिकरित्या उदाहरणे by बिटाकाका
असलं बेसलेस उत्तर तुमच्याकडून
In reply to मी आत्ता चिलम पेटवली आहे. by अनुप ढेरे
ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट
In reply to अतिशय निरुपयोगी उदाहरणं आहेत. by अनुप ढेरे
गर्द, हेरॉईन, कोकेनसुद्धा
In reply to ओलीस आणि दहशतवाद यात कंसेंट by सुबोध खरे
चिल माडी
In reply to विशेष प्रतिसाद by जेम्स वांड
असंय व्हय!
In reply to चिल माडी by पैसा
एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले
In reply to भारीय! by पैसा
एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले ते म्हणजे गांजाचे समर्थन करणार्या मंडळीला त्यांची यत्ता ५ व्वीत शिकणारी मुलगी, किंवा इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा, किंवा आयटीत लेट आवर्स शिफ्ट करणारी बहीण, शिक्षिका असलेली बायको यापैकी कोणी, किवा इव्हन घरातले नको तर मुलांचे शिक्षक गांजाच्या तारेत दिवसाचा बराच काळ असतात असे कळले तर त्यांचे हेच मत कायम असेल का ये रे डिअर, दोघेही बसू म्हणून गळ्यात गळे घालून जोडीने कारेक्रम होईल. जस्ट कुतुहल बरं का!एका धाग्यावर न्यूड मॉडेलिंगचे तावातावाने समर्थन करणा-यांना मी विचारले होते की तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का? यावर एकाही समर्थकाने स्पष्ट भूमिका न घेता हिंदुत्ववादी, कर्मठ, टिपिकल पुरूषी मानसिकता अशा शब्दात माझी संभावना केली होती.कठीण आहे!
In reply to एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले by श्रीगुरुजी
असा प्रतिसाद येणार हे वाटलंच
In reply to कठीण आहे! by जेम्स वांड
प्रतिसादाची वाट पहातोय
In reply to असा प्रतिसाद येणार हे वाटलंच by श्रीगुरुजी
नाही बुआ
In reply to प्रतिसादाची वाट पहातोय by श्रीगुरुजी
चला, मी उत्तरे देतो.
In reply to असा प्रतिसाद येणार हे वाटलंच by श्रीगुरुजी
मिपा च्या बाहेर...
In reply to एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले by श्रीगुरुजी
छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत
कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
वरील प्रतिसादात असहमत
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
गांजाचे व्यसन लागत नाही असे
In reply to वरील प्रतिसादात असहमत by पुंबा
शिवाय, गांजाचे व्यसन लागत
In reply to वरील प्रतिसादात असहमत by पुंबा
पुम्बा साहेबगांजाचे व्यसन
In reply to वरील प्रतिसादात असहमत by पुंबा
हो तुमचे बरोबर आहे.
In reply to पुम्बा साहेबगांजाचे व्यसन by सुबोध खरे
+१००
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
+११११
In reply to छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत by मार्मिक गोडसे
अहो शुक शुक अजो
In reply to +११११ by arunjoshi123
त्यापेक्षा लीगल असलेलं बरं,
In reply to अहो शुक शुक अजो by जेम्स वांड
लैच भारी
In reply to त्यापेक्षा लीगल असलेलं बरं, by सुबोध खरे
व्यसन कुठलंही वाईटच
In reply to लैच भारी by जेम्स वांड