नास्तिक चळवळ : काळाची गरज ?
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
In reply to ३०० प्रतिसादाबद्दल आभारी आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धूसर रेषा by चौकस२१२
In reply to @ चौकस २१२, मी आपल्या by माहितगार
In reply to इतिहास साक्षी आहे by Rajesh188
In reply to एक फेबू मित्र संजय सरांची पोष्ट आठवली म्हणून पाठवली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आणि गंभीर आजारातून बरे झाले by ऋतुराज चित्रे
In reply to असे कार्य चालू आहे जगभर चालू by ऋतुराज चित्रे
In reply to अनिसला समांतर अशी संघटना by ऋतुराज चित्रे
In reply to आपापल्या धर्मातील अनिष्ट by प्रकाश घाटपांडे
In reply to अनिसला समांतर अशी संघटना by ऋतुराज चित्रे
In reply to तुमचा बराच वैचारिक गोंधळ by ऋतुराज चित्रे
पुरोगामी = दांभिक
हेच अंतिम सत्य आहे.In reply to बहुसंख्य फुरोगामी हे दांभिक by सुबोध खरे
In reply to बहुसंख्य फुरोगामी हे दांभिक by सुबोध खरे
हेच अंतिम सत्य आहे.अंतिम सत्याचा शोध अंतापर्यंत चालूच असतो. अंतिम सत्य कुणाला सापडलय म्हणल की मला धडकीच भरते :)
In reply to हेच अंतिम सत्य आहे. by प्रकाश घाटपांडे
In reply to प्रतिगामी=अंतिम सत्य. by ऋतुराज चित्रे
In reply to gossip by संदीप-लेले
In reply to gossip by संदीप-लेले
'देव नाही' या गोष्टीवर बहुंजनांचा विश्वास बसेल हे होणे नाही.अगदी खरं...! मूल जन्माला आल्यावर त्याच्यावर, त्याच्या मेंदुवर आजूबाजूंच्या घटनांचा डाटा जमा व्हायला लागतो. जन्माला आल्यानंतर मंदिरं, आजान, चर्च आणि तत्सम देवाळूंच्या परंपरांचा परिणाम त्याच्यावर व्हायला लागतो. आपल्या परिस्थितीला आपण जवाबदार आहोत हे तो विसरुन जातो. जीवन जगतांना पारंपरिक विचारांचा घरातल्या नित्यनियमित पुजा अर्चा, देवधर्म त्याच्यावरच्या कल्पनारम्य गोष्टींना भुलून रिस्क नको म्हणून तोही त्या गोष्टी करु लागतो. सदसद्विकेबुद्धी शिल्लकच राहात नाही. प्रत्येक गोष्टीत चमत्कार हात जोडणे, बुद्धीचा विचार संपला की देवाचं गाव सुरु होतं. महाराज सदेह वैकुंठाला गेले. पवित्र माणसाला क्रुसावर दिल्यानंतर तिसर्या दिवशी तो थडग्यातून उठून धर्मप्रचाराला गेला. अशा आणि भरमसाठ गोष्टी माणूस निर्माण करतो, म्हणून त्याचा विश्वास बसतो. मेंदूत चिकटलेल्या देव नावाच्या तंतूला वेगळं करणे अशक्यच होऊन जाते. आमच्या घरात घाण राहू देत, पण दुसर्याच्या घरात किती घाण आहे ती उचलली पाहिजे ना यावर आमचा फोकस असतो. आणि आमचं काय नुकसान व्हायचं ते होऊ देत, तुम्ही आम्हाला शिकवू नका असे म्हटले की विषयच संपतो.
नास्तिक चळवळ करून वेळ आणि श्रम वाया जाण्यापलीकडे फारसे काही हाती लागण्याची शक्यता नाही.शिक्षणाने माणासामधे एक समज निर्माण होते, एक नवी डोळस दृष्टी निर्माण होते म्हणून नास्तिक चळवळीचे श्रम वाया जाणार नाहीत असे वाटते. कोराना विषाणुचा देवाला संसर्ग होऊ नये म्हणून मंदिरं बंद ठेवली आहेत, अशी टीपन्नी वाचून मनोमन हसू आलं. देव आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येत नाही, हा धडा देवाने माणसाला दिलाय आता त्याकडे कसे बघायचं हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. बाकी नास्तिक चळवळ यशस्वी व्हायला अजून किती दशकं, शतकं, लागतील हे माहिती नाही. पण, नास्तिक चळवळीचं काम मोठं कठीण आहे हे मात्र नक्की. आपलं काम समाजाला सावचित करणे आहे. तुका म्हणे संती सावचित केले अंती, नाही तरी होती टाळी बैसोनि राहिली. -दिलीप बिरुटे
In reply to 'देव नाही' या गोष्टीवर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to देवांनी मैदान सोडले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to देवांनी मैदान सोडले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३०० प्रतिसादाबद्दल आभारी आहे.