Skip to main content

आठवणींचा कप्पा म्हणजे...

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 15/03/2018 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती... आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती! काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी... वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती! ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना... एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती! जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही... ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती! मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे... घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती! —सत्यजित
लेखनविषय:

वाचने 6565
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

वा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic

सुंदर कविता आहे ... वाचता वाचता अनेक अडगळी समोर आल्या ,, आणि परत नवीन झाल्या ... त्यापैकीच हि एक ..... मी तेव्हाही तसाच होतो जो आज आहे ... माझं मन कधी बदललंच नाही .... तिने मात्र सांगून टाकलं सहज .. तूला भरपूर माज आहे ... छान कविता सत्यजित साहेब .... काही कविता अपरोक्षपणे दुसऱ्याच्या आयुष्याशी जोडलेल्या असतात किंबहुना प्रत्येक वाचक किंवा अभिप्राय देणारा त्या कवितेत कुठेतरी स्वतःला ठेवून पाहतो किंवा जोडून पाहतो .. अशीच हि कविता आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

आजकाल मुक्तछंदातून गेयता हरवत चालली आहे. या पार्श्वभूमीवर 'घमघम करिती पिवळे लोलक...' सारख्या किंवा 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले...' सारख्या तालात म्हणता येऊ शकणाऱ्या जुन्या कवितांसारखी एक कविता 'भेटली' असं वाटलं. फारच छान!

अहाहा!!! जियो.. फार सुरेख कविता. आज आंतरराष्ट्रीय कविता दिनाची सुरेल भेट दिलीत तुम्ही. धन्यवाद!

वा!!