✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आठवणींचा कप्पा म्हणजे...

स — सत्यजित..., गुरुवार, 03/15/2018 - 03:35
पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती... आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती! काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी... वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती! ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना... एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती! जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही... ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती! मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे... घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
6539 वाचन

💬 प्रतिसाद (16)

सकाळी सकाळी एवढी सुंदर कविता!

प्राची अश्विनी
गुरुवार, 03/15/2018 - 06:58 नवीन
सकाळी सकाळी एवढी सुंदर कविता! दिन बन गया.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!

अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/15/2018 - 10:20 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!

चांदणे संदीप
गुरुवार, 03/15/2018 - 13:28 नवीन
आवडली. वाखूसा! Sandy
  • Log in or register to post comments

सुप्पर लाइक करणेत येत आहे.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/15/2018 - 14:56 नवीन
सुप्पर लाइक करणेत येत आहे.
  • Log in or register to post comments

सत्यजित साहेब

खिलजि
Fri, 03/16/2018 - 13:51 नवीन
सुंदर कविता झाली आहे ...
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर.

पद्मावति
Sat, 03/17/2018 - 02:10 नवीन
अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments

वा...

मदनबाण
Sat, 03/17/2018 - 13:33 नवीन
वा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी!

सत्यजित...
Sun, 03/18/2018 - 08:39 नवीन
सर्व प्रतिसादक रसिकांचे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता आहे ... वाचता

खिलजि
Mon, 03/19/2018 - 13:44 नवीन
सुंदर कविता आहे ... वाचता वाचता अनेक अडगळी समोर आल्या ,, आणि परत नवीन झाल्या ... त्यापैकीच हि एक ..... मी तेव्हाही तसाच होतो जो आज आहे ... माझं मन कधी बदललंच नाही .... तिने मात्र सांगून टाकलं सहज .. तूला भरपूर माज आहे ... छान कविता सत्यजित साहेब .... काही कविता अपरोक्षपणे दुसऱ्याच्या आयुष्याशी जोडलेल्या असतात किंबहुना प्रत्येक वाचक किंवा अभिप्राय देणारा त्या कवितेत कुठेतरी स्वतःला ठेवून पाहतो किंवा जोडून पाहतो .. अशीच हि कविता आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

क्या बात है! अप्रतिम!!

Naval
Wed, 03/21/2018 - 10:09 नवीन
क्या बात है! अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

सुरेख कविता ! आवडली.

सस्नेह
Wed, 03/21/2018 - 11:26 नवीन
सुरेख कविता ! आवडली.
  • Log in or register to post comments

आजकाल मुक्तछंदातून गेयता हरवत

एस
Wed, 03/21/2018 - 11:57 नवीन
आजकाल मुक्तछंदातून गेयता हरवत चालली आहे. या पार्श्वभूमीवर 'घमघम करिती पिवळे लोलक...' सारख्या किंवा 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले...' सारख्या तालात म्हणता येऊ शकणाऱ्या जुन्या कवितांसारखी एक कविता 'भेटली' असं वाटलं. फारच छान!
  • Log in or register to post comments

अहाहा!!!

पुंबा
Wed, 03/21/2018 - 13:44 नवीन
अहाहा!!! जियो.. फार सुरेख कविता. आज आंतरराष्ट्रीय कविता दिनाची सुरेल भेट दिलीत तुम्ही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

वा!!

यशोधरा
Sun, 03/25/2018 - 17:53 नवीन
वा!!
  • Log in or register to post comments

नवल, स्नेहांकिता, एस, पुंबा,

सत्यजित...
Mon, 03/26/2018 - 17:19 नवीन
नवल, स्नेहांकिता, एस, पुंबा, यशोधरा... सर्वांचे खूप-खूप धन्यवाद! खिलजी आपले पुनःश्च धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आयला.. ही रचना कशी काय सुटली

राघव
गुरुवार, 04/19/2018 - 18:44 नवीन
आयला.. ही रचना कशी काय सुटली म्हणायचें !! :-) खूप सुंदर! भा.पो. !!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा