आठवणींचा कप्पा म्हणजे...
पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!
काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!
ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना...
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!
जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती!
मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!
—सत्यजित
सकाळी सकाळी एवढी सुंदर कविता!
सुंदर कविता!
सुंदर कविता!
सुप्पर लाइक करणेत येत आहे.
सत्यजित साहेब
अतिशय सुंदर.
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublicधन्यवाद मंडळी!
सुंदर कविता आहे ... वाचता
क्या बात है! अप्रतिम!!
सुरेख कविता ! आवडली.
आजकाल मुक्तछंदातून गेयता हरवत
अहाहा!!!
वा!!
नवल, स्नेहांकिता, एस, पुंबा,
आयला.. ही रचना कशी काय सुटली