✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - भाग २४

श
श्रीगुरुजी यांनी
Sun, 02/25/2018 - 12:00  ·  लेख
लेख
अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43254 वाचन

💬 प्रतिसाद (156)

प्रतिक्रिया

सर्वसाधारणपणे सरकारी पद्धतीनं

arunjoshi123
Wed, 02/28/2018 - 11:57 नवीन
सर्वसाधारणपणे सरकारी पद्धतीनं तेजोनिधी भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेन्स च्या अमेंडमेंट्स आणि कोरिजेंडा काढत बसायच्या वेळात अख्खा पुलच बांधून काढल्याबद्दल भारतीय लष्कराचा जाहिर निषेध!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

हे पाहुन , पायाभुत सुवीधांची

मराठी_माणूस
Wed, 02/28/2018 - 12:15 नवीन
हे पाहुन , पायाभुत सुवीधांची सर्वच कामे लष्कराकडे सोपवावी असे म्हणण्याचा मोह होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

भारी ना!

जेम्स वांड
Wed, 02/28/2018 - 22:12 नवीन
विहिरीत पडलेली पोरे ते मोडके पुल सगळं लष्कराने करायचं, फक्त लष्कर प्रमुखांनी सद्यःस्थितीवर एखादी टिप्पणी केली , ते पण राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तर आपण लगेच बोंबाबोंब सुरू करावी! काय समाज आहे राव आपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

https://m.maharashtratimes

श्रीगुरुजी
Wed, 02/28/2018 - 12:29 नवीन
https://m.maharashtratimes.com/india-news/karti-chidambaram-arrested-by-the-cbi-in-chennai/articleshow/63105469.cms कार्ती चिदंबरम् ला अटक
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
गुरुवार, 03/01/2018 - 00:29 नवीन
https://m.maharashtratimes.com/india-news/p-chidambaram-instructed-us-to-pay-money-to-his-son-karti-indrani-and-peter-mukerjea-told-ed/articleshow/63116670.cms काय गंमत आहे . डायरीत लिहिले तर तो पुरावा होत नाही , असा युक्तिवाद करणारे लोक आता तिसर्याच माणसाने कुणा तरी चौथ्या माणसाबद्दल दिलेला तोंडी / लेखी जबाब ऐकून नाचत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काय गम्मत आहे नाही, अंध विरोध

बिटाकाका
गुरुवार, 03/01/2018 - 08:26 नवीन
काय गम्मत आहे नाही, अंध विरोध काहीही बोलायला मजबूर करतो लोकांना. जणूकाही ती डायरी भाजप समर्थकांनी पुरावा म्हणून नाकारली होती, हाहाहा! मालक, सुप्रीम कोर्टाने नाकारला होता हो तो पुरावा. ---------------------------------- त्या डायरीत तिकीट लावून जबाब वगैरे नोंदवलेला नव्हता हो, जो इंद्राणीचा आहे. आणि ते चिदंबरम वकील आहेत की हो, पुरावा नसताना अटक केली यावरून सीबीआयला कोर्टात का बरे खेचत नसतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

हाहाहा, तुमच्या मते साक्षिदार

अनुप ढेरे
गुरुवार, 03/01/2018 - 10:15 नवीन
हाहाहा, तुमच्या मते साक्षिदार नसायला हवेत राईट? कोर्टात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

हो का ?

manguu@mail.com
गुरुवार, 03/01/2018 - 10:55 नवीन
साक्षीदाराची पूर्ण उलटतपासणी करुन कोर्ट जे ठरवते , ते फायनल असते. ते होण्यापुर्वी कोणत्याही लेखी तोंडी जबाबाला सहाराच्या डायरीइतकेच शून्य महत्व असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अग्गोबाई! डायरीला महत्व नाही

अनुप ढेरे
गुरुवार, 03/01/2018 - 11:55 नवीन
अग्गोबाई! डायरीला महत्व नाही असं म्हणताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

अग्गोबाई !

manguu@mail.com
गुरुवार, 03/01/2018 - 11:57 नवीन
डायरीला काडीमात्र महत्व नाही , असे इथल्याच सन्माननीय सदस्यानी इथेच कुठेतरी लिहिले आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

माझीच गल्लत होतेय का तुमची?

बिटाकाका
गुरुवार, 03/01/2018 - 12:13 नवीन
माझीच गल्लत होतेय का तुमची? मी इतके दिवस समजत होतो कि पोलीस तपासात प्रथमदर्शनी, लिखित कबुलीजबाबानुसार एखादा पोलिसांना दोषी वाटला तर पोलीस त्याला अटक करतात आणि न्यायालयात सादर करतात. मग न्यायालय तो प्रथमदर्शनी पुरावा वगैरे बघून त्या एखाद्याला पोलीस कोठडी द्यायची, न्यायालयीन कोठडी द्यायची, जामीन द्यायचा कि सोडून द्यायचं हे ठरवतं! या प्रक्रियेत काही चुकीचे आहे का? ----------------------------------------- डायरीला महत्व आहे कि नाही यावर तुमचं मत काय आहे? इतर काय म्हणतात यावर दुहेरी भूमिका कशाला? तुम्ही डायरीला महत्वाचं मानत असाल तर कबुलीजवाबाला (तो तर अधिकृत आहे) महत्वाचं माना किंवा जर (अधिकृत) कबुलीजवाब महत्वाचा नाही असे मानत असाल तर डायरी तो किस झाड कि पत्ती म्हणून सोडून द्या. या तो घोडा बोलो या चतुर बोलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

कांची कामकोटी पीठाचे

श्रीगुरुजी
Wed, 02/28/2018 - 12:33 नवीन
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे निधन झाले.
  • Log in or register to post comments

२०१७-१८ या आर्थिक वर्षातील ३१

श्रीगुरुजी
Wed, 02/28/2018 - 19:55 नवीन
२०१७-१८ या आर्थिक वर्षातील ३१ डिसेंबरला संपलेल्या तिस-या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नात ७.२℅ वृद्धी झाली. निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली तथाकथित घट फक्त एका तिमाहीपुरतीच टिकली. या दोन्ही निर्णयांवर सातत्याने टीका करणारे मनमोहन सिंग, चिदंबरम्, पप्पू इ. गप्प बसले आहेत. http://indianexpress.com/article/business/economy/indias-gdp-registers-major-jump-in-third-quarter-grows-to-7-2-from-6-5/
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Wed, 02/28/2018 - 20:06 नवीन
६० पुरुष विहिरीत पडल्यावर आठ दहा फूट वर आले तरी ६-७ % होतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

चान चान!!

बिटाकाका
Wed, 02/28/2018 - 20:22 नवीन
चान चान!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

मला वाटते निश्चलनीकरण व वसेक

अमितदादा
Wed, 02/28/2018 - 23:20 नवीन
मला वाटते निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली घट एका पेक्षा जास्त तिमाही वर परिणाम करून गेली. तसेच मनमोहन सिंग आणि चितांबरम यांनी नोटबंदी मुळे gdp वर परिणाम झाला आणि चांगल्या गोष्टी पेक्षा वाईट गोष्टी अधिक झाल्या या अर्थाने टीका केली होती, ज्यात मला शत प्रतिशत तथ्य वाटते. GDP उभ्या आयुष्यात वर येणार नाही अशी कोणीही टीका केली नाहीये. नोटबंदी च्या परिणामातून कधी न कधी अर्थव्यवस्था सावरणारच होती. असो अर्थव्यवस्था वेग पकडत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मला वाटते निश्चलनीकरण व वसेक

अमितदादा
Wed, 02/28/2018 - 23:20 नवीन
मला वाटते निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली घट एका पेक्षा जास्त तिमाही वर परिणाम करून गेली. तसेच मनमोहन सिंग आणि चितांबरम यांनी नोटबंदी मुळे gdp वर परिणाम झाला आणि चांगल्या गोष्टी पेक्षा वाईट गोष्टी अधिक झाल्या या अर्थाने टीका केली होती, ज्यात मला शत प्रतिशत तथ्य वाटते. GDP उभ्या आयुष्यात वर येणार नाही अशी कोणीही टीका केली नाहीये. नोटबंदी च्या परिणामातून कधी न कधी अर्थव्यवस्था सावरणारच होती. असो अर्थव्यवस्था वेग पकडत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१०० डुआयडी घेऊन प्रत्येकी १०

तेजस आठवले
Wed, 02/28/2018 - 21:38 नवीन
१०० डुआयडी घेऊन प्रत्येकी १० काड्या टाकल्या तरी उपद्रवमूल्य १% येते.
  • Log in or register to post comments

नीरवला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे योजना नाही : शरद पवार.

प्रसाद_१९८२
गुरुवार, 03/01/2018 - 10:40 नवीन
साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवर बुधवारी थेट तोफ डागली. महागाई, बेरोजगारी वाढली असून, शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे अच्छे दिन नको तर पूर्वीचे दिवस द्या, असे लोक म्हणू लागले आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला. ---- https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/pm-modi-does-not-have-any-plan-for-to-catch-neerav/articleshow/63116531.cms
  • Log in or register to post comments

+ १

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/01/2018 - 12:33 नवीन
+ १ नीरव मोदीला पकडण्यासाठी पवारांकडे एक खात्रीशीर योजना आहे. पवारांच्या काळात सुवर्णयुग होते. महागाई, बेरोजगारी नावाला पण नव्हती. शेतकरी अत्यंत आनंदात समृद्ध जीवन जगत होते. त्यामुळे अच्छे दिन नको तर पूर्वीचे दिवस द्या असे मीही म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

छान

manguu@mail.com
Fri, 03/02/2018 - 00:03 नवीन
मोदीजी व त्यांचे समर्थक तुमची इच्छा पूर्ण करोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

State funeral

प्रसाद_१९८२
गुरुवार, 03/01/2018 - 11:32 नवीन
काल श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ह्या पाठी काय कारण असावे ? श्रीदेवी यांनी कोणतेही शासकिय पद भुषविले नव्हते मग दारु नशेत बाथ टब मधे पडून ज्या नटिचा मॄत्यु झाला आहे अश्या व्यक्तिचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे कितपत योग्य आहे?
  • Log in or register to post comments

पद्मश्री

कपिलमुनी
गुरुवार, 03/01/2018 - 13:58 नवीन
पद्मश्री मिळाला होता म्हणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. ( तिरंग्यात अंत्यसंस्कार हा सन्मान हे फक्त देशासाठि प्राण दिलेल्या सैनिकांसाठी असावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

हेच म्हणणार होतो.

बिटाकाका
गुरुवार, 03/01/2018 - 14:03 नवीन
हेच म्हणणार होतो. --------------------------- नियमानुसार एखाद्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारला घेता येतो. याशिवाय शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हा त्यांच्या एखाद्या क्षेत्रातील योगदानावर अवलंबून असावा, त्यांचा मृत्यू कसा झाला यावर असू नये असे मला वाटते. वाद नको म्हणून यापासून दूर रहाणे वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/01/2018 - 18:03 नवीन
ह्या पाठी काय कारण असावे ?
भावना.लोकांच्या मनात काय चालू आहे ह्याची चाचपणी राजकारण्यांकडून नेहमी चालू असते. विचारी मनास न पटतील असे निर्णय देताना,'बेताल' वक्तव्ये करताना,ईतिहासाची उजळणी करताना.. नेहमी विचार केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

असे का म्हणे ?

manguu@mail.com
Fri, 03/02/2018 - 00:00 नवीन
( तिरंग्यात अंत्यसंस्कार हा सन्मान हे फक्त देशासाठि प्राण दिलेल्या सैनिकांसाठी असावा) का म्हणे ? राजे , म्हाराजे , सेनापती , सेना इ इ इ इ नी वर्षानुवर्षे लोकाना मोरली प्रेशराइज केले आहे ... आम्ही रक्त सांडतो , मरतो अन तुम्ही दुय्यम आहात. अजुनही लोकांवर ते मोरल प्रेशर तसेच आहे. बाकीचे लोक सैन्यात जाऊन मरत नसले तरी त्यांचेही देशहितात योगदान असतेच की. दिला देशाने इतरानाही तो सन्मान तर बाकीच्यांच्या पोटात का दुखते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

खांग्रेसच्या भ्रष्टाचाराचा

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/01/2018 - 14:29 नवीन
खांग्रेसच्या भ्रष्टाचाराचा इतिहास - १९७१ मधील अत्यंत रोचक व गाजलेले नगरवाला प्रकरण https://www.loksatta.com/desh-videsh-news/ghosts-of-bank-nationalisation-and-nagarwala-scam-1638791/
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
गुरुवार, 03/01/2018 - 16:48 नवीन
२०१९ जवळ आले वाटतं. या प्रकरणातून नेमके काय सांगायचे आहे ? पैसे गांधीनी घेतले की काँग्रेसने ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

छान

manguu@mail.com
गुरुवार, 03/01/2018 - 23:26 नवीन
नवी दिल्ली: 'दहशतवादाशी मुकाबला करण्यास भारत सक्षम आहे,' असं सांगतानाच 'मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावं असं आम्हाला वाटतंय,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. दिल्लीत 'इस्लामिक स्कॉलर कॉन्फरन्स'ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं. या परिषदेला जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांच्यासह अनेक देशांचे इस्लामिक विद्वान उपस्थित होते. जगभरातील धर्म भारताच्या मातीत रुजले आणि वाढले याचा आम्हाला अभिमान असल्याचंही मोदी म्हणाले. दहशतवादाची लढाई कोण्या एका पंथाविरोधात नाही, असं सांगतानाच इथे रमजानही साजरा होतो आणि होळी सुद्धा, असं मोदी यांनी सांगितलं.
  • Log in or register to post comments

मुसलमानांच्या एका हातात कुराण

मार्मिक गोडसे
गुरुवार, 03/01/2018 - 23:48 नवीन
मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावं असं आम्हाला वाटतंय,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. ताटातले काढून घेतलेले परत देणार का?
  • Log in or register to post comments

कुणाला काय फरक पडला ?

manguu@mail.com
Fri, 03/02/2018 - 07:11 नवीन
हज अनुदान बंद केले . पण हजचा भारताचा कोटा वाढवला आहे. आणि अनुदान बंद होउनही लोक जातच आहेत. हे अनुदान तसेही एअर इंड्याचे पोट भरत होते. आता ते मुस्लिम स्त्रियांच्या हितासाठी खर्च होणार , असे महामहीम बोलले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

नेमकं काय काढून घेणं खुपलेलं

बिटाकाका
Fri, 03/02/2018 - 09:23 नवीन
नेमकं काय काढून घेणं खुपलेलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

यातलं काहिच नाही

महेश हतोळकर
Fri, 03/02/2018 - 09:48 नवीन
अवघड जागेचं दुखणं आणि जावई डॉक्टर असा प्रकार आहे हा. सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही, नुसतंच व्हिवळताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

शब्दशः ताटातले

मार्मिक गोडसे
Fri, 03/02/2018 - 10:20 नवीन
शब्दशः ताटातले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

कायदा खावा म्हणतो तिथं खा,

बिटाकाका
Fri, 03/02/2018 - 10:32 नवीन
कायदा खावा म्हणतो तिथं खा, जिथं नाही म्हणतो तिथं खाऊ नका! एवढं सोप्पंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

हे असं का बरं?

मार्मिक गोडसे
Fri, 03/02/2018 - 10:52 नवीन
हे असं का बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

सत्यपाल

कपिलमुनी
Fri, 03/02/2018 - 00:48 नवीन
सत्यपाल बंडूने काल पुन्हा कैच्या काय फेकाफेकी केली
  • Log in or register to post comments

बुरा ना नमो होली है

मार्मिक गोडसे
Fri, 03/02/2018 - 10:47 नवीन
https://www.youtube.com/watch?v=gWD1N1pJA6U
  • Log in or register to post comments

छान छान! आणि म्हणे आम्हाला

बिटाकाका
Fri, 03/02/2018 - 10:57 नवीन
छान छान! आणि म्हणे आम्हाला बोलू दिले जात नाही, आमचा आवाज दाबला जातो. *************************** विडिओ बरा एडिट केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

२०१४ पासुन नुसतंच व्हिवळताहेत

डँबिस००७
Fri, 03/02/2018 - 11:14 नवीन
२०१४ पासुन नुसतंच व्हिवळताहेत !!
  • Log in or register to post comments

आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील: आठवले

सिद्धार्थ ४
Fri, 03/02/2018 - 12:03 नवीन
आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असं भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. मात्र 250 जागा मिळवून केंद्रात भाजप सत्तेत येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपच्या जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी दिला. http://abpmajha.abplive.in/pune/bjps-seats-will-decrease-in-next-election-says-ramdas-athavale-517345
  • Log in or register to post comments

त्रिपुरा निवडणुक निकाल

प्रसाद_१९८२
Sat, 03/03/2018 - 08:28 नवीन
भाजप - ५ सिपीएम - ५ कॉंग्रेस - ०
  • Log in or register to post comments

अंतिम निकाल -

श्रीगुरुजी
Sat, 03/03/2018 - 20:41 नवीन
अंतिम निकाल - भाजप - ४३ चीन - १६ इटली - ०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

हा हा हा हा

जेम्स वांड
Sun, 03/04/2018 - 10:27 नवीन
चीन अन इटली काय गुरुजी! एकट्या भाजपच्या ४३ सीट्स आहेत की भाजप + आयपीटीएफ युतीच्या आहेत ४३ सीट्स?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आयपीएफटी म्हणायचं होतं

जेम्स वांड
Sun, 03/04/2018 - 10:31 नवीन
रिझल्टनुसार भाजप = ३५ आयपीएफटी = ०८ एकूण = ४३ असे आहे, आयपीएफटी सारख्या स्थानिक मित्राला तितकं श्रेय द्यायलाच हवे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

मेघालय निवडणुक निकाल

प्रसाद_१९८२
Sat, 03/03/2018 - 08:37 नवीन
भाजप - ० एनपीपी - ० कॉंग्रेस - १
  • Log in or register to post comments

मेघालय निवडणुक निकाल

प्रसाद_१९८२
Sat, 03/03/2018 - 08:40 नवीन
भाजप - १ एनपीपी - ० कॉंग्रेस - २ अन्य - १
  • Log in or register to post comments

गौरी लंकेश : एक अटक

manguu@mail.com
Sat, 03/03/2018 - 08:58 नवीन
https://m.maharashtratimes.com/india-news/gauri-killing-man-linked-to-right-wing-outfit-held-in-bengaluru/articleshow/63142626.cms पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलीस विशेष पथकाने (एसआयटी) हिंदू युवा सेनेच्या नवीन कुमारला अटक केली आहे. नवीन कुमारने गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यासोबत हत्या करण्यासाठी सराव शिबिरासाठीची व्यवस्था केली असल्याची माहिती समोर आली आहे.
  • Log in or register to post comments

बंगालपाठोपाठ डाव्यांचा २५

श्रीगुरुजी
Sat, 03/03/2018 - 14:28 नवीन
बंगालपाठोपाठ डाव्यांचा २५ वर्षे अबाधित असलेला अजून एक गड कोसळला. आता फक्त केरळमध्ये डावे शिल्लक आहेत. त्रिपुरा, नागाल्यांड ही राज्ये खूप लहान आहेत व तेथील निकालांचा राष्ट्रीय राजकारणावर अत्यल्प परीणाम होत असला तरी अशा निकालांमुळे भाजपविरूद्ध सातत्याने सुरू असलेल्या नकारात्मक प्रचाराला एक जोरदार उत्तर मिळते. आता मतदान यंत्राच्या नावाने ठणाणा सुरू होईल.
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Sat, 03/03/2018 - 15:10 नवीन
आता तिथल्या ख्रिस्चनांची मज्जाच मज्जा ! विमानात बसून जेरुसलेम यात्रा. विमानं कधी उडणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा