Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २४

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 25/02/2018 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!

वाचने 43583
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

मोदीजी व त्यांचे समर्थक तुमची इच्छा पूर्ण करोत.

काल श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ह्या पाठी काय कारण असावे ? श्रीदेवी यांनी कोणतेही शासकिय पद भुषविले नव्हते मग दारु नशेत बाथ टब मधे पडून ज्या नटिचा मॄत्यु झाला आहे अश्या व्यक्तिचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे कितपत योग्य आहे?

In reply to by प्रसाद_१९८२

पद्मश्री मिळाला होता म्हणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. ( तिरंग्यात अंत्यसंस्कार हा सन्मान हे फक्त देशासाठि प्राण दिलेल्या सैनिकांसाठी असावा)

In reply to by कपिलमुनी

हेच म्हणणार होतो. --------------------------- नियमानुसार एखाद्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारला घेता येतो. याशिवाय शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हा त्यांच्या एखाद्या क्षेत्रातील योगदानावर अवलंबून असावा, त्यांचा मृत्यू कसा झाला यावर असू नये असे मला वाटते. वाद नको म्हणून यापासून दूर रहाणे वेगळे.

In reply to by बिटाकाका

ह्या पाठी काय कारण असावे ?
भावना.लोकांच्या मनात काय चालू आहे ह्याची चाचपणी राजकारण्यांकडून नेहमी चालू असते. विचारी मनास न पटतील असे निर्णय देताना,'बेताल' वक्तव्ये करताना,ईतिहासाची उजळणी करताना.. नेहमी विचार केला जातो.

In reply to by कपिलमुनी

( तिरंग्यात अंत्यसंस्कार हा सन्मान हे फक्त देशासाठि प्राण दिलेल्या सैनिकांसाठी असावा) का म्हणे ? राजे , म्हाराजे , सेनापती , सेना इ इ इ इ नी वर्षानुवर्षे लोकाना मोरली प्रेशराइज केले आहे ... आम्ही रक्त सांडतो , मरतो अन तुम्ही दुय्यम आहात. अजुनही लोकांवर ते मोरल प्रेशर तसेच आहे. बाकीचे लोक सैन्यात जाऊन मरत नसले तरी त्यांचेही देशहितात योगदान असतेच की. दिला देशाने इतरानाही तो सन्मान तर बाकीच्यांच्या पोटात का दुखते ?

नवी दिल्ली: 'दहशतवादाशी मुकाबला करण्यास भारत सक्षम आहे,' असं सांगतानाच 'मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावं असं आम्हाला वाटतंय,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. दिल्लीत 'इस्लामिक स्कॉलर कॉन्फरन्स'ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं. या परिषदेला जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांच्यासह अनेक देशांचे इस्लामिक विद्वान उपस्थित होते. जगभरातील धर्म भारताच्या मातीत रुजले आणि वाढले याचा आम्हाला अभिमान असल्याचंही मोदी म्हणाले. दहशतवादाची लढाई कोण्या एका पंथाविरोधात नाही, असं सांगतानाच इथे रमजानही साजरा होतो आणि होळी सुद्धा, असं मोदी यांनी सांगितलं.

मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावं असं आम्हाला वाटतंय,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. ताटातले काढून घेतलेले परत देणार का?

In reply to by मार्मिक गोडसे

हज अनुदान बंद केले . पण हजचा भारताचा कोटा वाढवला आहे. आणि अनुदान बंद होउनही लोक जातच आहेत. हे अनुदान तसेही एअर इंड्याचे पोट भरत होते. आता ते मुस्लिम स्त्रियांच्या हितासाठी खर्च होणार , असे महामहीम बोलले होते.

In reply to by बिटाकाका

अवघड जागेचं दुखणं आणि जावई डॉक्टर असा प्रकार आहे हा. सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही, नुसतंच व्हिवळताहेत.

सत्यपाल बंडूने काल पुन्हा कैच्या काय फेकाफेकी केली

In reply to by मार्मिक गोडसे

छान छान! आणि म्हणे आम्हाला बोलू दिले जात नाही, आमचा आवाज दाबला जातो. *************************** विडिओ बरा एडिट केला आहे.

आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असं भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. मात्र 250 जागा मिळवून केंद्रात भाजप सत्तेत येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपच्या जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी दिला. http://abpmajha.abplive.in/pune/bjps-seats-will-decrease-in-next-electi…

In reply to by श्रीगुरुजी

चीन अन इटली काय गुरुजी! एकट्या भाजपच्या ४३ सीट्स आहेत की भाजप + आयपीटीएफ युतीच्या आहेत ४३ सीट्स?

In reply to by जेम्स वांड

रिझल्टनुसार भाजप = ३५ आयपीएफटी = ०८ एकूण = ४३ असे आहे, आयपीएफटी सारख्या स्थानिक मित्राला तितकं श्रेय द्यायलाच हवे असे वाटते.

https://m.maharashtratimes.com/india-news/gauri-killing-man-linked-to-r… पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलीस विशेष पथकाने (एसआयटी) हिंदू युवा सेनेच्या नवीन कुमारला अटक केली आहे. नवीन कुमारने गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यासोबत हत्या करण्यासाठी सराव शिबिरासाठीची व्यवस्था केली असल्याची माहिती समोर आली आहे.

बंगालपाठोपाठ डाव्यांचा २५ वर्षे अबाधित असलेला अजून एक गड कोसळला. आता फक्त केरळमध्ये डावे शिल्लक आहेत. त्रिपुरा, नागाल्यांड ही राज्ये खूप लहान आहेत व तेथील निकालांचा राष्ट्रीय राजकारणावर अत्यल्प परीणाम होत असला तरी अशा निकालांमुळे भाजपविरूद्ध सातत्याने सुरू असलेल्या नकारात्मक प्रचाराला एक जोरदार उत्तर मिळते. आता मतदान यंत्राच्या नावाने ठणाणा सुरू होईल.

बंगालपाठोपाठ डाव्यांचा २५ वर्षे अबाधित असलेला अजून एक गड कोसळला !! २५ वर्षे पुर्ण नॉर्थ ईस्ट ला एक कॉरेंटाईन भारत करुन ठेवलेला होता. आता तो भाग कोशातुन बाहेर येउन मेन स्ट्रीम भारताबरोबर प्रगतशील होईल. मोदीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मुक्त भारता कडे यशस्वी वाटचाल !!


नीरव मोदीचे लफडे कळुनही त्रिपुरा आणी नागालँडवाल्यांना काय अक्कल आली नाही म्हणाय्ची. सालं शेवटी इव्हीएमच जिंकल ;), :)) जेव्हा जेव्हा विरोधकांच्या हातात काही झुन्झुणा मिळतो, पब्लिक परत काय तरी कांड करुन टाकते. :)) मिपावरच्या काही सन्माननीय सदस्यांच्या संतुलित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत (नरेंद्र मोदी हे बिलकुलच चांगल करत नाहीएत म्हणुन) साला मला तर मानसिक आदळापट पण इमॅजिन नाय होत त्यांची.

सकाळ पासून टिव्ही चॅनल्सवर ईशान्येतील निवडणूका चर्चील्या जाताहेत, पण एखाद अपवाद सोडला तर या चर्चात इशान्येच्या माणसांना चा सहभाग घेण्या बद्दल टिव्ही चॅनल वाले विसरले आहेत का असा प्रश्न पडला (कदाचित मी सर्व चॅनल चेक केले नसतील चुभूदेघे)

In reply to by माहितगार

+१०० केवळ इशान्य भारतातिल निवडणूका असूनही, चुकून एखादा अपवाद वगळता, तिथल्या स्थानिक पक्ष/नेते/वार्ताहर/तज्ज्ञ यांची अनुपस्थिती नक्कीच खटकली !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तावातावाने उच्चरवात बोलता येणे हे तेथील लोकांच्या स्वभावात नसते असा ह्यांचा अनुभव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आता स्पेशल लोक तिथे गेलेत म्हणे. आता शिकतील हळूहळू

In reply to by manguu@mail.com

लहेज्यात "अग्गोबाई ते काय काम करत आहेत हे कधीच वाचनात आले नाही का असलं वाचवत नाही हे खरं" संघाचा द्वेष करताना संघाचे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन गेले आहेत हे बरोबर विसरलात. चालायचंच, चोराची नजर सतत ऐवजावर तशी अवस्था झाली आहे असे माई सांगत होत्या तुमच्या हितेश ला!! मतदार नाखु

नागालॅंडमध्ये ndpp + bjp 29 आहेत म्हणे. Ndpp चे किती अन bjp चे किती ? Ndpp च्याच जागा जास्त आहेत , म्हणून separate figure देत नाही आहेत का ?

In reply to by manguu@mail.com

तुम्हीच ठरवा कोण जिंकलं ते. भाजप १२, एनडीपीपी १६. भाजपने २० जागा लढवल्या होत्या व एनडीपीपी ने ४०. मागच्या निवडणुकीत भाजप ला एक जागा तर काँग्रेस ला ८ जागा होत्या ही अवांतर माहिती. ***************************** जिंकले कोण ते जाऊद्या, हारले कोण ते ठरवता आलं का? लोकशाही, ईव्हीएम की अजून कोण?

देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर आणून देशाची धुरा त्यांच्याकडे सोपवली. मात्र, आता आपण घोडचूक केल्याचे जनतेला कळून चुकले आहे, अशा शब्दात ज्येष्ठ विधीज्ञ व खासदार अॅड. राम जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पुढील निवडणुकीनंतर मोदी केवळ पायउतारच होणार नाहीत, तर कदाचित देशाबाहेरही निघून जातील, असे भाकितही त्यांनी वर्तविले. https://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/made-mistake-to-ma…

In reply to by manguu@mail.com

>>> आपण घोडचूक केल्याचे जनतेला कळून चुकले आहे, LLRC >>> पुढील निवडणुकीनंतर मोदी केवळ पायउतारच होणार नाहीत, तर कदाचित देशाबाहेरही निघून जातील, LLRC

In reply to by manguu@mail.com

देशाबाहेर ते का निघून जातील..ह्याचे कारण हे वकील साहेब देत नाहीत. निवडणूका जिंकणे/हरणे हे चालूच असते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जेठमलानींच्या मते रागा पंप्र होतीलच आणि नोटा बंदी बद्दल शिक्षाही ठोठावली तर वाचण्यासाठी ते परदेशी जातील ना!!! आत्तापर्यंत त्यांनी तिथलं आधारकार्ड काढलं सुद्धा असेल जिकडे पाहावे तिकडे मोदी या संघाच्या मुखपत्रातून साभार

चंद्राबाबुंनी सिवसेनेसारखं फार तळ्यात-मळ्यात न करता निर्णय घेतलाच. युपीएमधे सामील होणार काय टीडीपी ? आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलय राहुलबाबाने.

In reply to by अर्धवटराव

आंध्र मध्ये त्यांचा बहुमत आहे , भाजप सोबत नसेल तर फार फरक पडत नाही. भाजप आंध्र मध्ये कोणा सोबत जाणार हा मुद्दा आहे. पवन कल्याण ची पार्टी आहे, त्यांना आश्वासन देऊन सोबत घेता येईल. YSR ची इमेज भ्रष्ट आहे , केसेस चालू आहेत. 2019 चा पेपर सोपा नसणार हे नक्की

In reply to by कपिलमुनी

२०१९ वर फार फरक दिसत नाही. सरळ सरळ भाजपची कॅल्क्युलेटेड रिस्क दिसतेय. सध्या भाजपचे आंध्रमधून फक्त २ खासदार आहेत तर टिडीपीचे १५. टिडीपीची विशेष राज्याच्या दर्जाची मागणी भाजपला फार काही मिळवून देईल असे नाही, उलट टिडीपीलाच फायदा. याशिवाय, आंध्रला विशेष दर्जा देऊन बिहारला नाराज करणे बीजेपीला अजिबात परवडण्यासारखे नाही. भाजप आणि नितीश एकत्र आल्यामुळे बिहारमधला एनडीएचा आकडा २५ वरून ३५ वर जाण्याची संधी आहे. भाजप २-४ जागा वाढवूहि शकेल. ********************************* इतर छोट्या पार्ट्या एनडीएला येऊन मिळण्याची शक्यता आहेच. असे दबावाखाली ठेवू पाहणारे रिजनल पक्ष भाजपने दूर ठेवलेलेच बरे.

In reply to by बिटाकाका

आमच्या आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात कायम आजारी राज्याना BiMARU राज्ये अशा एका गटात टाकले आहे. बिहार मध्य आंध्र राजस्तान युपी विषेश् राज्य म्हणजे काय फायदे मिळतात ?

In reply to by manguu@mail.com

अजून काय असणार, करात सवलती, केंद्राकडून जास्तीचा फंड, केंद्राच्या योजनांना ७०(केंद्र):३०(राज्य) च्या ऐवजी ९०:१० फंडिंग. याशिवाय अजून काही राज्याच्या योजना पुढे सरकावण्यासाठीचे सोपे मार्ग वगैरे असतील.

In reply to by manguu@mail.com

राज्य सरकारने एखादी योजना जाहीर केली व ती मंजूर झाली की त्याचा ९०% खर्च केंद्राने उचलायचा. उत्तर-पूर्वेकडील काही राज्ये,हिमाचल्,झारखन्ड ही राज्ये विशेष राज्य आहेत. आंध्रप्रदेशचे विभाजन होताना तत्कालिन काँग्रेस सरकारने आंध्रला विशेष दर्जा देऊ म्हणून आश्वासन दिले होते. नंतर भाजपानेही ते दिले.पण तेवढा पैसा आता नाही असे अरूण जेटली म्हणत आहेत. असो. खंजीर्,तलवार,भवानी..भाषा वापरून पदांवर चिकटून रहायचे व रास्त मागणी अमान्य झाल्यावर सरकारमधून ताबडतोब बाहेर पडायचे.. शिवसेना व तेलुगु देसम..दोन्ही पक्षात अधिक स्वाभिमानी कोण ते कळले.

एनडीएतून इतर पक्षही बाहेर पडतील: शिवसेना --- वी दिल्ली: तेलुगू देसम पार्टी आणि भाजप दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर शरसंधान साधलं आहे. 'एनडीएतील घटकपक्षांचे भाजपबरोबर सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. हळूहळू इतर पक्षही तक्रारी करू लागतील आणि एक एक करून सर्व पक्ष एनडीएतून बाहेर पडतील,' असा दावा शिवसेनेने केला आहे. -- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/tdp-break-from-centr…

In reply to by प्रसाद_१९८२

हळूहळू इतर पक्षही....
मुळात टिडीपीच एनडीएमधून बाहेर पडली आहे का? त्यांनी तसे काही सांगितल्याचे वाचण्यात आले नाही. ते फक्त सरकारमधून बाहेर पडले आहेत असेच बहुतेक माध्यमे सांगत आहेत. ============================ या बातमीनंतरही शिवसेना परत राजिनामा-धमकी देण्याचा कसा काय विचार करते काय माहित? ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी दिला, याना प्रॉब्लेम आहेत असे मागचे तीन वर्षे सांगत आहात मग बाहेर पाडण्यासाठी एवढा कसला विचार चालू आहे?

In reply to by प्रसाद_१९८२

नायडूंच्या दबावाखाली न झुकण्याचा योग्य निर्णय मोदींनी घेतला आहे. मोदी हे वाजपेयी नाहीत हे जसे उद्धटला समजले नाही, तसेच ते नायडूनाही समजलेले नाही. >>> शिवसेना सत्तेला कधीही लाथ मारुन बाहेर पडू शकते. LLRC

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन एनडीएतून बाहेर पडले, असा दावा शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. गेली 4 वर्ष आम्ही भूमिका घेतोय. आता त्यांनी त्यांच्या राज्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला आहे. आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना बाहेर पडणार का? शिवसेना टीडीपीप्रमाणे सरकारमधून बाहेर का पडत नाही, असं विचारलं असता, राऊत म्हणाले, टीडीपी आणि शिवसेनेमध्ये फरक आहे. टीडीपी हा एनडीएमध्ये कायमस्वरुपी राहणारा पक्ष नाही. ते जाऊन येऊन असतात ना, लॉजवर जसं रुम घेतली, सोडली, तसा पक्ष टीडीपी आहे. ते कधी यूपीएमध्ये, कधी तिसऱ्या आघाडीत असतात. 2014 मध्ये मोदींची हवा होती. त्यामुळे ते एनडीएत गेले. जर ती हवा नसती तर देशात वेगळं राजकीय चित्र दिसलं असतं.

In reply to by प्रसाद_१९८२

'आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन एनडीएतून बाहेर पडले," नक्की कसली प्रेरणा?. ते (व ईतर पक्ष) ह्यांना हिंग लावूनही विचारत नाहीत. टी.व्ही.वर सेनेचे नेते फक्त तिरकस प्रतिक्रिया द्यायला येतात. स्वतः पुढाकार घेऊन ईतर पक्षांना विश्वासात घेऊन शिवसेनेने कधी मुद्दा उचलून धरला असे कधी दिसले नाही.

२०१९ साली देशव्यापी विक्रमी बहुमत मिळवून शिवसेनेचा प्रधानमंत्री निवडून आल्यावर तेलगू देसमशी चर्चा करण्याबद्दल संजय राऊत काहीच म्हणाले नाहीत ? बातमी अर्धवट प्रकाशित झालेली दिसते. खुद्द शिवाजी महाराजांनी शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापले हे एवढे आता ऐकायचे बाकी राहिले आहे.

In reply to by तेजस आठवले

>>> खुद्द शिवाजी महाराजांनी शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापले हे एवढे आता ऐकायचे बाकी राहिले आहे. LLRC

खुद्द शिवाजी महाराजांनी शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापले हे एवढे आता ऐकायचे बाकी राहिले आहे. LLRC ))--((

In reply to by manguu@mail.com

फेकू असा उल्लेख केला म्हणून १५ लाखातले ७.५ लाख कापले , उद्या असेही होईल .

In reply to by manguu@mail.com

मंगूजी आपण दोन दिवसांपूर्वीची शिळी बातमी दिलीत. या लिंकवर कालच्या टाईम्स वरची बातमी वाचा. https://timesofindia.indiatimes.com/india/pm-orders-bsf-to-revoke-pay-c…

In reply to by बिटाकाका

खरे कारण वेगळे असणार असे ह्यांचे मत. जवान व त्याचा वरिष्ठ ह्यांच्यात आधीपासून काहीतरी बिनसले असावे.