अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!
सर्वसाधारणपणे सरकारी पद्धतीनं तेजोनिधी भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकार्यांच्या देखरेखीखाली रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेन्स च्या अमेंडमेंट्स आणि कोरिजेंडा काढत बसायच्या वेळात अख्खा पुलच बांधून काढल्याबद्दल भारतीय लष्कराचा जाहिर निषेध!!!
विहिरीत पडलेली पोरे ते मोडके पुल सगळं लष्कराने करायचं, फक्त लष्कर प्रमुखांनी सद्यःस्थितीवर एखादी टिप्पणी केली , ते पण राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तर आपण लगेच बोंबाबोंब सुरू करावी! काय समाज आहे राव आपला.
https://m.maharashtratimes.com/india-news/p-chidambaram-instructed-us-to-pay-money-to-his-son-karti-indrani-and-peter-mukerjea-told-ed/articleshow/63116670.cms
काय गंमत आहे . डायरीत लिहिले तर तो पुरावा होत नाही , असा युक्तिवाद करणारे लोक आता तिसर्याच माणसाने कुणा तरी चौथ्या माणसाबद्दल दिलेला तोंडी / लेखी जबाब ऐकून नाचत आहेत.
काय गम्मत आहे नाही, अंध विरोध काहीही बोलायला मजबूर करतो लोकांना. जणूकाही ती डायरी भाजप समर्थकांनी पुरावा म्हणून नाकारली होती, हाहाहा! मालक, सुप्रीम कोर्टाने नाकारला होता हो तो पुरावा.
----------------------------------
त्या डायरीत तिकीट लावून जबाब वगैरे नोंदवलेला नव्हता हो, जो इंद्राणीचा आहे. आणि ते चिदंबरम वकील आहेत की हो, पुरावा नसताना अटक केली यावरून सीबीआयला कोर्टात का बरे खेचत नसतील?
माझीच गल्लत होतेय का तुमची? मी इतके दिवस समजत होतो कि पोलीस तपासात प्रथमदर्शनी, लिखित कबुलीजबाबानुसार एखादा पोलिसांना दोषी वाटला तर पोलीस त्याला अटक करतात आणि न्यायालयात सादर करतात. मग न्यायालय तो प्रथमदर्शनी पुरावा वगैरे बघून त्या एखाद्याला पोलीस कोठडी द्यायची, न्यायालयीन कोठडी द्यायची, जामीन द्यायचा कि सोडून द्यायचं हे ठरवतं! या प्रक्रियेत काही चुकीचे आहे का?
-----------------------------------------
डायरीला महत्व आहे कि नाही यावर तुमचं मत काय आहे? इतर काय म्हणतात यावर दुहेरी भूमिका कशाला? तुम्ही डायरीला महत्वाचं मानत असाल तर कबुलीजवाबाला (तो तर अधिकृत आहे) महत्वाचं माना किंवा जर (अधिकृत) कबुलीजवाब महत्वाचा नाही असे मानत असाल तर डायरी तो किस झाड कि पत्ती म्हणून सोडून द्या. या तो घोडा बोलो या चतुर बोलो!
२०१७-१८ या आर्थिक वर्षातील ३१ डिसेंबरला संपलेल्या तिस-या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नात ७.२℅ वृद्धी झाली. निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली तथाकथित घट फक्त एका तिमाहीपुरतीच टिकली. या दोन्ही निर्णयांवर सातत्याने टीका करणारे मनमोहन सिंग, चिदंबरम्, पप्पू इ. गप्प बसले आहेत.
http://indianexpress.com/article/business/economy/indias-gdp-registers-major-jump-in-third-quarter-grows-to-7-2-from-6-5/
मला वाटते निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली घट एका पेक्षा जास्त तिमाही वर परिणाम करून गेली. तसेच मनमोहन सिंग आणि चितांबरम यांनी नोटबंदी मुळे gdp वर परिणाम झाला आणि चांगल्या गोष्टी पेक्षा वाईट गोष्टी अधिक झाल्या या अर्थाने टीका केली होती, ज्यात मला शत प्रतिशत तथ्य वाटते. GDP उभ्या आयुष्यात वर येणार नाही अशी कोणीही टीका केली नाहीये. नोटबंदी च्या परिणामातून कधी न कधी अर्थव्यवस्था सावरणारच होती.
असो अर्थव्यवस्था वेग पकडत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
मला वाटते निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली घट एका पेक्षा जास्त तिमाही वर परिणाम करून गेली. तसेच मनमोहन सिंग आणि चितांबरम यांनी नोटबंदी मुळे gdp वर परिणाम झाला आणि चांगल्या गोष्टी पेक्षा वाईट गोष्टी अधिक झाल्या या अर्थाने टीका केली होती, ज्यात मला शत प्रतिशत तथ्य वाटते. GDP उभ्या आयुष्यात वर येणार नाही अशी कोणीही टीका केली नाहीये. नोटबंदी च्या परिणामातून कधी न कधी अर्थव्यवस्था सावरणारच होती.
असो अर्थव्यवस्था वेग पकडत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवर बुधवारी थेट तोफ डागली. महागाई, बेरोजगारी वाढली असून, शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे अच्छे दिन नको तर पूर्वीचे दिवस द्या, असे लोक म्हणू लागले आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.
----
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/pm-modi-does-not-have-any-plan-for-to-catch-neerav/articleshow/63116531.cms
+ १
नीरव मोदीला पकडण्यासाठी पवारांकडे एक खात्रीशीर योजना आहे.
पवारांच्या काळात सुवर्णयुग होते. महागाई, बेरोजगारी नावाला पण नव्हती. शेतकरी अत्यंत आनंदात समृद्ध जीवन जगत होते. त्यामुळे अच्छे दिन नको तर पूर्वीचे दिवस द्या असे मीही म्हणतो.
काल श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ह्या पाठी काय कारण असावे ? श्रीदेवी यांनी कोणतेही शासकिय पद भुषविले नव्हते मग दारु नशेत बाथ टब मधे पडून ज्या नटिचा मॄत्यु झाला आहे अश्या व्यक्तिचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे कितपत योग्य आहे?
हेच म्हणणार होतो.
---------------------------
नियमानुसार एखाद्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारला घेता येतो. याशिवाय शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हा त्यांच्या एखाद्या क्षेत्रातील योगदानावर अवलंबून असावा, त्यांचा मृत्यू कसा झाला यावर असू नये असे मला वाटते. वाद नको म्हणून यापासून दूर रहाणे वेगळे.
भावना.लोकांच्या मनात काय चालू आहे ह्याची चाचपणी राजकारण्यांकडून नेहमी चालू असते. विचारी मनास न पटतील असे निर्णय देताना,'बेताल' वक्तव्ये करताना,ईतिहासाची उजळणी करताना.. नेहमी विचार केला जातो.
( तिरंग्यात अंत्यसंस्कार हा सन्मान हे फक्त देशासाठि प्राण दिलेल्या सैनिकांसाठी असावा)
का म्हणे ?
राजे , म्हाराजे , सेनापती , सेना इ इ इ इ नी वर्षानुवर्षे लोकाना मोरली प्रेशराइज केले आहे ... आम्ही रक्त सांडतो , मरतो अन तुम्ही दुय्यम आहात.
अजुनही लोकांवर ते मोरल प्रेशर तसेच आहे.
बाकीचे लोक सैन्यात जाऊन मरत नसले तरी त्यांचेही देशहितात योगदान असतेच की.
दिला देशाने इतरानाही तो सन्मान तर बाकीच्यांच्या पोटात का दुखते ?
खांग्रेसच्या भ्रष्टाचाराचा इतिहास - १९७१ मधील अत्यंत रोचक व गाजलेले नगरवाला प्रकरण
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ghosts-of-bank-nationalisation-and-nagarwala-scam-1638791/
नवी दिल्ली: 'दहशतवादाशी मुकाबला करण्यास भारत सक्षम आहे,' असं सांगतानाच 'मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावं असं आम्हाला वाटतंय,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.
दिल्लीत 'इस्लामिक स्कॉलर कॉन्फरन्स'ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं. या परिषदेला जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांच्यासह अनेक देशांचे इस्लामिक विद्वान उपस्थित होते. जगभरातील धर्म भारताच्या मातीत रुजले आणि वाढले याचा आम्हाला अभिमान असल्याचंही मोदी म्हणाले. दहशतवादाची लढाई कोण्या एका पंथाविरोधात नाही, असं सांगतानाच इथे रमजानही साजरा होतो आणि होळी सुद्धा, असं मोदी यांनी सांगितलं.
मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावं असं आम्हाला वाटतंय,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.
ताटातले काढून घेतलेले परत देणार का?
हज अनुदान बंद केले .
पण हजचा भारताचा कोटा वाढवला आहे.
आणि अनुदान बंद होउनही लोक जातच आहेत.
हे अनुदान तसेही एअर इंड्याचे पोट भरत होते. आता ते मुस्लिम स्त्रियांच्या हितासाठी खर्च होणार , असे महामहीम बोलले होते.
आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असं भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. मात्र 250 जागा मिळवून केंद्रात भाजप सत्तेत येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपच्या जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी दिला.
http://abpmajha.abplive.in/pune/bjps-seats-will-decrease-in-next-election-says-ramdas-athavale-517345
https://m.maharashtratimes.com/india-news/gauri-killing-man-linked-to-right-wing-outfit-held-in-bengaluru/articleshow/63142626.cms
पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलीस विशेष पथकाने (एसआयटी) हिंदू युवा सेनेच्या नवीन कुमारला अटक केली आहे. नवीन कुमारने गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यासोबत हत्या करण्यासाठी सराव शिबिरासाठीची व्यवस्था केली असल्याची माहिती समोर आली आहे.
बंगालपाठोपाठ डाव्यांचा २५ वर्षे अबाधित असलेला अजून एक गड कोसळला. आता फक्त केरळमध्ये डावे शिल्लक आहेत.
त्रिपुरा, नागाल्यांड ही राज्ये खूप लहान आहेत व तेथील निकालांचा राष्ट्रीय राजकारणावर अत्यल्प परीणाम होत असला तरी अशा निकालांमुळे भाजपविरूद्ध सातत्याने सुरू असलेल्या नकारात्मक प्रचाराला एक जोरदार उत्तर मिळते.
आता मतदान यंत्राच्या नावाने ठणाणा सुरू होईल.
प्रतिक्रिया
सर्वसाधारणपणे सरकारी पद्धतीनं
हे पाहुन , पायाभुत सुवीधांची
भारी ना!
https://m.maharashtratimes
छान
काय गम्मत आहे नाही, अंध विरोध
हाहाहा, तुमच्या मते साक्षिदार
हो का ?
अग्गोबाई! डायरीला महत्व नाही
अग्गोबाई !
माझीच गल्लत होतेय का तुमची?
कांची कामकोटी पीठाचे
२०१७-१८ या आर्थिक वर्षातील ३१
छान
चान चान!!
मला वाटते निश्चलनीकरण व वसेक
मला वाटते निश्चलनीकरण व वसेक
१०० डुआयडी घेऊन प्रत्येकी १०
नीरवला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे योजना नाही : शरद पवार.
+ १
छान
State funeral
पद्मश्री
हेच म्हणणार होतो.
हम्म
असे का म्हणे ?
खांग्रेसच्या भ्रष्टाचाराचा
छान
छान
मुसलमानांच्या एका हातात कुराण
कुणाला काय फरक पडला ?
नेमकं काय काढून घेणं खुपलेलं
यातलं काहिच नाही
शब्दशः ताटातले
कायदा खावा म्हणतो तिथं खा,
हे असं का बरं?
सत्यपाल
बुरा ना नमो होली है
छान छान! आणि म्हणे आम्हाला
२०१४ पासुन नुसतंच व्हिवळताहेत
आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील: आठवले
त्रिपुरा निवडणुक निकाल
अंतिम निकाल -
हा हा हा हा
आयपीएफटी म्हणायचं होतं
मेघालय निवडणुक निकाल
मेघालय निवडणुक निकाल
गौरी लंकेश : एक अटक
बंगालपाठोपाठ डाव्यांचा २५
छान