Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २४

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 25/02/2018 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!

वाचने 43583
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

श्रद्धांजली ( घडामोडींच्या धाग्याना २४-२५ असे नंबर न देता , नावात फेब्रुवारी २०१८ असे दिल्यास जास्ती सोयीचे होईल का ? )

In reply to by manguu@mail.com

+१०० चांगली कल्पना. महिना व वर्ष शीर्षकात ठेवून दर महिन्याच्या १ तारखेला नवीन धागा काढल्यास ते जास्त सोईचे होईल.

संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे मीरत येथील आजचं संपूर्ण भाषण ऐकले. इतकं उत्कृष्ट भाषण आयुष्यात दुसरं कोणतं ऐकल्याचं आठवत नाही.

In reply to by arunjoshi123

त्यांचं भाषण नेहमीच उत्कृष्ट असतं. त्यांना अगदी जवळून प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळालीय आणि त्यांच्यासोबत फक्त २/३ फूट अंतरावरून संघाची 'नमस्ते सदा..' ही प्रार्थनाही म्हणालोय.

In reply to by arunjoshi123

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'राष्ट्रोदय समागमा'च्या निमित्ताने मेरठमध्ये आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. देशभरातील सुमारे दोन लाख स्वयंसेवकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कट्टर हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करताना कट्टर हिंदुत्व म्हणजेच कट्टर अहिंसा आणि कट्टर उदारता असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

In reply to by manguu@mail.com

राजकारणात सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शक्तीप्रदर्शन हा शब्द (जसा इथे अभिप्रेत असावा) आणि भागवतांच्या भाषणातील शक्तीप्रदर्शनाचा संदर्भ यांच्यातला फरक देखील विलक्षण आहे.

पटना: बिहार के मुजफ्फरपुर में बुलेरो की चपेट में आने से नौ बच्चों की मौत और 20 के घायल होने की घटना की पड़ताल में पता चला है कि उस गाड़ी का रजिस्ट्रेशन बीजेपी प्रदेश महामंत्री मनोज बैठा के नाम पर है. इस बात के सामने आने के बाद से राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव ने बीजेपी सरकार पर निशाना साधा है. श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अस्पताल में पूर्व उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव ने पहले मृत बच्चो के परिजनों को सांत्वना दी उसके बाद मीडिया से बातचीत में कहा कि शराब के नशे में नौ बच्चो को रौंद कर मौत के घाट उतार दिया गया कई बच्चे घायल हो गए लेकिन जिला प्रशासन अब तक आरोपी चालक नहीं पकड़ सका है. ..... इतक्या मुलांचा मृत्यू , आरोपीस योग्य शासन व्हावे.

In reply to by manguu@mail.com

काय आहे यार हे!! इतकं वाईट वाटतं असल्या बातम्या वाचल्यावर. त्या लहानग्यांच्या आईबापाविषयी विचार करूनच गलबलून येते. 'जन्म एक व्याधी' वाटावी अशी परिस्थिती. फार दु:खद.

In reply to by manguu@mail.com

मेलो च्यामारी हसून हसून. समाजात मूर्खपणा वाढला आहे. म्हणून मी सहानुभूतीसाठी माझी सर्व कामं मूर्खपणाने करणार आहे. -गा.पै.

श्रीदेवीच्या मृत्यूसंबंधी रोचक प्रतिक्रिया वाचली :-
श्रीदेवींचे पार्थिव 'बॉडी'? ऋषी कपूर नाराज : https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-new…
त्याचं काये की त्या बॉडीच्या मालकिणीने ती बॉडी एखाद्या बॉडीसारखी वापरली. त्याला आपण काय करणार. ऋषी कपूरांनी उगीच उद्विग्न होऊ नये! शरीर हे ईश्वरी देणगी नसून पैसे कमविण्याचं यंत्र आहे या अत्याधुनिक विचारांचं मनन व चिंतन केल्यास बहुधा मनास उभारी येईल. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही शरीर न वापरता पैसे कमावता? बाकी, दिवंगत माणसाबद्दल फार चांगलं बोलता येणार नसेल तर निदान फालतू शेरेबाजी तरी टाळावी एवढा संकेत पाळणं का बरं जमू नये?

In reply to by गामा पैलवान

सर्वसामान्य मराठीत ज्याला "मृत शरीर" आणि भारदस्त मराठीत "पार्थिव" म्हणतात त्यालाच सर्वसाधारण इंग्लिशमध्ये "डेड बॉडी" आणि भारदस्त भाषेत "मॉर्टल रिमेन्स" म्हणतात... हे सगळे शब्द सर्वमान्य व शिष्ट आहेत. श्रीदेवीच्या अचानक मृत्युमुळे भावनावश झालेल्या ऋषी कपूरला असा एखादा शब्द खटकला असला तरी, या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर त्याचा फार गाजावाजा न करता त्याचे ते मत अनुल्लेखाने टाळावे. इतकी सन्मान्य अपेक्षा, सतत ब्रेकिंग न्यूजच्या वासावर असलेल्या, सद्याच्या बाजारू माध्यमांकडून करणे अवास्तव आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी, ऋषी कपूरची प्रतिक्रिया व माध्यमांचा आगावूपणा, या दोघांकडे दुर्लक्ष करावे, हेच ठीक.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माध्यमांची लायकी अशी उरलेली दिसत नाही. नेहरुवाद्यांनी, डाव्यांनी, पुरोगाम्यांनी माध्यमांची लायकी इतकीच कमी करायला हवी होती कि ते जे खोटे रेटताहेत ते तरी किमान प्रतिष्ठितपणे आणि फुशारकीने मिरवत फिरता यावे. यांना अजिबातच कशाचं काहीच नाही इतकं काय ते खालच्या पातळीवर जायचं? कोणी मेलं तर त्याच्या कुणालाही "तुम्हाला कसं वाटतंय?" असं जगात कोणीही विचारणार नाही. आता सांगणांराना देखील आपल्या निकटतम कोणी मेलं तर आपल्याला कसं वाटतंय हे अगदी गद्य, पद्य, इ मधे सांगता येतंय. इतके रुदाली कसे पैदा झाले?

काल संघाच्या कार्यक्रमाचं न्यूज २४ वर काही वेळ ब्रोडकास्टींग होतं त्यात - १. ही २०१९ ची तयारी आहे २. शक्तीप्रदर्शन आहे ३. कितने लोग बुलाए ४. क्या इंतजाम ५. संघाचं रेप्यूटेशन (मंजे काय ते कळलंच असेल.) २०१९ ...२०१९ ....२०१९ ... बरं हे ठिक आहे. हे चॅनलला म्हणायचं आहे हे ठीक. पण काय चाललं आहे त्याबद्दल आयोजकांना काय म्हणायचं आहे हे एकदा तरी सांगावं नि मग त्याला खोटं म्हणावं. आयोजकांचं प्रयोजन गायबच. आणि भाषणं = शून्य कवरेज. मग खाली बातम्या "भागवत मेक्स हिंदू यूनिटी पीच" ============================================ पुरोगाम्यांना टाळ्या वाजवायला जत्रेकरी कुठून मिळतात ते सुस्पष्ट आहे. ================================== तेच हा लोकसत्तावाला. या बाबाला फॉरेन ट्रेडमधलं काय कळतं देव जाणो.

ईशान्य म्हणजे पुर्वोत्तर भारतात भाजपाने अरुणाचल राजकारणात केलेली घाई रुचली नव्हती, पण ईशान्य भारत मुख्य धारेत येणेही महत्वाचे आहे. ख्रिश्चनां धर्ममार्तंडांनी भाजपावर उगाचचे तोंडसूख घेण्याचे सोडले नसले तरी सत्तेवर आल्यानंतर गल्फ मधून असुरक्शीत स्थितीतील ख्रिश्चनां नागरीकांनाही सुखरूप परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सकारात्मक नोंद घेतली जावयास हवी होती तेवढी ती घेतली गेली नाही. गोव्यात पर्रीकरांनी ख्रिश्चन मतदाराम्शी जुळवून घेण्याचे बर्‍यापैकी प्रयत्न केले असावेत. असेच प्रयत्न भाजपा त्रिपुरा मेघालय आणि नागालँड इत्यादी राज्यातून करताना दिसतो आहे. या निमीत्ताने भाजपाचे काही अंशी रिपोझीशनींग होऊन भाजपाची काँग्रेस होण्याचा धोका संभवतो पण ती भविष्यातली बाब झाली. भाजपा नागालँडमधील ख्रिश्चन धर्मवेडाशी कसे तोंड देतो आहे त्या बद्दल या वृत्तामुळे अंदाजा यावा. मुख्य म्हणजे या वृत्तातील मांडणी भाजपा प्रेमींना आवडेल अशी बर्‍ञापैकी मुद्देसूद दिसते . कॉम्ग्रेस भाजपा कोणी का असेना भारतातील सगळी राज्ये मुख्य धारेत येण्याशी मतलब.

In reply to by माहितगार

कॉम्ग्रेस भाजपा कोणी का असेना भारतातील सगळी राज्ये मुख्य धारेत येण्याशी मतलब.
सहमत आहे. कॉंग्रेस असो वा भाजप सगळ्यांच ध्येय साम दाम दंड भेद करून सत्ता मिळवणे हेच आहे. UPA आणि NDA या सरकारांची जर तुलना केली तर NDA सरकार च ईशान्य भारतावर नेहमीच जास्त लक्ष असते असे मला वाटते जी चांगली गोष्ट आहे. ईश्यान्य भारतातील निकाल पाहण्यासारखे असतील, विशेषतः त्रिपुरा आणि नागालंड. (त्रिपुरा हिंदू बहुसंख्य राज्य आहे.)

In reply to by अमितदादा

ईशान्येत शांतता असण्यासाठी भाजपला कोणत्याही राज्यात पूर्ण बहुमत न मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ------------------------ ईशान्य भारताशी फुटीरवाद ही काही म्हणावी अशी समस्या नाही. फुटीरवाद तिथे नाही असं म्हणता येईल. मात्र स्थानिक जातींत प्रचंड वैमनस्य आहे. म्हणून सत्तेत दुसर्‍या राज्याच्या अल्पसंख्यकांची साथ असेल तर दोन्ही राज्ये शांत राहतात. मणिपूरमधे भाजपचा नागा समथिंग पक्षाशी अलायन्स आहे. म्हणून नागा - मैतेई वाद मिटला आहे. नागालँडमधे भाजपने या पक्षाशी युती तोडली आहे. त्या पक्षाशी पुन्हा युती करणं भाजपला भाग पडावं इतक्याच जागा त्यांना तिथे मिळाल्या पाहिजेत. जास्त मिळाल्या तर त्यात प्रदेशाचं प्रचंड अहित आहे.

प्रकल्पग्रस्त पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यासाठी अनेक बैठका घेणा-या सिडकोने नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन कार्यक्रमावर तब्बल १० कोटी ३४ लाखांची उधळपट्टी केल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबई- प्रकल्पग्रस्त पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यासाठी अनेक बैठका घेणा-या सिडकोने नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन कार्यक्रमावर तब्बल १० कोटी ३४ लाखांची उधळपट्टी केल्याचे उघड झाले आहे. या शानदार कार्यक्रमाचे आयोजक आणि विमानतळाची कंत्राटदार कंपनी असलेल्या जीव्हीकेने खर्चाचे देयक आता सिडकोला पाठवले आहे. देयकानुसार सिडकोची नोडल एजन्सी एनएमआयएलने ४० टक्के, तर उर्वरित ६० टक्के खर्च जेएनपीटी व सिडकोने (६ कोटी २० लाख) देण्याची मागणी जीव्हीकेने केली आहे. http://prahaar.in/विमानतळ-भूमिपूजनावर-१०-क/

पुंबा, १.
तुम्ही शरीर न वापरता पैसे कमावता?
शरीर ईश्वराकडून मिळालेली देणगी असल्याची जाणीव हवी. हा मूळ मुद्दा आहे. २.
बाकी, दिवंगत माणसाबद्दल फार चांगलं बोलता येणार नसेल तर निदान फालतू शेरेबाजी तरी टाळावी एवढा संकेत पाळणं का बरं जमू नये?
पहिल्याप्रथम औपरोधिक भाष्याबद्दल माफी असावी. माझं म्हणणं अधिक उचित शब्दांत मांडायला हवं होतं. त्याचं काय आहे की ऋषी कपूर हे बॉडी या शब्दामुळे अस्वस्थ झालेत. मात्र त्यांनी त्यांच्या तरुणपणी जे काही केलं (किंवा केलं नाही) त्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे. दोघे पतीपत्नी स्वत:च्या लहान मुलांसमोर कचकचा भांडायचे. मग मुलांवर कसले संस्कार होणार. ही त्यांचीच नाही तर पूर्ण पिढीची कहाणी आहे. थोड्याफार फरकाने बॉलीवूड वगैरे वलयांकित जगतात हेच चित्र आढळून येतंय. याच संस्कारांच्या अभावी आज श्रीदेवीच्या पार्थिवाचा उल्लेख बॉडी म्हणून होतोय ना? संस्कार करायचे कोणी? आणि कोणावर करायचे? हे खरं दुखणं आहे. ऋषी कपूरांच्या समोर जी समस्या आहे ती संस्कार केल्याने उत्पन्न झालीच नसती. पण आता तर ती निर्माण झालीये आणि तिने अक्राळविक्राळ रूपही धारण केलंय. मग यावर आज काय करायचं, असा प्रश्न आहे. तर ऋषी कपूरना साधना करावी लागेल. इथे साधना म्हणजे सुरुवातीस नामजप एव्हढंच अपेक्षित आहे. त्यातून माणूस ईश्वराशी जोडला जातो. शेवटी ऋषी कपूरांची सुद्धा 'डेड बॉडी'च होणार आहे. ती व्हायच्या आधी ईश्वराशी जोडलं जाणं महत्त्वाचं. श्रीदेवीच्या उदाहरणावरून आपण शहाणं व्हायला हवं ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्कट अजिबात पटण्यासारखे नाही. मुळात ऋषी कपूर यांचा दावाच अजब आहे. मृत शरीराला सर्वसाधारणपणे डेडबॉडी म्हणतात, त्यात वावगे ते काय? त्यातून त्या मृत व्यक्तीचा अनादर वगैरे होण्याचा काय संबंध?

In reply to by बिटाकाका

आत्मा सोडून गेला की राहते ते शरीर ! आणि त्याला बॉडी म्हणाले तर चुकीचे काही नाही. अति संवेदनशील दाखवायला गेला चिंटू

खरे आहे. रिषी कपूर जास्तच भावूक झाल्याचे दाखवत होता. बहुतांशी बॉलीवूडकर पांढरे कपडे,गॉगल घालून 'डेड बॉडी' येण्याची प्रतिक्षा करत असणार असे ह्यांचे मत. घराबाहेर मिडियावाल्यांची गर्दी जमल्याची खात्री झाली की मग हे मोठ्या गाड्यातून घाईघाईने उतरत बोनी व त्याच्या कन्यांच्या बाजूला उभे राहणार.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुमच्या ह्यान्नी तुमच्याबरोबर एकच षिनेमा केला , तर तुम्हाला त्यांची कितीदा आठवण होते. ऋषी कपूर श्रीदेवीचे तर कितीतरी सिनेमे झालेत.

नुकतेच छ. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या समारंभात मा. मुख्यमंत्री त्यांच्याविषयी गौरवपर बोलले. त्यांनी जर जनतेसाठी चांगली कामे केली असतील, तर त्यात काहीच वावगे नाही. उलट चांगल्या गोष्टींचा गौरव करणे सरकार हे संवेदनशील अाहे, हे दर्शवते. पण पुढे ते म्हणाले की राजे हे एक मुक्त विद्यापीठ अाहेत. त्यांचे नियम तेच बनवतात, त्याची अंमलबजावणी तेच करतात व न पाळणार्यांना शासनही तेच करतात. एका शासनव्यवस्थेच्या प्रमुखाने अशा प्रकारे शासनाचे कायदे नियम त्यांना लागू होत नसल्याचे जाहीरपणे सांगणे, हे चिंताजनक वाटते. शासनच असे सांगत असेल, तर सातार्यातील लोकांचे अवघड अाहे. खाली व्हिडीअो: https://www.youtube.com/watch?v=RJVJGXdFp1M

In reply to by विशुमित

असली कायतर बडबड करत बसण्यापेक्षा पवारांनी मराठ्यांनी काढलेल्या इंजिनिरिंग आणि मेडिकल कॉलेजच्या संस्थापक, मॅनेजमेंटला एकत्र आणून त्यांच्या 'पूर्ण खाजगीकरण'साठी प्रयत्न करावेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय वातावरण तापलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. कर्नाटकात सिद्धरामय्यांचं सरकार असलं तरी हे सरकार 'सीधा रुपैया'चे सरकार आहे. पैसे दिले तरच येथे कामे होतात. म्हणूनच हे पैसे खाणारं सरकार घालवून इमानदार सरकार आणण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. .... Election mode मधून हे बाहेर कधी येणार ? पैसे खाणारे सरकार ... साक्षात पंतप्रधानांचा आरोप. मग हे शिक्षा का देत नाहीत ?

In reply to by बिटाकाका

मंगू, अरे निवडणूकीच्या धामधुमीत आरोप प्रत्यारोप चालयचेच. 'पवारांनी भूखंड घोटाळा केला/पैसे खाल्ले' म्हणणारे शेवटी त्यांना पद्मभूषण देते झाले. मुख्य म्हणजे पवारांनीही तो पुरस्कार स्वाकारला. तीच गोष्ट 'सेक्युलर' लोकांची.भाजपा/संघ कम्युनल आहे म्हणणारे काही भाजपात गेले. नारायण राणे शिवसेनेत असताना 'कम्युनल' होते.काँग्रेसमध्ये गेल्यावर सेक्युलर झाले. राजकारणातल्या आरोप-प्रत्यारोपांकडे मनोरंजन म्हणून बघायचे असे ह्यांचे मत.

In reply to by बिटाकाका

पण धागे आले, अभ्यासू धागे आले, प्रत्येकाने आपापल्या परीने आपापले राजकीय तत्वविचार लढवले, राखले, शाब्दिक धुळवडी झाल्या, खपवून घेतलेच न काका आपण? म्हणणे इतकेच आहे की विघनसंतोषी मंगु कितीही डु आयडी काढून आले तरी त्यांना किती बोलून किती महत्व द्यायचे हे आपण ठरवायला हवे. पटलं तर पहा बुआ, इथे तुमच्याकडून कोणाला मत द्यायचंय वगैरे ऐवजी जर उत्तर कन्नड भागात होणाऱ्या आपल्या तरण्या स्वयंसेवकांच्या हत्या, पाद्री मुसलमानांचा हलकल्लोळ इतके जरी तुम्ही अधोरेखित केले असते तर वाचणाऱ्याने पाहिजे ते घेतलं असतं. हे माझं वैयक्तिक मत हो काका, राग मानू नका कृपया.

In reply to by जेम्स वांड

तर, माझा मुद्दा तोच आहे. यांना असल्या गोष्टींचा राग आहे म्हणून भाजप त्यांना आवडत नाही असे गृहीत धरून तसे नाही बाबा, काँग्रेस यापेक्षा बेकार गोष्टी करत होती/आहे वगैरे दाखवले की मग आजकाल मुद्दा येतोय की त्यांनी तसे केले म्हणून त्यांना हाकलून यांना आणले. तर मज बापुड्याला कळेना की यांचा मुद्दा नेमका काय? म्हणून आपलं डायरेक्ट विचारून घेतलं की, काँग्रेस बेकार होती/आहे हे तुम्ही मान्य करताय, भाजप बेक्कारच हे तुम्ही सिद्ध करायचा प्रयत्न करताय, मग कुणाला मतदान करायचं! --------------------------------------------------- ताकाला जाऊन भांडं लपवनार्यांना काय आणि कसे समजावणार? सतत फक्त नकारात्मक बातम्या पुढे करण्यामागे त्यांचा मुद्दा भाजप खराब आहे असा असेल तर मग थोडं मन मोठं करून भाजप आणि काँग्रेसची तुलना होऊ द्या की! सतत काँग्रेसचं कशाला काढायला पाहिजे असला फालतू मुद्दा कशाला? -------------------------------------------------- थोडक्यात उपरोधीकरित्या विचारून ताकाचं भांडं बाहेर निघतंय का बघायचा (व्यर्थ) प्रयत्न केला.

In reply to by बिटाकाका

कुणाला तरी छोटा मोदी म्हटले की भाजपे आणि भक्तांना राग अगदी अनावर झाला होता ना ? म्हणून विचारले की दुसर्याना पैसे खाणारे , असा direct आरोप हे कसे करू शकतात ? तर इथले लोक माझ्याच अंगावर आले . असो. फेसबुकवर माझ्या मित्रालाही हाच अनुभव आला. त्याने लिहिले ... आम्हाला नररुंड मोडी नको - कर्नाटका . लोक वस्सकन अंगावर आले. त्यान्नी शाब्दिक कोट्या केल्या - सीधा रुपय्या सरकार म्हटले तर ते चालते , इतराना मात्र अलाउड नाहीत ! गंमतच आहे ह्यांच्या लोकशाहीची !

In reply to by manguu@mail.com

राग अनावर झाला होता म्हणजे काय झाले होते? ------------------------------------ अंध विरोधकांचा हा दुसरा मोड्स ऑपरेंडी! स्वतः सतत भाजप/मोदींच्या नावाने अतार्किक, गलिच्छ बडबड करायची आणि मग त्यावर कोणी काही म्हटलं की त्याला "वसकन" अंगावर येणे, स्वातंत्र्यावर घाला, असहिष्णुता वगैरे संबोधायचे. पण स्वतः दुसऱ्यांच्या वक्तव्यावर स्वतःची काय प्रतिक्रिया होती याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे! यालाच क्राय फाऊल म्हणतात! ------------------------------------ भाजपवर सतत नकारात्मक टिका करण्यामागे अंधविरोधकांचा नेमका उद्देश काय हे समजलं तर मज्जा येईल!

In reply to by बिटाकाका

>>> भाजपवर सतत नकारात्मक टिका करण्यामागे अंधविरोधकांचा नेमका उद्देश काय हे समजलं तर मज्जा येईल! भाजपवर सकारात्मक टीका करण्यासाठी अंधविरोधकांकडे मुद्दे आहेत नाहीत. म्हणूनच "मोदी गाल लाल ठेवण्यासाठी रोज ४ लाखांचे मशरूम खातात", "मोदी २५ लाखांचा सूट वापरतात", "मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते", "मोदी भित्रे व मनोरूग्ण आहेत", "मोदी नीच आहेत" अशी टीका सुरू आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोदी, मोदी, मोदी . . .

एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्टेशनला जोडणाऱ्या नव्या पादचारी पुलासह करीरोड आणि आंबिवली स्थानकांवरील नव्या पादचारी पुलांचे अखेर काल लोकार्पण करण्यात आलं. लष्करानं करुन दाखवलं, ११७ दिवसांत तीन पुलांचं काम पुर्ण abc

In reply to by प्रसाद_१९८२

सर्वसाधारणपणे सरकारी पद्धतीनं तेजोनिधी भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेन्स च्या अमेंडमेंट्स आणि कोरिजेंडा काढत बसायच्या वेळात अख्खा पुलच बांधून काढल्याबद्दल भारतीय लष्कराचा जाहिर निषेध!!!

In reply to by प्रसाद_१९८२

हे पाहुन , पायाभुत सुवीधांची सर्वच कामे लष्कराकडे सोपवावी असे म्हणण्याचा मोह होतो.

In reply to by प्रसाद_१९८२

विहिरीत पडलेली पोरे ते मोडके पुल सगळं लष्कराने करायचं, फक्त लष्कर प्रमुखांनी सद्यःस्थितीवर एखादी टिप्पणी केली , ते पण राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तर आपण लगेच बोंबाबोंब सुरू करावी! काय समाज आहे राव आपला.

In reply to by श्रीगुरुजी

https://m.maharashtratimes.com/india-news/p-chidambaram-instructed-us-t… काय गंमत आहे . डायरीत लिहिले तर तो पुरावा होत नाही , असा युक्तिवाद करणारे लोक आता तिसर्याच माणसाने कुणा तरी चौथ्या माणसाबद्दल दिलेला तोंडी / लेखी जबाब ऐकून नाचत आहेत.

In reply to by manguu@mail.com

काय गम्मत आहे नाही, अंध विरोध काहीही बोलायला मजबूर करतो लोकांना. जणूकाही ती डायरी भाजप समर्थकांनी पुरावा म्हणून नाकारली होती, हाहाहा! मालक, सुप्रीम कोर्टाने नाकारला होता हो तो पुरावा. ---------------------------------- त्या डायरीत तिकीट लावून जबाब वगैरे नोंदवलेला नव्हता हो, जो इंद्राणीचा आहे. आणि ते चिदंबरम वकील आहेत की हो, पुरावा नसताना अटक केली यावरून सीबीआयला कोर्टात का बरे खेचत नसतील?

In reply to by अनुप ढेरे

साक्षीदाराची पूर्ण उलटतपासणी करुन कोर्ट जे ठरवते , ते फायनल असते. ते होण्यापुर्वी कोणत्याही लेखी तोंडी जबाबाला सहाराच्या डायरीइतकेच शून्य महत्व असते.

In reply to by manguu@mail.com

माझीच गल्लत होतेय का तुमची? मी इतके दिवस समजत होतो कि पोलीस तपासात प्रथमदर्शनी, लिखित कबुलीजबाबानुसार एखादा पोलिसांना दोषी वाटला तर पोलीस त्याला अटक करतात आणि न्यायालयात सादर करतात. मग न्यायालय तो प्रथमदर्शनी पुरावा वगैरे बघून त्या एखाद्याला पोलीस कोठडी द्यायची, न्यायालयीन कोठडी द्यायची, जामीन द्यायचा कि सोडून द्यायचं हे ठरवतं! या प्रक्रियेत काही चुकीचे आहे का? ----------------------------------------- डायरीला महत्व आहे कि नाही यावर तुमचं मत काय आहे? इतर काय म्हणतात यावर दुहेरी भूमिका कशाला? तुम्ही डायरीला महत्वाचं मानत असाल तर कबुलीजवाबाला (तो तर अधिकृत आहे) महत्वाचं माना किंवा जर (अधिकृत) कबुलीजवाब महत्वाचा नाही असे मानत असाल तर डायरी तो किस झाड कि पत्ती म्हणून सोडून द्या. या तो घोडा बोलो या चतुर बोलो!

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे निधन झाले.

२०१७-१८ या आर्थिक वर्षातील ३१ डिसेंबरला संपलेल्या तिस-या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नात ७.२℅ वृद्धी झाली. निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली तथाकथित घट फक्त एका तिमाहीपुरतीच टिकली. या दोन्ही निर्णयांवर सातत्याने टीका करणारे मनमोहन सिंग, चिदंबरम्, पप्पू इ. गप्प बसले आहेत. http://indianexpress.com/article/business/economy/indias-gdp-registers-…

In reply to by श्रीगुरुजी

मला वाटते निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली घट एका पेक्षा जास्त तिमाही वर परिणाम करून गेली. तसेच मनमोहन सिंग आणि चितांबरम यांनी नोटबंदी मुळे gdp वर परिणाम झाला आणि चांगल्या गोष्टी पेक्षा वाईट गोष्टी अधिक झाल्या या अर्थाने टीका केली होती, ज्यात मला शत प्रतिशत तथ्य वाटते. GDP उभ्या आयुष्यात वर येणार नाही अशी कोणीही टीका केली नाहीये. नोटबंदी च्या परिणामातून कधी न कधी अर्थव्यवस्था सावरणारच होती. असो अर्थव्यवस्था वेग पकडत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मला वाटते निश्चलनीकरण व वसेक मुळे झालेली घट एका पेक्षा जास्त तिमाही वर परिणाम करून गेली. तसेच मनमोहन सिंग आणि चितांबरम यांनी नोटबंदी मुळे gdp वर परिणाम झाला आणि चांगल्या गोष्टी पेक्षा वाईट गोष्टी अधिक झाल्या या अर्थाने टीका केली होती, ज्यात मला शत प्रतिशत तथ्य वाटते. GDP उभ्या आयुष्यात वर येणार नाही अशी कोणीही टीका केली नाहीये. नोटबंदी च्या परिणामातून कधी न कधी अर्थव्यवस्था सावरणारच होती. असो अर्थव्यवस्था वेग पकडत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवर बुधवारी थेट तोफ डागली. महागाई, बेरोजगारी वाढली असून, शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे अच्छे दिन नको तर पूर्वीचे दिवस द्या, असे लोक म्हणू लागले आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला. ---- https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/pm-modi…

In reply to by प्रसाद_१९८२

+ १ नीरव मोदीला पकडण्यासाठी पवारांकडे एक खात्रीशीर योजना आहे. पवारांच्या काळात सुवर्णयुग होते. महागाई, बेरोजगारी नावाला पण नव्हती. शेतकरी अत्यंत आनंदात समृद्ध जीवन जगत होते. त्यामुळे अच्छे दिन नको तर पूर्वीचे दिवस द्या असे मीही म्हणतो.