Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २४

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 25/02/2018 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!

वाचने 43583
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Farooq-Takla-Paasport-… संपुआच्या काळात, दाऊदचा साथीदार असलेल्या, फरारी असलेल्या व रेड कॉर्नर नोटिस असलेल्या फारूक टकल्याच्या पारपत्राचे नूतनीकरण केवळ २४ तासात झाले. "खांग्रेस का हाथ, इस्लामी दहशतवादियोंके साथ"

In reply to by श्रीगुरुजी

मोदीनी पद्मभूषण देऊन ज्यांना गौरवले.. त्यांच्या कृपेने हे झाले असावे असा आमचा अंदाज.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला हिंदू युवा सेनेचा संस्थापक के. टी. नवीनकुमार याला आज बेंगळुरू येथील महान्यायदंडाधिकारी कोर्टात हजर करण्यात आले असता ५ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवीनकुमार उर्फ होटे मांजा हा कर्नाटकातील मद्दूर येथील राहणारा असून गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला १८ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १८ राऊंड जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर २ मार्च रोजी विशेष तपास पथकाने (एसआयटी) नवीनला ताब्यात घेतले व त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीत गौरी यांच्या हत्येमागे नवीनकुमार हाच मुख्य सूत्रधार असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. नवीन कुमारने केलेल्या जामीन अर्जावर आज महान्यायदंडाधिकारी कोर्टात सुनावणी झाली असता एसआयटीच्यावतीने सरकारी वकिलांनी जामीन देण्यास जोरदार विरोध केला. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नवीनकुमार हा मुख्य आरोपी असून त्याच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा आहे, अशी मागणी वकिलांनी केली. ही मागणी मान्य करत कोर्टाने नवीनकुमारला आणखी ५ दिवसांची एसआयटी कोठडी दिली आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/gauri-lankesh-murder…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन... काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन... पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. 1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. राजकीय कारकीर्द 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 1968 साली ते एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला. जून 1991 ते मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री मे 1992 ते 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते) ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री नोव्हेंबर 2004 पासून पुढे - सहकार्य, पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन...

In reply to by कपिलमुनी

>>> 1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. 20 व्या वर्षी? >>> 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. १९९५ मध्ये पडले होते. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये. परंतु विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी उकळलेल्या बेकायदेशीर देणग्या, धनकनडीतील बळकावलेली जमीन व बळजबरीने बंद केलेला रस्ता इ. गोष्टी सुद्धा लिहिल्या जाव्यात.

In reply to by श्रीगुरुजी

मला मेसेज आला तो पेस्टवला , शिवाय abp majha वर पण हेच लिहिले आहे. त्यांनी खोटे लिहिले असेल बहुधा . >>गेलेल्याबद्दल वाईट बोलू नय असे लिहिता आणि नंतर वाईट पण बोलता ? वाईट कामाबद्दल वाईटच बोलावे जिवंत असो की मृत ! कर्म तर तेच असते. मी मूळचा सांगलीचा आहे आणि मी भारती मध्ये 3 वर्षे शिकलो. माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे. सांगली मध्ये चांगले काम आहे. शिक्षण संस्था , साखर कारखाना अतिशय उत्तम चालू आहे. शिवाय वन प्रशिक्षण अकॅडमी आहे. कदमांनी तिथल्या एका पिढीला नोकरीस लावले आणि सुधारले. एस टी महामंडळावर असताना त्यांनी प. महाराष्ट्रातील खूप लोकांना एसटी मध्ये भरती होण्यास प्रोत्साहन दिले. भारती मध्ये गावाकडची खूप मुले विना फी शिकवली. सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलांना शिक्षण मोफत होते. सांगली जिल्ह्यातील त्यांचे काम मोठे होते. संगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार करायचे असतील तर गरीब रुग्णांना कायम आधार वाटतो. एका सामान्य कुटुंबातील मुलाने एवढी मोठी झेप घेणे नक्कीच कौतुकास्पद आहे.

In reply to by कपिलमुनी

म्हणजे एबीपी माझाने पण चुकीचं लिहिलं आहे तर! पतंगराव कदम संपतराव देशमुखांकडून हरल्याचं वाचलेलं आहे.

खोटेनाटे आरोप लावून सनातन संस्थेवर बंदी घालायचं कारस्थानं चालू होती. त्या वेळेस (२०१० च्या आसपास) सनातनच्या साधकांना पतंगरावांनी भेट कबूल केली होती. त्यावेळचा साधकांचा अनुभव निराशाजनक होता. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असणार . आता सनातनचेच बघा , Holi एका सनातन साधकास हे एक्स्प्लेन करायला सांगितले तर गंडला ना बिचारा ! माझा अनुभव फार निराशाजनक होता

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी, सगळ्यांना सगळं ठाऊक नसतं. जनतेची सेवा करण्याची वचनं देऊन एखादा मंत्री निरपराध्यांची बाजूही ऐकून न घेता हात झटकून टाकतो हे गंभीर प्रकरण आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मंत्री सेवा करतो म्हणजे direct मंत्र्याकडे जायचे असते का ? योग्य त्या ऑफिसात अर्ज वगैरे नको का ?

https://news.rediff.com/commentary/2018/mar/10/us-leader-pelosi-seeks-e… चीनने तिबेट घशात घातल्यानंतर बहुतेक पहिल्यांदाच एखादा अमेरिकी नेता तिबेटच्या बाजूने बोलला आहे. चीन तिबेटबाबतीत अत्यंत संवेदनाशील असल्याने आता चीनची प्रतिक्रिया बघणे रोचक असेल.