Skip to main content

(कोण म्हणतो रात्र झाली )

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आताच अमुच्या जेवणाची आता कुठे सुरवात झाली बघुया चला - या फोडणीची नुकतीच टेट्रापॅकमधुनी डालड्याला जाग आली पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)

वाचने 2762
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आज काय चालु आहे हो मिपावर? विडंबनावर विडंबन . . चालु आहे . . चालु द्या. चालु द्या. चालु द्या. चालु द्या. चालु द्या. =)) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

या फोडणीमुळेच विकासरावांना शिंका आल्या का? =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली भोत अच्छे! :) आपला, (फोडणीप्रेमी) तात्या.

बेसन लाडू भारी जमलाय की.

त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते वा वा वा.. मस्त आहे :) -- लिखाळ.

सही रे बेला.

माझ्या कवितेच छान विडंबन तुम्ही केल आहे

हिंग, जिरे, मिरे तडका मारलेले खमंग विडंबन आवडले!! ;) चतुरंग

मिसळपाव आहे म्हणून फक्त खादाडीच करत रहायची की काय? कुणी रांधण्याची शिकवणी घेतोय तर कुणी फोडण्या घालतोय! चालू द्या. आम्हाला काय, खमंग खाण्याशी मतलब! तसेही आम्ही मुलखाचे खादाड! क्रान्ति

प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली - ह्या कडव्याला जरा वेगळा आणि जास्त खमंग वास आहे. ( खडा हिंग होता कां ? )