Skip to main content

बळी [शतशब्दकथा]

लेखक निओ यांनी रविवार, 08/10/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले. आचके देऊन एकदाचा शांत झाला. ................................. एकाने काठीवरून त्याचे वेटोळे बाहेर फेकले. "चुकी तुझी नाही, आमची पोरं निर्धोक राहावी म्हणून तुझा बळी घेतला", तो पुटपुटला.

वाचने 3704
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आपल्याकडे सापांना दिसला रे दिसला की मारायची प्रवृत्ती आहे. पण आता सर्पमित्रांना बोलावण्याचीही चांगली पद्धत सुरू झाली आहे हे बरे आहे. कथा आवडली.

उगा काहितरीच, एस सर, अभिजीत अवलिया, सौरा, अमरेंद्र बाहुबली, ईनिगोय....धन्यवाद!