Skip to main content

ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

लेखक मार्मिक गोडसे यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये..... तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता. आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्‍यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!

वाचने 122750
प्रतिक्रिया 261

प्रतिक्रिया

या गुन्ह्याला राजीनाम्याशिवाय प्रायश्चित्त नाही. मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे.;)

In reply to by Nitin Palkar

छ्या.. कर ली ना छोटी बात..? राजीनामा बिजीनामा काये.. डायरेक राजकीय संन्यास आणि भाजपाचे विसर्जन असले मुद्दे बोला.

कशाच्या आधारावर हे ठरवलं तेही सांगा. स्विस बँकेतला पैसा येणार नाही हे सर्वांनाच माहित होतं. त्यावर विसंबून मतं दिली सांगणाय्रांनी हात वर करा. बाद झालेल्या नोटा जमा झाल्या म्हणजे मोहिम फसली हे कसे काय? ज्यांनी ज्याप्रमाणात रिटन भरत आहेत तेवढे रुपये जमा करू शकले. दरम्यानच्या झालेल्या निवडणुकीत शालश्रीफळ का दिली गेली नाही त्यांना आणि पक्षाला हेसुद्धा सांगा.

In reply to by कंजूस

बाद झालेल्या नोटा जमा झाल्या म्हणजे मोहिम फसली हे कसे काय? ८ नोव्हे.२०१६ नंतर ३-४ लाख कोटी कागदाचे तुकडे होणार होते ना? नाही झाले म्हणजे मोहिम फसलीच म्हणायचे. ज्यांनी ज्याप्रमाणात रिटन भरत आहेत तेवढे रुपये जमा करू शकले जवळ जवळ बाद झालेल्या सगळ्याच नोटा बँकेत जमा केल्या गेल्या, म्हणजे काळ्या पैशाबाबत सरकारचा अंदाज चुकला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? दरम्यानच्या झालेल्या निवडणुकीत शालश्रीफळ का दिली गेली नाही त्यांना आणि पक्षाला हेसुद्धा सांगा नोटाबंदीनंतर झालेल्या निवडणुका ह्या नोटाबंदी वर सार्वमत म्हणून घेतल्या होत्या का? निवडणुकांतील यश हाच निकष लावणार असाल तर गेली ६० वर्षे मागील सरकाराने कोणतेच अयोग्य काम केले नाही असंच म्हणायचे आहे का तुम्हाला?

लेखक महोदय, तुम्हारा जरा च्युक्याचं बरका ..... तिकडे सीमेवर जवान अहोरात्र खडा पहारा देत आहे, आणि तुम्ही असले लेख कसे काय लिहिता, असे मार्मिकीकरण करणे म्हणजे राष्ट्र द्रोह, तुम्ही लागलीच पाकिस्तानात चालू लागा....किंवा तुमच्या आरोग्यास लाभदायी मॉर्निंग वॉक तरी सुरू करा. एवढा सैराट विकास झालेला तुम्हाला दिसत नाही का ? विकास नुसता पिसाटलाय.... इकडे भारताला महान राष्ट्र बनवण्याचा यज्ञात सहभागी व्हायचं सोडून, कुठं इंधन दरवाढ, बेरोजगारी, अर्थव्यवस्था अश्या शुल्लक गोष्टी उगळता हो ? देशद्रोही कुठले... कोणी कोणी जुमलेबाजीला मतं दिलेली ? हात वर करा .... कोणी कोणी गौरक्षणासाठी मतं दिलेली ? हात वर करा .... कौटिल्या नंतर प्रथमच भारतवर्षाला एवढा अर्थतज्ञ कम कुटनीतिज्ञ कम राष्ट्रभक्त नेतृत्व मिळालं ... अन अशी टीका तुम्ही करूच कसे शकता ? एक सर्वसामान्य भारतीय नागरिक जेव्हा चहाविक्रेता ते देशपातळीवरिल पदावर पोहोचू शकतो, तेव्हाच त्याला खरी लोकशाही म्हणतात, ....पण तुम्ही त्याच व्यक्तीवर अशी टीका करता तेव्हा तीच लोकशाही धोक्यात येते, हे तुमच्या बथ्थड टाळक्यात का येत नाही ?

वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने चकली भाजणी असेल मिपा गिरणीत, हे तर दर महिन्याला​ लागणारी ज्वारी आहे! चला भाकरी "थापा"यला घ्या. बुवा ,डांगे अण्णा खर्डा तयार ठेवा, ठेचा सुद्धा चालेल

In reply to by नाखु

अहो कसली दिवाळी अन कसले काय... पंतप्रधानपद घराण्याबाहेर गेल्याने सुतक आले आहे. बादवे - तुम्ही एनाराय आहात का..? त्या सगळ्या एनाराय लोकांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले म्हणे. मंगल पांडे, चापेकर बंधू वगैरे सोयीची नांवे नव्हती म्हणे. असो.. आपण जरा कांही बोलले की असहिष्णुता वाटते आणि लोकं आयडीवापसीचा गेम सुरू करतात.

In reply to by मोदक

ओह माय गोडसे..... सहिष्णू राष्ट्रभक्त स्वातंत्रसेनानी, निवडक व हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अल्पसंख्य असतानाही, तुमच्या कडून परमपूज्य गोळवलकर व प्रातःस्मरणीय गोडसे, यांचा अनुल्लेख व्हावा, यासारखे दुर्दैव ते काय या हिंदुराष्ट्राचे.... हंत हंत

In reply to by पगला गजोधर

सहिष्णू राष्ट्रभक्त स्वातंत्रसेनानी, निवडक व हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अल्पसंख्य असतानाही, व्वा.. कमाल कौतुक वाटते या विचारधारेचे. मोगलांविरूद्ध....सॉरी हां.. तुमच्या आलमगीर महामहीम औरंगजेब बादशहाशी लढलेले शिवाजी महाराजही या न्यायाने अल्पसंख्याक होते. मग हाच नियम लावणार का तिथेपण..? बाकी एकाच घराण्याची पाद्यपूजा, प्रातःस्मरण कोण करत आहे हे उघड होईल इतकाही पक्षपात दाखवू नका.. नै कसे आहे, उद्या २०१९ च्या वेळी असहिष्णुता आणि हिंदूद्वेषाचा अजेंडा राबवण्यापूर्वीच बुरखा फाटायचा तुमचा. :)

In reply to by मोदक

कॉकेशस पर्वतराजीतुन आलेले NRI असोत, किंवा ग्रीस समद्रातून आलेले गौरांग निलाक्ष NRI असोत, सर्वांचेच आधुनिक भारताच्या स्वातंत्रात प्र/अप्र योगदान आहेच, तरीही तुम्ही असे मार्मिक लेख का लिहिता ??

In reply to by पगला गजोधर

नक्की ना? कारण ते स्वतन्त्रता सन्ग्रामात नव्हते तर ब्रिटिशान्चे हेर/हुजरे होते म्हणे. आणि जे भाजपा उच्चवर्णिय स्वातन्त्रलढ्यात होते ते काहि देशप्रेमामुळे नव्हे तर त्यान्च्या वैयक्तिक स्वार्थामुळे!! कस आहे बर का, स्वातन्त्र्य आले फक्त एका पक्शामुळे आणि तो पक्श सुखनैव राज्य करत होता इतकी वर्ष!! सर्व धर्म सुखात नान्दत होते. देश प्रगतिपथावर होता. ते बाहेरुन आलेले NRI पण हळुहळु देश सोडुन चालले होते. उगिच मोदि आले. कॉकेशस पर्वतराजीतुन आलेले NRI असोत.......... BTW मोदी या category मधले की मुलनिवासी??

In reply to by सुखीमाणूस

BTW मोदी या category मधले की मुलनिवासी??
मोदीजीही होते का ? स्वतंत्र लढ्यात योगदान द्यायला ??? वा वा चान चान, मला तर माहीतच नव्हतं.

In reply to by सुखीमाणूस

मोदीजी, NRI की मूलनिवासी ? असा प्रश्न एका भारतीय मतदाराला कसा पडू शकेल ? मी वरील एका प्रतिसादात उल्लेखल्या प्रमाणे, परत सांगतो, मोदीजी घरी आपल्या वृद्ध मातोश्रीना एकटे ठेवून, जगाचा नकाशा पिंजून काढण्याचा वनवास भोगताना, त्यांना जननी जन्मभूमीचा विरह, वर्ष्यातले कित्येक महिने सहन करावा लागतो. एवढा प्रदीर्घ कालावधी ते परदेशी फक्त देशकल्यानासाठी व्यतीत करत आहेत..... तर लागले लगेच कुशंका व्यक्त करायला , की म्हणे NRI की मूलनिवासी .... अशी शंका येतेच कशी ???

In reply to by सुखीमाणूस

स्वातन्त्र्य आले फक्त एका पक्शामुळे आणि तो पक्श सुखनैव राज्य करत होता इतकी वर्ष भारतात हा पक्ष होता हो पण १९४६ मध्ये सीरियाला १९४७ मध्ये भारताबरोबरच श्रीलंका आणि म्यानमारला १९४६ मध्ये थायलंड कोरिया भूतान इंडोनेशिया कंबोडिया अल्जेरिया यांनाही स्वातंत्र्य मिळालं. तिथे हि बहुतेक हेच एन आर आय च असतील स्वातंत्र्य लढा लढायला. तिथे पण त्या पक्षा चंच राज्य असणार ६५-७० वर्षे. केवळ "आमच्या" मुळेच स्वातंत्र्य मिळालं असा दुष्प्रचार ७० वर्षे चालवला होता सत्तेसाठी. जसे काही नेताजी सुभाष बाबू किंवा स्वा . सावरकर क्रांतिसिंह नाना पाटील भुरटे चोरच होते. स्वतः ला फायद्याचा इतिहास शिकवलं गेला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना "चुकलेला देशभक्त" म्हणणारे लोक हे.

In reply to by सुबोध खरे

यांच्याकडे मणिशंकर अय्यर, डॉग्गीराजा आणि खुद्द पप्पू अशी महान पात्रयोजना आहे , साल्यानी भारतीय राजकारणातील शोले बनवून ठेवला असता . नेहरूंच्या शिवाजी राजाच्या अशा उल्लेखाबद्दल तर पायताण काढावसं वाटतं

In reply to by मोदक

अहो कसली दिवाळी अन कसले काय... पंतप्रधानपद घराण्याबाहेर गेल्याने सुतक आले आहे. ह्यापूर्वी पंतप्रधानपद घराण्याबाहेर कधीच गेलं नव्हतं का? दिवाळीबद्दल म्हणत असाल तर बराच 'दारुगोळा' आयताच मिळतोय. कदाचीत येत्या १८ महिन्यात दारुगोळा फॅक्टरीतच फुटण्याची शक्यता आहे.

In reply to by मोदक

अरे हो, आम्हाला पण शाळेत एवढंच शिकवलं गेलंय की मंगल पांडे, चाफेकर बंधू आणि तत्सम मंडळींनीच स्वातंत्र्य मिळवून दिलंय. बाकी नाना पाटील वगैरे स्वातंत्र्य मिळवण्यात मागच्याच बेंचवर असतील हं.

In reply to by सरकारसाहेब

कारण आम्हाला शिवाजी महाराजान्चा इतिहास होता आणि स्वातन्त्र्य लढ्याचा इतिहास होता त्यात तर एवढेच शिकलो की स्वातन्त्र्य मिळाले ते फक्त गान्धिजीनमुळे जे महात्मा आणि राष्ट्रपिता होते आणि चाचा नेहरुन्मुळे. नाना पाटीलानवर आख्खा धडा होता मराठी मधे..... आणि बघाव तिथे Gandhi/Neharu Road/Institute/airport दुस्वास करावा पण ........

In reply to by नाखु

वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने चकली भाजणी असेल मिपा गिरणीत, हे तर दर महिन्याला​ लागणारी ज्वारी आहे!
पुढील १८ महिने भाकरीवर काढा. बुवा ,डांगे अण्णा खर्डा तयार ठेवा, ठेचा सुद्धा चालेल सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' जोरात वाजतोय, इथे 'नोटाबंदीभक्त' दातखिळीने हैराण झालेत. बिगुलचा आवाज त्यांना सहन होणार नाही, बहीरे होतील ते.

In reply to by मार्मिक गोडसे

सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' जोरात वाजतोय, इथे 'नोटाबंदीभक्त' दातखिळीने हैराण झालेत. बिगुलचा आवाज त्यांना सहन होणार नाही, बहीरे होतील ते. यात वुमन एम्पॉवरमेंट, ज्युपीटर वेलॉसिटी आणि एनाराय लॉजिक जोडा म्हणजे राहुलबाबा गांधीचे भाषण पूर्ण होईल.

In reply to by मोदक

यात वुमन एम्पॉवरमेंट, ज्युपीटर वेलॉसिटी आणि एनाराय लॉजिक जोडा म्हणजे राहुलबाबा गांधीचे भाषण पूर्ण होईल. मुद्दे संपले की अंधभक्ताना असा अवांतराचा आजार होतो, तुम्हीही त्याला अपवाद नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

२०१९ ला पप्पू कृपेने तुमच्यावर इलाज होईल अशी देवाजवळ प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. बालदिनाच्या शुभेच्छा. :)

छान लेख .

कधी करताय ते १५/२० लाख जमा माझ्या अकाउंट्ला ?????????..........(पण छ्या तसं काही म्हटलेलं दिसत नाहीए, वर लिहीलेल्या भाषणाच्या तुकड्यात ).

In reply to by इरसाल

होय, पण वरील भाषणात म्हटलेल्याची, पुर्ती भाषांकर्त्याने ऑल रेडी केलेली असूनही असे धागे काढून लेखक लोकशाही/राष्ट्रभक्तीवर भुंकतोय.

नोटाबंदी सक्सेस झालीय. मला सारस्वत बँकेकडून गो कॅशलेस मध्ये १००० रुपये रिवॉर्ड मिळाले.

In reply to by अभ्या..

होय तुफान सक्सेस , मला HSBC ने १००० रुपयांचं अमेझॉन गिफ्ट कार्ड दिलं ... नंतर १० मिनिटांनी PMO मधून SMS आला कि "हा पयला हप्ता १५ लाखापैकी बरंका "

In reply to by मालोजीराव

HSBC म्हणजे हाँगकाँग शांघाय बँक ऑफ कॉमर्स, (अश्या चायनीज) संस्थेने नोटबंदी यशस्वी व्हावी म्हणून गिफ्ट कार्ड वाटले.... अरेरे, भक्तांपेक्षा, चायनीज जास्त सिरीयस प्रयत्न करत आहे की काय ? नोटबंदी यशस्वी व्हावी म्हणून...... सध्याचं PMO व ही चायनीज बँक यांच्यात चांगलंच कोओर्डीनेशन दिसतंय ...... नै लगेच एस एम एस आला म्हणून वाटलं ....

आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत.
. नोटाबंदी कशी फसली हे सांगणार्या प्रत्येक लेखामधले हे पालुपद. जवळपास 1 वर्षानंतर सुद्धा या लोकांचे होणारेअतोनात हाल जर संपलेले नसतील तर आतापर्यंत या लोकांनी ऊठाव,आंदोलन, जाळपोळ, रेलरोको, चक्काजाम या पैकी काहितरी केले असते. पण आता पर्यंत तसे काही घडले नाही. यावरून या दाव्याचे फोलपण लक्षात येते. मी नोटाबंदी चा समर्थक आहे तेंव्ह एवढेच सांगू ईच्छीतो ........समझनेवाले समझ गये है ना समझे वो अनाडी है ‍

मार्मिक गोडसे,
ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा..
मोदी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळवून देणार आहेत म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी फक्त काळ्या पैशाचा दरडोई हिशोब सांगितला. मोदी भीक वाटंत नाहीत. पप्पू आणि त्याच्या अवलादीला जनतेला भिकेला लावायचे डोहाळे लागलेत. म्हणून मी काँग्रेसला भिकारडी म्हणतो. लोकं भिकारी असतात हा काँग्रेसचा लाडका सिद्धांत आहे. मोदी काय पप्पूसारखी भीक थोडीच देणारेत? तो पक्का बनिया आहे. स्वत:चं स्वत: कमवून खावं असंच म्हणणार ना तो? आणि तेच बरोबर आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोदी भीक वाटंत नाहीत. तेच भीक मागत आहेत. कशाला हवे त्यांना ते स्विस बँकेतील पैसे, जे आपले नाहीत त्याच्या मागे कशाला लागायचे आणि मुंगेरीलाल सारखे स्वप्न रंगवत बसायचे . कष्ट करून इथलाच काळा पैसा शोधता आला असता, पण नाही त्यांना विनाकष्ट ३-४ लाख कोटी हवे होते.

In reply to by सुबोध खरे

गोडसे भटजी ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे आहेत ते सांगितलं नाही तुम्ही नाहीं म्हणजे ते आपले नाहीत असे छातीठोकपणे सांगता आहेत तर तुम्हाला माहित असणारच.

In reply to by सुबोध खरे

द्वेष करायचा ठीक आहे पण म्हणून काहीही? एखाद्या व्यक्तीच्या लबाडपणाच्या प्रमाणात मी माझा द्वेष व्यक्त करतो. ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे आहेत ते सांगितलं नाही तुम्ही हा लेख मी मिपावर चर्चा घडवून आणण्यासाठी टाकला होता. पुढिल भागात त्याविषयी अधिक स्पष्ट लिहिणार होतो. हा लेख टाकल्यावर मी काही दिवस उत्तरेकडे फिरायला गेलो होतो. नैनितालला एके ठिकाणी मला शेजारची व्यक्ती मोबाईलवर मिपा वाचताना दिसली. मी उत्सुकतेने चौकशी केली ती व्यक्ती मिपासदस्य नव्ह्ती, कुठलातरी विषय शोधत असताना तीला मिपावर तो विषय सापडला होता. मी लिहिलेला हा लेख त्यांना वाचायला दिला. ती व्यक्ती अर्थ सल्लागार , व काही छोटे मोठे व्यवसाय करत होती. पुढील भागाच्या उत्सुकतेने तीने मला विचारले मीही थोडे कच्चे मुद्दे सांगितले (तांत्रिक). तीला ते बरेचसे पटलेही व तीने चक्क आर्थिक मोबदल्याच्या(फार नव्हते) बदल्यात लिखाणाचे हक्क मागितले. मी नकार दिला. परंतू माझा हा प्रतिसाद वाचल्यावर तीने माझ्याशी संपर्क साधला व एक नवीन ऑफर (व्यावसायीक) दिली जी मी लगेच स्विकारली व त्यांच्याबरोबर कायदेशीरबाबी पुर्ण केल्या. आता मला ह्याविषयार लिहिता येणार नव्हते, म्हणून मी पुढील भागही टाकले नाहीत. हा प्रतिसाद देण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून त्यांच्याशी चर्चा केली. मी आतापर्यंत मिपावर लिहिलेल्या लेखांचा संदर्भ देण्यास कोणतीही अडचण येणार नाही ह्याची खात्री केली. ह्या विषयावर आता ह्यापुढे अधिक स्पष्टीकरण करण्यास मी असमर्थ आहे. मिपामुळे मला ही व्यावसायीक संधी मिळाली.असाच एक फायदा मला मिपावरील स्पर्धेतील ह्या फोटोमुळे(गुगलची मेहरबानी) झाला होता. गम्मत म्हणजे मी ड्रोनने काढलेला हा पहीलाच फोटो होता व त्यावेळी मी लेन्सवरील प्लॅस्टिकचे आवरण काढायचे विसरलो होतो, नाहीतर हा फोटो अजुन स्पष्ट आला असता. एका आंतरराष्ट्रिय पर्यटन मासिकाने ह्या फोटोबरोबर माझे इतरही फोटो स्विकारले होते. ह्यासाठी मी मिपाचा ॠणी आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

गोडसे बुवा तुम्ही कुणाचा द्वेष करायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मोदींचा १०० % कशाला २०० % द्वेष करा हो. म्हणून स्विस बँकेतील पैसा देशाचा नाहीच असे धडधडीत खोटे विधान कसे करू शकता? आणि वर त्याचे समर्थन सुद्धा? इतकी पातळी खाली आणायची? मला त्या डांगे अण्णांच्या २० लाखाच्या ट्रकची आठवण आली अरेरे

In reply to by सुबोध खरे

तुम्ही मोदींचा १०० % कशाला २०० % द्वेष करा हो. नाही समप्रमाणातच. आणि वर त्याचे समर्थन सुद्धा? इतकी पातळी खाली आणायची? ठिक आहे तसं समजा. मी माझं काम केलं, त्यावर विश्वास ठेवा अगर नका ठेवू आग्रह नाही. परंतू तुमचं काय? खोटी कहाणी रचून फेकाफेक करायची. तुमच्या'शॄंगापत्ती' लेखावर मी अशी शंका उपस्थीत केली होती. त्यावर तुम्ही उत्तर देण्याऐवजी असा फटकळ प्रतिसाद दिला होता. स्वतःकरता वेगळा न्याय. दुसरा खुलासा करतो तर त्याची खिल्ली उडवता? त्याच धाग्यावर तुम्हाला मी हा प्रश्न विचारला होता , ज्यातुन चुकीचा संदेश जात होता,तरीही त्याचे उत्तर देणे तुम्ही टाळले होते. नशीब तो धागा नंतर वाचनमात्र झाला. 'शॄंगापत्ती'नंतर तुम्हाला आलेले नैराश्य लपविण्यासाठी तुम्ही ट्रकच्या मागे लपत आहात. हरकत नाही. नाहीतरी तुम्ही अडचणीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे नेहमीच टाळत असतात. मिळत असणारा आदर कसा गमवावा हे तुमच्याकडूनच शिकावे.

In reply to by मार्मिक गोडसे

हायला तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय बोललं हे लक्षात ठेवता ?आणी ते उकरून काढता धन्य आहे ! इतकी हतबलता (DESPARATION) कामाची नाही. माझ्या बऱ्याच धाग्यांवर बऱ्याच लोकांनी धुळवड खेळली आहे. मी तिकडे लक्ष ना देता पुढे जातो. जुनी ओझी घेऊन स्वतःला त्रास करून घेण्यात काय हशील आहे? मला नैराश्य वगैरे काहीही आलेलं नाही. उगाच गैरसमज नको. लोकांचे प्रश्न डॉक्टर जर स्वतःला चिकटवून घ्यायला लागला तर त्याला सुखाने जगणे अशक्य होईल. असो दुसऱ्या धाग्यावरच्या प्रश्नांची उत्तरे मी इथे देत नाही. ट्रक ड्रायव्हरला मालक २० लाख रुपये रोख देऊन ठेवतो हे डांगे अण्णांचे उदाहरण स्विस बँकेत भारतिय राजकारण्यांचे पैसे नाहीतच हे म्हणण्याइतकेच धडधडीत असत्य आहे म्हणून दिले आहे मी माझं काम केलं, त्यावर विश्वास ठेवा अगर नका ठेवू बाकी अजूनही स्विस बँकेतील पैसे भारतीय जनतेचे नाहीतच हे धडधडीत असत्य तुम्हाला अजूनही ठासून म्हणायचं असेल तर मग काय बोलणार? ..... .. ... भद्रम ते भवतु

In reply to by सुबोध खरे

तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय बोललं हे लक्षात ठेवता ?आणी ते उकरून काढता धन्य आहे ! कोण किती लाख ट्रक ड्रायव्हरला देतो हे लक्षात ठेवनारे तुम्हीच ना? कशाला लक्षात ठेवता हो? दुसऱ्या धाग्यावरच्या प्रश्नांची उत्तरे मी इथे देत नाही मग दुसऱ्याचे ट्रक इथे कशाला आणता? तुम्ही तेथे उत्तर देऊ शकले नाही, इकडे द्यावं अशी अपेक्षाही नाही. आणि तुम्ही ते देऊही शकणार नाही,कारण ते गृहितकच चुकीचे होते. पळपुटेपणा कळस झाला.

In reply to by सुबोध खरे

गोडसे, सुप्रीम कोर्टाने फटकारून सुद्धा, हे लोक, काळा पैसा खातेदारांची नावे जाहीर का करत नाही ? यांना नुस्ता वाद घडवायचा असतो बहुदा .... खातेदारांची नावे यांच्याकडे, जाहीर करत नाही हे, उलट तपासणी तुम्ही का देताय ? Black money list with 627 names given to Supreme Court INDIATODAY.INNEW DELHI | WEDNESDAY, OCTOBER 29, 2014 The Supreme Court also directed the government to share the list with the Enforcement Directorate and the CBI. The case will be next heard on December 3 after the SIT submits its status report by November 30.

In reply to by पगला गजोधर

प ग हे पैसे आपले ( राष्ट्राचे) नाहीतच असा दावा गोडसे करत आहेत त्याला तुम्ही फाटे फोडायचा प्रयत्न का करत आहात?

In reply to by सुबोध खरे

माझ्या अल्पमती प्रमाणे, त्यांनी "मत" (Opinion ) प्रदर्शित केलेल आहे, "दावा" नाही. रुग्णालयातील डॉक्टरसुद्धा अत्याधुनिक तपासणी करून, आपलं "मत / ओपिनियन " देतात, म्हणून त्यांच्या सेवेला प्रॅक्टिस म्हणत असावेत. (माझ्या अल्पमती प्रमाणे), डॉक्टरसुद्धा कधीही दावा करत नाही तर मत व्यक्त करतात.

In reply to by पगला गजोधर

दावा मत किंवा ओपिनियन म्हणा ( शब्दच्छल). मी ( तुम्ही डॉक्टरचे उदाहरण दिले म्हणून )एखाद्या व्यक्तीला कर्करोग आहे असे मत,दावा किंवा ओपिनियन दिले तर ते तसे का आहे याचा काही तरी पुरावा देणे आवश्यक आहे अन्यथा कोणत्याही रुग्णाला तोंडाकडे पाहून तुला कर्करोग आहे सांगणे हे किती गंभीर ठरू शकते. उगाच शब्दच्छल करून मुद्दा भरकटवण्याचा आपला प्रयत्न केविलवाणा आहे.

In reply to by सुबोध खरे

अच्छा म्हणजे भ्रस्ताचाराचे पैसे खाल्ले व ते स्विस बँकेत लपवले, हे म्हणायला पुरावे लागत नाही .... बाकी .... असोच ....

In reply to by सुबोध खरे

अन्यथा कोणत्याही रुग्णाला तोंडाकडे पाहून तुला कर्करोग आहे सांगणे हे किती गंभीर ठरू शकते.
हे जसं चूक आहे तसंच, जर कुठल्या तोतयाने, डॉक्टर असल्याचे भासवून , कोणा एखाद्याला, "तुला ६० वर्ष जुना कँसर आहे, व तो मीच एकटा, माझ्या योग्यसामर्थ्यावर बारा करू शकतो", असं म्हणून, त्याला लुबाडलं असेल तर तेही चूकच. बाकी शब्दच्छल बुमरँग होताना काहींना वाईट वाटते...

In reply to by पगला गजोधर

http://www.thehindu.com/news/national/other-states/70k-crore-in-black-m… काय आहे गजोधर भैया या वरच्या दुव्यात सर्वोच्च न्यायालयाने काळे पैसे देशाबाहेर दडवले आहेत असे स्पष्ट म्हटले आहे तेंव्हा ते पैसे देशाचे नाहीतच हे म्हणणे साफ चूक आहे.आणि हे हिमनगाचे टोक आहे. आणि हो महत्त्वाचे हे श्री मोदी म्हणत नाहीयेत तर सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेली माजी न्यायाधीशांची समिती म्हणते आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की ते खोटे आहे. बुमरँग म्हणायला माझे कोणते विधान असत्य आहे ते दाखवा मी केवळ गोडसेंचे विधान असत्य आहे असे म्हणालो. त्यासाठी मोदींचे (तथाकथित) असत्य विधान मला दाखवण्याची गरज काय? बाकी मोदी काय म्हणतात ते खरं कि खोटं ते मतदार ठरवतीलच.

In reply to by पगला गजोधर

सुप्रीम कोर्टाने फटकारून सुद्धा, हे लोक, काळा पैसा खातेदारांची नावे जाहीर का करत नाही ?
कोर्टानं ज्यांना नावं द्या म्हटलं आहे त्यांना दिली आहेत. आणि जाहिर का नाही केली याचं कारण जेटलींनी सांगीतलं आहे.

In reply to by arunjoshi123

http://www.thehindu.com/news/national/centre-submits-list-of-names-of-i… नावे कोर्टाला दिली आहेत ती जाहीर करायची कि नाही ते तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकता. हे बेलाशक आरोप करणे केजरीवालांसारखे व्हायला लागले आहे

In reply to by पगला गजोधर

परत फाटे फोडणारे विधान आपला दुवा ऑक्टोबर २०१४ चा आहे आणि मी दिलेला दुवा मे २०१६ चा आहे जेंव्हा सरकारने नावे सर्वोच्च न्यायालयाला दिली आहेत. ती जाहीर करायची कि नाही हा न्यायालयाचा स्वतःच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. केवळ दिशाभूल करण्यासाठी काहीतरी जुने उकरून काढण्याचा आपला हा प्रयत्न खालच्या पातळीचा आहे एवढेच नमूद करतो.

In reply to by गामा पैलवान

संघमित्रा, व्वा, काय सुसंस्कृत भाषा आहे. हीच भाषा नोटबंदीवाल्या काकांना पण वापरणार का? निदान प्रतिसादाच्या शेवटी 'आपला नम्र' असं तरी लिहू नका.