विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो
माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे.
आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे
तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा.
आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?)
एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी.
तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला .
हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे.
आदित्य---
वाचने
50484
वाचनखूण
प्रतिक्रिया
148
लेख आवडला. थोडा एडिट करून
In reply to लेख आवडला. थोडा एडिट करून by अत्रे
पाठवला होता ...नाकारला पण
"अहो आहत कुठे ???
ग्रंथ हे प्रमाण नसतील.
In reply to ग्रंथ हे प्रमाण नसतील. by गवि
नासा
In reply to ग्रंथ हे प्रमाण नसतील. by गवि
हे सगळ सगळां बहुराष्ट्रीय
उत्तम लेख. मनोरंजन म्हणून
आवडला.
आवडला.
मस्त लेख !
दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे
In reply to दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे by गॅरी ट्रुमन
दाभोळकरांच्या "आत्म्यास"
शिवरायांना मध्ये आणल्याशिवाय
In reply to शिवरायांना मध्ये आणल्याशिवाय by Ram ram
तुम्ही लेख आणि त्याचा
अगस्ति ऋषि बॅटरी तन्त्रज्ञानाचे जनक
बघदाद बॅटरी
Ancient Indian inventions- by Karolina Goswami
चर्चा थांबवा..काही करता येइल का ते पहा
असे काही प्रयोग केले पाहिजेत
...
In reply to ... by धडपड्या
वेगळा विषय
साधे शेतातले नगराचे फाळ
भारतातल्या काही मंदिरातल्या
मिपावर योगायोगाने दोन विरुद्ध
याच/अशाच शिर्षकाचा मी लिहिलेला लेख.
काही शक्यता
In reply to काही शक्यता by ट्रेड मार्क
दिल्लीतील ,
http://home.iitk.ac.in/~bala
In reply to http://home.iitk.ac.in/~bala by सुबोध खरे
फक्त धातू आणि रसायनशात्रातच का?
In reply to फक्त धातू आणि रसायनशात्रातच का? by ट्रेड मार्क
त्यापैकी अजून काय काय आधुनिक
In reply to त्यापैकी अजून काय काय आधुनिक by अत्रे
ही लिंक वाचा. यात कालौघात
In reply to त्यापैकी अजून काय काय आधुनिक by अत्रे
माझं म्हणणं उलटं आहे
In reply to माझं म्हणणं उलटं आहे by ट्रेड मार्क
खूप ब्रॉड प्रश्न आहे त्याचे
In reply to खूप ब्रॉड प्रश्न आहे त्याचे by अत्रे
अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे
In reply to अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे by ट्रेड मार्क
तंत्रज्ञानात अनेकदा अपघाताने
In reply to तंत्रज्ञानात अनेकदा अपघाताने by नितिन थत्ते
बरोबर
In reply to बरोबर by ट्रेड मार्क
अख्ख्या भारतात एकच खांब
In reply to अख्ख्या भारतात एकच खांब by अत्रुप्त आत्मा
बाकीच्या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतंय
एक शंका : त्या न गंजणार्या
In reply to एक शंका : त्या न गंजणार्या by मराठी_माणूस
तेच तर
In reply to तेच तर by राही
स्तंभबांधणी आजच्या काळात
In reply to स्तंभबांधणी आजच्या काळात by मराठी_माणूस
भक्कमपणा
In reply to भक्कमपणा by अत्रे
गंजुन खराब होणार्या वस्तु
In reply to गंजुन खराब होणार्या वस्तु by मराठी_माणूस
होय असे दिसते.
In reply to होय असे दिसते. by अत्रे
पण त्यातही ती मायक्रोफिल्म
In reply to पण त्यातही ती मायक्रोफिल्म by arunjoshi123
नो आयडिया. त्याचा बेस किती
In reply to नो आयडिया. त्याचा बेस किती by अत्रे
लोहस्तंभाचा बेस
In reply to लोहस्तंभाचा बेस by ट्रेड मार्क
आणि का?
In reply to लोहस्तंभाचा बेस by ट्रेड मार्क
सोप्पय ......
In reply to सोप्पय ...... by पगला गजोधर
काहीतरी पुराणातल्या भाकडकथा
In reply to लोहस्तंभाचा बेस by ट्रेड मार्क
ध्वजस्तंभ
In reply to तेच तर by राही
स्टेनलेस स्टील नावाचा
In reply to स्टेनलेस स्टील नावाचा by arunjoshi123
शंकेचे उत्तर
In reply to शंकेचे उत्तर by राही
ओके. स्टेनलेस स्टील हा शब्द
ब्रह्मविद्या
त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना
In reply to त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना by arunjoshi123
ज्ञानेश्वर हे उत्तम कवी
हे जे वेदकाली विमान ,अंतराळ
आता यावरून प्राचीन भारतात
In reply to आता यावरून प्राचीन भारतात by arunjoshi123
मी गेली तीस वर्षे पेपर वाचतो
In reply to मी गेली तीस वर्षे पेपर वाचतो by अत्रे
याला कारणीभूत वैज्ञानिक नाहीत
In reply to याला कारणीभूत वैज्ञानिक नाहीत by arunjoshi123
Bad science reporting या
मागे एक सद्गृहस्थ असेच
टेलीस्कोपचा शोध जर साधारणपणे
In reply to टेलीस्कोपचा शोध जर साधारणपणे by मराठी_माणूस
रोचक प्रश्न!
In reply to रोचक प्रश्न! by अत्रे
शून्यातून सुरु करून आपण पाच
In reply to शून्यातून सुरु करून आपण पाच by arunjoshi123
त्या काळातल्या लोकांनी
In reply to त्या काळातल्या लोकांनी by अत्रे
१०० - २०० हजार वर्षांपूर्वी
In reply to १०० - २०० हजार वर्षांपूर्वी by arunjoshi123
पूर्वीच्या माणसाला फार मूर्ख
In reply to पूर्वीच्या माणसाला फार मूर्ख by अत्रे
बेनिफिट ऑफ डाऊट नको, ते
In reply to बेनिफिट ऑफ डाऊट नको, ते by arunjoshi123
१. मृत आणि जीवंत देहांशी लढणे
In reply to १. मृत आणि जीवंत देहांशी लढणे by थॉर माणूस
प्रश्न असा उरतो, जो अत्रेंना
In reply to बेनिफिट ऑफ डाऊट नको, ते by arunjoshi123
विज्ञान म्हणजे संपूर्ण
In reply to विज्ञान म्हणजे संपूर्ण by अत्रे
वाटचाल
In reply to वाटचाल by arunjoshi123
"आम्ही म्हटलेलं फायनल नाही"
In reply to "आम्ही म्हटलेलं फायनल नाही" by अत्रे
काही गोष्टी चूक आहेत हे
In reply to काही गोष्टी चूक आहेत हे by arunjoshi123
चुकीच्या विधानाचे एक उदाहरण
In reply to चुकीच्या विधानाचे एक उदाहरण by अत्रे
पृथ्वी चेंडूच्या आकाराची नसून
In reply to पृथ्वी चेंडूच्या आकाराची नसून by arunjoshi123
खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा
In reply to खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा by अत्रे
बरोबर लिंक
In reply to खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा by अत्रे
सहमत.
In reply to सहमत. by arunjoshi123
तुम्ही सहमत झाल्यामुळे
In reply to तुम्ही सहमत झाल्यामुळे by अत्रे
आपला मूळ विषय इतिहासातील,
In reply to पृथ्वी चेंडूच्या आकाराची नसून by arunjoshi123
फक्त वाद म्हणून मुद्दा
In reply to फक्त वाद म्हणून मुद्दा by आदित्य कोरडे
मला काहीच वाटत नाही.
In reply to त्या काळातल्या लोकांनी by अत्रे
समृद्धी आणि संकटकाळसुद्धा.
एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा
In reply to एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा by arunjoshi123
आता जुन्या काळात "युरेनियमला
In reply to आता जुन्या काळात "युरेनियमला by पगला गजोधर
जुन्या काळात पण तसंच असेल
In reply to जुन्या काळात पण तसंच असेल by arunjoshi123
तुमच्यासारख्यान्ची जी