✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लिखाण

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Mon, 08/21/2017 - 17:09  ·  लेख
लेख
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात. तरीही याचं लिखाण संपायचं चिन्ह दिसत नाही. आता संपेल, मग संपेल असं करता करता लिखाण लांबतच रहातं. मग पुढच्या रांगेतली पुरुष मंडळी बळेच लिखाण छान आहे असा अभिप्राय देतात आणि पॉपकॉर्न घेऊन बसतात. इकडे लेखकाला 'चेव' चढलेला असतो कारण मान्यवर संपादक मंडळी डोके बडवून घेऊ शकत नसतात. त्यांना ते लिखाण वाचणे (?) भाग असतं. अखेर मिपा सभागृहातील निम्मी अधिक मंडळी यानिमित्ताने (जायचे असो वा नसो ) शांत होण्यासाठी क्रोधागारगृहाचा दौरा करून येतात. तरीही लेखक जोशातच असतो. जगाच्या अंतापर्यंत हे असेच चालू रहाणार असं फील येत असताना केव्हातरी ते रटाळ लिखाण संपलं असं वाटतं. लोकं जोरदार टाळ्या वाजवतात. या टाळ्या लिखाण थोड्या वेळासाठी का होईना संपले म्हणून असतात. पण लेखकाला वाटते आपले मौलिक विचार वाचून वाचक प्रभावित झालेले आहेत. तो पुनः "एक लिहायचं राहिलंच" असं म्हणून तो काहीतरी लेखन जिल्बी टाकतो. हेतू हा की पुनः पुढच्यावेळी कुणाचीतरी खेचायची संधी मिळावी. "हा आता परत कितीवेळ खाणार" या विचाराने लोकांच्या पोटात गोळा येतो. याला नक्की कोणी आयडी मंजूर केला होता याचा शोध सुरु होतो. सगळे संपादक पदाधिकारी ' तो मी नव्हेच' हा पवित्रा घेतात. इकडे 'जगावर सूड उगवणारी' चार दोन माणसे प्रत्येक ठिकाणी असतातच. ती 'त्या' लेखका(?)ला "भाषण छान झालं" असं सांगून इतरांच्या जखमेवर मीठ चोळतात. अथक परिश्रम करून आणि पैसा खर्च करूनही पडद्यामागेच रहाणाऱ्या आणि प्रयत्नपूर्वक देखणा कार्यक्रम करणाऱ्या मालकांच्या मेहनतीवर उपस्थितांच्या चेहऱ्यावरच्या 'कार्यक्रम रटाळ झाला' या अदृश्य भावनेने पाणी फिरते याच्याशी 'त्या' लिखाण (!) करणारास काहीच देणेघेणे नसते. 'सकसलेखनविषय सहस्त्रेषु' म्हणजे काय हे या अर्धवटरावांच्या गावीही नसते. लिखाण करताना केव्हा थांबावे हे ज्याला कळते तोच खरा लेखक असतो! - संदेश विनास्वाक्षरी , एेच्छिक.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
मुक्तक
समाज
औषधी पाककृती
कालवण
औषधोपचार
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
प्रश्नोत्तरे
वाद
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
7694 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

हा हा हा. मस्त

ज्योति अळवणी
Mon, 08/21/2017 - 17:11 नवीन
हा हा हा. मस्त
  • Log in or register to post comments

ठ्ठो..... अफाट.

पुंबा
Mon, 08/21/2017 - 17:29 नवीन
ठ्ठो..... अफाट.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Mon, 08/21/2017 - 17:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments

खी खी खी! :-)

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/21/2017 - 18:05 नवीन
खी खी खी! :-)
  • Log in or register to post comments

मापं काढलीत की एकदम! :-D :-D

एस
Mon, 08/21/2017 - 19:01 नवीन
मापं काढलीत की एकदम! :-D :-D :-D
  • Log in or register to post comments

=))

प्रचेतस
Mon, 08/21/2017 - 19:04 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लय हाणलं कि मा.प. ;-). तरी काल वॉर्निंग मिळाली होती.

दुर्गविहारी
Mon, 08/21/2017 - 19:10 नवीन
लय हाणलं कि मा.प. ;-). तरी काल वॉर्निंग मिळाली होती.
  • Log in or register to post comments

मूळ धागा आणि त्याचे ईडंबान...

विजुभाऊ
Mon, 08/21/2017 - 20:27 नवीन
मूळ धागा आणि त्याचे ईडंबान.... दोन्ही लैच पकावू ......
  • Log in or register to post comments

ते तेवढं कॉपीराईट आणि

पिलीयन रायडर
Mon, 08/21/2017 - 20:47 नवीन
ते तेवढं कॉपीराईट आणि ट्रेडमार्कचं जमवा की! पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

पण अर्थात लेखकु वाचायला

अभिजीत अवलिया
Mon, 08/21/2017 - 21:06 नवीन
पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
शक्य आहे. ह्या धाग्याची लिंक 'त्या' धाग्यात प्रतिक्रिया म्हणून टाकायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

डन. :))

मोदक
Mon, 08/21/2017 - 21:28 नवीन
डन. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

जुने लोक्स

धर्मराजमुटके
Mon, 08/21/2017 - 20:56 नवीन
जुने आणि जाणिते मिपाकर पण आजकाल तेच तेच चर्‍हाट वळून राहिलेत त्यामुळे नवीन लेखकुंना पाठींबा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यातल्या त्यात जमल्यास शालजोडीतले हाणावे असा मम मनी विचार येतो पण प्रत्यक्ष कृती करणे टाळावे लागते. न जाणो आपलाच पत्ता कट झाला तर ! कोणत्याही लेखापुढे शुन्य अभिप्राय असु नये असे व्रत म्या धरीले आहे आजकाल :)
  • Log in or register to post comments

कॉपी करायला सुद्धा अक्कल

मंगेश पंचाक्षरी
Mon, 08/21/2017 - 22:29 नवीन
कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते, काही लोकांकडे ती ही नसते त्यामुळे साधं एडिट करताना भाषण शब्द राहून गेलाय एका ठिकाणी. अजून आमचे शेकडो लेख येणे आहेत ज्यावर असे काही गरीब पोट भरू शकतील. कॉपी करून का होईना, पास होत रहा.
  • Log in or register to post comments

हा लेख दैनिक दुष्काळच्या

सतिश गावडे
Tue, 08/22/2017 - 11:21 नवीन
हा लेख दैनिक दुष्काळच्या कोणत्या आवृत्तीत आणि किती तारखेला प्रसिद्ध झाला आहे?
  • Log in or register to post comments

दैनिक दुष्काळ

माम्लेदारचा पन्खा
Tue, 08/22/2017 - 11:26 नवीन
विडंबनावृत्ती दि. १२.१२.२०१२ ©®™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा