राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे.
मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत.
पुढच्या फेर्यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.
वर्गीकरण
वाचने
36427
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
जदयु केंद्रातल्या
अजून कशातच काही नाही असे
In reply to जदयु केंद्रातल्या by अनुप ढेरे
जदयुमध्ये मतभेद
दिल्ली आणि बिहारमधील २०१५ मधील पराभव
अमित शाह
या घटनेच्या निमित्ताने
मोदी-शहांचा डाव
In reply to या घटनेच्या निमित्ताने by श्रीगुरुजी
- बिहारमध्ये नितीश स्वबळावर
In reply to मोदी-शहांचा डाव by गॅरी ट्रुमन
मला वाटते की भाजपने हे पाऊल उचलून चांगले केले. हे करायला जितका उशीर लागला असता तितके भाजप आणि नितीश या दोघांनाही जड गेले असते.हा निर्णय चांगला होता का वाईट ते २०१९ पर्यंत समजेलच.२०१९ च्या लोकसभा निवडणुका
In reply to - बिहारमध्ये नितीश स्वबळावर by श्रीगुरुजी
पण या घटनेतून विरोधी
In reply to २०१९ च्या लोकसभा निवडणुका by गॅरी ट्रुमन
पण या घटनेतून विरोधी पक्षांच्या आघाडीचे स्थैर्य आणि विश्वासार्हता वादात सापडली आहे त्याचबरोबर 'मोदींशिवाय पर्याय नाही' हा संदेशही मतदारांपर्यंत गेला आहे याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? प्रश्न नुसत्या बिहारमधील राज्य सरकारचा नाही तर व्यापक आहे. प्रश्न २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा आहे.विरोधी आघाडीला तसेही स्थैर्य आणि विश्वासार्हता नव्हतीच. निष्प्रभ विरोधी पक्षांमुळे व नाकर्त्या विरोधी नेत्यांमुळे 'मोदींशिवाय पर्याय नाही' हा संदेश यापूर्वीच गेला आहे. सध्याच्या विरोधी नेत्यांपैकी एकही नेता मोदींना आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाही. ज्याप्रमाणे भाजपने राष्ट्रीय पातळीवर अडवाणींसारख्या जुन्या नेत्याला पूर्णपणे बाजूला करून मोदी हा नवा चेहरा समोर आणला व विजय मिळविला, त्याचप्रमाणे भाजपला नमविण्यासाठी विरोधी पक्षांना विशेषतः काँगेसला राहुलऐवजी प्रियांकाला आणावेच लागेल. अन्यथा मोदींचा विजय निश्चित आहे. जिथे विरोधी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे ती राज्ये पाहू आणि कालच्या निर्णयामुळे त्यात किती फरक पडला असता ते पाहू. (१) महाराष्ट्र - पुढील निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची युती होणार हे नक्की आहे. नितीश लालूबरोबर राहिले असते किंवा आता भाजपबरोबर आल्याने या संभाव्य युतीवर अजिबात परीणाम होणार नाही. शिवसेना व भाजप युती विधानसभेत होणार नाही हे पण नक्की आहे. लोकसभेला युती होण्याची १००% खात्री नाही. परंतु कालच्या घडामोडींमुळे शिवसेनेच्या निर्णयात तसूभरही बदल होणार नाही. आपला महाराष्ट्रातील एकंदरीत जनाधार ओळ्खून सेनेने व्यावहारीक भूमिका घेतली तरच ही उती शक्य होईल. अन्यथा नाही. म्हणजे कालच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. (२) बंगाल - २०१९ मध्ये काँग्रेस तृणमूल किंवा डाव्या पक्षांबरोबर युती करणार हे नक्की आहे. तॄणमूल व डावे यांच्यात अजिबात युती होणार नाही. कालच्या घडामोडींमुळे बंगालमधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. (३) उत्तर प्रदेश - २०१९ मध्ये काँग्रेस सप किंवा बसपबरोबर युती करणार हे नक्की. परंतु काँग्रेस + बसप + सप अशी युती होणे अत्यंत अवघड आहे. समजा अशी युती करायचे ठरविले तर ८० पैकी किमान १० जागा काँग्रेसला द्यावा लागतील. उर्वरीत ७० पैकी प्रत्येकी ३५ जागा सप व बसप मान्य करतील याची शक्यता फार कमी आहे. २०१२, २०१४ व २०१७ मध्ये सपने बसपपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आपल्या बरोबरीने बसपला जागा देण्यास सप अजिबात तयार होणार नाही. म्हणजेच उर्वरीत ७० जागांपैकी सप किमान ४० जागांचा आग्रह धरेल आणि बसपसाठी जास्तीत जास्त ३० जागा सोडेल. मायावती ८० पैकी फक्त ३० जागा लढण्यास अजिबात तयार होणार नाही. जर अजितसिंगसुद्धा यांच्या आघाडीत सामील झाले तर त्यांनाही ४-५ जागा द्यावा लागतील व त्या जागा सप आणि बसपच्या कोट्यातून जातील. एकंदरीत असे जागावाटप होणे अत्यंत अवघड आहे. नितीशकुमार राजदबरोबर राहिले असते किंवा आता ते भाजपबरोबर आहेत या परिस्थितीचा उ. प्र. मधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर अजिबात परीणाम होणार नाही. (४) तामिळनाडू - देशात काय घडते यावर तामिळनाडूचे राजकारण चालत नाही. कालच्या घडामोडींमुळे तामिळनाडूमधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. भाजपला तसेही तिथे किरकोळ स्थान आहे. तिथे कोणाचीही कोणाही बरोबर आघाडी झाली तरी भाजपला फरक पडणार नाही. (५) बिहार - कालच्या घडामोडींमुळे जो फरक पडणार आहे तो फक्त याच राज्यात पडणार आहे. संजदबरोबर केलेल्या नवीन आघाडीमुळे रालोआचा व संजदचा फायदा होईल, पण भाजपचे नुकसान होईल. समजा काँग्रेस + राजद + संजद ही युती २०१९ मध्ये टिकली असती तरीसुद्धा भाजप व रालोआला नुकसान झालेच असते. परंतु कालच्या घडामोडी झाल्या नसत्या तरी काँग्रेस + राजद + संजद ही युती २०१९ मध्ये टिकली असती याची खात्री नाही. तसेच कालपासून संजद व भाजप एकत्र आले असले तरी नितीशकुमारांचा विश्वासघातकी इतिहास बघता यांची युती २०१९ मध्ये टिकेल किंवा निवडणुकीनंतर संजद भाजपबरोबर राहीलच याची खात्री नाही. एकंदरीत बिहार वगळता इतरत्र कालच्या घडामोडींमुळे फरक पडणार नाही असे दिसते.विरोधकांच्या युतीतील पाचर
In reply to पण या घटनेतून विरोधी by श्रीगुरुजी
याचा एक फायदा असाही होऊ शकतो
In reply to - बिहारमध्ये नितीश स्वबळावर by श्रीगुरुजी
+१
In reply to मोदी-शहांचा डाव by गॅरी ट्रुमन
केवळ नितीशकुमारांची नाही तर
In reply to या घटनेच्या निमित्ताने by श्रीगुरुजी
गुर्जी
In reply to या घटनेच्या निमित्ताने by श्रीगुरुजी
नाही. महाराष्ट्रात शिवसेनेची
In reply to गुर्जी by अभिदेश
नाही. महाराष्ट्रात शिवसेनेची
In reply to गुर्जी by अभिदेश
कोकणात भाजपचे
In reply to नाही. महाराष्ट्रात शिवसेनेची by श्रीगुरुजी
भाजपशी युती होण्यापूर्वी
In reply to कोकणात भाजपचे by अभिदेश
मग ह्याच
In reply to भाजपशी युती होण्यापूर्वी by श्रीगुरुजी
युतीपूर्वी १९८० च्या विधानसभा
In reply to मग ह्याच by अभिदेश
तुम्हाला हे
In reply to युतीपूर्वी १९८० च्या विधानसभा by श्रीगुरुजी
१९८५ पूर्वी शिवसेनेने
In reply to तुम्हाला हे by अभिदेश
भाजप
In reply to १९८५ पूर्वी शिवसेनेने by श्रीगुरुजी
जसा भाजप जनसंघ या रूपात अनेक
In reply to भाजप by अभिदेश
गुर्जी
In reply to जसा भाजप जनसंघ या रूपात अनेक by श्रीगुरुजी
नितीश काय करणार हे मला तीन-चार महिने आधीच माहिती होतं!
नॉस्ट्रडेमसची पण मान खाली
In reply to नितीश काय करणार हे मला तीन-चार महिने आधीच माहिती होतं! by धर्मराजमुटके
कमाल आहे
In reply to नितीश काय करणार हे मला तीन-चार महिने आधीच माहिती होतं! by धर्मराजमुटके
राहुल गांधी
In reply to नितीश काय करणार हे मला तीन-चार महिने आधीच माहिती होतं! by धर्मराजमुटके
हा
In reply to राहुल गांधी by अमितदादा
गॅरी ट्रुमन