Skip to main content

ताज्या घडामोडी: भाग ७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 20/07/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे. मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत. पुढच्या फेर्‍यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.

वाचने 36427
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

http://indiatoday.intoday.in/story/nia-hurriyat-india-today-expose-paki… काश्मिरमध्ये अशांतता माजविण्यासाठी पाकिस्तानकडून हवाला मार्गाने पैसे घेतल्याच्या आरोपावरून हुरियतच्या ७ नेत्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. या ७ जणांमध्ये गिलानीच्या जावयाचा देखील समावेश आहे. पुढील काळात मिरवैझ, शब्बीर शाह, यासिन मलिक इ. पकडले जातील असे वाटते. केंद्र सरकार व लष्कर हळूहळू पण निश्चितपणे काश्मिरमधील देशद्रोह्यांच्या भोवती फास आवळत आहे. २०१७ मधील पहिल्या ६ महिन्यातच लष्कराने ९२ अतिरेकी/घुसखोरांना गोळ्या घालून मारले आहे. मागील २-३ वर्षांपेक्षा हा आकडा जास्त आहे. कोणाशीही चर्चा नाही व गोळीला गोळीने उत्तर देण्यासाठी लष्कराला मुक्तहस्त हे नवीन धोरण निर्धाराने राबविले जात आहे. जुलै २०१६ मध्ये बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर जवळपास ४ महिने पोलिस व लष्करावर दगडफेक होत होती. त्यात अनेक जवान व पोलिस जखमी झाले. परंतु लष्कराने अतिशय कठोरपणे परिस्थिती हाताळून व प्रसंगी पॅलेट बंदुकीचा वापर करून निदर्शकांवर जोरदार कारवाई केली. यापुढे लष्कराची भूमिका अजून कठोर होत जाणार असा अंदाज आहे.

गेल्या महिन्यात ८ जूनला लष्कर प्रमुख 'भारतीय लष्कर एकाचवेळी २.५ आघाड्यांवर लढू शकते' असे म्हणाले होते. २.५ म्हणजे पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत काश्मीर वगैरे. काल बातमी आलीय की कॅगने दिलेल्या अहवालात (एप्रिल २०१३ ते सप्टेंबर २०१६) ह्या कालावधीचा विचार करता संरक्षण दलांकडे दारूगोळ्याचा प्रचंड तुटवडा आहे. कारगिल मधील युद्धानंतर संरक्षण दलांनी ४० दिवसांच्या घनघोर युद्धासाठी पुरेल इतका दारुगोळा साठा करण्याचे ठरवले होते. त्यातही किमान २० दिवसांचा हवाच. बातमीनुसार १५२ पैकी ४०% प्रकारचा दारुगोळा १० दिवस पुरेल इतकाही नाही. तब्बल ८०% दारुगोळा जवळपास २० दिवस पुरेल इतकाही नाही ८३% तोफगोळे हे फ्युज उपलब्ध नसल्याने (जोपर्यंत फ्युज उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत) युद्धात वापरता येणार नाहीत. जवानांकडे सध्या असणाऱ्या इन्सास रायफली बदलण्यासाठी २०११ साली लष्कराने परदेशातून मल्टि कॅलिबर असौल्ट रायफल खरेदीच्या निविदा काढल्या. अजूनही त्या रायफली मिळालेल्या नाहीत. ही फार धक्कादायक आणि चिंताजनक परिस्थिती आहे. आजच्या तारखेला पण जवळपास हीच स्थिती असेल तर लष्कर प्रमुख कशाच्या आधारावर 'भारतीय लष्कर एकाचवेळी २.५ आघाड्यांवर लढू शकते' असे म्हणाले ते लष्कर प्रमुखच जाणो.

In reply to by अभिजीत अवलिया

CAG हा अहवाल सरकारला गुप्तपणे देऊ शकत होते. चीन युद्धाच्या पावित्र्यात सीमेवर असताना असे अहवाल जाहीर करून आपली कमतरता उघड करणे अयोग्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी सहमत... हे कॅगवाले असंच करतात. गेली ७-८ वर्षे बघतोय. तेव्हा ठिक होतं पण आतासुद्धा तेच करायचं म्हणजे काय, याला काही अर्थ आहे का? बाकी हा खरंतर चीनला गाफिल ठेवण्याचा मास्टरप्लॅन आहे वगैरे येईलच चेपुवर.

In reply to by अभिजीत अवलिया

कॅगने दिलेल्या अहवालात (एप्रिल २०१३ ते सप्टेंबर २०१६) सप्टेंबर २०१६ पर्यंत असलेली हि परिस्थिती आहे. दारुगोळा भारतात ७ दिवसात येऊ शकतो. सरकारने डॉकलाम पठारावर सैन्य पाठ्वण्या अगोदर हा विचार केलेला असेलच. लष्कर प्रमुख २. ५ देशांशी लढाई करण्याची क्षमता आहे हे विधान दर्पोक्ती म्हणून करणार नाहीत. भारतीय लष्कराची तशी परंपरा आणि संस्कृती नाही. शिवाय या सरकारमध्ये दोन लष्करी अधिकारी मंत्री आहेत. जनरल व्ही के सिंह आणि कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड जे असे विधान लष्करप्रमुखांनी केल्यावर त्यांची हजेरी घेण्यास कमी करणार नाहीत. लष्कराला ४०००० कोटी रुपयांचा दारूगोळा आणण्याची परवानगी सरकारने दिली आहे हि बातमी १७ जुलैलाच प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजेच माझ्या कयासाने हा दारुगोळा मार्गस्थ असेल (किंवा पोहोचलाही असेल) http://www.ndtv.com/india-news/army-gets-special-powers-to-buy-ammo-spa…

In reply to by सुबोध खरे

क्षमा करा हि बातमी १३ जुलै ची आहे. म्हणजेच परवानगी याच्या अगोदर कमीत कमी आठवडाभर तरी दिली गेली असणार

In reply to by सुबोध खरे

जनरल व्ही के सिंह आणि कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड जे असे विधान लष्करप्रमुखांनी केल्यावर त्यांची हजेरी घेण्यास कमी करणार नाहीत.
काही पण! कोणत्या अधिकाराने घेऊ शकतात म्हणे हे हजेरी? संरक्षण मंत्री वगैरे ठीक पण हे दोघे कोण लागून गेले असे.

In reply to by सुबोध खरे

जर ७ दिवसात येऊ शकतो तर इतके दिवस का आणला न्हवता? का तहान लागल्यावर विहीर खणायचे बघू असा विचार होता सरकारचा ? सध्याचा जो shortfall आहे तो पूर्ण भरून काढायला २०१९ चा शेवट उजाडेल असे एका दुव्यात वाचले. त्यामुळे हे २. ५ आघाड्यांवर एकाच वेळी लढाई करण्याची क्षमता हे विधान सद्य स्थितीत दर्पोक्तीच असावी असे म्हणायला वाव आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

CAG की रिपोर्ट पर रक्षा मंत्री का जवाब सेना के पास है पर्याप्त गोला-बारूद http://abpnews.abplive.in/india-news/660147armed-forces-sufficiently-eq…

In reply to by प्रसाद_१९८२

संरक्षण मंत्र्याना तसेच सांगावे लागणार. पण किमान माझा कोणत्याही मंत्र्यापेक्षा CAG वर विश्वास आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

बहुसंख्य लोकांना सरकार कसे चालते त्याची फारशी माहिती नाही असे दिसते. लोक सरसकट विधाने करीत आहेत म्हणून म्हणत आहे. कोणताही अहवाल संसदेपुढे ठेवण्यासाठी स्पीकरची परवानगी लागते. अति संवेदनशील कागदपत्रे इतकी सहज उघडी केली जात नाहीत.ती विरोधी पक्ष आणि इतर पक्षांच्या नेत्यांना दाखवली जातात पण संसदेत त्याचे अभिवाचन टाळले जाते. कारण पत्रकार या संस्थेवर किती भरवसा ठेवायचा याचा सर्व राजकारण्यांना चांगला अनुभव असतोच. मुळात हा अहवाल हा २०१३ ते २०१६ मधील आहे.सप्टेंबर २०१६ मध्ये काय परिस्थिती होती आणि आता काय आहे यात भरपूर फरक आहे. तेंव्हा आता प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे हे CAG च्या अहवालात येणारच नाही. CAG चे काम एखाद्या सरकारी कामात त्रुटी काय आणि का आहेत ते संसदेच्या नजरेस आणून देणे आहे आहे. सद्यस्थिती काय आहे ते जाणणे हे नव्हे. हे पोस्ट फॅक्टो ऑडिट असते. ( ज्यांना ऑडिट काय असते ते माहीत आहे त्यांच्यासाठी) डॉकलाममध्ये सैन्य तैनात करण्याच्या अगोदर तेथे जर मर्यादित युद्ध झाले तर आपल्याला काय शस्त्रास्त्रे लागतील किती दारुगोळा लागेल याचा विचार केल्याशिवाय लष्करच काय पण सरकारही सैन्य पाठवणार नाही. बाजीरावाची शेंडी अहमदशाहची अब्दालीला लावण्याचा प्रकार आहे. कोणतेंही सरकार (काँग्रेस असो व भाजप) असेल तरीही ते लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे ऐकल्याशिवाय आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार केल्याशिवाय दुसऱ्या देशात( येथे डॉकलाम पठार हे भूतान मध्ये भारतात नाही आहे हे लक्षात घ्या) सैन्य पाठवणार नाही. उद्या हेच कारण देऊन चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य पाठवले तर काय याचा विचार केल्याशिवाय लष्कर किंवा संरक्षण तज्ज्ञ असे सैन्य पाठवण्याचा सल्लाही देणार नाहीत. यावर मला आणखी काहीच म्हणायचे नाही. ज्याला हवा तसा तो अर्थ काढू शकतो.

In reply to by सुबोध खरे

मुळात हा अहवाल हा २०१३ ते २०१६ मधील आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये काय परिस्थिती होती आणि आता काय आहे यात भरपूर फरक आहे. तेंव्हा आता प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे हे CAG च्या अहवालात येणारच नाही
मान्य आहे. म्हणूनच मी मूळ बातमी देताना आजच्या तारखेला पण जवळपास हीच स्थिती असेल तर लष्कर प्रमुखांचे विधान अतिशयोक्ती ठरेल असे म्हणालो होतो. पण जर सध्याचा shortfall पूर्ण करायला २०१९ च्या अंतापर्यंत वाट बघावी लागणार असेल तर ह्याचा अर्थ सध्याची परिस्थिती पण २०१३ ते २०१६ मधल्या परिस्थितीसारखीच असणार असा होत नाही का ?
डॉकलाममध्ये सैन्य तैनात करण्याच्या अगोदर तेथे जर मर्यादित युद्ध झाले तर आपल्याला काय शस्त्रास्त्रे लागतील किती दारुगोळा लागेल याचा विचार केल्याशिवाय लष्करच काय पण सरकारही सैन्य पाठवणार नाही. बाजीरावाची शेंडी अहमदशाहची अब्दालीला लावण्याचा प्रकार आहे.
दारुगोळा ४० दिवसांच्या घनघोर युद्धासाठी आवश्यक असेल इतका उपलब्ध नाही. त्यामुळे मर्यादित युद्धाची काही काळजी नसेल. पण आपली तयारी नेहमी घनघोर युद्ध होईल ह्या दृष्टीने असावी असे मला वाटते.
कोणतेंही सरकार (काँग्रेस असो व भाजप) असेल तरीही ते लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे ऐकल्याशिवाय आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार केल्याशिवाय दुसऱ्या देशात( येथे डॉकलाम पठार हे भूतान मध्ये भारतात नाही आहे हे लक्षात घ्या) सैन्य पाठवणार नाही.
डॉकलाम पठार भूतान मध्ये असले तरी हा भूभाग चीनने गिळंकृत केल्यास त्याचा फटका भारताला बसणार आहे. त्यामुळे भूतानला मदत करणे ही आपली मजबुरी आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

@अभिजित अवलिया तुम्ही म्हणताय ते अगदीच खरं आहे आणि तितकेच चिंताजनक आहे. मुळात भारत चीन सीमेवरती ७३ स्ट्रॅटेजिक रोड तयार करायचे आहेत त्यातील फक्त २२ रोड तयार करून झालेत. ओरिजिनल टार्गेट होत २०१२ पर्यत च पण अजून सुद्धा रोड तयार नाहीत. सीमावर्ती भागात रेल्वे जायला तर काही दशके वाट पाहावी लागेल. भारतीय वायुसेना आता कुठे विमानांना उतरण्यासाठी ALG तयार करताय सीमावर्ती भागात. चीन मात्र याबाबत आपल्यापेक्षा एक दशक तरी पुढे आहे हे नाकारून चालणार नाही. @ खरे साहेब
दारुगोळा भारतात ७ दिवसात येऊ शकतो.
काहीही. मुळात ४०००० कोटींचा दारुगोळा विमानांनी तरी येणार नाही त्यासाठी कार्गो शिप हव्या असा माझा समज आहे, त्यामुळे वेगवेगळ्या देशातून दारुगोळा भरून कार्गो शिप ७ दिवसात भारतात येतील का ? हा माझा प्रश्न आहे. (दारुगोळा तयार करायचा वेळ बाजूलाच राहूदे). ७ दिवसात एक कागद ह्या सरकारी टेबल वरून त्या टेबल वर सरकत नाही. मी times of india वरती वाचलेल्या लेखानुसार (लिंक सापडत नाही ) भारताला पूर्ण वर्ष जाईल आता दिलेल्या emergency order पूर्ण करायला. @श्रीगुरुजी
CAG हा अहवाल सरकारला गुप्तपणे देऊ शकत होते. चीन युद्धाच्या पावित्र्यात सीमेवर असताना असे अहवाल जाहीर करून आपली कमतरता उघड करणे अयोग्य आहे.
मला वाटतंय कॅग अवहाल सरकार लोकसभेत मांढते, आणि आता उघड झालेला भाग हा सरकार ने मांडलेला अवहलातूनच आहे.

हे मी लिहित असताना रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेत आहेत . याबरोबरच प्रणव मुखर्जी जवळपास ५० वर्षांच्या सार्वजनिक जीवनातून निवृत्त होतील. प्रणव मुखर्जींनी यापूर्वी केंद्रिय मंत्रीमंडळात अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण ही टॉप ४ पैकी ३ खाती सांभाळली होती. त्यांनी अमेरिकेबरोबरच्या अणुकरारावेळी (२००८ मध्ये) परराष्ट्रमंत्री म्हणून भारताची बाजू समर्थपणे मांडली होती. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस तसेच त्यापूर्वी अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांच्याकडून प्रणव मुखर्जींच्या 'अ‍ॅक्युमेन' विषयी आदर व्यक्त झाला होता असे वाचल्याचे आठवते. प्रणवदांची राष्ट्रपतीपदाची कारकिर्द त्या पदाचा आब राखणारी होती. त्यांनी त्या पदाच्या मर्यादा ओळखून त्या मर्यादांचे कधीही उल्लंघन केले नाही. प्रणवदांचे आयुष्य गेले काँग्रेसमध्ये. आणि काँग्रेस नेत्यांनी कायमच नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते. पण तरीही एक राष्ट्रपती म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदींशी जाहिरपणे कधी मतभेद उघड केले नाहीत. तसेच जेव्हाजेव्हा गरजेचे होते तेव्हा (गोरक्षकांनी गोंधळ घातल्याच्या घटना झाल्यावर) त्यांनी त्याविरूध्द स्पष्ट भूमिकाही घेतली पण त्यावेळी सुध्दा एका राष्ट्रपतींच्या भूमिकेच्या मर्यादांचे उल्लंघन होणार नाही अशा पध्दतीनेच त्यांचे भाष्य होते. २०१३ मध्ये मनमोहन सरकारने दोन पेक्षा जास्त वर्षे शिक्षा झालेल्यांना निवडणुक लढविण्यापासून बंदी घालणारा अध्यादेश जारी करायचा प्रयत्न केला (राहुल गांधींनी जाहिरपणे फाडून टाकलेला तोच अध्यादेश) त्यावेळी प्रणव मुखर्जी त्यावर सहजासहजी सही करणार नाहीत आणि सरकारकडून अधिक स्पष्टीकरण मागतील अशा बातम्या होत्या. प्रणव मुखर्जी रबरस्टॅम्प राष्ट्रपती नव्हते हे त्यातून दिसून येतेच. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवालांनी जानेवारी २०१४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या आधी काही दिवस दिल्लीत रस्त्यावर उतरून प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात गोंधळ घालायची धमकी द्यायचा बेजबाबदारपणा केला होता. त्यावर प्रणव मुखर्जींनी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केजरीवालांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. तसेच केजरीवाल परत दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भेटायला गेले होते तेव्हा प्रणव मुखर्जींनी केजरीवालांना राज्यघटनेची प्रत देऊन 'राज्यघटनेच्या चौकटीतच काम करा' असा संदेश न बोलता दिला होता. राष्ट्रपतींनी वारंवार आपले मत जनतेत मांडू नये असा पायंडा आहे. त्याचे प्रणव मुखर्जींनी पालन केले. आणि त्याचबरोबर पूर्ण मौन न बाळगता गरज असेल तिथे त्यांनी आपले मत स्पष्टपणे मांडलेही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कधी आपले मत मांडावे आणि कधी मांडू नये हे भान त्यांच्याकडे होते. कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीला त्यांनी दयेचे अर्ज फेटाळून मान्यता दिली. फालतूच्या मानवतावादी लोकांच्या प्रचाराला प्रतिभा पाटील बळी पडल्या त्याप्रमाणे प्रणवदा बळी पडले नाहीत. निर्भयाच्या अत्याचार्‍यांनाही प्रणवदांच्या कार्यकाळातच फासावर लटकविण्यात यावे असे फार वाटत होते. पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही. प्रतिभा पाटील यांच्या निष्प्रभ राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीपुढे प्रणव मुखर्जींची कारकिर्द मात्र नक्कीच कितीतरी उजवी वाटली. आता ती जबाबदारी रामनाथ कोविंद यांच्यावर आली आहे. आपले सार्वजनिक जीवन आता वयानुरूप संपले. यानंतर पक्षीय राजकारणात आणि इतरत्रही आपली लुडबूड नको आणि आपल्यापेक्षा तरूण असलेल्यांना संधी द्यावी हे भान प्रणव मुखर्जींकडे होते आणि आहे. कधी एकदा हा माणूस निघून जातो असे एखाद्याविषयी वाटायला लागेपर्यंत थांबू नये तर एखादा माणूस सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त झाल्यामुळे लोकांना हळहळ वाटेल अशावेळीच सन्मानाने निवृत्त व्हावे हे पण भान प्रणवदांनी दाखविले. दुर्दैवाने ते भान भाजपमधील अडवाणी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांना दाखविता आलेले नाही. त्यामुळेच प्रणवदा निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्याविषयीचा आदर कायमच राहिल आणि अडवाणींच्या वाट्याला जी अवहेलना आली ती त्यांच्या वाट्याला कधीच येणार नाही. असो. अलविदा प्रणवदा. आता यापुढे तुमच्या आवडत्या गोष्टींना (वाचन, लेखन) तुम्हाला वेळ देता येईलच. त्याचा पूर्ण वापर तुम्ही कराल ही बर्‍यापैकी खात्री आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

+१ मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देखील आपल्या पदाची प्रतिष्ठा पूर्णपणे सांभाळली. आपल्या पदाच्या मर्याद, पदासाठी आवश्यक असलेले राजकीय शिष्टाचार त्यांनी व्यवस्थित पाळले. कोठेही त्यांनी आपल्या मर्यांदांचे उल्लंघन करून पदाची अप्रतिष्ठा केली नाही. राम माधव यांनी एकदोनदा त्यांच्यावर चिखल उडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या सर्व प्रसंगी मान्य शिष्टाचारनुसारचे ते वागले होते हे स्पष्ट झाले. सलग १० वर्षे राज्यसभेचे सभापतीपद सांभाळताना त्यांचा कस लागला होता. परंतु संयम न घालविता अतिशय शांतपणे त्यांनी सभागृह चालविले. खरं तर रालोआने त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी विचार करायला हवा होता.

In reply to by श्रीगुरुजी

खरं तर रालोआने त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी विचार करायला हवा होता.
अन्सारी यांच्या उमेदवारीसाठी २००७ मध्ये कम्युनिस्ट पक्षांनी प्रयत्न केले होते असे वाचल्याचे आठवते. त्यावेळी युपीए-१ सरकार कम्युनिस्टांच्या पाठिंब्याने चालले होते त्यामुळे कम्युनिस्टांचा उमेदवार युपीएने मान्य केला. त्यामुळे त्यांचा रालोआने राष्ट्रपती किंवा परत उपराष्ट्रपतीपदासाठी विचार करायची शक्यता जवळपास शून्य होती. त्यांनी राज्यसभेचे कामकाज चांगले चालवले हे नक्कीच. पण तरीही कम्युनिस्टांनी उमेदवारीसाठी एकेकाळी आग्रह धरलेली कोणतीही व्यक्ती पुढे आणण्यात आली नाही हे मला स्वतःला तरी चांगलेच वाटते. माझा कम्युनिस्टांना कमालीचा विरोध असल्यामुळे कदाचित तसे वाटत असावे.

जर दारुगोळा मार्गस्थ झाला असेल किंवा पोहोचला असेल तर प्रत्येकाला आनंदच होणार जेंव्हा जनरल व्ही के सिंह हे तत्कालीन सैन्यप्रमुख होते तेंव्हा त्यांच्या निवृत्तीवरुन जनरल व्ही के सिंह व तत्कालीन सरकार यांच्यात निवृत्ती तारखेवरुन वाद निर्माण झाला होता वाद सुरु झाल्यावर दारुगोळा साठा आणि उपलब्धता यातील कमतरता व त्रुटिवरिल कागदपत्रे बाहेर येणे हा काहि योगायोग नव्हता हे माझे मत. जर मागील सरकार खरोखर नालायक व निर्लज्ज होते आणि २०१४ पर्यंत या विषयावर काही केले नाही असे म्हणले, तरी जनरल व्ही के सिंह यांनी मंत्रिमंडळात सामील झाल्यावर दारुगोळा साठा आणि उपलब्धता यातील कमतरता व त्रुटि यावर पाठपुरावा करुन दारुगोळा साठा आणि उपलब्धता यावर भरीव कामगिरी करुन दारुगोळा साठा आणि उपलब्धता यावर शत्रुला धडकी भरवेल असा अहवाल २०१५ च्या अंतापर्यंत कॅगने नक्किच दिला असता. बाकि दोन लष्करी अधिकारी मंत्री असलेले मंत्रिमंडळ पुर्णवेळ नसणारे संरक्षण मंत्री यावर जाणकार जास्त बोलु शकतील.

केजरीवालांचा पाय अजून खोलात. नाकातोंडाशी पाणी आल्यावर जेठमलानींनी केजरीवालांना पायाखाली घेतले. http://m.indiatoday.in/story/ram-jethmalani-arvind-kejriwal-arun-jaitle…

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल व जेठमलानी या दोन नीच व्यक्तींची युती तुटलेली दिसते. भारतातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आपण जंबुद्वीपात अवतार धारण केला आहे ही समजूत मनाशी धरून मनाला येईल त्याच्यावर निराधार, बेलगाम आरोप करायचे अरणि आरोप अंगाशी आले की "ये सब मिले हुए है", "ये सब भ्रष्टाचारी है" असे म्हणून पळ काढायचा हे केजरीवालांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेत अरूण जेटलींनी भ्रष्टाचार आरोप केला असा गंभीर आरोप जेव्हा केजरीवाल व त्यांच्या टोळीतील सदस्यांनी केला तेव्हा जेटली हा आरोप इतक्या गंभीरपणे घेऊन आपल्याला न्यायालयात खेचतील असे केजरीवालांना स्वप्नातही वाटले नसावे. जेटली कसलेले वकील आहेत. कायद्याच्या खाचाखोचा त्यांना चांगल्याच माहिती आहेत. त्यामुळे कोणतेही पुरावे न देता आपणावर केलेल्या आरोपांमुळे त्यांनी केजरीवालांवर दिवाणी व फौजदारी दावा दाखल केला. आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून केजरीवालांच्या आरोपांमुळे आपली सार्वजनिक जीवनात आपली बदनामी व अप्रतिष्ठा झाली आहे आणि त्यामुळे केजरीवालांना बदनामीच्या कलमानुसार शिक्षा करून त्यांच्याकडून आपल्याला १० कोटी रूपयांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी ते थेट सर्वोच्च नायालयात गेले. वयाची प्रख्यात वकील राम जेठमलानी सुद्धा जेटलींवर खार खाऊन होते. केजरीवालांविरूद्धचा खटला त्यांना जेटलींबरोबरचे हिशेब चुकते करण्यासाठी सुवर्णसंधी वाटली. त्यांनी स्वतःहून केजरीवालांचा वकील होण्याची तयारी दर्शविली. जेटलीसुद्धा कसलेले वकील आहेत. त्यांनी खटल्यात आपली बाजू भक्कम करायला सुरूवात केल्यानंतर केजरीवाल व जेठमलानी यांनी विचित्र युक्तीवाद करायला सुरूवात केली. जेटलींना आपल्याविरूद्ध खटला भरण्याचा अधिकारच नाही असा केजरीवालांचा सुरवातीचा युक्तीवाद होता. न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर त्यांनी अत्यंत विचित्र भूमिका घ्यायला सुरूवात केली. एक दिवस सुनावणी सुरू असताना जेठमलानींनी केजरीवालांच्या वतीने अत्यंत अतार्किक व हास्यास्पद युक्तीवाद केला. जेटली २०१४ ची लोकसभा निवडणुक अमृतसरमधून हरले असल्यामुळे त्यांना कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा नाही व त्यामुळे केजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची बदनामी होण्याचा व अप्रतिष्ठा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा अत्यंत विचित्र युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. निवडणुकीतील विजय म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा असणे व पराभव म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा नसणे हे मोजमाप लावले तर मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, दस्तुरखुद्द यांना सामाजिक प्रतिष्ठा अजिबात नाही असा निष्कर्ष निघतो. तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा असती तर तुम्ही निवडणुक कसे काय हरला या प्रश्नावर जेटली यांनी सांगितले की निवडणुक जिंकणे हे फक्त सामाजिक प्रतिष्ठेवर अवलंबून नसून त्यासाठी इतर अनेक घटक कारणीभूत असतात. केजरीवालांप्रमाणे किर्ती आझादने व इतर काही जणांनी सुद्धा तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सामाजिक माधमातूनही काही जण अशा आरोपांना दुजोरा देतात. मग अशा प्रत्येकावर खटला भरणार का, या प्रश्नावर जेटलींनी सांगितले की केजरीवाल एका राज्याचे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी केलेल्या आरोपांना जास्त वजन असते. म्हणूनच त्यांच्यावर खटला दाखल करणे आवश्यक होते. काही काळानंतर केजरीवालांनी एक विचित्र मागणी न्यायालयात केली. जेटलींची जितकी बँक खाती आहे त्या प्रत्येक खात्यात १९९९ पासून आजतगायत जे यवहार झाले त्या सर्व व्यवहारांची माहिती आपल्याला मिळावी अशी त्यांनी न्यायालयात मागणी केली. त्याचबरोबर जेटलींनी १९९९ पासून भरलेले प्रत्येक वर्षीच्या आयकर रिटर्न्सची प्रत आपल्याला मिळावी अशीही त्यांनी मागणी केली. त्यांचे बँक व्यवहार दाखवून मी त्यांनी केलेला भ्रष्टाचार सिद्ध करू शकतो असा त्यांचा दावा होता. ही मागणी अत्यंत हास्यास्पद होती. जर त्यांनी जेटलींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तर त्यांच्याकडे जेटलींनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची नक्कीच काहीतरी माहिती असणार होती. ती माहिती न्यायालयापुढे ठेवण्याऐवजी त्यांनी अशी विचित्र मागणी केली कारण त्यांचे सर्व आरोप निराधार होते. अशी माहिती मागणे हे एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनावर अतिक्रमण असते हे आयकर खात्यात अनेक वर्षे काम केलेल्या केजरीवालांना माहित असणार. परंतु खटला लांबविण्यासाठी त्यांनी मुद्दामच ही मागणी केली. न्यायालयाने अर्थातच ही मागणी फेटाळून लावली. दरम्यान आतापर्यंत झालेल्या सुनावणीचे सुमारे सव्वादोन कोटी रूपयांचे बिल जेठमलानींनी केजरीवालांना पाठविले. हा खटला केजरीवाल या व्यक्तीवर दाखल केलेला खटला होता. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरूद्ध किंवा दिल्ली सरकारविरूद्ध हा खटला नव्हता. तरीसुद्धा आपल्या खटल्याचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकारने करावा असा ठराव केजरीवालांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला व तो ठराव मान्यतेसाठी नायब राज्यपालांकडे पाठविला. या ठरावावर पचंड टीका झाली. 'आपण सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराविरूद्ध लढत आहोत. त्यामुळे या खटल्याचा खर्च दिल्ली सरकारने देणे योग्यच आहे' अशी शेखी केजरीवालांनी मारली. म्हणजे स्वतः घाण करायची आणि घाण साफ करण्याचा खर्च सरकारने उचलायचा. जेठमलानीचा जेटलीद्वेष इतक्या पराकोटीला गेला होता की 'जर नायब राज्यपालांनी आपली फी दिल्ली सरकारने देण्याचा ठराव मान्य केला नाही तर आपण फुकट खटला लढू' असे जेठमलानींनी सांगितले. 'लोकसत्ता'तील बातमीनुसार जेठमलानींना दिल्ली सरकारने आजपर्यंत ३.५० कोटी रूपये वकील फी म्हणून दिले आहेत. केजरीवालांची बाजू दिवसेंदिवस दुर्बल होत होती. त्यांनी चाणाक्षपणे हे ओळखले होते. त्यामुळे खटला जास्तीत जास्त कसा लांबविता येईल यासाठी ते वेळकाढूपणा करीत होते. परंतु जेटलींनी चिकाटीने आपली बाजू भक्कम करीत नेली. शेवटी मे २०१७ मध्ये एका सुनावणीदरम्यान जेठमलानींनी जेटली यांचा उल्लेख 'क्रूक' (बदमाष) असा केल्यावर जेटलींच्या बरोबरीने न्यायाधीशही संतापले. सुरवातीपासूनच जेठमलानी जेटलींना अतिशय खोचक व जिव्हारी लागणारे प्रश्न विचारून त्यांची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल याच प्रयत्नात होते. परंतु यावेळी मात्र कळस झाला. 'एखाद्याला कोणताही पुरावा नसताना व आरोप सिद्ध झाले नसताना "क्रूक" म्हणणे अत्यंत अयोग्य आहे. खटल्याची सुनावणी ही वाटेल ते आरोप करण्याचा व बदनामी करण्याचा परवाना नाही. तुम्ही स्वतःच हा शब्द वापरत आहात की तुमच्या अशीलाच्या सांगण्यावरून हा शब्द वापरत आहात? जर तुम्ही स्वतःहून हा शब्द वापरला असेल तर मला तुम्हाला या खटल्यातून काढून टाकावे लागेल. जर तुमच्या अशीलाने हा शब्द वापरायला सांगितला असेल तर मला तुमच्या अशीलावर कायदेशीर कारवाई करावी लागएल.' असे न्यायाधीशांनी संतापून जेठमलानींना सांगितले. पुढील सुनावणीच्या वेळी मला याचे उत्तर मिळालेच पाहिजे असेही न्यायाधीशांनी ठणकावून सांगितले. 'क्रूक' शब्द वापरणे आपल्या अंगाशी येणार हे केजरीवाल व जेठमलानी या दोघांच्याही लक्षात आले. 'आपण स्वतःहून क्रूक हा शब्द जेटलींच्या बाबतीत वापरला नाही. माझे अशील केजरीवाल यांनीच मला हा शब्द वापरायला सांगितले होते' असे जेठमलानींनी सांगितल्यावर केजरीवालांनी काखा वर केल्या. जेठमलानींन हा शब्द स्वतःहून वापरला आहे. जेटलींचा उल्लेख क्रूक असा करा असे मी त्यांना कधीही सांगितले नव्हते असा केजरीवालांनी दावा केला. केजरीवालांनी हात झटकल्यानंतर जेठमलानी तोंडघशी पडले. दोघेही न्यायप्रक्रियेतून वाचण्यासाठी दुसर्‍याचा बळी देण्याचा प्रयत्न करीत होते. 'केजरीवाल खोटे बोलत आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच मी न्यायालयात जेटलींचा उल्लेख क्रूक असा केला होता. किंबहुना आमच्या खाजगी संभाषणात केजरीवालांनी जेटलींविषयी क्रूक या शब्दापेक्षाही जास्त वाईट शब्द वापरले आहेत.' असे जेठमलानींनी सांगितले व या खटल्यात आजपासून आपण केजरीवालांचा वकील म्हणून काम करणार नाही व माझी उर्वरीत फी म्हणून २ कोटी रूपये केजरीवालांनी द्यावे असे पत्र मी त्यांना पाठविले आहे असेही जेठमलानी म्हणाले. जेठमलानी हा केजरीवालांप्रमाणेच अत्यंत नीच माणूस आहे. त्यांनी जे सांगितले त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नसला तरी केजरीवाल एखाद्यावर अत्यंत घाण शब्दात राळ उडवू शकतात हे यापूर्वी अनेकवेळा दिसून आले. मोदींचा उल्लेख 'भित्रा व मनोरूग्ण' असा करणे किंवा २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ध्वनीफितीमध्ये योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्याबद्दल बोलताना 'त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घातली पाहिजे' असे ते म्हणाल्याचे सिद्ध झाले होते. या खटल्यात आपली बाजू दुर्बल आहे. त्यामुळे खटल्याच्या सुनावणी दरम्यान जेटलींविरूद्ध घाण भाषा वापरून अजून नवीन आरोप करून त्यांची अजून बदनामी करायची असा या दोघांचा डाव होता. परंतु जेटलींनी कायद्याच्या चौकटीत राहून हा डाव उधळून लावला. न्यायालयात आपला उल्लेख 'क्रूक' असा केल्याबद्दल जेटलींनी केजरीवाल व जेठमलानींविरूद्ध एक नवीन दावा दाखल केला आहे. खटल्यात काय होणार याचा अंदाज आल्यानेच केजरीवाल मागील २-३ महिन्यांपासून गप्प आहेत. अर्थात त्याला एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतील दारूण पराभवाची पार्श्वभूमी सुद्धा आहे. आपल्या नीच वर्तनाने केजरीवाल स्वतःहून अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर अनेकांनी बदनामीचे खटले दाखल केले आहेत. सैल जिभेच्या या अत्यंत ढोंगी व बेताल व्यक्तीला किमान एका खटल्यात तरी तुरूंगवासाची शिक्षा मिळो अशी तीव्र इच्छा आहे. अजून एक अंधुक शक्यता म्हणजे हा खटला अजून लांबवावा यासाठी जेठमलानींनी राजीनामा दिला असावा. मला आता वकील नाही, नवीन वकील शोधायला मला वेळ हवा असे न्यायालयाला सांगून केजरीवाल या खटल्याची सुनावणी लांबवू शकतात. खरे काय ते काही दिवसातच समजेल.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जि स्वारी...तुमचा वरील प्रतिसाद पुर्ण न वाचता माझा प्रतिसाद देतोय. सर केजरीवाल ह्यांच अस झालय ,"" बिच्छु का मंतर नहि जानता और साप के बिल मे हाथ डाल दिया "" ;) गडकरीं सारख माफिनामा घेवुन सर जी ना ह्यावेळेस सोडु नये. Let him face the music and let the other लंगुर dance ;)

In reply to by गामा पैलवान

अजून किती बोंबाबोंब करायची शिवसेनेच्या नावाने? शिवसेनेचे मागील काही वर्षात पुरते वस्त्रहरण झाले आहे. सेनेच्या अब्रूची सर्व लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. तरीही त्यांना अक्कल येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गुरू, हो जा शुरू! तुम्ही यायचीच वाट पहात होतो. शिवसेनेचं नाव वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईनाशी झाली की काय या चिंतेने घेरलो गेलो होतो. तुम्हीच जर शिवसेनेवर तोंडसुख घेतलं नाही, तर शिवसेनेस अक्कल कशी येणार! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी कधीच जिंकलोय. म्हणून तर थांबलोय. क्रिकेटचं उदाहरण देतो. एकदा प्रतिपक्षाची धावसंख्या पार केली की तुमचे कितीही गडी बाद व्हायचे शिल्लक असले तरी फलंदाजी करणारा संघ पुढे फलंदाजी करीत नाही कारण तिथेच सामन्याचा निकाल लागलेला असतो. इथेही तसंच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेचं नाव आलं आणि तुमचा प्रतिसाद नसेल तर दिवस खराब जातो आमचा. उगीच सूर्य पश्चिमेस उगवल्याचा भास होतो. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्यासाठी आमच्या प्रतिसादाची गरज नाही. तुमचा मुक्काम भारताच्या पश्चिमेला असल्याने तुमच्या ठिकाणी सूर्य पश्चिमेलाच उगवणार.

In reply to by श्रीगुरुजी

गुरू, हो जाव शुरू! तुमचं हेच तर्कट आम्हांस फार्फार आवडतं :
तुमचा मुक्काम भारताच्या पश्चिमेला असल्याने तुमच्या ठिकाणी सूर्य पश्चिमेलाच उगवणार.
आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

फारंच 'मार्मिक' टिपणी हो तुमची. 'पांचजन्या'चं 'प्रबोधन'च जणू. फक्त इतक्या लवकर हार नका मानू. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काय हे न. गा. पै.! हार कशी काय मानणार? मी 'सामना' कधीच जिंकलाय. आज तुमच्या उधोजींचा प्रकटदिन असला तरी उधोजींसारखंच बोललं पाहिजे असं नाही. आ. न. - उ. श्री.

In reply to by श्रीगुरुजी

सामना जिंकल्याची आगाऊ जाहिरात करणे ही उद्धवगिरी नाहीका? असो. तुमच्याकडे वारंवार 'प्रहार' करण्याचा 'स्वाभिमान' नाही. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आगाऊ जाहिरात कसली? 'सामना' केव्हाच संपला आहे. आम्ही पराभुतांवर 'प्रहार' करीत नाही. तो शिवसेनेवरील धागा जरा वाचा म्हणजे समजेल. आ. ऊ. - श्री.

In reply to by गामा पैलवान

तुमचं त्यांना इतकं ताणणं तुमच्या आजपर्यंतच्या इंप्रेशन्च्या विपरित वाटलं गामाजी. कि यारि दोस्ती मे चाललंय?

गुर्जि नौटंकी नाहि आहे, मला तरी नाहि वाटत. अजुनहि नितिशकुमार बोलताहेत मिडीया सोबत. अक्षरश: कपडे फाडले आहेत त्यांनी सो कॉल्ड महागठबंधन चे.

In reply to by सचु कुळकर्णी

लालूच्या मुलाने नोव्हेंबर २०१५ नंतर भ्रष्टाचार केलेला नाही. लालू व त्याचे सर्व कुटुंबीय खूप पूर्वीपासून भ्रष्टाचार करीत होते. परंतु २०१५ मध्ये लालूशी युती करून लालूला मिठ्या मारताना नितीशकुमारांना त्यात काहीही वावगे वाटले नव्हते. २०१३ व २०१४ मध्ये आपले अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी महाभ्रष्टाचारी लालूचा पाठिंबा घेताना त्यांना अजिबात संकोच वाटला नव्हता. मग आज अचानक त्यांना भ्रष्टाचाराविरूद्ध जाण्याची का गरज भासली? आज तेजस्वी यादवचे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने व त्यांमुळे त्याने राजीनामा द्यावा ही मागणी लालूने अमान्य केल्यामुळे आपली प्रतिमा उंचाविण्यासाठी नितीशकुमारांनी ही राजीनाम्याची नौटंकी केली आहे. तेजस्वीला मंत्रीमंडळातून हाकलणे त्यांना सहज शक्य होते. तसे केले असते तर लालूने पाठिंबा काढून घेतला असता व तसाही त्यांना राजीनामा द्यावाच लागला असता. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राजीनामा द्यावाच लागणार आहे. त्यामुळे सत्ता सोडल्याचे नाटक करून आपण भ्रष्टाचाराविरूद्ध आहोत अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठीच हे नाटक आहे. परंतु हे करताना पुन्हा एकदा नितीशकुमारांची खेळी चुकली आहे. २०१३ मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा मोदींवर सोपविल्यानंतर नितीशकुमारांनी तडकाफडकी भाजपशी संबंध तोडून राजद व कॉंग्रेसची मदत घेऊन आपले अल्पमतातील सरकार वाचविले होते. भाजपशी संबंध तोडून टाकण्याची खेळी म्हणजे दुर्री मारण्यासाठी हातात असलेल्या हुकुमाचा एक्का टाकून देण्यासारखे होते. जी चाल सर्वात शेवटी करायला हवी होती तीच चाल त्यांनी सगळ्यात पहिली चाल केल्याने नंतर करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. त्याचाच फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसून लोकसभा निवडणुकीत संजदचे ४० पैकी फक्त २ खासदार निवडून आले होते. मोदींची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपशी तडकाफडकी संबंध न तोडता रालोआतच राहून मोदींना आपला विरोध सुरू ठेवायला हवा होता. त्यामुळे भाजपवर दबाव कायम राहिला असता व त्यांची तडजोडीची ताकद वाढली असती. ते न करता थेट संबंध तोडून टाकल्याने भाजपला रान मोकळे मिळाले. त्यावेळी अडवाणींनी देखील हीच चूक केली होती. नितीशकुमारांनी आता कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली दिसते. राजीनाम्याचे नाटक करून आपली प्रतिमा उजळून घ्यावी व २०-२१ महिन्यानंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी आपण विरोधकांचा केंद्रबिंदू असावे हा एक हेतू त्यामागे असावा. दुसरी शक्यता अशी आहे की डोईजड झालेल्या लालूशी संबंध तोडल्याने भाजप आता आपल्याला स्वतःहून पाठिंबा देईल व त्यायोगे आपले सरकार वाचू शकेल असाही त्यांचा विश्वास असावा. समजा मुदतपूर्व निवडणुक झाली तर आपल्या उजळलेल्या प्रतिमेमुळे आपल्याला फायदा होईल असेही गणित असावे. परंतु यात धोकेही आहेत. लालूकडे ८० व काँग्रेसकडे २७ आमदार आहेत. दोघांचे एकत्रित १०७ आमदार आहेत. बहुमतासाठी त्यांना फक्त अजून १५ आमदार हवे आहेत. लालूने काही अपक्ष आमदार गोळा केले व संजदमधील ९-१० आमदार फोडले तर लालू व काँग्रेसचे एकत्रित सरकार येऊ शकते. दुसरा धोका असा की आता भाजप बिनशर्त पाठिंबा न देता आपल्या अटींवर पाठिंबा देईल ज्या संजदशी जाचक असू शकतील. अशा परिस्थितीत भाजपच्या अटी मान्य करून सरकार वाचवायचे का हा प्रश्न उभा राहील. समजा मुदतपूर्व निवडणुक झाली तर संजदला स्वबळावर किंवा जास्तीतजास्त काँग्रेसबरोबर युती करून निवडणुक लढवावी लागेल. बिहारमध्ये सर्वांच्या मतपेढ्या भक्कम आहेत. लालूकडे १८% मतांची भक्कम मतपेढी आहे. संजदची मतपेढी १६-१७% च्या पुढे जात नाही. काँग्रेसकडे अजूनही ६-७% मते आहेत. भाजप आघाडीकडे किमान ३४% मते आहेत. संजदने अगदी काँग्रेसशी युती करून निवडणुक लढविली तरी त्यांची मतसंख्या २३-२४% मतांच्या पुढे जात नाही. अशा परिस्थितीत भाजपला बहुमत मिळेल. त्यामुळे भाजपला चुचकारून भाजपच्या कमीतकमी अटी स्वीकारून सरकार चालविणे हाच मार्ग योग्य वाटतो. एक शक्यता अशी आहे की सत्ता गमाविण्याच्या भीतिने लालू तेजस्वीला राजीनामा द्यायला लावून व त्या बदल्यात काहीतरी नवीन मिळवून पुन्हा एकदा संजद + राजद + काँग्रेस हे सरकार नव्याने सुरू होईल. मला तरी हा शेवटचा पर्यायच प्रत्यक्षात येण्याची सर्वाधिक शक्यता वाटते. भाजपने मात्र स्वतःहून नितीशकुमारांना पाठिंबा द्यायची अजिबात घाई करू नये. स्वतःचे पत्ते अजिबात दाखवू नयेत. समजा पुन्हा एकदा नितीशकुमारांशी युती करण्याची वेळ आली तर ती २०१३ पूर्व अटींवर न करता नव्या अटींवर युती करावी ज्यात भाजपचे स्थान मोठ्या भावाचे असेल. भाजपने १९८९ मध्ये फारसा जनाधार नसलेल्या शिवसेनेशी युती करताना शिवसेनेला मोठ्या भावाचे स्थान देऊन तब्बल २५ वर्षे स्वतःची फरपट होऊन दिली होती. तीच चूक भाजपने २००० मध्ये संजदबरोबर जागावाटप करताना केली. भाजपच्या तुलनेत संजदचा जनाधार कमी असताना सुद्धा भाजपने लोकसभेसाठी भाजप १५ व संजद २५ आणि विधानसभेसाठी भाजप १०२ व संजद १४१ असे विषम जागावाटप स्वीकारले होते. आता युती करायची असेल तर भाजपने किमान ५०% जागा असतील तरच युती स्वीकारावी व युतीत बरोबरीचे स्थान मिळवावे. अन्यथा आपल्या इतर मित्रपक्षांच्या बरोबरीने स्वबळावर लढावे. जर भाजपने उतावीळपणे आपले पत्ते उघड करून नितीशकुमारांना स्वतःहून पाठिंबा द्यायची घोषणा केली तर पुन्हा एकदा भाजपला संजदपेक्षा बलवान असूनसुद्धा कनिष्ठ भूमिका स्वीकारावी लागेल. भाजपने संयम दाखविला तर बिहारमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होईल.

नितीशकुमार हे पक्के राजकारणी आहेत. कधी त्यांचे डावपेच यशस्वी होतात तर कधी होत नाहीत. राजीनामा देण्यामागे त्यांचा नक्की काय उद्देश आहे याविषयी माझे अंदाज लिहित आहे. नितीशकुमारांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदींनी खालील दोन ट्विट केल्या आहेतः मागे एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे नितीशकुमारांना राजदबरोबरचे संबंध तोडून भाजपबरोबर हातमिळवणी केली तर आपल्या मागे पक्ष उभा राहिल याची खात्री नव्हती. अशावेळी राजीनामा देऊन बिहार विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे असे वातावरण निर्माण करायचे जेणेकरून शरद यादव कॅम्पमधील आमदारांवर वेसण घालता येईल हा एक उद्देश असावा. त्यातून बिहारचे राज्यपाल आहेत केशरीनाथ त्रिपाठी. हे भाजपचे नेते आहेत आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनीच मागच्या वेळी जीतनराम मांझी मुख्यमंत्री असताना नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपदावर परतण्यावरून बरेच तंगवले होते. अशावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट येऊन मध्यावधी निवडणुका होतील ही एक भिती घालायची आणि त्याचवेळी मोदींकडून ट्विट आल्यामुळे भाजप नितीशकुमारांना पाठिंबा द्यायला तयार आहे असेही वातावरण उभे करायचे. म्हणजे जर भाजपचा पाठिंबा न घेता शरद यादव कॅम्पमधील आमदारांनी राजद बरोबर हातमिळवणी करायचा प्रयत्न केल्यास राष्ट्रपती राजवट लागेल ही टांगती तलवार आहेच. राजद-जदयुमध्ये परत समझौता होईल का? १९९६ मध्ये काँग्रेसला देवेगौडा नको होते म्हणून आधी पाठिंबा काढून घेतला पण सरकार पडल्यावर गुजराल यांना पाठिंबा काँग्रेसने दिला. त्याच धर्तीवर सुरवातीला राजीनामा द्यायचा आणि राजदला नमायला लावून परत तेजस्वीशिवाय सरकार स्थापन करायचे असे होईल का? ही शक्यता कमी आहे. जदयु-भाजप एकत्र न येता निवडणुका होतील का? २०१५ मध्ये राजद आणि जदयुच्या मतांची बेरीज झाल्यामुळेच या युतीला विजय मिळाला. जर जदयु आणि भाजप स्वतंत्रपणे लढले तर जदयुला स्वबळावर बहुमत मिळेलच याची खात्री नितीशकुमारांना असेल असे वाटत नाही. तसेच राजदबरोबर परत समझौता झाला तरी हे पाऊल उचलून नितीशकुमारांनी विरोधकांच्या आघाडीपासूनही फारकत घेतल्याचे चित्र आहे. सध्या मोदी विरूद्ध इतर अशा काळात दोन्ही कॅम्पमध्ये न जाता स्वतंत्र अस्तित्व ठेवायला नितीश तयार होतील ही शक्यता कमी. एकूणच पुढील काही दिवस इंटरेस्टींग असणार आहेत. जशा घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहितोच.

In reply to by गॅरी ट्रुमन

मोदिंनी नितीशकुमारांचे डंकर्क केले. सर्व बाजूंनी अभूतपूर्व कोंडी करून यशस्वी माघार घ्यायला लावली. नितीशकुमारांचा राजीनामा व NDA प्रवेश ही घटना म्हणजे माझ्या अंदाजा प्रमाणे येत्या काही दिवसांत मोदि सर्व काळापैसा व भ्रष्टाचारावर मोठी कारवाई करणार असल्याची नांदी आहे. दोन दिवसां पूर्वी झालेल्या भेटीत मोदिंनी नितीशकुमारांना याची स्पष्ट शब्दात कल्पना दिली असावी व दोन पर्याय त्याच्या पुढे ठेवले असावेत. तात्काळ महागठबंधनातून बाहेर पडा व भाजपा बरोबर सरकार बनवून मुख्यमंत्री ह्वा आणि जर लालू व काँग्रेस बरोबर राहीलात तर त्यांच्याबरोबर तुमचीही राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल.

समझौता होण्यापलिकडे गेलय भौ आता. 302 / हत्येचा आरोप लावतायत लालु नितीश कुमार ह्यांच्यावर ती केस सुध्दा 1991 ची आहे.

In reply to by सचु कुळकर्णी

हत्येचा आरोप लावतायत लालु नितीश कुमार ह्यांच्यावर
हो. हा प्रकार नवीनच ऐकला आहे. एकूणच पुढे काय होईल याची उत्सुकता लागली आहे.

नितीशकुमार यांनी मोठी खेळी केली आहे क्रॉस टेबल वर! भाजपा सोबतच जावे लागेल किंवा परत निवडणुका/राष्ट्रपती राजवट!

नितीशकुमारांनी राजीनामा द्यायच्या घटनेमुळे २०१९ मध्ये विरोधक एकत्र जरी आले तरी ती आघाडी कितपत स्थिर राहिल हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आणि त्यातूनच विरोधकांच्या प्रस्तावित आघाडीची विश्वासार्हता कमी होणार हे नक्की. एकूणच मोदी-शहा विरोधकांना एकत्र येण्याच्या फारशा संधी देत नाहियेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये रामनाथ कोविंद हा दलित उमेदवार देऊन विरोधकांमध्येच फाटाफूट घडवली. अन्यथा राष्ट्रपती निवडणुकांच्या निमित्ताने विरोधकांची मजबूत आघाडी उभी करायची प्रक्रीया सुरू झाली असती. ती संधी मोदी-शहांनी विरोधकांना मिळू दिली नाही. अशा बातम्या आहेत की केशवप्रसाद मौर्य उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि त्यांना केंद्रात मंत्री केले जाईल. याचे कारण ते सध्या फूलपूर मतदारसंघातून निवडून आलेले लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदावर कायम राहायचे असेल तर उत्तर प्रदेश विधानसभा किंवा विधानपरिषदेत जावे लागेल आणि फूलपूरची लोकसभेची जागा सोडावी लागेल. त्या ठिकाणी पोटनिवडणुक होईल तिथे मायावती उमेदवार असतील आणि समाजवादी पक्ष-काँग्रेस तिथे आपला उमेदवार उभा करणार नाही ही शक्यता आहे म्हणजे २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात सपा-बसपा-काँग्रेस युती कितपत चालते हे चाचपून बघायची संधी फूलपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळेल. ती संधी पण विरोधकांना मिळू द्यायची नाही हा मोदी-शहांचा उद्देश आहे अशा बातम्या आहेत. तसे योगी आदित्यनाथही गोरखपूरचे खासदार आहेत आणि तिथेही पोटनिवडणुक होईलच. पण गोरखपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातून मायावती निवडणूक लढवून पराभवाचा धोका पत्करतील ही शक्यता कमी. आणि मोदी शहांचे डावपेच जिथे कमी पडत असतील तिथे विरोधकच त्यांना मदत करत आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार ठरवायला उशीर केला ही अक्षम्य चूक विरोधकांची झालीच. आणि आता नितीशकुमारसारखा मोहरा गमावावा लागत आहे.

संयुक्त जनता दल आणि भाजपचे आमदार आज रात्रीच राज्यपालांची भेट घेऊन नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचा दावा करणार आहेत. भाजप सरकारमध्ये सामील होणार आहे अशा बातम्या आहेत. अरे अरे अरे. पुढील फोटोतील मंडळींनी उगीचच आपले पुरस्कार परत केले म्हणायचे. 1 आता यापुढे नितीशकुमारांनी बिहारसाठी काहीच कसे केले नाही वगैरे विचारवंती बडबड सुरू होईल :)

In reply to by गॅरी ट्रुमन

उद्या शपथ घेणार आहेत नितीशकुमार अशा बातम्या आहेत. सुशील मोदीही उद्याच शपथ घेणार आहेत असं दिसतं!

२०१९ मध्ये विरोधक एकत्र जरी आले तरी ती आघाडी कितपत स्थिर राहिल हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भौ कोण कुठले विरोधक एकत्र येणार ? फुटकळ कम्युनिस्ट, दिशाहिन कॉंग्रेस, हिस्टेरीक ममता, किंवा ईतर सैरभैर झालेले सो कॉल्ड** पक्ष ? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे ह्या आतुन कंप्लिटली सैरभैर, भयभित झालेल्या लोकांच नेतृत्व करणार कोण ? *** हो हे कधिकाळी पक्ष, संघटना होते ज्याला नेतृत्व होते आता त्या फक्त मोदि विरोध करणार्या टोळ्या आहेत ज्या त्यांच्या प्रवक्तयां मार्फत चालवल्या जातात. माझ्या मते तरी केंद्र सरकार व्यवस्थित काम करतय पण आज मोदि जे प्रचंड मोठे झालेय ( विराट दर्शन) ते फक्त ह्या वैचारीक भयाणपणा आलेल्या टोळ्यांमुळे. मोबाईल टंकन क्षमता त्यामुळे क्रमश:

या प्रकारामुळे पवारांसारखीच नितीशकुमारांची विश्वासार्हता ढासळली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी हा माणूस कधीही धोका देऊ शकतो हे आज दुसऱ्यांदा घडलंय. तत्वाचा कितीही मुलामा चढविला तरी त्यामागचा संधीसाधूपणा लपलेला नाही. दुर्दैवाने भाजप इतिहासातून धडा घेत नाही असं दिसतंय.

In reply to by श्रीगुरुजी

तत्वाचा कितीही मुलामा चढविला तरी त्यामागचा संधीसाधूपणा लपलेला नाही.
राजकारणात सगळेच संधीसाधूच आहेत. भाजपनेही मायावती, जयललिता, करूणानिधी, चंद्रबाबू नायडू, नवीन पटनायक, शिबू सोरेन, ममता बॅनर्जी इत्यादी अनेकांबरोबर कधीनाकधी हातमिळवणी केलीच होती. या मंडळींचा आणि भाजपच्या ध्येयधोरणांशी कधीही काहीही संबंध नव्हता. तो पण संधीसाधूपणाच होता की. जर नितीशकुमारांना बरोबर घेऊन विरोधकांच्या प्रस्तावित ऐक्यात पाचर मारली जाणार असेल तर मला वाटते तसे करावे. उगीच अतिआत्मविश्वासात गेल्याचे परिणाम २००४ मध्ये एकदा भोगून झाले आहेत. तो प्रकार परत नको. तेव्हा विरोधकांच्या ऐक्याला इतके कमीही लेखले जाऊ नये आणि तेच हाणून पाडता येत असेल तर करावे. बाकी मनमोहन सरकारपेक्षा मोदी सरकार बरेच उजवे आहे. ते २०१९ मध्ये परत जिंकायला हवे. नितीशकुमार संधीसाधू म्हणून त्यांना दूर ठेवायचे, नितीश-लालूंना एकत्रच ठेवायचे आणि २०१९ मध्ये बिहारमधून २०१४ पेक्षा लोकसभेच्या ८-१० जागा गमावायच्या असे करून काहीच उपयोग नाही. दुसरे म्हणजे नितीशकुमारांची 'सुशासनबाबू' ही प्रतिमा आहेच. आणि तेच सुशासनबाबू मोदींबरोबर जाणार असतील तर चांगल्या गव्हर्नन्ससाठी मोदींशिवाय पर्याय नाही हे चित्र अधिक ठळकपणे मतदारांपुढे अधोरेखित करता येईल.

In reply to by गॅरी ट्रुमन

नितीशकुमार संधीसाधू म्हणून त्यांना दूर ठेवायचे, नितीश-लालूंना एकत्रच ठेवायचे आणि २०१९ मध्ये बिहारमधून २०१४ पेक्षा लोकसभेच्या ८-१० जागा गमावायच्या असे करून काहीच उपयोग नाही. नितीश-लालू आता एकत्र येणार नाहीत. भाजपने स्वतः सत्तेवर येण्यासाठी दोघांनाही संपवायला हवे. भाजपने नितीशना पाठिंबा दिल्याने लालू संपला तरी संजदचे अस्तित्व राहील. नितीशना पाठिंबा न देता भाजपने मुदतपूर्व निवडणूक लादली तर ते दोघेही संपतील.

In reply to by श्रीगुरुजी

नितीशना पाठिंबा न देता भाजपने मुदतपूर्व निवडणूक लादली तर ते दोघेही संपतील.
या शक्यतेचा मोदी-शहांनी विचार केला नसेल असे वाटत नाही पण भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे कठिण आहे हे त्यांनी जाणले असावे. राजद-जदयुमध्ये काडीमोड झाल्यावर राजद हौतात्म्य मिळाल्याचा आणि नितीशकुमारांनी विश्वासघात केल्याचा दावा करेल तर जदयु नितीशकुमारांनी सुशासनबाबू ही प्रतिमा कायम ठेवली हा दावा करेल. अशावेळी राजद आणि जदयुमागे मतांचे अधिक ध्रुवीकरण होईल ही शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक पक्षांची कामगिरी लोकसभा निवडणुकांमध्ये होते त्यापेक्षा चांगली होते तर लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांची कामगिरी विधानसभा निवडणुकांमध्ये होते त्यापेक्षा चांगली होते हा कल देशात कित्येक वेळा बघायला मिळालेला आहे. तेव्हा भाजप इथे बॅकफूटवर असणार आहे आणि नितीशकुमारांना त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा फायदा मिळायची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्यात मुदतपूर्व निवडणुकांमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल हे गृहितक वाटत आहे. तसे होईल असे वाटत नाही. अर्थात नितीशकुमारांनाही स्वबळावर बहुमत मिळेल असे नक्कीच नाही. त्रिशंकू विधानसभा येईल ही शक्यता सर्वात जास्त. त्रिशंकू विधानसभा आली तर परत लालू-नितीश हातमिळवणी करायची शक्यता मोकळी राहते आणि त्यातून नितीश २०१९ मध्ये विरोधकांच्या आघाडीत जातील ही पण शक्यता मोकळी राहते. ते काही केल्या होऊ द्यायचे नाही आणि विरोधकांची निवडणुकपूर्व आघाडी 'स्टीलबॉर्न' असावी हा मोदी-शहांचा डाव दिसतो.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांच्या उद्याच्या शपथविधीच्या बातम्या झळकत आहेत तेव्हा ऑप्शन 2 आधीच निश्चित झालेला दिसतोय.

शेवटि कोणितरी हा प्रश्न विचारलाच ;) थांबा सध्या कलानगर ची हवा टाईट आहे :) तसेहि हे राजीनामे खिशात घेउन फिरतात आणि काल तर अजित पवारांनी ऑफर दिलीच आहे सेने ला सरकार स्थापनेची. बराय जर हे पवारांसोबत गेले तर त्याने एक फायदा होईल निदान ऊर्वरीत महाराष्ट्रालाहि पेंग्विन नावाचा पक्षी / प्राणि तिथे बघता येईल जिथे जिथे कार्यसम्राट माजी सिंचन मंत्री अजित दादा पवार ह्यानी धरणे, बंधारे बांधलेयत. पाऊस नाहि पडला तरी धरणातिल पाण्याचि लेव्हल 12 महिने शेम राहिल. कशी ? ते अजितदादा सांगतील.

मटातील बातमीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना केंद्र सरकारने सैन्य अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या शिध्याला कात्री लावली आहे. जुलै २०१७पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्यानुसार शांतता काळातील युनिटवर नियुक्त असलेल्या सैन्याधिकाऱ्यांना आता प्रत्यक्ष शिधा देण्याऐवजी दिवसाला ९६ रुपये तीन पैसे शिध्यापोटी देण्यात येतील. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/armed-fo…

नितीशकुमार यांनी आज सकाळी १० वाजता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली. त्यांच्याबरोबर भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी यांना शपथ दिली. 1 उद्या म्हणजे २८ जुलैपासून बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. उद्याच नितीशकुमार आपल्या सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडतील. जदयु आणि भाजपने काल समर्थन देणार्‍या २४३ पैकी १३२ आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली होती. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मंजूर व्हायला अडचण येऊ नये. हा ठराव मंजूर झाल्यावर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येईल आणि दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १३ मंत्री मंत्रीमंडळात असतील अशा बातम्या आहेत. म्हणजे भाजपला ५०% प्रतिनिधीत्व मंत्रीमंडळात द्यायला नितीशकुमार राजी झालेले दिसतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

नितीशकुमार यांनी आज सकाळी १० वाजता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली.
आता पाठ झाली असेल. राज्यपाल दिसले रे दिसले की आपोआप सुरू होत असतील.

नितीशकुमार यांच्या राजीनाम्याने आणि खांग्रेस लालू बरोबर राहिल्याने मात्र खांग्रेस का हाथ भ्रष्टाचारियों के साथ हे अधोरेखित होत आहे याची त्यांना अजूनही जाणीव होताना दिसत नाही . एका अर्थाने खांग्रेसमधील नेतृत्व हताशपणे बघत बसणे याशिवाय काहीच करू शकत नाही . अर्थात नेतृत्वपदी महाबुद्धिमान माणूस असल्यावर हेच होणे अपेक्षित आहे . बाकी ते भ्रष्टाचार निर्दालक, लालूंची गळाभेट घेतलेले श्री 420 यावर अजून काही बोलले नाहीत हे आश्चर्य आहे .

In reply to by सुज्ञ

एका अर्थाने खांग्रेसमधील नेतृत्व हताशपणे बघत बसणे याशिवाय काहीच करू शकत नाही . अर्थात नेतृत्वपदी महाबुद्धिमान माणूस असल्यावर हेच होणे अपेक्षित आहे .
एक गोष्ट कळत नाही. लालू आणि नितीश यांच्यातील मतभेद तुटेल इतके ताणले गेले तरी काँग्रेसने त्यांच्यात मध्यस्थी करून महागठबंधन टिकवायचा फार प्रयत्न केल्याचे दिसत नाही. सुमारे २० वर्षांचे वैर विसरून लालू आणि नितीश यांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. तसेही दोघेही २०१४ च्या मोदीलाटेत वाहून गेल्यावर एकत्र आलेच असते ही शक्यता आहे. पण त्यावेळीच नितीशकुमारांकडे झालेगेले विसरून जाऊन थोडी पडती भूमिका घेऊन भाजपबरोबर जायचा पर्याय होताच (तो त्यांनी आता वापरला आहे). पण तसे न करता त्यांनी लालूंबरोबर (आणि लालूंनी नितीशबरोबर) हातमिळवणी करावी यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. इथपर्यंत सगळे ठिक चालू आहे. पण आता मात्र नितीशकुमार महागठबंधनमधून बाहेर पडले आणि ते काँग्रेसवाले बघत बसले. नितीश हा विरोधी पक्षांमधला मोठा मोहरा होता आणि त्यांची चांगली प्रतिमा ही २०१९ मध्ये एक चांगला 'अ‍ॅसेट' झाली असती हे राहुल गांधींना कळत नव्हते का? मग सुरवातीलाच एक तर लालू किंवा नितीश या दोघांपैकी एकाला नमायला लावायचा आणि महागठबंधन टिकवायचा कोणता प्रयत्न त्यांनी केला? की २०१४ पासून काँग्रेसला पराभूत मनोवृत्तीने पछाडले आहे आणि काहीही झाले तरी आपण जिंकू शकत नाही आणि मोदींना हरविणे कठिण आहे असेच त्यांनी ठरवून टाकले आहे हे समजत नाही. अन्यथा हिमंत बिस्व शर्मा, शंकरसिंग वाघेला, अजित जोगी इत्यादींना काँग्रेसमधून इतक्या सहजपणे बाहेर पडू दिले गेले नसते. मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर हिमंत बिस्व शर्मा दिल्लीला राहुल गांधींना भेटायला गेले होते तेव्हा आपण कुठे कमी पडलो, काय करायला हवे याविषयी राहुल काहीतरी बोलतील ही त्यांची अपेक्षा होती. पण राहुल गांधींनी त्यापैकी काहीही न करता ते आपल्या कुत्र्यांबरोबर खेळत होते अशा बातम्या आल्या होत्या. स्वतः नेताच जर का असा बेफिकिर असेल तर काँग्रेस पुनरागमन करणार कधी आणि कशी?

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमचे नाव चेतन रावळ आहे काय ? मला वाटते नसावे. तो तुमचे इथले प्रतिसाद ढापून जसेच्या तसे सकाळमधे टाकतोय. ह्या बातमीखालील प्रतिक्रिया बघा ! काय दिवस आलेत ! पहिले लोक कथा, कविता ढापायचे. आता डायरेक्ट प्रतिसादच :)