Skip to main content

शिवसेना..... ???

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/07/2017 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही. पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती. सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर. बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला. सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही. लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे. शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत. हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते. या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे. मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले ( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )

वाचने 119771
प्रतिक्रिया 329

प्रतिक्रिया

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुमचे सगळे प्रतिसाद वाचले हातोळकर साहेब, तुमचा समतोल दृष्टिकोन आवडला हे वेगळं सांगत नाही, तसे तुमच्या संयमाचे कौतुक करतो मी. ह्याच धाग्यात श्रीगुरुजी ह्यांनी 'बाळासाहेब/शिवसेनेनं' १९८४ च्या शीख नरसंहाराच्या वेळी मुंबईतल्या शिखांना 'खंडणी घेऊन' अभयदान दिल्याचे एक प्रचंड मोठं विधान सुचक रित्या केलं आहे, त्याचे पुरावे मागूनही अद्याप इतक्या मोठ्या आरोपाला सिद्ध करणारा एकही पुरावा त्यांनी सादर केलेला नाही, त्यामुळे त्यांचा अजेंडा काय ते स्पष्ट होते पुरेसे.

In reply to by जेम्स वांड

पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे हे राजकारणात होत नाही. बोफोर्सचं लफडं अजूनही डोकं वर काढतंय. बाकी बोफोर्स किंवा गेला बाजार सिंचनात घोटाळा झालाच नाही असे आपण म्हणणार का? जाता जाता -- बाळासाहेबांची एक आठवण. बाळासाहेबांचा बायपास डॉ नीतू मांडके यांनी केला. घरी( मातोश्री) गेल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांची टीम बाळासाहेबांना मातोश्री वर जाऊन सल्ला आणि उपचार देत असत. त्यातील एक डॉक्टर माझे अत्यंत जवळचे आहेत. त्यांनी सांगितलेला हा किस्सा. एक दिवस बाळासाहेबांनी याना विचारले डॉक्टर वाईन मध्ये रेड वाईन चांगली कि व्हाईट? यावर डॉकटर म्हणाले कि तुमचा बायपास झाला आहे कुठलीच दारू तुम्ही पिऊ नये. बाळासाहेब आपल्या स्टाईल मध्ये म्हणाले कि दारू चांगली कि वाईट हा मुद्दा नाहीच रेड वाईन कि व्हाइट एवढंच सांगा. डॉक्टर यावर म्हणाले व्हाईट वाईन पेक्षा रेड वाईन चांगली. कारण त्यात रेसव्हेरेट्रोल नावाचे द्रव्य असते ज्यामुळे हृदय विकाराला थोडा प्रतिबंध होतो. बाळासाहेब त्यांना "म्हणाले" डॉक्टर आजपासून बाहेरच्या लोकांना व्हाईट वाईन"च" चांगली "असेच सांगायचे" याचा "पुरावा" मागू नका. आमचे वडील बाळासाहेबांना बऱ्यापैकी ओळखत होते आणि त्यांची काही वेळेस भेटही झाली होती. त्यांचे राजकारण वडिलांना चांगले माहित होते आणि पटतही नव्हते तरी माणूस "उमदा आणि हिमतीचा आहे/ होता" असेच त्यांचे आजही मत आहे.

In reply to by सुबोध खरे

गल्लत होते आहे का डॉक्टर काका? तुम्ही दिलेलं व्हाइट वाईन/रेड वाईनचं उदाहरण, किंवा तुमच्या पिताजींची असलेली बाळासाहेबांशी ओळख, हे 'वैयक्तिक डोमेन' झालं हो, त्याचे पुरावे मागणाऱ्याचे डोके ठिकाणावर नाही हे मी स्वतः म्हणेल ह्याची खात्री बाळगा खरे काका. पण, 'खंडणी मागून अभयदान दिले' म्हणणे हे पब्लिक डोमेन मध्ये येणारे आरोप/दावे होत. ह्याला समर्थनार्थ पुरावे द्यायलाच हवेत, नुसता हवेत गोळीबार उपयोगी नाही. उरता उरला बोफोर्स अन सिंचनाचा प्रश्न, तर ते न्यायप्रविष्ट आहेत न? खंडणीच्या मोबदल्यात अभयदान ह्या आरोपाखाली बाळासाहेब ठाकरेंवर काही केस आहेत का? होत्या का? आजवर युती करताना हे सगळे दिसले नाही का भाजप ला? बाकी, तुम्ही सैनिक माणसे , तुम्ही म्हणाल ते प्रमाण अन ग्राह्य , तुमचा आदर नाही करणार तर कोणाचा करणार.......

In reply to by जेम्स वांड

मी सैनिक होतो किंवा डॉक्टर आहे म्हणून एखादी गोष्ट सकृतदर्शनी स्वीकारावी असे मुळीच नाही. परंतु काही गोष्टींना पुरावे मागता किंवा देता येत नाहीत. मुंबईच्या राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या माणसांना हे माहित आहे कि मातोश्री कडे जाणारा ओघ कशा कशाचा आणि का असतो? एन्रॉनची कहाणी वाचून पहा. https://www.outlookindia.com/magazine/story/the-real-story-of-dabhol/21… याचे पुरावे देता येणार नाहीत. पण आज १०५०० कोटीच्या तोट्यासह हि कंपनी कुठे आहे तेही पाहून घ्या.

In reply to by सुबोध खरे

आपल्यामुळे १९८४ मध्ये मुंबईतील शीख वाचले असा दावा करणार्‍या बाळासाहेब ठाकर्‍यांनीच १९८८ मध्ये पत्रकार परीषदेत खालील इशारा दिला होता. Bombay's one lakh Sikhs will face a crisis unless they accede to the demands of Shiv Sena Pramukh, Bal Thackeray. At a bizarre press conference on March 19, which was a virtual inquisition, the Shiv Sena chief gave them a one-month ultimatum. Within this time, he said, they should send a delegation to Amritsar instructing the high priests to issue a hukumnama against the extremists; else he would enforce a social and economic boycott of them. http://indiatoday.intoday.in/story/shiv-sena-chief-bal-thackeray-target… खालील वृत्तात असे लिहिले आहे की - 1988: Thackeray's 'boycott of Sikhs businesses' idea is quietly abandoned after extorting crores from Sikhs in Mumbai. https://www.outlookindia.com/magazine/story/tooth-and-claw/283066 खालील ठिकाणी १९८४ चा संदर्भ आहे. http://neetakolhatkar.com/index.php/uncategorized/a-roar-that-isnt.html

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर आजपासून बाहेरच्या लोकांना व्हाईट वाईन"च" चांगली "असेच सांगायचे
बाहेरचे म्हणजे कोण ? आणि असे का सांगायचे ? हे काही कळले नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रश्न डॉक्टरांनी रेड सजेस्ट केली असताना व्हाईट चांगली असे सांगायचे कारण काय ?

In reply to by सुबोध खरे

मला या प्रसंगात सांगण्यासारखे काय आहे तेच कळले नाही! तुम्ही साधारण असं सांगण्याचा प्रयत्न करत आहात का कि बाळासाहेबांनी धमकी दिली कि इथून पुढे व्हाईट वाईन सांगायचं? मला तरी तो परिस्थितीजन्य विनोद असेल असे वाटते. नितु मांडके आणि बाळासाहेबांचे संबंध साधारणपणे सर्वश्रुत आहेत.

In reply to by सुबोध खरे

साहेब हे दैवत होतं आणि साहेब करतात ते बरोबरच असतं हे जगाला दिसलं पाहिजे. राजकीय अपरिहार्यता (political compulsion) हि वैद्यकीय सल्ल्याचा वरची असते. उद्धव ठाकरे यांनी बायपास करण्याऐवजी अँजियो प्लास्टी केली आणि पाच (कदाचित सात) स्टेंट बसवले. साधारण तीन पेक्षा जास्त स्टेण्ट लागणार असतील तर बायपासचा सुचवलं जातो. कारण तीन चार पैकी एक किंवा अधिक स्टेण्ट परत ब्लॉक होण्याची शक्यता असते. http://www.hindustantimes.com/mumbai/uddhav-thackeray-undergoes-angiopl… इतरही अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. पण त्या जालावर नको.

हे सगळं वाचून मला मात्र २०१९ कधी येते आहे असं झालं आहे. माझा असा अंदाज आहे की भाजपा फार मोठी चूक अशी करणार नाहीत की लोकांनी आतापर्यंत डेस्परेटली पर्याय म्हणून पुन्हा कॉंग्रेस वा समाजवादी पक्षांकडे परत सत्ता द्यावी. ज्या प्रमाणे राज हा फुसका बार ठरला त्याप्रमाणे उद्धव ही ठरेल पण शिवसेना मनसे इतकी तळाला मात्र जाणार नाही.

In reply to by चौकटराजा

२०१९ मध्ये लोकसभेसाठी भाजप व शिवसेना पुन्हा एकदा युती करण्याची बरीच शक्यता आहे. परंतु विधानसभेसाठी युती होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

वरील चर्चेत श्रीगुरुजी यांनी मांडलेल्या मतांशी मी बहुतांशी सहमत आहे.

भेदरने. धास्ती खाने. झोल खाने/ मारने. पाचातले तीन जाणे. वग्रै. किंवा गळपटणे. वाक्यात कसा उपयोग करता येईल ? *** न च्या जागि न आणि ण च्या जागि ण आहे.

सक्काडि सक्काडि चाल्लो हाव रे भाव मिंया-मार च्या यँम्बेशित ईचारतो त्याईले का तुमचा जनरल हिकड काह्याले धाडला... बाप्पा काहुन माय मले माईती चा अधिकार नाय ? पिल्लमपोया

भाजपा फार मोठी चूक अशी करणार नाहीत की लोकांनी आतापर्यंत डेस्परेटली पर्याय म्हणून पुन्हा कॉंग्रेस वा समाजवादी पक्षांकडे परत सत्ता द्यावी. ज्या प्रमाणे राज हा फुसका बार ठरला त्याप्रमाणे उद्धव ही ठरेल पण शिवसेना मनसे इतकी तळाला मात्र जाणार नाही. चौरा काका भाजप आता मोठ्ठा मगर / देवमासा झालाय. आता त्यांना त्यांच्या कडुन ह्यापुढे जर झालिच तर ति चुकच हरवु शकते बाकि कोणि सध्या दुर दुर पर्यंत दिसत नाहि. Actually भाजपा किंवा मोदि अजिंक्य नाहि झालेत पण विरोधिपक्ष (?) कोता झालाय जो फक्त त्यांच्या प्रवक्ते किंवा निवडक न्युज च्यानेल पुरता मर्यादित झालाय. 2017 अर्ध झालय पण ह्यांना अजुनहि भान नाहि आलय कि भाजप सोडुन जो मोठा पक्ष आहे तो फक्त 44 वर आहे. असो बापडे.

मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ? एकहाती सत्ता.....मग पुढे काय? असं तर नाही ना की मोदींना सत्ता यशोदाबेनच्या हातात सोपवायची आहे ???????? (टिपीकल राजकारणीय घराणेशाही)

In reply to by इरसाल

शिवसेना समर्थक दुसर्‍यांवर घराणेशाहीचा आरोप करतायत =))

In reply to by इरसाल

हुकुमशाहीचे फायदे लोकशाही पेक्षा ऐहिक सुख येण्यासाठी कितीतरी अधिक असतात. जगाचा इतिहास असा आहे की हुकुमशहा " जनतेसाठी हुकुमशहा " रहात नाही. त्यामुळे शराब को शराबीयोने बदनाम किया या चालीवर हुकुमशाही बदनाम होत रहाते. लोकशाही नसेल तर किती वेगाने प्रगति होउ शकते याची चीन हे उदाहरण आहेच.. आणि आपली लोकशाही तरी कशी ६५ टक्के सताधार्‍याने खायचे व ३५ टक्क्के विरोधकाने . फक्त जनतेसमोर भांडणाचा फार्स करीत पडद्यामागे एकाच प्याल्यात दारू प्यायची.

In reply to by चौकटराजा

हो ना हो! पण एक आहे हं, लोकशाही कोणालाही त्याला अक्कल नसेल त्या क्षेत्रात बोलायची सूट देते! भरपूर उदाहरणे इथे मिपावरच सापडतील, काय म्हणता?

In reply to by इरसाल

मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ? मित्रपक्षांना संपविण्याची गरज नाही. ते स्वतःहूनच आत्मघात करून घेत आहेत. मित्रपक्षांना जिवंत रहायचे असेल तर त्यांनी आंधळा मोदीद्वेष सोडून, मोदींना विरोधासाठी विरोध करणे सोडून, मोदींना अपशकुन करण्यासाठी देशाच्या शत्रूंबरोबर हातमिळवणी करणे सोडून विधायक भूमिका घेणे व स्वतःची विश्वासार्हता वाढविणे आवश्यक आहे. एकहाती सत्ता.....मग पुढे काय? सर्व विरोधी पक्ष स्वतःहून आत्मघात करीत असल्यामुळे सत्ता एकहातीच राहणार.

In reply to by श्रीगुरुजी

दिल्लीच्या शिंव्हासणातच ही दिफौल्ट भाषा दिसते. एकेकाळी औरंग्याने हेच ऐकवले होते. अगदी सेम डायलॉग.

In reply to by अभ्या..

औरंग्या, अफजुल्या, आदिलशहा, मोगलांची फौज . . . परत सुरू झालेलं दिसतंय. आता कोथळा, थडगं, छाताड, वज्रमूठ इ. सुरू होईल.

जेम्स वांड, त्याहून पुढे जाऊन, प्रभू रामचंद्रांनी तरी काय केलं जनतेसाठी? बाललीला झाल्यावर लग्न, मग वनवास अन मग पत्नी पळवून नेणाऱ्या विरुद्ध युद्ध! खर आणि दूषण या राक्षसांची नावं ऐकली असतील तुम्ही. वसिष्ठ आणि विश्वामित्र दोघांनीही रामलक्ष्मणांना शिक्षणासाठी विश्वामित्रांच्या आश्रमात जाऊ देण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा विश्वास सार्थ करीत या दोघांनी आश्रम क्षेत्रे राक्षसी पीडेपासून मुक्त केली. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी तुम्ही आता निलेश राणेंना जवळ केलाय का?

In reply to by विशुमित

दुशमन का दुशमन दोस्त होत्या हय!! डायलयाग नही सुन्या क्या? नितेश राणे व्यंगचित्र मस्त काढतात हे माहिती नव्हतं पण! सध्याच्या परिस्थितीवर भारी जमलंय!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

जरा हलकेच घ्या हो. मलिष्काचे विडंबन रॅप पाहिल्यानंतर सेना नेते भडकले तसे करू नका. विनोद, व्यंगचित्रे याचा आनंद घ्या. इथे दुश्मन, दोस्त याचा काही संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हाहाहा! भडकतंय कोण, मी तर स्तुती केली त्या व्यंगचित्राची! तुम्हीच सिरिअसली घेताय :) हे आसंच असतं बगा तुमचं, मलिष्का प्रकरणावर भाष्य करायचं म्हणून मी रागात, कैच्या कै! येवडा इनोद मारला आन तुमी आमालाच रागात मना! जरा विनोद, स्नॅपचॅट याचा आनंद घेत चला! नेते म्हणलं की भडकणं वगैरे आलंच, परवा ते स्नॅपचॅटवरून नेते भडकल्याचंही वाचण्यात आलं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

रागावला नाहीत ना. मग ठीक आहे. परवा ती पेडणेकर बाई मलिष्काला मूर्ख वगैरे म्हणाली. ढिंगटांग मध्येही बऱ्याचदा उधोजींची खेचली जात असल्याने सेना समर्थक चिडलेले असतात. म्हणून वाटलं की हे व्यंगचित्र पाहून तुम्हालाही राग आला की काय.

In reply to by श्रीगुरुजी

तिथेच गडबड आहे गुरुजी, सेना समर्थक चिडत असतील हो! काय आहे मी काही नेता नाहीये. शिवाय मी अंध भक्त किंवा अंध विरोधक ही नाहीये. मग कशाला येईल राग?

In reply to by श्रीगुरुजी

निरा आता व्यन्गचित्राकार केव्हापासून झाले. का धापले कुठून? :) .. सगळेच आजकाल बाळासाहेब होउ बघतात

श्रीगुरुजी,
Within this time, he said, they should send a delegation to Amritsar instructing the high priests to issue a hukumnama against the extremists; else he would enforce a social and economic boycott of them.
यालाच ठाकरी पद्धत म्हणतात. ही खूपश्या मराठ्यांना आवडते. भारतातल्या अनेकांना ती आवडू लागलीये. मात्र सगळ्यांना आवडावी असा आग्रह नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ठाकरी पद्धत, ठाकरी भाषा, राडा संस्कृती, शिवसेनेच्या पद्धतीने प्रश्न सोडवू, वाघाचा पंजा इ. शब्द आता हास्यास्पद झाले आहेत. मातोश्रीवर सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वातानुकुलीत खोलीत बसून वाईनचे घुटके घेत आणि पाईप चोखत काहीही बरळायचं आणि त्याचं ठाकरी भाषा म्हणून कौतुक करायचं हा विनोदी प्रकार आहे. २०१२ ला बाळ ठाकरे गेल्यानंतर १८-१९ वर्षांच्या दोन मुलींना धमकावण्यात या वाघांना मर्दुमकी वाटली होती. आता हे वाघ मलिष्काच्या मागे लागले आहेत. मलिष्काच्या घराची तपासणी करून तिथे डेंगूच्या अळ्या वगैर सापडल्या हे सेनेने जाहीर करणे अपेक्षितच होते. शिवसेना किती खालच्या थराला जाऊ शकेल याला मर्यादा नाही. अशीच तपासणी मातोश्रीची केली तर तिथे डेंगूच्या अळ्यांच्या बरोबरीने मेंदूत वळवळणार्‍या अळ्या आणि किडे सुद्धा सापडतील. मलिष्काच्या एका साध्या विडंबन रॅपचा शिवसेनेला प्रचंड धसका बसलेला दिसतो. बाळ ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रातून उपहास दाखविणे, हसतखेळत टीका करणे हे व्यंगचित्रकाराचे काम असते. उधोजींना ती समज दिसत नाही. मलिष्काच्या गाण्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला दिसतोय. तिने जर हे रॅप तयार केले नसते तर तिच्या घरी बंदुका आणि बाँब असते तरी ते ह्यांना सापडले नसते. पण तिने हे गाणे प्रसिद्ध केल्यामुळे यांची सटकली आणि लगेच तिच्या घराची तपासणी झाली. हे दिवसरात्र मोदी व फडणविसांच्या नावाने अत्यंत असभ्य भाषेत शंख करीत असतात. पण यांना एक शाकाहारी विडंबन गीत चालत नाही. एकंदरीत भारतामध्ये नाटकीपणाला व ढोंगीपणाला सीमा नाही हे केजरीवालांवरून दिसून येते. भारतामध्ये पोरकटपणाला सीमा नाही हे राहुलवरून समजते. भारतात आचरटपणाला सीमा नाही हे दिग्विजय सिंग वरून समजते. तसेच भारतात मूर्खपणाला सीमा नाही हे टी-गँग वरून समजते.

In reply to by श्रीगुरुजी

सेना नेत्याना प्रत्येक गोष्टीत "डाव " का दिसतो? एकुणच या सरवणकर महोदयांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बाकी ते " मैद्याचं पोतं , बारामतीचा पैलवान , खंडोजी खोपडे , नारोबा ," या पदव्यांना काय म्हणायचे? तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढीला.....

आत्ता च वाचलेल्या बातमीनुसार या RJ च्या घरी महानगरपालिकेच्या लोकांनी जाऊन झडती घेतली व तिथे डास अळ्या वगैरे शोधल्या म्हणे . म्हणजे ज्या गाण्यात साधं शिवसेनेचं नावही घेतल नाही व विनोदाने जे गाणे तयार केले त्यातही आता हे चिवसैनिक घाणेरडे राजकारण करत आहेत. म्हणजे महानगरपालिकेविरुद्ध काहीही बोलण्याची कुणाला परवानगी नाही नाहीतर ह्यांचे गुंड तयार आहेतच . यातूनच शि(व)सेना हा बौद्धिक व राजकीय दृष्ट्या किती नीच पातळीला पोचलेला पक्ष आहे हे दिसून आले. सैनिकांनी आता RJ किंवा महानगपालिकेविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हे काम सेनेने केलेल्या कामच्या यादीत टाकण्यास हरकत नाही

In reply to by सुज्ञ

सैनिकांनी आता RJ किंवा महानगपालिकेविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हे काम सेनेने केलेल्या कामच्या यादीत टाकण्यास हरकत नाही सेनेचे अजून एक भरीव काम!

भाजप+शिवसेना वि. कॉन्ग्रेस मधुन कॉन्ग्रेस बाजुला होवुन जेव्हा भाजप आणी शिवसेना असा प्रकार झाला तेव्हा एकत्रित युतीला नाव ठेवणारे आता फक्त आणी फक्त भाजपला दुषणं देत आहेत. कमाल है भाई (और बहन भी) !

'बीएमसीवर भरवसा नाय काय' या झी २४ तासच्या विशेष कार्यक्रमात आज आमदार नितेश राणे, मनसेचे संदीप देशपांडे आणि भाजपचे केशव उपाध्ये यांनी अत्यंत मुद्देसूद आपले विचार मांडले. शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकरने झी २४ तासच्या चर्चेतून पळ काढला. नक्की येतो सांगितलेल्या पेडणेकर बाईंची खुर्ची शो संपेपर्यंत संपादक उदय निरगुडकर यांनी रिकामी ठेवली. आणि यांचा पळपुटेपणा जनतेसमोर आणला. खरंतर या बाईंना आजवर मी कधी मुद्द्यावर बोलताना बघितलं नाही. समोरच्याना अरेतुरे करून हमरीतुमरीवर येऊन शो मध्ये वाद घालायचे हीच या बाईंची आजवरची प्रवक्तेगिरी. दुसरीकडे म्हणे या पेडणेकर बाईंनी मलिष्काला उत्तर द्यायला गाणे रचले. आम्ही पाहिले ते गाणे. धड गाणं पण बनवता येत नाही या बाईंना. ना सूर, ना ताल, ना कुठले यमक जुळले. ते गाणं पण मुंबईतल्या नालेसफाई सारखं आणि खड्ड्यांसारख खडबडीत...

In reply to by सुज्ञ

ह्यावेळी सेनेचे चुकलेच राव, त्या आरजेची काय राजकारणाची समज असणारे, बरं ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला तरी एफएम चॅनलने राजकीय भाष्ये करू नयेत, निदान मनोरंजनाच्या चॅनेल्स नी तरी , हा अलिखित संकेत तिला माहीत नसावा. शिवाय चॅनेल डीबी ग्रुपचे, मग तर बोलायलाच नको. एकवेळ प्रहार परवडला पण डीबी नको असा प्रकार आहे. बरं हाये क्रियेटीव्हीती तिच्यात तर तिलाच सुपारी देऊन "मोदी, तुमचा पब्लिक वर भरोसा नाय काय" अशीही व्हर्जन काढून एटीम, बँका, पंप, ग्यास एजंसया अशा ठिकाणी रेग्युलरली वाजवता आली असती. अवघड आहे राव.

In reply to by अभ्या..

आयला, खराब रस्त्यांबद्दल एका गाण्याच्यामार्फत तक्रार करणे हे राजकीय भाष्य?? बर या आख्या गाण्यात शिवसेनेचं कुठेही नाव देखील नव्हतं घेतलं.

In reply to by मोदक

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची शिवसेनेची व्याख्या काय आहे..?
लोकाना खंडोजी खोपडे , लखोबा लोखंडे , नार्‍या , अफझलखान म्हणणे , लोकाना शाई फासणे म्हणजे अभिव्यक्ती स्वतन्त्र्य असे त्याना म्हणायचे असेल.

In reply to by विजुभाऊ

तलवार, वाघनखे, दांडपट्टा, बिचवे, गद्दार, पिसाळ झालच तर बांबु, पोकळ बांबु गुप्त्या, कोयता हे राहिले काय ??????????????????????

In reply to by अनुप ढेरे

अर्थात, रुल किंवा नियम नाहीये तसा आणि आहे तो इतका अंधुक आहे की त्यातून पळवाटा काढणे खुप सोपे आहे. कम्युनिटी रेडीओजवर आणि एफेमचॅनेल्सवर ट्राफिक सोडून न्युज म्हणूनच अलाऊड नाहीयेत. ते चॅनेल सुरु करताना एज्युकेशनल अथवा मनोरंजन अशा पध्दतीनेच चालवावे अशी अपेक्षा असते. एजुकेशनलवाल्यांना जाहीराती न घेण्याचे बंधन आहे. कारण कमर्शिअल व्ह्यु असु नये म्हणून. पोलिटिकल पार्टीज ना पण अलाऊड नाहीये चॅनेल चालवणे. सोशल इश्श्युज रेज करणे चालतेच पण बीएमसी हे कोण चालवते ते सर्वाना माहीतीये. रस्त्यात झोल हा सरळ आरोप झाला. ऑथॉरीटीजची पोलखोल करा हे आवाहन मनोरंजनाच्या नावाखाली ब्रॉडकास्ट करणे, एंटरटॅनमेंट लिसनरचा आधार घेऊन सर्वत्र करणे हे पटत नाही. प्रुव्ह करा रस्त्यात बीएमसीने झोल केला मग गाणे काय श्रुतिका पण चालेल. हेच गाणे एखाद्या चित्रपटात सेन्सॉर चालू देईल का ह्याचा विचार करा. मग ब्रॉडकास्टिंग फॅसिलिटी आहे म्हणून त्याचा वापर असा करणे पटत नाही. एखाद्या ग्रुपने ते बनवून युट्युबवर टाकणे वेगळे आणि चॅनेलच्या एम्प्लॉयी आरजेने ते एंंटरटेनमेंट चॅनेलथ्रु ब्रॉडकास्ट करणे ह्यात निश्चितच फरक आहे.

In reply to by अभ्या..

तसं असेल तर मग सेनेने रडीचा डाव खेळणे सोडून आणि बालिशपणा सोडून रेड एफएम विरूद्ध रीतसर पोलिसात किंवा न्यायालयात तक्रार करावी.

In reply to by अभ्या..

प्रुव्ह करा रस्त्यात बीएमसीने झोल केला
कृष्णा देसाई / रमेश किणी प्रकरण , बोफोर्स ही सुद्धा कधीच प्रुव्ह झाले नाही

In reply to by अभ्या..

ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला तरी एफएम चॅनलने राजकीय भाष्ये करू नयेत, निदान मनोरंजनाच्या चॅनेल्स नी तरी , हा अलिखित संकेत तिला माहीत नसावा. अलिखित संकेत म्हणजे कायदा नव्हे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार मनोरंजनाच्या वाहिन्यांनी राजकीय भाष्य करायला बंदी घातली आहे ते सांगता का जरा? मुळात मलिष्काच्या त्या विडंबन गीतात राजकीय भाष्य नव्हतेच. असले तर कोणत्या ओळीत राजकीय भाष्य आहे ते सांगा. मुंबईतील रस्ते, वाहतूक इ. च्या दुरावस्थेवर तिने विंडबन केले होते. या गीतावर शिवसेना इतकी का चवताळली आहे हे अनाकलनीय आहे.

In reply to by अभ्या..

अत्यंत बालिश प्रकार! या प्रकारावर खरंतर सेनेच्या नेतृत्वाने त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना समज देणे गरजेचे होते, तिथे हे नेतृत्व स्वतःही तेच करत आहे. काहीही कारणच नव्हते मुळी त्या विडिओवर/गाण्यावर बोलण्याचे! त्याच गाण्यात मुंबईच्या लोकल व्यवस्थेवर आणि पर्यायाने भाजपच्या अखत्यारीतील रेल्वे खात्यावर पण टीका आहेच ना. कुठली गोष्ट दुर्लक्ष करण्यात फायदा आहे ही साधी गोष्ट कळू नये? वरून कायदेशीर कारवाई करण्याचे ते पत्र हास्यास्पद प्रकार आहे.

थोडक्यात शिवसेना या पक्षाची बौद्धिक कुवत आज दिसून आली. एका मलिश्काने अक्खी शिवसेना गार केली..... असे म्हणायला हरकत नाही. वाघ डरकाळ्या वाघनखे वगैरे यांचीच यांच्या.. ... . असो .

In reply to by सुज्ञ

हे वाघबिघ नसून दुगाण्या झाडणारी आणि भेसूर रेकणारी गाढवे आहेत. हे कायम शेपटीला लवंगीचा सर लागल्यासारखे दुगाण्या झाडत, भेसूर रेकत सैरावैरा धावत असतात.

In reply to by अभिदेश

"अडला नारायण . . ." ही म्हण ऐकली असेलच. जोक्स अपार्ट, अडेलतट्टू गाढवाला पाठीत रट्टा घालूनच उठवावे लागते. शहांनी मातोश्रीवर जाउन वाघोबांच्या पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले.

In reply to by श्रीगुरुजी

शहांनी मातोश्रीवर जाउन वाघोबांच्या पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले. .... आतापर्यंत तुम्ही लिहिलेल्या मेगाबायटी , गिगाबायटी प्रतिसादात हा सगळ्यात विनोदी प्रतिसाद. अख्या महाराष्ट्रात फक्त तुमच्याच कानात शहांनी हे सांगितलेले दिसतंय. मदतीच्या याचनेला तुमच्या भाषेत पाठीत रट्टा घालणे म्हणतात वाटत. "अडला नारायण . . ." ही म्हण ऐकली असेलच. ... पण तुमच्या सगळ्या मेगाबायटी , गिगाबायटी प्रतिसादा नुसार , तुम्ही अडलेले नाही आहात ना? मग कशाला पाय धरताय ? आणि एकदा पाय धरण्याचेही म्हणताय आणि लगेच पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले , असंही म्हणताय . नक्की काय बोलायचे ते एकदा शहांना विचारा बुवा. नाहीतरी तुमची हॉट लाईन आहेच .

In reply to by अभिदेश

पाय धरलेच नव्हते. हिसका दाखवायला गेले होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे दगाबाजी करायचा विचार होता. मनाला येईल ती नावे सुचवित होते. आधी प्रणव मुखर्जींंनाच परत राष्ट्रपती करा म्हणत होते. नंतर मोहन भागवतांचं नाव आणलं. नंतर स्वामीनाथन् यांचं नाव आणलं. नंतर म्हणायला लागले की आधी नाव सांगा. त्यानंतर पाठिंब्याचं ठरवू. जेव्हा रामविलास पास्वान म्हणाले की हे नाव ठरविण्याचे सर्वाधिकार मोदींना द्यावेत, तेव्हा यांनी विरोध केला आणि आम्ही आमच्या मताप्रमाणे कोणाला पाठिंबा द्यायचा ते नंतर ठरवू असे म्हणाले. नंतर शहांच्या भेटीनंतर लगेच कोणतीही खळखळ न करता विनाअट आपला पाठिंबा जाहीर केला. महिनाभर फुशारक्या मारणारा अडेलतट्टू एका भेटीत वठणीवर आला.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी , तुम्हाला वाटत नाही का तुमचे प्रतिसाद हास्यास्पद होत चालले आहेत ? नाव आधी सांगा ही मागणी चुकीची नाही ? नंतर शहांच्या भेटीनंतर लगेच कोणतीही खळखळ न करता विनाअट आपला पाठिंबा जाहीर केला. लगेच ? मला तरी असे काही वाचल्याचे आठवत नाही.राष्ट्रपतिपदाचा उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यावरच पाठिंबा दिला ना? आणि शहांनी त्यांना उमेदवाराचे नाव सांगितले नसेलच हे कशावरून ?

In reply to by अभिदेश

गुर्जी, नका हो इतकी डिटेल माहिती ठेवू सेनेची. इतकी विरोधीभक्ती तुम्हाला पुढचा जन्म कट्टर शिवसैनिकांचा मिळेल बरे. आदित्यसाहेबांच्या मुलाची युवासेना अशाच एका कट्टर प्रवक्त्याची वाट बघतेय. ;)