Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Tue, 07/11/2017 - 20:03
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही. पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती. सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर. बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले. त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला. सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही. लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे. शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत. हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते. या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे. मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले ( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
  • Log in or register to post comments
  • 119196 views

प्रतिक्रिया

Submitted by अनुप ढेरे on Mon, 07/17/2017 - 12:12

In reply to समज by गॅरी ट्रुमन

Permalink

आता आयायटी गांधिनगर पण आहे

आता आयायटी गांधिनगर पण आहे गुजरातेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Mon, 07/17/2017 - 12:36

In reply to आता आयायटी गांधिनगर पण आहे by अनुप ढेरे

Permalink

हो

आता आयायटी गांधिनगर पण आहे गुजरातेत.
हो गेल्या काही वर्षात अनेक राज्यांमध्ये नव्या आय.आय.टींची स्थापना झाली आहे. या यादीमध्ये त्यांचा समावेश मुद्दामून केला नाही कारण (माझ्या माहितीप्रमाणे) ती आय.आय.टी गुजरातमध्ये यावी यासाठी गुजरातच्या राज्यकर्त्यांनी किंवा उद्योजकांनी विशेष प्रयत्न केले नव्हते. केंद्र सरकारच्या अनेक नव्या आय.आय.टी स्थापन करायच्या धोरणात गुजरातलाही आय.आय.टी मिळाली. तसेच सुरतमध्ये एन.आय.टी (पूर्वीचे रिजनल इंजिनिअरींग कॉलेज) आहे. त्याचा पण समावेश त्या यादीत केला नाही कारण केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक राज्यात एक एन.आय.टी आहे. महाराष्ट्रातही नागपूरला, मध्य प्रदेशात भोपाळला, कर्नाटकात सुरथकलला इत्यादी ठिकाणी अशा एन.आय.टी आहेत. ते कॉलेज गुजरातमध्ये यावे यासाठी गुजरातच्या राज्यकर्त्यांनी किंवा उद्योजकांनी विशेष प्रयत्न केल्याचे मला तरी माहित नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 07/16/2017 - 14:17

In reply to तुमच्या पूर्वग्रहदोषीत by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

मी कुठल्याही साईटवरून कॉपी

मी कुठल्याही साईटवरून कॉपी करतोय याच्याशी काहीही संबंध नसावा त्यामुळे त्याचा उल्लेख तुम्हाला ह्या योजना काय होत्या याची माहिती नकोच आहे त्यामुळे तुम्ही फाटे फोडता या मताकडे घेऊन जातो. संबंध आहे. शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचलून इथे जे लिहिले आहे त्याच्यावर मी किंवा इतरांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी अपेक्षा आहे का? मी कोणत्याच पक्षाच्या संकेतस्थळावर/मुखपत्रात काय लिहिले आहे त्यावर डोळे झाकीन विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही इथे शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचललेली शिवसेनेच्या भरीव (!) कामांची यादी इथे टाकली आहे त्यावर आंधळेपणाने निदान मी तरी विश्वास ठेवणार नाही. शिवसेनेची एक गंमत तुम्हाला माहिती नसावी. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात (चुकलो. वचननाम्यात असा शिवसेनेचा शब्द होता. जसे सेनेने जलयुक्त शिवार या योजनेचे आपल्यापुरते शिवजलक्रांती असे नामांतर केले आहे, तसेच इतर पक्ष ज्याला जाहीरनामा म्हणतात त्याला शिवसेना वचननामा असे संबोधते) आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ८०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. नंतर २००४ च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या वचननाम्यात आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ९०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. हे १९९९-२००४ या काळात सत्तेवर नसताना ही जास्तीची १०% आश्वासने कशी काय पूर्ण केली हे खुदा जाने. सांगायचा मुद्दा असा की राजकीय पक्षाने स्वत: केलेल्या दाव्यांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. चला मान्य करू कि शिवसेनेने कामे केलेली नाहीत. आता हा भाजपचा धागा नाहीये वगैरे पळपुटेपण तुम्ही करणारच नाहीत, त्यामुळे सांगा बरं पटापट कि कुठली भाजपची कामे तुम्हाला आवडतात. अजून किती वेळा सांगायचं की हा धागा भाजपवर नसून शिवसेनेवर आहे. भाजपच्या कामासंदर्भात मिपावर अनेक धागे निघाले आहेत व काही अजूनही जिवंत आहेत. तिथे भाजपच्या कामगिरीवर प्रचंड दळण दळले गेले आहे. वाटल्यास त्या धाग्यांच्या उरल देतो, पण इथे ते पुन्हा टाकणे योग्य होणार नाही. त्यामुळे धाग्याचा शिवसेना हा विषय भरकटून भाजप हा विषय चघळला जाईल. बाकी तुम्ही कॉम्पुटर लिटेरेट असालच असा माझा कयास आहे त्यामुळे उगाचच वायफळ (अज्ञानमुलक) फाटे फोडण्यापेक्षा त्या योजनांबद्दल माहिती तुम्ही काढू शकालच याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाहीये. त्यामुळे माहिती शिवसेनेच्या साईटवर आहे म्हणून खोटी वगैरे अंध विरोधकांची लक्षणे पण तुम्ही दाखवणार नाहीत याबद्दल खात्री आहेच. मी वर दिलेल्या शिवसेनेच्या भरीव (!) कामांची माहिती काढायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ "क्रीडापीठ" हे नक्की काय आहे हे बराच वेळ गुगलून पाहिल्यावर त्याबद्दल काहीच मिळाले नाही. तुम्ही शिवजलक्रांती या योजनेची दिलेली चित्रफीत सुद्धा २-३ वेळा पाहिली. शिवसेनेने केलेल्या भरीव (!) कामांची माहिती कोठे मिळेल (शिवसेनेचे संकेतस्थळ व वचननामा सोडून इतरत्र) ते सांगा. फक्त एक निरीक्षण नोंदवतो आणि रजा घेतो, तुमच्यासारख्या अभ्यासू आयडीचा ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यास कमी पडतोय. ते झुणका भाकरी योजनेचा अभ्यास करणे तर फार गरजेचं आहे. काय आहे एखाद्या पक्षाचा विरोध करणं वेगळं आणि त्या पक्षाच्या एखाद्या चांगल्या योजनेचा विरोध करणं वेगळं! अशातूनच लोकं मागच्या सरकारच्या 108 योजनेचा पण अंधपणे विरोध करतात. झुणका भाकरी योजना किंवा वडापावच्या गाड्या (दोन्ही गोष्टी बेकायदेशीर जागेत) ही सेनेच्या रोजगारनिर्मितीची सर्वोच्च कल्पना. असल्या गोष्टी करण्याऐवजी सेना नेत्यांनी सहकारी कारखाने, महाविद्यालये, डेअर्‍या अशा गोष्टी सुरू केल्या असत्या तर कितीतरी जास्त प्रमाणात स्थायी स्वरूपाची रोजगार निर्मिती झाली असती. झुणका भाकरी केंद्रात आधी लिहिल्याप्रमाणे झूणका भाकरी ऐवजी बिसलेरीच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्यांची माळ, बिस्किटांचे पुडे अशा गोष्टी दिसायच्या. यातली बहुसंख्य केंद्रे १९९९ नंतर बंद झाली. बाबा आढावांनी १९७५ मध्ये सुरू केलेले मंडईतील मूळ झुणकाभाकरी केंद्र अनेक दशके सुरू होते (ते बहुतेक अजूनही सुरू आहे). त्याचीच नक्कल करून कोपर्‍याकोपर्‍यावर उभी केलेली बेकायदेशीर झुणकाभाकर केंद्रे केव्हाच बंद झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on Mon, 07/17/2017 - 11:16

In reply to मी कुठल्याही साईटवरून कॉपी by श्रीगुरुजी

Permalink

नक्कीच

हेच म्हणायचे होते .
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 07/17/2017 - 12:40

In reply to मी कुठल्याही साईटवरून कॉपी by श्रीगुरुजी

Permalink

पुरावे नसताना बेछूट विधाने

पुरावे नसताना बेछूट विधाने करणे हा बऱ्याच लोकांचा हातखंडा असतो त्यामुळे त्यात काही नवल नाही ते एक असोच! प्रतिसाद नीट वाचत चला हि वारंवार केलेली विनंती धुडकावून भारंभार शब्दाचे ढीग ओतणे आवडत असल्यास काय करणार? मी कुठेही तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सांगितले नाही तरी तुमचा पोकळ दावा चालूच आहे. मी तुम्हाला मुद्दे सांगितले, तेही तुम्ही स्वतःहून कुठलाही अभ्यास न करता पूर्वग्रहदूषित मते मांडत आहात म्हणून. यावरून मला ती गुरु शिष्याची गोष्ट आठवली, पालीची. पाल खायचीच आहे, मग ती परतून खायची आहे मग ती अर्धी करून खायची आहे वगैरे! वचननामा: थोडक्यात काय वचननामा म्हणा किंवा जाहीरनामा म्हणा तुम्ही काटेकोरपणे पाहता तर आणि त्यानुसार कोणत्या पक्षावर टीका करायची ते ठरवता! सामान्य नागरिकांनी हे करणं कौतुकास्पदच आहे. मग काढायचे काय जाहीरनामे मागचे सगळ्यांचे (हा शिवसेनेचा धागा आहे वगैरे कारणे द्यायची असतील दुसरा धागा काढा किंवा कुठल्याही राजकीय धाग्यावर जिथे या विषयाशी संबंधित चर्चा होईल तेव्हा टाका नाहीतर उगाच एकांगी टीका काय कोणीही करतं)? क्रीडापीठ: १९९५ सालच्या किती गोष्टी आंतरजालावर आधारित आहेत हो? हि योजना बदलत बदलत आजच्या सरकारच्या क्रीडा खात्यात आहे काय कि बंद पडली किंवा दुसऱ्या नावाने सुरुच आहे याची कुठे माहिती मिळतेय का बघा, मला वाटते माहिती मिळत नाही नाही म्हणून एखादी गोष्टच खोटी वगैरे असले पोकळ दवे सहज करता येतात. म्हणजे मी तरी तसंच करतो माहिती मिळत नाही म्हणजे दोनही बाजू असू शकतात, चालली नाही योजना किंवा चालली. दोन्हीची शक्यता गृहीत धरायला अडचण कसली? बाकी इतर बाकीच्या योजनांची माहिती मिळाली कि नाही? झुणका भाकरी आणि शिवसेनेचे सहकारी कारखाने वगैरे - पुरावे कशाचेही नाहीत, स्वतःच्या घराबाजूची कुठली टपरी बेकायदा होती वगैरे पुरावे तर नसतीलच वरून महाराष्ट्रभर तहसील कार्यालयाच्या आत उघडण्यात आलेली झुणका भाकर केंद्रे सुद्धा बेकायदेशीरच, दुर्दैवाने तुमच्या गल्लीच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे! टपरी आणि गुटख्याच्या माळा! त्या टपरीचालकाने काय ठेवावे हे सरकारच्या योजनेत लिहायला हवं होतं? हास्यास्पद पूर्वग्रहदूषित मते! एखाद्या पक्षाच्या नेत्याने स्वतःच्या फायद्यासाठी काढलेल्या संस्था म्हणजे त्या पक्षाचे रोजगारनिर्मितीचे धोरण? महाराष्ट्रातल्या कोणत्या डेअऱ्या, कारखाने कोणत्या नेत्याचे आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा अभ्यास असेल तर तो टाका इथे. नाही म्हणजे हा भाजपचा धागा आहे वगैरे पळपुटेपणा तुम्ही करणार नाहीत असे वाटले होते पण शेवटी तुम्ही फाटा फोडलातच. जरा भाजपच्या किंवा इतर दोन मुख्य पक्षांच्या आतापर्यंतच्या ५-५० वर्षाच्या कामगिरीचा कोणता धागा तुम्ही संदर्भासाठी वापरात आहेत त्याची लिंक द्याल का प्लिज? वाचून घेतो. आणि हो, झुणका भाकर योजनेचा अभ्यासही राहिला आहे. झुणका भाकर आणि रोजगार निर्मिती? झुणका भाकरी केंद्रे का बंद झाली १९९९ नंतर याचा अभ्यासही गरजेचा आहेच, त्यामुळे अभ्यास वाढवा!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 07/17/2017 - 15:31

In reply to पुरावे नसताना बेछूट विधाने by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

मी तुम्हाला मुद्दे सांगितले,

मी तुम्हाला मुद्दे सांगितले, तेही तुम्ही स्वतःहून कुठलाही अभ्यास न करता पूर्वग्रहदूषित मते मांडत आहात म्हणून. मी आधीच सांगितलंय की शिवसेनेच्या भरीव कामांचे जे दावे केले जात आहेत ते मी तपासून त्यातील सत्यता तपासायचा प्रयत्न केलेला आहे. उगाच हवेत बाण मारलेले नाहीत. मग काढायचे काय जाहीरनामे मागचे सगळ्यांचे (हा शिवसेनेचा धागा आहे वगैरे कारणे द्यायची असतील दुसरा धागा काढा किंवा कुठल्याही राजकीय धाग्यावर जिथे या विषयाशी संबंधित चर्चा होईल तेव्हा टाका नाहीतर उगाच एकांगी टीका काय कोणीही करतं)? काढा की सगळ्यांचे जाहीरनामे. मी कधी त्याला विरोध केलाय? हा शिवसेनेचा धागा आहे हे सत्यच आहे. इथे भाजपची कामगिरी, शेकापची कामगिरी, अद्रमुकची कामगिरी, मनसेची कामगिरी इ. गोष्टी दळायला सुरूवात केली तर धागा त्या दिशेने भरकटत जाईल. क्रीडापीठ: १९९५ सालच्या किती गोष्टी आंतरजालावर आधारित आहेत हो? हि योजना बदलत बदलत आजच्या सरकारच्या क्रीडा खात्यात आहे काय कि बंद पडली किंवा दुसऱ्या नावाने सुरुच आहे याची कुठे माहिती मिळतेय का बघा, मला वाटते माहिती मिळत नाही नाही म्हणून एखादी गोष्टच खोटी वगैरे असले पोकळ दवे सहज करता येतात. म्हणजे मी तरी तसंच करतो माहिती मिळत नाही म्हणजे दोनही बाजू असू शकतात, चालली नाही योजना किंवा चालली. दोन्हीची शक्यता गृहीत धरायला अडचण कसली? बाकी इतर बाकीच्या योजनांची माहिती मिळाली कि नाही? १९९५ च्या बर्‍याचश्या गोष्टी आंतरजालावर नाहीत हे सत्य आहे. परंतु त्या काळात घडलेल्या (किंवा त्यापूर्वीची घडलेल्या) महत्त्वाच्या घटनांबद्दल किंवा त्या काळात सुरू झालेल्या व अद्यापही सुरु असलेल्या योजनांबद्दल आंतरजालावर वाचायला मिळते. आता ही क्रीडापीठ नावाची योजना तितकी महत्त्वाची नसेल, किंवा त्या योजनेमुळे फारसे काही घडलेच नसेल किंवा काही काळानंतर त्या योजनेचा बोजवारा उडून ती लगेचच संपुष्टात आली असेल तर आजच्या काळात त्या योजनेविषयी वाचायला मिळणे अवघड आहे. ज्या योजनेबद्दल शिवसेनेच्या संकेतस्थळाशिवाय इतरत्र उल्लेख नाहीत ती योजना खरोखरच अस्तित्वात होती किंवा शिवसेनेने केलेले ते एक भरीव काम होते यावर कसा विश्वास ठेवायचा? झुणका भाकरी आणि शिवसेनेचे सहकारी कारखाने वगैरे - पुरावे कशाचेही नाहीत, स्वतःच्या घराबाजूची कुठली टपरी बेकायदा होती वगैरे पुरावे तर नसतीलच वरून महाराष्ट्रभर तहसील कार्यालयाच्या आत उघडण्यात आलेली झुणका भाकर केंद्रे सुद्धा बेकायदेशीरच, दुर्दैवाने तुमच्या गल्लीच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे! टपरी आणि गुटख्याच्या माळा! त्या टपरीचालकाने काय ठेवावे हे सरकारच्या योजनेत लिहायला हवं होतं? हास्यास्पद पूर्वग्रहदूषित मते! एखाद्या पक्षाच्या नेत्याने स्वतःच्या फायद्यासाठी काढलेल्या संस्था म्हणजे त्या पक्षाचे रोजगारनिर्मितीचे धोरण? महाराष्ट्रातल्या कोणत्या डेअऱ्या, कारखाने कोणत्या नेत्याचे आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा अभ्यास असेल तर तो टाका इथे. नाही म्हणजे हा भाजपचा धागा आहे वगैरे पळपुटेपणा तुम्ही करणार नाहीत असे वाटले होते पण शेवटी तुम्ही फाटा फोडलातच. जरा भाजपच्या किंवा इतर दोन मुख्य पक्षांच्या आतापर्यंतच्या ५-५० वर्षाच्या कामगिरीचा कोणता धागा तुम्ही संदर्भासाठी वापरात आहेत त्याची लिंक द्याल का प्लिज? वाचून घेतो. आणि हो, झुणका भाकर योजनेचा अभ्यासही राहिला आहे. झुणका भाकर आणि रोजगार निर्मिती? झुणका भाकरी केंद्रे का बंद झाली १९९९ नंतर याचा अभ्यासही गरजेचा आहेच, त्यामुळे अभ्यास वाढवा! झुणका भाकर केंद्राचे निमित्त करून कोपर्‍याकोपर्‍यावरील सार्वजनिक जागा ढापल्या गेल्या होत्या. या केंद्राचा मूळ उद्देश १ रूपयात झुणकाभाकरीचे पोटभर जेवण देणे हा होता. प्रत्यक्षात काही काळातच या केंद्रांचे रूपांतर इतर गोष्टी विकणार्‍या टपरींमध्ये झाले. कोणत्याही नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी डेअरी, कारखाना, शिक्षणसंस्था काढली तरी त्याचा इतरांना फायदा होतोच. पुण्यात येऊन पंतगराव कदमांनी भारती विद्यापीठ सुरू करून आपल्या गावाकडच्या अनेकांना तिथे नोकर्‍या दिल्या. पुण्यातील देखील अनेकांना तिथे नोकर्‍या मिळालेल्या आहेत. पंतगरावांनी तिथे बक्कळ कमावले ही गोष्ट खरी आहे, पण इतरांना देखील त्याचा फायदा झाला हे नाकारता येईल का? शिवसेनेने निदान स्वतःच्या स्वार्थासाठी असे काही केले का? झुणका भाकर केंद्रे, वडापावच्या गाड्या जागा दिसेल तिथे उभे करणे व त्याला स्थानिक नेत्यांचे पाठबळ असल्याने कारवाईची भीति यातून काय साध्य झाले? सरकार बदलले अशा गाड्यांवर/केंद्रांवर कारवाई सुरू होते. पोलिसांची, स्थानिक दादांची खंडणी तर असतेच. बाकी भाजपच्या कामगिरीविषयी वाचायचं असेल तर अगदी अलिकडेच "मोदी सरकारची ३ वर्षे" या शीर्षकाचा धागा निघाला आहे. तिथून वाचायला सुरूवात करा. नंतर नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा संप, तुकाराम मुंढे, करण जोहरच्या सिनेमावरील बंदी इ. विषयांवर अनेक धागे आहेत. ते नजरेखालून घाला. मोदींच्या पहिल्या वर्षानंतर मीच एक धागा काढला होता. तो धागा तब्बल १ वर्षे वाहत होता. त्यात केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारच्या कामगिरीवरही प्रतिसाद आहेत. भाजपच्या बरोबरीने इतर पक्षांच्या संदर्भातही दळण दळले गेले आहे. तेही वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 07/17/2017 - 16:04

In reply to मी तुम्हाला मुद्दे सांगितले, by श्रीगुरुजी

Permalink

अर्थातच, असहमतीवर सहमती! मला

अर्थातच, असहमतीवर सहमती! मला मोदींचे आणि भाजपचे तीन वर्षातील कामे माहिती आहेत, त्यामुळे बिनबुडाचे प्रश्न पडत नाहीत! अभ्यासासाठी, शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 07/17/2017 - 16:47

In reply to अर्थातच, असहमतीवर सहमती! मला by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

मलासुद्धा सेनेची ५१ वर्षातील

मलासुद्धा सेनेची ५१ वर्षातील भरीव (!) कामगिरी माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 07/17/2017 - 17:21

In reply to मलासुद्धा सेनेची ५१ वर्षातील by श्रीगुरुजी

Permalink

हायला भाजपने तीन वर्षे कामे

हायला भाजपने तीन वर्षे कामे केली नाहीयेत असे म्हणत आहात कि काय? नाही सरकास्टिक प्रतिक्रिया टाकली आहे म्हणून म्हणालो.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 07/17/2017 - 12:53

In reply to मी कुठल्याही साईटवरून कॉपी by श्रीगुरुजी

Permalink

बाकी तुमचं मत पक्कं

बाकी तुमचं मत पक्कं असल्यामुळे यावरही तुमचे काही मुद्दे येतीलच पण उगाच अभ्यास न करता मुद्दे टाकून प्रतिसाद वाढवण्यात अर्थ नाही. मी आधीच मान्य केलेले आहे कि शिवसेनेने तुम्हाला आवडण्यासारखी काहीच कामे केलेली नाहीत. शिवसेनेचे सध्याचे धोरण बोगस वाटणे आणि शिवसेनेने काहीच काम केले नाही वाटणे यावर आपली सहमती होणार नाही असे वाटत असल्यामुळे असहमतीवर सहमती करण्यास हरकत नसावी!
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Mon, 07/17/2017 - 14:12

In reply to बाकी तुमचं मत पक्कं by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

तुमचे सगळे प्रतिसाद वाचले

तुमचे सगळे प्रतिसाद वाचले हातोळकर साहेब, तुमचा समतोल दृष्टिकोन आवडला हे वेगळं सांगत नाही, तसे तुमच्या संयमाचे कौतुक करतो मी. ह्याच धाग्यात श्रीगुरुजी ह्यांनी 'बाळासाहेब/शिवसेनेनं' १९८४ च्या शीख नरसंहाराच्या वेळी मुंबईतल्या शिखांना 'खंडणी घेऊन' अभयदान दिल्याचे एक प्रचंड मोठं विधान सुचक रित्या केलं आहे, त्याचे पुरावे मागूनही अद्याप इतक्या मोठ्या आरोपाला सिद्ध करणारा एकही पुरावा त्यांनी सादर केलेला नाही, त्यामुळे त्यांचा अजेंडा काय ते स्पष्ट होते पुरेसे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 07/17/2017 - 19:43

In reply to तुमचे सगळे प्रतिसाद वाचले by जेम्स वांड

Permalink

पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे

पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे हे राजकारणात होत नाही. बोफोर्सचं लफडं अजूनही डोकं वर काढतंय. बाकी बोफोर्स किंवा गेला बाजार सिंचनात घोटाळा झालाच नाही असे आपण म्हणणार का? जाता जाता -- बाळासाहेबांची एक आठवण. बाळासाहेबांचा बायपास डॉ नीतू मांडके यांनी केला. घरी( मातोश्री) गेल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांची टीम बाळासाहेबांना मातोश्री वर जाऊन सल्ला आणि उपचार देत असत. त्यातील एक डॉक्टर माझे अत्यंत जवळचे आहेत. त्यांनी सांगितलेला हा किस्सा. एक दिवस बाळासाहेबांनी याना विचारले डॉक्टर वाईन मध्ये रेड वाईन चांगली कि व्हाईट? यावर डॉकटर म्हणाले कि तुमचा बायपास झाला आहे कुठलीच दारू तुम्ही पिऊ नये. बाळासाहेब आपल्या स्टाईल मध्ये म्हणाले कि दारू चांगली कि वाईट हा मुद्दा नाहीच रेड वाईन कि व्हाइट एवढंच सांगा. डॉक्टर यावर म्हणाले व्हाईट वाईन पेक्षा रेड वाईन चांगली. कारण त्यात रेसव्हेरेट्रोल नावाचे द्रव्य असते ज्यामुळे हृदय विकाराला थोडा प्रतिबंध होतो. बाळासाहेब त्यांना "म्हणाले" डॉक्टर आजपासून बाहेरच्या लोकांना व्हाईट वाईन"च" चांगली "असेच सांगायचे" याचा "पुरावा" मागू नका. आमचे वडील बाळासाहेबांना बऱ्यापैकी ओळखत होते आणि त्यांची काही वेळेस भेटही झाली होती. त्यांचे राजकारण वडिलांना चांगले माहित होते आणि पटतही नव्हते तरी माणूस "उमदा आणि हिमतीचा आहे/ होता" असेच त्यांचे आजही मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 07/18/2017 - 08:28

In reply to पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे by सुबोध खरे

Permalink

गल्लत होते आहे का डॉक्टर काका

गल्लत होते आहे का डॉक्टर काका? तुम्ही दिलेलं व्हाइट वाईन/रेड वाईनचं उदाहरण, किंवा तुमच्या पिताजींची असलेली बाळासाहेबांशी ओळख, हे 'वैयक्तिक डोमेन' झालं हो, त्याचे पुरावे मागणाऱ्याचे डोके ठिकाणावर नाही हे मी स्वतः म्हणेल ह्याची खात्री बाळगा खरे काका. पण, 'खंडणी मागून अभयदान दिले' म्हणणे हे पब्लिक डोमेन मध्ये येणारे आरोप/दावे होत. ह्याला समर्थनार्थ पुरावे द्यायलाच हवेत, नुसता हवेत गोळीबार उपयोगी नाही. उरता उरला बोफोर्स अन सिंचनाचा प्रश्न, तर ते न्यायप्रविष्ट आहेत न? खंडणीच्या मोबदल्यात अभयदान ह्या आरोपाखाली बाळासाहेब ठाकरेंवर काही केस आहेत का? होत्या का? आजवर युती करताना हे सगळे दिसले नाही का भाजप ला? बाकी, तुम्ही सैनिक माणसे , तुम्ही म्हणाल ते प्रमाण अन ग्राह्य , तुमचा आदर नाही करणार तर कोणाचा करणार.......
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/18/2017 - 09:23

In reply to गल्लत होते आहे का डॉक्टर काका by जेम्स वांड

Permalink

मी सैनिक होतो किंवा डॉक्टर

मी सैनिक होतो किंवा डॉक्टर आहे म्हणून एखादी गोष्ट सकृतदर्शनी स्वीकारावी असे मुळीच नाही. परंतु काही गोष्टींना पुरावे मागता किंवा देता येत नाहीत. मुंबईच्या राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या माणसांना हे माहित आहे कि मातोश्री कडे जाणारा ओघ कशा कशाचा आणि का असतो? एन्रॉनची कहाणी वाचून पहा. https://www.outlookindia.com/magazine/story/the-real-story-of-dabhol/211469 याचे पुरावे देता येणार नाहीत. पण आज १०५०० कोटीच्या तोट्यासह हि कंपनी कुठे आहे तेही पाहून घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 07/18/2017 - 14:48

In reply to मी सैनिक होतो किंवा डॉक्टर by सुबोध खरे

Permalink

आपल्यामुळे १९८४ मध्ये

आपल्यामुळे १९८४ मध्ये मुंबईतील शीख वाचले असा दावा करणार्‍या बाळासाहेब ठाकर्‍यांनीच १९८८ मध्ये पत्रकार परीषदेत खालील इशारा दिला होता. Bombay's one lakh Sikhs will face a crisis unless they accede to the demands of Shiv Sena Pramukh, Bal Thackeray. At a bizarre press conference on March 19, which was a virtual inquisition, the Shiv Sena chief gave them a one-month ultimatum. Within this time, he said, they should send a delegation to Amritsar instructing the high priests to issue a hukumnama against the extremists; else he would enforce a social and economic boycott of them. http://indiatoday.intoday.in/story/shiv-sena-chief-bal-thackeray-targets-sikhs/1/329167.html खालील वृत्तात असे लिहिले आहे की - 1988: Thackeray's 'boycott of Sikhs businesses' idea is quietly abandoned after extorting crores from Sikhs in Mumbai. https://www.outlookindia.com/magazine/story/tooth-and-claw/283066 खालील ठिकाणी १९८४ चा संदर्भ आहे. http://neetakolhatkar.com/index.php/uncategorized/a-roar-that-isnt.html
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 07/18/2017 - 15:18

In reply to पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे by सुबोध खरे

Permalink

डॉक्टर आजपासून बाहेरच्या

डॉक्टर आजपासून बाहेरच्या लोकांना व्हाईट वाईन"च" चांगली "असेच सांगायचे
बाहेरचे म्हणजे कोण ? आणि असे का सांगायचे ? हे काही कळले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/18/2017 - 18:40

In reply to डॉक्टर आजपासून बाहेरच्या by मराठी_माणूस

Permalink

बाहेरचे म्हणजे बाळासाहेबांचे

बाहेरचे म्हणजे बाळासाहेबांचे हुजरे आणि मुजरे
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 07/19/2017 - 10:49

In reply to बाहेरचे म्हणजे बाळासाहेबांचे by सुबोध खरे

Permalink

आणि तसे सांगण्याचे कारण ?

आणि तसे सांगण्याचे कारण ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/19/2017 - 11:28

In reply to आणि तसे सांगण्याचे कारण ? by मराठी_माणूस

Permalink

आतले आणि बाहेरचे यातील फरक.

आतले आणि बाहेरचे यातील फरक.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 07/19/2017 - 12:06

In reply to आतले आणि बाहेरचे यातील फरक. by सुबोध खरे

Permalink

प्रश्न डॉक्टरांनी रेड सजेस्ट

प्रश्न डॉक्टरांनी रेड सजेस्ट केली असताना व्हाईट चांगली असे सांगायचे कारण काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/19/2017 - 12:09

In reply to प्रश्न डॉक्टरांनी रेड सजेस्ट by मराठी_माणूस

Permalink

कारण साहेबाना व्हाईट वाईन

कारण साहेबाना व्हाईट वाईन आवडत असे आणि ते "तीच" पीत असत
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Wed, 07/19/2017 - 12:18

In reply to कारण साहेबाना व्हाईट वाईन by सुबोध खरे

Permalink

मला या प्रसंगात सांगण्यासारखे

मला या प्रसंगात सांगण्यासारखे काय आहे तेच कळले नाही! तुम्ही साधारण असं सांगण्याचा प्रयत्न करत आहात का कि बाळासाहेबांनी धमकी दिली कि इथून पुढे व्हाईट वाईन सांगायचं? मला तरी तो परिस्थितीजन्य विनोद असेल असे वाटते. नितु मांडके आणि बाळासाहेबांचे संबंध साधारणपणे सर्वश्रुत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/19/2017 - 12:19

In reply to कारण साहेबाना व्हाईट वाईन by सुबोध खरे

Permalink

साहेब हे दैवत होतं

साहेब हे दैवत होतं आणि साहेब करतात ते बरोबरच असतं हे जगाला दिसलं पाहिजे. राजकीय अपरिहार्यता (political compulsion) हि वैद्यकीय सल्ल्याचा वरची असते. उद्धव ठाकरे यांनी बायपास करण्याऐवजी अँजियो प्लास्टी केली आणि पाच (कदाचित सात) स्टेंट बसवले. साधारण तीन पेक्षा जास्त स्टेण्ट लागणार असतील तर बायपासचा सुचवलं जातो. कारण तीन चार पैकी एक किंवा अधिक स्टेण्ट परत ब्लॉक होण्याची शक्यता असते. http://www.hindustantimes.com/mumbai/uddhav-thackeray-undergoes-angioplasty-docs-say-he-is-fine/story-2ISxotzn5GD6j3qq9BPNvL.html इतरही अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. पण त्या जालावर नको.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 07/19/2017 - 13:58

In reply to साहेब हे दैवत होतं by सुबोध खरे

Permalink

<<<इतरही अनेक सुरस आणि

<<<इतरही अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. पण त्या जालावर नको.>> ==>> का ?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 07/14/2017 - 18:22

Permalink

हे सगळं वाचून ..

हे सगळं वाचून मला मात्र २०१९ कधी येते आहे असं झालं आहे. माझा असा अंदाज आहे की भाजपा फार मोठी चूक अशी करणार नाहीत की लोकांनी आतापर्यंत डेस्परेटली पर्याय म्हणून पुन्हा कॉंग्रेस वा समाजवादी पक्षांकडे परत सत्ता द्यावी. ज्या प्रमाणे राज हा फुसका बार ठरला त्याप्रमाणे उद्धव ही ठरेल पण शिवसेना मनसे इतकी तळाला मात्र जाणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 07/15/2017 - 13:47

In reply to हे सगळं वाचून .. by चौकटराजा

Permalink

२०१९ मध्ये लोकसभेसाठी भाजप व

२०१९ मध्ये लोकसभेसाठी भाजप व शिवसेना पुन्हा एकदा युती करण्याची बरीच शक्यता आहे. परंतु विधानसभेसाठी युती होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Fri, 07/14/2017 - 21:11

Permalink

सहमत

वरील चर्चेत श्रीगुरुजी यांनी मांडलेल्या मतांशी मी बहुतांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Fri, 07/14/2017 - 22:41

Permalink

भेदरने. धास्ती खाने. झोल

भेदरने. धास्ती खाने. झोल खाने/ मारने. पाचातले तीन जाणे. वग्रै. किंवा गळपटणे. वाक्यात कसा उपयोग करता येईल ? *** न च्या जागि न आणि ण च्या जागि ण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Fri, 07/14/2017 - 22:47

In reply to भेदरने. धास्ती खाने. झोल by सचु कुळकर्णी

Permalink

तोंडाले फेस येने

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Fri, 07/14/2017 - 23:00

Permalink

सक्काडि सक्काडि चाल्लो हाव रे

सक्काडि सक्काडि चाल्लो हाव रे भाव मिंया-मार च्या यँम्बेशित ईचारतो त्याईले का तुमचा जनरल हिकड काह्याले धाडला... बाप्पा काहुन माय मले माईती चा अधिकार नाय ? पिल्लमपोया
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Fri, 07/14/2017 - 23:20

Permalink

भाजपा फार मोठी चूक अशी करणार

भाजपा फार मोठी चूक अशी करणार नाहीत की लोकांनी आतापर्यंत डेस्परेटली पर्याय म्हणून पुन्हा कॉंग्रेस वा समाजवादी पक्षांकडे परत सत्ता द्यावी. ज्या प्रमाणे राज हा फुसका बार ठरला त्याप्रमाणे उद्धव ही ठरेल पण शिवसेना मनसे इतकी तळाला मात्र जाणार नाही. चौरा काका भाजप आता मोठ्ठा मगर / देवमासा झालाय. आता त्यांना त्यांच्या कडुन ह्यापुढे जर झालिच तर ति चुकच हरवु शकते बाकि कोणि सध्या दुर दुर पर्यंत दिसत नाहि. Actually भाजपा किंवा मोदि अजिंक्य नाहि झालेत पण विरोधिपक्ष (?) कोता झालाय जो फक्त त्यांच्या प्रवक्ते किंवा निवडक न्युज च्यानेल पुरता मर्यादित झालाय. 2017 अर्ध झालय पण ह्यांना अजुनहि भान नाहि आलय कि भाजप सोडुन जो मोठा पक्ष आहे तो फक्त 44 वर आहे. असो बापडे.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 07/15/2017 - 22:25

Permalink

एक प्रश्ण आहे.

मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ? एकहाती सत्ता.....मग पुढे काय? असं तर नाही ना की मोदींना सत्ता यशोदाबेनच्या हातात सोपवायची आहे ???????? (टिपीकल राजकारणीय घराणेशाही)
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sat, 07/15/2017 - 22:55

In reply to एक प्रश्ण आहे. by इरसाल

Permalink

देवा!!

शिवसेना समर्थक दुसर्‍यांवर घराणेशाहीचा आरोप करतायत =))
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sun, 07/16/2017 - 05:53

In reply to एक प्रश्ण आहे. by इरसाल

Permalink

एक हाती सत्ता ...

हुकुमशाहीचे फायदे लोकशाही पेक्षा ऐहिक सुख येण्यासाठी कितीतरी अधिक असतात. जगाचा इतिहास असा आहे की हुकुमशहा " जनतेसाठी हुकुमशहा " रहात नाही. त्यामुळे शराब को शराबीयोने बदनाम किया या चालीवर हुकुमशाही बदनाम होत रहाते. लोकशाही नसेल तर किती वेगाने प्रगति होउ शकते याची चीन हे उदाहरण आहेच.. आणि आपली लोकशाही तरी कशी ६५ टक्के सताधार्‍याने खायचे व ३५ टक्क्के विरोधकाने . फक्त जनतेसमोर भांडणाचा फार्स करीत पडद्यामागे एकाच प्याल्यात दारू प्यायची.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sun, 07/16/2017 - 12:15

In reply to एक हाती सत्ता ... by चौकटराजा

Permalink

हो ना हो! पण एक आहे हं,

हो ना हो! पण एक आहे हं, लोकशाही कोणालाही त्याला अक्कल नसेल त्या क्षेत्रात बोलायची सूट देते! भरपूर उदाहरणे इथे मिपावरच सापडतील, काय म्हणता?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 07/16/2017 - 14:23

In reply to एक प्रश्ण आहे. by इरसाल

Permalink

मित्र पक्षांना संपवुन मग पुढे

मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ? मित्रपक्षांना संपविण्याची गरज नाही. ते स्वतःहूनच आत्मघात करून घेत आहेत. मित्रपक्षांना जिवंत रहायचे असेल तर त्यांनी आंधळा मोदीद्वेष सोडून, मोदींना विरोधासाठी विरोध करणे सोडून, मोदींना अपशकुन करण्यासाठी देशाच्या शत्रूंबरोबर हातमिळवणी करणे सोडून विधायक भूमिका घेणे व स्वतःची विश्वासार्हता वाढविणे आवश्यक आहे. एकहाती सत्ता.....मग पुढे काय? सर्व विरोधी पक्ष स्वतःहून आत्मघात करीत असल्यामुळे सत्ता एकहातीच राहणार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 07/18/2017 - 00:32

In reply to मित्र पक्षांना संपवुन मग पुढे by श्रीगुरुजी

Permalink

दिल्लीच्या शिंव्हासणातच ही

दिल्लीच्या शिंव्हासणातच ही दिफौल्ट भाषा दिसते. एकेकाळी औरंग्याने हेच ऐकवले होते. अगदी सेम डायलॉग.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 07/18/2017 - 08:03

In reply to दिल्लीच्या शिंव्हासणातच ही by अभ्या..

Permalink

औरंग्या, अफजुल्या, आदिलशहा,

औरंग्या, अफजुल्या, आदिलशहा, मोगलांची फौज . . . परत सुरू झालेलं दिसतंय. आता कोथळा, थडगं, छाताड, वज्रमूठ इ. सुरू होईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 07/16/2017 - 14:48

Permalink

प्रभू रामचंद्रांची कामगिरी

जेम्स वांड, त्याहून पुढे जाऊन, प्रभू रामचंद्रांनी तरी काय केलं जनतेसाठी? बाललीला झाल्यावर लग्न, मग वनवास अन मग पत्नी पळवून नेणाऱ्या विरुद्ध युद्ध! खर आणि दूषण या राक्षसांची नावं ऐकली असतील तुम्ही. वसिष्ठ आणि विश्वामित्र दोघांनीही रामलक्ष्मणांना शिक्षणासाठी विश्वामित्रांच्या आश्रमात जाऊ देण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा विश्वास सार्थ करीत या दोघांनी आश्रम क्षेत्रे राक्षसी पीडेपासून मुक्त केली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 07/16/2017 - 18:33

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Mon, 07/17/2017 - 11:02

In reply to (No subject) by श्रीगुरुजी

Permalink

धन्य हो..!!

गुरुजी तुम्ही आता निलेश राणेंना जवळ केलाय का?
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 07/17/2017 - 12:44

In reply to धन्य हो..!! by विशुमित

Permalink

दुशमन का दुशमन दोस्त होत्या

दुशमन का दुशमन दोस्त होत्या हय!! डायलयाग नही सुन्या क्या? नितेश राणे व्यंगचित्र मस्त काढतात हे माहिती नव्हतं पण! सध्याच्या परिस्थितीवर भारी जमलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 07/17/2017 - 15:34

In reply to दुशमन का दुशमन दोस्त होत्या by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

जरा हलकेच घ्या हो. मलिष्काचे

जरा हलकेच घ्या हो. मलिष्काचे विडंबन रॅप पाहिल्यानंतर सेना नेते भडकले तसे करू नका. विनोद, व्यंगचित्रे याचा आनंद घ्या. इथे दुश्मन, दोस्त याचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 07/17/2017 - 16:01

In reply to जरा हलकेच घ्या हो. मलिष्काचे by श्रीगुरुजी

Permalink

हाहाहा! भडकतंय कोण, मी तर

हाहाहा! भडकतंय कोण, मी तर स्तुती केली त्या व्यंगचित्राची! तुम्हीच सिरिअसली घेताय :) हे आसंच असतं बगा तुमचं, मलिष्का प्रकरणावर भाष्य करायचं म्हणून मी रागात, कैच्या कै! येवडा इनोद मारला आन तुमी आमालाच रागात मना! जरा विनोद, स्नॅपचॅट याचा आनंद घेत चला! नेते म्हणलं की भडकणं वगैरे आलंच, परवा ते स्नॅपचॅटवरून नेते भडकल्याचंही वाचण्यात आलं!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 07/17/2017 - 16:42

In reply to हाहाहा! भडकतंय कोण, मी तर by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

रागावला नाहीत ना. मग ठीक आहे.

रागावला नाहीत ना. मग ठीक आहे. परवा ती पेडणेकर बाई मलिष्काला मूर्ख वगैरे म्हणाली. ढिंगटांग मध्येही बऱ्याचदा उधोजींची खेचली जात असल्याने सेना समर्थक चिडलेले असतात. म्हणून वाटलं की हे व्यंगचित्र पाहून तुम्हालाही राग आला की काय.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 07/17/2017 - 17:26

In reply to रागावला नाहीत ना. मग ठीक आहे. by श्रीगुरुजी

Permalink

तिथेच गडबड आहे गुरुजी, सेना

तिथेच गडबड आहे गुरुजी, सेना समर्थक चिडत असतील हो! काय आहे मी काही नेता नाहीये. शिवाय मी अंध भक्त किंवा अंध विरोधक ही नाहीये. मग कशाला येईल राग?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 07/17/2017 - 18:22

In reply to तिथेच गडबड आहे गुरुजी, सेना by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

ज्याला आला राग, त्याला चावला

ज्याला आला राग, त्याला चावला वाघ =))
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Mon, 07/17/2017 - 19:45

In reply to ज्याला आला राग, त्याला चावला by अभ्या..

Permalink

वाघ चावायला लागल्यापासुनच तर

वाघ चावायला लागल्यापासुनच तर राग येवुन र्हायला भौ. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 07/17/2017 - 22:13

In reply to ज्याला आला राग, त्याला चावला by अभ्या..

Permalink

जो नाही कावला, त्याला वाघ

जो नाही कावला, त्याला वाघ चावला।
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 07/17/2017 - 22:49

In reply to जो नाही कावला, त्याला वाघ by श्रीगुरुजी

Permalink

विनंतीला उध्दवदेव पावला,

विनंतीला उध्दवदेव पावला, म्हणून मातोश्रीला फोन लावला.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com